बेरोजगार(कथा)

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in जनातलं, मनातलं
2 Sep 2015 - 5:25 pm

अज्या तणतणतच रुमवर आला. रागारागाने शुज फेकुन देत बोलु लागला...
"नाय रे योग्या, नाय होणार आपलं पुण्यात काही! च्यायला या पण कंपनीत तिसर्‍या राउंडनंतर बाहेर!"
योग्या निवांत मोबाईलवर गेम खेळत होता. त्याने लक्षच दिले नाही. "ए भाड्या तुला बोलतोय!" योग्याने मोबाईल खाली ठेवला अन बोलला - "हं बोल काय झालं?" "काय व्हायचय ? तिसर्‍या राउंड्मध्ये बाहेर! च्यायला यांच्या , दिवसभर काही खाल्ल नव्हतं , सकाळी नऊ ला बोलवलं होतं, अकरा वाजता अ‍ॅप्टी घेतली, दोन वाजेपर्यंत बसवुन घेतलं, नंतर अजुन एक टेक्निकल, ती पण केली क्रॅक, चार वाजता जीडी घेतला, बारा मधुन दोनच घेतले.
"सोडरे!" योग्या बोलला. "एवढी काही खास नव्हती कंपनी." "नाय रे लागलो असतो तर जमलं असतं ना राव! आठ हजार तर आठ हजार, केलं असतं वर्षभर, च्यायला तिन महिने होत आले रिझल्ट लागुन, काय फायदा राव डिश्टींशनचा, घरी पैसे पण मागावेसे वाटत नाहियेत."
अज्या जवळजवळ रड्कुंडीला आला होता. "ए गपे!" काय तुलाच एकट्याला नाहिए डिश्टींशन, तुझ्यापेक्षा जास्तच मार्क्स आहेत मला, तरी घासतोय ना सहा हजारावर ?" अज्या थोडा शांत झाला. बोलला- "काय फायदा राव पिजी करुन? बॅकऑफिसवाले येउ देत नाहीत, अन आयटीवाले अनुभव मागत आहेत." "जाउ देरे! लागेल आज ना उद्या, च्यायला येड्या येड्या पोराला लागली तुला नाही लागणार का ? चल जेवण करुन येऊ"
अजय आणि योगेश दोघे फर्स्ट इयर पासुन रुममेट्स. अगदी जिवाला जिव देणारे मित्र. फायनलची परीक्षा झाल्यापासुन दोघांचाही दिनक्रम झाला होता. सकाळी उठणे, फॉर्मल घालणे आणि ओपनींग दिसेल तिथे जाणे. सुरुवातीला मजा वाटत होती. पण नंतर नंतर चिडचिड वाढत होती. वर्गातले मित्र हळुहळु लागर होते, पण हुशार असुनही अजय कुठे लागत नव्हता.
जेवण करुन थोडं फिरून रुमवर आल्यावर नेहमीप्रमाणे अजयने मेल चेक केले. व बोलु लागला- " उद्या कुठं विशेष ओपनींग नाही दिसत राव! त्या दिवशी त्या बिपीओतुन फोन आला होता, जाउन पाहु कारे?" " पहा जाऊन तर ये , करा वाटली तर कर नाही तर नको करू." योग्या बोलला. "ठिक आहे जाउन तर येतो" अज्या झोपता झोपता बोलला.
दुसर्‍या दिवशी अजय सकाळीच गेला त्या बिपीओत. पहिला राउंड त्याच्या अपेक्षेपेक्षा सोपाच निघाला, म्हणुन तो क्रॅक झाल्याचं त्याला विशेष काही वाटलंच नाही. दुसर्‍या राऊंडला इंटरव्ह्यु संपल्यावर मॅनेजर म्हणाला - "काँग्रॅजुलेशन्स अजय , यु आर सिलेक्टेड, युवर सिटीसी वुड बी १.४४ लॅक पर अ‍ॅनम!"
पुणे विद्यापिठातुन अभियांत्रीकीचे पद्व्युत्तर शिक्षण घेतलेल्या अजयला हसावे का रडावे तेच कळेना !

शिक्षण

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

2 Sep 2015 - 5:32 pm | द-बाहुबली

धागा वाचुन मलाही हसावे का रडावे तेच कळेना ! मग विचार केला जाणकार प्रकाश टाकतील... अन तुम्ही पुढचा धागा.

मांत्रिक's picture

2 Sep 2015 - 6:13 pm | मांत्रिक

ऑ! थोड्या वेळापूर्वी तर इथं वेगळंच नाव होतं की?

द-बाहुबली's picture

2 Sep 2015 - 6:18 pm | द-बाहुबली

छु: मंतर :)

नाव आडनाव's picture

3 Sep 2015 - 11:52 am | नाव आडनाव

हे असं कसंकाय झालं याचा तपास बॉमकेस बॅक्षिंना करायला सांगा :)

पद्मावति's picture

2 Sep 2015 - 5:35 pm | पद्मावति

छान लिहिलय.

जे.पी.मॉर्गन's picture

2 Sep 2015 - 5:57 pm | जे.पी.मॉर्गन

अशी परिस्थिती आहे खरी... पण त्याचवेळी आजकाल कुठल्याही अन्या दिल्या पक्याला (टॉम, डिक, हॅरी सारखं) इंजीनिअरिंगला फर्स्टक्लास असतो आणि जवळ एमबीएचा कागद असतो. गेल्या १५-२० वर्षांपासूनची कथा आहे... म्याक्निकल इंजिनियर पुढे मार्केटिंग अन फायनॅन्समध्ये एमबीए करतो आणि जातो दिसेल त्या इंटरव्ह्यूला. समजून उमजून शिक्षण घेतलेले फार कमी दिसतात.

जेव्हा आयटी / बीपीओमध्ये मजूरांची गरज होती तेव्हा आम्ही खपून गेलो. आता तसं होणं कठीण आहे.

जे.पी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2015 - 12:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

इतकाच पेशेंस आहे तर ही पोरे MPSC/UPSC का देत नाहीत?

उगा काहितरीच's picture

3 Sep 2015 - 1:30 pm | उगा काहितरीच

बापुसाहेब mpsc,upsc सोपी गोष्ट नाही, जी मंडळी पास झाली ती सांगत सुटतात मी इतके तास अभ्यास केला अन तितके तास अभ्यास केला. पण तितकाच अभ्यास करून पण नापास झालेली मंडळी उजेडात येत नाहीत ना. सो त्यांचा संघर्ष आपल्यापर्यंत नाही पोचत. (कधी वेळ असेल ना तर जुन्या सांगवीत एक स्टडी सेंटर आहे, बहुधा सरकारी ! त्यात फक्त जेवण , नैसर्गिक विधी व थोडीफार झोप हे सोडून सर्व वेळ पडीक असतात उमेदवार ! असे कित्येक स्टडी सेंटर आहेत महाराष्ट्रात कोण जाणे) माझ्याकडे डेटा नाही पण mpsc, upsc देणारे व पास होणारे यांचे गुणोत्तर धक्कादायक असेल.

एम्पीयेस्स्शी आन युपीएश्शी म्हंजे काय ह्येच म्हैत नस्तं
बीप्यो आन कॉल्शेंटर लै प्याप्युलर आस्तै. कंच्या बी कालीजात जा मास्तरानासुदीक एम्पीयेस्स्शी आन युपीएश्शी म्हैत नस्तं
आता मास्तर लोक बी जर वेठबीगारी आन क्लाक्वर बेशीसवर आस्तील तर कठीनंच हाय की श्टुडंटांचं.
कालीजं बी कस्ली कस्ली जंक्षन नावाची अस्त्यात्.कायतरी " हुब्लकवाडी बुद्रूक ग्राम विकास संस्थेचे विकासपुरुष कोंडीबा हांडेपाटील हुब्लकवाडीकर टेक्निकल अ‍ॅन्ड मॅनेजमेंट रीसर्च इन्श्टीट्यूट " अस्ली.