गाभा:
मंडळी रामराम
तसे १२ वाजलेच आहेत भारतीय प्रमाण वेळे नुसार आणि आपला फ्रेन्डशिप डे सुरु झालेलाच आहे .
तसा मिपावर आता एक आठवडा झालेलाच आहे येउन, ३-४ तासापासुन मिपा सुरु होण्याची वाट बघत होतो
मालक पण कमाल आहेत बरोबर १२ वाजत मिपा चालू केलं, मी पहिला प्रवेश करणारा
ब-याच ओळखी पाळखी झाल्यात आल्यापासून, स्वागत मात्र धूम धाडाक्यात झाले
नवीन ब्लॉग सुरु केला, आता तुम्ही विचारण्याआधीच सांगतो कि पैसे अजून काही कमावले नाही पण फक्त नोंदी २ करून प्रेक्षक मात्र १५०० झालेत, हा पण एक महान उच्चांक म्हणता येईल, १०० करोड क्लब असतो तसा
३ छोटे मोटे फुटकळ लेख लिहिले, पण कमाल म्हणजे तिन्ही वरून लोकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वतः धागे टाकले बाकी काही नाही
लोभ असू द्या हि विनंती,पण मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे कळून चुकले
प्रतिक्रिया
3 Aug 2015 - 4:44 pm | टवाळ कार्टा
प्रगोच्या वरताण लाल डबेवाला आला रे =))
3 Aug 2015 - 7:22 pm | प्रसाद गोडबोले
लाल सलाम =))
4 Aug 2015 - 4:44 pm | जडभरत
म्हणजे काय? नवीन आहोत. अर्थ लक्षात नाही आला.
4 Aug 2015 - 7:01 pm | पाटीलअमित
जाऊ द्या
का माझ्या सारख्या अब्रूदार माणसाचे टोपी उचलाता भर बाजारात .
4 Aug 2015 - 8:19 pm | प्रसाद गोडबोले
=))
तुम्ही टोपी नक्की कुठे घालता
4 Aug 2015 - 8:38 pm | टवाळ कार्टा
अरे ए चायला =))
4 Aug 2015 - 8:56 pm | जडभरत
लाल डबेवाला आला रे =))
या माझ्या प्रश्नाचे कुणीच उत्तर नै दिले. किमान व्यनि तरी करा.
3 Aug 2015 - 5:25 pm | वेल्लाभट
अच्छा.....
3 Aug 2015 - 5:31 pm | पाटीलअमित
धन्यवाद
3 Aug 2015 - 7:22 pm | बबन ताम्बे
अजून उच्चांक व्हावा ही सदिच्छा .
4 Aug 2015 - 3:11 pm | पाटीलअमित
धन्यवाद
3 Aug 2015 - 7:29 pm | gogglya
राहीले की वो ! आता पेटतय बघा...
3 Aug 2015 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाकर म्हणजे सदाशिव पेठी हे कळून चुकले
उशीर झाला हो पाअ तुम्हाला ! असली वाक्ये टाकून धागा शतकी करण्याचे दिवस मिपावरून फार पूर्वीच गेले ! ;) :)
3 Aug 2015 - 11:17 pm | पाटीलअमित
म्हणून तर फोटू पण टाकलाय