भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in काथ्याकूट
2 Sep 2015 - 12:09 pm
गाभा: 

आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.

ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.

प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.

प्रतिक्रिया

मिपावर माबोसारख्या धाग्यांचे प्रमाण वाढत आहे.

नाखु's picture

2 Sep 2015 - 12:57 pm | नाखु

दौर था (कवीतांका) य भी एक दौर है !!!

दुपारचे १२.४० झाले आहेत ऐकू यात सुमधूर गीत "ये दुनीया ये महफिल.."

आप्कीफर्माइश नाखु

gogglya's picture

3 Sep 2015 - 3:47 pm | gogglya

कहर कौमेंट आहे ही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 3:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

वारलो की राव हसून हसून

द-बाहुबली's picture

2 Sep 2015 - 12:43 pm | द-बाहुबली

वानप्रस्थाश्रम स्विकारायची इछ्चा नसलेल्यांची हीच गत होणार.. म्हातरपणी स्वतःच्या अथवा मुलाच्या घरात रहावे असे नक्किच आपली प्राचिन संस्कृती बोलत नाही.

अहो मोठमोठे राजे लोक वयं झाली की सर्वत्याग करुन वानप्रस्थी होत असत...

चैतन्य ईन्या's picture

2 Sep 2015 - 2:13 pm | चैतन्य ईन्या

टंकनश्रम वाचवल्या बद्दल धन्यवाद. इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच देवाघरी/अल्लाला प्र्यार/कैलासवासी वगैरे होत असत ते आता सहज ८०-९० वर्षे जगत आहेत. जरा सारासार विचार करायला शिका कि उगाचच आपले सगळ्या ठिकाणी धर्म बुडाला आणि काय हि संस्कृतिचे रडगाणे. एक जन वानप्रस्थाश्रम स्विकारायला स्वतःहून पुढे येत नाही.

हेमंत लाटकर's picture

2 Sep 2015 - 5:45 pm | हेमंत लाटकर

इथे जी लोक ५०-६० व्या वर्षीच देवाघरी/अल्लाला प्र्यार/कैलासवासी वगैरे होत असत ते आता सहज ८०-९० वर्षे जगत आहेत.

तुम्ही उलट सांगताय.आपल्या आजोबाच्या काळात जन्मलेले लोक 80-90 वर्ष जगत. आताच्या लोकांना 50 शी आली की हार्ट अॅटक होत आहेत, 65 शी आली की स्वर्गवासी होत आहेत, बायका मात्र 85-90 वर्ष पार करीत आहेत.

मग वृद्धाश्रमात कोण जातं?
पंचवीशीचे लोक?

खेडूत's picture

3 Sep 2015 - 1:44 pm | खेडूत

हा ह हा! :)
मधे कस्काय वर आलेली ही ढकल आठवली … (याला काय कविता म्हन्टात का?)

मध्य बिंदु आला आयुष्याचा
हाफ सेंच्यूरी हा शतायुषीचा

ना इकडचे राहीलो ना तिकडचे
ना जवान ना वृद्धावस्थेकडचे

काही झालेत थोडे स्थूल, काही लठ्ठे
काही मात्र आहेत टुणटुणीत पठ्ठे

काहिंची पिल्लं गेली घरटे सोडून
काहीं अजून काढतात रात्र जागून

लागले कोणास चश्मे, कोणाला कवळ्या
कोणा कोणाला बीपी शुगरच्या गोळ्या

चेहऱ्यावर दिसू लागल्या महीन सुरकुत्या
त्या लपवण्यास करतो अतोनात खटपट्या

आता लवकरच गुडघे दुखू लागतील
काहींच्या डोळ्यात कॅटरॅक्ट पण होतील

लागेल कार्डीयाक बायपास काहींना
नी जॉइन्ट हिप जॉइन्ट रिप्लेस बाकींना

काहींना अलझायमर्स...किंवा डिमॅनशीया
बऱ्याच जणांना इनसॉमनीया वा अॅमनेशीया

सुरू होण्या पूर्वी ही शरीराची घसरण
एन्जोय करा आयुष्याचे क्षण-क्षण

छंद जोपासा..मित्र बनवा..जग सारे फिरून घ्या...
काम तर आहेच हो...स्वत:ला पण थोडा वेळ द्या...
हाफ सेंच्युयरी आलीय...स्वत:ला पण थोडा वेळ द्या...!

हेमंत लाटकर's picture

3 Sep 2015 - 2:38 pm | हेमंत लाटकर

मग वृद्धाश्रमात कोण जातं?

काही नशीबवान लोक

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 7:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नै वृद्धाश्रमात जाणारे लोक्स नशिबवान असतील तर तुमच्या धाग्याच्या मुद्द्यामधे कैच प्वॉईंट र्‍हात नै काका. धाग्याची नाडी आवळायची का?

लेगस्टम्प उघडा राहिला चुकून. लगेच काय पाडायचा का तो, चिमणराव?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Sep 2015 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेगस्टंप उघडा? अहो ते डायरेक्ट नॉन स्ट्रायकरला आले तिन्ही स्टंप्स उघडेचं होते. =))

हेमंत लाटकर's picture

4 Sep 2015 - 7:57 pm | हेमंत लाटकर

वृद्धाश्रमात जाणारे लोक्स नशिबवान असतील तर.....

नशिबवान म्हणजे धडधाकट असल्यामुळे वृद्धाश्रमात जायची गरज नसणारे

हेमंत लाटकर's picture

2 Sep 2015 - 6:46 pm | हेमंत लाटकर

वानप्रस्थाश्रम स्विकारायची इछ्चा नसलेल्यांची हीच गत होणार..

वृद्धाश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम नव्हे

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 12:47 pm | प्रसाद गोडबोले

धागा वाचुन डोळ्यात पाणी आले !

हेमंत लाटकर's picture

2 Sep 2015 - 12:50 pm | हेमंत लाटकर

स्वत:वर वेळ आल्यावर कळते.

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 12:58 pm | प्रसाद गोडबोले

खरे आहे .

: ढसाढसा रडणारी स्मायली :

नाखु's picture

2 Sep 2015 - 1:00 pm | नाखु

आज सुट्टी आहे काय का संप आहे ?

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 2:37 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

आज काम कमी आही आणि बाकी

ऑफीसात काहीच "इन्टरेस्टींग" नसल्याने आम्ही वृध्दास्रमात असल्या सारखेच आहोत ... म्हणुन जरा भावना वाटुन घेतल्या =))

भावना वाटून घेऊ नयेत. नुस्तं टेचून घ्यावं. दाताखाली लागल्या पाहिजेत.

चिगो's picture

2 Sep 2015 - 1:23 pm | चिगो

मी पण भसाभसा, ढसाढसा रडलो.. नंतर नंतर तर पाणी पुसायला माणूस बोलवावा लागला. पाऊस पडतोय म्हणून बरं.. पर्जन्यतुषारांवर ढकललं सगळं..

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत... बरं, मग?

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 1:43 pm | प्यारे१

पाणी पुसायला माणूस

>>>>>ऑ
कैसन हो भैयाजी, तबियत ठीक बा?

चिगो's picture

2 Sep 2015 - 3:40 pm | चिगो

ठीकैही है, भाई.. किंतु दिल बडा उदास होईल रहा हैं, ई जो चिंता प्रकट किए हई ऊं का बारे मे सोचल से..

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 4:13 pm | प्यारे१

कौनो चिंता की बातइ नाही है, हमार बच्चा को अच्छी पढ़ाई देना हमार फरज है, ऊके बाद गर उसको उसका फ़रज याद ना आवत है तो हम का कर सकते है उसके लिए, बताईये तो. हमार भविष्य की पूंजी जमा करके रख देना है बस्स.

बाकी नए नए पढना लिखना सीखे बच्चे इधर उधर कुछ तो लिख देते ही है. जोस होता है. हो जाईल ठंढा!

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 4:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

भैबा आपके जइसन कहाँ सब सोचैबे करताऊ? ओकर को ता बस बच्चा तक को इन्शुरन्स पालिसी की तरह देखने का आदत पड़त बा! भैया संस्कारवा जब देइबै करेंगे तभी तो जा कर के कुछो होगा!

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 4:25 pm | प्यारे१

अरे छड़ो ई सब बात का.
ऊ करीना को देखे का?
कइसन दूध से नहाकर आयल लागत है हमार दिल में तो एकदम... अब का बताय आपको

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 4:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

कर दिए ससुरे बात!! आवा कभी सोनपुर मेला मा नौटंकी देखबे करेंगे

अजया's picture

2 Sep 2015 - 6:06 pm | अजया

=))
आमची पण ढसाढसा रडणारी स्मायली!
खरं तर वृध्दाश्रम ही काळाची गरज आहे हे त्यांची वाढती संख्या अधोरेखीत करत आहे.पण अशा दवणीय लिखाणामुळे ज्यांना अशा आश्रमाची गरज भासते त्यांच्या नातेवाईकांच्या मनात निष्कारण गिल्ट निर्माण केला जातो.
मी एका आनंदी वृध्दाश्रमासाठी अनेक वर्ष काम करतेय.तिथे राहाणारे बरेचसे उच्चवर्गातील रिटायर झालेले लोक आहेत.बर्याच जणांची मुलं भारताबाहेर सेटल्ड आहेत.या आजी आजोबांना घर सांभाळणे जमत नाही.नोकरवर्गाची भिती वाटते.ते इथे आनंदाने राहातात.त्यांच्यातले काही वृद्धांच्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेऊन आलेत.काही बागकामात मन रमवतात.काही निपुत्रिक जोडपी तसेच अशाच जोडप्यातला जोडीदार नसल्याने देखील आहेत.समवयस्क असल्याने छान मैत्री दिसते.
अजून एक कॅथलिक ख्रिश्चन लोकांचा आश्रम माझ्या घराजवळ आहे.तिथे माझी ८३ वर्षाची मैत्रीण चार उच्चपदस्थ मुलं असताना स्वातंत्र्य असावे म्हणून राहाते.
सकारात्मकतेने गरजेकडे पाहिले तर ढसाढसा वाले एकटी छाप विचार करावे लागणार नाहीतच!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2015 - 7:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रगो ला रडताना बघुन मी धागा वाचला. तीन बादल्या भरायला आल्या ना :'(

ही विनंती. नुसत्या सन्ख्येवर जायचे तर अनाथाश्रम पण वाढत आहेत ना ?

नात्यांचे बंध तकलादू होत आहेत ओ. बाकी कै नै.
पोरांना वेळेत वेळ दिला नसल्यानं वेळेला पोरं वेळ देत नाहीत.
- गुत्ताडलेला

खटपट्या's picture

2 Sep 2015 - 1:17 pm | खटपट्या

सर्वच जण जड होतात म्हणून स्वतःच्या आईवडीलांना व्रुद्धाश्रमात धाडत नाहीत असा अनुभव आहे. बर्‍याच वेळेला आईवडील व्रुधापकाळामुळे ईतके जराजर झालेले असतात की त्यांना अंथुरणातुन उठताही येत नाही. नवरा बायको कामाला जाणार असतील तर अशा म्हातार्‍यांचे खूप हाल होतात. दीवसभरात पाणी हवे असेल ते देणारेही कुणी नसते तसेच वेळच्यावेळी औषधे देणेही शक्य होत नाही. सर्व सोपस्कार जागेवरच होत असल्यामुळे कपडे बदलणे, आंघोळ घालणे. अशावेळी म्हातार्‍या लोकांना अवघडल्यासारखे होते. घरात दीवसभर माणूस ठेवणे हा एक उपाय असतो पण आजकाल म्हातार्‍यांचा छळ करणारे व्हिडीओ बघीतले की तेही घातक वाटते.
उलट व्रुध्दाश्रमात पाठवणे आर्थिकद्रुष्ट्या जास्त जड जाते. एका व्रुद्धाचा महीन्याचा व्रुध्दाश्रमातला खर्च २० हजाराच्या पुढे जातो.
यावर उपाय म्हणून आता काही लोक व्रुद्धांची काळजी घेण्याची सेवा पुरवतात. माझ्या समोरील इमारतीमधे एकाने दोन फ्लॅट घेउन त्यात सर्व खोल्यांमधे पलंगांची व्यवस्था केली आहे. (हॉस्पीटल सारखी) जवळ जवळ १५ व्रुध्द तीथे सदैव पलंगावर झोपलेल्या अवस्थेत असतात. त्यांची देखभाल करण्यासाठी एक मावशी आहे. जी त्यांना जेवण देते. औषधे देते. त्यांची अंघोळ आणि बाकीचं करते. त्यांचे कपडे बदलते. प्रत्येक खोलीत टीव्ही आहे. ती जेवढी त्यांची काळजी घेते तेवढी त्यांची मुलं घेउ शकतील की नाही शंका आहे.

म्हणणे एवढेच की सर्वच जण आई बाबा नकोत म्हणून व्रुध्दाश्रमाचा पर्याय निवडत नाहीत. काही जणांना आपल्या आईबाबांची चांगली देखभाल व्हावी अशी ईच्छा असते म्हणून मग ते अशा सेवांचा विचार करतात. हॉस्पिटलपेक्षा स्वस्त आणि घराच्या जवळ.

देउ शकाल का? कोणा अडल्या-नडल्या साठी उपयोगी पडू शकेल.

खटपट्या's picture

3 Sep 2015 - 8:58 am | खटपट्या

व्य.नि. केलाय.

इरसाल's picture

2 Sep 2015 - 1:40 pm | इरसाल

मिपाचे ॠन्मेष......................

रुस्तम's picture

2 Sep 2015 - 3:20 pm | रुस्तम

हा हा हा

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 3:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

आज मारताय मला सगळे हसवुन हसवुन ऋन्मेष

खरेखुरे ॠन्मेष आहेत मिपावर वेगळ्या नावाने बहुतेक.

बहुगुणी's picture

3 Sep 2015 - 3:01 am | बहुगुणी

अत्यंत मुद्देसूद लिहिणारे 'ॠषिकेश' माहीत आहेत, पण ते हल्ली (मिपावर) दिसत नाहीत, तेच हे ॠन्मेष का?

तुम्ही मायबोलीवरचे ॠन्मेष ह्यांचे धागे पाहिलेले नसावेत बहुधा :)

रुस्तम's picture

3 Sep 2015 - 5:39 pm | रुस्तम
बहुगुणी's picture

3 Sep 2015 - 5:53 pm | बहुगुणी

माहीत नव्हतं, ज्ञानात भर पडली :-) धन्यवाद!

यशोधरा's picture

4 Sep 2015 - 1:56 am | यशोधरा

ओह बाय द वे, ॠषिकेश वायले.

खेडूत's picture

2 Sep 2015 - 1:47 pm | खेडूत

ओक्के !

बाकी आपण काही विदा जमवला आहे का?
.
.
.
.
.
.
.

(स्वगत: कै कै धाग्यांसाठीपण एखादा वृद्धाश्रम असायला हवा !)

शंभरी तर कुठेच नाय गेली. जेपी, आर्डर द्या...

आधीच काय एक रंगाण्णा लि़ंकन कमी होते म्हणून तुम्ही पण लिंकालिंका करायलात? ;)

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 5:50 pm | दिव्यश्री

पर्तेक्ष रंगाण्णा पण्तांशी तुलणा... अरे ते कुठे , मी कुठे. मी आपली साधी,भोळी,सासुरवाशीण,गरीब बिच्चारी आणी बरीच काही(धुमध्डकाफेम उद्योग्पती श्टाइल वाच्णे) अशी सामाण्य गृहिणी आहे रेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेर्रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!

तिमा's picture

2 Sep 2015 - 4:06 pm | तिमा

सर्वप्रथम माणसाने भावनाशील असू नये. म्हातारपणी आपली अडगळ होऊ नये म्हणून स्वतःहून वेगळे व्हावे व रहावे. पुढे, तब्येती ढासळल्या तर जरुर वृद्धाश्रमात जाऊन रहावे. तरुण पिढीचे जीवन इतके धकाधकीचे झाले आहे की त्यांचा प्रॉब्लेम होऊन राहू नये.

- एक वृद्ध, तिमा

हेमंत लाटकर's picture

2 Sep 2015 - 6:38 pm | हेमंत लाटकर

सर्वप्रथम माणसाने भावनाशील असू नये.

तुमचे म्हणणे बरोबर आहे. आई-वडिलांनी मुलांवर जास्त अवलंबून राहु नये. आपल्या म्हातारपणीची सोय करावी, सगळे मुलांना देऊन टाकू नये. मुलाचे लग्न झाल्यावर त्याला वेगळे राहु द्यावे. कारण आजकाल मुलीनां स्वतंत्र राहवे वाटते. पण मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या संसारात लक्ष घालू नये.

याबाबतीत अमेरीकन लोकांचे चांगले आहे. ते मुलांना लहानपणापासून स्वावलंबी बनवतात. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, हाॅटेल येथे नौकरी करून आपला खर्च भागवतात व वेगळे राहतात. याउलट भारतातील मुले नौकरी लागेपर्यंत आई-वडिलांवर अवंलबून असतात.

धागा वाचून बरे वाटले. मलाही भविष्यात एका वृद्धाश्रमाची गरज लागणार आहे. तिथे राहण्यात काय हो एवढे वाटून घ्यायचे? संसार करून कंटाळा येत नाही का? निवांत तिकडे जाऊन रहावे, वेळेवर व्यायाम, जेवण, वैद्यकीय तपासण्या, समवयस्कांशी गप्पा, दूरदर्शन संचासमोर बसून सासूसुना मालिका बघणे (तरण्या वयात ती संधी नाही ना मिळाली!), जमल्यास जरा कथा कीर्तन ऐकणे. उद्याला ब्रेकफास्टायला काय, जेवायला कोणती भाजी, रात्रीच्या जेवणात पिठले करू की कढी? लाँड्री करायचीये, कपड्यांच्या घड्या, घराची स्वच्छता हे विचार कधीतरी थांबतील या कल्पनेने बरे वाटतेय. आधीच्या माहितीनुसार वृद्धाश्रमात बरीच वेटींग लिस्ट असते असे ऐकले होते. आता आश्रमांची संख्या वाढतिये म्हणजे मलाही संधी मिळेल असे वाटतेय. तशा माझ्या चुलत आजेसासूबाई वृद्धाश्रमात राहतायत. अगदी स्वत: ठरवून राहतायत व आम्ही नातेवाईक येताजाता सारखे भेटत असतो. शेवटी त्या कंटाळतात व आम्हाला "घरी जा" म्हणतात. त्यांना त्यांचे वेळापत्रक सोडायचे नसते. हसतमुख आहेत. नुकतीच भेटले तर नव्वदितल्या आजी इतक्या तरतरीत दिसल्या की मीच काळवंडलेली दिसत होते त्यांच्यासमोर! तुम्ही झकास बातमी दिलीत, धन्यवाद!
भारतात त्या परांजपे की कोणत्यातरी बांधकाम व्यावसायिकांनी अथश्री नावाची योजनाही आणलिये म्हणे! त्यात वयस्कांसाठी सगळ्या सोयी असतात असे ऐकले आहे. चांगली कल्पना आहे.

पैसा's picture

2 Sep 2015 - 5:58 pm | पैसा

मी विचारच करत होते की आता मी म्हातारी झाल्यावर कुठे जाऊ म्हणून. कारण आमच्या घरात तरी ९० च्या पुढे वय असलेले शिनियर लोक स्वतःच्या मुलांच्या अयुष्यातलेच नव्हे तर नातवंडांच्या आयुष्यातले निर्णयही आपणच घ्यायला बघत आहेत. आणि ते हताशपणे बघण्याखेरीज माझ्या हातात काही नाही. अर्थात ती नातवंडे त्यांना कट मारून आपल्याला हवे ते करतात ही गोष्ट वेगळी.

चाळीस-पन्नास वयाच्या माझ्या मैत्रिणींशी बोलते तेव्हा कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती सगळ्यांच्या घरी असल्याचे कानावर येते. त्यांची मुले १५ ते २५ वर्षांची झाली तरी आपल्याला मिळालेले पैसे घरातल्या मोठ्या माणसांच्या हातात ठेवावे लागतात आणि खर्चाचा हिशेबही द्यावा लागतो हे अजूनही खूपजणांकडून ऐकते.

त्यामुळे आम्ही म्हातारे झाल्यावर असा काही त्रास नसलेल्या ठिकाणी रहायला मिळाले तर मला प्रचंड आनंद होईल!

मी विचारच करत होते की आता मी म्हातारी झाल्यावर कुठे जाऊ म्हणून.

विचार सुरु तर झाला म्हणा की.
ब्येस्ट. ;)

पैसा's picture

2 Sep 2015 - 6:10 pm | पैसा

तुझी १२ पोरं बघितल्याशिवाय नाही जाणार! :P

अभ्या तुम आगे बढ़ो (पूर्णविराम)

-हम तुम्हारे साथ है चं काय करायचं याच्या विचारात प्यारे

हम बच्चोंकी चड्ड्या संभालते है असे म्हणायचे बर्का प्यारे.

चिगो's picture

3 Sep 2015 - 1:32 pm | चिगो

प्यारे पुरता सुसाट सुटलाय ह्या धाग्यावर.. मेलो मी हसून हसून..

अभ्या तुम आगे बढो.. होऊ दे खर्च..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगागगगगगगगगगगगगगगगगग!!!!

आयला प्यारे काका आज अगदी जोमात आहेत. ;)

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 7:04 pm | दिव्यश्री

बाब्बौ... अहो लोक्सण्ख्या स्फोट असा शब्द ऐकला तरी आहे का कधी????

मिपावरील म्हातार्या लोकांसाठी आश्रम काढायचा का ?
महीना वीसहजार बदल्यात खाणे(अमर्यादीत), पिणे(मर्यादीत) आणी मिपा -मिपा खेळण्यासाठी फुकट ब्रॉडबॅंड नेट.!

कपिलमुनी's picture

2 Sep 2015 - 7:43 pm | कपिलमुनी

पिणे(मर्यादीत)

मक्काय. घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे येईनात. हितं कुणी असल्या लोडांना सांभाळायचे? ;)

घरच्याना शुध्दीवरचे सांभाळणे येईनात>>> स्वाणुभव म्हणाचा हा?? इतक औघडे का अभ्या तुज ??

आसं परसणल णाई बोलायचं बर्का. जे काय ते जणरल जणरल.
आमचं परसणल लै लागतं लोकांणा मग.

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 7:54 pm | दिव्यश्री

बाबा गल्ती से मिष्टेक मैत है णा?? :(

इस्मायली राहिलि की?? :(

(स्वसंपाद्णाच कै झाल कै मैत)

आपण अनाहितांचा वृद्धाश्रम काढूया का? ;)
त्यात शिनियर असल्यामुळे तुमचे सगळ्यांचे निर्णय मीच घेणार? ;)

पैसा's picture

2 Sep 2015 - 6:14 pm | पैसा

पण तू सासू म्हणून येणार का! मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?

मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?

केवळ ह्याच मुद्द्यामुळे कितीतरी वृध्दाश्रमांचा बिझ्नेस कमी होतो हो.

एस's picture

2 Sep 2015 - 6:20 pm | एस

अक्षरशः खरे!

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले

मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?

=))))

नाखु's picture

2 Sep 2015 - 6:27 pm | नाखु

पार्श्वसंगीत म्हणून आणी खास आजी-भावी सासवांसाठी (आणि सायंकाळचे ६.२० झाले म्हणून ) सांजधारा गीत ऐकूया.

"सुन्या सुन्या महफिलीत माझ्या" चित्रप्ट उंबरठा !!!

सांजधाराप्रेक्षकश्रोतासंघ

सुना मजेत म्हणजे आपले मुलगेही आनंदी राहतील ना! शिवाय त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी! आपल्या संसारात आयुष्यभर भाज्या निवडल्यावर पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत कोथिंबीरीची जुडी पूर्ण निवडून मरण्याची माझी इच्छा नाही. ;) मी सासू म्हणून वृद्धाश्रमात आले तर तुला चालेल का? अनाहितांनी आपापली मते द्यावीत. आपला रोल काय असणारे ते आधीच स्प्ष्ट असलेले बरे! आश्रमात अडीनडीला उपयोगी म्हणून निदान एक अ‍ॅम्ब्यूलन्स तरी असतेच. आपल्याला एकवेळ ती नसली तरी चालेल पण शॉपिंगला जाण्यासाठी गाडी लागेल. त्याचा विचारही करावा लागेल. नुसते अनाहिता कट्ट्याचे फोटू बघून आता गप्प बसवत नाही. मलाही तुळशीबाग शॉपिंग कट्टा निदान म्हातारी झाल्यावर तरी करायचाय. हीच शेवटची इच्छा! ;)

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2015 - 6:33 pm | पिलीयन रायडर

पै तै आणि रेवाक्का ला अणुमोदन! (दिव्यश्री इफेक्ट)

रेवाकका सासु होणार असेल तर मी पण तीशीतच वृद्धाश्रमात यायला तयार आहे!

एवढे सगळे पाह्यजे म्हणती रेवाक्का?
राहा बै आपापल्या घरातच. घरचे थोडे चिडचिड करतील पण आपलेच ना ते. उगी बाहेरच्या लोकांना त्रास कशाला? ;)

वृद्धाश्रमात राहण्यात मजा वाटायला हवी ना!
प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या गोष्ती करायच्या राहून गेलेल्या असतात त्यातील काही तरी करून बघता यायला हव्यात म्हणून सगळी खटपट चाललिये. तर तुम्ही मला भगवी कफनी आणि कमंडलूच देताय की! ;)

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2015 - 6:36 pm | पिलीयन रायडर

मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?

=))

एस's picture

2 Sep 2015 - 6:17 pm | एस

मी काय म्हणतो, आपण मिपाकरांचाच एक वृद्धाश्रम काढायचा का? तिथे डुआयडींना प्रवेश नसेल. प्रत्येक वृद्ध मिपाकर हातात एक टॅब घेऊन मिपामिपा खेळत बसेल. तिथे सरळसरळ एकमेकांशी बोलायला बंदी असेल. जे काही बोलायचेय ते व्यनि/खवमधून. झालेच तर जो कॉमन हॉल असेल त्याला खरडफळा असे नाव देऊ.

अगदीच कुणाला बोलायची हुक्की आली तर बसने बाहेर कुठेतरी नेऊन कट्टाबिट्टा करू.

काय म्हणता? फक्त मिपा जरी मिपाकरांना फुकट असले (मालकांच्या कृपेने) तरी मिपाश्रम मात्र टीटीएमएम. काय?

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2015 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले

ही देखील भारी आयडीया आहे .... फक्त त्यांच्या मिसळीत जास्त तिखट मीठ मसाला तर्री नको ... बीपी वाढलं तर कोण पहाणार भाऊ !

आयडीया ढापायची नाय सांगुन ठेवतय.

थांबा, आधी एक सांगा की स्कोअर सेटल कसे करायचे? समोर बसलेला मनुष्य माझ्याशी तिरके प्रतिसाद देऊन भांडतोय असे दिसताच, हातातील काठी नाही तरी तोंडातील कवळी फेकून मारली तर जबाबदारी कोण घेणार? अजया एकवेळ कवळी बसवण्याची जबाबदारी घेईल, फेकून मारणार्‍यांची नाही! ;)

इत्ते साल मिपा पे रैकर इत्ता भी नै सीखी आप????
क्या दादी आप भी????

हापशेंच्युरी निमीत्त श्री.लाटकर यांचा सत्कार मिपाआश्रमात 50 % डिस्कांऊट देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक- जेपी आणी तमाम तरणेताठे कार्यकर्ते

भारतातल्या एका मोठ्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल तुमचे किती आभार मानावे तितके कमीच!!

ह्या समस्येच्या वाचेलाच कंटाळून वृध्दाश्रमांची आयड्या निघालीय.

वायच गप रंव!! ते लाटकरकाका कायतरी बोलतायेत!! ;)

अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या लै भारी आहे.कट्ट्यासाठी बस असली की बास.वाती वळायला कापूस ,सुनांच्या चहाडया.मज्जानु लाइफ! मी फुकट दात पाडून हातात देणे हा रोल घ्यायला तयार आहे.

ओक्के, मग मी सासूचा रोल करीन. आपल्या भटारखान्यातील मेन्यू प्ल्यानिंगला ताज्या दमाच्या कार्यकर्त्या म्हणून सानिकाताईंना घेण्यात यावे. तो त्यांचा अर्धवेळ जॉब असेल. ;)
स्पँडीताई या सणवार येताच सर्व आज्ज्यांचे मेक अप करून देतील.

सानिकास्वप्निल's picture

2 Sep 2015 - 9:14 pm | सानिकास्वप्निल

मी तय्यार आहे ;)

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 7:06 pm | दिव्यश्री

मला पण घ्या तुमच्यात ... ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2015 - 9:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एवढ्या स्त्रिया एकत्र रहाणार. ह्म्म. म्हणजे सलोखा, शांती, गुण्यागोविंदा वगैरे शब्दांचा वापर थांबणार तर. ;)

(सोमणांच्या मिलिंदाबरोबर ट्रायाथलॉन एवढं पळुन जातो आहे. कृपया इकडचे वातावर शांत झाले की व्यनि करणे) :P

अजया's picture

2 Sep 2015 - 7:07 pm | अजया

दिव्या रोल ठरव मग.

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 7:10 pm | दिव्यश्री

रोल म्हणे... काय तुम्ही द्याल त्यो ...

आफ्ट्र अ‍ॅल...यु आर शिणेर ...यु णो ;)

रेवती's picture

2 Sep 2015 - 7:21 pm | रेवती

ओक्के. मग आपण तुला शुद्धलेखणाचे वर्ग घेण्यास नेमूयात.

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 7:34 pm | दिव्यश्री

पळेल... बाकीच्य्याणा विचरा ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2015 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सूद्दलेकण म्हणायचय का तुम्हाला?

रेवती's picture

2 Sep 2015 - 9:19 pm | रेवती

त्येच त्ये!

सुबोध खरे's picture

2 Sep 2015 - 7:10 pm | सुबोध खरे

मी जांभूळपाड्याला( पाली जवळ) एक वृद्धाश्रम पाहिला. जेथे सर्व टूणटुणीत सुखवस्तू वरिष्ठ नागरिक राहताना दिसले प्रत्येक जोडप्यासाठी दोन खोल्या (एक बेडरूम आणि एक बाहेरची खोली) होत्या (४०० चौ फूट).बाहेरच्या खोलीत एक सोफा दोन खुर्च्या एक टी व्ही. आतल्या खोलीत दोन पलंग एक ड्रेसिंग टेबल त्याला जोडून बाथरूम ज्यात सौरबंबाच्या पाण्याची जोड इ. ते म्हणजे एक स्वयम्पाकघर नसलेले घर होते. सकाळी सहा वाजता चहा येतो. तो घेऊन प्रातर्विधी आटोपून सर्व जण नदीकाठी फिरायला जातात. आठ ते साडे नउ पर्यंत न्याहारी दुपारी साडेबारा ते दोन जेवण आणि सायंकाळी साडे सात ते नौ जेवण हे सर्व मोठ्या डायनिंग हॉल मध्ये. मधल्या काळात वरिष्ठ लोक आपापसात गप्पा मारताना पत्ते कॅरम वगैरे खेळताना दिसले. कोणीही तेथे गलितगात्र नव्हता किंवा अगतिक नव्हता. सर्व जण खाऊन पिउन सुखी अशा कुटुंबातील होते. तेथील खर्च माणशी १० हजार होता आणि जोड्प्याला १७ हजार होता.(२०११ -१२ मध्ये). पण त्यात जेवण खाण पासून सर्व गोष्टींची काळजी घेतलेली होती. सकाळी उठून दुध वाला पेपर वाला पासून मोलकरीण कपडे धुणे इ गोष्टींची कोणतीही कटकट त्यात नव्हती. प्रदूषण विरहित हवा पाणी, ताज्या भाज्या कोणताही ताण तणाव नाही.घराची डागडुजी करा. प्लंबर इलेक्त्रिशियन ची दाढी धरा काहीच नाही. एकदा पैसे भरले कि मोकळे. (तेथे जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे असे ऐकतो.)
कुटुंबाच्या कटकटी नाही कि गृह कलह नाही.एकमेकांच्या फार जवळ राहण्यामुळे पायात पाय अडकण्याची शक्यता असते तीही नाही. परत मुंबईहून फार लांबही नाही.
ते पाहून मला ती कल्पना फारच आवडली. माझ्या सारख्या माणसाला तर जवळ एखादा धर्मार्थ दवाखानाही चालवता येईल. परंतु बायकोला हि कल्पना फारशी आवडलेली नाही. ( पन्नाशी नंतर कदाचित आवडेल अशी आशा).
असा वृद्धाश्रम मला फारच भावला. अगदीच गलितगात्र होईपर्यंत अशा ठिकाणी राहायचे असे मी मनाशी ठरवलेले आहे पुढचे पुढे पाहू.
मुलांनी हाकलल्यावर वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा अगोदरच जाऊन सेकंड इनिंग चालू करण्याची कल्पना मला भावते.
जाता जाता --विदारक सत्य
अनाथाश्रमात गरिबांची मुलं असतात आणि
वृद्धाश्रमात श्रीमंतांचे आईबाप असतात.

हे आताचे असेल , पुर्वी आमच्या गावात एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या मुख्यप्रवेश्द्वारा समोर एक मोठी घंटा आहे , त्या खाली चारचाक्यांमधुण व्रुद्ध आइबापांणा सोड्त असत. हे डोळ्याणी(कुणाच्या असा प्रश्ण विचारु ण्ये) पाहिले आहे.

रेवती's picture

2 Sep 2015 - 7:20 pm | रेवती

डॉ. खरे यांच्याशी सहमत.
मी पाहिलेल्या आश्रमात एकच मोठी खोली दोन जणांमध्ये दिली गेली होती. बाथरुम जोडलेले होते. माझ्या आजेसाबा मात्र दोन जणांचे पैसे भरून एकट्याच रहात होत्या. त्यासाठी त्यांनी दिलेली कारणे मला पटली. आयुष्यभर त्यांनी बर्‍याच तडजोडी केल्या (हे सगळे माझे लग्न होण्याआधी झाले होते ;) ). आता या वयात कोणा दुसर्‍या सदस्येशी जमवून घेणे व आपले वेळापत्रक पाळणे त्यांना अवघड वाटले. हातात पैसे असताना ही तडजोड नको वाटत होती. शिवाय त्या त्यांच्या (दिवंगत) पतींच्या स्वभावामुळे का होईना वेळापत्रक, प्लेनिंग यांच्या पक्क्या आहेत. त्यात गडबड झालेली अजिबात चालत नाही. त्यांनी तोही उल्लेख केला. त्यांचा मुलगा, मुलगी यांचे सगळे आयटीवाले संसार, त्याप्रमाणे असलेली धावाधाव आहे. ती त्यांना मानवत नाही. मग आपले आपण राहिलेले बरे. शिवाय सगळे नातेवाईक विचारपूस करून आहेत याचेही सूख मनात असते. त्यांना सांगितले की मीही तिथेच येऊन राहणार आहे.

आज्जे चक्क तुळशी बागेतुन नीट चुझ करुन घेतलेली तुळशी माळ जपत... काळे वाटाणे वाफेवर सहज शिजत नसल्यास त्यावर काय करावे ? या शंकेवर सगळ्या भक्तांना { सुनांना } प्रवचन कम टिप्स देत आहे असे चित्रच डोळ्या समोर आले ! ;)
.
..
...
चल पळा आता... ;)

जाता जाता :- मध्यंतरी मात्र एक बातमी वाचुन माझ्या डोळ्यात पाणी आले होते...
जन्मदात्या आईला भर पावसात टाकून कृतघ्न मुलाचा पोबारा
भर पावसात वयोवृद्ध आईला गाडीतून फेकून देऊन 'तो' पळून गेला...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

बाणा, मी अनाहिता आज्जी आहे. ;)

मदनबाण's picture

2 Sep 2015 - 7:37 pm | मदनबाण

हा.हा.हा... ते माहित आहे हो. पण ते माझं असचं... कॄपया राग मानु नये !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

हेमंत लाटकर's picture

2 Sep 2015 - 7:43 pm | हेमंत लाटकर

हे वृद्धाश्रम श्रीमंत आई-वडिलांसाठी आहेत. पण जे गरीब वृद्ध लोक आहेत, त्यांची परिस्थिती मात्र फार वाईट आहे.

खरंच काका!! पण मी काय म्हणतो, इथे लेख लिहीण्यापेक्षा तुम्हीच एखादा उपक्रम अशा वृद्धांसाठी का सुरु करत नाही?

कवितानागेश's picture

2 Sep 2015 - 8:23 pm | कवितानागेश

इथे पत्ते टाका हो वृद्धाश्रमाचे.
वाचनखू ण साठवून ठेवेन. ;-)

पत्ते टाकतो पण आधी काय खेळायचं ते ठरवा. बदाम सात, पाचतीन्दोन, मेंढीकोट की रमी?

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 8:30 pm | दिव्यश्री

किण्वा मेंढीकोट ...चालेल

एस's picture

2 Sep 2015 - 8:32 pm | एस

पोकर.

तात्या, कसं खेळत्यात ते सांगा की!! आमास्नी ठावं नाय.

हाहाहाहा! यावरून आठवलं, मिपाची वाटचाल पत्त्यांच्या खेळांच्या रूपाने मांडायची झाल्यास सर्वात आधी होतं पोकर. मग झालं ब्रिज. मग झालं रमी. नंतर पाचतीनदोन, मेंढीकोट वगैरे. आणि सध्या आहे जोड्या-जोड्या. ;-)

पोक आलेल्यांसाठी पोकर काय ? ;-)

हेमंत लाटकर's picture

2 Sep 2015 - 8:36 pm | हेमंत लाटकर

मुलांनी आई-वडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळच का येऊ द्यावी. मुले शाळेत असताना सकाळी पाच वाजता उठून पोळी भाजीचा डब्बा आई करून देते. मुले आजारी पडले की रात्रभर आई जागरण करते. मुले काॅलेजात गेली की मुलांना त्रास होवू नये म्हणून लोन काढून वडिल गाडी घेऊन देतात, मग ते लोन फेडण्यासाठी आेव्हरटाईम करतात. मुलांसाठी एवढे करूनही मुलांसाठी वेळ न देणार्याची गती अशीच होते म्हणणे म्हणजे कृतग्घपणा आहे. मुले परदेशात असली तर वृद्धाश्रमात जाणे बरोबर आहे. पण एकाच गावात राहुन मोठे घर असुनही वृद्धाश्रमात जावे लागणे वाईट आहे.

मुलांनी आई-वडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळच का येऊ द्यावी.

हे तर मान्य आहे. पण आता ज्यांच्यावर ही वेळ आली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला अतोनात कणव वाटत्ये तर काहीतरी करा की राव, नुसते लेख पाडून काय होणारे?

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 8:45 pm | दिव्यश्री

मुले काॅलेजात गेली की मुलांना त्रास होवू नये म्हणून लोन काढून वडिल गाडी घेऊन देतात, मग ते लोन फेडण्यासाठी आेव्हरटाईम करतात. मुलांसाठी एवढे करूनही मुलांसाठी वेळ न देणार्याची गती अशीच होते म्हणणे म्हणजे कृतग्घपणा आहे. >>>अहो मला एक सांगा की काॅलेजात जाणार्या मुलांणा वडिलांणी का गाडी घेउण द्यावी??? त्यांच्यात धमक असेल तर ते घेतिल कि पुढे... कशाला णसते लाड हवेत...जोपर्यन्त ते स्वता कष्ट करुण मिळवणार णाहीत तोपर्यंत त्यांना कष्टाची आणी पैशाची किंमत कशी समजणार?

दुसर म्हन्जे मुले जन्माला घालताना आपली म्हातार्पनीची काठी होइल हा विचार्च का?? अपेक्षाच का ठेवायची अशी?

कवितानागेश's picture

2 Sep 2015 - 9:13 pm | कवितानागेश

इतक्या पहाटेपासून शाळेत जाऊन जर बेसिक मूल्यशिक्षण मुलांना मिळत नसेल, आणि उच्चशिक्षणासाठी गाड़ी आवश्यक होत असेल तर तो दोष शिक्षणपद्धतीचा आणि समाजातूनच रुजल्या जाणाऱ्या मूल्यांचा आहे, .. मुलांचा नाही!

हा प्रतिसाद सीरियसली सीरियस वाटता वाटता सीरियसली कॉमिक वाटायला लागलाय.

पहाटे आई उठते, डब्बा बनवते (मधली कामं संदीपसांदने यांच्या निलाक्षीच्या धाग्यावर) पोरं शाळेला आरामात जातेत.
बाकी पोरांचा दोष नाही हे सांगितल्यावर टेंशन गेलं ना भो!

लाटकर साहेब, विषय फार मोठा आहे. कृपया राग मानू नका. असे एका धाग्यात काय बोलणार? मिपावर याआधी वृद्धाश्रमांचा विषय चर्चिला गेलाय अनेकदा. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. आजकाल सारखे सारखे ऐकू येते की दुसर्‍यांचा विचार करा, दुसर्‍यांचा विचार करा. पण खरंतर स्वत:चाच विचार करायला कोणाकडे वेळ नाहीये. माझ्याकडे सध्या आहे म्हणून मी फक्त माझाच विचार करतिये ही गोष्ट वेगळी. वृद्ध व त्यात आर्थिक परिस्थिती वाईट असलेल्यांचे खरंच हाल आहेत. अमान्य नाहीच. मनुष्यबळ हा मोठा प्रश्न ठरतोय. शिवाय दरपिढी जे बदल समाजात घडायचे ते थांबणार नाहीत. तसे ते थांबत असते तर आज तुमच्या/माझ्या घरातील महिला नऊवारी साडी नेसून वावरत असत्या. तर, बदल हे असेच आहेत. आपापले संसार पूर्वीच्या पद्धतिनं करून झाल्यावर आजकालचे शिनियर्स अबलंबित्व असेल असे रहायलाच तयार नाहीत. हा वर्गही मोठा आहे. ते जिथे राहतात ती गल्ली सोडूनही त्यांना कोणी ओळखत नाहीत पण त्यांना तेच बरे वाटते. ही परिस्थिती माझी आहे तरी मी त्या परिस्थितीचाच विचार करणार. जगातील प्रत्येक अनाथ, दीन दुबळ्याचा विचार कोणीही करू शकत नाही. त्याने आज हातात असलेला दिवसही वैट जातो हा स्वानुभव आहे. ते म्हातारे आहेत म्हणून त्यांनी दु:खात जगायचं व जे तरणे आहेत त्यांनी काहीही कन्स्ट्रक्टीव न करता नुसतं अरेरे म्हणायचं आणि उसासे सोडायचे. ना म्हातारे सुखी, ना तरणे!
तुम्हाला काळजी वाटतिये तर एक काम होऊ शकेल. वृद्धाश्रमात तेथील सिनियर सिटिझन्सच्या मनोरंजनासाठी काही उपक्रम राबवू शकता. त्याबद्दल काही म्हणायचे असेल तर चांगले आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Sep 2015 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१०० झाले. सत्कार करा रे.

दिव्यश्री's picture

2 Sep 2015 - 9:21 pm | दिव्यश्री

जेपी दादा जर्रा मदत करा बर्र... हा फाष्टेश्ट शेण्च्युरी धागा हाये का ? हे साण्गा बरे.

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 9:23 pm | नीलमोहर

" .......
अन कालचा गोंधळ बरा होता."
काय म्हण आहे बरं ही ?

यावेळी मी बरीच मदत केलीये शेंचुरीसाठी. आमचाही सत्कार झाला पायचे. फ्लेक्ष लागले पायजेत. त्यावर समर्थक म्हणूनही चित्र व नाव लावावे.

राघवेंद्र's picture

2 Sep 2015 - 11:22 pm | राघवेंद्र

+१

धागा असाच दीर्घायु होवो. आता दोनशासाठी शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2015 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

भूतकालातल्या आणि सद्याच्या जीवनात असलेल्या फरकाचा अंदाज जमेस न धरल्यानेच केवळ वृद्धाश्रमांबद्दल अनेक गैरसमज होत आहेत.

जुन्या काळासंबंधिची काही भ्रामक गृहीतके...

१. पूर्वी कसे सगळे पुत्र/पुत्री अगदी श्रावणबाळासारखी आईवडिलांची सेवा करत असत !
२. आईवडिलांची सेवा करण्यापुढे मुलांनी आपल्या भवितव्याचा बळी दिला पाहिजे !!
३. ... आणि मुख्य म्हणजे एवढे सर्व (आणि इतर काही) त्याग आईवडिलांसाठी करून वर आपल्या मुलांनी आपल्या शेजार्‍यांच्या मुलांच्यापेक्षा चार पावले पुढे राहून आईबापांचे आयुष्य कृतकृत्य केले पाहिजे ही अपेक्षा असतेच !!!

पूर्वीच्या आणि सद्याच्या वस्तूस्थितीतील फरक लक्षात घेतला तर असे दिसून येईल की...

१. जुन्या काळी जेव्हा आईबाप... बहुदा बापच... आपल्या जीवनाचा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवत असत आणि मुलगाही बापाच्या गावात आणि घरात राहून पुढचे आयुष्य घालवत असे तेव्हा आईवडिलांनी मुलांवर अवलंबून असणे हे 'एका अर्थाने' ठीक होते.

२. आजच्या काळात बापाचा व्यवसाय-धंदा मुलगा चालवतोच असे नाही... बहुदा नाहीच. कारण पीढी-दरपीढी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. या सर्व संधी मूळ गावी मिळतील असेच नाही... बहुदा नाहीच. मग असे असताना चांगल्या आईबापांनी आपल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण देवून त्यामूले मिळणार्‍या जगभरच्या संधी काबीज करण्यासाठी पूर्ण मोकळीक द्यावी की त्यांच्यावरचा भार बनून त्यांचे पंख छाटावेत ?

३. जर नीट नियोजन केले तर सद्याच्या काळातल्या बहुसंख्य आईवडीलांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नाही की त्यांनी आपल्या मुलांवर सरसकट अवलंबून रहायला लागावे. आणि विशेषतः, ज्या काही आईवडीलांना मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून रहावे लागते त्यांनी जर मुलांवर बंधने न टाकता त्यांना त्यांच्या विकासाला मोकळीक दिली तर मुलांची आणि पर्यायाने आईवडिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासच मदत होईल नाही का ?

अजून महत्वाचे मुद्दे असे की...

१. भावनिक भरात अंध झाल्याने आपण आपल्या मुलांच्या विकासावर बंधने घालत आहोत हे बर्‍याच लोकांच्या ध्यानात येत नाही.

२. याच भावनिक अंधत्वामुळे "वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी लाजिरवाणे आहे" हा गैरसमज आणि "आईवडिलांनी वृद्धाश्रमांत राहणे हे मानहानीकारक आहे" अश्या खुळ्या कल्पना उगम पावतात. या कल्पनाच भारतात उत्तम सोईसुविधांचे वृद्धाश्रम निर्माण होण्याला असलेले मोठे अडथळे आहेत.

त्यामुळे, एकीकडे आर्थिक सुस्थिती असलेल्या कित्येक घरांत वृद्धांची मानसिक व शारिरीक अनावस्था होत असते. तर दुसरीकडे आर्थिक दृष्ट्या सबळ असलेल्या वृद्धांनाही उत्तम व्यवस्था असलेले (किंवा इतर कोणतेही) वृद्धाश्रम उपलब्ध नाहीत. हा विरोधाभास केवळ मानसिक दंभामुळे निर्माण झालेला असून, तो दंभ झुगारून दिल्याशिवाय त्याचे निराकरण होणार नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2015 - 9:10 am | प्रकाश घाटपांडे

सहमत आहे.
वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे होतील हे पहाण्याची आता गरज आहे.
तुला जन्म दिला. खस्ता खाऊन लहानाचा मोठा केला. ..... वगैरे वगैरे जे मुलांना ऐकवले जाते त्याला जन्म देण्यापुर्वी आमची परमिशन घेतली होती काय? असा प्रश्न विचारु लागले आहेत.

हेमंत लाटकर's picture

3 Sep 2015 - 10:42 am | हेमंत लाटकर

वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे होतील हे पहाण्याची आता गरज आहे.

आपल्या मुलांचे पालनपोषण करताना कोणतेही आई-वडिल म्हातारपणी मुलांनी सांभाळावे म्हणून करत नाहीत तर प्रेमापोटी करतात.

आजकाल आई-वडिलच एकत्र फॅमिलीत राहत नसल्यामुळे मुलांनी जवळच राहावे असा आग्रह आई-वडिल करत नाहीत.

खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2015 - 11:17 am | डॉ सुहास म्हात्रे

खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे.

हे सरसकटीकरण झाले ! अमेरिकन जीवन पद्धतीत जसे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत.

१. अमेरिकेतही ज्या आईवडिलांना परवडते ते मुलाची पोस्ट्ग्रॅजुएट (ज्याला ते कॉलेज/ग्रॅज्युएशन म्हणतात) शिक्षणाच्या खर्चाची एजुकेशन फंड, बचत, इ तून तरतूद करतात. अमेरिकेत शैक्षणिक कर्ज जास्त सुलभपणे मिळते आणि ते निवडणूकीतला महत्वाचा मुद्दाही असते. पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट, इ त काम करून मिळणारे उत्पन्न शिक्षणाच्या खर्चाला पुरेसे नसते... त्याच्याकडे एक अतिरिक्त (सप्लिमेंटरी) आवक इतकेच पहाता येईल.

२. ज्यांच्या पालकांना उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही असे अनेकजण ग्रॅज्युएट (ज्याला ते हायस्कूल म्हाणतात) शिक्षणानंतर नोकरी करून पैसे साठवून अथवा स्वतःच्या नोकरीच्या बळावर शिक्षणकर्ज काढून पोस्टग्रॅजुएशन करतात.

३. शिक्षण चालू असतानाही स्वावलंनाची सवय असली तर ते नक्कीच चांगले आहे. पण, ज्या पाल्याच्या पालकांमध्ये शिक्षणाचा खर्च उचलण्याची ताकद आहे त्या पाल्यांना शिक्षणात अधिक वेळ खर्च करता आला तर ते पाल्याच्या भवितव्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल.

३. एखादी परदेशी पद्धत अंगिकृत करताना तिच्यातले सर्वच आपल्या देशातल्या वस्तूस्थितीत आणि तेही सर्वच माणसांना लागू पडेलच असे नाही... त्यामुळे त्यातले फक्त आपल्यासाठी चांगले तेवढेच उचलावे, अंधानुकरण टाळावे. मुख्य म्हणजे चांगल्या गोष्टी केवळ पश्चिमेकडूनच येतात असे नाही... पूर्व, उत्तर, दक्षिणेकडूनही येऊ शकतात किंबहुना आपण डोके लढवले तर आपल्या इथेही त्या जन्मू शकतात... आपण डोळे उघडे ठेवून निष्पक्षपातीपणे त्यांचे विष्लेशण करून योग त्याचा आणि योग्य तेवढ्याचा स्विकार करणे जास्त फायद्याचे ठरेल.

स्रुजा's picture

3 Sep 2015 - 6:29 pm | स्रुजा

पर्फेक्ट ! संपूर्ण प्रतिसादाला + १००००

अर्धवटराव's picture

3 Sep 2015 - 2:08 am | अर्धवटराव

कि भारतात वृद्धाश्रम काढत आहेत. मोठ्या अपेक्षेने, अभिनंदन वगैरे करायला धागा उघडला. तर च्यामारी..केटली तो गरम है और चाय बिलकुलच नय.

आमचा ( नो वृद्ध ) आश्रम काढण्याचा बेत आहे (आदर्शः अनेक बापु, बुवा वगैरे). तिथले उद्योग बघता तिथे वृद्धावस्थेला थाराच नसतो. प्रश्नच इल्ले :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Sep 2015 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या ह्या ह्या. आम्हास एंट्री चकटफु ना?

नाखु's picture

3 Sep 2015 - 8:29 am | नाखु

असा प्रश्न विचारल्याने एक जागरूक मिपा वाचक म्हणून शरम /लाज्/खंत जी उप्लब्ध आहे ती वाटली.

अ.राव.आगे बढो हम तुम्हारे साथ है!!!

डोळे पाणावले :)

हेमंत लाटकर's picture

3 Sep 2015 - 7:21 am | हेमंत लाटकर

माझ्या धाग्याला 100 च्यावर नेल्याबद्दल सर्व मिपाकरांचे शतश अभिनंदन.

पैसा's picture

3 Sep 2015 - 10:35 am | पैसा

बर्‍याच गंभीर धाग्यांनंतर जरा गंमत केली ती तुम्ही मजेत घेतली त्याबद्दल धन्यवाद! इथे बर्‍याच लोकांनी गंभीर प्रतिसाद दिले आहेत आणि ते खरंच चांगले आणि व्यवहार्य आहेत. आता निव्वळ भावनेवर आधारित राहून चालणार नाही. काही लोक म्हणतात तसे खरंच घरी ठेवलेल्या नोकराने काही अघटित प्रकार केला तर? किंवा घरात एकट्या असलेल्या वृद्धाला अचानक काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि मदत उपलब्ध नाही झाली तर? असे बरेच प्रश्न आहेत. त्यातही कोणतीही दोन माणसे आणि त्यांची परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे एकच एक उत्तर सगळीकडे लागू होणार नाही. त्या त्या परिस्थितीत सापडल्याशिवाय कोणीही माणूस असा का वागला हे सांगता येणार नाही. त्यामुळे सगळ्याला सरसकट लेबल लावू नये.

आता जगच बदलत चालले आहे तर माणूस बदलणारच ना! जागतिकीकरणात अनेक गोष्टीचे संदर्भ बदलतात. त्या रेट्यात नवीन पिढी स्वार्थी झाल्यासारखी वाटली तरी त्याला इलाज नाही. पूर्वी ५/८ मुलं असायची. आईबापाची जबाबदारी सगळ्यांवर वाटून जायची. आता एकेकच मूल असेल तर एका नवरा बायकोच्या जोडीवर ४ वृद्धांची, (आजी आजोबा असतील तर त्याहूनही जास्त) जबाबदारी येईल. ते हे कसे निभावून नेऊ शकतील? स्वतंत्रपणे आयुष्य घालवलेल्या माणसाला सुनेच्या किंवा जावयाच्या मर्जीनुसार वागणे कितपत शक्य होईल? या सगळ्याला इलाज नाही. बदल हे होणारच. ते जास्तीत जास्त सकारात्मक कसे घेता येतील हे बघणे गरजेचे आहे. त्याबदली पूर्वी कसं होतं आता कसं आहे हा विचार करून काय फायदा आहे?

चिगो's picture

3 Sep 2015 - 3:01 pm | चिगो

माझ्या धाग्याला 100 च्यावर नेल्याबद्दल सर्व मिपाकरांचे शतश अभिनंदन.

मग आता ह्या धाग्याला घरीच ठेवून त्याची मायेनी काळजी घेणार तुम्ही कि वृद्धाश्रमात टाकणार? ;-)

हेमंत लाटकर's picture

3 Sep 2015 - 1:23 pm | हेमंत लाटकर

आई-वडिलांंनी मुलांना जन्म दिल्यावर मुलांना लहानाचे मोठे करून त्यांना उच्चशिक्षण देणे हे जसे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. तसे आई-वडिल खुप म्हातारे व आजारी (धडधाकट असताना ते आपली कामे आपणच करतात) पडल्यावर त्यांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य नाही का? वृद्धाश्रमात पाठवून आपली जबाबदारी झटकणे कितपत योग्य आहे.

सेवा करणे म्हणजे नेमके काय? त्या मुलांनी आपापले कामधंदे सोडून आईबापाची शारीरिक सेवा करावी का? ते तुम्हाला स्वतःला शक्य आहे का? जरा विचार करून बघा. मग म्हातार्‍या आईबापांना नोकरांच्या हातात सोपवून नोकरांनी हेळसांड केली, खून वगैरे केले तर? ती रिस्क घेण्यापेक्षा वृद्धाश्रमात ते राहिले तर काय वाईट आहे?

खटपट्या's picture

3 Sep 2015 - 1:55 pm | खटपट्या

+१ बरोबर

सौंदाळा's picture

3 Sep 2015 - 2:02 pm | सौंदाळा

+२
सध्या ज्यांचे (ज्या पिढीचे) आईवडील वूध्द आहेत त्यांना हे तणावपुर्ण वाटु शकेल कारण त्यातल्या बर्‍याच जणांनी आई-वडीलांनी आजी-आजोबा, सासु-सासरे यांची केलेली सेवा बघितली असेल आणि त्यांच्यावर कळत . नकळत संस्कारदेखिल आई-वडीलांना सांभाळायचे झाले आहेत.
पण जे लोक आता ४०-४५ किंवा कमी वयाचे आहेत त्यांना त्यांच्या वृध्दापकाळी वृध्दाश्रमात राहयला काही वाटणार नाही.
येत्या काही वर्षात लोकांचे वृध्दाश्रमाकडे सकारात्मकरित्या बघण्याचे प्रमाण वाढेल.

दिव्यश्री's picture

3 Sep 2015 - 2:11 pm | दिव्यश्री

मी माझ्या आईबाबाना माझ्या आजीआजोबांची सगळी सेवा करता णा पाहिले आहे त्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले आहेत . मी माझ्या सासुसासार्याना वृद्धाश्रमात कधीही ठेवणार णाही . पण जर माझ्यावर वेळ आली तर मी अगदी आनंदाने जायील . :)

सौंदाळा's picture

3 Sep 2015 - 2:26 pm | सौंदाळा

इथे दिव्यश्री ताईंशी सहमत
माझी म्हातारपणी जर वर डॉक म्हणाले आहेत तशा वृध्दाश्रमाची पैसे भरण्याची ऐपत असेल तर मी पण आनंदाने जाईन. कमीतकमी हवापालट म्हणुन एखाद-दोन महिने जायला तर काहीच वाटणार नाही.

हेमंत लाटकर's picture

3 Sep 2015 - 3:01 pm | हेमंत लाटकर

मी माझ्या सासुसासार्याना वृद्धाश्रमात कधीही ठेवणार णाही.

वा! सुन असावी तर अशी असावी!

वा! सुन असावी तर अशी असावी!

कित्ती भारी!!

कपिलमुनी's picture

3 Sep 2015 - 2:49 pm | कपिलमुनी

या सर्व चर्चांमधून एकच गोष्ट कळली
म्हातारपणी पुरेशी बचत हवी. श्रीमंत म्हातर्‍यांना बरे दिवस आहेत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Sep 2015 - 3:59 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

पद्मावति's picture

3 Sep 2015 - 2:55 pm | पद्मावति

वरच्या अनेक प्रतिसादात आल्याप्रमाणे हे खरं आहे की उत्तम वैद्यकीय सेवा, समवयस्क लोकांचा सहवास, जबाबदारीतून मुक्तता हे वृद्धाश्रमाचे प्लस पॉइण्ट्स आहेतच. बर्याच घरात बघितलं आहे की तीथे वृद्धांची आबाळ होते. कधी कधी मुलांना इच्छा असूनही आई वडिलांकडे पूर्णवेळ लक्ष देणे शक्य होत नाही. मग नोकरांच्या भरवशावर त्यांना ठेवण्यापेक्षा वृद्धाश्रमात ठेवणे कधी पण चांगले. पण त्यांच्या वृद्धाश्रमाचा खर्च मात्र मुलांनीच करावा. आई वडिलांच्या उतरवयात मुलांनी त्यांची आर्थिक जाबाबदारी घेणे कायद्याने अनिवार्य करावे.
सौंदाळा यांचा प्रतिसाद सुद्धा पटतो.
मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीत हा मन आणि बुद्धी यामधला हा संघर्ष आहे. बुद्धी सांगते की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. पण तरीही स्वत:च्या आईवडील, सासू सासरे यांच्याविषयी वृद्धाश्रमाचा विचार करवतही नाही. याचबरोबर हेही पक्कं माहिती आहे की बहुतेक करून सगळेच वेळ आल्यावर स्वत: मात्र वृद्धाश्रमात आनंदाने जातील.

तुडतुडी's picture

3 Sep 2015 - 3:25 pm | तुडतुडी

द-बाहुबली >>> +११११११११११
अहो पण आता वनंच नाहीत तर वानप्रस्थाश्रम कसा स्वीकारणार ? खिक
बरं मग ? वृद्धांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींत पोरांच्या संसारात नाक खुपण बंद करावं . आणि ह्याला आईवडिलांचे संस्कार पण कारणीभूत असतात .
आता लहान मुलं असलेल्या आईबापांनी त्यांच्या म्हातारपणी होणार आहे ह्याचा विचार करावा