बंगला - भाग १

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 1:53 am

भाग १

नविनच फ्लॅट घेतला. थोडा गावा बाहेर. एका नवीन बिल्डींगमधे. मुलांची शाळेची आणि बायकोची ऑफिसची बस जवळच्या वळणावर येत होती. त्यामुळे त्यांना काहीच त्रास नव्हता. माझ ऑफिस जवळच होत. त्यामुळे मी माझ्या स्कूटरने जायचो. मला पहिल्यापासूनच शांतता आवडते. म्हणून तर बायको आणि मुल फारशी तयार नसतानासुद्धा मी हा flat बुक केला होता. खर तर मला बंगलाच आवडला असता. अगदी आमच्या बिल्डिंग समोरच जसा टुमदार बंगला आहे तसा. ते एक मी माझ्या मनाशी जपलेल.... फक्त मलाच माहित आहे..... अस माझ एकट्याच स्वप्न आहे. पण परवडणार नाही म्हणून तर हा फ्लॅट पसंत केला होता. किमान समोर दिसणारा बंगला बघून मनातल्या मनात समाधान करून घेतो.

सुंदरच आहे तो बंगला. बाहेर छान आवार. गुलाब, चाफा, वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद अशी एक ना अनेक फुल झाड आहेत आणि चार नारळ, एक आंबा, एक फणस, जांभुळ, बकुळ अशी मोठी झाड़ देखील आहेत.. घरावर कायम सावली. बाजुनी तारेच कुंपण. मोठस गेट. पोर्च. बहुतेक वरुन पोर्चच्या वरच्या बाजूला गॅलरी होती.

आता तुम्हाला वाटेल मला कस काय हे सगळ माहित; ते ही इतक्या डिटेलमध्ये! अहो संध्याकाळी बाहेर पडतो ना मी ऑफिसमधून आलो की, ते मुद्धामच. मला या बंगल्याच निरीक्षण करायचा नादच लागला आहे. इतके दिवस रोज फिरतो त्याच्या बाजूने आणि रोज काहीतरी नवीन दिसत. कधी नवीन आलेलं फुल किंवा नवीन लावलेलं झाड. मोठ्या झाडांना लागलेली फळ मोजण मला फार आवडत. मी राहायला आलो त्याच दिवशी तिथे जाऊन तिथल्या नोकराकडे चौकशीसुद्धा करून आलो. सर्वसाधारण मानवी स्वभाव; दुसर काय? कळल ते अस की एक एकटी मध्यम वयाची कोणी स्त्री राहाते. बस्! का कोण जाणे माझ कुतूहल जाग झाल आहे.

तो नोकर.... किंवा माळी किंवा खानसामा... काय हवी ती उपाधी देता येईल..... तो माझ्याकडे थोडा विचित्र नजरेने पाहत असतो म्हणा. पण मी मुद्धामच बंगल्याच्या थोडा लांबून चालतो. त्यामुळे त्याला माझ हे निरीक्षण करण आणि बंगल्याच्या आजूबाजूला घोटाळण आवडत नसल तरी तो काही बोलू शकत नाही.

बंगल्याच्या मालकीणबाई मध्यम वयाच्या अस आपल् म्हणायच. पण दिसायला अत्यंत सुंदर, टापटिप अशा होत्या . रोज सकाळी 7 ला त्या पोर्चच्या गॅलरीमधे बसून चहा घ्यायच्या. मग 10/10.30 पर्यंत बागेत काम करायच्या. त्यानंतर कधी या गॅलरीत तर कधी त्या खिड़कीत दिसायच्या. कधी पडदे सारखे कर; कधी गाण गुणगुणत शिवण-टिपण कर. शिवण-टिपण हा आपला माझा अंदाज हो; नाहीतर म्हणाल याला बरे माहित ती सुंदर बंगल्याची सुंदर मालकीण तिच्या घरात काय करते ते. हा हा हा!

मग मात्र त्यांचे दर्शन 4 च्या सुमारास आंब्याच्या झाडाकडच्या गॅलरीत चहा घेताना व्हायच. बाई मजेत चहा आणि नाष्टा करते. एकटी असली तरी शिस्त भारी आहे बहुतेक. चहा केटलीतूनच लागतो. आणि नाश्तासुद्धा काहीतरी गरम-गरम असतो. उगाच चकल्या-चिवडा अस नसावं; असा माझा अंदाज बरका. मग छान तयार होऊन कुठेतरी बाहेर पडतात. जाताना बागेत फूल तोडून डोक्यात माळताना अनेकदा दिसतात, पण बाहेर बहुतेक मागच्या गेट ने जात असतील. पुढच गेट उघडताना कधी दिसायच्या नाहीत. बहुतेक बाजार किंवा लायब्ररी किंवा एखाद महिला मंडळ असावं. पण आजूबाजूला कोणाशी कधी बोलताना बघितल नाही त्यांना. आमची बिल्डिंग तशी नवीन. त्यामुळे इथले लोकं पण नवीन. पण त्याच्या बंगल्याच्या थोड पुढे एक बिल्डिंग होती. तिन मजली. बऱ्यापैकी जुनी असावी. पण तिकडचे कोणी कधी बंगल्याकडे आलेले बघितले नाहीत किंवा मालकीणबाई कधी त्या बिल्डींगच्या बाजूला गेलेल्या दिसल्या नाहीत. त्यांच्याकडे कधी पाहुणे आलेले देखील दिसले नाहीत; की त्यांच्या रूटीनमधे कधी फरक पडला नाही.

फ़क्त गॅलरीत असोत किंवा बागेत.. त्यांची माझी दृष्टादृष्ट व्हायची तेव्हा त्यांना माझ्याशी बोलायच आहे अस मला वाटायच. बहुतेक त्या हसायच्या देखिल माझ्याकडे बघुन. कदाचित ती माझी आंतरिक इच्छा होती; म्हणून भासही होत असेल... पण त्याना कधी कोणाशीही बोलताना बघितलं नाही की पुढच्या गेटजवळ आलेलं बघितल नाही. त्यांचा सोबती अस म्हणायला तो एकुलता एक नोकर होता; बंगल्याची काळजी घेणारा... आवारातल्या दोन खोल्यात राहणारा. बस्! पण त्यालाही कधी कोणाशी बोलताना बघितला नाही.

कथा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

5 Oct 2015 - 7:36 am | कविता१९७८

कथा काय असेल याचा अदाज येतोय, भुतबन्गला असावा बहुतेक