अमेरिकेतील काही भारतीयांचे अनुभव

Jack_Bauer's picture
Jack_Bauer in जनातलं, मनातलं
31 Jul 2015 - 12:52 am

माझ्या अमेरिकेतील अनुभवला मिपाकर मंडळीनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद .. आपल्याला माझे मागील लेख वाचायचे असतील तर ते इथे आहेत :

अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव
USA it is ...

इथे मी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी आलेले भारतीय लोकांचे अनुभव मांडत आहे :
---------------------------------------------------------------
१.
एकदा मित्राला आणायला न्यूयॉर्क विमानतळावर गेलो होतो. मित्राला रेसिव करून taxi stand वर आलो आणि एका taxi मध्ये बसलो. योगायोगानी taxi driver पंजाबी होता. त्याच्याशी हिंदी मधून गप्पा मारायला सुरवात केली. सुमारे तासाभरानी आम्ही पोहोचलो. मित्राचे घर तिसर्‍या मजल्यावर आहे (लिफ्ट नाही). आम्ही उतरल्यावर त्या सरदार driver ने स्वतःहुन bags वर आणून दिल्या. त्या बद्दल त्याला जास्तीचे पैसे देवू केले तर ते त्यानी नाकारले आणि म्हणाला "ओये अपणे भाई के वास्ते किया यार" आणि आपले कार्ड देवून निघून गेला.

२.
मी व बायको एकदा एका indian store मध्ये गेलो जे फ़क़्त पूजा सामानासाठी प्रसिद्ध आहे. त्या दुकानाचा मालक गुजराती. तिथे जवळ जवळ सर्व पूजा सामान मिळाले फ़क़्त गेजावस्त्र सोडून. आम्ही त्याला त्या बद्दल विचारलं तर त्याला गेजा वस्त्र म्हणजे काय ते माहित नव्हतं. आम्ही थोडं वर्णन केल्यावर त्यांनी लगेच त्याची डायरी काढली आणि त्यात गेजा वस्त्र अशी नोंद केली. स्वतच्या फोन वर लगेच गूगल करून ही काय वस्तू आहे ते पाहिलं आणि लगेच स्वतःचं कार्ड देऊन म्हणाला "१५ दिन के बाद फोन करो अगर उसे पहिले आता हे तो मै आपको बता दुंगा, आप अपना नंबर दो ".

३.
एका दुकानात गेलो होतो जे खास महाराष्ट्रीयन वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे. तिथे भाजणीचे पीठ, मेतकूट, कांदा लसूण ठेचा आणि बर्‍याच इतर महाराष्ट्रीयन वस्तू मिळतात. त्याचा मालक महाराष्ट्रीयन आहे. पण तिथे त्याला जे विचारू त्याचं १ किंवा २ शब्दात उत्तर आणि तेही चेहर्‍यावरची रेषही न हलू देता. जसा काही एखादा रोबो बोलत आहे. तो मराठी आहे म्हणून त्याच्याशी मराठीत बोललो तर उत्तर इंग्लिश मधून. मग मी इंग्लिश मधून बोललो तरी तेच … बहुतेक ह्याला शाळेत असताना एका शब्दात उत्तरे द्या हा खूप भाग आवडता होता की काय असं वाटून गेलं.
उदा: तुमच्याकडे भाजणीच्या चकल्या आहेत का ? उत्तर :- by order only.
I need to place the order. उत्तर:- उत्तर म्हणून त्याने त्याचे कार्ड दिले ज्यावर लिहिले होते to order send email to xxxxx@xxx.com आणी त्या इमेल वर बोट ठेवून ते tap केल. तोंडातून काहीही उत्तर नाही.
--------------------------------------------------------

तीन माणसे, तीनही भारतीय पण गिऱ्हाइकाशी वागायची पद्धत ही त्यांच्या मानसिकतेबद्दल बरच सांगून जाते. पहिल्या दोघांना माझाकडून repeat business आणि तिसर्‍याला bad mouth publicity मिळाली ह्यात आश्चर्य ते काय ?

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

31 Jul 2015 - 1:16 am | पद्मावति

मस्तं लिहिलय.
गुजराती दुकानदाराचा अनुभव फारच छान. अतिशय मेहेनती लोक. चोख सर्विस.
बाकी मराठी दुकानाचा अनुभव...मला थोडंफार लक्षात आलंय कुठलं स्टोर म्हणताय ते.

पहिल्या दोघांना माझाकडून repeat business आणि तिसर्याला bad mouth publicity मिळाली ह्यात आश्चर्य ते काय ?

...खूप छान लिहिलय.

रेवती's picture

31 Jul 2015 - 1:57 am | रेवती

हम्म......महाराष्ट्रीय माणसाचे दुकान आहे हीच बातमी आहे.
आमच्याकडे गुज्जूभायाही असेच वागतात. चेहर्‍यावरील रेष हलत नाही. तुम्ही दुसरीकडे कोठे जाणार? आजकाल बरीच भारतीय दुकाने झालीत तरी तुम्हा न्यू जर्सीकरांशी कंपिट नाही करू शकत आम्ही! ;)
तेलुगु लोकांचीही दुकाने आहेत. तेही तसेच! इथल्या इथे थोडी कांपिटिसन आल्यामुळे आजकाल रेष नाही पण माशी हलते चेहर्‍यावरची! यांना आणखी वाईट दिवस येण्याचे कारण म्हणजे हामेरिकन ग्रो स्टो वाल्यांनी कढीपत्ता, आपल्या टैपच्या मिरच्या, केळफूल, डायकॉन, छोटी वांगी विकायला सुरुवात केल्याने फक्त शिळ्या मेथीसाठी, दोडक्या, पडवळासाठी भारतीय दुकानात नाही गेले तरी चालते. जेंव्हा कधी पंध्रा दिवसातून जाईन तेंव्हा बरी दिसणारी भाजी आणली तरी चालते. शिवाय हामेरिकन ग्रो स्टो वाले आपल्या तक्रारीची दखलही घेतात. त्यांना या नव्या भाज्या विकायला शिकायचे असते. आपण हळूहळू इथल्या भाज्या आपल्या पद्धतीने बनवून खायला शिकलो की खूप सोपे होते.

Jack_Bauer's picture

31 Jul 2015 - 4:50 am | Jack_Bauer

अगदी बरोबर आहे आपलं, मी तर बर्याचवेळा expire झाला माल ठेवलेला पाहिलेलं आहे. ह्या बाबतीत अमेरिकन दुकानदार अगदी दक्ष असतात.

पगला गजोधर's picture

31 Jul 2015 - 9:19 am | पगला गजोधर

सहमत… वॉंलमार्टमधे सुद्धा जास्त फ्रेश माल मिळायचा, मी फक्त कढीपत्ता, कोथंबीर, शेवगा साठी जायचो फक्त…. आणि हो मँगी-मसाला साठी फक्त.

"मी तर बर्याचवेळा expire झाला माल ठेवलेला पाहिलेलं आहे"

आमच्या येथे एका दुकनदाराने तर expire झालेला माल दाखवून दिल्यानंतरही बदलला नाही. जाणे सोडले.

विद्यार्थी's picture

31 Jul 2015 - 2:16 am | विद्यार्थी

मराठी माणसाच्या दुकानातील सगळ्यात तुच्छ आणि दुर्लक्षित गोष्ट म्हणजे ग्राहक (असे पु.ल. म्हणतात). "आमची कोठेही शाखा नाही" हे दुकानात अभिमानाने लावणारे आणि दुपारी १ ते ५ दुकान बंद ठेवणारे मूर्खही मराठीच.

दुकान जणू ग्राहकांवर उपकार करण्यासाठीच उघडले आहे अश्या अविर्भावात वागणारे आणि इतर राज्यांमधून लोक महाराष्ट्रात येउन मराठी माणसांवर अन्याय करतात अशी उलटी तक्रार करणारेही मराठीच.

महाराष्ट्रातच काय पण अमेरिकेमध्ये जाऊनही आम्ही बदलणार नाही हे दाखवणारेही मराठीच.

अतिशय अंतर्मुख करणारा लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.

स्पंदना's picture

31 Jul 2015 - 4:34 am | स्पंदना

ओ हात नका लावु तेथे ऑरडरचा आहे फराळ

सिंगापूरचे यतिन दातार असे खेकसतात. अरे? ऑर्डरचे आहे मग आत ठेव येथे पसरुन कशाला ठवलेस?
दुकानात हा माणुस फक्त आणि फक्त माणसांचा अपमान करायला मिळावा म्हणुन बसतो अशी मला जाम शंका आहे. वर आणि हॉटेल उघडलय!! तेथेतर काय विचारुअच नका. बाकी आख्ख्या सिंगापुरात हाफ चिकन म्हण्जे सरळ सरळ हाफ चिकन असताना हा मात्र दोन एव्हधुशे पिस ठेवतो प्लेटीत.
मरु दे तो मराठी दुकानदार अन स्वाभिमान. मी वेस्टर्न खाईन.

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2015 - 10:07 am | प्रभाकर पेठकर

यतिन दातार? पुन्हा भेटाल तेंव्हा (आणि भेटलात तर) ते आधी मस्कतला होते का विचारा. तेंव्हा इथे ते मस्कतमध्ये नोकरीत होते. पुढे सिंगापुरला जाऊन व्यवसायात उतरले. माझे नांव सांगून पाहा. आठवत असेल त्यांना तर मैत्री होऊ शकेल आणि चांगली वागणूकीची अपेक्षा ठेवता येईल. (खात्री नाही). इथे असे पर्यंत (निदान माझ्याशी तरी) चांगले होते.

पप्पुपेजर's picture

12 Aug 2015 - 7:21 pm | पप्पुपेजर

mala kadhi asa anubhav ala nahi ulat amhi jevnha pan jato tevnha khup changla interaction hote. May be tumhala one of anubhav ala asel. Ani please tyanche nav mention karu naka patat asel tar pratisad sampadit karn ghya.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Aug 2015 - 7:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दातार अति वैतागल्याशिवाय खेकसत नैत हो. कोणीतरी आधी काडी सारली असणार आणि खेकसा तुम्हाला बसला असणार. दातार मंडळी अतिशय प्रेमळ हो हाडाची. (अन्या दातरु आहेस कुठे??)

-दातारांचा अनिरुद्ध-

अरुण मनोहर's picture

19 Aug 2015 - 8:21 am | अरुण मनोहर

अपमान - मान ह्यांचे गणित असे आहे की मान द्या - मान मिळवा. अपमान करा- अपमान मिळवा
------ बी अवेअर
कोणाचेही नाव घेऊन चव्हाट्यावर ओरड्ण्याआधी विचार करा- तुम्ही पुर्ण स्टोरी सांगितली आहे कां?
अर्धसत्य आणि विकृत सत्यं सांगून चिखलफेक करणे खूप सोपे असते.

vikramaditya's picture

31 Jul 2015 - 8:06 am | vikramaditya

Q. Why a maharashtrian runs his own business?

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2015 - 10:09 am | प्रभाकर पेठकर

Must observe successful business person/community and improve themselves.

श्रीरंग_जोशी's picture

31 Jul 2015 - 9:36 am | श्रीरंग_जोशी

निरीक्षणे आवडली.

माझ्या आजवरच्या अनुभवानुसार मला सगळीकडे सगळ्या प्रकारची माणसे भेटली. त्यामुळे एकदम सरसकटीकरण करावेसे वाटत नाही. अमेरिकेत मराठी माणसाच्या दुकानात खरेदी करण्याची संधी आजवर भेटली नाही.

आमच्या शहरातले सर्वात मोठे भारतीय वाणसामानाचे जे दुकान आहे तिथे नाशिकचे एक मराठी गृहस्थ काम करतात. कदाचित ते दुकानमालकांचे (गुजराती कुटुंब) भागीदार असू शकतात. हे दुकान घरापासून लांब असल्याने आम्ही वर्षातून दोनतीनदाच जातो. दर वेळी आम्हाला स्वतःहून केप्रचे उपवासाच्या भाजणीचे पीठ काही सापडत नाही. मग काउंटरवर जाऊन या गृहस्थांना मदत मागतो. त्या पीठाची जागा दर वेळी बदललेली असते ;-) .

बाकी आमच्या घराजवळ जे भारतीय दुकान आहे ते दिल्लीकर अग्रवाल बंधू. दोन्हीही भाऊ एकदम दिलखुलास अन गप्पिष्ट व्यक्तिमत्वे आहेत. खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांच्या व आपल्या आवडीत बरेच साम्य असल्याने नवे काही आले असले की ते स्वतःहून सुचवतात अन आम्हाला ते आवडतेही. घराजवळ इतरही दक्षिण भारतीयांची दुकाने आहेत पण स्वतःहून तिकडे पावले वळत नाहीत.

हेमंत लाटकर's picture

31 Jul 2015 - 10:14 am | हेमंत लाटकर

महाराष्ट्रियन मराठी माणसाला एवढा कशाचा इगो आहे कळत नाही. आपण फक्त परप्रांतिय व मराठीपणाचा आटापिटा करत बसतो. एखादा पुढे जाउ लागला की त्याचे पाय खेचण्यात वाकबगार. आता मराठी माणसाला उद्योग धंद्यात पडावे लागणार आहे. त्यासाठी गुजराती लोकांकडून उद्योग धंद्याचे बाळकडू शिकावे लागेल.

विवेकपटाईत's picture

31 Jul 2015 - 10:15 am | विवेकपटाईत

कुठे हि गेलो तरी आम्ही आपुला प्रिय मराठी बाणा सोडत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

31 Jul 2015 - 10:15 am | प्रभाकर पेठकर

एक दोन प्रसंगांवरून/व्यक्तींवरून मत बनवू नये ही विनंती.

मुळात मराठी उद्योजक अल्पसंतुष्ट असतात (त्यातून ही व्यवसायिक उदासिनता येत असावी) आणि त्यांना घरी जाऊन आपल्या कुटुंबात वेळ घालविणे जास्त आवडत असते असे वाटते. पुण्यात मराठी दुकानदार (मराठी लोकसंख्येमुळे) जास्त दिसतात. पण कस्टमर फ्रेंडली कमीच. मराठी माणसाने स्वतःच्या स्वभावात कांही बदल केले तर तोही व्यवसायात पुढे जाऊ शकतो.

स्रुजा's picture

31 Jul 2015 - 10:33 am | स्रुजा

एक दोन प्रसंगांवरून/व्यक्तींवरून मत बनवू नये ही विनंती.

पेठकर काकांसारखंच म्हणते.

कस्टमर फ्रेंडली एकुण च कुठलेच दुकानदार भारतात फारसे नसतात. मेहनती असतात, धंदा वाढवण्यासाठी शक्य असेल ते उपाय करुन ते तुमची सोय करुन दिल्याचा आभास करतात. हा त्यांचा व्यवहार चतुर स्वभाव म्हणता येईल, ग्राहक धार्जिणा स्वभाव नाही. तसं असतं तर १० पैकी ९ वेळा माल तपासून बघायची, वजन समोर करुन घेण्याची आपली ही मानसिकता झाली नसती.

व्यक्तिश: मला मराठी दुकानदारांचा कधीच वाईट अनुभव आला नाही. भारतात तर नाहीच आणि कॅनडा मधे पण नाही. भारतामध्ये मी एक किलो तांदुळ सांगताना "प्लीज" म्हणत नाही तसं ते ही मला गेल्या गेल्या कशा आहात विचारत नाही. हा कल्चरल भाग आहे. पण मला लागेल ती मदत मात्र त्या दुकानात मिळते , सण वार असतील तर इकडच्या तिकडच्या गप्पा पण होतात. मी नेहमीच्या ग्राहकांपैकी असेन आणि बरोबर आई किंवा नवरा पहिल्यांदा आले तर आज साहेब आले का, किंवा आज आईंना आणलंत का, अरे वा! अशी दखल पण घेतात. मराठी दुकानदारांच्या या वरच्या गोष्टी त्यामुळे क्लीशे वाटतात मला.

मराठी चांगले अनुभव आहेत तसे अमराठी वाईट ही आहेत.

इकडे पण एक च मराठी दुकान आहे, ते काका काकु दादरचे आहेत आणि वागा-बोलायला मिठास आहेत.आणि इकडच्या पद्धतीप्रमाणे कसे आहात वगैरे नेमाने विचारतात कारण इकडचे ते कल्चर आहे. हे कल्चर जर दुकानदारांनी अंगिकारलं नाही तर जेवणातल्या खड्यासारखं टोचतं. अगदी बस मध्ये समोर येणार्‍या माणसाला बघुन न हसणे किंवा ड्रायव्हर ला थँक्य न म्हणता उतरणे या गोष्टी आता मला उद्धट वाटतील. आधी माझ्या त्या गावी ही नव्हत्या. त्यामुळे या सगळ्या इतर प्रतिसादांमधल्या उदाहरणात काळानुरुप न बदललेले लोकं आहेत, मराठी असणं वगैरे फक्त योगायोग.

एक दोन प्रसंगांवरून/व्यक्तींवरून मत बनवू नये

अगदी सहमत पेठकर काका . काही अमेरिकन दुकानदार देखील मागच्या जन्मी सदाशिव पेठेतील दुकानदार असल्याप्रमाणे वागतातच की. आणी या उलट एक मराठी स्त्री आहे जी दिवाळीच्या फराळाचा बिसनेस चालवते , कामगार सर्व mexican आहेत आणी त्यांच्याशी ती अस्खलित spanish मधून बोलते आणी गिर्हैकाशी मराठी / हिंदी मधून. छान आणी चविष्ट असतात सर्व पदार्थ तिथले .

रेवती's picture

1 Aug 2015 - 1:47 am | रेवती

अगदी सहमत. हामेरिकन दुकानदारही स. पे. मधून आल्यासारखे वागतात कधीकधी.

नाखु's picture

1 Aug 2015 - 8:58 am | नाखु

दुकानदाराने ग्राहकाशी तुसडी-हाडहाड वागणूकीसाठी अमेरिकेत जावे लागले नाही ( आणि सध्या तरी जायला मिळेल असे वाटत नाही हा वास्तव भाग) पण त्याचा सम्रुद्ध अनुभव "पातंजली उत्पादन विक्री केंद्रा" त आला आणि धन्य झालो. तिसर्याच भेटीत मुलाने (वय १३) शेरा दिला "बाबा इथे नको घ्यायला दुसरीकडून घेऊ जास्त उप्कार केल्यासारखेच बोलणे आहे, या दुकानदाराचे"

आता वय १३ ले जे समजते ते त्या इसमास कळू नये ? आता बर्यापैकी विक्री केंद्रे उघडल्यामुळे आमचे काहीही अडत नाही ( पण त्याने काय्मस्वरूपी एक नियमीत ग्राहक गमावला हे खरे)

बाकी सरसकटीकरण करण्यास तीव्र आक्षेप कारन काही अन्मोल अनुभव आहेत्च गाठीशी बिगर मराठींचे !!

भागो जागो ग्राहक जागो वाला नाखु

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2015 - 11:55 am | प्रभाकर पेठकर

नादखुळा साहेब,

>>>>( पण त्याने काय्मस्वरूपी एक नियमीत ग्राहक गमावला हे खरे)

हे फक्त एक ग्राहक गमविण्याइतकं सिमित नसतं. असा ग्राहक इतर १०० संबंधितांना आपला अनुभव सांगत असतो. असा अनुभव अजून कोणाला आला आहे का (समदु:खी) हे शोधून आपले दु:ख कमी करण्यासाठी, त्या दुकानदाराचे नांव खराब करून सूड उगविण्यासाठी किंवा नुसतेच दुकान आणि योग्य सेवेबद्दल आपण किती चोखंदळ आहोत हे दाखविण्यासाठी तो प्रत्येकाला त्या प्रसंगाचे तिखटमिठ लावून वर्णन करीत असतो. ती शंभर माणसे ह्या घटनेला त्यांच्या ओळखित पसरवितात आणि कर्णोपकर्णी दुष्किर्ती पसरत जाते. त्यामुळे 'नाराज' गिर्‍हाईकाला वेळीच चांगली सेवा देणे, त्याची तक्रारनिवारण करणे हेच व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशिर असते. Otherwise, bad word spreads very very fast.
तुमचा अनुभव वाचून मी आमच्या एका कॉमन मित्राला सांगितला (पाहा, असे पसरत जाते) तेंव्हा, 'तो, यतिन दातार, आहेच असा तुसडा' असा अभिप्राय त्याने दिला. असो. आता त्यांची दुकाने ऑस्ट्रेलियातही सुरु होत आहेत (किंवा ऑलरेडी सुरु झाली असतील).

वॉल्टर व्हाईट's picture

12 Aug 2015 - 2:48 am | वॉल्टर व्हाईट

बाकी आणि या प्रतिसादात मांडलेली मते जरी बहुतांशी खरी असली तरी काही लोक शिस्ताप्रीयतेमुळे किंवा तत्वनिक्ष्ठतेमुळे उगाच बदनाम होतात. भारतीय लोकांत माईंडिंग वन्स ओंन बिझनेस ची वृत्ती अभावानेच आढळते, मग नसत्या क्षुल्लक कारणाने लोक चांगल्याहि लोकांची उगाच बदनामी करत सुटतात. आता हे वर उल्लेखलेले गृहस्थ इतकेच तुसडे वैगेरे आहेत तर ते त्यांच्या व्यवसायात इतकी प्रगती कशी करत आहेत असा प्रश्न येतोच.

प्रतिसादाचे तात्पर्य एवढेच की रिव्यू नेहमी 'take it with grain of salt' तत्वाला अनुसरून घ्यावेत.

समीरसूर's picture

11 Aug 2015 - 11:58 am | समीरसूर

हाहाहाहा...मस्त लिहिले आहे. मी लिहिलेल्या लेखाची आठवण झाली. माझा अनुभव काही फारसा वेगळा नव्हता. मराठी माणूस 'मोडेल पण वाकणार नाही' जातीचा असतो ना!! मग त्या बाण्याला जागले पाहिजेच. मला एअरपोर्टवर भेटलेलं मराठी कुटुंब धडधडीत मराठी होतं. मी मराठीमध्ये त्या इसमाला प्रश्न विचारला तर साला भुक्कड इंग्रजीमध्ये उत्तर देतो. दोन्ही-तिन्ही प्रश्नांना त्याने इंग्रजीत उत्तरे दिली. तीदेखील अशी दिली की "हा काय मागासलेला मराठी माणूस मला मराठीत प्रश्न विचारतोय. युसलेस! हाऊ ब्याकवर्ड! इन अ युनायटेड फ़्लाईट, इजण्ट इट इन्सल्टिंग टू स्पीक इन मराठी?"....आणि त्याने माझ्याकडे चक्क दुर्लक्ष केलं. :-) अशा लोकांच्या कानाखाली जाळ काढला पाहिजे.

सरसकटीकरण करू नये वगैरे ठीक आहे पण मराठी जनतेचे असेच अनुभव खूप जास्त येतात/आलेले आहेत. हा मराठी स्वभावविशेष आहे.

एका सोफा दुरुस्त करणार्या मराठी माणसाला ३-४ वेळा फोन केला. आता येतो, संध्याकाळी येतो म्हणून हा मराठी कणा जागचा हललाच नाही. राजस्थानी कारागिराला बोलावले तर ३० मिनिटात घरी हजार! मराठी माणसांचॆ (अस्मादिक धरून) खूप प्रोब्लेम आहेत हे नक्की. काल राज ठाकरे ओरडत होते. मराठी माणसाला रोजगार द्या. अरे मराठी माणसाच्या अटी किती असतात? हे नको, असं नको, इतक्या सुट्या पाहिजे, काम सातच तास करणार, टर्रेबाजी करणार....उत्तरेतले लोक जबरदस्त मेहनत करतात. आणि म्हणून ते काम मिळवतात, जम बसवतात, स्वत:चे प्रस्थ निर्माण करतात...

लेख सुरेख. अगदी नेमका. प्रामाणिक. खुसखुशीत. अजून येऊ द्या.

मास्टरमाईन्ड's picture

12 Aug 2015 - 2:29 pm | मास्टरमाईन्ड

मराठी माणूस बर्‍याच वेळेस तुफान अटी घालतो.

हे नको, असं नको, इतक्या सुट्या पाहिजे, काम सातच तास करणार, टर्रेबाजी करणार.

हे तर ११०% खरंय.
खूप अवघड आहे १००% मराठी employee घेऊन छोटी कंपनी चालवणं

बाबा योगिराज's picture

12 Aug 2015 - 3:47 pm | बाबा योगिराज

अरे मराठी माणसाच्या अटी किती असतात? हे नको, असं नको, इतक्या सुट्या पाहिजे, काम सातच तास करणार, टर्रेबाजी करणार

एकदम खर आहे समीर भाउ. आजकालच्या पोरांच्या अश्या वृत्ती मुळे आज काल कामाला पोर पण मिळत नाहीत.

फेरफटका's picture

13 Aug 2015 - 8:05 pm | फेरफटका

"मराठी माणसाला रोजगार द्या" - असं मागून मिळणार आहे का / मिळावा का? स्किल आणी मेहनतीने मिळवावं जे आहे ते.

Jack_Bauer's picture

19 Aug 2015 - 12:12 am | Jack_Bauer

समीरसूर धन्यवाद. मिपाकरांचा असा प्रतिसाद माझ्या सारख्या नवीन लेखकांना आणखी लिखाण करण्यास उद्युक्त करतो

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2015 - 6:32 pm | प्रसाद गोडबोले

खतरनाक ! तिन्ही लेख एका दमात वाचले !

मीपण मीपण लिहिणार माझे अणुभव हमेरिकेतले !!

गावडे सरांनाही त्यांचे अणुभव लिहायची विनंती करतो अता =))

Jack_Bauer's picture

19 Aug 2015 - 12:14 am | Jack_Bauer

धन्यवाद प्रगो. आपल्याला माझे लेख आवडले हे वाचून बरे वाटले. आपले अमेरिकेतील अनुभव वाचण्यास उत्सुक आहे.