सार्वजनिक संभोगालये

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in काथ्याकूट
10 Aug 2015 - 11:23 pm
गाभा: 

काही दिवसांपूर्वी सफदरजंग चा मक़बरा पाहायला गेलो होतो. छान आहे. वीकडे होता. मक़बरा बघायला म्हणून फार कमी लोक आलेले. मला धरून 7. बाकी सगळे कपल्स हिरवळीवर झाडाखाली. मोठा परिसर आहे आणि गर्दी नसते. फारसे कुणी जात नाही.5 रूपयात दिवसभर फूल प्राइवेसी. ऐसी आझादी और कहाँ!

मनात आले की दिल्लीतल्या अशा जागांवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहावा. म्हणजे स्वस्तात मस्त प्राइवेसी कुठे मिळेल ह्याचे रेडी रेक्नॉर बनेल. मराठी पोरे पोरी दिल्लीला जातील तेव्हा कामी येईल.

पुराना किल्ला गेलो तेव्हा तर शोधून शोधून सांदिकोपरे पाहून ठेवले होते. Occupied! तेव्हा अशी पॉपुलर, overcrowded स्थळे वगळता प्रेमी जीवांना काही अनवट वाटा कळाल्या तर उत्तमच अशी कल्पना होती. सध्याच्या व्यापात हा प्रकल्प तडीस नेणे कठीणच आहे म्हणा. पण आमच्या एका व्हाट्सऐप ग्रुपवर या मुद्द्यावर जरा चर्चा झाली तेव्हा. परवा अचानक मढ़ आइलैंड च्या बातमीमुळे ती चर्चा परत आठवली.

आपल्याकड़े, विशेषतः मोठ्या शहरांत प्राइवेसी ही एक मोठी समस्या आहे. मोठे कुटुंब किंवा लहान घर असेल तर घरांमध्ये जागेअभावी प्राइवेसी मिळत नाही, होटल बुक करावे तर ह्या धाडी पडण्याची शक्यता, बहुतेक पर ऑवर बेसिस वाली होटल्स अवैध असतात. काही काही छुपे कैमरे लावतात असे ऐकिवात आहे. बहुतेक तरुणतरुणी आपले प्रकरण घरी सांगू शकत नाहीत, मग लपतछपत भेटणे वगैरे. एकदंर बरीच कुचंबना होते. तेव्हा मग नाइलाजाने ऐतिहासिक स्थळे, राखीव जंगले, बगीचे वगैरे जागी शक्य तेवढी क्षुधाशांती केली जाते.

सरसकट समस्या नाकरण्यात अर्थ नाही, किंवा संस्कृती बुडते म्हणून कंठशोष करण्यातही अर्थ नाही. शेवटी प्राइवेसीच्या शोधात इकडेतिकडे जाणारे फ़क्त लफडी करणारेच असतात असे नव्हे तर विवाहित जोडप्यांनाही नाइलाज म्हणून हां उपाय करावा लागतो. तर आपल्याकडे जसे सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये? सध्या असलेल्या अवैध होटल्सना एक वैध, नियमबद्ध स्वरूप देता येईल. खात्रीने प्राइवेसी मिळेल. ह्या इमारती ख़ास कपल्ससाठीच असणार. हफ्तावसूली, धाडी यांपासून मुक्ती मिळेल. इथे वेश्या व्यवसाय चालू नये यासाठी संबंधित कायदे उभारून त्यावर आणि इतर संभाव्य समस्यांवर तोडगा काढता येईल.

भारताचे शहरीकरण वाढत जाणार आहे. पुरेशी प्राइवेसी लाभेल अशा जागा कमी कमी होत जातील. वन रूम किचन किंवा एका खोलीत संसार करणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. तेव्हा वरवर पाहता विचित्र वाटणारी ही संकल्पना तेवढी विचित्र वाटणार नाही. बगीचे किंवा ऐतिहासिक स्थळांमध्ये पोरांसोबत,कुटुंबासोबत फिरताना अवघडल्यासारखे वाटणार नाही. ओंगळवाणी दृश्ये दिसणे कमी होईल. आडवाटेला खासगी जागा शोधण्यातले धोके(लूटमार, बलात्कार,कधी कधी खून) वगैर कमी होतील. सामाजिक स्वास्थ्याकरिता भविष्यात सार्वजनिक संभोगालये सुद्धा आवश्यक ठरतील असे वाटते.

1. मिपाकरांचे काय मत आहे?
2. संभाव्य अडचणी काय असू शकतात?
3. इतिहासात अशी उदाहरणे आहेत का? (इथे वेश्यागृहांची उदाहरणे नकोत.)
4. आणि मोठा प्रश्न, हे शक्य आहे का? ह्याला किती विरोध होणार. विरोध होणार हे नक्की, पण तीव्रता किती असणार?
5. धाडी टाकून पोलिसांचे हफ्ता वसुलण्याचे धंदे बंद पडतील असे वाटते काय? की तिथेही कायद्यात पळवाट शोधतील?

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

10 Aug 2015 - 11:42 pm | आशु जोग

बाप रे

जव्हेरगंज's picture

11 Aug 2015 - 12:03 am | जव्हेरगंज

काय भन्नाट आयडीया येतात एकेकाच्या डोक्यात ...

श्रीरंग_जोशी's picture

11 Aug 2015 - 12:07 am | श्रीरंग_जोशी

या समस्येवर सह्याद्री वाहिनीवर चर्चा झालेली आठवते. कार्यक्रम होता विश्वास मेहंदळे यांचा वाद-संवाद.
तेव्हा पोलिस, सामाजिक कार्यकर्ते, टॅक्सी चालक यांनी आपापली निरिक्षणे व मते मांडली होती.

समस्येवर काय उपाय असावा हे ठरवणे सोपे नसले तरी किमान समस्या आहे हे मान्य करायला कुणाची हरकत नसावी.

स्वामी संकेतानंद's picture

11 Aug 2015 - 12:16 am | स्वामी संकेतानंद

बरोबर. पाल झटकावी तसे "छे छे! थेरं आहेत ही नुसती!" असे म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही.

श्रीरंग_जोशी's picture

11 Aug 2015 - 12:32 am | श्रीरंग_जोशी

या विषयावरून द्वारकानाथ संझगिरी यांचा लोकप्रभेत काही वर्षांपूर्वी वाचलेला एक लेख आठवला. खरं तर त्या लेखात वर्णन असलेला न्युझिलंडमधल्या एका तरुणीबरोबरचा त्यांचा संवाद आठवला.

माझी बाहेरख्याली

अत्रुप्त आत्मा's picture

11 Aug 2015 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जी... +++१११
धाडसी विषयात चांगली मुद्देसूद मांडणि केलीत. अश्या गोष्टींची गरज असणारच आहे.... अर्थात विरोध भरपूर होइल. आम्ही धर्म,अर्थ आणि मोक्षावर भरपूर काम केलेले आहे.. पण कामा'चा धर्म , अर्थ आणि मोक्ष मात्र उपेक्षेच्या वाळवंटातच सोडलेला आहे! त्याला स्वार्थापुरता हात लावण्या इतकाच आम्ही जवळ घेतो. त्याची ही अशी काही व्यवस्था लागत असेल,तर त्याच्या इतके चांगले दुसरे काहीही नाही.

सायकलस्वार's picture

11 Aug 2015 - 12:16 am | सायकलस्वार

काही आदिवासी समाजात 'घोटूल' नामक एक वास्तू असते ती अशाच प्रकारची व्यवस्था पुरवते असं वाटतं.
लेखाशी सहमत आहे. नाना-नानी पार्कसारखीच केवळ कपल्ससाठी काही पार्क्स असावीत असं माझं मत आहे. त्यामुळ निदान सार्वजनिक ठिकाणी कुटुम्बवत्सल लोकांना कानकोंडे न करता कपल्सना काही प्रायव्हसी मिळेल असं वाटतं. संभोगासाठी इमारती असाव्यात की नाही ते सांगता येत नाही. आपल्याकडे प्रेमिकांपेक्षा बर्‍याच विवाहित जोडप्यांनाच अशा व्यवस्थेची जास्त गरज आहे.

मस्तच या भौंनी कपल पार्क हा छान शब्द सुचवला. कल्पना खूप चांगली आहे. नाके मुरडणार्यांना मुरडू देत. एखाद्याला सामाजिक भान पाळून अशा ठिकाणी एकांत प्रेमाचे क्षण मिळणार असतील तर त्यात गैर काय?

अभिदेश's picture

11 Aug 2015 - 3:27 am | अभिदेश

तुमचा आयडि तुम्ही अगदि योग्य निवडलाय. जसे नाव तसाच विचार...

घराला जर घर म्हणुन प्रायव्हसी द्यायची क्षमता नसेल, तर तासाभरापुरती अशी सोय जोडप्यांना देण्यात काहीच गैर ना ही.
दिल्लीच काय मुंबईत पण अशीच अवस्था झाली आहे. प्रेमप्रकरण सोडाच, पण वैवाहिक जीवन सुद्धा अतिशय कुचंबीत झाले आहे.
कल्पनेचे स्वागत आहे. फक्त गटवुन आणणे हा प्रकार वाढीस लागण्याची शक्यता जास्त! तरीही जर फोटो आयडेंटीटी अन ही माहिती अश्या सर्व स्थळांवर शेअर करुन काही उपाय काढता येतील.

संदीप डांगे's picture

11 Aug 2015 - 5:53 am | संदीप डांगे

सार्वजनिक संभोगालये ही कल्पना कागदावर छान आहे. प्रत्यक्षात फोल ठरेल.

संदर्भः
महाराष्ट्रातील एका शहरात एका पार्कची ओळख लवर्स पार्क म्हणून होऊ लागली तेव्हा तिथे प्रेमीयुगुलांचे जाणे झपाट्याने कमी झाले.

स्पष्टीकरणः
मध्यंतरी सायबरकॅफेच्या उदयकाळात तिथले केबिन्स या कामासाठी वापरले जाऊ लागले. त्याआधी काही रेस्टॉरंट्स नी छोटे छोटे केबिन्स बनवून कॉलेजीयन विद्यार्थ्यांची बैठी सोय केली होती. त्याचे दर त्याच रेस्टॉरंट्स च्या इतर दरांपेक्षा तिप्पट होते. पण हे सर्व बोंबाबोंब झाल्यावर बंद पडले. गावोगावी लॉज्/बोर्डींग याच कामासाठी वापरले जातात. पण तिथून बाहेर पडतांना कोणी ओळखीच्याने बघणे हे नाइटमेअर (दु:स्वप्न?) समजले जाते.

यात बेकायदेशीर किंवा अनैतिकचा संबंध नसून सामाजिक प्रतिष्ठेचा आहे.

काही प्रश्नः
ग्राहकांची वैधता तपासणे:
१. प्रेमीयुगुल म्हणजे नक्की कोण? लग्नाचे सर्टीफिकेट मागता येते. प्रेमप्रकरणाचे कसे मागणार?
२. लपवाछपवी हाच मूळ हेतू असतांना राजरोस ओळखपत्रं कोण देईल. दिली तरी ती खरी कशावरून मानायची?

कायदे व सुव्यवस्था:
१. प्रेमप्रकरणांकडे संभाव्य धोका म्हणूनच बघणारी संपूर्ण यंत्रणा आहे. ती बदलणे कसे शक्य आहे?
२. पुरुषांबरोबर आलेल्या स्त्रिया ह्या वेश्या किंवा बळजबरीने आणलेल्या नाहीत हे कोण व कसे तपासणार?
३. यंत्रणेस अपेक्षित धोका (प्रेमप्रकरणातून मारहाण, आत्महत्या, खून, बलात्कार, इत्यादी) प्रत्यक्षात एखाद्या संभोगालयात घडला तर एकूण व्यवस्था, समाज त्याला कसे सामोरे जातील? आयटीतल्या अशाच समस्यांना इतर लोक काय नजरेने बघतात हे आपल्याला ठावूकच आहे.

सामाजिक प्रतिष्ठा:
१. टोलेजंग घर आहे पण त्यात शौचालय नाही म्हणून दहा किलोमीटर दूर जाऊन सार्वजनिक शौचालयांचा वापर कोणी करत असेल तर त्याला ज्या सामाजिक अप्रतिष्ठेला सामोरे जावे लागेल तीच सार्वजनिक संभोगालयात जाणार्‍यांना वाट्याला येईल. त्याचे काय करावे?
२. लग्न झाले असून इथे येताय म्हणजे घरी नक्की काय समस्या आहे हे कुठेतरी सरकारी व्यवस्थेत नोंदवावे लागणार. ही माहीती सर्वत्र उपलब्ध असेल. हे कितपत झेपेल?
३. लग्न झाले नसून इथे येताय म्हणजे नक्की काय प्रकरण आहे हे कुठेतरी सरकारी व्यवस्थेत नोंदवावे लागणार. ही माहीती सर्वत्र उपलब्ध असेल. ते ही कितपत झेपण्यासारखे आहे?

शौचालय/मुतार्‍या ही एका अशा शारिरिक प्रतिक्रियेचा निचरा करण्याची जागा आहे जिच्यावर मानवी मनाचे फार क्वचित काळासाठी नियंत्रण असते. त्या नियंत्रणाबाहेर जाऊन ह्या शारिरीक क्रियेचे समाजात वावरतांना दर्शन, अभिव्यक्ती झाली तर सर्वांचीच कुचंबणा होते व हे सर्वांना ठावूक असल्याने सार्वजनिक शौचालये ठिकठिकाणी उभारली आहेत. याउप्परही कुणाकडून असे विसर्ग झालेच तर त्यात त्याचा काही दोष नाही असे मानण्याचा मोठेपणा बहुसंख्य वेळा समाज दाखवु शकतो. याउलट संभोगक्रियेत मनाचे नियंत्रण बलवान असल्याने व त्याबाहेर ते वर्तन कदापि न जाण्याचे समाजास माहित असल्याने, त्याबरोबरच याच विशिष्ट क्रियेवर मनाचे नियंत्रण मानवाचा सर्वोच्च सद्गुण मानला गेला असल्याने असे वर्तन लोकांसमोर, किंवा स्वत:च्या जागेअभावी, सामाजिक अनुमतीअभावी, इतर काही सुस्पष्ट्/अस्पष्ट कारणामुळे अगदी कायदेशीर मान्यताप्राप्त संस्थेत जाऊन करणे समाजसंमत नाही. त्यास (दारू पिण्यासारखी, मांस खाण्यासारखी) छुपी प्रतिष्ठाही नाही. त्यामुळे समाजातून थेट विरोध वैगेरे होण्याऐवजी ग्राहकच तयार होणार नाहीत.

श्रीरंग_जोशी's picture

11 Aug 2015 - 7:40 am | श्रीरंग_जोशी

संदीप - तुमचा प्रतिसाद वास्तवावर आधारीत असला तरी ही समस्या कधी ना कधी आपल्या समाजाला मोठेपणा दाखवून स्वीकारावी लागणारच आहे. यापूर्वीच्याही सामाजिक सुधारणा सहजपणे घडलेल्या नाहीत.

तुमचा प्रतिसाद वाचून नऊ-दहा वर्षांपूर्वी लोकप्रभेत वाचलेला सातच्या आत घराबाहेर हा लेख आठवला. आता तो लेख उघडला असता जुन्या काळातला मिलेनियम वरुण फॉन्ट चालत नसल्याने वाचता आला नाही.

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 8:55 pm | संदीप डांगे

श्रीरंग,

मी फक्त वास्तवतेतून ह्या समस्येकडे लोक कसे बघतील ते मांडलंय. प्राप्त परिस्थितीतली समस्या सोडवायची असल्यास ज्या आदर्श वागणूकीची अपेक्षा समाजाकडून, यंत्रणेकडून करतोय ती मानसिकता तयार झाली तर मग अशा जागांची गरजच उरणार नाही. जोडप्यांच्या किंवा तरूणांच्या लैंगिक/भावनिक कोंडमार्‍याबद्दल सहानुभूती व मोकळेपणा आला तर यापेक्षा अनेक उत्तम व समाजमान्य मार्ग निघू शकतील.

आज भारतीय समाज फार विचित्र त्रांगड्यात अडकलाय. योग्य वयात लग्ने लावायची नाहीत वर लग्नापर्यंत कुठल्याही प्रकारे लैंगिक संबंधही करू नये ही तिरपागडी विचारसरणीच समस्यांचे मूळ आहे. माझा ३२ वर्षिय एक मित्र आहे, अजून वर्जिन आहे. माझ्या एका मामेभावाने ३६व्या वर्षी लग्न केले. हे काय आयुष्य आहे? माझ्या मते लग्न कुठल्याही वयात करा किंवा करू नका. योग्य काळजी घेऊन वयाच्या किमान अठराव्या वर्षापासूनतरी शास्त्रशुद्ध पद्धतीने संभोगसुख प्राप्त करण्याची मोकळीक असली पाहिजे. ती राजरोस नसेल तरी निसर्ग थांबत नाही. तो मार्ग काढतोच आणि ह्या समस्या उभ्या राहतात.

गंमत म्हणजे ज्यांनी तरूणपणी ह्याच समस्या भोगल्या असतात, त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न केलेले असतात तेच प्रौढ झाले की 'कसली तरुणांची थेरं' म्हणून झिडकारतात.

आजचा भारतीय समाज ६० टक्क्यांवर तरूण आहेत पण पगडा शेकडो वर्षांआधी मरून गेलेल्या पुर्वजांच्या कसल्यातरी फडतूस कल्पना, परंपरा आणि संस्कार यांचाच आहे. इथल्या समाजावर अजून मेलेले लोकच राज्य करतायत.

मला ही सा.सं. न पटण्याचे कारण तेच आहे. हा पळपुटेपणा आहे, वरवर मलमपट्टी आहे जी जखमेला अजून चिघळवण्यास हातभार लावू शकते. समस्येला सरळ भिडण्याची वृत्ती आवश्यक आहे. तरूणांनी ती दाखवावी. जग त्यांचंच आहे. समस्या त्यांच्या आहेत, त्यांनीच सोडवाव्या. पण तंग कपडे घालते म्हणून समवयस्क बहिणीचा खून करणारा तरूण जोपर्यंत इथे आहे तोवर हे सगळं स्वप्नंच आहे.

इतरांचं माहित नाही पण माझ्या मुलांसाठी तरी ते जेव्हा वयात येतील तेव्हा हा मोकळेपणा दाखवायला मी तयार असेन.

श्रीरंग_जोशी's picture

13 Aug 2015 - 9:01 pm | श्रीरंग_जोशी

आपल्या समाजाला याबाबतीत प्रगल्भ व्हायला अजुन बराच काळ लागणार आहे.

अशाच मानसिकतेमुळे अमेरिकन नागरिकत्व मिळालेले काही भारतीय लोक मुले वयात येऊ लागली की भारतात परतताना पाहिले आहेत.

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 9:10 pm | संदीप डांगे

खरे आहे. नमस्ते लंडन या चित्रपटात ही मानसिकत उत्तम दाखवली आहे.

अतिशय मुद्देसूद प्रतिसाद :)

तुमचा प्रतिसाद उशिराच वाचला. पण मुद्दा पटला. ही दुसरी बाजू देखील लक्षात घ्यावयास हवी. :(

प्यारे१'s picture

11 Aug 2015 - 1:18 pm | प्यारे१

+१

मुद्देसूद प्रतिसा/वाद आवडला.

कोमल's picture

11 Aug 2015 - 2:07 pm | कोमल

"समाजातून थेट विरोध वैगेरे होण्याऐवजी ग्राहकच तयार होणार नाहीत." +१

पुण्यात Z ब्रीजवर बसणार्‍या युगुलांना बाकी मंडळी अन् पोलीस खूप छळतात.
आम्ही पण कॉलेज मध्ये असतांना कोणी ओळखीचा/ची इथे बसलेले आढळले की त्यांना तुफान चिडवायचो.

जर अशा मान्यताप्राप्त संस्था सुरु जरी झाल्या तरी 'अगायायायायाया, तिकडं गेल्तसं होय रं' असे संवाद हमखास ऐकू येतील.

द-बाहुबली's picture

11 Aug 2015 - 5:20 pm | द-बाहुबली

बेकायदेशीर किंवा अनैतिकचा संबंध नसून सामाजिक प्रतिष्ठेचा आहे.

करेक्ट, चार चौघात काँडम मागायला लाजणारे प्रतिष्ठीत.. संभोगालयात काय घंटा जाणार ?

स्वामी संकेतानंद's picture

13 Aug 2015 - 4:03 am | स्वामी संकेतानंद

प्रतिसाद आवडला. काही नवे मुद्दे कळले.

थॉर माणूस's picture

13 Aug 2015 - 10:10 am | थॉर माणूस

सहमत...

आणि बरेच कष्ट वाचवलेत त्याबद्दल ठांकू. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Aug 2015 - 8:02 am | कैलासवासी सोन्याबापु

स्वामीजी डांगे साहेबांचे विचार सुद्धा पटण्या सारखे आहेत, एकांत प्रदान करणाऱ्या आस्थापनेला जर तुम्ही "अशी आम्ही सुविधा देतो" हे लेबल चिकटवलेस ग्राहक कमीच येतील

तीरूपुत्र's picture

11 Aug 2015 - 8:33 am | तीरूपुत्र

तुमचा विषय छान आहे, पण समाज या विषयाला मान्यता देणार नाही.

नाखु's picture

11 Aug 2015 - 9:07 am | नाखु

नैतीक-अनैतीक या संकल्पना कायमच सापेक्ष राहिल्या आहेत.
वरती अदिवासींच्या प्रथेबाबत उल्लेख आला आहे, कुणी पुराणकालीन अगदी वेदकालीन दाखले देईल.मुळात इंग्रजी चित्रप्टातील चुंबन द्रुश्ये आणि मराठी/हिंदी मधील हिच द्रुश्ये सारख्या नजरेतून पाहिली जातात काय? नसतील मग आधी मानसीकता तपासणे गरजेचे आहे.(पण मोकळीकचा मुद्दा ताणून, लोक प्राण्यांसारखा रस्त्यात केला तर काय फरक पडतो असा अजब तर्कट युक्तीवाद करण्यास कचरणार नाहीत हेही खरे)
लेखातील कुचंबणा आणि वस्तुस्थीती न नाकारता ही इतकेच म्हणावे लागेल ही समस्या फक्त जागेअभावामुळे उगवली नसून,आणखी इतरही सामाजीक् अनास्था/लैंगीक शिक्षण कमतरता/असलेच तर जास्त चुकीचे आणि विपर्यास असलेले/टोकाची मत भिन्नता.समस्या आहे हे मान्य करणे आणि त्याकरीता पुरेसा एकांत देणे हे पहिले पाउल ठरेल. अगदी नवपरीणित दांपत्यालाही एकमेकांशी मोकळेपणाने बोलताही येत नाही हे मी पाहिले/अनुभवले आहे तर उपरोक्त विना-विवाह, बाबतची बातच सोडा.

पण अशी व्यवस्था केल्याबरोबर गैरफायदा घेणार्यांची संख्या वाढू शकते आणि आत्ता जो चोरून आणि "हप्ता"बंद व्यवसाय (कल्याणी देशपांडे पुरसकृत) तो उघड आणि जोमाने फोफावेल.खर्या प्रेमी जीवांकडेही तश्याच नजरेने पाहिले जाईल हे लख्ख सत्य आहे.मिपावर व्यवसायामुळे आणि व्यासंगाने सम्रुद्ध अनुभव असलेले बरेच मिपाकर आहेत, तेच अश्या स्फोटक सामाजीक विषयाबाबत सांगोपांग माहीती आणि नात्यांची भावनीक गुंतागुंत याबाबत माझ्यापे़क्षा नक्कीच जास्त मुद्देसूद आणि विवेचनात्मक लिहितील.

आपण किमान मुला-मुलींची मैत्री (संशयविरहीत) निकोप मनाने स्वीकारली पाहिजे.

बालक असलेला पालक नाखु

gogglya's picture

11 Aug 2015 - 12:27 pm | gogglya

सुक्या बरोबर ओले पण जळण्याचीच जास्त शक्यता आहे!

हमरा लाडला मोघल राजा बाबर अगदी लाजाळू असल्याने बायकोला आठ दहा दिवसाने एकदा भेटायचा !

बाबराची आई सतत रागवून त्याला बायकोला वारंवार भेटण्यास सांगायची .

https://en.m.wikipedia.org/wiki/Aisha_Sultan_Begum

.....

पैसा's picture

11 Aug 2015 - 12:38 pm | पैसा

दादुस, तुम्ही रंग बदललात का! या बाबतीत बाबराबद्दल कमी बोलाल तेवढे बरे.

सुबोध खरे's picture

11 Aug 2015 - 12:40 pm | सुबोध खरे

हा प्रश्न टाकाऊ किंवा निरर्थक नक्कीच नाही तर खरोखरच विचार करण्यासारखा आहे.
काही वर्षापूर्वी एका अशाच हॉटेल वर वेश्या व्यवसाय चालतो म्हणून धाड पडली असता तेथे दोन लग्नाचे नवरा बायको सापडले. एक वरळीच्या चाळीत राहणारे निम्न मध्यमवर्गीय तरुण मराठी कुटुंब ज्यांच्या दीड खोलीत आई वडील, भाऊ आणि त्याचे कुटुंब यासहीत राहत होते आणि केवळ तेथे संबंधासाठी संधी मिळत नाही म्हणून या स्वस्त हॉटेलात एक खोली घेऊन राहिले होते. दुसरे कुटुंब असेच माहीमच्या एका चाळीत एका खोलीत आई वडील आणि मुलांसोबत राहत असलेले. एका खोलीत पडदा लावूनही वडील रात्री कधीही लाघवी साठी उठत असल्याने पाहिजे तेवढा एकांत मिळत नसे यासाठी काही तास फक्त एकमेकासोबत राहण्यासाठी आलेले होते.
पोलिस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष ओळख पटल्यावर पोलिसांनी उदार मनाने( आणि गरम खिशाने) त्यांना सोडून दिले.
तरुण लग्न झालेल्या जोडप्यांना साधा एकांत हि मिळू नये हि परिस्थिती मुंबईत ६०% जोडप्यांची आहे हे सांगून पटणार नाही. तेंव्हा एकत्र कुटुंब पद्धतीत तरुण माणसांचा आणि मनांचा किती कोंडमारा होतो हे आपल्याला कळत नाही. मागे कुणीतरी चाळीतील जीवनाबद्दल गहिवर काढला होता तेथे रसभंग नको म्हणून मी अशा घटना टाकल्या नव्हत्या. परंतु लग्न झालेल्या जोडप्यांचे नोकरीवर जातो म्हणून दोघांनी दांडी मारून अशी जीवाची मुंबई करणे हे लोकांना वाटते तितके कमी प्रमाणात नाही हेही नमूद करू इच्छितो. मुलाचे लग्न करून दिले पण मुलगा आणि सुनेच्या मध्ये झोपणारी सासू मी पहिली आहे. अशा परीस्ठीतित्त त्या जोडप्याने काय करावे अशी अपेक्षा आहे?
हि कल्पना वास्तवात येईल कि नाही ते माहित नाही आणि वास्तवात उतरली तरी धन्द्य्च्य गणितात टिकेल कि नाही हेही माहित नाही.परंतु हे केवळ कल्पना रंजन आहे असे मात्र नाही असे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो

मृत्युन्जय's picture

11 Aug 2015 - 12:56 pm | मृत्युन्जय

मुलाचे लग्न करून दिले पण मुलगा आणि सुनेच्या मध्ये झोपणारी सासू मी पहिली आहे.

मुलाच्या खोलीबाहेर खुर्ची टाकुन बसणारी आणि दोन तास झाल्यावर दार ठोठावुन "आता बास झाले उघडा दार आता" असे म्हणणारी बाई मी बघितली आहे. (अर्थात ती अश्या रम्य अवस्थेत खुर्ची टाकुन बसलेली असताना नाही बघितली).

प्यारे१'s picture

11 Aug 2015 - 1:19 pm | प्यारे१

बसवला टेम्पोत च्यायला!
अशा वेळी सुनेने औद्धत्य पत्करुन निमंत्रण द्यावं.

मास्टरमाईन्ड's picture

11 Aug 2015 - 11:57 pm | मास्टरमाईन्ड

काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजंना.

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2015 - 1:02 pm | प्रसाद गोडबोले

खतरनाक कन्सेप्ट !

मी मुंबैत होतो तेव्हा ..... रिक्षामधे बिन्धास्तपणे चाललेले अगदी बेस १ , बेस २ पर्यंतचे प्रकार अगदी ह्याची देही ह्याची डोळा पाहिले आहेत .... ते आठवले !

.

कानडाऊ योगेशु's picture

11 Aug 2015 - 1:25 pm | कानडाऊ योगेशु

अरे बाप रे. हे कसे शक्य आहे ?
तेव्हा एक तर तुम्ही तिसर्या सीटवर असणार किंवा रिक्षा चालवत असणार.(मागे बघत बघत.)
ह.घ्या.! ;)

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2015 - 1:29 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा !

हलके घेतले आहे =))

आम्ही 'पहिल्या' किंव्वा 'दुसर्‍या' सीटवर असण्याची शक्यता आपण का बरे लक्षात घेतली नाहीत ;)

अ‍ॅक्च्यली , मुंबईट ट्रॅफिक इतके असते की गाडी अगदी १०-२० च्या स्पीड ने चालवावी लागते , तेव्हा हे सारे प्रकार पहाय्ला मिळतात .

तसेही अक्क्षा बीच , बॅन्डस्टॅन्ड , मुंबई टाऊन मधील काही काही ठिकाणे तर जाहीर बेस १ लये आहेत =))

प्यारे१'s picture

11 Aug 2015 - 2:41 pm | प्यारे१

'बेस१, बेस२' बोले तो?

थोडा ग्यान प्रदान करे प्रभु पोपशास्त्री. व्यनि करेंगे तो भी चलेगा.

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 2:45 pm | टवाळ कार्टा

ऐला हे नै म्हैती...हैट्ट आहे...का निरागसतेचा आव =))

मीपण निरागस हाये. मलापण व्यनी करा.

या प्रकाराला अमुकअमुक म्हणतात असं नाव माहिती नाय रे.
कृती माहिती असेलच्च. ;)

तुझी शप्पथ टक्कुमक्कुसोनु!

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 4:59 pm | टवाळ कार्टा

बेस १ = मधाच्या पाकळ्या
बेस २ = हेडलाईट्स
बेस ३ = अता हे पण सांगायला लागत असेल तर मग कैच न करता हिमालयात जाउन हरी-हरी करत बसा

=))

प्रसाद गोडबोले's picture

11 Aug 2015 - 5:36 pm | प्रसाद गोडबोले

अधिक विस्त्रुत माहीतीकरिता हे पहा

बेसबॉल कन्सेप्ट्स

प्यारे१'s picture

11 Aug 2015 - 6:21 pm | प्यारे१

___/\___

चान चान!

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 6:24 pm | टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 5:00 pm | टवाळ कार्टा

टक्कुमक्कुसोनु

टक्कुमक्कुशोनु असे आहे ते...

सस्नेह's picture

11 Aug 2015 - 1:03 pm | सस्नेह

मेट्रो सिटीज मधला ज्वलंत प्रश्न !
पण याचा गैरफायदा घेऊन वेश्यालये बोकाळू नयेत म्हणजे झाले !!

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Aug 2015 - 1:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

+१

बहुतही क्रांतिकारी!! असे विचार केले होते कॉलेजमध्ये असतांना की एक पेशल गार्डन किंवा हॉटेल काढायचे खास प्रेमीलोकांसाठी.

पैसा's picture

11 Aug 2015 - 1:10 pm | पैसा

असे काहीतरी स्वामीजींनाच सुचणार! कल्पना चांगली आहे. पण आम्ही "इंडियन" लोक कोणत्याही चांगल्या कल्पनेची वाट लावू शकतो. या संभोगालयांची वेश्यागृहे व्हायला अज्जिबात वेळ लागणार नाही हे एक. आणि ज्यांच्याकडे पयशे नाहीत ती कॉलेजची पोट्टी पुन्हा पुरान्या किल्यातच दिसतील.

संजय पाटिल's picture

11 Aug 2015 - 1:58 pm | संजय पाटिल

कॉलेगची आयडी असेल तर सूट किंवा मोफत अशी स्कीम ठेवत येईल.

टवाळ कार्टा's picture

11 Aug 2015 - 2:20 pm | टवाळ कार्टा

+१

मला वाटतं अशाच एका विषयावर एक जुना { कॄष्ण धवल } मराठी चित्रपट आहे मी पाहिला आहे,पण आत्ता काय त्याचे नाव आठवेना ! नवरा बायकोला "एकांत" मिळत नसतो आणि त्यामुळे त्यांची होणारी तगमग... कोणाला आठवल्यास त्या चित्रपटाचे नाव कळवावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli

अशाच एका विषयावर एक जुना { कॄष्ण धवल } मराठी चित्रपट

मुंबईचा जावई!!

मदनबाण's picture

11 Aug 2015 - 3:29 pm | मदनबाण

येस्स करेकट... ठांकू ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli

पद्मावति's picture

11 Aug 2015 - 8:15 pm | पद्मावति

पिया का घर मधे पण थोडेफार असेच दाखवले आहे.

तो त्याच चित्रपटाचा रीमेक आहे. (लै जुनं प्रकरण आहे रीमेक म्हणजे)
वपुंची कथा होती बहुतेक.
मराठीत अरुण सरनाईक नायक होते.

जगप्रवासी's picture

11 Aug 2015 - 1:41 pm | जगप्रवासी

एकत्र कुटुंबात प्रायवसी भेटत नाही म्हणून नवीन घर घेऊन वेगळे राहायला जाणार्या कुटुंबाच्या कथेवर मराठी चित्रपट येतोय
"डबल सीट"

प्रायवसी मिळत नाही असं ऐकलं होतं. ;-)

प्रायवसी भेटत नाही

म्हणजे?? कोण प्रायवसी? कुठे राहाते? का नाही भेटत ती?

प्यारे१'s picture

11 Aug 2015 - 3:02 pm | प्यारे१

मुंबईची मराठी आहे ती मावशी!

तिथे खायला, प्यायला, फिरायला वगैरे सगळं 'भेटतं'!

अत्रन्गि पाउस's picture

11 Aug 2015 - 1:53 pm | अत्रन्गि पाउस

ह्यांनी हि कल्पना मांडली होती ...
प्राचीन संस्कृत काव्यात सुद्धा अशी मिलन केंद्रे असल्याचे उल्लेख आहेत का ? (चिं वी जोशींच्या एका लेखनात असे वाचल्या सारखे वाटते )

चिगो's picture

11 Aug 2015 - 2:08 pm | चिगो

चांगला मुद्दा आहे. विचार करण्यासारखी कल्पना.. प्रतिसाद वाचतोय..

कल्पना चांगली आहे, पण लोकांची मानसिकता? त्याचं काय करणार!! आपल्याला एकदा वस्तू सार्वजनिक म्हटली की त्याची किंमत नसते. पाचेक वर्षांपूर्वी मुंबईत पांढर्‍या शुभ्र लोकलगाड्या दाखल झाल्या, महिन्याभरातच त्यांचे दरवाजे पान खाणार्‍या रसिकांनी रंगवून ठेवले होते. तुम्ही म्हणताय त्या बाबतीत ज्यांची खरोखरच ज्यांची गैरसोय होते त्यांची सोय होण्यापेक्षा हवशे आणि गवशे येण्याची शक्यता अधिक!!

जिथे स्वच्छ भारत अभियान म्हणताना पान-तंबाखूच्या पिचकार्‍या रस्त्यावर उडवू नयेत याची अक्कल आपल्याला नाही तिथे इतक्या संवेदनशील बाबतीतली वास्तू लोक विवेकबुद्धी शाबूत ठेवून वापरतील अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Aug 2015 - 3:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुद्दा वाचला पटला, प्रतिसाद ही अतिशय प्रगल्भ आहेत त्यात वादच नाही, जितके मला आकलन झाले त्यानुसार "प्राइवेसी नसणे" "संभोगालाये आईडिया फोल ठरणे" अन "ह्या संकल्पनेला वेश्यावृत्ती ने टेक ओवर करायची भीती" हे तीन मुद्दे इंटेरसेक्ट होत आहेत किमान ह्यांच्यातली लाइन फार पुसट आहे असे वाटते,

ह्यावर कितीही उहापोह झाला म्हणजे संभोगालय उभारणे किंवा अगदी वेश्याव्यवसाय कायदेशीर करणे, काहीही म्हणले तरी प्रथम नादखुळा साहेब म्हणाले तशी मानसिकता नसल्यास आईडिया फोल जाणार अन अनुषंघाने येणारे एड्स वगैरे प्रॉब्लम सुद्धा तसेच राहणार , नुसते एक असे आस्थापन स्थापन करून काय होणार? आमचा एक मित्र जर्मनी ला राहतो त्याने सांगितले की तिथे सेक्स ला एक गरज म्हणुन ट्रीट करतात फ़क्त ते इतके सब्जेक्टिव विचार करतात की आपल्या जाहिराती असलेले fliers (पत्रके, हैंडबिल) हॉस्टल च्या नोटिस बोर्ड ला लावायला आलेल्या मुलींना पाहून किंवा पुरुष वेश्याना पाहून कोणीही घृणेने पचकन थुंकत नाही किंवा त्यांना विरोध करत नाही उलटे त्यांना अगदी बिच्चारे ह्यूमन ट्रैफिकिंग चे शिकार म्हणुन सिम्पेथी सुद्धा नाही , तर एका सामान्य नागरिकासोबत जो सार्वजनिक व्यव्हार असतो तसाच ठेवला जातो,

संभोगालय ते वेश्यालय भारतात लीगल केले तरी जोवर मानसिकता नाही तोवर हे विषय असेच taboo राहणार अन त्यातून कोणाचेच काही भले होणार नाही असे वाटते

-बाप्या

शिव कन्या's picture

11 Aug 2015 - 3:28 pm | शिव कन्या

+१

चंबा मुतनाळ's picture

11 Aug 2015 - 3:52 pm | चंबा मुतनाळ

शिवाय अशा स्थळांमधे गैरप्रकार होउ नयेत म्हणून CCTV क्यामेरे लावेत आणी चव्वीस तास मॉनीटर करावेत असे सुचवू
ईच्छीतो!

चिगो's picture

11 Aug 2015 - 5:44 pm | चिगो

शिवाय अशा स्थळांमधे गैरप्रकार होउ नयेत म्हणून CCTV क्यामेरे लावेत आणी चव्वीस तास मॉनीटर करावेत असे सुचवू
ईच्छीतो!

नेमके कुठे लावायचे हे कॅमेरे? मॉनिटर करणारा मरायचा नाहीतर..

औनलाईन प्रक्षेपण करून अवांतर पैसे मिळवावे !

अशी काही व्यवस्था किमान मुंबई /पुण्यात तरी आज काळाची गरज झाली आहे. पण खेड्यांमध्ये, तालुक्यांच्या ठिकाणी तसेच इतर छाेट्या शहरांमध्ये देखील लोकलज्जास्तव वा इज्जत जाण्याच्या भयामुळे म्हणा, अशी व्यवस्था जास्त काळ प्रतिसादाअभावी टिकणार नाही, असे वाटते.
मुंबई /पुण्यात शहराच्या अवाढव्य आकारामुळे 'ओळखीचं कोणी मला तिथे पाहिल का? ' ही धास्ती जवळपास नसते, त्यामुळे आदर्श परस्थितीत तिथे हे शक्य वाटते.
बाकी काहिका असेना, भविष्यात असे काही खरच अस्तित्वात आल्यास इञ-तञ-सर्वञ लावण्यात येणार्या छुप्या क्यामेर्यांच्या पुण्याईमुळे दररोज शेकडो जिबी भारतीय निलफिती उपलब्ध होतील, हे माञ नक्की.

लोकलज्जास्तव वा इज्जत जाण्याच्या भयामुळे म्हणा,

मुंबई /पुण्यात शहराच्या अवाढव्य आकारामुळे 'ओळखीचं कोणी मला तिथे पाहिल का? ' ही धास्ती जवळपास नसते, त्यामुळे आदर्श परस्थितीत तिथे हे शक्य वाटते.

कठीण आहे.

मालोजीराव's picture

11 Aug 2015 - 5:23 pm | मालोजीराव

हि कन्सेप्ट ऑलरेडी आहे जपान मध्ये, "लव्ह हॉटेल्स" म्हणतात तिकडे

पद्मावति's picture

11 Aug 2015 - 8:42 pm | पद्मावति

बरोबर आहे. जपान मधे अशी लव हॉटेल्स खूप दिसतात.
दुरूनही अगदी ओळखू येतील अशी विचित्र गुलाबी रंगाची असतात. फारच भडक प्रकार आहे पण तिथे सर्रास चालतो.

द-बाहुबली's picture

12 Aug 2015 - 2:05 pm | द-बाहुबली

अन्न वस्त्र निवारा आणी संभोग या मुलभुत गरजा मानल्या गेल्या आहेत जापान मधे.

खटपट्या's picture

13 Aug 2015 - 1:58 pm | खटपट्या

यात वाय फाय अ‍ॅडवा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2015 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कल्पना काही वाईट नाही, स्वरुप कसं असेल सांगता येत नाही.

-दिलीप बिरुटे

तुडतुडी's picture

12 Aug 2015 - 1:40 pm | तुडतुडी

सार्वजनिक शौचालय असते तसे सार्वजनिक संभोगालय का असू नये>>
शाब्बास . हेच राहिलं होतं . नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे चोचले पुरवणार्या अनैतिक गोष्टी ह्यांच्यातला फरक पण कळेनासा झालाय

उगा काहितरीच's picture

17 Aug 2015 - 1:24 am | उगा काहितरीच

नैसर्गिक गोष्टी आणि शरीराचे चोचले पुरवणार्या अनैतिक गोष्टी ह्यांच्यातला फरक पण कळेनासा झालाय

या वाक्याचा तीव्र शब्दांत निषेध ! कामासारख्या अत्यावश्यक क्रियेला फक्त शरीराचे चोचले कसे काय म्हणू शकतात लोक ? ताई/भाऊ थोडे स्पष्ट बोलतोय राग मानू नका ! पण कामाशिवाय तुमचा , माझा जन्म तरी झाला असता काय ? माझ्या दृष्टीने काम ही अतिशय पवित्र क्रिया आहे. (त्यामुळेच बहुधा आपल्या प्राचीन मंदिरात तशा मुर्त्या वगैरे आहेत.) पण मधल्या काळात मुस्लीम राज्यकर्ते व त्यांची पडदा पद्धत , स्त्रीयांना दूय्यम मानन्याची वृत्ती यामुळे व रानटी पणा मुळे आपली पण दृष्टी कामाकडे एक टाबू म्हणूनच पाहू लागली, जगाला कामशास्त्र शिकवीणार्या देशातच कामाकडे एका कुत्सीत नजरेने पाहाण्यात येते आहे , यापेक्षा दुर्दैव ते काय !

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 9:58 am | संदीप डांगे

वा वा वा! हिंदूंच्या प्रत्येक प्रश्न/समस्यांचे मूळ मुस्लिमांमधेच आहे असे ठाम विश्वास आहे काही लोकांचा.

बंधो, जरा अपनेही गिरेबान में झांक कर देखो. स्त्री नरकाचे द्वार आहे, कामवासना मोक्षापासून भरकटवणार्‍या असतात. असल्या अफलातून कल्पना आपल्याच हिंदूलोकांनी पसरवलेल्या आहेत. मी वरच सांगितलेलं की कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय समाजाच्या मते सर्वोच्च सद्गुण आहे. कामक्रिडेबद्दल घृणा पसरवण्याचे पवित्र कार्य आपल्या सो कॉल्ड साधुसंतांनी केलंय. हिंदू समाज नेहमीच सर्वसंगपरित्याग करणार्‍यांना आदर्श मानत आलाय. त्यातूनच असले विचार उपजले आहेत. इथे मुस्लिमांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा काहीही संबंध नाहीये.

उगा काहितरीच's picture

17 Aug 2015 - 10:45 am | उगा काहितरीच

कामवासनेवर नियंत्रण हा भारतीय समाजाच्या मते सर्वोच्च सद्गुण आहे. कामक्रिडेबद्दल घृणा पसरवण्याचे पवित्र कार्य आपल्या सो कॉल्ड साधुसंतांनी केलंय. हिंदू समाज नेहमीच सर्वसंगपरित्याग करणार्‍यांना आदर्श मानत आलाय.

हे अलिकडच्या काळातील जैन, बुद्ध ही लाट आल्यानंतर . त्याअगोदर काम हे जीवनाचा अविभाज्य अंग होते. व सर्वसंगपरीत्यागला ग्लॅमर तर अशोकाच्या काळानंतरच आले. त्याआधी ऋषीपण संसार करत असत. (काही थोडे जे सर्वसंगपरीत्याग करीत ते समाजात रहातच नव्हते )
-‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ' अशा संस्कृतीचा आदर असलेला

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 10:59 am | संदीप डांगे

आता तुम्ही जैन, बुद्धापर्यंत पोचले का...? बरं बरं. थोड्यावेळाने अजून मागे जाल... नाही?

असो.

ऋषी हे साधु, संत, सन्यासी ह्याच कॅटेगीरीत येतात हा हिंदू संस्कृतीबद्दल प्रचंड माहिती असल्याचा गैरसमज असलेल्या हिंदूंचा एक फार मोठा गैरसमज आहे महाराजा...

उगा काहितरीच's picture

17 Aug 2015 - 12:52 pm | उगा काहितरीच

गैरसमज दूर करण्याच्या तुमच्या प्रयत्नासाठी आभार ! मे बी तुम्ही म्हणताय तसा माझा गैरसमज होत असेल कदाचित ! पण मला एवढेच म्हणायचे होते कि पुरातन हिंदू संस्कृतीला काम हा विषय त्याज्य नव्हता . मधल्या काळात (जैन, बुद्ध व त्यानंतर मुस्लीम ) हा विषय असा तिरस्करणीय झाला . (मांसाहारी अन्नाबद्दलही तेच. असो तो वेगळा विषय असल्या कारणामुळे येथे चर्चा करणे योग्य नाही)

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 1:29 pm | संदीप डांगे

पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले हिंदू यांच्या काम ह्या विषयीच्या बदलणार्‍या मताला इतरधर्मीय विचार कारणीभूत आहेत हा विचित्र दावा काही पटला नाही बुवा! कारण बौद्ध, जैन यांची धर्मतत्त्वे ही मूळ हिंदू विचारपद्धतीतूनच आली आहेत असा कर्मठ हिंदूंचा दावा असतो. मुस्लिम धर्मातही कामवासना ह्या वाईट आहेत, त्यांचा त्याग करणेच इष्ट असं काही आहे असं दिसत नाही (संदर्भः चार-चार विवाह. असंख्य पोरांची पैदास).

आपल्या धर्मातल्या चुकीच्या चालीरितींचे खापर दुसर्‍या धर्मावर फोडणे व भारतातल्या स्त्रियांच्या स्थानाचा आणि कामक्रिडेच्या स्थानाचा बादरायण संबंध जोडणे विस्मयकारक आहे इतकेच.

उगा काहितरीच's picture

17 Aug 2015 - 2:08 pm | उगा काहितरीच

पुरातन हिंदू ते सद्यस्थितीतले हिंदू यांच्या काम ह्या विषयीच्या बदलणार्‍या मताला इतरधर्मीय विचार कारणीभूत आहेत हा विचित्र दावा काही पटला नाही बुवा!

हिंदू संस्कृती ही प्रवाही आहे. त्यामुळे नवीन धर्मातील काही गोष्टी अंगीकारण्यात आल्या त्यात नवल नाही. शिवाय धाकदपटशहा ही होताच . त्यामुळे काही चांगल्या/वाईट गोष्टी अंगीकारण्यात आल्या .

कारण बौद्ध, जैन यांची धर्मतत्त्वे ही मूळ हिंदू विचारपद्धतीतूनच आली आहेत असा कर्मठ हिंदूंचा दावा असतो.

माझ्या एका लेखात उल्लेख आला होता कि universal set व sub set मधे समानता असणारच की !

मुस्लिम धर्मातही कामवासना ह्या वाईट आहेत, त्यांचा त्याग करणेच इष्ट असं काही आहे असं दिसत नाही (संदर्भः चार-चार विवाह. असंख्य पोरांची पैदास).

मुस्लीम धर्माबद्दल माझा जास्त अभ्यास नाही आहे त्यामुळे बोलू इच्छित नाही , माफी असावी .

आपल्या धर्मातल्या चुकीच्या चालीरितींचे खापर दुसर्‍या धर्मावर फोडणे व भारतातल्या स्त्रियांच्या स्थानाचा आणि कामक्रिडेच्या स्थानाचा बादरायण संबंध जोडणे विस्मयकारक आहे इतकेच.

मला कालखंडाबद्दल बोलायचे होते.स्त्रियांच्या स्थानाचा व कामक्रिडेच्या स्थानाचा काय संबंध लावला मी ?
(रच्याकने यापुढचा माझा प्रतिसाद रात्री मिळेल )

स्वामी संकेतानंद's picture

13 Aug 2015 - 4:21 am | स्वामी संकेतानंद

हां धागा इथे टाकताना उथळपणाकडे तर सरकणार नाही ना अशी भीती होती, पण वर उत्तम चर्चा झाली आहे. अनेक मुद्दे आले आहेत. अनेकांनी ही एक समस्या आहे हे मान्य केले आहे आणि संयतपणे या संकल्पनेवर चर्चाही केली आहे. मिपावरून संपूर्ण भारतीय जनतेचा कौल घेणे बरोबर होणार नाही, पण आपल्या विचारांत हळूहळू का होईना, पण बदल होत आहेत. आपण थेट शॉक्ड न होता त्यावर चर्चा करतोय हे दृश्य सुखावह आहे. मला वाटते भारतात शहरीकरण आणि जागेची, प्राइवेट स्पेस ची कमी जाणवू लागेल तेव्हा वर प्रतिसादात आल्याप्रमाणे लवर्स पार्क किंवा जापान्यांसारखे लव होटल्स ही येतील आणि त्यांना अगदीच तीव्र विरोढ होणारही नाही कदाचित. समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदला होत राहील. धर्म अर्थ आणि मोक्षाच्या मागे उर फूटेस्तोवर धावताना काम कड़े ही लक्ष द्यायला पाहिजे हे लक्षात येईलच कधीतरी.

वर तुडतुड़ी ह्यांनी शरीराचे चोचले हा शब्द वापरला आहे. आपण जीभेचे चोचले पुरवतो तर शरीराचे चोचले का पुरवू नये? त्यात काय वाईट नेमके? रोजरोज आंघोळ करणे, केस विंचरणे, हलकेच पण नटणे हे पण शरीराचे चोचले पुरवणे आहे ना? काम ही पण शरीराची एक गरज असेल तर ती भागवणे ह्याला चोचले पुरवणे कसे म्हणावे? त्यात अनैसर्गिक काय आहे?आणि वर डॉ खरे आणि अजून कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ह्यांचा वापर विवाहित जोडपीच कदाचित जास्त करतील,कारण त्यांना खरेच प्राइवेट स्पेस मिळत नाही. तर हे नैसर्गिक नव्हे का?

(नेट च्या समस्येमुळे मला फ़क्त रात्री उशीरा किंवा पहाटे मिपावर येणे शक्य होते(वारंवार पेज लोड करावा लागतो), त्यामुळे चर्चेत भाग घेता आला नाही. तरी सबकु थैक्यू वेरी मच.)

तुडतुडी's picture

13 Aug 2015 - 12:18 pm | तुडतुडी

जीभेचे चोचले पुरवतो तर शरीराचे चोचले का पुरवू नये? >>>
जीभेचे चोचले प्रमाणाबाहेर पुरवणं धोक्याचं तसाच शरीराचे चोचले पुरवणंहि .
काम ही पण शरीराची एक गरज असेल तर ती भागवणे ह्याला चोचले पुरवणे कसे म्हणावे?>>
काम ही पण शरीराची एक गरज आहे ह्याच्याची सहमत आहे . म्हणून तर लग्न व्यवस्था आहे . लग्न काय फक्त वंश वाढवा , म्हातारपणाची काठी मिळावी एवढ्याच हेतूने केलेलं असतं का ? शरीराची गरज पुरवणं हा एक मोठा हेतू असतो ना त्यात . विवाहित जोडप्यांना प्रायव्हेट स्पेस मिळत नाही हा बिनबुडाचा
युक्तिवाद आहे . किती विवाहित जोडप्यांना पुरेशी प्रायव्हसी नसते ? तशी नसेल तर लोक लग्नच करणार नाहीत . लपून छपून करणाऱ्यात अविवाहित आणि व्यभिचार करणारे असतात .
ह्यांचा वापर विवाहित जोडपीच कदाचित जास्त करतील>>> गैरसमज आहे .

आस्तिक शिरोमणि's picture

13 Aug 2015 - 8:04 pm | आस्तिक शिरोमणि

@सार्वजनिक संभोगालये ,
वाचायला विचित्र वाटत आहे.. पण एकंदर सगळा विचार केल्यावर अश्या गोष्टींची आवश्यकता आहे.. हे पटतय.

ऋत्विका's picture

14 Aug 2015 - 5:39 am | ऋत्विका

एका कॉमन समस्येला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.
फक्तं यात एकच धोका आहे -

अशा जागा हा ब्लॅकमेलर्सचा अड्डा बनण्याची शक्यता आहे. समोरच्या पानटपरीवर किंवा हॉटेलमध्ये कॅमेरा घेऊन बसायचं आणि तिथून बाहेर पडणार्‍यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायचं.

डायवर's picture

15 Aug 2015 - 9:36 pm | डायवर

सार्वजनिक संभोगालयात प्रवेशासाठी दोघांनाही प्रौढ असल्याचा म्हणजे वयाचा पुरावा द्यावा लागेल. याची सरकार दफ्तरी कायमस्वरूपी नोंद राहील. आपल्या देशात " प्राइवेसीचा अधिकार " घटनेने दिलेला नाही. म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे हे सर्व उघड होणार. जर दोघेही अविवाहित असतील आणि भविष्यात पुढे दुसर्याच व्यक्तीशी या प्रकारांची कल्पना 'न' देता विवाह झाला तर तो संसार जास्त काळ टिकणार नाही. जर दोहोंपैकी एक विवाहित अन एक अविवाहित असेल किंवा दोघेही विवाहित असून एकमेकांचे नवरा बायको नसतील तरीपण संसार टिकणार नाही आणि विवाह बाह्य सम्बधाच्या केसेस होतील . हे टाळण्यासाठी मग आज जसे जमीन खरेदी करण्यापूर्वी वकिलांकडून सर्च रिपोर्ट काढतात अगदी तसेच भावी जोडीदाराबद्दलचे सर्च रिपोर्ट खाजगी गुप्तहेरांकडून काढण्यात येतील. आजपण वर उल्लेख केलेले प्रकार समाजात चालतात पण लपून छपून. सा. सं. मुळे हे प्रकार अगदीच खुले होतील आणि आधीच मेटाकुटीला आलेली लग्न संस्था कोलमडून पडेल, असे वाटते. किंवा असे काही घडू शकते याचा अंदाज आधीच असल्यामुळे तिकडे कोणी फिरकणार नाही अन हि संकल्पनाच फोल जाईल.
दुसरे असे कि " लग्नाच्या आमिषाखाली बलात्कार " हा प्रकार सर्रास सा. सं.मध्ये घडताना दिसेल. फसवून किंवा काहीतरी आमिष दाखवून मुली आणणे अन नंतर अत्याचाराची केस झालीच तर ती एक प्रौढ होती व स्वमर्जीने आली होती हे तिथल्या कर्मचार्यांच्या साक्षी पुराव्यांसकट न्यायालयात सिध्द होताना दिसेल.

कहर's picture

17 Aug 2015 - 2:29 pm | कहर

मुलगी सज्ञान असेल तर लग्नाच्या अमिषाखाली बलात्कार हा नक्की काय प्रकार असतो आणि त्या मागचे logic काय कोणी सांगेल का ?

द-बाहुबली's picture

17 Aug 2015 - 2:49 pm | द-बाहुबली

एखादी मुलगी पटवायची. तिला तुच माझी प्रियतमा म्हणायचे. लवकरच लग्न करु असे अश्वासन देउन विश्वास संपादन करुन जवळीक साधायची. मग शरीसुखाला नकार देणे उमलत्या नात्यातील अविश्वास ठरेल असे भासवुन अप्रत्यक्ष दडपण अथवा भावी नवराच आहे काय फरक पडतो म्हणुन परस्पर-सहमतीने शरीर संबंध निर्माण करायचे नंतर काहीतरी कारण सांगुन तुझ्याशी लग्न करणे शक्य नाही म्हणून मोकळे व्हायचे म्हणजे लग्नाच्या अमिषाखाली बलात्कार होय. अर्थात असा पुढाकार स्त्रिने घेतला तर तो पुरुषावर बलात्कार ठरावा असा कयास आहे... जाण्कारांच्या प्रतिक्षेत.

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 3:20 pm | संदीप डांगे

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही भारतीय दंड संहितेतले एक जुने कलम आहे. प्रेमविवाहात घरून पळून जाणार्‍या मुलींच्या पालकांचे हे एक आवडते कलम होते. एवढ्यातच माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या कालबाह्य कलमाला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे स्मरते. सज्ञान व सक्षम स्त्रीला असा दावा दाखल करता येणार नाही असे न्यायालयाच्या निकालात म्हटले होते.

उलटी केस झाल्याचे ऐकिवात नाही. भारतीय कायदे स्त्री-धार्जिणे असल्याने अशी काही केस पोलिस दाखलच करत नाहीत.

असो. सज्ञान असो व अज्ञान. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही केसच मुळात कुठे स्टँड करू शकत नाही. तरी इतकी वर्षे यासंबंधी खटले चालू होते हे विशेष.

प्रतिसादाबद्दल दोघांचे धन्यवाद … मी तेच म्हणत होतो कि यात logic काय ? जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या संमती शिवाय विवाह करू शकते तर (हे)हि करू शकेल…मग बलात्काराचा काय संबंध

स्वामी संकेतानंद's picture

17 Aug 2015 - 3:38 pm | स्वामी संकेतानंद

बरोबर.. अगदी बंडल कायदा आहे असे माझेही मत आहे.

जर सज्ञान मुलगी आई वडिलांच्या संमती शिवाय विवाह करू शकते तर (हे)हि करू शकेल…मग बलात्काराचा काय संबंध

मुलगी सज्ञान आहे हे वास्तव आहेच, पण ज्याच्याशी शरीर संबंध ठेवले तो भामटा निघाला केवळ शरीरसंबंध निर्माणकरण्यापुरते त्याने नाते निर्माण करायचे आमिष दाखवले व नंतर हात झटकले तर तर त्याची / तिची ती कृती बलात्कारच ठरते.

प्रेमविवाहात घरून पळून जाणार्‍या मुलींच्या पालकांचे हे एक आवडते कलम होते.

असणारच. पण स्त्रियांची लैंगीक फसवणूक करणारे कमी नाहीत.

बरोबर! कृपया ही बाजू देखील लक्षात घेणे आवश्यक आहे.
विकसनशील देशात स्त्रिया अजून पुरेशा जागरूक नाहीत तिथे ही फसवणूक सहज शक्य आहे.

सज्ञान चा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी असा होतो. एखाद्या दुकानदाराने स्वतः एखाद्या लहानग्याला चोकलेट दिले तर नंतर त्याला चोरी केली म्हणले तर पटते का ? (इथे दुकानदार सज्ञान समजावा )

द-बाहुबली's picture

17 Aug 2015 - 6:30 pm | द-बाहुबली

ठीक आहे आपण म्हणत आहात तर यापुढे या जगात कोणत्याही सज्ञान व्यक्तिबाबत घडणार्‍या कोणत्याची गुन्हा गुन्हा धरु नये अशी मागणी करुया. त्यांच्याबाबत एखादा गुन्हा घडुच कसा शकतो ? कारण सज्ञानचा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी व्यक्ती असा होतो. त्यांच्याबाबत मिसहॅप होउच कशी शकेल ? त्यामुळे यापुढे तुरंगांचीही गरज नाही... कारण सज्ञा व्यक्ती तुरुंगात जातीलच कशा ? मुळात सज्ञान व्यक्तळागुन्हा करतीलच कशा सज्ञानचा अर्थच योग्य अयोग्य कृतींची जाण असणारी व्यक्ती असा होतो ? यापुढे फक्त बालसुधारगृहे तेवडी चालु राहुदे अज्ञानी जिवांसाठी.

कहर आहे.

जडभरत's picture

17 Aug 2015 - 7:54 pm | जडभरत

ब्बरोब्बर बक्षीजी!
विकसनशील देशात स्त्री पुरुषाच्या हातातील खेळण्यासारखी असू शकते. ही वस्तुस्थिती नाकारणे बरोबर नाही.
अवांतर: आपल्या नात्यातील स्त्री गुन्ह्यास बळी पडली तर खूप कांगावा होतो. पण जेव्हा असे पुरुष स्वतः एका स्त्रीवर अन्याय करतात तेव्हा? कायद्याचा खीस पाडून पुरुषच कसा बरोबर हे सिद्ध केले जाते.

इट्स बॅक्षी, बॉमकेस बॅक्षी ;)

जडभरत's picture

17 Aug 2015 - 8:12 pm | जडभरत

साॅरी प्यारेजी!!!
;););)

द-बाहुबली's picture

17 Aug 2015 - 8:28 pm | द-बाहुबली

अवांतरः- हा yaa धाग्यावरील १०० वा प्रतिसाद.

संदीप डांगे's picture

17 Aug 2015 - 9:35 pm | संदीप डांगे

सज्ञान व्यक्तीसोबत बलात्कार आणि लग्नाचे वचन देऊन केलेला संमतीसंभोग यात आपण गल्लत करत आहात ब्योमकेसबाबू.

मुलींना फूस लावून पळवणे हे ही एक लोकप्रिय कलम आहे पालकांचे. पण त्यातही जर पोलिसांसमोर जर मुलीने माता-पित्यांसोबत जायचे नसून ह्या मुलासोबतच जायचे आहे असा कबुली जबाब दिला तर पोलिस काहीच करू शकत नाहीत. लग्न झालेले असो वा नसो. सज्ञान म्हणजे अठरा वर्षे पूर्ण व्यक्ती स्वत:च्या मर्जीने कुणासोबतही जाऊ राहू शकते. त्यास कोणीच आडकाठी करू शकत नाही. (मुलगी अल्पवयीन असल्यास प्रकरण वेगळे)

आता लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ही केसच स्टँड होत नाहीयेना ह्या संदर्भात. ओळखीतली एक केस आहे अगदी अशीच. मुलगी आठ दिवस आजोळी गेली. रिक्षावाल्या पोराने पटवली. नवव्या दिवशी घरून पळून गेली. दहाव्या दिवशी आर्यसमाजमंदिरात लग्न केले. बाराव्या दिवशी स्वतः पोलिसात दाखल झाले आणि मुलीने पालकांसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. तीन महिने मुलगी सो कॉल्ड नवर्‍यासोबत राहिली. चौथ्या महिन्यात चूक उमगून परत आली घरी. मुलगा नालायकच होता. पण कायदा काहीच करू शकला नाही. कारण मुलगी २१ वर्षे वयाची सज्ञान होती. तीला तीचे पूर्ण अधिकार होते.

लग्नाचे आमिष दाखवून शारिरिक-मानसिक गैरफायदा घेता येतो. बलात्कार ही व्याख्याच मुळात वेगळी आहे. शारिरिक भोग म्हणजेच बलात्कार असा अर्थ लावून तत्कालिन कायदा मो़कळा झाला. यात आधी शरिराचे आमिष दाखवून नंतर लग्नासाठी मागे लागली असेही आरोप मुलीवर करता येतात पण कायदा स्त्री-धार्जिणा असल्याने असे घडत नाही.

सज्ञान व्यक्ती गुन्हा करत नाही असे कुणीच म्हटले नाही. दोन सज्ञान व्यक्तिंमधला शारिरिक संबंध जर परस्परसंमतीने झाला असेल तर तो बलात्कार ठरत नाही असे म्हणायचे आहे. आपले इप्सित साध्य होत नाही असे समजल्यावर मागाहून बलात्कार केला असा कांगावा करता येत नाही. न्यायालयानेही ह्याच गोष्टीवर बोट ठेवून निर्णय दिला आहे. अगदी २५ वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शहरी स्त्रीयांनीही असे खटले दाखल केले आहेत. यात त्यांना संबंध ठेवतांना लग्नाचे आमिष हे फसवे आहे हे ओळखता येत नव्हते असे मानणे म्हणजे अगदी....

असो.

मी सज्ञान लोकांनी केलेला गुन्हा किंवा त्यासाठी होणारी शिक्षा याबद्दल बोलतच नाहि. मी म्हणतोय ज्या गोष्टीचा आनंद दोघांनी मिळून घेतला त्यात नंतर अचानक एकटाच दोषी कसा ठरू शकतो

सज्ञान झाल्यावर पळून जाउन लग्न केल्यास त्यावर कोणते कलम लावावे ?तो गुन्हा का समजू नये हेही स्पष्ट करा.
समजा "जे" झाले ते दोघांच्या संमतीने झाले आणि नंतर अशा गुन्हाच्या नावाखाली मुलांना blackmail करण्यात आले तर ?

मी सज्ञान लोकांनी केलेला गुन्हा किंवा त्यासाठी होणारी शिक्षा याबद्दल बोलतच नाहि. मी म्हणतोय ज्या गोष्टीचा आनंद दोघांनी मिळून घेतला त्यात नंतर अचानक एकटाच दोषी कसा ठरू शकतो

सज्ञान झाल्यावर पळून जाउन लग्न केल्यास त्यावर कोणते कलम लावावे ?तो गुन्हा का समजू नये हेही स्पष्ट करा.
समजा "जे" झाले ते दोघांच्या संमतीने झाले आणि नंतर अशा गुन्हाच्या नावाखाली मुलांना blackmail करण्यात आले तर ?
विकसनशील देशात मुलांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या मुली फसवेगिरी करण्यातही मागे नाहीत. शरीराचा फायदा नोकरीत बढतीसाठी करून नंतर प्रकरण उघडकीस आल्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवले हा कांगावा अगदी सहज करता येण्यासारखा आहे.

मी सज्ञान लोकांनी केलेला गुन्हा किंवा त्यासाठी होणारी शिक्षा याबद्दल बोलतच नाहि. मी म्हणतोय ज्या गोष्टीचा आनंद दोघांनी मिळून घेतला त्यात नंतर अचानक एकटाच दोषी कसा ठरू शकतो

सज्ञान झाल्यावर पळून जाउन लग्न केल्यास त्यावर कोणते कलम लावावे ?तो गुन्हा का समजू नये हेही स्पष्ट करा.
समजा "जे" झाले ते दोघांच्या संमतीने झाले आणि नंतर अशा गुन्हाच्या नावाखाली मुलांना blackmail करण्यात आले तर ?
विकसनशील देशात मुलांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या मुली फसवेगिरी करण्यातही मागे नाहीत. शरीराचा फायदा नोकरीत बढतीसाठी करून नंतर प्रकरण उघडकीस आल्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवले हा कांगावा अगदी सहज करता येण्यासारखा आहे.

चुकून सज्ञान लोकांनी केलेला कहर असे वाचले. ;)
गमतीत घ्या कहरजी :)

नमकिन's picture

16 Aug 2015 - 2:49 pm | नमकिन

विशेष लक्षवेधी " विषय "सुख मिळवून देण्यासाठी " आहेरे" वर्गातील सुज्ञ मिपा/नेटकरी आपले "सेकंड होम" या प्राथमिक गरजेसाठी उपलब्ध करुन देतील व मनाचा मोठेपणा दाखवतील आणि पुण्य जोडतील अशी खात्री बाळगतो. राहुन राहुन एक इरसाल नमुना आठवतोय, सांगावा की नको ? माहित असेल बहुतेकांना, असो-

ऐका- एका स्त्रीरोगतज्ञ/लैंगिक विषय तज्ञ व वयस्कर डॅा. कडे एक प्रेमी युगुल आपली समस्या घेऊन जाते की आम्हाला मार्गदर्शन करा, तुमच्या तज्ञ निगरानीखाली. प्रथम डॅा तयार होतो (मनात पहिला लाडू फुटला) -१ तासच्या १ "सेशन"चे रु•१०००/-, युगुल झटक्यात तयार, (मनात दुसरा लाडू फुटला) १ तासाने युगुल रु•१०००/- देऊन तसेच पुढच्या आठवड्यातील डॅा. भेटीची आगाऊ नोंदणी करुन आनंदात निरोप घेतात. असे ५ "सेशन" महिन्यात पार पडल्यावर डॅा. सांगतात की तुमची समस्या निराकरण झाले असे दिसत आहे व तुमचा आत्मविश्वास वाढलाय आणि पुढे जमेल सरावाने, अडचण आली तर मी आहेच मार्गदर्शन करायला. तरीही युगुलाच्या आग्रहाखातर अजून १ महिना मार्गदर्शक होतो. का?
उत्तर - संपूर्ण धागा सविस्तार वाचणा-यांना सहज सापडेल.

सुबोध खरे's picture

17 Aug 2015 - 2:16 pm | सुबोध खरे

जाता जाता
१००० रुपयात एक तास मार्गदर्शनासाठी स्त्रीरोगतज्ञ/लैंगिक विषय तज्ञ व वयस्कर डॅा मिळणार नाही तर बाबा कमाल खान बंगाली मिळेल तो सुद्धा झोपडपट्टीत.शिवाय पुढे तुम्हाला ब्लैक मेल पण "फुकट" होईल. तेंव्हा पुढील कथा हा विनोद म्हणून ठीक आहे

स्वामी संकेतानंद's picture

17 Aug 2015 - 3:39 pm | स्वामी संकेतानंद

मला पण हा एक जालीय विनोदच वाटला.

डबलसीट नामक सध्या नुकत्याच आलेल्या मराठी पिच्चरमध्ये नवविवाहितांच्या प्रायव्हसीचा इश्श्यू खूप उत्तमरीत्या दाखवलेला आहे. पूर्ण पिच्चर एक नंबर बघण्यासारखा आहे, अवश्य बघा. लैच आवडला. मुक्ता बर्वेला मराठीची कंगना राणावत म्हणावे असे वाटले.

नमकिन's picture

2 Sep 2015 - 9:43 am | नमकिन

डॅा नमूना विनोदच.
सेकंड होम ला "फुल सर्विस अपार्टमेंट" करुन या 'सत्कामाला' उपलब्ध करुन देणेबाबत "नो" प्रतिक्रिया?
किस्सा होता संभोगालय विषयावर जिथे १च्या जागी ५ रु वाचले तर खरेपणाची शक्यता वाढेल का? ( श्री. खरे नव्हे)!
एकंदरित शिवकालीन लग्नपत्रिकेत "शरिरसंबंध करण्याचे योजिले" असा उल्लेख वाचलेला स्मरतो. "डबलसीट"वाल्यांची तरी सोय होईल,
तरी विषय सोडवणेस आपल्या परीने सहाय्य करतीलंच सुहृदय जन.
लोभ असावा!