वांझ

यमन's picture
यमन in जनातलं, मनातलं
2 Sep 2015 - 9:09 am

ही कथा मी " श श क " स्पर्धेसाठी लिहायला घेतली होती . शब्दसंख्या अंदाज न आल्यानी अंमळ गंडली होती.
पण आता कुठले शब्द उडवू तेच समजेनासं झालंय.
वांझ
सूर्य झाडाच्या पायाशी पेटायचा आणि कमरेशी विझायचा ;रोज ;रोज ;गेली कित्येक वर्ष . त्याचं झाडाला कसलं अप्रूप असणार ?
स्वतःचा अपूर्ण ;शुष्क ; जमिनीत खोलवर रुजलेला संसार घेऊन झाड जगत होतं . जगण्यात कुठला सोहळा नाही ;मरणही येत नाही .अगदी एकटं .
पानं ;फुलं ;फळं एवढंच काय पावसाळ्यातलं शेवाळ पण झाडावर बहिष्कार टाकून होतं .
गर्भारिणी ; पहिलट करणी झाडाची वाट शक्यतो टाळायच्या . पार लांबून जड पावलांनी जायच्या ; पण तीठा चुकवायच्या .
नाही म्हणायला एक झाडापेक्षा म्हातारी कातकरीण बऱ्याचदा खुरडत खुरडत झाडाशी यायची .
झिजलेल्या अशक्त नखांनी बुंधा खरडायची . कधी कधी काही माही बोलायची . क्वचित जनावरासारखी भेसूर रडायची .
एकदा अशीच रडता रडता झाडापाशीच मेली . झाडावरचे ओरखडे तसेच ठेऊन ,स्वतः च्या नखा बरोबर झाडाचा अंश घेऊन गेली .तेंव्हा पासून झाडाच्या जागेला "वांझेचा तीठा "म्हणतायेत .
जाता जाता एक वांझ तशाच दुसऱ्याला स्वतःच नाव देऊन गेली .
पुढच्या कैक पिढ्या हे नाव पुसू शकणार नाहीत .
कित्येक अष्टपूत्रा ;सौभाग्यवतींना जमणार नाही इतकं चिरंतन .
झाड अजूनही उभं आहे . म्हातारीच्या चितेला सुद्धा आपला उपयोग झाला नाही ह्याची खंत बाळगत .
एखादा हळवा मुसाफीर ; कधीतरी तेल पणती ठेवेल ह्याची वाट बघत .

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

बापरे अंगावर काटा आला वाचताना. प्रतिमासृष्टी अगदी दमदार उतरल्ये.

विरामचिह्नं तेवढी सुधारा. फार घोळ आहे त्यांचा.
बाकी पहिल्या वाचनात जाणवलं नव्हतं. पण आवडल्यामुळे पुन्हा वाचायला घेतलं, तेव्हा लक्षात आलं.
कथेवर काय मंत्र वगैरे टाकलात का हो?;)

वेल्लाभट's picture

4 Sep 2015 - 3:10 pm | वेल्लाभट

कथा अतिशय प्रभावी

स्पंदना's picture

2 Sep 2015 - 9:39 am | स्पंदना

सुंदर म्हणवत नाही, पण कथा लिहायची पद्दत अतिशय भावली.

ब़जरबट्टू's picture

2 Sep 2015 - 9:42 am | ब़जरबट्टू

छान जमलीये .. सोडा तो शशक चा वांझोटा नाद हो.. :)

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 10:54 am | नीलमोहर

प्रभावी लेखन.

प्यारे१'s picture

2 Sep 2015 - 1:26 pm | प्यारे१

+११११
थेट पोचणारं प्रभावी लेखन.

बाकी शशक चा नाद आपल्याला झेपत नाहीच्च नाहीतरी. काय ओ बजरुभौ? ;)
-स्मरणशील

लीना घोसाळ्कर's picture

2 Sep 2015 - 10:20 am | लीना घोसाळ्कर

खरच वाचताना अंगावर काटा आला.....

राजाभाउ's picture

2 Sep 2015 - 10:36 am | राजाभाउ

मस्त जमलीय. जी. एं च्या कथांची आठवण आली.

द-बाहुबली's picture

2 Sep 2015 - 1:25 pm | द-बाहुबली

येस टिपिकल जि.ए. टच.

सुरेख भावविश्व तयार केलं आहे. अजुन लिहा.

बॅटमॅन's picture

2 Sep 2015 - 2:09 pm | बॅटमॅन

अगदी नेमके. एकदम जीए च! :(

नाखु's picture

2 Sep 2015 - 10:57 am | नाखु

अजून फुलवता आली असती.

अश्याच आशयाची पण थोडी वेगळी माझी

कथा आठवली.

यादगार नाखु

मीता's picture

2 Sep 2015 - 12:21 pm | मीता

मस्त

एस's picture

2 Sep 2015 - 12:34 pm | एस

कथा परिणामकारक आहे. ह्यावर एक तर दीर्घकथा व्हायला हवी किंवा अतिशय कमी शब्दांत शतशब्दकथेसारख्या फॉर्मॅटमध्ये लिहिली जावी.

लावणारे वाक्य! आधीच वांझ असल्याचे दुक्ख आणी त्यात ही निराशा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2015 - 4:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

हे वाक्य त्या कथेचा परमोच्च बिंदू आहे.

ताकदीची लिखाणशैली आहे तुमच्याकडे. लिहीत रहा.

खटपट्या's picture

2 Sep 2015 - 1:31 pm | खटपट्या

आवडली

मनाला चटका लावणारी कथा. अतिशय प्रभावी लेखन.

बोका-ए-आझम's picture

2 Sep 2015 - 2:01 pm | बोका-ए-आझम

अमूर्त (abstract ) कथा हा तसा हाताळायला कठीण प्रकार आहे पण तुम्ही फार छान लिहिलं आहे. Bravo!

जव्हेरगंज's picture

2 Sep 2015 - 7:58 pm | जव्हेरगंज

बोजड वृक्षाची व्यथा पोहोचली.
चहुबाजुंनी पाना-फुलांसारख्या विखुरलेल्या 'अवतरणचिन्हां'सकट काळजाला भिडली.

कविता१९७८'s picture

3 Sep 2015 - 2:25 pm | कविता१९७८

छान लेखन

आई गं...खरच अंगावर काटा आला.

तुडतुडी's picture

3 Sep 2015 - 4:35 pm | तुडतुडी

काळजाला भिडली कथा

शंभर शब्दात वगैरे बसवण्याचा अट्टाहास नकोच. उत्तम आहे लेखन.

इस्पिक राजा's picture

3 Sep 2015 - 5:45 pm | इस्पिक राजा

शतशब्दकथेचा सोस नकाच धरु. आहे या शब्दात परफेक्ट लिहले आहे. शतशब्दकथा हा वेगळा फॉर्मेट आहे पण त्याला लिमिटेशन्स आहेत. भावन पोचवण्यासाठी शब्दांची मर्यादा बर्‍याचदा त्रासदायक ठरु शकते.

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2015 - 12:18 am | चौथा कोनाडा

परिणामकारक लेखन ! उत्कृष्ट वातावरण निर्मिती !

कथा आवडली. शुद्धलेखन व चि न्हे या कडे लक्ष द्या

मिपा दिवाळी अंक 2015 sसाठी जरुर लिहा: वाट पहात आहे अश्याच दमदार दीर्घ लेखनाची ! .

उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी, सणाच्या दृष्टीने अप्रिय, किळसवाणे, मृत्यूशी संबंधित, थेट शोकांतिका असे प्रकार कृपया न पाठवल्यास बरे.असं म्हन्तायेत सं मं

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2015 - 9:32 pm | चौथा कोनाडा

अर्थातच .........!
"अप्रिय, किळसवाणे" हे असले तर एरवी ही लिहु नये. आणि दिवाळीच्या अंकाचं म्हणाल तर विषयाचे वैविध्य तर हवेच !
चिवडा, चकली, लाडु या फराळाच्या व्हरायटी सारखाच मिपाचा दिवाळी अंक असणारच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 4:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

बापरे!! शब्द संपले माझे तर

पैसा's picture

4 Sep 2015 - 4:56 pm | पैसा

अतिशय परिणामकारक लिहिलंय!

एक एकटा एकटाच's picture

4 Sep 2015 - 7:09 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त लिहिलीय

अभ्या..'s picture

5 Sep 2015 - 12:25 am | अभ्या..

अप्रतिम लेखन

dadadarekar's picture

5 Sep 2015 - 5:51 pm | dadadarekar

छान

यमन's picture

7 Sep 2015 - 10:05 am | यमन

सर्व सुचना ,सुधारणा अमलात आणायचा जरूर प्रयत्न करीन .