मोठ्यांचे मोठेपण आणि त्यांची विनम्रता!

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 8:09 pm

विश्वविहार करताना नारद मुनी एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले.निरनिराळ्या वयातील विद्यार्थी तिथे बसून अभ्यास करत होते. त्यातील काही विद्यार्थी ७०-७५-८० वर्षांचे होते. ते पाहून नारदांना गम्मत वाटली. ते वसिष्ठ ऋषींना म्हणाले, "माझा शिष्य ध्रुव (ध्रुव तारावाला) याला तर मी थोड्याच काळात अढळ पदावर पोहोचवले पण तुमचे हे शिष्य संपूर्ण आयुष्य घालवून काहीच मिळवू शकले नाहीत. गुरु म्हणून तुम्ही त्यांना काय मिळवून दिले?"

वसिष्ठ ऋषीं त्यांना नम्रपणे म्हणाले, "आपण देवर्षी नारद आहात, तुमची आणि माझी बरोबरी कशी बरे होऊ शकेल?"

हे संभाषण संपता संपता संध्याकाळ झाली. वसिष्ठ ऋषीं आणि नारद नदीवर संध्येकरता गेले. परत येताना जंगलातील वाटेत नारदांना अतिशय सुंदर वास आला. त्यांनी वसिष्ठ ऋषींना त्याविषयी विचारले पण वसिष्ठ ऋषीं म्हणाले की मला हा वास कुठून आणि का येत आहे याबद्दल काहीच कल्पना नाही. दोघांनी त्या सुवासाचा मागोवा घ्यायचे ठरवले. मागोवा घेत घेत ते एका गुहेजवळ पोहोचले. त्या गुहेतून तो सुवास येत होता. त्या सुवासाबरोबरच त्या गुहेतून तेजस्वी प्रकाशही बाहेर पडत होता.

नारदांना आश्चर्य वाटले. त्या दोघांनी गुहेत प्रवेश केला. गुहेमध्ये आत लांबवर एक मनुष्य झोपलेला त्यांना दिसला आणि त्याच्या शरीरामधून तो प्रकाश आणि सुगंध बाहेर पडताना त्यांना दिसले. अजून जवळ गेल्यावर त्या मनुष्याच्या शेजारी अजून एक मनुष्य झोपलेला त्यांना दिसला. त्याशेजारी अजून एक, त्याशेजारी अजून एक असे करता करता त्यांना ९९ जण झोपलेले दिसले. त्या प्रत्येकाच्या शरीरामधून तेज आणि सुगंध येत होता.

चालत चालत ते पहिल्या मनुष्याजवळ पोहोचले आणि त्यांना तो मनुष्य मृत असल्याचे आढळले. पाहता पाहता सगळे ९९ मृतदेह असल्याचे त्यांना आढळले. हे सर्व मृतदेह तेजस्वी आणि सुगंधित कसे हा प्रश्न नारदांनी वसिष्ठ ऋषींना केला.

वसिष्ठ ऋषी नम्रपणे म्हणाले, "ज्या ध्रुवाला एका जन्मात तुम्ही अढळपद मिळवून दिले त्याच धृवाचे हे त्याआधीचे ९९ जन्म आहेत. आणि त्या सर्व ९९ जन्मांमध्ये तो माझा शिष्य होता.

कथेचा स्त्रोत: ह.भ.प. दीनानाथ गंधे, नाशिक यांचे १५-२० वर्षांपूर्वी ऐकलेले कीर्तन

कथालेख

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 8:17 pm | मांत्रिक

चांदोबा स्टाईल आहे पण आवडली.

दत्ता जोशी's picture

2 Oct 2015 - 10:06 pm | दत्ता जोशी

भावार्थ आणि मतितार्थ महत्वाचा.

द-बाहुबली's picture

2 Oct 2015 - 11:14 pm | द-बाहुबली

मस्त कथा आवडली.

अवांतरः-

मोठ्यांचे मोठेपण आणि त्यांची विनम्रता!

विनम्रता सोडली तर मोठेपणाचा डॉलाराड्खाडकन कोसळतो म्हणून बहुतांश मोठे विनम्र राहतात. माजोरडेपणा राखुनही मोठेपणा मात्र आयुष्यभर न गमावलेले ही आसपास कितीतरी आहेतच की. थॉडक्यात काय तर विनम्रता ही भ्रामक मोठपणा मोठा करायला कामी येते. कारण जो प्रत्यक्ष मोठा असतो त्याची अविनम्रता (माजोरडेपणा) नाइलाजाने का होइना जनता सहन करतच जगते ना ?

तर्राट जोकर's picture

3 Oct 2015 - 1:10 am | तर्राट जोकर

सहमत!

मोठ्यांच्या विनयाचं कौतुक केलं जातं कारण सामान्य माणासाच्या मनात मोठेपणाची एक भूक असते, ती यासाठी की "आपण मोठे झालो की मान-मरातब मिळवू, मग लोक कशी आपली थुंकी झेलतात की नाही पहा" अशी शेखचिल्ली टायिप विचारसरणी असते, त्याच भूमिकेतुन ते मोठ्यांकडे पाहत असतात. एखादा विनम्र असेल तर त्यामुळेच त्याचे कौतुक होते. अथवा मोठ्याने माज केलाच पाहिजे असा अलिखित समाजमान्य समज असतो. प्रत्यक्षात उलटे असायला हवे. हे थोडं समजायला विचित्र होत असेल तर हा माझ्या लिखानाचा दोष.

भरत जाधव ने याबद्दल एक छानसा किस्सा एका मुलाखतीत सांगितलेला: त्याचे चाळीतले काही जुने मित्र तो यशस्वी झाल्यावर जरा अंतर ठेवून वागू लागले. भरत पुर्वीप्रमाणेच त्यांच्याशी वागायचा पण पुर्वीचा मोकळेपणा ते मित्र दाखवू शकत नव्हते त्यामुळे ह्याला अवघडल्यासारखे व्हायचे. काही दिवसांनी त्याला कळले की ते मित्र त्याचा उल्लेख 'मोठा झाला तर लय भाव खतो' असा करायला लागले. हे कळल्यावर भरत बोलता झाला की मी तर बदललो नाही. त्यांच्या मनात जी मोठेपणाविषयी प्रतिमा होती ती ते माझ्यावर इम्पोज करून मोकळे झाले. त्यांना जे वाटतं की मी असा वागतो हे त्यांच्या मनाने प्रतिक्षिप्त केलेले मनोव्यापार आहेत. त्या भरतशी ह्या भरतचा संबंध नाही.

दिवाकर कुलकर्णी's picture

5 Oct 2015 - 12:28 am | दिवाकर कुलकर्णी

कथा आवडली