आंतरजाल : काय लिहावे काय लिहू नये...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
3 Sep 2015 - 12:31 am
गाभा: 

सद्याच्या आंतरजालक्रांतीच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या जगात सामजिक माध्यमांनी सर्वसामान्य माणसांला सार्वजनिक स्तरावर व्यक्त होण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. ही संधी एक दुधारी धार असलेले शस्त्र आहे हे विसरून चालणार नाही. आंतरजालावरच्या मिसळपावसारख्या मुक्त संस्थळांवर वापरलेल्या व्यक्तीगत गैर टिप्पणींमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या / समाजगटाच्या श्रद्धास्थानावर केलेल्या गैर टिप्पणींमुळे ही संधी नकळत कायदेशीर अपराधामध्ये परावर्तीत होवू शकते.

त्यामुळे लेख आणि प्रतिसाद लिहीणार्‍या सर्व लेखकांनी ही संधी जबाबदारीने वापरण्याची जरूरी आहे याबाबत दुमत नाही. तरीही, बर्‍याच जणांच्या मनात "आंतर्जालावर काय लिहिणे योग्य आहे आणि काय लिहिणे अयोग्य आहे" याबाबतीत संदेह असतो.

जालावर तरंगत (सर्फिंग) असताना पुणे पोलिस या संस्थळावर मला यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना मिळाल्या. मिपावरील लेख व प्रतिसादांच्या लेखकांच्या माहितीसाठी त्या खाली दिल्या आहेत...

.

.

प्रतिक्रिया

फार उपयू़क्त माहिति सांगितलि आहे. या पुढे कोमेंट कर् तांना जपून केलि पाहिजे

बहुगुणी's picture

3 Sep 2015 - 2:44 am | बहुगुणी

ही माहिती WhatApp वर Share करता आली तर गरजेचं आहे. पुणे पोलिस संस्थळावर जाऊन तसं करता येतं का ते पहायला पाहिजे.

[WhatApp वर अशा समाज-विघातक कृत्यांप्रमाणेच बर्‍याच वेळा चक्क medical misinformation देखील पहायला मिळते आहे. उदाहरणार्थ, तथाकथित स्वयंघोषित 'तज्ञ डॉक्टर' मंडळी chelation या "थेरपी"ची हृदयविकारावर बायपासला विकल्प म्हणून जाहिरात करतांना आजच पाहिली. (या विषयीच्या clinical trials अपयशी ठरलेल्या आहेत आणि मेयो हॉस्पिटल सारखी नामवंत रुग्णालये या विरोधात जनजागृती करीत आहेत.) WhatApp वर माहिती फॉरवर्ड करणारे सदिच्छेनेही करत असतील, पण ते वाचून आणि तो 'प्रेमळ आणि माहितीपूर्ण सल्ला' ऐकून गरजेचा असा बायपास न करता अशी "थेरपी" घेतल्याने एखाद्या रुग्णाचा मृत्यू ओढवला, तर चुकीची माहिती फॉरवर्ड केली म्हणून तसं करणार्‍यावर कदाचित कायदेशीर कारवाई होऊ शकेल.]

चित्रगुप्त's picture

3 Sep 2015 - 3:23 am | चित्रगुप्त

पुणे पोलिसांनी केलेल्या सूचना इथे दिल्याबद्दल आभार.
अलिकडे वॉट्सप ही एक डोकेदुखी झालेली आहे. मजकुराच्या सत्यतेची शहानिशा न करता ऊठसूट कोणीही काहीही शेयर करावे, नकोसे होतील एवढे गुडमॉर्निंग, जोक्स वगैरेंनी उच्छाद मांडलेला आहे. मी स्वतः विशिष्ट हेतूंनी निर्माण केलेले सर्व कंपू (ग्रुप्स) असल्या अनावश्यक कचर्‍यामुळे बंद केले.

बर झालं हे येथे स्पष्ट केलत ते.
बर्‍याचदा आपला शेजारी किंवा आपला जीवाभावाचा मित्र वेगळ्या जाती-पातीचा असतो, पण कोणत्यातरी एखाद्या भडकावु घटनेला बळी पडुन बर्‍याचदा लोकांना भान उरत नाही, मग वेगवेगळ्या शब्दात दुसर्‍या गटाचा अपमान केला जातो.

नाखु's picture

3 Sep 2015 - 8:23 am | नाखु

या करीता अगदी शालेय विद्यार्थ्यांचेही प्रबोधन करणे गरजेचे आहे.

माहीतीबद्दल धन्यवाद.

नाव आडनाव's picture

3 Sep 2015 - 10:01 am | नाव आडनाव

मी ८ वी - ९ वी च्या पोरांना, ज्यांना काही कळत देखील नाही, अश्या चर्चा (जातिच्या) करतांना समोर बघितलंय. सगळीकडे / सगळ्यांवर कंट्रोल असू शकत नाही, पण मिसळपाव जर अश्या गोष्टींच्या चर्चा टाळता आल्या तर बरं होइल.

एक विनंती - ह्या लेखाची लिंक दखल मधे कायमची ठेवा.
थोड्याफार फरकाने धोरणात / मिसळपाव बद्दलच्या माहितीच्या बाकिच्या लिंक मधे ही / अशीच माहिती आहेच, पण पोलिसांच्याच साईट चा रेफरंस आहे तर हे जास्त परिणामकारक होईल.

राजाभाउ's picture

3 Sep 2015 - 5:41 pm | राजाभाउ

>>एक विनंती - ह्या लेखाची लिंक दखल मधे कायमची ठेवा.
+१

अजया's picture

3 Sep 2015 - 8:06 am | अजया

उपयुक्त माहिती.

या वरून पूर्वीचा एक जोक आठवला. अमेरिकेचा एक लोकशाही प्रेमी नागरिक एका " पोलादी पडद्यावाल्या " रशियनाला भेटला. म्हणाला " आमच्या अमेरिकेत फार अनमोल असे प्रकटीकरण स्वातंत्र्य आहे. आम्ही व्हाईट हाउस समोर उभे राहून
मोठ्याने ओरडू शकतो की अमेरिकेचा अध्यक्ष गाढव आहे !!! " त्यावर रशियन म्हणतो " ह्या ! असे स्वातंत्र्य आम्हाला ही आहे. आम्ही क्रेमलिन समोर उभे राहून ओरडू शकतो की अमेरिकेचा अध्यक्ष गाढव आहे ! "

कालपरत्वे , देशपरत्वे महापुरूषांची व्याख्या बदलत असते. त्याचे वरील जोक हे उदाहरण आहे. गणेशोत्सवात महाराष्ट्र्राची अस्मिता दडलेली असेल तर वंग प्रदेशात दुर्गा पूजेची. त्यामूळे कुणाच्या " भावना" कोठे दुखावतील याची काळजी करतच
प्रकट होत रहाणे हे संकुचित लोकशाहीचे लक्षण ठरावे. यातून महापुरूष व धर्म यांच्या बद्द्ल आदर न रहाता भिती मात्र निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सीतेची चिकित्सा परटाने केली तरी श्रीरामानी भावना दुखावल्याचा कांगावा केला नाही याला म्हणतात खरी लोकशाही. भावनेपेक्षा प्रकटीकरणाची भूमिका महत्वाची. त्यात सत्याचा अंश असेल तर फक्त प्रकटी करणाच्या भाषेला हरकत असू शकते प्रकटीकरणालाच काय म्हणून कायद्याची सुरी लावायची ?

सुबोध खरे's picture

3 Sep 2015 - 12:44 pm | सुबोध खरे

+ १०००
त्यामुळे आजकाल फक्त गोग्गोड असे प्रतिसाद पुढे पाठवावे किंवा आईचे उपकार, वडिलांचे ऋण, थोरल्या वहिनीचा त्याग, ताईचा निस्वार्थी स्वभाव अशा गोष्टींवर लिहावे. हिंदू मुस्लीम भाईचारा, ख्रिश्चन धर्मातील दहा तत्त्वे, जैन समाजाचे भारताच्या इतिहासातील महत्त्व, हिंदू सणातील आधुनिकता ई ई.
मला हा POLITICALLY CORRECT राहणाऱ्या लोकांचा तिटकारा आहे.
पोलिसांनी पाठ्विलेला हा मेसेज त्यांच्या स्वतःचे काम कमी व्हावे म्हणून आणि लोकांच्या "व्यक्त" स्वातंत्र्यावर घाला आणणारा आहे.
त्यात तथ्य आहे याबद्दल वाद नाही परंतु त्याचा अतीरेक फारच आहे.
शक्य झाले तर पोलिस सातच्या आत घरात राहा असे स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांना पण सांगतील.म्हणजे तेवढेच गुन्हे कमी आणि त्यांना कामही कमी.

बॅटमॅन's picture

3 Sep 2015 - 1:18 pm | बॅटमॅन

क्या बात है, एकदम नेमके.....

यमन's picture

3 Sep 2015 - 10:40 am | यमन

धन्यवाद डॉक्टर साहेब .
शाळेपासूनच आंतर जालीय शिस्त शिकवली पाहिजे आता.

सर्वसाक्षी's picture

3 Sep 2015 - 10:50 am | सर्वसाक्षी

आजकाल ढकलकानी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. नुकतेच पाय फुटलेले बालक जसे हाताला लागेल ती वस्तू खिडकीतून खाली टाकते तद्वत आलेला प्रत्येक मजकूर/ चित्र/ चित्रफित हे ढकलकपंथी आपल्या सर्व परिचितांना/ समुहातील सदस्यांना अथकपणे विनाविलंब ढकलत असतात. हे ढकलक कसलेही तारतम्य बाळगत नाहीत. खरेतर आता आधुनिक व सुसज्ज अशा जालसंपन्न हस्तसंचामुळे आलेली बातमी खरी की अफवा हे पडताळुन पाहणे सोपे झाले आहे. किमान आपण जे काही ढकलत आहोत ते नक्की काय आहे, आपण या विचारप्रणालीचे पुरस्कर्ते आहोत का? मजकूरातील हेतू हाच आपल्या ढकलण्यामागील हेतू आहे का? याचा विचार न करता हे ढकलक कार्यरत असतात. माहिती वा साहित्य सुलभतेने प्रसारीत करता येते म्हणुन अनाठायी लेखन, अनावश्यक, द्वेषमूलक, भावना भडकवणारे लेखन करु नये हा विवेक झाला. ज्याच्या ठायी तो नाही वा ज्याला तेढ पसरवायची आहे, सामाजिक स्थैर्य धोक्यात आणायचे आहे अशा व्यक्तिने जरी जहरी वा अयोग्य लेखन केले तरी ढकलकांनी त्याचा प्रसार करावा का? असा प्रसार करणे हे मूळ लेखन करण्याइतकेच अयोग्य आहे.

एक प्रश्नः

संकेतस्थळ वा जालनिशीवर संचालक, मालक व प्रशासक वगैरेना जे काही गैर वाटेल ते काढुन टाकायची सुविधा व अधिकार असतात. अशा परिस्थितीत संपादक, मालक वा प्रशासक यांनी असा मजकुर/ चित्र/ चित्रफित यांना त्यांच्या संस्थळावर/ जालनिशीवर काही आक्षेपार्ह आढळल्यास दोषी धरणे काही अंशी समजण्यासारखे आहे. मात्र वॉसप वर प्रशासक हा फक्त समुह संस्थापक असतो. त्याला सद्स्य दाकहल करुन घेण्याव्यतिरीक्त अन्य कसलेही अधिकार नाहीत. समुहाचे बोधचित्र वा नावसुद्धा कुणीही सभासद करु शकतो. वॉसपचा प्रशासक सदस्याने टाकलेला मजकूर/ चित्र/ फित हे तो समुहातुन काढुन टाकु शकत नाही (भले तो असे काही करणार्‍या सदस्याला काढुन टाकेल पण त्याचे लेखन काढु शकत नाही). मग त्याला जबाबदार धरणे कितपत कायदेशीर व योग्य आहे?

दखल घेतलीच पाहिजे अशी माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद !

मितान's picture

3 Sep 2015 - 1:12 pm | मितान

उपयुक्त धागा !

सीतेची चिकित्सा परटाने केली तरी श्रीरामानी भावना दुखावल्याचा कांगावा केला नाही याला म्हणतात खरी लोकशाही.

कांगावा करण्यासाठी आधी भावना तर दुखायला पाहिजेत ना . सीतेच्या भावनांचं काय ? हि लोकशाही ? सीता रामाच्या प्रजेचा भाग नव्हती का ? परटाच्या वृत्तीच्या लोकांना काय कळणारे ?

"धोबियोंकी दृष्टी बस मेल और धब्बे देखे ,
कपडा बुना हो चाहे कैसेभी धागे का "

असो .

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 3:38 pm | प्यारे१

ओ धाग्याचं रामायण करु नका बरंका....!
मूळातलं रामायण वाचा आधी. त्याच्या रॉकेल कॉप्या नको.

म्हणजे वाल्मिकीरामायणात हा प्रसंग नैये का?

वल्ली म्हणतो तसं उत्तरकांड प्रक्षिप्त आहे. ;)

बॅटमॅन's picture

3 Sep 2015 - 3:50 pm | बॅटमॅन

वाल्मिकीरामायणात आहे ना उत्तरकांड, तेवढं बास आहे.

बाकी एखादी कथा गैरसोयीची वाटल्याने प्रक्षिप्त ठरवण्याची अहमहमिका समजू शकतो बायदवे ;)

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 3:55 pm | प्यारे१

गुड!

pradnya deshpande's picture

3 Sep 2015 - 3:47 pm | pradnya deshpande

सोशल मिडीया बाबत डोळस होण्याची गरज आहे.

डॉ. साहेब, काय लिहावं याबद्दल काहीच नाही की लेखात ...?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Sep 2015 - 4:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

धार्मिक भावना दुखावतील असे मजकूर लिहायचे नाहीत असे पुणेरी पोलिस म्हणतात तर मग नवाकाळ्,सामना,ऑर्गनायझर चालवणार्यांचे काय करायचे ? असा ह्यांचा प्रश्न.

खूप चांगली आणि उपयुक्तं माहीती.

प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे.

सव्यसाची's picture

3 Sep 2015 - 4:15 pm | सव्यसाची

एक प्रश्न आहे. ६६ अ रद्द झाला आहे ना?

सव्यसाची's picture

5 Sep 2015 - 10:35 am | सव्यसाची

मग अजूनही पोलिसांच्या सूचनांमध्ये हे कलम कसे काय आहे?
कि या सूचना जुन्या आहेत?

लेखकाने धोक्याची सुचना दिली आहे.आपण बसू ती रेल्वेतली सीट घाण आहे का पहा.ती घाण दुसरीकडे बसून पसरवताना पकडले गेलात तर------

>>वॉसपचा प्रशासक सदस्याने टाकलेला मजकूर/ चित्र/ फित हे तो समुहातुन काढुन टाकु शकत नाही (भले तो असे काही करणार्या सदस्याला काढुन टाकेल पण त्याचे लेखन काढु शकत नाही). मग त्याला जबाबदार धरणे कितपत कायदेशीर व योग्य आहे?>>>--- --पकडून खटला लावतात त्याच्याच अंगावर प्रकरण शेकते
.

पैसा's picture

3 Sep 2015 - 4:55 pm | पैसा

चांगली माहिती. पोलिस त्यांचे काम कमी करतात किंवा कसेही असेल. मात्र आपण हे सगळे लक्षात न ठेवल्यास झेलात जावे लागेल त्यापेक्षा माहिती असलेली बरी.

विकास's picture

3 Sep 2015 - 10:47 pm | विकास

या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद. वर आधीच सुचवले गेले आहे त्याप्रमाणे, ह्या धाग्याची कायम स्वरूपी लिंक बाजूला राहूंदेत.

विकास's picture

3 Sep 2015 - 10:51 pm | विकास

वर चौकटराजा, डॉ. खरे यांनी विशेष करून लिहीले आहेच. तेच परत उद्धरतो: अशा बंदी असणे योग्य वाटत नाही. अर्थात पोलीस कायद्यानुसार करत असले तर आपण काही करू शकणार नाही...

तरी देखील नशीब, या सुचनेच्या खाली * करून असे लिहीलेले नाही!

या सुचनेसाठी आणि आवाहना साठी "पुणे" हा धर्म आणि "पुणेकर" ही जात मानली गेली आहे.

=))

फॉर दी रेकॉर्ड: ह.घ्या. !

आस्तिक शिरोमणि's picture

4 Sep 2015 - 12:53 am | आस्तिक शिरोमणि

आवश्यक स्वरुपाच्या लेखनासाठी धन्यवाद.