श्श..... सांभाळून बोला! भाग १

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
27 Sep 2015 - 1:07 am

भाग 1 

"हलो... हलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हलो..... एकता आहात का तुम्ही? हलो........"
फोन कट करून मैथिली खो-खो हसत सुटली. वर्धा, अभी, राजन, मंजू सगळे तिच्या हसण्यात सामील झाले. एकटी अवनी शांत होती.

"काय झाल तुला अवनी?" हसण थांबवत मैथिलीने अवनीला विचारले.

"मैथिली मला असले pranks आवडत नाहीत. काय हा आचरटपणा लावला आहेत तुम्ही? कुठला रस्ता नाही मिळत तुला? मला या वाड्यात फक्त ही एकच रात्र रहायचं आहे ह. पहाटेच निघायचं आहे साधारण पाच पर्यंत. आणि dont worry...  मला रस्ता मिळेल बाहेर पडायचा. तुमच तुम्ही बघा. एकतर आपल्यापैकी कोणालाही या बंगल्याची माहिती नाही.... आणि आल्या आल्या हा असला फोन काय करतेस तू?" अवनी एकूण प्रकार न आवडून रागाने म्हणाली.

"chill अवनी. प्रत्येकवेळी तुझी लेक्चर्स नको आहेत आम्हाला. आमची ताई बनू नकोस सारखी. समजल? अग, आत आल्या आल्या हा जुन्या पद्धतीचा फोन बघितला गोल डायलवाला आणि वापरावासा वाटला.... केला फोन." मैथिली आवाज चढवून म्हणाली.

वातावरण तापत आहे हे बघून वर्धा मध्ये पडला. "पण तू नक्की कोणाला लावला होतास  फोन मैथिली?" हसू थांबवत त्याने तिला विचारल.

"अरे कोणाला असा नाही रे. बस काही नंबर फिरवले. समोरून फोन उचलल्याच समल आणि मी घाबरलेल्या आवाजात बोलून फोन कट केला." मैथिली हसत म्हणाली.

"कोण होत ग फोनवर?" मंजूने विचारल.

"मला काय माहित? एक घोगरा आवाज होता. हलो..... बोला.... अस म्हणाला. बस. जाउदे ते. यार इतका प्रवास करून आलो आहोत. चला जरा घर बघून घेऊया. बाबा म्हणाले होते की ते इथे फोन करून जो कोणी care taker आहे त्याला कळवतील आपण येणार आहोत. पण तुम्हाला माहित आहे ते किती बिझी असतात. त्यामुळे कदाचित ते फोन करायला विसरले देखील असतील. चला, आपणच त्याला शोधून काढू या." अस म्हणत मैथिलीने पायाशी ठेवलेली आपली bag उचलली. तिच अनुकरण करत सगळ्यांनीच आपापल्या bags उचलल्या.

"रामू काका....... ओ रामू काका....." अभी हाका मारायला लागला.

"ए गप. कोण रामुकाका रे?" राजनने अभिच्या टपलीत मारत विचारले.

"अरे साधारणपणे अशा जुन्या वाड्यांचा सांभाळ करणारे कोणी असतात ना ते म्हातारे असतात. आणि त्यांच नाव रामू काका असत. कायम धोतर.... मळकट बनियन आणि खांद्यावर एक फडक असा त्यांचा अवातार असतो." अभी राजनला डोळा मारत म्हणत आतल्या दिशेने वळला आणि दचकून धडपडला.

आतल्या एका दारात कोणीतरी उभ होत. एकदम आवाज वाढवून अभिने विचारल,"कोण? कोण आहे तिथे?"

त्याच्या या प्रश्नाने सगळेच त्या दाराकडे बघायला लागले. मंजूने घाबरून वर्धाचा हात धरला. तिच्या हातातली bag खाली पडली. मैथिली पण  गोंधळली. कारण तिच्या बाबांनी तिला सांगितले होते की बंगला बंद असतो. कोणीतरी आहे तिथे सांभाळायला पण त्याना कळवाव लागत. तुम्ही २ दिवसच जाणार आहात तर मी कळवतो. पण जर कोणी नसल तर आपल आपण manage करा. त्यावर मैथिलीने सांगितल होत की फक्त रात्री मुक्कामाला ते सगळे त्या बंगल्यावर जाणार होते आणि सकाळी सगळ आवरून लगेच निघणार होते. त्यामुळे कोणी नसल तरी चालणार होत.

मैथिलीने धीर परत करून विचारल,"कोण?"

"मी रामुकाका हाय जी. आवाज दिलात म्हणून आलं जी." त्या कृश आकृतीने उत्तर दिल.

"अहो मग तिथे उभ राहून काय बघता आहात. आत या की. पाहुणे आम्ही आहोत; तुम्ही नाही." मंजू वैतागून म्हणाली.

"हा जी. आलो." अस म्हणून रामुकाका आत आले. कृश ताब्बेतीचे म्हातारे, मळकट धोतर आणि बनियन आणि खांद्यावर एक फडक असा त्यांचा अवतार होता. ते बघताच अभी राजांकडे बघत डोळा मारून परत हसला.

"काय हो इतका वेळ कुठे होतात? बर... ते जाऊ दे. किती खोल्या आहेत इथे?" वर्धाने विचारले.

"किती म्हंजी?  मला काय माहित जी." रामुकाका म्हणाले.

"तुम्हाला नाही माहित? मग काय आम्हाला माहिती आहे का या बंगल्याची? काय ग मैथिली... मी तुला म्हंटल होत न की आपण एखादी खानावळ किंवा लोजिंग-बोर्डिंग शोधुया. इथे कधीतरी कोणितरी उतरत असत. त्यामुळे बरी सोय असते. तर तुलाच या आडबाजूच्या वाड्यात यायची हौस. या रामुकाकाना जर काही माहित नाही तर मग आता कोण या वाड्यात रहाणारी पूर्वीची पितर येणार आहेत का आपल्याला माहिती द्यायला?" राजन म्हणाला.

तेवढ्यात वाड्याच्या वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या बाजूने खाकारल्याचा आवाज आला.

आता मात्र मैथिली, मंजू, अवनी, वर्धा, राजन आणि अभी सगळेच दचकले.

"मैथिली या वाड्यात कोणी राहात का?" हळूच मैथीलीच्या कानाला लागून राजाने विचारले.

तेवढ्याच हळू आवाजात मैथिली म्हणाली,"माहित नाही रे. बाबा म्हणाले होते........." तिच वाक्य पूर्ण होण्याच्या आत वरच्या जिन्यावरून एक मध्यम वयाचे गृहस्थ खाली याय्लां लागले.

"कोण रे तुम्ही पोर? इथे कसे आलात?" त्यांनी एक करडा कटाक्ष सगळ्यांवर टाकला आणि विचारले.

मैथिली पुढे होत म्हणाली,"आम्ही मुंबईहून आलो आहोत. कर्जतच्या पुढेच एक ट्रेकिंग पोइंट आहे. तिथे ट्रेकिंगला गेलो होतो. आता फक्त रात्रीचा मुकाम होता. माझ्या बाबांच्या ओळखीच्या लोकांचा हा बंगला आहे. बाबा म्हणाले की रात्री आम्ही इथे थांबू शकतो म्हणून फक्त रात्रीपुरते इथे आलो आहोत."

"बर बर....." त्या व्यक्तीने सोफ्यावर बसत म्हंटले. "मी तुम्हाला वाड्याची माहिती देतो. हा दिवाणखाना. समोरच्या जिन्याने वर गेल की डावीकडे एक, उजवीकडे एक, आणि समोर एक अशा तीन खोल्या आहेत. जिन्याच्या मागून माजघर आणि त्याच्या शेजारी  जिन्याच्या डावीकडे देवघर आहे. पण आता ते बंदच असत."

"आम्ही वरची खोली वापरली तर चालेल का?" मैथिलीने विचारले.

"तुमची मर्जी. माझी काहीच हरकत नाही." त्यांनी म्हंटले.

"धन्यवाद." अस म्हणत मैथिलीने रामुकाकांकडे बघितले आणि म्हणाली,"काका थोड काही खायला आणता? काहीही चालेल. पिठलं भाकरीसुद्धा. आम्ही वर खोलीत आहोत. तयार झाल की बोलवा. आम्ही येतो खाली."

"बर..." अस म्हणत रामुकाका माजघराच्या दिशेने गेले.
"चला आपण वर जाऊ या." अस म्हणत मैथिलीने तिचे सामान उचलले आणि जिना चढायला लागली. ते गृहस्थ शांतपणे सोफ्यावर बसले होते. इथारांनी मग फार विचार न करता मैथिलीच अनुकरण केल. जिन्याने वर गेल्यावर मैथिली क्षणभर थांबली आणि मग उजवीकडच्या खोलीकडे वळली. सगळेच तिच्या पाठोपाठ त्या खोलीत गेले.

"यार अजब घर आहे हे. तू म्हणाली होतीस कोणीच नसेल. आणि आता एक एक जण अचानक उगवतो आहे इथे. अख्खी रात्र अशीच गूढ घटनांनी भरलेली असली तर मजा येईल." खोलीत आल्या आल्या सामान जमिनीवर टाकत अभी म्हणाला. तितक्यात काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला आणि सगळेच धावत खोलीच्या बाहेर अगदी जिन्याच्या टोकापर्यंत आले.

कथा

प्रतिक्रिया

भयकथा! गुड.

पुभाप्र.

बाबा योगिराज's picture

27 Sep 2015 - 1:47 am | बाबा योगिराज

सुरुवात तर चांगलीच आहे. पुभाप्र.

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 6:49 am | मांत्रिक

खत्तरा सुरुवात!!!
पु.भा.प्र.!!!

कविता१९७८'s picture

27 Sep 2015 - 8:57 am | कविता१९७८

मस्त , सुरुवातीलाच अवनी नाव वाचुन विचार आला अलवनी मधुन ल काढला की अवनी होईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2015 - 9:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चांगली सुरुवात. :)