याकुबचा फार्स(स)

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in काथ्याकूट
30 Jul 2015 - 5:06 pm
गाभा: 

(मिपा वर पहिल्यांदाच लिहिले आहे. अगदी राहवत नाही म्हणून मन मोकळे करावे वाटले. चुकलं-माकलं क्षमा असावी.)

माझ्या आजोबांच्या तोंडी एक वाक्य सतत येऊ लागल होत, "भारत आचारटांचा देश झालाय." हल्ली हे पदोपदी पटायला लागल आहे.
आज 'अब्दुल कलाम' यांचा दफनविधी, त्या महामानवाच स्मरण करायचं तर आपण भारतीय याकुबचा दफनविधी कसा होईल याची अपडेटस पाहतोय.
याकुबला फाशी झाली. मानवतावादी दृष्टीकोनातून बरोबर कि चूक हे मला कळत नाही. पण एवढ मात्र कळतंय कि आपण न्यायालयाचा आदर केला पाहिजे आणि त्या निष्पाप जीवांचा आणि त्यांच्या मागे राहिलेल्या जीवालागांचा विचार करायला हवा.
याकुबच्या फाशीकडे हिंदू विरोधी मुस्लिम असे बघितले जातेय. किती चूक आहे हे. मिडिया आणि काही नेते मंडळी सतत त्यावर चर्चा करून त्याच उदात्तीकरण करत आहेत. उद्या 'शूट अट लोखंडवाला किंवा वडाला' असे गुंडांचे पिक्चर आले तसा यावरही तयार होईल. आणि आपण डोळे पुसत पुसत त्याच्या बायकोला दुवा देत तो पिक्चरहि पाहू.
याकुबला फाशी देणार अस जाहीर झाल्याबरोबर सगळ्या मिडीयाला उत आला. नेतेमंडळी राजकारण करू लागले. मानवतावादी आसवे गाळू लागले. आणि आपण सगळे निमूट पाहत होतो, किंव्हा आपल्याला ते पाहावेच लागत होते. क्रिकेट आणि सासू-सून मालिकेतून बाहेर पडून काहींनी रुचीपालटहि केला असेल.
याकुबला फाशी देण्याचा चौथरा बांधण्यासाठी २२ लाख रुपये खर्च झाला. (आमच्या भागात एवढ्यात एक छोटा flat येईल.) त्याचा दोर म्हणे खास बिहारहून मागवला. फाशी कशी द्यावी याची रंगीत तालीम करण्यात आली. अस नि तस. काल खरतर कलाम यांच्या आठवणी ऐकण्यासाठी टीवी लावला होता पण अश्या फालतू बातम्या ऐकून बंद करून टाकला. या फाशीला सरकारने व्ही.आय.पी. फाशी बनवलं, मिडीयाने जगासमोर ठेवून भारताचा आचरटपणा जगासमोर आणला.
आणखी एक खटकलेली गोष्ट, याकुब दोषी होता मान्य, त्याला शिक्षा होणे गरजेच होत. पण म्हणून निर्ढावलेल्या मिडीयाने याकुबच्या भावाला त्याच्या फाशी आधी 'तुम्हाला कस वाटतंय?' हे विचारणे योग्य आहे का?
याकुबच्या फाशीची सगळी प्रक्रिया गुप्त का झाली नाही? का हा विषय चघळून चघळून बोथट केला? का विषयाचं गांभीर्य कमी केल? का याकुबला हिरो बनवलं? का या घटनेला हिंदू-मुसलीम रंग दिला जातोय? का?

प्रतिक्रिया

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 5:47 pm | पाटीलअमित

मी ह्याच अनुषंगाने एक धागा टाकलाय ,२ दिवसा आधी पण टाकला होता पण मजकूर कमी होता म्हणून काढण्यात आला
उगाच गैरसमज नकोत म्हणून ...

कृपया http://www.misalpav.com/node/३२२०१

रावणाचे उदाती कारण

ह्याची पण नोंद घ्यावी

dadadarekar's picture

30 Jul 2015 - 5:50 pm | dadadarekar

असु द्या हो.

आता गुजरत दंग्यातील बज्रंगी वगैरेना मोदीसाहेब फाशी देतील तेंव्हा मेडिया त्यानाही हिरो करेल.

आता त्यांचे दिवस आहेत. उद्या ह्यांचे येतील.

पाटीलअमित's picture

30 Jul 2015 - 5:53 pm | पाटीलअमित

खरे हिरो मात्र उपेक्षित

तुम नहि सुधरोगे.. साला सुअर आखिर * खाकर हि रहेगा :- ओमपुरी (कुरुक्षेत्र)

कोणी जर कुठल्या च्यानेलाने कित्ती बेजबाबदार पणे आणि आचरटपणे या विषयासंबंधी बातम्या दाखवल्या याची माहिती उपलब्ध केली तर आपण सगळे मिळुन त्याच्यनेलावर बहिष्कार टाकु शकतो.

माझ्या एकटाकडुन काय होणार असा विचार करुन चालणार नाही. सुरुवात तर करु या.

जे कोणते च्यानेल निवड होईल ते च्यानेल आपण काही दिवस ( बहिष्कार उठेवपर्यंत ) लावायचे नाही. अगदी त्यावर आपला एखादा आवड्ता कार्यक्रम असला तरीही.

जेंव्हा प्रेक्षकसंख्या कमी होईल आणि जाहिराती कमी होतील तेंव्हा त्यांनाकळेय्ल.

हे कदाचित अवघड आहे. पण एक प्रयोग म्ह्णुन करायला हरकत नाही.

पूर्वाविवेक's picture

7 Aug 2015 - 12:31 pm | पूर्वाविवेक

अगदि बरोबर ! मनातल

प्यारे१'s picture

30 Jul 2015 - 6:01 pm | प्यारे१

नवा धागा काढून आपण देखील वाढीव 'फुटेज' दिलं आणि आम्ही प्रतिसाद देऊन त्यात आणखी 4-6 इंच वाढवले.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jul 2015 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा

आरारारारा! जौद्ये की आता ..

त्ये एकदा ग्येलं की फासावर

होबासराव's picture

30 Jul 2015 - 6:20 pm | होबासराव

पण हि पिलावळ आहेत ना.. "आता त्यांचे दिवस आहेत. उद्या ह्यांचे येतील."
घाटावर ह्याचे दिवस करावे लागणार आहेत बहुधा

dadadarekar's picture

30 Jul 2015 - 6:28 pm | dadadarekar

काय चुकले त्यात ?

आज हा गेला.

उद्या बज्रंगी , कोदलाणीन बाई पण जातीलच ना ?

प्रसाद गोडबोले's picture

30 Jul 2015 - 6:35 pm | प्रसाद गोडबोले

झालं ... संपलं ... गेला याकुब ! जन्नत मधे ७२ व्हर्जिन्स मधे खुष असेल तो !

मिपावर जातीवादी आणि व्यक्तिद्वेषी एकांगी आणि प्रचारकी वादविवाद बंद करा .

आता बस्स करा . वातावरण निवळु द्या !

पूर्वाविवेक's picture

31 Jul 2015 - 11:49 am | पूर्वाविवेक

माझा रोख व्यक्तिद्वेषी नाही आणि जातीयवादी किंवा धार्मिक तर अजिबातच नाही. प्रसार माध्यम, नेते मंडळी वै. लोकांनी जो तमाशा केला त्याबद्दल होता.

आणी प्रसार माध्यमे यांची खालवलेली पातळी आणी अभिरुची बघून मनाला यातना होतात. हीच पिढी पुढच्या पिढ्यांना जन्म देणारी आहे आणी मग काय फलनिष्पत्ती होइल याची कल्पना पण करवत नाही!

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 12:12 pm | टवाळ कार्टा

+११११११११११११११११

ध्रुवीकरणासाठी !!

यामुळे होणारी मतांची बेरीज वजाबाकी बिहार च्या इलेक्शन मध्ये फायदेशीर होणार आहे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Jul 2015 - 5:55 pm | निनाद मुक्काम प...

सरकारने याकुब ला फाशी देण्याच्या पूर्वी बचावाचे कायदेशीर हक्क प्रपात व्हावे म्हणून त्यास योग्य संधी देण्यासाठी फाशीची शिक्षा आधीच जाहीर केली
आता गुपचूप कसाब व अफजल गुरु सारखी फाशी दिली तर बोंबा बोंब मग सांगून कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत
फाशी दिली तरी बोंबा बोंब
सरकारने कोर्टाचे आदेश पाळले ,सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून भडकाऊ वक्तव्ये किंव मतांचे राजकारणासाठी एखाद्या धर्मावर बोलणे किंवा विचारजंतांच्या तीव तीव किंवा मुलाखतीला प्रती उत्तरे देऊन वादंग माजवायचे टाळले ह्या बद्दल त्यांचे अभिनंदन
आता प्रसार माध्यमांनी देशातील सारे महत्त्वाचे विषय सोडून याकुब एके याकुब असा तमाशा सुर्रू ठेवला अनेक विचार जंत आपली गरळ ओकत होते ,
मुंबई मधील मुसलमान याकुब विषयी सहानुभूती बाळगून आहेत म्हणून मतांच्या राजकारणासाठी अबू व ओविसी ह्यांच्यात रस्सी खेस सुरु झाली
ह्यात भाजप सरकारचा की दोष
प्रसार माध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी कडक कायदे बनविण्याची गरज आहे.

असे धागे वाचले की ,मला माज्या जरनल नालेज ची कीव वाटते.
22 लाखाचा चौथारा...
ह हपुवा..

पूर्वाविवेक's picture

31 Jul 2015 - 7:17 pm | पूर्वाविवेक

हे माझे जी.के. नाही. मी हे माझ्या कानांनी स्पष्टपणे बातम्यात ऐकल त्यादिवशी. मलाही ते ऐकून फार मोठा धक्का बसला म्हणूनच मी ते उपहासाने लिहील आहे.

तुडतुडी's picture

7 Aug 2015 - 12:10 pm | तुडतुडी

कासीम बद्दल वाचलं का काल ? केवळ मज वाटते म्हणून केलं . हिंदूंना मारायला आलो होतो . च्या आयला ह्याच्या !@##%$$&*^^&&*)(