आमचा पण बिग बॉस भाग २

यमन's picture
यमन in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 6:34 pm

व. पू . ….
ह्यांनी बहुतेक सनी लिओन चा उल्लेख "सखी "म्हणून केलाय
ह्यांच्या अनुदिनी वरती ह्यांचा मनिला घातलेला आणि टक्कल पडलेला फोटो आहे .

"भाई कडे बघून "आपण सारे पी. एल." असं रंजलेल्या 'गांजलेल्या पुरुषां वरती असं खास एखादं पुस्तकं लिहायला पाहिजे . असो .
सखी आज सकाळीच दिसली . आमच्या पोरी असले कपडे घालत नाहीत म्हणून ह्यांच्या सारख्यांच फावत .
फिक्कट लिंबू कलर ची शिफॉन साडी ;माने पर्यंत रुळणारे दाट केस .अगदी किरण सारखी .
फक्त केसांवर सोन चाफ्याची कमी .अशा सौंदर्याला सुगंधाच कोंदण हवंच .
हि पोरगी म्हणजे वाऱ्याची झुळूक . अंगावरून जाते ; अमाप सुख,प्रसन्नता देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही .
माझं अस्तित्वच सखीमय झालंय .
Mr. काळे जागे व्हा . एक क्षण भाळण्याचा . बाकी सांभाळण्याचे .
she is certainly made for Apte's ; Garware's and कीर्लोस्कर्स ….
तसेही सुंदर बायकांचे नवरे सुखी नसतातच . रस्त्या वरून जाताना इतर कोणी आपल्या बायको कडे बघत नाही ना ?ह्याच्याच कडे ह्यांच लक्ष . म्हंजे ह्यांच्या डोळ्या पुढे सुंदर बायको ऐवजी कायम पुरुषच . आणि स्वतः प्रसन्न होण्याचे इतर किती क्षण निसटतात ह्याचा हिशोब नाही .
सखी संध्याकाळी मात्र जेवायला साधीच आली होती . पुरुषांच्या बुभुक्षित नजरांचा सामना किती वेळ करणार ?
मी तीला समजावलं …"फुलणं हा फुलांचा धर्म . त्याला भुलण हा भ्रमराचा . भ्रमर भाळतील म्हणून फुलं फुलायची थोडीच राहतात ?"

गो. नि. दांडेकर ;
आप्पांची अनुदिनी म्हणजे शब्दप्रभू चे सजीव लेणे . एखाद्या आजा नि आपल्या पोरक्या नातवाला मांडीवर घेऊन तिन्ही सांजेला दूध भात भरवता भरवता सगळ्या आयुष्याचं सार आईच्या मायेनं सांगाव अशी माया प्रत्येक शब्दात.
एक एक शब्द तोलून घ्यावा .
"sunny बाळ आज रडली . श्रीमंतीत वाढलेली पोर . कामाची सवय नाही . वेदना अपरिहार्य आहे .
वेदनाच खरंतर सुखाच मूळ . नऊ महिने कळ सोसल्या शिवाय पान्हा कसा येणार . वेदनाच नसती तर माणसांनी सुख कसं भोगलं असतं
तीला समजावून समजावून सांगता सांगता साक्षात योगेश्वर पण थकला असता . मी तर मर्त्य .
संह्याद्री मला बोलवतोय . मला इथे नाही थांबता येणार .
बुद्धाला बोधी मिळाला . ज्ञानेश्वराला अजान वृक्ष मिळाला . आमच्या डोक्याला संह्याद्री ची चंद्रप्रकाशाच्या दुधात मुरलेली नागफणी . पण आम्ही तिथेही करंटेच राहिलो . संह्याद्रीची माया आम्हास स्वतः मध्ये साठवता आली नाही .
सह्य कडा म्हणजे प्रेमळ ;आपल्या आईविना पोरा साठी लग्ना विना राहिलेला बाप .
पूर्वे कडून येणारे काळे ढग आपल्या छाताडा वर थांबवून महरष्ट्राची तहान भागवणारा . दर वेळी झीजत झीजत दिवाळीला पूर्ण महादेशाला हिरवं लेणं देऊन माहेरपण करणारा .
ह्याच्या संसारात लेकर तरी किती असावीत ?गणतीच नाही . आपापल्या झापा मधून रान शेण्यांची शेकोटी करून पावसाळ्यात गोठणारे धनगर ;ढोलिया च्या तालावर झपूर्झा होणारे ठाकर , बोलक्या डोळ्यांचे संह्याद्रीचा काटक पणा घेणारे कातकरी ;गोंड .
खरंच एका बापाचा पान्हा ह्या सगळ्यांना जगवत ठेवतोय .
sunny च्या पापणीआड दुथडी भरून वाहू पाहणारी भीमा कशीबशी रोखली गेलीय .
मी तीला म्हटलं नर्मदा मैया आणि संह्याद्री ला शरण जा . रोज एक श्लोक मैयेला वहात जा .
तुझी काळजी आता त्यांची चिंता .
शुभम भवतु I नर्मदे हर हर ….

अनंत सामंत
सेकंड मेट "अनंत "ची रोजनिशी एखाद्या लॉग बुक सारखी . रोजच्या रोज तीन वेळा;जागेच्या नावा सकट नोंदी .डायरीच प्रत्येक पान वेगळ्या वेगळ्या रंगाच . एखाद्या रंगेल खलाश्याच्या प्रत्येक बंदरा वरच्या वेग वेगळ्या घरा सारखं .
"ऍना बेसिलोना च्या नशेतून मला बाहेर काढू शकणारी स्त्री अजून जन्माला यायचीय .
ह्या सनी सारख्या कैक वादळान वर एखादा सामान्य दर्यावर्दी सुद्धा मांड टाकू शकतो .तीथे कॅप्टन रॉस च्या हाताखाली तयार झालेला हा "सेकंड" कसा काय विरघळेल ?

जेंव्हा जहाजं लाकडाची होती आणि खलाशी पोलादी होते तेंव्हा पासून कागदी खलाशी आणि पोलादी जहाजं पाण्यावर यायला लागे पर्यंत एकच गोष्ट कायम राहिलेय … ती म्हणजे ह्या सनी सारख्या बेलगाम ;बेफाम आणि बेधडक वादळाला स्वतःच्या राकट पौरुष्या वर झुकवणारा खलाशी .
म्हणूनच विध्वंस करणाऱ्या वादळां ना मुलींची नावं देतात . आणि ते वादळ सुद्धा पौरुषेय पहाडा पाशी जाऊन थंडावत.
ह्या पोलादी खलाश्या ला दिवसें दिवस समुद्रावर स्वार होऊन गंज लागतो ; तेंव्हा तोच खलाशी स्त्रीस्पर्शानी कात टाकतो ;त्याचा पौरुष्य पुन्हा झळाळून उठत आणि तो परत भयाण लाटांवर आरूढ होतो.
हि सनी सुद्धा तशीच . एखाद्या खारं वारं पिउन बेफाम गलबताच्या माजावर आलेल्या शीडा सारखी . भरगच्च आणि ताठ .
पण हा "सेकंड " हाडा मासांचा खलाशी आहे .असल्या वादळान मुळे भरकटणारा "Bloody landlubber" नाही.
माझं स्वतःच सर्वस्व ऍना बेसिलोना नावाच्या शांत ;काळ्याभोर डोळ्यांच्या समुद्राच्या तळाशी मी विसर्जन केलंय . आणि आता ते चिरनिद्रा घेतंय .
तेंव्हा सनी माझ्या मार्गातून बाजूला हो . मी भरकटणारा नाही .

किरण प्रेमी, पोरांवर वैतागल्या वर " शितू "वाचणारा ,बायको मध्येच ऍना बेसिलोना गवसलेला……. यमन

क्रमशः ….

हे ठिकाणप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Oct 2015 - 7:58 pm | पैसा

:D

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2015 - 8:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चाललंय ! और आंदो :)

मित्रहो's picture

2 Oct 2015 - 8:54 pm | मित्रहो

मस्त

बोका-ए-आझम's picture

4 Oct 2015 - 12:40 am | बोका-ए-आझम

पुभाप्र!

एस's picture

4 Oct 2015 - 5:41 pm | एस

जबरदस्त!

अजया's picture

4 Oct 2015 - 6:21 pm | अजया

सही!!

gogglya's picture

6 Oct 2015 - 3:54 pm | gogglya

अजून लिहित रहा...

शलभ's picture

6 Oct 2015 - 4:02 pm | शलभ

सहीच..;)

नाखु's picture

6 Oct 2015 - 4:11 pm | नाखु

जब हर्या वपु अलगद उतरलेत.

मी करंट्याने गोनीदा फार वाचले नाहीत माचीवरचा बुधा वाचले आणि एक ज्यावरून सिनेमा निघाला होता सूर्यकांतचा ती एक वाचले.

अनंत सामंत "एम टी आय वा मारू "वाले का ? चूभू देणे घेणे.

पुभाप्र.

नाखु

स्वच्छंदी_मनोज's picture

7 Oct 2015 - 4:26 pm | स्वच्छंदी_मनोज

अनंत सामंत "एम टी आय वा मारू "वाले का ? चूभू देणे घेणे.

होय तेच ते.. फार भारी कादंबरी. एकदा हातात घेतली की सोडवत नाही. अनंत, दीपक, कॅ. रॉस आणी अनेक वक्तीरेखा जबरी उतरल्यात.

शित्रेउमेश's picture

7 Oct 2015 - 12:50 pm | शित्रेउमेश

भारीच की राव....

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 1:06 pm | प्यारे१

'गोनिदां' ना सन्नी लिओनी सारख्या बाईबद्दल लिहायला लावणं पटलं नाही. बाकि लेखन स्वातंत्र्य आहेच.

इतरांसाठी छानच. गोनिदांच्या शैलीसाठीही छानच.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 1:20 pm | टवाळ कार्टा

'गोनिदां' ना सन्नी लिओनी सारख्या बाईबद्दल लिहायला लावणं पटलं नाही. बाकि लेखन स्वातंत्र्य आहेच.

तुम्ही सन्नी लिओनी बद्दल असे लिहिणं पटलं नाही. बाकि लेखन स्वातंत्र्य आहेच.
=))

प्यारे१'s picture

7 Oct 2015 - 1:31 pm | प्यारे१

आपण सन्नी बाईंची बाजू घेणं पटलेले आहे. ;)

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 2:10 pm | टवाळ कार्टा

आपणांस मुद्दा कळलेला नाही

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 2:13 pm | दिपक.कुवेत

मला तर लेखच कळला नाहि...

अंताक्षरी (गाण्याच्या भेंड्या) चा खेळ खेळताना एखादं कुठलंसं गाणं आलं की मैने प्यार किया ची अंताक्षरी सुरु होते. मग भसाड्या सुरात लो आज मै कहती हू ..... 'आय ला बुलिव' पर्यंत ते सुरु राहतं..

तुम्ही 'मिपाची अंताक्षरी' सुरु केली आहे.
पण मी तसाच प्रतिसाद देईन 'हा तुमचा भ्रम आहे'.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 2:27 pm | टवाळ कार्टा

लो आज मै कहती हू ..... 'आय ला बुलिव'

=))

बोका-ए-आझम's picture

7 Oct 2015 - 3:55 pm | बोका-ए-आझम

आयला बुलीव...

हे कुठे ऐकलंत प्यारेलाल ?

अजया's picture

7 Oct 2015 - 4:40 pm | अजया

=))