[शतशब्दकथा] शिवी- भाग २

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 11:44 pm

भाग १

आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते.
"मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला.
मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली!

गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले. उगीचच त्याने डोळ्यांवरचा चष्मा जागीच असल्याची हाताने चाचपून खात्री केली आणि आपल्या काठीच्या मदतीने रस्त्याचा अंदाज घेत तो सावकाश तिथून चालू लागला. कुठेही न अडखळता…
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाग २

त्याच्या आतमध्ये काहीतरी धुमसत होत. हातातली काठी फेकून देऊन जोरात पळत सुटावं असं वाटत होत. पण तो तसे करणार नव्हता, लहानपणी केलेल्या याच चुकीच्या आठवणरूपातला व्रण त्याच्या कपाळावर होता. ती जखम जरी पूर्वीच भरली असली तरी अधून मधून तिच्यावरची खपली निघत होतीच!

"फुटपाथ संपला! रस्ता ओलांडायला लागणार! कोणाची तरी मदत मागावी लागणार…

पण का? मी खरच एवढा अगतिक आहे? मला काही स्वाभिमान नाही?

नाही, तुला कसला आलाय स्वाभिमान? आणि असला तरी कोण विचारणार आहे? तुझ्या नशिबात....."

"काका, मी काही मदत करू?" तेवढ्यात एका लहानग्याचा गोड आवाज आला.

मनावरचे निराशेचे मळभ दूर होऊ लागले, त्यातून येणारा प्रकाशाचा एक किरण त्याला 'दिसला!'

कथा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

24 Aug 2015 - 11:51 pm | अर्धवटराव

खुप छान झाला कथेचा समारोप.

अर्धवटराव's picture

24 Aug 2015 - 11:54 pm | अर्धवटराव

+१ राहिलच :)

शब्दबम्बाळ's picture

25 Aug 2015 - 10:15 pm | शब्दबम्बाळ

खूप धन्यवाद!
पण स्पर्धेत नसल्यामुळे +१ राहिला तरी चालेल! ;)

एक एकटा एकटाच's picture

25 Aug 2015 - 12:21 am | एक एकटा एकटाच

+१

प्यारे१'s picture

25 Aug 2015 - 12:23 am | प्यारे१

बहोत अच्छे!

उगा काहितरीच's picture

25 Aug 2015 - 12:51 am | उगा काहितरीच

वा !

मांत्रिक's picture

25 Aug 2015 - 7:27 am | मांत्रिक

+१

स्पंदना's picture

25 Aug 2015 - 10:20 am | स्पंदना

हं!
सिंगापुरात एकजण प्रत्येक बसच्या दारात जाऊन ड्रायव्हरला बस नंबर विचारायचा. मी जवळच उभी होते, शेवटी मी येणार्‍या बसचा नंबर म्हणायला सुरवात केली अन तो हसला!! नशिबाने एकाच बस साठी उभे होतो, माझी स्टॉप येइतो मस्त गप्पा हाणल्या!!

शब्दबम्बाळ's picture

25 Aug 2015 - 10:20 pm | शब्दबम्बाळ

खूप छान अनुभव, आपले अभिनंदन आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

जेपी's picture

25 Aug 2015 - 10:27 am | जेपी

आवडली.

नीलमोहर's picture

25 Aug 2015 - 11:43 am | नीलमोहर

दोन्ही भाग छानच !!
पूर्वार्धही खूपच परिणामकारक होता,(कथा अंतिम सहामध्ये अपेक्षित होती, असो..)

एस's picture

25 Aug 2015 - 11:51 am | एस

छान आहे कथा.

नाखु's picture

25 Aug 2015 - 12:04 pm | नाखु

शेवट...+१

न बंबाळ होता

शब्दबम्बाळ's picture

25 Aug 2015 - 10:18 pm | शब्दबम्बाळ

धन्यवाद!
बाकी त्या "समेवर" वरती आमच्या इथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटकी संगीत यावर चर्चा झाली.
मला फारस काही कळाल नाही हि वेगळी गोष्ट! :)

बबन ताम्बे's picture

25 Aug 2015 - 12:28 pm | बबन ताम्बे

मस्त कथा.

जगप्रवासी's picture

25 Aug 2015 - 1:22 pm | जगप्रवासी

मस्त शेवट

अन्या दातार's picture

25 Aug 2015 - 2:23 pm | अन्या दातार

मस्त कथा. दोन्ही भाग आवडले. :)

पैसा's picture

25 Aug 2015 - 2:34 pm | पैसा

उत्तरार्धही आवडला!

gogglya's picture

25 Aug 2015 - 3:09 pm | gogglya

बाकी मदत करायला जावे आणी जर त्यात कोणी दुखावले गेले [ स्वाभिमान ] तर काय करा म्हणून धास्ती वाटते मदतीचा हात द्यायची.

माधुरी विनायक's picture

26 Aug 2015 - 4:27 pm | माधुरी विनायक

+१

इशा१२३'s picture

26 Aug 2015 - 11:26 pm | इशा१२३

छान.आवडला शेवट...

पद्मावति's picture

26 Aug 2015 - 11:36 pm | पद्मावति

मनावरचे निराशेचे मळभ दूर होऊ लागले, त्यातून येणारा प्रकाशाचा एक किरण त्याला 'दिसला!'

छान शेवट. आवडला.

योगी९००'s picture

27 Aug 2015 - 4:46 am | योगी९००

+१००
पहिल्या भागात शिवी या नावाचा उलगडा झाला नव्हता पण हे दोन्ही भाग वाचून कळलं..!!

रातराणी's picture

27 Aug 2015 - 9:38 pm | रातराणी

+१