[शतशब्दकथास्पर्धा] भेट भाग २

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 12:31 pm

[शतशब्दकथास्पर्धा] भेट
चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरतच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती.
पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली.
ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?”
त्यालाही ओळख वाढवायचीच होती. दोघे बाहेरच्या बागेत बाकावर बसले.गप्पा रंगल्या.हातात हात आले.नववर्षाच्या गार वाऱ्यात तिचा हात जास्तच थंड लागल्यामुळे त्याने आपला कोट तिच्या अंगावर पांघरला.पहाटे तिला घरी पोचवले.
आता कोट घेण्यासाठी तो आला होता.दार उघडण्याऱ्या वृद्धाने उदास हसत स्वागत केले. दारासमोरच्या भिंतीवर तिचा फोटो त्याच्याकडे पाहून हसत होता.फोटोसमोर मेणबत्ती जळत होती.

भाग=२

वृद्ध म्हणाला ,”कोट न्यायला आलायत ? वाटच पाहत होतो,चला.”
त्याचा हात धरून दार मागच्यामागे बंद करत वृद्ध निघाला.तो नि:शब्दपणे वृद्धासोबत फरपटला.चालतच ते चर्चच्या मागे आले.
'मेरी डिकॉस्टा' नावाच्या कबरीवर त्याचा कोट पडला होता.
तो हतबुद्धच .
कोट देत वृद्ध म्हणाला.
“मेरी या चर्चच्या समोरच कार अपघातात गेली, तेव्हा चर्चच्या पार्टीलाच निघाली होती.दरवर्षी ती अशीच कोणालातरी भेटते.त्या रात्रीची राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी.पहिल्यावर्षी जो मुलगा आला होता त्याला, मी,’ ती जिवंत नाही ‘असे सांगितले,पण तो ऐकेना जेव्हा मी त्याला इथे घेऊन आलो.तेव्हा त्याचा कोट पहिला.तेव्हापासून दरवर्षी खिसमस साजरा करायला तिने पाठवलेल्या पाहुण्याशी भेट घडते.”

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

जगप्रवासी's picture

24 Aug 2015 - 1:19 pm | जगप्रवासी

मस्त

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 2:23 pm | संदीप डांगे

अरे वा, छान! अजून नीट खुलवता आली असती. तुमच्यासारख्या लेखक मंडळींकडून जरा मोठ्या अपेक्षा असतात आम्हा पामरांच्या :-)

- मेरी दरवर्षी नेहमी कोटवालंच ('प्यांटवालं'च्या धर्तीवर) शोधते हे एक विशेष -

पैसा's picture

24 Aug 2015 - 2:29 pm | पैसा

आवडली कथा!

भिंगरी's picture

24 Aug 2015 - 2:32 pm | भिंगरी

+१

प्यारे१'s picture

24 Aug 2015 - 2:45 pm | प्यारे१

लैच साधंसरळ भूत हाय.
आज कोट द्या दुसऱ्या दिवशी परत घ्यायला या स्कीमवालं. असो!

+१

कविता१९७८'s picture

24 Aug 2015 - 2:50 pm | कविता१९७८

मस्तच

योगी९००'s picture

24 Aug 2015 - 3:13 pm | योगी९००

छान पण अजुन खुलवता आली असती..!!

कोट देत वृद्ध म्हणाला. “मेरी या चर्चच्या समोरच कार अपघातात गेली, ..........तेव्हापासून दरवर्षी खिसमस साजरा करायला तिने पाठवलेल्या पाहुण्याशी भेट घडते.”

याऐवजी

"कोट देत ड्रॅकुला म्हणाला “मेरी या चर्चच्या समोरच कार अपघातात गेली, ..........तेव्हापासून दरवर्षी खिसमस साजरा करायला तिने पाठवलेल्या पाहुण्याशी माझी भेट घडते.”

हे कसे वाटते..? (एक शब्द जास्त झालाय तो कोठेतरी कमी करावा लागेल).

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 4:43 pm | मांत्रिक

हा तर डब्बल तडका झाला. मस्तच!

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 4:16 pm | मांत्रिक

+१
आवडली.

तुडतुडी's picture

24 Aug 2015 - 4:40 pm | तुडतुडी

मस्त +१ . योगी९०० तुम्ही म्हणताय तसं सुधा मस्त आहे