एक अनुभव - २

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जनातलं, मनातलं
2 Sep 2015 - 5:48 am

एक अनुभव

अश्विता काय होतेय? बर वाटत नाही आहे का?...शेजारीच उभ्या असलेल्या काकांनी विचारल..
पण अश्विता काहीही न बोलता जोरजोरात हुंकार भरू लागली..
सुनील तुझ्या पोरीला धरलान र कुणीतरी.....गर्दीतून एक अनुभवी आवाज आला..
एव्हाना अश्विता सगळीकडे डोळे मोठे करून पाहू लागली होती, अस्पष्ट घोगर्या आवाजात ''मला सोडा, सोडा मला'' अस ओरडू लागली.
..
बाळा जा जाऊन पटकन खालच्या अळीच्या शिर्या काकांना बोलाव...अस बोलून काकांनी एका लहानमुलाकरवी सांगावा धाडला.
थोड्याच वेळात तो मुलगा शिर्या काकांना घेऊन आला..शिर्या काका भूत उतरवतो अस खुपदा ऐकल होत मी. गावात कुणाला राखनेचा नारळ द्यायचा असेल तर शिर्या काकांना बोलावलं जायचं..

शिर्या काका थेट जाऊन अश्विता समोर बसले. आणि आपल्या धारधार आवाजात'' कोण आहेस तू? आमच्या पोरीला कशाला धरलयस?..असा प्रश्न केला..
यावर अश्विता जोरजोरात हुंकारे भरून सुटण्याची धडपड करू लागली..
वेताची काठी आणा रे...शिर्या काकांनी हुकुम सोडला
काकांनी घरातली एक काठी शिर्या काकांना दिली..आणि पुढच्याच क्षणाला एक जोरदार तडका अश्विताच्या पाठीवर पडला..
अत्यंत भेसूर आवाजात मोठ्याने ओरडली ती...कोण आहेस तू? कुटून आली? अस विचारून काकांनी पुन्हा एक जोरदार फटका तिच्या पायावर मारला..
''मारू नका मला.. सांगते मी ...मारू नका''..अश्विताच्या तोंडून कुणी दुसरच बोलत असाव अस वाटू लागल होत..
सांग कोण आहेस तू?
मी पार्वती..खालच्या आळीची..हि पोरगी माझ्या विहिरीवर सांच्याला आलि..तिकडे धरल मी तिला...डोळ्यांच्या विचित्र हालचाली करत तिने सांगितलं..
काय पाहिजे तुला? कशाला धरलाय तिला?...अस बोलताना काठीचा प्रसाद पुन्हा पाठीवर दिला शिर्याकाकानी तिला..
पण याचा काहीच परिणाम या वेळी अश्वितावर जाणवला नाही. त्या घोर्या आवाजात ती अचानक जोरजोरात हसू लागली. काय घडतंय काही कळायला मार्ग भेटेच ना.
सांग काय हवी तुला? यावेळी मात्र शिर्याकाकानी शेतात घुसलेल्या बैलाला माराव इतक्या जोरात काठीचे तडाके दिले..
''मला मारू नका.. मटन पाहिजे मला..मटन पाहिजे''...अश्विताच्या तोंडून रडवेला आवाज आला.
मटन देतो मी..पण पोरीला सोड..बोल सोडशील पोरीला..शिर्या काकांनी तिला दमात घेत म्हंटल.
मी सोडते.. मला मटन द्या..पुन्हा जमिनीकडे डोळे फिरवत अश्विता म्हणाली.
मटन भाताची एक थाळी मागवली शिर्या काकांनी..आणि अश्विता समोर ठेवली..ती थाळी भस्म्या झालेल्या रोग्यान खावी तशी संपवली तिने. एरवी ताटातलं थोड वाढलेलं जेवण सुद्धा न खाणारी अश्विता हे सगळ करतेय हे बघून खर काय आणि खोट काय तेच कळेनास झाल होत..
खान संपल होत एव्हाना. काकांनी पुन्हा एकदा तिला निघून जायला सांगितलं.
ती काही वेळ शांत झाली..अचानक पुन्हा वर पाहिलं तिने..पण काही बोलत न्हवती. सर्वाना वाटल निघून गेली असावी ती.पण शिर्या काकांनी तिच्या वडलाना जवळ बोलावलं. आणि विचारल'' हा कोण आहे ते सांग?
पण अश्विता उत्तर देइन..तेव्हा शिर्याकाकानी ''जायला बोललो ना तुला'' अस बोलून तडाखे द्यायला सुरवात केली. आठ ते दहा फटक्यानंतर अचानक अश्विता जमिनीवर आडवी झाली. तिची शुद्ध हरपली होती. कुणीतरी पाणी आणून तिच्या डोळ्यावर मारलं.
जी जागी झाली.
पप्पा काय झाल? सगळे कशाला जमलेयत? काय झाल?....अश्विताने निरागसपणे प्रश्न केला.
''काही नाही''..शिर्या काका म्हणाले.. तिच्या आई कडे बोट दाखून म्हणाले हिला ओळखतेस ना?
काय काका आई ला ओळखते का विचारता मला? मला ना खूप भूक लागलीय, मी जेऊन येते हा.अस बोलून ती आतमध्ये गेली.तिच्या मागे आई बाबा सुद्धा गेले..शिर्याकाकानी हाताने आत्ता सगळ ठीक आहे म्हणून सांगितलं.

पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न मला पडला होता..अर्धा तास मारलेल्या गप्पा, अश्विताने मारल्या माझ्यासोबत कि ती पार्वती जिने झपाटल होत तिला.....

कथाअनुभव

प्रतिक्रिया

इतक मारावं लागत भूत घालवायला?

कथा आवडली.

सुमित_सौन्देकर's picture

2 Sep 2015 - 6:47 am | सुमित_सौन्देकर

पाहिलंय तस लिहील

स्पंदना's picture

2 Sep 2015 - 10:09 am | स्पंदना

अच्छा अनुभव कथन आहे.
मी विचारल खरच इतक माराव लागत का?
तुमच्या अनुभवाबद्दल काही म्हणन नाही, कारण हे सगळ गावी पाहिलयं.

सुमित_सौन्देकर's picture

2 Sep 2015 - 2:53 pm | सुमित_सौन्देकर

उपाय खर तर अघोरीच केले जायचे. इतका मार सहन करण तस कठिनाच

उगा काहितरीच's picture

2 Sep 2015 - 8:40 am | उगा काहितरीच

बाबौ !

मांत्रिक's picture

2 Sep 2015 - 8:47 am | मांत्रिक

कथेपेक्षा अनुभवकथन जास्त वाटतं. थोडा कथेचा रंग देता आला असता. पण असो, तुमची मैत्रीण आता ठीक असावी अशी आशा करतो.

सुमित_सौन्देकर's picture

2 Sep 2015 - 3:06 pm | सुमित_सौन्देकर

पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2015 - 8:55 am | कैलासवासी सोन्याबापु

मस्त अनुभव मांत्रिक बोलल्या प्रमाणे ज़रा कथारूप करता आले तर बरे पडेल देवा. बाकी बाधा झालेली माणसे पाहून मला मौज वाटते बरेच वेळी अन विचित्र ही गाणगापुर ला तर साक्षात् गुरुदेव दत्तांस शिव्या घालणारी असली माणसे पाहिली मी साखळी न बांधलेली

सिरुसेरि's picture

2 Sep 2015 - 1:18 pm | सिरुसेरि

अरुंधती ( तेलुगु सिनेमा)ची आठवण झाली . त्यांमध्ये सयाजी शिन्दे यांनीही असाच एक भुते काढणारा फकिरबाबा साकारला आहे जो नास्तिकांना भगवद्गीतेमधले दाखले देतो .

द-बाहुबली's picture

2 Sep 2015 - 1:19 pm | द-बाहुबली

जयचम्मा..

पद्मावति's picture

2 Sep 2015 - 1:30 pm | पद्मावति

तुम्हाला आलेला अनुभव भयानकच होता. पण तो तुम्ही छान मंडलाय.

कपिलमुनी's picture

2 Sep 2015 - 1:52 pm | कपिलमुनी

एखाद्या भुकेलेल्या सांगितला पहिजे हा उपाय .

कधीतरी लोक पोटभर जेवायला घालतील

सुमित_सौन्देकर's picture

2 Sep 2015 - 3:00 pm | सुमित_सौन्देकर

कारण कोणतही असो...पण मुळात काहि देण्याची इच्छा मनात हवी