देव आणि वेदना (शरण तुला भगवंता वरुन काही शंका)

सच्चिदानंद's picture
सच्चिदानंद in काथ्याकूट
28 Aug 2015 - 8:24 pm
गाभा: 

आज ही कथा वाचली. अगदी छान लिहिली आहे लेखकानं. परंतु खालच्या ओळी अजूनच अस्वस्थ करुन गेल्या.

तोः आता परत यायचं नाही बरं का इथे. या सगळ्या दुःखांचा वेदनेचा शेवट झालाय. मी तुला माझ्यापासून दूर कुठेच जाऊ देणार नाही आता.

इथे तो म्हणजे कोणी माणूस नसून देव तिला परलोकात घेऊन जायला आलाय असा संदर्भ आहे.
कथाविषय म्हणून ही गोष्ट सोडून दिली तरी ही एक प्रश्न इथे येतो तो म्हणजे, आपण इथे देव या संकल्पनेतला विरोधाभास का नाही पहात.. का परलोक वगैरे गोष्टी इथे मांडल्या जातात.

ही विधवा स्त्री आयुष्यभर दु:खं सहन करत बसली. तिच्या कुटुंबापासून दूर भीक मागत बसलीय आणि शेवटी तिला न्यायला देव आलाय. म्हणजे तिच्या वाईट दिवसात तो कोठे होता? आता तो तिला त्याच्यापासून कुठे जाऊ देणार नाहीय पण मग आजवर कोणी रोखलं होतं त्याला.
गेल्या जन्माचे भोग, पाप-पुण्याचे हिशेब या सर्व तकलादू सबबी आहेत असं वाटतं. देवावर विश्वास असण्या/नसण्यापेक्षा आपली ही त्याच्याआडून इतर गोष्टींसाठीची भलामण पटत नाही.

आणि कर्म-फल इतकाच जन्माचा अर्थ असेल तर मग देवळात कशाला जायचं त्याच्या दर्शनासाठी तरी ? तो काय एक्ष्ट्रा बोनस देतो काय पुण्याचा ? मग देवळाची दुकानदारी केलेल्यांना काय देतो ? पुण्य + संपत्ती ?

एक तर जीवनाबद्दलचा हा पॅसिव्ह निराशावादी दृष्टीकोन, देवाच्या नावावर चालणारा हा बाजार अन चुकीच्या कल्पनांचे समर्थन खटकतं.

या कथेच्या संदर्भात तरी समाजाला, देवाला (असेल तर) माफ करावंसं वाटत नाही.

=======
खरं तर या विषयावर आधीही बर्‍यापैकी इथे तिथे चर्चा झालेली असेल परंतु तरीही विषय मांडावासा वाटतोय म्हणून लिहितोय.

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

28 Aug 2015 - 8:37 pm | dadadarekar

पण या विषयावर मी काही बोललं की लोक मला बाटगा / पाक्या म्हणतेल.

म्हणुन पास.

सच्चिदानंद's picture

28 Aug 2015 - 9:49 pm | सच्चिदानंद

तुम्ही सगळीकडे ज्या भाषेत बोलत फिरता त्यामुळे तुम्हाला ते फटके बसतेत. तुम्ही तुमच्यापुरतं बोला. तुमच्या आवडत्या धर्माच्या अनुशंगाने बोला हवं तर, सांगा तिथल्या व्यथा नि कथा.
आणि कोणी तुम्हाला बोलतंय म्हणून तुम्ही गप्प राहिल्याचा तरी इतिहास नै त्यामुळे तुमची मर्जी.

धर्मराजमुटके's picture

28 Aug 2015 - 8:43 pm | धर्मराजमुटके

चर्चा ??
अशा विषयांवर कधीही चर्चा होत नसतात. फक्त माझीच बाजू कशी बरोबर ते रेटून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे असल्या वांझोट्या चर्चांवर वाचनमात्र राहणेच श्रेयस्कर. असो, धाग्यासाठी शुभेच्छा !

सच्चिदानंद's picture

1 Sep 2015 - 7:20 pm | सच्चिदानंद

तुमच्याशी बिनशर्त सहमत.
इथे काही सदस्यांनी जी भाषा आणि वक्तव्ये, अवांतरे सुरु केली आहेत ते पाहता तर असे म्हणावे वाटते की असे धागे फक्त यांनीच काढावेत आणि यांनीच तिथे दंगे घालावेत. इतरांनी विषयाला हात लावू नये, मनातले बोलू नये अथवा वाचनमात्रच रहावे. :/

इतके दिवस कुठे होता बे सच्चया? आज उपटलास अचानक?मिसळपाव चालेल तुझ्या शिवाय....
चल निघ! (संपादक आणि मालकांनी ठरवलं असेल तर राहशील)

सगा मोड ऑन - देव हा मनाचा खेळ आहे.- सगा मोड ऑफ.

मी सगाशी सहमत आहे.

सतिश गावडे's picture

28 Aug 2015 - 9:31 pm | सतिश गावडे

:)

मन हा मानवी मेंदूने विविध अंतर्बाह्य उलाधालींना(स्टीम्युलाय) दिलेला प्रतिसाद आहे.

सच्चिदानंद's picture

28 Aug 2015 - 9:45 pm | सच्चिदानंद

प्यारे भाऊ, इतकं वैतागायला काय झालं हे कळालं नाही..? हा मी इथे लिहायला नवीन आहे पण आंजा अथवा मिपावर नवीन नाही आणि माझा इथल्या इतर आयडींशी वैयक्तिक ओळखी आहेत पण तसा माझा हा पहिलाच लेख आहे. तेव्हा तर मग,

इतके दिवस कुठे होता बे सच्चया? आज उपटलास अचानक?मिसळपाव चालेल तुझ्या शिवाय....
चल निघ! (संपादक आणि मालकांनी ठरवलं असेल तर राहशील)

याचा काही बोध होत नाही. "इतके दिवस कुठे होता बे सच्चया?", "उपटलास अचानक" - जर आधी नव्हतोच तर ह्या भाषेचा वापर चूक वाटतोय.
तसेच "चल निघ!" म्हणायचा तुमचा काय संबंध ..?
दुसर्‍या कुठल्या आयडीशी गल्लत करु नये प्यारे काका.

"देऊळ, देव" या उल्लेखांमुळे जर काही गैरसमज झाला असेल तर ढिस्क्लेमर टाकून ठेवतो :
मी agnostic आहे (म्हणजे नास्तिक नव्हे). पण इथे मंदीर म्हणा अथवा मशीद म्हणा अथवा चर्च म्हणा, स्थिती बदलत नाही. देव म्हणा अथवा अल्ला म्हणा अथवा अजून काही, परलोक म्हणा अथवा जन्नत/ हेवन म्हणा. मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो गोष्टीच्या अनुशंगाने आलाय.

याव्यतिरिक्त काही गैरसमज असतील तर तसे नीट शब्दात सांगावे उगी उचकू नये.

सच्चिदानंद चा नेमका अर्थ काय ठाऊक आहे का? त्यात सगळंच येतं. तेवढंच माहिती करून घेणं पुरेसं आहे. पण ते मिपावर मिळणं अवघड आहे.

हेमंत लाटकर's picture

29 Aug 2015 - 7:49 am | हेमंत लाटकर

सच्चिदानंद म्हणजे सत, चित आणि आनंद

सच्चिदानंद's picture

1 Sep 2015 - 7:13 pm | सच्चिदानंद

सच्चिदानंद चा नेमका अर्थ काय ठाऊक आहे का? त्यात सगळंच येतं. तेवढंच माहिती करून घेणं पुरेसं आहे. पण ते मिपावर मिळणं अवघड आहे.

मला जो अर्थ माहीत आहे आणि अभिप्रेत आहे तो लाटकर काकांनी व्यक्त केलाय. तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय आहे?
जर ते मिपावर मिळणे अवघड आहे तर तुम्ही लिंक द्या अथवा साध्या शब्दात सांगा.

परत सांगतो, याव्यतिरिक्त काही गैरसमज असतील तर तसे नीट शब्दात सांगावे उगी उचकू नये.
आणि तेही शक्य नसेल तर सरळ गैरसमज झाला इतके सरळ मान्य तरी करावे. (त्याला पण मोठे मन लागतं पण असोच)

सच्चिदानंद's picture

1 Sep 2015 - 7:17 pm | सच्चिदानंद

तुम्ही तर राहूच द्या दरेकर. इतरत्र संस्कृत लिहित फिरताय आणि गुगल करायला येत नै होय. की उगी वेड पांघरुन पेडगाव ला जायचं ?

जे तुम्हाला या प्रतिसादात बोललोय त्याचं उत्तर देता येत असेल तर पहा अन्यथा सोडून द्या..

dadadarekar's picture

29 Aug 2015 - 2:35 am | dadadarekar

अरे सच्चिदानंदा , देव हा आपल्या मानण्यावर असतो.

मी आमच्या ' ह्या'ंच्यामध्येच देव पहाते रे बाबा !

मांत्रिक's picture

31 Aug 2015 - 4:01 pm | मांत्रिक

मी आमच्या ' ह्या'ंच्यामध्येच देव पहाते रे बाबा !
अहो दादासाहेब "मी आमच्या ह्याच्यामध्येच देव पहाते रे बाबा!" म्हणजे काय?
अनुस्वार तरी नीट द्या की! काय तरीच विनोद निर्माण करता राव ;)

द-बाहुबली's picture

31 Aug 2015 - 3:23 pm | द-बाहुबली

तुम्हला कथेवर चर्चा करायची आहे की कर्म प्रमाण जरी तरी का भजावा हरी ही शंका मनात आहे ?

तुडतुडी's picture

31 Aug 2015 - 3:38 pm | तुडतुडी

गेल्या जन्माचे भोग, पाप-पुण्याचे हिशेब या सर्व तकलादू सबबी आहेत असं वाटतं.

तुमच्या वाटण्यावर काय आहे ? हे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा त्या स्त्रीच्या पापपुण्याचा तुमच्याकडे काटेकोर हिशेब असतो . पापी लोकांना शिक्षा नाही मिळाली कि सुधा लोक ओरडतात आणि मिळाली सुधा कि . कर्माचा सिद्धांत प्रत्येकाला लागू होतो . आत्ता लाचार , गरीब , शांत असणारा माणूस एके काळी गुंड , माजलेला , पापी , अत्याचारी असू शकतो . आणि ह्या सगळ्याचा हिशोब देवाकडे असतो . दुसरी गोष्ट

आणि कर्म-फल इतकाच जन्माचा अर्थ असेल तर मग देवळात कशाला जायचं त्याच्या दर्शनासाठी तरी ? तो काय एक्ष्ट्रा बोनस देतो काय पुण्याचा ? मग देवळाची दुकानदारी केलेल्यांना काय देतो ? पुण्य + संपत्ती ?.

ह्या प्रश्नांची उत्तरं कॉमन सेन्स ने मिळू शकतात . ती स्त्री अशीच पूर्वायुष्यात किवा पूर्व जन्मी देवळाची दुकानदारी करणारी असेल म्हणून हे भोग भोगावे लागत असतील . कर्म फळ हेच महत्वाचं . कारण कर्म करण आपल्या हातात आहे . फलं देणं ईश्वराच्या हातात . काही वाईट बघितलं कि आपण देवाच्या नावाने बोटं मोडतो . पण जगात भरपूर सुंदर गोष्टी सुधा आहेत मग तेव्हा आपण देवाचे आभार का मानत नाही ?

Energy can not be created Not be destroyed. It can be converted from one form to another.
चांगल्या किवा वाईट कर्मांमुळे जी Energy निर्माण होते ती कुठे जाणार ?
Every action has equal and opposite reaction
चांगली कर्म , चांगली फलं . वाईट कर्म , वाईट फलं

या कथेच्या संदर्भात तरी समाजाला, देवाला (असेल तर) माफ करावंसं वाटत नाही.

खिक .देव तुम्हाला ह्या वाक्याबद्दल माफ करो . तुम्ही कोण देवाला माफ करणारे ?

सच्चिदानंद's picture

10 Aug 2017 - 5:13 pm | सच्चिदानंद

या जुन्या धाग्यावरचे बहुतेक प्रतिसादक आयडी अवतारकार्य संपवून गेल्याचे पाहून अंमळ विस्मय वाटला, परंतु आश्चर्य नक्कीच वाटले नाही.
तथास्तु! :)