जागे राहा, रात्र भुताची आहे.... रिलोडेड..... (स्वैर अनुवाद)

अजिंक्य विश्वास's picture
अजिंक्य विश्वास in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 10:21 pm

लहान मुलांनी सांगितलेल्या विचित्र गोष्टी....
१. मी माझ्या मुलाला- झोप आता. तुझ्या बेडखाली काहीच नाहीये.
माझा मुलगा- पण पप्पा , तुमच्या मागे ’तो’ उभा आहे ना!
२. माझी ३ वर्षाची मुलगी घरात लाईटस्‌ गेले असताना अचानक म्हणाली,’ बाबा वर पाहा ना. आपल्या पंख्याला कोणीतरी माणूस लोंबकळून झोके घेतोय्‌.’
३. मी माझ्या ४ वर्षाच्या मुलीला गोष्ट सांगत होतो, तेवढ्यात तिने माझ्या हातातील पुस्तक झटकन्‌ बंद केले आणी उघड्या दाराकडे बोट करत म्हणाली, तू निघून जा इथून लगेच. तू आधीच कितीतरी लोकांना मारले आहेस. हे माझे पप्पा आहेत.
४. माझा मुलगा स्वत:शीच हातवारे करत बोलत बसला होता. मी त्याला विचारले तर तो म्हणाला, ’बघा ना पप्पा , हे तिघे काय म्हणत आहेत. ते मला म्हणत आहेत की आम्हांला तुमच्या बागेतील मागल्या नारळाच्या झाडाखाली पुरले आहे. मला तिकडे त्यांना पाहायला बोलवत आहेत. ’
५. माझा भाऊ लहान मुलांना गोळ्या वाटत होता. त्याने एका लहान मुलीला विचारले.’ बाळा तुला गोळ्या हव्यात?’
ती त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली,’ हे तुम्ही त्या बागुलबुआच्या घरात लऊन बसून म्हणत होता ना? ’
६. माझ्या सात वर्षाच्या मुलाने मला विचारले- आई मी तुझ्यासारखा ४१ वर्षाचा होईल, तेव्हा तू किती वर्षाची होशील?’
मी म्हणाले ’ मी ७५ वर्षाची होईल.’
’किंवा तोपर्य़ंत मेलेली असशील.’ माझी ५ वर्षाची मुलगी चटकन्‌ बोलली.
७. माझी मुलगी तिच्या बेडरूममध्ये एकटीच रडत बसली होती. मी जाऊन तिला विचारले तर ती मला म्हणाली- बघ ना आई, आज आपण सिमेट्रीमध्ये ज्या बाईला पुरून आलो, ती समोर बसून, मला सारखी चिडवत आहे.
८. माझ्या मित्राच्या ३ वर्षाच्या मुलाने मित्राला अचानक म्हटले- पप्पा मी तुमच्या तोंडावर उशी दाबून तुम्हाला देवाघरी पाठवणार आहे, आईसारखेच. ’
९. तुम्ही राजेश काकाला टाटा करणार नाहीत?
माझी मुलगी झोपाळ्यावर झोके घेत असताना मला म्हणाली. राजेश माझा भाऊ होता, तो मरून ९ वर्षे होऊन गेली होती. त्यावेळेस तिचा जन्मही झाला नव्हता. आणि आमच्यातील कोणीही तिच्याजवळ हा विषय कधीच काढला नव्हता.
मी तिला विचारले, ’तुला राजेश काका कसा काय माहिती आहे गं?’
’त्यात काय एवढं?’ ती म्हणाली. ’ तो रोज तर मला भेटतो. आतापण तो समोर उभा आहे आणि मला जपून झोके घ्यायला सांगतोय. पहा ना तिकडे.’
१०. माझी मुलगी घरातल्या एका खांबाकडे एकटक पाहत होती. मी विचारले असताना ती म्हणाली, ’ पिंटूने तिकडे एक गोष्ट केली होती.’
आमच्या घरात आणि आजूबाजूला कोणीच पिंटू नावाने राहत नव्हते.
मी तिला आश्चर्याने विचारले, ’ कोण हा पिंटू? आणि काय केले त्याने?’
’तो रोज रात्री छतावरून माझ्या खोलीत येतो.’ ती म्हणाली, ’ आणि मला सारखे सांगत असतो, की त्याने त्याच्या आईला त्या खांबाजवळ बॅटने मारले. तू पण कर, छानपैकी रक्ताचे कारंजे उडते असे केल्याने!’
११. माझ्या चारही आयांमध्ये तू माझी सर्वात आवडती आई आहेस!
’मी तुझी एकुलती एक आई आहे.’ मी चकीत होत माझ्या मुलीला म्हणाले.
ती बेसमेंटकडे हात करून म्हणाली,’ त्या तीन आयापण हेच म्हणत असतात.!’

१२. नी मिळालेल्या जेवणाबद्दल देवाकडे आभार मानले आणि ते माझ्याकडे पाहात गालातल्या गालात हसले. मी चमकून डायनिंग टेबलावर पाहिले तर ...
टेबलावर अन्नाचा एक कणदेखील नव्हता...!!! ( रत्नाकर मतकरी- जेवणावळ या कथेशी विलक्षण साधर्म्य)
स्वैर अनुवादक- अर्थात मीच
मूळ कल्पना- आंतरजालावरून साभार

मौजमजाआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 10:35 pm | मांत्रिक

हायला!!! पितृपक्षाची भेट काय वाचकांना!!!

द-बाहुबली's picture

2 Oct 2015 - 10:42 pm | द-बाहुबली

xD खिक्क...

बाकी लिहते झाल्याचे स्वागत होइल असेच धागा लिखाण.

जव्हेरगंज's picture

2 Oct 2015 - 10:50 pm | जव्हेरगंज

छानपैकी रक्ताचे कारंजे उडते असे केल्याने!’>>>>:-D:-D:-D:-D:-D:-D:-D

सर्व विनोद मस्त आहेत :-D:-D:-D:-D:-D

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 11:03 pm | मांत्रिक

माझा एक खरा अनुभव आहे. मी एक आठवड्यापूर्वी गावी होतो. रात्रीचे १० वाजले असतील. वरती गच्चीवर निवांत शतपावली करत होतो. माझी ३ वर्षाची मुलगी आली वर. मला पप्पांच्याकडे जायचे म्हणून.
थोडा वेळ आम्ही टेडी घेऊन खेळत होतो. अचानक मुलगी घाबरली. शेजारच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाली "पप्पा! तिथं कोण बसलंय?" अंगावर काटाच आला माझ्या. तिची खोटी समजूत घालून लगेच खाली घेऊन आलो.

अजिंक्य विश्वास's picture

2 Oct 2015 - 11:09 pm | अजिंक्य विश्वास

सर्वांसाठी ता. क. - लेख वाचा, घाबरा किंवा हसा....
पण एन्जॉय नक्की करा... :)

पियुशा's picture

2 Oct 2015 - 11:12 pm | पियुशा

आई ग घाबरले मी आता झोप नै येणार

प्यारे१'s picture

2 Oct 2015 - 11:26 pm | प्यारे१

बेष्टाड बेष्ट!

पैसा's picture

2 Oct 2015 - 11:32 pm | पैसा

तुमचं नाव बघून वाचलं. आता रात्री कशाला वाचलं ते?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गोयंकर भुतास घाबरत नैत असं ऐकलेलं. बहुधा अफवा असावी. माझी आजी कोकणातल्या भुतांच्या गोष्टी आणि काही अनुभव सांगायची त्याची आठवण आली.

पैसा's picture

4 Oct 2015 - 9:34 pm | पैसा

काहीही हं चि! आम्ही घाबरतो बुवा! कारण कोकणात आणि गोव्यात जेवढी भुते आहेत तेवढी अख्ख्या होल इंड्यात मिळून नसतील!

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 9:53 pm | प्रचेतस

त्यांना गाणगापूरला का नेत नाहित म्हणे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एवढी "झाडं" आख्ख्या गोव्यात नैत.

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 9:56 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

पैसा's picture

4 Oct 2015 - 9:56 pm | पैसा

ती भुते कोणाच्या मानगुटीवर बसली तर त्या माणसाला नेता येईल. पिंपळावर, पडक्या घरात, पारावर, विहिरीवर अशी कुठे कुठे लपून बसलेली असतात त्यांना कसे नेणार?

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 9:58 pm | प्रचेतस

सोप्पंय की.

माणसांना पिंपळावर, पडक्या घरात, पारावर, विहिरीवर आणि असं कुठं कुठं न्यायचं. मग त्यांना भूतानं धरलं की डायरेक्ट गाणगापूरच गाठायचं.

पैसा's picture

4 Oct 2015 - 10:01 pm | पैसा

रस्त्यावरच्या माणसाला धरून पारावर नेलं तर आधी आपल्याला गाणगापूरला नेतील!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 10:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक दोन सुंदर हडळी आहेत का हो गोव्यात?

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 10:13 pm | टवाळ कार्टा

gost
awesome

उगा काहितरीच's picture

3 Oct 2015 - 12:50 am | उगा काहितरीच

रात्रीचे १२:५० झालेत , अंधार , थोडा पाऊस , अन् हे लेखन !

dadadarekar's picture

3 Oct 2015 - 5:55 am | dadadarekar

छान

पद्मावति's picture

3 Oct 2015 - 2:20 pm | पद्मावति

मस्तं! सही लिहिलंय.
१० आणि ११ नं. किस्से खतरनाक.

नीलमोहर's picture

3 Oct 2015 - 2:45 pm | नीलमोहर

रात्री शीर्षक पाहून लेख उघडलाच नाही, आत्ता वाचला.

घाबरलेही आणि एन्जॉयही केला...
:)

दिनु गवळी's picture

4 Oct 2015 - 3:54 am | दिनु गवळी

काल मी व दिनु खेकडे पकडायला गेलो होतो तेव्हा नदीच्या आजुबाजुला झाडीतुन विचीत्र आवाज येत होता पानाची सळसळ पन आम्ही घाबरलो नाही जर खेकडाचा रस्सा खायचा होतै तर या भुतांना कोन घाबरत बसलय या रस्सा प्यायला.

झाडीतुन विचीत्र आवाज येत होता पानाची सळसळ ती गावातलीच मंडळी असतील कुणीतरी! ;)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 11:23 am | टवाळ कार्टा

काल मी व दिनु खेकडे पकडायला गेलो होतो

तुमी स्प्लिट पर्सनॅलिटीवाले कै?

जव्हेरगंज's picture

4 Oct 2015 - 4:48 pm | जव्हेरगंज

Fighting with Baseball Bat

दत्ता जोशी's picture

4 Oct 2015 - 11:57 am | दत्ता जोशी

>मांत्रिक : ती गावातलीच मंडळी असतील कुणीतरी" : नाही हो त्यांचे गाव **** मुक्त आहे.
टवाळ कार्टा : तुमी स्प्लिट पर्सनॅलिटीवाले कै? मी, स्वतः आणि दिनू?
@ दिनू: कृ हलके घ्या. ( खास मिपा टर्म )

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:04 pm | टवाळ कार्टा

>मांत्रिक : ती गावातलीच मंडळी असतील कुणीतरी" : नाही हो त्यांचे गाव **** मुक्त आहे.

फारच सोज्वळ बुवा तुम्ही...अल्का कुबल्चे पिच्चर जास्त बघायचा का? =))

दत्ता जोशी's picture

4 Oct 2015 - 12:47 pm | दत्ता जोशी

" फारच सोज्वळ बुवा तुम्ही...अल्का कुबल्चे पिच्चर जास्त बघायचा का?"
काय संदर्भ मिळेना बघा.

सोडून द्या. फार शिरेस नाहीये. ;)

तुडतुडी's picture

4 Oct 2015 - 1:03 pm | तुडतुडी

म्हणजे ? समजलं नै . हे कसले किस्से आहेत सगळे ? आणि 'रिलोडेड' काय आहे ?
रत्नाकर मतकरींची 'जेवणावळ' मात्र भारी आहे हा . त्याच्यातली क्लक क्लक करून हसणारी बाई आणि तिचे ते विधी . बापरे

अजिंक्य विश्वास's picture

4 Oct 2015 - 1:11 pm | अजिंक्य विश्वास

रिलोडेड ...मी माझ्या फेसबुक अकाऊंटवर ह्या आधीही अश्या २-३ ओळींच्या भय-भूतकथा अनुवाद करून पोस्ट केल्या होत्या. त्यातली ही तिसरी वेळ होती, म्हणून रिलोडेड असे लिहिले होते. आता २-३ दिवसात आधीच्या गोष्टींची सुद्धा जमल्यास नवीन पोस्ट करेन.

द-बाहुबली's picture

4 Oct 2015 - 4:31 pm | द-बाहुबली

आज हा अख्खा धागा जसाच्या तसा वाट्सपला आला होता.

सगळीकडे फिरवायच्या तयारीनेच लिहिला होता. आळशीपणा झटकून अजून एक-दोन अनुवादाची कामे पूर्ण करायची आहेत , म्हणून योग्य त्या आणि मिळेल तितक्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसादांने उत्साह मिळण्यासाठी सर्व ठिकाणी पसरवत आहे.

ह्या अजून काही भूत-भयकथा. ह्या व्हॉटस्‌अपवर असायचा काही एक संबंध असणार नाहीये :)

माझ्या मांजरीला जणू काही माझ्याकडे टक लावून बघायची सवय आहे, असे मला वाटायचे. पण नंतर कळाले की, ती माझ्या मागे कोणाकडे तरी सारखी भेदरून पाहात असते.
माझी बहीण मला सारखे सांगते, की तिला माझ्या आईने मारले. मग आई कशाला उगाचच सांगत असते, की मला बहीणच नाहीये, म्हणून?
मी रोज सकाळी उठतो, आणि खिडकीबाहेर एकटक बघत राहतो. नेहमी मला काहीतरी चुकल्यासारखे वाटते. जाता-येता लोक सारखे माझ्या घरासमोर थबकून घाबरत कुजबुजत असतात. आता तरी त्यांनी हे थांबवायला हवे. मला जाऊनच ५ वर्षे झाली आहेत.
आरशासमोर हसतमुख चेहर्‍याने उभे राहिल्याने दिवस चांगला जातो, असे म्हणतात. एक दिवशी तरी माझ्या प्रतिबिंबाला हसायला सांगितले पाहीजे.
माझा रूममेट दार उघडून त्याला आत घेण्यासाठी माझे नाव घेऊन सारखे दार ठोठावत आहे. मी सरळ सरळ दुर्लक्ष करतो. काय कारु? तो माझ्या शेजारच्याच पलंगावर छान पैकी झोपला आहे.

दिवाकर कुलकर्णी's picture

5 Oct 2015 - 1:11 am | दिवाकर कुलकर्णी

ड्रँकुल्यातली ल्युसी ४० वर्षापूर्वी पाहिलेली आठवणीनं आजहि अंगावर काटा आणते.

ज्योति अळवणी's picture

5 Oct 2015 - 1:26 am | ज्योति अळवणी

मस्त........ खूप आवडल. विचाराला प्रवृत्त करणारे अनुभव. कदाचित काहीतरी सुचेलही यावरून लिहायला.

विजुभाऊ's picture

5 Oct 2015 - 12:20 pm | विजुभाऊ

माझ्या मोबाईल मधे मी बेडवर झोपलेलो आहे असा एक फोटो आहे.
मी घरात एकटाच रहातो.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2015 - 10:01 am | पिलीयन रायडर

आधी मला हे किस्से काल्पनिक वाटायचे. त्याला दणदणीत सुरूंग परवाच लेकाने लावला.
छोटा भीमच्या कार्टुनमध्ये एक राक्षस आहे "किरमाडा"... तर अचानक काही दिवसांपासुन "किरमाडा माझा फ्रेंड आहे" असा साक्षात्कार लेकाला झाला. मग हवेत हातवारे करुन गप्पा मारणे पण सुरु झालं. पण तसं रोल प्लेयिंग सगळीच मुलं करतात. मग "आई किरमाडाला सांग ग.." वगैरे सुरु झालं.. "ए किरमाडा.. तू थांब हां.. मी मम्मम करुन येतो" असं रुमच्या रिकाम्या कोपर्‍याला सांगुन झालं.
एकदा आम्ही ट्रिपला गेलो होतो तर काहीतरी विषय निघालाच किरमाडाचा. तर म्हणे "आई.. बघ तो किरमाडा कसा बघतोय माझ्याकडे".. म्हण्लं "कुठय??"
"ते काय मागच्या सीटवर बसलाय"
आम्ही टरकुन बसच्या मागच्या रिकाम्या सीट्कडे पाहिलं..
"काय घातलय बेटा किरमाडानी?" टरकलेली मी
"आईचा गाऊन"
खरंतर इथेच मी गप्प बसायला हवं होतं..
"डोळे कसे आहेत रे किरमाडाचे"
"लाsssल"
.
.
.
.
"झोप हं बाळा..."

पुन्हा किरमाडाचं नाव काढायची माझी हिम्मत झालेली नाही.

धर्मराजमुटके's picture

7 Oct 2015 - 9:34 am | धर्मराजमुटके

बाबा, आपण सगळे रात्री झोपलो होतो पण तुमचा मोबाईल चालू होता आणि कुणीतरी त्याच्यावर सबवे सर्फर खेळत होतं !