करू तो क्या करू ?

सुजल's picture
सुजल in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 1:08 pm

मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही.

तर झाल काय एकदा मी मोठ्या कानातल्या रिंगा अशाच खरेदी केल्या . त्या रिंगा बर्याच म्हणजे अगदी बर्याच मोठ्या होत्या आणि तीन चतुर्थावश्य होत्या म्हणजे पूर्ण गोलाकृती नव्हे. घेतल्या घेतल्या आणि लगेच दुसर्या दिवशी ऑफिस ला जाताना घातल्या पण . काय ती हौस ताबडतोब वापरण्याची. जाताना स्टेशन पर्यत रिक्षानीच गेले त्यामुळे काहीच घडल नाही किव्वा काहीच जाणवलं पण नाही पण स्टेशन वर मी पाऊल ठेवलं काय आणि गाडीची वाट बघत उभी राहिले काय तर सगळे जण माझ्या कडे बघताहेत अस जाणवलं. पहिल्यांदी सगळ ठीक ठाक आहे ना चेक केल. सगळ तर व्यवस्थित होत मग लोक अशी सेलिब्रिटी कडे बघाव अशी का बघत होती माझ्याकडे ? सगळ्यांच्या नजरा माझ्या कडेच होत्या. विचारच करत होते रातोरात काय बदल झाला माझ्यात . एकाच रात्रीत मी काय माधुरी दीक्षित सारखी वगैरे दिसायला लागले कि काय ? एखाद मिनिटच काय झाल असेल तेवढ्यात लांबच्या एका बाईने कानाला हात लाऊन काय? अस हातानी विचारल . मला काहीच कळल नाही. खरच नाही . कानाला कशाला हात लावतेय ? पण मग लगेच दोन मिनिटातच उलगडा झाला . एक कॉलेज कुमारनी जवळ येउन सांगितलं "म्याडम तुमच्या कानातली रिंग पडायला आलेय". त्याला काय सांगणार ती तशीच आहे म्हणून. दुसर्या साईड ने दुसरा मनुष्य कानाला हात लाऊन "म्याडम तुमच्या कानातली रिंग पडणार आहे आत्ता."अस सांगत आला . आत्ता मला उलगडा झाला मला अचानक प्राप्त झालेल्या सेलिब्रिटी पणाचा .तेवढ्यात जवळच्या बाईने पण सांगितलं " कानातल पडणार आहे तुमच्या " हे सगळं गाडी येण्याच्या मधल्या वेळात. अरे रामा. इतक का लक्ष असत लोकांच ?

मला वाटल धावत स्टेशन मास्तरच्या केबिन मध्ये जाव आणि "अनाउन्समेंट" करावी "माझ्या कानातल आहे ना ते खोट आहे आणि ते तसच "तीन चतुर्थांश" आहे. ते जरी आत्ता पडणार आहे कि काय अस वाटत असल तरी ते पडायला आलेल नाही. ते तसच आहे .तेव्हा समस्त पब्लिक ला काळजी नसावी ".पण मी तो विचार क्यान्सल केला ( हाहाहाहा )आणि कानातले काढून निमूटपणे पर्स मध्ये टाकले. तेवड्यात गाडीही आली आणि ऑफिस मध्ये पोचले . हुश्य . सही करून स्वताच्या सीट वर स्थानापन्न झाले काय आणि शेजारी बसणारीने विचारलं अग कानातल आहे कुठे तुझ्या ? विसरलीस कि काय घालायला? मी दिग्मूढ."
अरे " कानमे डालो तो भी मुश्किल और न डालो तो भी . जिये तो जिये कैसे "

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

30 Sep 2015 - 1:12 pm | चांदणे संदीप

मस्त लिहिलंय.
गाढव आणि बापलेकाची गोष्ट आठवली! :)

एस's picture

30 Sep 2015 - 1:19 pm | एस

ऐसेही! और कैसे! :-)

खुसखुशीत लेख.

दमामि's picture

30 Sep 2015 - 1:47 pm | दमामि

आवडेश!

खटपट्या's picture

30 Sep 2015 - 1:48 pm | खटपट्या

वा ! मस्त अनुभव..

द-बाहुबली's picture

30 Sep 2015 - 2:19 pm | द-बाहुबली

वाहवा...!
(हे तारिफ मुक्तपिठीय नाही बरंका...)

नीलमोहर's picture

30 Sep 2015 - 2:49 pm | नीलमोहर

भारी

शित्रेउमेश's picture

1 Oct 2015 - 9:47 am | शित्रेउमेश

करू तो क्या करू ? ...

खिंक्क्क्क्क्क

हा हा हा ... स्त्री वर्गाच्या डब्यातील विक्रेत्यांचा संयम हा उच्चकोटीचा असतो... हे नको, असचं दुसर्‍या रंगामधे आहे का ?, किती ट्रे आहेत ? ३ ट्रे चाळुन परत झाल्यावर ऑर व्हरायटी नही है क्या ? इतके आणि याहुन अधिक प्रश्न तो बिचारा एकटाच झेलत असतो. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake... Shake... Shake... That B**ty... ;) :- Balwinder Singh Famous Ho Gaya

नाखु's picture

2 Oct 2015 - 10:41 am | नाखु

तसही लोकांना सोताच्या मनात बघण्यापेक्षा दुसर्याच्या कानात बघायची खोड असतेच की !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 10:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जमलाय लेख मस्तं

बाकी

अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत.

पायाच्या नखाला क्लिपा का लावतात हो =))!!!

(अडाणी भोळाभाबडा सज्जन समंजस चौकस) कॅजॅस्पॅ!!

अरे सोरी सोरी लिहिताना काहीतरी गडबड झालेली दिसतेय :)

पद्मावति's picture

2 Oct 2015 - 11:04 am | पद्मावति

मस्तं लेख. मजेदार लिहिलंय. आवडलं.

रातराणी's picture

9 Oct 2015 - 8:46 am | रातराणी

ही ही :)
राहून गेलेलं वाचायचं. हलकफुलक छान आहे.

अमृत's picture

9 Oct 2015 - 10:06 am | अमृत

गाढव आणि बापलेकाची गोष्ट आठवली :-)