मिरर मिरर...

नीलमोहर's picture
नीलमोहर in काथ्याकूट
27 Aug 2015 - 5:02 pm
गाभा: 

लेखनामागची प्रेरणा: समाप्त...

"मिरर मिरर ऑन द वॉल, हू इज द फेअरेस्ट ऑफ देम ऑल !!"
'हिमगौरी आणि सात बुटके ' या कथेतील दुष्ट राणीचे हे वाक्य आपल्याला आठवत असेलच.
प्रत्येकाला वाटत असते की असं विचारल्यावर आरशाने उत्तर द्यावे तूच सगळ्यात सुंदर म्हणून...
पण आपण जर स्वत:लाच हा प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल,
आपण असू सगळ्यात छान..चांगले...फेअर ??

आपल्या रोजच्या जगण्यात माणूस अनेक मुखवटे सोबत वागवत फिरत असतो.
जशी समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती त्यानुरूप मुखवटे बदलण्यात तो तरबेज असतो.
मात्र या मुखवट्याआडचा खरा चेहरा वेगळाच असतो, त्याचे अनेक पैलू असतात,
जे तो इतरांसमोर आणू इच्छित नाही,जे फक्त त्यालाच माहीत असतात.

थोडक्यात आपण इतरांसाठी वेगळे असतो आणि प्रत्यक्षात वेगळे.
अर्थात यावर कोणी म्हणू शकेल की असं काही नसतं, मी जसा आत आहे तसाच बाहेरही,
पण ते तितकसं खरं नाही हे त्यालाही माहीत असतं.

इथे व्हॉटसएप वर फिरणाऱ्या एका विनोदाचे उदाहरण देता येईल, 'सोशल मिडिया वरील प्रोफाईल फोटो
हे बऱ्याचदा आपले मुखवटे असतात आणि आधार कार्डवरील फोटो हे प्रत्यक्षातले आपण असतो '

इतरांसमोर आपली स्वच्छ सुंदर प्रतिमा यावी असा सगळयांचा अट्टाहास असतो, पण मनाच्या आत, खोलवर
आपली एक काळी बाजू आपण लपवून ठेवलेली असते, जी कधी कोणासमोर येऊ नये यासाठी सतत आपली धडपड सुरू असते. (इथे काळा रंग नकारात्मक या अर्थाने वापरला आहे, कोणताही वर्णद्वेष इ.त्यात अभिप्रेत नाही)

मात्र इतरांपासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी स्वत:पासून कोणी लपू शकत नाही, किंवा काही लपवूही शकत नाही..
मग आपण द्वेष करत राहतो आपल्यातीलच या काळया बाजूचा, जी सावलीसारखी सतत आपल्या अवती-भोवती, टोचत, छळत, फिरत राहते. अर्थात इथे पर्याय असतो झाले गेले विसरून नव्याने सुरुवात करण्याचा,
पण कितीही घासून पुसून लख्ख केलं तरी पाटीवरील खडूचा पांढरा थर जसा पूर्णपणे कधीच जात नाही,
तसंच काही गोष्टी अशा असतात ज्या मनातून कधीच बाहेर पडत नाहीत, कायम घर करून तिथेच राहतात....

आपण आरशासमोर उभे राहतो तेव्हा त्यात दिसणारी प्रतिमा आपल्याला पूर्णपणे आवडली की आपण खूश होतो,
तसे जर मनाच्या आरशात डोकावून पाहिले तर आपल्याच आतील काही नकोशा छटा आपल्याला अस्वस्थ करतात का ??

अशी आपल्यातील एखादी नकारात्मक बाजू मग ती कुठल्याही रूपात असेल जसे की एखादा न्यूनगंड, केलेल्या चुका, वाईट गोष्टी, स्वभावातील एखादा वाईट भाग, आपल्यामधील न आवडणारे काही इ. ते सर्व व्यक्त करून थोडं मोकळं होण्याचा हा एक प्रयत्न..सगळेच करून पाहू.

प्रतिक्रिया

नीलमोहर's picture

27 Aug 2015 - 5:17 pm | नीलमोहर

स्वभाव बराचसा शांत आणि अंतर्मुख (वेगळा वेगळा...) त्यामुळे लोकांमध्ये मिसळणे वावरणे थोडे त्रासदायक वाटते आणि लोक या गोष्टी तेवढ्या समजून घेऊ शकत नाही हा अनुभव, त्यामुळे चार लोकांत कधीकधी शिष्टपणाचे, अलिप्तपणाचे मुखवटे चढवावे लागतात.

याशिवाय इतरांमधील दोष नजरेआड करता न येणं (यात घरचेही येतात), कोणालाही लवकर माफ न करता येणं, नकोसे विषय डोक्यातून काढता न येणं, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची हुकुमशाही, न-शक्य डेडलाईन्स सहन करत राहणं, वादाच्या वेळी आपली बाजू प्रभावीपणे मांडता न येणं (भांडण करणे जमत नाही, अशा वेळी सगळा संताप डोक्यात जाऊन आधी डोळयांतून पाणी येऊ लागतं ही सगळयात जास्त चीड आणणारी गोष्ट !!)
या आणि अशा इतरही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्वतःबद्दल आवडत नाहीत, अर्थात ही यादी बरीच वाढत जाईल तरी मुद्दा कळण्यासाठी एवढे पुरेसे आहे.

मांत्रिक's picture

27 Aug 2015 - 10:53 pm | मांत्रिक

@नीलमोहोर
थोड्याफार फरकाने सर्वांची परिस्थिती अशीच असते. तुम्ही स्वतःलाच दोष देत राहिलात तर कदाचित समस्या अजून उग्र होत जातील. हां, एक गोष्ट नक्की की आजच्या काळात दुष्ट, कपटी, बेडर लोकांचं जगणं फार सोपं आहे. संवेदनशीलता व हळवेपणा आजकाल शापच आहे म्हणा. पण केवळ दोष कबूल करून उपयोग नाही. तो दूर करता येण्यासाठी काही उपाय आहे का? हे शोधणं फार महत्वाचं.

नीलमोहर's picture

28 Aug 2015 - 10:21 am | नीलमोहर

अर्थातच स्वत:मधील दोष जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा कायम प्रयत्न असतो आणि प्रत्येका बाबतीत ही प्रोसेस आयुष्यभर सुरू राहिली पाहिजे तरच आपण प्रगति करू शकतो.
संवेदनशीलता हा दोष मानला जातो आजच्या जगात हे अगदी मान्य.

बरं तुम्ही मांत्रिक आहात तर ते काळी जादू वगैरेबद्दल काही येऊद्यात,
;)

असंका's picture

27 Aug 2015 - 11:37 pm | असंका

मि. डार्सी.

कल्पना चांगलीये...

नीलमोहर's picture

28 Aug 2015 - 10:41 am | नीलमोहर

मि.डार्सी.

खूप दिवसांनंतर भेट झाली यांची, ब्रिगेट जोन्स मध्ये आठवणी ताज्या झाल्या होत्या नंतर.
मात्र इथे 'the dark knight' जास्त आठवत होता.

बरं तुम्ही अकॉउंटंट (कसं लिहीता हो हे ?) आहात,त्यातही कंफ्युज्ड,त्या बॅलंसशीटचे बारा तर वाजत नाहीत ना.
(कृ.ह.घ्या)
तर तुमचेही डेबिट क्रेडिट, हिसाब किताब बॅलंसशीट शेअर कराल इथे.

मी एक तर अकौंटंट तरी असतो नाही तर कंफ्युज्ड तरी. दोन्ही एकाच वेळी मी क्वचितच असतो.

म्हणजे जेव्हा मी कन्फ्युज्ड असतो तेव्हा मी अकौंटंट असत नाही.
जेव्हा मी अकौंटंट असतो तेव्हा मी कन्फ्य्जुज्ड असत नाही.

माझा आय डी कन्फ्युज्ड/अकौंटंट असता तर परफेक्ट असता...पण आयडी घेताना मी अकौंटंट नव्तो!

:-))

(कायतरी टाइमपास आहे हो. ह. घ्या.)

नीलमोहर's picture

28 Aug 2015 - 10:59 am | नीलमोहर

तुम्ही विषय मोठ्या सफाईने चुकवलाय हे लक्षात आलेले आहे तरी कृपया मुद्द्यावर येणे.
(आम्हीही अकौंटस शिकलो आहोत जरी त्यात करियर नाही केले, ती आकडेमोड टॅली इ. आपल्या डोक्याबाहेरचे काम आहे हे पहिल्या जॉबच्या वेळी समजले.)

नीलमोहर's picture

28 Aug 2015 - 10:04 am | नीलमोहर

लेख माझ्याबद्दल वा माझ्या समस्यांबद्दल नाही.
लेखामागील उद्देश्य आहे - टू ओपन अप (यासाठी समर्पक मराठी वाक्य ?)
अजून एक उदाहरण द्यायचं तर दीपिकाने आपल्या डिप्रेशनबद्दल कंफेस केलं तसं.
सर्वांनी आपल्यातील खटकणाऱ्या नावडत्या गोष्टी शेअर कराव्या ही इच्छा, अर्थात ते सोपं नाही
पण सोपी कामं आपल्याकडून अपेक्षित नाहीतच, अवघड कामं करूनच पुढील रस्ता सोपा
करायचा आहे.
यातून होईल एवढेच की आपल्यासारखेच इतरही सम दु:खी-सुखी आहेत हे जाणून, त्यांच्याशी
शेअर करून आपल्यातील त्या नकारात्मक भावनांना एक क्लोजर (शेवट) मिळू शकतो.

धन्यवाद :)

पैसा's picture

28 Aug 2015 - 10:58 am | पैसा

स्वतःच्या डिप्रेशनबद्दल बोलणे हे अगदी कबुलीजबाब या सदरात येणार नाही. डिप्रेशनमधे असलेला माणूस सहसा त्याबद्दल बोलत नाहीच. त्यातून बरे होतानाच बोलायला लागतो. शिवाय तो आजार आहे. डिप्रेशन "येतं". चूक ही माणूस "करतो."

शेअर करणे सोपे नाही. केवळ एवढ्याचसाठी की चूक कबूल करणे कठीण नसते. मात्र इथे ओपन फोरमवर तुम्ही जे काय लिहाल त्याचा वापर नेहमीच स्कोअर सेटलिंगसाठी केला जातो. इथे लिहिताना किंवा आमच्यासारखे काही काम करताना आपण कळत नकळत अनेकांना दुखावतो. ते फक्त पलटवार करण्यासाठी संधीची वाट बघत असतात. मग तुम्ही कोणत्याही उद्देशाने काहीही लिहा, त्यातून फक्त वाद आणि भांडणेच तयार होतात.

हिरीरीने याला उत्तर देणार होतो तेवढ्यात एकापेक्षा एक कटू आठवणी यायला लागल्या. नेहमी शब्द बोल्ड मध्ये घेतलात त्यालाही आक्षेप घेता येणार नाही.

नीलमोहर's picture

28 Aug 2015 - 11:25 am | नीलमोहर

इथे अर्थातच कोणाकडूनही कसले कंफेशन इ.अपेक्षित नाही, फक्त शेअरिंग हवंय जेणेकरून इतर लोक या गोष्टींबद्दल काय आणि कसा विचार करतात हे जाणून घेता येईल.
जसे मला ती कथा वाचून आतवर काहीतरी हलवल्यासारखे वाटले आणि त्यातून हा लेख लिहीला गेला.

बाकी ते इतर राजकारण, स्कोअर सेटलिंग वगैरेबद्दल कल्पना नाही त्यामुळे तो विषयच डोक्यात आला नाही.

सूड's picture

2 Sep 2015 - 5:01 pm | सूड

टू ओपन अप

सगळं मान्य, पण अशा फोरम्सवर ओपन अप होऊन काय मिळतं? काहीच नाही. वरती पैसा म्हणतात तसं इथल्या गोष्टी पलटवार करण्यासाठीच वापरल्या जाण्याची शक्यता जास्त!!

आणि आपल्यातल्या सो कॉल्ड काळ्या/लपलेल्या बाजूबद्दल म्हणता, तर ती आपणच स्विकारली तर कोणी स्वीकारली किंवा नाही फार फरक पडत नाही. इथे ज्या ज्या म्हणून लोकांनी आपली मनोगतं मांडली मग ते डिप्रेशन बद्दल असो, की आणखी काही, धाग्यावर सहानुभूती किंवा "मी तुमची अवस्था समजू शकतो" टाईप प्रतिक्रिया देणारे लोक माघारी खिल्ली उडवताना, त्या गोष्टीवर गॉसिप करताना दिसले. त्यामुळे ओपन अप होण्यासाठी this(rather any virtual forum) is not right place at all!!

ओपन अप व्हायला काहीच हरकत नाही, पण ज्या व्यक्तीसमोर ओपन अप होताय त्यांनीच जर सहानुभूतीचा मुखवटा धारण केला असेल तर that does not make sense !

पैसा's picture

2 Sep 2015 - 5:51 pm | पैसा

सगळ्यांना धोक्याची सूचना. ओपन अप होणे वगैरे आदर्शवत परिस्थितीत ठीक आहे. पण आंतरजालावर आपण ज्या लोकांना कधी पाहिले नाही आणि पाहण्याची शक्यता नाही त्यांच्यासमोर कोणत्या खाजगी गोष्टी आणि किती प्रमाणात बोलाव्यात याबद्दल कोणतेही स्वप्नाळू निरागस विचार नकोत. कोणाला मुलं व्हायला प्रॉब्लेम आहे, कोणाला अजून काही प्रॉब्लेम आहे असे विश्वासाने एखाद्याला/एखादीला सांगितलेले त्याने तिसर्‍याच कोणा संबंध नसलेल्या माणसाला सांगण्याचे दुर्दैवी प्रकार इथे मिपावरच झाले आहेत. म्हणून आंतरजालावर वावरताना सुरक्षिततेचे जे सामान्य नियम आपण बाहेरच्या जगात पाळतो ते इथेही न चुकता पाळा असेच मी सर्वांना सांगते.

मारव्याने प्रांजळपणे सांगितले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण उद्या त्यांच्या लिखाणावर टीका करताना या गोष्टीचा कोणी वापर करणारच नाही असे मी ठामपणे सांगू शकत नाही. कारण तसे प्रकारही इथेच पूर्वी घडलेले आहेत.

दुसऱ्यानं तिसऱ्या व्यक्तीवर टाकलेल्या विश्वासाची काशी झाली त्याचं काय?
एखादी मुलगी कुणाबरोबर तरी फिरते हे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगते. तेव्हा दुसरी व्यक्ती हे तुझं 'चीप गॉसिप' तुझ्या जवळच ठेव असं सांगते त्यामुळं पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोम्ब मारते.

उगाचच कुणाचं तरी नाव घेऊन कांगावा करते आणि स्वत: च्या डोक्यातली घाण गावभर पसरवते. जे अर्थ अभिप्रेत नसतात ते लावले जातात त्यांचं काय करायचं?????

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 8:54 pm | नीलमोहर

ते धोक्याची सूचना वगैरे थोडं जास्त नाही झालं का, असं वाटतंय की लोकांनी इथे प्रतिसाद दिले की काहीतरी अनर्थ घडेल. एक साधा निरूपद्रवी धागा आहे हा, आरडीएक्स भरलेला ट्रक नाही की कोणीतरी प्रतिसाद देईल आणि स्फोट होईल :)
असं नसतं हो.
आपण आधीही ते स्कोअर सेटलिंग इ. मुद्दे मांडलेत ज्याला काही संदर्भ नव्ह्ता आणि इथे त्याची गरजही नव्ह्ती. मिपावरील काही लोक एकमेकांशी काय राजकारण खेळतात याच्याशी मलाच काय इतरही बर्‍याच लोकांना काही घेणं-देणं नसेल. या धाग्याचा तो विषयच नाही.

मी आधीच पुरेशा सूचना, स्पष्टीकरण, नमुना उत्तरे इ.वर दिलेले आहेत, पहिल्याच प्रतिसादाद्वारे व्यवस्थित सुरुवात करून दिलेली आहे आणि अनेकांनी ते समजून घेऊन त्याप्रमाणे प्रतिसाद ही दिले आहेत. त्यांनाही पूर्ण कल्पना असेलच की हे सार्वजनिक संस्थळ आहे हे लक्षात ठेऊन इथे लिहावे.
मीही स्वतःबद्दल जे लिहीलंय ते केवळ 'टिप ऑफ द आईसबर्ग' आहे, पूर्ण ऑटोबायोग्राफी नाही लिहीलीय कारण इथे लिहीण्यातील मर्यादा मलाही कळतात. अगदी थोडक्यात स्वतःचे स्वभाव-विशेष इथे सांगण्यात काही आक्षेपार्ह असेल असे मला अजूनही वाटत नाहीये.

इथे येणारे लोक सूज्ञ, सज्ञान, समजूतदार आहेत (असं मी तरी मानते), त्यांना कुठे काय लिहायचं काय नाही ते नक्कीच कळत असावं, त्यामुळे इतक्या स्पून-फीडींगची आवश्यकता नाही असं मला वाटतं, काय लिहायचं काय नाही हा निर्णय त्यांच्यावरच सोपवलेला बरा, नाही का?
लिहीण्यात काही चुकले असेल तर जरूर सांगा. आपला तो अधिकार आहेच.
धन्यवाद.

पैसा's picture

2 Sep 2015 - 9:41 pm | पैसा

ते धोक्याची सूचना वगैरे थोडं जास्त नाही झालं का, असं वाटतंय की लोकांनी इथे प्रतिसाद दिले की काहीतरी अनर्थ घडेल.

तुम्ही मिपावर खर्‍याच नवीन आहात का?

आपण आधीही ते स्कोअर सेटलिंग इ. मुद्दे मांडलेत ज्याला काही संदर्भ नव्ह्ता आणि इथे त्याची गरजही नव्ह्ती.

संदर्भ रेग्युलर येणार्‍यांना चांगलेच माहीत आहेत. नाहीतर तुम्ही १०० वेळा सांगून एक मारवा सोडता १/२ लोकांनीच अगदी ओझरतं का लिहिलं? बाकी कुणी इथे प्रतिसाद का देत नाहीयेत? मी फार उशीरा लिहिलंय. त्या आधी किती प्रतिसाद आले होते?

गरज नव्हती हे सांगायची तुम्हाला का गरज वाटली? ओपन फोरमवर वावरण्यातले धोके काय आहेत हे माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगू शकते. तुम्हाला पटलं तर घ्या.

अगदी थोडक्यात स्वतःचे स्वभाव-विशेष इथे सांगण्यात काही आक्षेपार्ह असेल असे मला अजूनही वाटत नाहीये.

अजून तुमचा सामना आंतरजालावरच्या नगांशी झालेला दिसत नाही.

इथे येणारे लोक सूज्ञ, सज्ञान, समजूतदार आहेत (असं मी तरी मानते), त्यांना कुठे काय लिहायचं काय नाही ते नक्कीच कळत असावं, त्यामुळे इतक्या स्पून-फीडींगची आवश्यकता नाही असं मला वाटतं, काय लिहायचं काय नाही हा निर्णय त्यांच्यावरच सोपवलेला बरा, नाही का?

एग्झॅक्टली! मग मी काही चुकीचे बोलत असेन तर त्याकडे सगळे दुर्लक्ष करतील. त्याऐवजी त्याच्याशी सहमत का होत आहेत?

माझा अधिकार वगैरे सोडूनच द्या. मी तसे काही मानत नाही. इथे जे नमुने बघितले आहेत त्यांबद्दल मीही टिप ऑफ आईसबर्ग लिहिले आहे. त्या अनुभवांवर लिहायचे ठरवले तर कित्येक गिगॅबाईट्स खर्च करावे लागतील. तरीही मी इथे आहे कारण हेच की काही नग असले तरी बहुतांश पब्लिक चांगलं असतं. फक्त आपली प्रायव्हसी सोडायचे भावनिक आवाहन वगैरे करणे मला पटत नाही. कारण भावनेच्या भरात कित्येकजण काहीकाही लिहून जातात आणि मग भानावर आल्यावर ते अप्रकाशित करायला सांगतात हे कित्येकदा अनुभवले आहे.

तुम्ही जरा जास्तच निरागस वाटता आहात मला!

नीलमोहर's picture

3 Sep 2015 - 12:17 pm | नीलमोहर

" सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी, सच है दुनियावालों के हम है अनाडी."

आरसा बघतांना प्रत्येक वेळी, न चुकता ही गोष्ट कळून येतेच.

मनीषा's picture

3 Sep 2015 - 4:21 pm | मनीषा

+१

सहमत

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 5:58 pm | नीलमोहर

तुम्हाला कोणाचा कोणता मुखवटा दिसून आला मला कल्पना नाही. कोणाचे दुर्गुण इ.जाणून घेऊन त्यावर सहानुभूति
दाखवणे हा लेखाचा उद्देश्य कधीच नव्ह्ता आणि नसेल. मला स्वतःला कोणीही,कोणासाठीही रिकामी सहानुभूति दर्शवलेली आवडत नाही (जिथे खरी गरज असते तिथे सोडून), लोकांनी माझी चेष्टा उडवण्याचाही मला अनुभव आहे, प्रत्येकालाच कधी न कधी येतो, त्यामुळे इतरांची खिल्ली उडवणे हा प्रकार सहसा कधी करत नाही.

बाकी ते पलट्वार करणे इ.राजकारणाचा इथे अजून अनुभव नाही त्यामुळे पास.

" अशा फोरम्सवर ओपन अप होऊन काय मिळतं "
-मनातील काही लपवून ठेवलेल्या गोष्टी ज्या ओळखीच्या लोकांसमोर आपण बोलु शकत नाही त्या इथे शेअर करून मन मोकळे केल्याचे समाधान असू शकेल.

माझ्या कल्पना कदाचित फारच भोळसट,बाळबोध, निरागस वाटू शकतील पण 'आपण चांगले तर जग चांगले' असा मी कायम विचार करते.
असो तुमचेही मुद्दे योग्यच आहेत, प्रत्येकाचे मत आपल्याजागी बरोबर असते.

आणि हो हा धागा मिपावर एक वेगळा प्रयोग म्हणून लिहीलाय, एरवी त्याच त्या राजकारण,जात,समाज,धर्म इ. अनेक धाग्यांवर त्याच त्या रिकाम्या,निष्फळ चर्चा करण्यापेक्षा वेगळे काहीतरी म्हणून.

'आपण चांगले तर जग चांगले' असा मी कायम विचार करते.

काय सांगता? पेशवे पार्क राह्यलं नाही, नाहीतर तुम्हाला तिथल्या पांढर्‍या वाघासमोर उभं करावं म्हणत होतो. तुम्ही चांगल्या असल्याने अर्थातच तोही तुमच्याशी चांगलाच वागला असता.

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 9:07 pm | नीलमोहर

मिपावर लिहीणे आणि पांढर्‍या वाघासमोर उभे राहणे यात आता काही फरक राहीलाय का सांगा बरं ?

कुठे त्या वाघाला मध्ये आणता, आधीच त्यांची संख्या कमी झाली आहे, तोही तुमचे हे विधान मनावर घेऊन त्यासाठी आमरण उपोषणाला बसला तर पंचाईत व्हायची. :)
बादवे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात अजूनही पांढरे वाघ आहेत, आपण समक्ष जाऊन खात्री करून घेऊ शकता.

आणि माणसात आणि वाघात काहीच फरक नाही असे तुम्हास म्हणायचे आहे काय?
नाही हो, ते बिचारे उपाशी असतील तरच शिकार करतात, विनाकारण लोकांना चावत सुटत नाहीत.

नीलमोहर's picture

2 Sep 2015 - 9:15 pm | नीलमोहर

शेवटी आपण ज्या दृष्टीने पाहू तसं आपल्याला जग दिसतं, प्रत्येक गोष्टीकडे, माणसाकडे पाहतांना कुठलातरी चष्मा घालूनच पाहणे गरजेचे आहे का, आपण कोणाकडेही, कशाकडेही स्वच्छ मनाने पाहू शकतच नाही का हेही स्वतःला विचारावे.

लोकांना साध्या-सरळ गोष्टींतही काही आक्षेपार्ह का वाटते हे मला कधीच कळत नाही, म्हणजे फक्त इथेच नाही तर रोजच्या आयुष्यातही.
हे जग किंवा त्यातील लोक एवढेही वाईट नाहीत, फक्त आपण त्याकडे कुठल्या नजरेने पाहतो ते महत्वाचं.

हा धागा फक्त चर्चा करण्यासाठी काढला आहे, कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद करण्याचे इथे काहीच प्रयोजन नाही आणि इच्छा तर मुळीच नाही.
(मिसळ्पावच्या 'लिहीते व्हा' सूचनेला सर आँखोपे मानून आम्ही लिहीण्याचा प्रयत्न करत असतो, हा प्रयत्न आमची चूक ठरू नये एवढीच आशा..)

(मिसळ्पावच्या 'लिहीते व्हा' सूचनेला सर आँखोपे मानून आम्ही लिहीण्याचा प्रयत्न करत असतो, हा प्रयत्न आमची चूक ठरू नये एवढीच आशा..)

लिहीते व्हा सांगितलंय; लिहीते करा नाही. लिहा खुशाल. लोकांनी त्यांचे अनुभव शेअर करावेत हा आग्रह का? ज्यांना लिहायचं असेल ते लिहीतील.

लिहीते व्हा सांगितलंय; लिहीते करा नाही. लिहा खुशाल. लोकांनी त्यांचे अनुभव शेअर करावेत हा आग्रह का? ज्यांना लिहायचं असेल ते लिहीतील.

अगदी योग्यं !

आणि कोणी पुष्कळ आग्रह करेल शेवटी निर्णय ज्याचा-त्याचा आहे,
कोणाच्याही डोक्याला पिस्तूल वगैरे लावलेलं नाही,लिहाच म्हणून.

व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

आणि कोणी पुष्कळ आग्रह करेल शेवटी निर्णय ज्याचा-त्याचा आहे,
कोणाच्याही डोक्याला पिस्तूल वगैरे लावलेलं नाही,लिहाच म्हणून.

आग्रह नसता तर तिथे खरडफळ्यावर आंवतणाची अक्षत घेऊन नसता आलात. तुम्ही लोकांच्या काळोखलेल्या कोपर्‍यांचा अभ्यास करत बसा. आम्ही लख्ख उजेडात जे दिसतंय त्यावर आनंदी आणि समाधानी आहोत.

-इति लेखनसीमा

नीलमोहर's picture

4 Sep 2015 - 10:54 am | नीलमोहर

खफवरच्या सार्वजनिक विनंतीला मान देऊन आग्रहाने येणे केल्याबद्दल आणि आपल्यातील नकारात्मक बाजू सर्वांसमोर आणून धाग्याला हातभार लावल्याबद्दल मनापासून आभार.
.

खफवरच्या सार्वजनिक विनंतीला मान देऊन आग्रहाने येणे केल्याबद्दल आणि आपल्यातील नकारात्मक बाजू सर्वांसमोर आणून

आता बोललाच आहात म्हणून सांगतो. ही बाजू सगळ्यांना माहीत आहे, वेगळी सर्वांसमोर आणायची गरज नाही. पण आपण आपलं सोशल इंजिनीयरींग अगदी पर्फेक्ट करत आहात.

नीलमोहर's picture

5 Sep 2015 - 12:00 pm | नीलमोहर

धन्यवाद.

सस्नेह's picture

3 Sep 2015 - 3:16 pm | सस्नेह

प्रत्येक गोष्टीकडे, माणसाकडे पाहतांना कुठलातरी चष्मा घालूनच पाहणे गरजेचे आहे का, आपण कोणाकडेही, कशाकडेही स्वच्छ मनाने पाहू शकतच नाही का हेही स्वतःला विचारावे.

लोकांना साध्या-सरळ गोष्टींतही काही आक्षेपार्ह का वाटते हे मला कधीच कळत नाही, म्हणजे फक्त इथेच नाही तर रोजच्या आयुष्यातही.
हे जग किंवा त्यातील लोक एवढेही वाईट नाहीत, फक्त आपण त्याकडे कुठल्या नजरेने पाहतो ते महत्वाचं.

पर्फेक्ट पॉझिटिव्ह थिंकिंग !
अर्थात त्याचाही आग्रह नसावा....

मारवा's picture

29 Aug 2015 - 10:53 am | मारवा

सच का सामना टी.व्ही. सीरीयल सारखी संकल्पना आहे का ? ती कन्सेप्ट ग्रेट होती. पण ते सीरीयल केवळ खाजगी लैंगिक बाबी उघड करण्याचाच आग्रह बहुतांश वेळा धरत असल्याने व सेन्सेशनल करण्यावर अधिक भर असल्याने त्याचा फारसा इम्पॅक्ट जाणवत नसे.
काही क्लोज नीट ग्रुप्स मध्ये उदा. अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस मध्ये सॉर्ट ऑफ कन्फेशन करण्यास सदस्यांना प्रेरीत केले जाते. मात्र त्याचा परीणाम परत एकदा एक क्लोज नीट सीक्रसी निर्माण होउन ते ग्रुप्स एकमेकांशी घट्ट बांधले जाऊन समाजापासुन अधिकच विलग होतात. अनेक कल्ट मध्ये असे कन्फेशन फोर्स केले जाते व त्याचा वापर नंतर सभासदांची कल्ट शी निष्ठा वाढवण्यासाठी केला जातो. व पुढे गुपिते उघड होतील या भीतीने यामुळे कल्ट सोडण्याचा विचारही सभासद करु शकत नाही.
ख्रिश्चीअ‍ॅनीटीतील कन्फेशन असेच आहे.
कल्पना उत्तम आहे मात्र मोकळेपणाने व्यक्त झाल्यावर भावनांचा निचरा होण्यास नक्कीच मदत होते. मात्र त्यासाठी सर्वप्रथम ज्याच्यासमोर शेअर करत आहोत त्या व्यक्तींविषयी मनात एक मुलभुत विश्वास निर्माण होण फार आवश्यक आहे. माणुस असा पटकन ओपन अप अगदि निकटवर्तीयांकडे ही होत नाही.
तुमचा आय डी आवडला नीलकांत नीलमोहर हल्ली गुलमोहरा च्या झाडासारखे दुर्मिळ झालेत.

नीलमोहर's picture

29 Aug 2015 - 12:33 pm | नीलमोहर

@ मारवा,
गुलमोहर विशेष आवडत असल्याने तो आयडी हवा होता,ते उपलब्ध नसल्यामुळे नीलमोहर घेतले.
आमच्या सारखी लोकंच दुर्मिळ झालीत तिथे झाडांचे काय.. (हे असंच आपलं गंमतीत..)
तुमचाही आयडी सुंदरच आहे, संगीतातील राग वगैरे समजत नसले तरी विविध रागांची नावे खूप आवडतात,
उदा. राग गंधार, मेघ-मल्हार, बागेश्री, भैरवी, देस, मारवा, पूरिया धनाश्री, मालकंस इ.

बाकी लेखाबद्दल,
तुम्ही सांगितलेले कल्ट, तिथे चालणारे प्रकार इ.फारच एक्सट्रीम आहेत. इथे तसे काहीही सेनसेशनल वा वाद्ग्रस्त अपेक्षित नाही, साधे सरळ डिस्कशन वा डिसक्लोजर असावे. ख्रिश्चीअ‍ॅनीटीतील कन्फेशनच्या जवळपास जाईल पण ते लोकांकडून खूप जास्त अपेक्षा करणे होईल.
तुम्ही म्हणताय ते खरे आहे की माणूस ओपन अप अगदी निकटवर्तीयांकडेही होत नाही, मग इथे तोच प्लस पॉईंट बनतो की कोणी कोणास विशेष ओळखत नाही त्यामुळे आपण इथे बर्‍यापैकी विनाधास्ती व्यक्त होऊ शकतो.
विश्वासाचे म्हणाल तर तसेही हल्लीच्या जगात आपण कोणावर मनापासून विश्वास ठेऊ शकतो ?
अगदी नवरा-बायकोच्या नात्यातही कितपत विश्वासार्हता असते ?(उदा. सध्या गाजणारे इंद्राणी मुखर्जी-शीना प्रकरण)
तरीही याच परिघात राहून आपण बरेच काही शेअर करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे.. येऊ द्या काही बिनधास्त

नीलमोहर जी
सर्वप्रथम तुमची एकुण सौम्य शैली ( पॉझीटीव्ह अर्थाने म्हणतोय ) सहजता खुप भावली. हि मराठी आंतरजालावर तरी दुर्मिळ आहे. फारच कमी असे आयडी आहेत एक धनंजय अतिवास इन्द्राज पवार, गवि असे काही मोजकेच आय डि आहेत अजुनही असतील पण एकंदरीत तुम्ही मायनॉरीटीत आहात हे नक्की.
तुमच्याशी खरच मो़कळ बोलावस वाटतय. मी माझ्या आयुष्यातील एक चुक ( पुर्ण चुक होती असेही म्हणवत नाही अवघडच आहे) तरी सर्वसाधारणपणे चुक मानल जाईल असा प्रकार केला.
मी माझ्या आयुष्याचा एक छोटा काळ हिप्पी समुदायामध्ये घालवलाय. मी तेव्हा ड्र्ग्ज घेत असे. त्या काळात मला काही एक्सट्रीम नीच व काही एक्सट्रीम उच्च अशा दोन्ही टाइपच्या लोकांचा फार तीव्रतम अनुभव आला. पोलिसांच्या क्रुरतेचा अनुभव ही मी घेतला. तो फारच भयंकर असा होता. अनेक दिवस मी उपासमारीत काढले. सुदैवाने ड्रग्जचा शरीरावर फार परीणाम झाला नाही कारण मुळात व्यायामाच व रनिंग च व्यसन असल्याने व मुळ शरीर जेनेटीकली म्हणा का काय टफ असल्याने तस झाल नसाव. थोड्याच कालावधीत मी त्या व्यसानाच्या विळख्यातुन स्वतःला अत्यंत कठोरतेने बाहेर काढण्यात यश मिळवल. तरीही शरीरावर परीणाम झालाच होता. त्यानंतर व्यायाम रनींग विलपॉवर ने परत एकदा अगोदरच्या पेक्षाही अधिक स्ट्रेंथ मिळवली.
आता अनेक वर्ष मी त्या गोष्टी पासुन दुर आहे.
अजुनही हिप्पींची थॉट प्रोसेस मला अर्थातच काही तीव्र मतभेदां व्यतिरीक्त आवडते. त्या विचारसरणीतला काहि भाग अत्यंत सुंदर आहे व काहि अत्यंत भयंकर वाइट. त्यातला फोलपणा अपुरेपणाही आता प्रकर्षाने जाणवतो. आता नेमक काय घ्यायच व काय सोडायच ते लक्षात आलय अस वाटत. माझा अत्यंत जवळचा मित्र मात्र ड्र्ग्जच्या विळख्यातुन बाहेर येउ शकला नाही त्याच्या शेवटच्या काळात मी त्याच्याबरोबर होतो अनेक दिवस मी हॉस्पीटल मध्ये घालवले. तो अनुभव तर फारच भयंकर होता. शेवटी तो गेला. त्या घटनेनंतर मी जवळ जवळ तीन दिवस तीन रात्र जागाच होतो.
मला झोपच येत नव्हती आय वॉज शेल शॉक्ड. मग एका नातेवाइकाला कळल्यावर त्याने डॉक्टरांकडे नेउन कुठलस इंजक्शन दिल मग नुसताच गुंगीत पडुन होतो दोन दिवस का तीन आठवत नाही त्या इंजेक्शन ने झोप तर आली पण आतुन जागाच होतो. एक अत्यंत विचीत्र अवस्था झाली, झोपे च्या व जागेपणाच्या मध्ये एक विचीत्र अवस्था येते तशी. त्यात तुम्हाला फारच कमाल अनुभव येतो. तुम्ही एखाद चित्रपट पाहत आहात व मी द वॉचर पण जागा आहे असा. त्या काहि तासांत मग पुर्ण फिल्म वेगाने मागे सरकली मला अगदि बालपणापासुन ते तेव्हापर्यंत चे सर्व प्रसंग एकामागोमाग अनकंट्रोलेबली नजरेसमोर रीक्रीएट होत येत होते. मग नेमक किती काळाने माहित नाही जाग आली.
मग एकदम हलक वाटल जोरात भुक लागली होती एक कॅथार्सिस सारख काही तरी झाल असाव मग हलका होउन गेलो. अगेन आय स्टार्टेड फायटींग वुइथ लाइफ वुइथ रीन्युड स्ट्रेंथ. मुळात अ‍ॅडिक्टीव्ह पर्सनॅलीटी आहे ती कधीच बदलत नसते फक्त काय की ऑब्जेक्ट ऑफ अ‍ॅडिक्शन चेंज करायच तसे मग खुप खेळणे होतेच आयुष्यात त्यामुळे अ‍ॅडिक्शन चा फोकस फक्त बदलला कोअर सेमच आहे. मजा वाटते खरच एकेका गोष्टीची आय टेक इट लाइटली.
मला मी जे काय केल त्याचा गिल्ट मात्र कधीच वाटला नाही. ती एक वेव्ह होती आली निघुन गेली. आत्ता फार पुढे निघुन आलेलो आहे. फार कमी जवळच्यांना हि माझ्या या एपिसोड विषयी माहीत नाही. लपवण्यात लाज नाही पण सांगण्यासारख ही फार काय आहे अस वाटत म्हणुन त्यांना कशाला इमोशनली डिस्टर्ब कराव म्हणुन कधी सांगितल नाही.
असो आज अचानक फुटुन बाहेर आल

मनापासून केलेल्या आवाहनाला कोणीही प्रतिसाद दिल्यावर जो अवर्णनीय आनंद होतो तो आता अनुभवत आहे !!
आपण या वेगळया उपक्रमात सह्भागी झालात, अगदी विश्वासाने मन मोकळे केलेत त्यासाठी मनापासून आभारी आहे.
शिवाय असं सर्वांसमक्ष ओपन अप होण्यासाठी फार मोठी हिंमत लागते, ती जिगर दाखवल्याबद्दल हॅट्स ऑफ !!

" हिप्पींची थॉट प्रोसेस मला अर्थातच काही तीव्र मतभेदां व्यतिरिक्त आवडते "
या वाक्याशी १००% सहमत. त्या जीवनशैलीचे कायमच खूप आकर्षण वाटत आले आहे, अर्थात त्यातील ड्रग्ज वगैरे गोष्टी वगळून. तेही करायची सुप्त इच्छा आत कुठेतरी लपलेली आहे :) पण ज्या गोष्टींचा शरीरावर नकारात्मक परिणाम होत असेल त्यापासून लांब राहिलेलेच बरे. ड्रग्जच्या व्यसनातून आपण सुखरूप लौकर बाहेर पडलात ही खूपच चांगली गोष्ट.

तुमच्या मित्राबद्दल वाचून फार वाईट वाटले, लोक व्यसनांच्या आहारी जाऊन आपला नाश आपणच ओढवून घेतात, कित्येकदा आपल्या डोळ्यांसमोर हे घडते पण आपण प्रयत्न करूनही काही उपयोग होत नाही किंवा ती व्यक्ति आपली मदत स्वीकारण्यापलीकडे पोहोचलेली असते हे सर्वात वाईट.

आपण जे केलंत ती काही चूक नव्हती, तो घेतलेला एक अनुभव होता जो काही शिकवण्यासाठीच तुमच्या आयुष्यात आला होता. त्यानंतरच्या कॅथार्सिस (शुध्दिकरण,ज्ञान प्राप्ती?) प्रोसेस मधून आपण गेलात, ज्याला 'युरेका' क्षणही म्हणता येईल, तो आयुष्यातील एक महत्वपूर्ण टप्पा असतो, ज्यातून तावून, सुलाखून बाहेर पडल्यावर माणसाचं खर्‍या अर्थाने सोनं होतं.
यानंतरच आपल्याला जीवनाचा अर्थ, जगणे म्हणजे काय हे नेमके कळाले असेल ही १००% खात्री आहे.
'आय स्टार्टेड फायटींग वुइथ लाइफ वुइथ रीन्युड स्ट्रेंथ' - हे तर सगळ्यात बेस्ट !!

" झोपेच्या व जागेपणाच्या मध्ये एक विचीत्र अवस्था येते तशी. त्यात तुम्हाला फारच कमाल अनुभव येतो. तुम्ही एखादा चित्रपट पाहत आहात व मी द वॉचर पण जागा आहे असा "
- या अवस्थेतून बर्‍याचवेळा (अजूनही) जात असते. शुध्दीवर-बेशुध्द असण्याच्या सीमारेषेवर,अध्ये-मध्ये कुठेतरी तरंगत असल्याचं हे खूप वेगळं फिलींग असतं, शब्दांत मांडण्यापलीकडील :)

माझाही कॅथार्सिसचा अनुभव:
काही वर्षांपूर्वी एका आजारामुळे मीही काही दिवस इस्पितळात राहून आले, त्या ४-५ दिवसांनी, तिथल्या अनुभवांनी मला जगण्याचे महत्व शिकवले.तुम्ही सांगितले तसे आयुष्यातील सर्व प्रसंग तेव्हा नजरेसमोर तरळून जायचे.
अर्थात नंतर व्यवस्थित औषधोपचार घेऊन त्यातून लौकरच बाहेरही पडले.

श्वास घेणे ही साधी क्रियाही आपण गृहित धरतो पण जेव्हा एक एक श्वास घेणेही दुर्लभ होते तेव्हा त्या एका श्वासाचे महत्व कळते. एक दीर्घ श्वास घेण्यासाठीही जीवाचा आटापिटा करावा लागायचा, पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाची जशी तडफड होते ती अवस्था प्रत्यक्ष अनुभवली आहे.
पलीकडील वॉर्डमधील एका बाईचा श्वास अचानक बंद पडला(कायमचा), तेव्हाचा तिथला गोंधळ, आक्रोश बेड वर पडल्या पडल्या फक्त कानांनी ऐकला तेव्हा जे मनात चाललं होतं ते सांगणं केवळ अशक्य..

आजही जेव्हा काही नकारात्मक विचार मनात येतात किंवा वाईट,नकोशा गोष्टी आयुष्यात घडतात तेव्हा मी ते दिवस आठवते आणि आपण त्यातून बाहेर पडलो ते काही यासाठी नाही असा विचार करून पुढे जायचं बघते.

तेव्हापासून कुठलीच गोष्ट फार सिरीयसली मनावर घ्यायची नाही (अगदी स्वतःलाही), हा नियम घालून घेतलेला आहे. जेवढे होईल तेवढे इतरांनाही हे समजवण्याचा प्रयत्न सुरू असतो.

नीलमोहर's picture

1 Sep 2015 - 3:58 pm | नीलमोहर

या धाग्यासंदर्भात थोडी निराशा वाटत होती कारण वाचकांचा अल्प प्रतिसाद. लेखाची हजारोंनी वाचने होऊनही ते प्रतिसादांत रूपांतरित होत नाही याचे थोडे शल्य वाटत होतेच.

कुठेतरी वाटत होते की आपण लिहीलेले समोरच्यापर्यंत पोहोचत नाहीये किंवा ते एवढे प्रभावी आणि परिणामकारक नाही की लोकांना प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करू शकेल. अर्थात ही कल्पना आहे की लेखाचा विषय क्लिष्ट आणि अवघड आहे त्यावर सहजासहजी प्रतिसाद देणे सोपे नाही पण प्रयत्न करायला काही हरकत नसावी.
आपण लिहीण्यात किंवा आपल्या भावना मांडण्यात कमी पडतोय ही फिलींग नव्यानेच लिहीण्याचा प्रयत्न करणार्‍यासाठी फार वाईट असते.

आपण आपले मनोगत इथे फारच सुंदररीत्या मांडलेत, छान वाटलं.
आपल्या प्रतिसादामुळे आणि कौतुकामुळे मनोधैर्य बरेच वाढले आहे त्यासाठी धन्यवाद..

संजय पाटिल's picture

2 Sep 2015 - 4:48 pm | संजय पाटिल

आपले लेखण वाचुन एका ब्लॉग ची आठवण आली.

पद्मावति's picture

27 Aug 2015 - 6:42 pm | पद्मावति

खूप सुरेख लेख/ विचार. मनाच्या आरशात आपले खरे रूप पाहायला खूप हिंमत लागते.

मनीषा's picture

27 Aug 2015 - 7:08 pm | मनीषा

" मिरर मिरर ऑन द वॉल, हूज द फेअरेस्ट ऑफ देम ऑल !!"
कुठल्याशा कथेतील हे वाक्य आपल्याला आठवत असेल,

मला वाटतं हे हिमगौरी आणि सात बुटके या कथेतील वाक्यं आहे. हिमगौरीची सावत्रं आई (जी चेटकी असते) जादुच्या आरशात बघुन हे बोलत असते.

खरय तुमचं, काही लोकांचे मुखवटे इतके सतत बदलत असतात की तिडीकच बसते.

अधुन मधुन आरशात डोकावणे कधीहि चांगलेच.

नीलमोहर's picture

28 Aug 2015 - 10:50 am | नीलमोहर

हो बरोबर आहे ते, कथेचे नाव सांगितल्याबद्दल आभारी आहे, लेखातही तसे बदल केले आहेत.
ती 'मिरर' वाली ओळ अगदी शेवट्च्या क्षणी अ‍ॅड केली, मोबाईल वरून टंकत असतांना बरयाच अड्चणी येतात त्यामुळे गुगल सर्च करणेही अवघड होते म्हणून तसेच प्रकाशित केले.

ही कथा जरी बालकथा असली तरी मला रोचक वाटते.
स्वतःला सर्वश्रेष्ठं म्हणवून घेण्याची या महिलेची अभिलाषा इतकी... की त्या साठी तिच्याच घरात रहाणारी पण तरीही अनाथ असणारी मुलगी तिला अडाचणीची वाटते, आणि तिचा काटा काढण्यासाठी ती हरतर्‍हेचे उपाय करते.
ही कथा असल्याने तिचा सुखान्त होतो. पण वास्तविक जीवनात अशा हिमगौरीं च्या नशीबी विजनवासच असतो.

त्यामुळे नुसता आरसा असणे/बघणे पुरेसे नाही, तर त्याचा उपयोग कोण आणि कसा करतो यावरही खूप काही अवलंबून असते.

एस's picture

27 Aug 2015 - 7:27 pm | एस

साधेसोपे जगता येणे हे सर्वात अवघड व गुंतागुंतीचे काम आहे. (Simplicity is the most difficult thing to achieve!)

नीलमोहर's picture

28 Aug 2015 - 11:06 am | नीलमोहर

कुठलातरी विनोद किंवा कविताही आहे यावर बहुतेक, 'मोठ्या मोठ्या गोष्टींचे काही वाटत नाही पण रोजचे जगणे अंगावर येते' की असेच काहीसे.(नाही तेव्हा स्मरणशक्ती स्पर्धेमध्ये बक्षिस मिळतं पण वेळेला जे हवे ते नेमके आठवत नाही.)

पैसा's picture

27 Aug 2015 - 10:38 pm | पैसा

छान लेख. स्वतःच्या चुका माहीत झाल्या तर सुधारायला वाव असतो.

वरती स्वॅप्स यांनी म्हंटलेलं "Simplicity is the most difficult thing to achieve!" हे, आणि पैसाताईंनी लिहिलेलं "स्वतःच्या चुका माहीत झाल्या तर सुधारायला वाव असतो" वाचलं, आणि खरं-खोटं बोलण्याविषयी कधीतरी वाचलेलं काहीसं अशा अर्थाचं खालील वाक्य आठवलं: Speaking truth is the shortest route to achieving success, one lie leads to another, and defending multiple lies takes a lot of energy and time.

याच कल्पनेचा थोडासा विस्तार करावासा वाटला:

एका थापेतून सहजच
दुसरी जन्माला येते
अन् साध्या सरळ वाटेपेक्षा
पायी मोडती काटे

पहिली थाप फसवणूक,
बचावासाठी दुसरी
सत्य सामोरं आलं की
मग आठवते तिसरी

दोन-तीनात थांबत नाही
चक्र राहतं चालू
दुबळं मन, थाप सोपी
खरं कशाला बोलू?

थापेमागे थापांची
मोठी रांग लागते
आठवून मग आधीची
पुढची सांगावी लागते

अवघड वाटलं जरी
असलं थोडं दुखरं
किंचित न्यून येईल तरी
खरं बोलणंच बरं

पैसा's picture

28 Aug 2015 - 10:50 am | पैसा

छान आहे! साधं सोपं ज्ञान म्हणजे नेहमी खरं बोललं की कधी कुठे कोणाला काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवावं लागत नाही! =))

सुबोध खरे's picture

28 Aug 2015 - 11:19 am | सुबोध खरे

नेहमी खरं बोललं की कधी कुठे कोणाला काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवावं लागत नाही
पण खरं बोललं तर माणसं दुखावतात हेही तितकंच सत्य आहे. बहुसंख्य लोक, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आटापिटा करणारे असतात. समाज्सेवेबद्दल बोलताना आमचे वडील म्हणाले होते कि लोकांनी चांगले म्हणावे म्हणून आपल्याला मानसिक आर्थिक आणी शारीरिक झीज सोसावी लागते. मी त्यावेळेस शांतपणे त्यांना म्हणालो कि लोकांनी चांगले म्हणावे म्हणून कोणतीही मानसिक आर्थिक आणी शारीरिक झीज सोसण्याची माझी तयारी नाही.एकदा आपण आपली मनोवृत्ती अशी बनविली कि पुढचा मार्ग अतिशय सुकर होतो.
सदा सर्वदा सत्य बोलण्यासाठी आपली मनोवृत्ती अशी असावी लागते कि लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. तशी मनोवृत्ती बहुसंख्य माणसांची नसते म्हणून लोक नेहमी छान छान बोलत असतात आणी यातच ते फसतात.
माझ्यकडे येणाऱ्या लठ्ठ रुग्णांना तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त खाता हे स्पष्ट सांगतो. ते रुग्णांना आवडत नाही हे लगेच चेहऱ्यावर दिसते.पण येथे ते माझ्याकडे सल्ल्यासाठी आलेले असतात.पण ६०% वजन जास्त असलेल्या माणसाला मी वजन "थोडे~ से" जास्त आहे अशा तर्हेचे साखरेत घोळलेले सांगत नाही. (अशाच एका प्रतिसादावर मी असंवेदनशील असल्याचा मिपावर आरोपही झाला आणी गदारोळही झाला).
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात
सत्यं अपि अप्रियम न ब्रूयात
मी जसा आहे तसा आनंदात आहे. कुणी माझ्या वर टीका केली तर मलाही ती आवडत नाही परंतु एकतर मी ती मनाला लावून घेत नाही आणी दुसरे म्हणजे मी त्याच्यावर नक्की विचार करतो. जर हि टीका मत्सरापायी असेल तर मी ती सोडून देतो पण खरोखर काळजीपोटी असेल तर त्याचा सुधारणेसाठी कसा वापर करता येईल याचा विचार करतो.
मी जसा आहे तसा आनंदात आहे.

नीलमोहर's picture

1 Sep 2015 - 4:54 pm | नीलमोहर

@ बहुगुणी,
शीघ्रकाव्य छान जमले आहे, धाग्याची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद..
लोकांनी सत्याची साथ कधीच न सोडायचे ठरवले तर बरेचसे प्रश्न सुटतील अथवा मुळात प्रश्नच उदभवणार नाहीत.

@ पैसाताई,
'नेहमी खरं बोललं की कधी कुठे कोणाला काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवावं लागत नाही'
हा तर आपला आवडता फंडा आहे :)

@ सुबोध खरे,
मनोगत आवडले. आपल्या मुद्देसूद आणि धाग्याला अभिप्रेत अशा प्रतिसादासाठी आभारी आहे.
सत्य हे बर्‍याच वेळा कटू असते त्यामुळे खरे बोललेले अनेकदा लोकांना आवडत नाही हा सर्वसाधारण अनुभव आहे.

श्रीरंग_जोशी's picture

28 Aug 2015 - 2:59 am | श्रीरंग_जोशी

मुक्तक आवडले. अगदी थोडक्यात पण नेमकेपणाने लिहिलं आहे.

बहुगुणी यांचं काव्य पण आवडलं.

स्तुत्य प्रयत्न.(एक पौराणिक उदा-इंद्राला आपले स्थान डळमळीत होण्याची भीती असते)सामान्य माणसालाही आपले समाजातले//कुटुंबातले स्थान डळमळीत होईल की काय याची भीती वाटते तेच या वाक्यातून सूचीत केलंय.
बहुगुणींचे काव्य वावा.

श्रीरंग_जोशी's picture

28 Aug 2015 - 4:57 am | श्रीरंग_जोशी

कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्या नव्याने सुरू झालेल्या संगणकशास्र विभागाला मिळणारी सावत्रपणाची वागणूक सहन होत नसल्याने त्यावर लढा देत असताना मी प्राचार्यांविरुद्ध बराच आक्रमकपणा दाखवला. आक्रमणामागचा उद्देश अजिबात गैर नसला तरी तो टाळता आला असता तर बरे झाले असते असे वाटते.

असो तो अठरा-एकोणीस या वयातला युवा जोश होता. त्या अनुभवातून बरंच काही शिकू शकलो हेही नसे थोडकं.

आपण कुणाला मारलं वगैरे असणं तर शक्यच नाही! शाब्दीक वाद झाले असतील.

संघर्ष इतका कमी दिसतो आपल्या आजुबाजूला, की कदाचित त्या तेव्ढ्या वादाचंही ओझं झालं असेल तुम्हाला. सगळेच प्रवाहाबरोबर जातात. सत्तेशी संघर्ष केलात त्याबद्दल अभिनंदन...

श्रीरंग_जोशी's picture

28 Aug 2015 - 5:52 pm | श्रीरंग_जोशी

मारणं वगैरे खूपच दूरची गोष्ट झाली अपशब्दही कधी वापरले नाही.

फक्त मागण्या फारच लावून धरल्या जे बहुधा त्या पूर्वी फारसे कॉलेजमध्ये झाले नसावे. इतर विद्यार्थ्यांचे असे होते की कॉलेजच्या लॅबमध्ये ४च डब्बा संगणक आहेत तर असुदेत बाहेर क्लास लावता येईल किंवा जमलंच तर घरी संगणक घेता येईल. शेवटी सायन्स कॉलेज असलं की प्रक्टिकलच्या मार्क्ससाठी एका अदृश्य सीमेच्या आत राहिले जाते जी मी कधीच पाळली नाही.

वरच्या माझ्या प्रतिसादात एक टंकनचूक झाली होती ती पण अशी झाली की...
आक्रमणामागचा उद्देश हे आक्रमकपणामागचा उद्देश असे टंकायचे होते.

नीलमोहर's picture

29 Aug 2015 - 10:22 am | नीलमोहर

@ श्रीरंगजी,

आपण कधी चुकूनही आक्रमक वगैरे होत असाल असे वाटत नाही, कारण मिपावरील आपले प्रतिसाद, विचार इ.पाहून आपण एक साधी-सरळ सज्जन व्यक्ति असाल हा अंदाज येतो.
शिवाय तुमचे कट्ट्याचे फोटोही पाहिलेले आहेत :)
म्हणूनच हे जाणून घ्यायची उत्सुकता असते की अशा व्यक्तित काही नकारात्मक गुण असतात का आणि असतील तर ते का अन कसे बाहेर येतात. तुम्ही वर एक उदाहरण दिलंय पण त्यापेक्षाही अजून डीप लेव्हलवर एखादी नकारात्मक कृति वा विचार काही असेल तर ते इच्छा असल्यास सांगू शकता.

श्रीरंग_जोशी's picture

29 Aug 2015 - 10:32 am | श्रीरंग_जोशी

काही (थोडे या अर्थाने) नाही बरेच नकारात्मक गुण आहेत माझ्यात. त्यावर उद्या लिहीन.

सस्नेह's picture

1 Sep 2015 - 3:19 pm | सस्नेह

मुक्त आणि स्वच्छ चिंतन + स्वदर्शन भावले.
स्वत:ला आहोत तसे स्वीकारणे फार कठीण असते. सदगुण आपली प्रतिमा स्वत:च्याच नजरेत उंचावतात आणि दोष, त्रुटी मात्र नाकारले जातात.
सर्वगुणसंपन्न कुणीच नसते. सर्वांचेच पाय मातीचे असतात. म्हणून दोषांना सहजपणे स्वीकारून जमले तर सुधारणे आणि नच जमले तर दुर्लक्ष करणे हे सयुक्तिक. त्यासाठी हिंपुटी होणे किंवा अट्टाहास करणे हे व्यक्तिमत्वाला मारक ठरू शकते.
...अंतर्मुख स्वभाव, एकांतप्रियता, अलिप्तता हे माझ्या स्वभावातले दोष मी स्वीकारले, त्यांच्याशी जुळवून घेतले आणि इतरांना ते त्रासदायक होणार नाहीत हे नेहमी पाहिले आहे.

नीलमोहर's picture

1 Sep 2015 - 5:21 pm | नीलमोहर

वरील सर्वच विचारांशी सहमत,

" अंतर्मुख स्वभाव, एकांतप्रियता, अलिप्तता हे माझ्या स्वभावातले दोष मी स्वीकारले, त्यांच्याशी जुळवून घेतले आणि इतरांना ते त्रासदायक होणार नाहीत हे नेहमी पाहिले आहे."
- मुळात हे स्वभावातील दोष आहेत असं लोक समजतात हेच चूक आहे, हा आपल्या स्वभावाचा,व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. समाजात बहिर्मुख लोकांची संख्या जास्त असल्याने अंतर्मुख लोक कायम स्वतःला मायनॉरिटी मधील समजून तो न्यूनगंड मनात ठेऊन वावरतात.

आपण मायनॉरिटी मध्ये आहोत हे खूप पूर्वीपासून समजत गेले होते आणि त्यावरून स्वतःला त्रास करून घ्यायची सवयही लागली होती, पण नंतर चूक लक्षात आली आणि याच गोष्टी सकारात्मकरीत्या घेण्यास सुरूवात केली.
आता चारचौघांपेक्षा वेगळे असण्याचा आनंद जास्त आहे.

pradnya deshpande's picture

1 Sep 2015 - 6:19 pm | pradnya deshpande

आरसा भावला. आज घरी गेल्यावर या आरस्यात नक्की पाहणार

नाखु's picture

2 Sep 2015 - 4:59 pm | नाखु

काही प्रसंगपरत्वे/तात्कालीक वागलो ते रास्त की गैर (मुद्दाम चूक की बरोबर असे लिहिले नाही कारण अगदी चूक्/बरोबर असे नसतेच. काळा पांढरा याच्या मध्ये करड्याच्या खूप रंगछटा आहेतच आणि त्या स्वीकाराव्या लागतातच)

हे समजण्यास जरा वेळ लागतो कधी दिवस तर कधी महीने /वर्षे सुद्धा.ती बोच्/जाणीव पुढील वर्तणूक्/प्रतीवाद यांच्यावर अंकुश ठेवत असतील तर काही शिकलो आहोत हे फलित. नुसती बोच उपयोगाची नाही.

मारवा यांचा प्रतीसाद सकारात्मक मुक्ताचिंतन आहेच शिवाय प्रांजळ्पणा आहे जो आजकाल दुर्मीळ आहे.

जगरहाटी टक्केटोणपे खाऊनच शहाणपण (२ पैशाचेच पण जगायला उपयुक्त)आले आहे असे वाटत असलेला जीवन्विद्यार्थी नाखुस

लेख स्तुत्य आहे पण...

मोकळे होणे हे सर्वांनाच सूट करेल असे नसते. काही कोश बरे असतात बाहेर मुक्त वावरण्यापेक्षा.

लेख वाचला.आरसा हातात घेऊन आत्मपरिक्षण करणे जास्त भावते.सार्वजनिकपणे आपले दिसणारे दोष उघड करणे हे पटणारे नाही.प्रांजळपणे सांगणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं.पण सार्वजनिक संस्थळ अशा प्रकटीकरणासाठी चुकीची जागा असू शकते.

सुबोध खरे's picture

2 Sep 2015 - 7:16 pm | सुबोध खरे

सार्वजनिक संस्थळ अशा प्रकटीकरणासाठी चुकीची जागा असू शकते.
+१
पण अजया ताई
डू आयडीला काहीच घेणं देणं नाही. आपल्या मनातील मळमळ ओकून टाकायची आणि निर्मळ व्हायचं
जर अंगाशी आलं तर दुसरा डू आय डी घ्यायचा. हा प्रश्न तुमच्या आमच्या सारख्या स्वतःच्या नावाने वावरणाऱ्या व्यक्तींचा आहे. आता मी जर रावबहाद्दूर झाडबुके नावाने माझी जुनी लफडी लिहिली आणि त्याचा गवगवा झाला तर
आय डी बदलून घारू अण्णा घोड्नदिकर नाव घ्यायचे नाहीतर एखादा स्त्री आयडी घ्यायचा आणि वर अनाहीतात काड्या सारायच्या.
हा का ना का

बोका-ए-आझम's picture

11 Sep 2015 - 10:07 am | बोका-ए-आझम

सहमत. आता जी कादंबरी अनुवादित करतो आहे, तिची मूळ संकल्पनाच ही आहे. कुणासमोर किती व्यक्त व्हावं याला मर्यादा असतात, कारण इंटरनेटवर तुमच्या व्यक्त होण्यातून तुमच्याविषयी जी माहिती लोकांना कळत असते तिचा गैरवापर केला जाऊ शकतो.

नीलमोहर's picture

11 Sep 2015 - 11:05 am | नीलमोहर

आपण जी कादंबरी अनुवादित करत आहात त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास आवडेल.

मांत्रिक's picture

2 Sep 2015 - 9:32 pm | मांत्रिक

नमस्कार ताई! तुम्ही सूड आणि पैसा यांचेविषयी गैरसमज का करत आहात ते कळत नाही. जरा डोके शांत ठेवून त्यांचे प्रतिसाद नीट वाचा. तुम्हाला कळेल की तुम्ही टार्गेट नाहिये. तर इंटरनेटवर ज्या दुष्ट, नीच प्रवृत्ती कार्यरत आहेत, त्या आहेत. भिकारपांड लोकांनी भरलेल्या जगात स्वतःच्या अवगुणांना असे उघड करणे म्हणजे स्वतःहून वाघाच्या तोंडात मान देणे होय. सूडच्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे. तो तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय. पैसाताई पण तेच म्हणताहेत. आतातरी समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

नीलमोहर's picture

3 Sep 2015 - 12:40 pm | नीलमोहर

समजून घेण्यातच आयुष्य जात असतं, त्याला पर्याय नसतोच.

मला माहीत आहे त्यांचा विरोध मला नाही इतर काही लोकांना, प्रवृत्तींना आहे,
पण ते या धाग्यावर गरजेचे नाही एवढेच माझे म्हणणे होते.
त्यांनी जे शब्द वापरले त्यामुळे वाईट वाटले.
धोक्याची सूचना आणि वाघाच्या पिंर्‍यासमोर उभे करणे याची काहीच गरज नव्हती.

त्यांच्या वाक्यातील उपहास तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही खूप भोळे आहात असं म्हणावं लागेल.

डोकं शांतच असतं, कारण नसतांना, गरज नसतांना गोष्टी वादग्रस्त होत असतील तर कोणालाही वाईट वाटेल, मनुष्य स्वभाव आहे तो.
असो. धन्यवाद.

पैसा's picture

3 Sep 2015 - 1:19 pm | पैसा

मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!

खरे तर नीलमोहर यांचा हा लेखही त्यांच्या इतर लिखाणाप्रमाणे चांगलाच होता, त्यांनी शेवट आपापले अनुभव शेअर करा म्हटले तिथे मतभेदाचा मुद्दा आला.

सस्नेह's picture

3 Sep 2015 - 3:20 pm | सस्नेह

फोरमवर व्यक्त होताना इतरही त्याच पद्धतीने व्यक्त होतील अशी अपेक्षा करणे चूक आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्तीही !

अर्थहीन's picture

3 Sep 2015 - 4:02 pm | अर्थहीन

मस्त आहे कल्पना...

द-बाहुबली's picture

4 Sep 2015 - 2:08 pm | द-बाहुबली

हा धागा मुक्तपिठीय वळन घेइल असा सपशेल अंदाज जाणकारांनी चुकवला...

नीलमोहर's picture

5 Sep 2015 - 11:58 am | नीलमोहर

मिपा आणि मुक्तपीठ मध्ये हाच तर फरक आहे,
हा अंदाज ज्यांनी लावला त्यांनी मिपाकरांना ओळखलेच नाही मग..

म्हन्जे बाकी काहीच फरक नाही?

आनन्दा's picture

10 Sep 2015 - 5:48 pm | आनन्दा

अवांतर - या नितांतसुंदर गाण्याबद्दल लेख असेल म्हणून लेख उघडला होता. पण काहीतरी वेगळे दिसले.
असो - आता याचे पण रसग्रहण येऊ द्या.

बाकी आता माझे मत -
मला व्यक्तिशः स्वतःशी प्रामाणिक राहायला आवडते. त्यामुळे मी कोणाशी कन्फेशन देत पण नाही, आणि इतरांच्या भानगडीत डोकावण्याची विशेष इच्छा नसल्यामुळे कोणी कन्फेशन देत असेल तर ते ऐकून फक्त सोडून देतो. कारण बर्‍याच वेळेस लोकांना डोके टेकायला एक निरुपद्रवी खांदा हवा असतो. तो मात्र मी नेहमी देऊ करतो.
अर्थात त्याचा वाईट परिणाम पण होतो, कारण मग लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात, आणि तोपर्यंत खांद्यावरच्या डोक्यांची पण सवय झालेली असते, तो मोडणे कठीण जाते.
असो इत्यलम.

नीलमोहर's picture

11 Sep 2015 - 11:00 am | नीलमोहर

लेख तुम्हाला अपेक्षित विषयाबद्दल नसतांनाही वाचून आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

" कोणी कन्फेशन देत असेल तर ते ऐकून फक्त सोडून देतो. कारण बर्‍याच वेळेस लोकांना डोके टेकायला एक निरुपद्रवी खांदा हवा असतो. तो मात्र मी नेहमी देऊ करतो."
- सहमत, अशावेळेस तेवढेच अपेक्षित असते.

तुम्ही सांगितलेले गाणे आधी ऐकले नव्हते, ऐकून जेवढे कळले त्याप्रमाणे गाणे एका मुलीने प्रेमात, प्रिय व्यक्तीशी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल तिला वाटत असलेला पश्चात्ताप यावर आहे.

ती आरशाला म्हणते की तिच्या लक्षात आले आहे जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती कोण आहे, त्याने तिला दाखवून देण्याची गरज उरली नाही, मात्र त्याचवेळी तिची इच्छा आहे की आरशाने तिला खोटेच सांगावे (की ती मूर्ख नाही) आणि त्यायोगे तिच्या प्रियाची परत भेट घडवून द्यावी .
पूर्ण गाण्याचे रसग्रहण करण्यास थोडा वेळ लागेल, मात्र तुमची इच्छा असल्यास नक्की प्रयत्न करेन.

मुक्त विहारि's picture

11 Sep 2015 - 11:20 am | मुक्त विहारि

तूर्त इतकेच.