<विडंबनः मिसळपाव वाचा व्यवस्थापन नीती शिका>

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in जनातलं, मनातलं
31 Jul 2015 - 5:59 pm

प्रेरणा: बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

मिसळपाव हे संस्थळ, तिथले लेख, कविता, काथ्याकुट आपण सर्वानी वाचलेच असणारच, पण ते फक्त वाचन आणि मनोरंजन म्हणून न बघता एक बोधप्रद संस्थळ म्हणून बघितले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप.

मिसळपाव वर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

दूरदृष्टी / नियोजन :- मिसळपावचे काम नियोजनबद्ध होते हे सर्व मिपाकर जाणतातच. जसे अनेक चांगले लेखक इथे उत्तमोत्तम साहित्य लिहितात, त्याचबरोबर अनेक डूआयडी बरेचदा त्रास देण्याच्या उद्देशाने येतात, काही फक्त खोड्या काढायलाच येतात, मग जेव्हा संपादक मंडळ यात उडी मारते तेव्हा आधी पासून ठेवलेली कात्री कामी येते.

नात्यांची जपणूक :- जेव्हा तथाकथित कंपूगिरी करणाऱ्यांकडून एक प्रतिसाद येतो, तेव्हा बाकीचे सगळे लगेच आपले उप उप प्रतिसाद देत सर्व वाचकांचा कॅमेरा आपल्याकडे खेचून घेतात. मिपाच्या कुठल्याही महान रत्नांना, मग हेवनवासी आयडी असू देत, मोजी असू देत, नाहीतर मोकालायाचे कवी असू देत, कुणाला म्हणून कुणाला आम्ही मिपाकर विसरू शकत नाही. हे सदस्यांचे लेखकांशी असलेले नातेच इथे जपले जाते.

कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- शशक म्हणजेच शतशब्दकथा हे याचे उत्तम उदाहरण. शिवाय मग रच्याकने, हहपुवा वगैरे सारखे अनेक शब्द वाचून याचीच प्रचीती येते.

संशोधन :- ड्वाळे पाणावले, चोप्य पस्ते, उप्डते, दुदुदु, चान चान, पुस्पगुच्छ.. किती किती लिहिणार इथे संशोधन झालेल्या शब्दांबद्दल. शिवाय वर दिलेली रत्ने, त्यांचे लेख हुडकून वर आणणे हे संशोधन मिपावर अविरत चालू असते. कोण कुणाचा डूआयडी आहे हे शोधून काढणे हेही एक आलेच.

कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली, कुठलाही काथ्याकुट आला की त्यावर तत्परतेने प्रतिसाद देणारेही मिपाकर, आणि जिल्ब्या पाडणारेही मिपाकरच. शिवाय मग डुआयडी शोधून काढण्याचे काम असू देत, खरडवहीत उचकापाचक असू देत, मिपाकर आवडीने आणि तत्परतेने ही कामे करतात.

संरक्षण (सरंक्षण) :- दिव्य मराठीतून (ते वर्तमानपत्र नाही, दिव्य हे विशेषण) लिहिणारे लेखक, आपल्या लिखाणाचा फाजील आत्मविश्वास बाळगणारे लेखक, अशांना पळवून लावण्यात इथले सदस्य हिरीरीने सहभागी होतात आणि पर्यायाने त्या लेखकांचे पुढील लेख निदान मिपापुरते थांबवून इतरांना संरक्षण देतात. आणि तरीही, यातलेच काही लेख विशेष सुरक्षा घेऊन, वाखू साठवून कधीतरी वर काढतात.

प्रोत्साहन :- सुज्ञ मिपाकरास याबाबत काही सांगण्याची गरजच नाही. मिपा हा अखंड प्रेरणास्त्रोत आहे.

तुम्हाला मिसळपाववर अजूनही अनेक वैशिष्ट्ये दिसली असतील, म्हणून तर तुम्ही इथे येता. तुम्ही तुमचे मत इथे कुठेही नोंदवू शकता. मग लेख लिहा, प्रतिसाद लिहा, चर्चा करा, वाद घाला, दंगाही करा, फक्त त्या सगळ्यावर वाचक/प्रतिसादक वरची कुठली व्यवस्थापन वैशिष्ट्ये दाखवून देतात, त्याचा अनुभव घ्या आणि मिपानीती शिकत राहा. :)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2015 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी हं...! लंबर एक विडंबन जमलंय. :)

-दिलीप बिरुटे

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:06 pm | पाटीलअमित
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2015 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटलं अगोदर विडंबन आलं आणि नंतर मुल धागा.
थ्यांक्स हं... ;)

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

31 Jul 2015 - 6:11 pm | प्यारे१

हो. तुमचा मुल धागा आहे.
वर बाप धागा आलाय. ;)
-प्यारेन्द्र सेहवाग

एस's picture

31 Jul 2015 - 7:18 pm | एस

>>>प्यारेन्द्र सेहवाग

ठ्ठो:!!!!

=))

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 7:21 pm | पाटीलअमित

हसावे का ?

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Jul 2015 - 8:27 pm | माम्लेदारचा पन्खा

अवांतर - मिपावर ब्लोग लिहून करोडपती कसे होतात हो?

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 8:38 pm | पाटीलअमित

तात्या .......

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 8:40 pm | टवाळ कार्टा

आणि तुम्ही नवीन????

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 8:42 pm | पाटीलअमित

हो
वाचक आधीपासून होतो

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 8:45 pm | टवाळ कार्टा

मग मिपा आणि मिपाकर कसे आहेत हे माहित असेलच....मग असे का करताय...तुम्च्यासाठी टेंप्यु सजवायला घेतलाय सगळ्यांनी

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 8:51 pm | पाटीलअमित

नशीब वाहिका नाही सजवली ,पुढच्या वेळ पासून करेल शुद्ध लेखन

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 8:54 pm | टवाळ कार्टा

हो फार छान...चांगला मुहुर्त आहे

आदूबाळ's picture

31 Jul 2015 - 9:07 pm | आदूबाळ

अरे जुना है यह!

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 9:08 pm | पाटीलअमित

इन्सानियत के दुश्मन

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Jul 2015 - 8:47 pm | माम्लेदारचा पन्खा

आज गुरूपौर्णिमा .....मंगल दिवस....

म्या पामरानं, चांडाळानं तुमास्नी वळिकलं न्हाय वो.......कुटं फेडू ही पापं ? थॉर प्रंप्रेतले दिसताय तुमी......

प्रकट व्हा ........!!!

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 9:09 pm | पाटीलअमित

हम गया नाही जिंदा हैन

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Jul 2015 - 9:13 pm | माम्लेदारचा पन्खा

जिंदा तो हय ..... पन हय कौन ?

हो पण धागा कुठे आहे हा ?

या नवीन नीती मुळे तू लवकर च करोडपती होणार ;)

यशोधरा's picture

31 Jul 2015 - 6:08 pm | यशोधरा

हायला! तुम भी? :D

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 6:11 pm | श्रीरंग_जोशी

क विडंबन क विडंबन.

आपल्या मिपाभ्यासाला सादर प्रणाम.

- (मिपाबालक) रंगा

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2015 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

"- (मिपाबालक) दंगा" असं वाचलं ! ;)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 8:14 pm | पाटीलअमित

नशीब अजून यमक नाही जुळाले

==================\
आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 8:14 pm | श्रीरंग_जोशी

हा हा. जे खफला भेट देतात त्यांना दंगा हे नाम देखील पटेलच :-) .

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 8:18 pm | पाटीलअमित

मी तर आधी तिकडेच जातो ,मग इकडे जिलब्या टाकतो

=================

माझा ब्लोग

मधुरा देशपांडे's picture

1 Aug 2015 - 12:52 am | मधुरा देशपांडे

तुम्ही आणि मिपाबालक???
मी तर संशोधन मध्ये दुवे संशोधक म्हणुन तुमचे नाव देणार होते. ;)

श्रीरंग_जोशी's picture

1 Aug 2015 - 1:32 am | श्रीरंग_जोशी

जसं एखादं बालक उत्साही असतं तसाच मिपावर दुवे शोधण्यात मी उत्साही असतो ;-) .

एकदा मिपावय झालं की माझाही उत्साह मावळेल कदाचित :-) .

कमी मटिरियलमध्ये काम चालवणे हे पर्फेक्ट आहे. ;) पुलेशु.

मोहनराव's picture

31 Jul 2015 - 6:46 pm | मोहनराव

जमंलय!!

नात्यांची जपणूक करण्याच्या उदात्त हेतूने प्रतिसाद देण्यास तत्परतेने धावून आलो आहे. ;-)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:54 pm | पाटीलअमित

मूळ धाग्याला पण प्रतिसाद देऊन नाती वाढवा राव

आम्ही 'संरक्षण'पण तितक्याच तत्परतेने आणि जोमाने करतो.

मधुरा देशपांडे's picture

1 Aug 2015 - 12:56 am | मधुरा देशपांडे

हाहाहा...धन्यवाद. :)

अरे कोणीतरी मोकलाया दाही दिशाचा धागा द्या रे. कित्ती दिवस शोधतोय.
हा नक्की काय प्रकार आहे?

मोहनराव's picture

31 Jul 2015 - 7:09 pm | मोहनराव
पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 7:14 pm | पाटीलअमित

हे का अच्चानक

===============================

आजची स्वाक्षरी

बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

आदूबाळ's picture

31 Jul 2015 - 7:07 pm | आदूबाळ

नाही जमलं.

एकतर फारच शुद्ध लेखन आहे, आणि कोणत्याच बोलीचा प्रभाव नाही. आणि तुम्हाला करोडपती व्हायची साधी महत्त्वाकांक्षासुद्धा नाही.

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 7:09 pm | पाटीलअमित

आणि ब्लोग पण नाही

बबन ताम्बे's picture

31 Jul 2015 - 7:18 pm | बबन ताम्बे

असं बोललं की "ते" encounter म्हणतात.

इथे प्रांतागणिक मराठी भाषा बदलते ,standard असे मराठी आहे आपल्याकडे ?
प्रभाव आहेच कुठला तरी.

बबन ताम्बे's picture

31 Jul 2015 - 7:28 pm | बबन ताम्बे

लिहीलेय ना त्यांनी आपल्या "मुल" धाग्यात.

आदूबाळ's picture

31 Jul 2015 - 7:28 pm | आदूबाळ

:-)

नो सरंडर वन्ली एन्काऊंटर ;)

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 7:31 pm | पाटीलअमित

जर माझ्या धाग्याचे सरंक्षण त्वरित काढेल नाही गेले आणि रेप्लाय नाही आले तर ह्यापुढील लेख साठी कालालाकेया वाली भाषा वापरली जाइल ह्याची नोंद घ्यावी

मधुरा देशपांडे's picture

1 Aug 2015 - 12:55 am | मधुरा देशपांडे

खरंय तुमचं...याला म्हणतात मिपाकरांचे प्रोत्साहन...अजुन ३ नवीन धागे काढायला वाव आहे असे सुचवत आहात. मिपावरील लेखांमुळे माझ्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत, काढते नवीन धागे. ;)

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 7:54 pm | टवाळ कार्टा

खी खी खी
उद्याचा दिवस सत्कारणी लाग्णार ;)

बबन ताम्बे's picture

31 Jul 2015 - 7:58 pm | बबन ताम्बे

तुमचीच कमी होती :-)

बाबा योगिराज's picture

31 Jul 2015 - 8:10 pm | बाबा योगिराज

ऐन गुरुपोर्निमे च्या दिवशीच शिकवनी सुरु झाली. बेस झाल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2015 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

विडंबन लै भारी !

जुइ's picture

31 Jul 2015 - 8:26 pm | जुइ

खासचं जमलय!

J.J.'s picture

31 Jul 2015 - 8:46 pm | J.J.

छान

अजया's picture

31 Jul 2015 - 9:05 pm | अजया

खंग्री विडंबन=))

मिपावरुन आदर्श घेऊन तुम्ही खुप चांगलं काम करत आहात! मोकलाया काय, हेवनवासी काय.. खुपच पगडा आहे बुवा मिपाचा तुमच्यावर..;)

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Jul 2015 - 9:11 pm | माम्लेदारचा पन्खा

बाजीप्रभूंसारखी तलवार चालवलीत......!!

जय हो !!

उगा काहितरीच's picture

31 Jul 2015 - 9:26 pm | उगा काहितरीच

हेहेहेहे ! जबरी विडंबन !

मधुरा देशपांडे's picture

1 Aug 2015 - 1:22 am | मधुरा देशपांडे

सगळ्यांना धन्यवाद!! :)

पाटीलअमित's picture

1 Aug 2015 - 1:27 am | पाटीलअमित

लोक मूळ लेख पेक्षा remake ला महत्व देतात हे सिद्ध झाले

नाखु's picture

1 Aug 2015 - 8:14 am | नाखु

पौर्णीमेला "गुरु दक्षिणा" पोचली आणी अभ्यास-व्यासंगाबद्द्ल _/\_

गपचिप बालक नाखु

अनामिक२४१०'s picture

1 Aug 2015 - 8:29 am | अनामिक२४१०

मस्त जमलंय विडंबनात्मक …
+१

मराठिी विडंबन करुन पैसे कसे कमवावे?

टवाळ कार्टा's picture

1 Aug 2015 - 9:43 am | टवाळ कार्टा

दात कोरुन =))

प्यारे१'s picture

1 Aug 2015 - 1:06 pm | प्यारे१

>>>ठिी
कसा लिहिला तो ठ
प्रतिसादातला समतोल हाच का???? दोन्ही बाजूला वेलांटी?

नव्या मोबाईलची करामत सुरु आहे.इ उमटत नाहीये.पुसलंही जात नाहीये!
खटपट्या भौ तुमचा प्रतिसाद चुकून मिटवला गेला.साॅरी.