न्याय जगाचा.

अर्धवटराव's picture
अर्धवटराव in काथ्याकूट
30 Jul 2015 - 1:58 am
गाभा: 

अत्यंत माननीय व्यक्तींच्या तेव्हढ्याच महान कृत्यंबद्दल तसलीच शिक्षा; आणि त्यावर वरताण असा महानतम काथ्याकूट मिपावर चालला आहे. नेहमीप्रमाणे डोळे पाणावलेच. वॉल्टर व्हाईट साहेबांनी फाशिची शिक्षा जगातुन हद्दपार होवो म्हणुन सद्भावना प्रकट केली. तिथेच विषय कंटुन्यु करावा असा विचार होता. पण म्हटलं शेपरेट काथ्याकूट करुया.

कायद्याचा धाक असावा, गुन्हे करताना माणसाने परिणामाचा चारदा विचार करावा... कडक शिक्षेचा असा जर हेतु असेल तर मानसशास्त्रदृष्ट्या ते एकवेळ तार्कीक वाटेल(कि त्याला पर्याय नाहि). अन्यायग्रस्त व्यक्तीला जर न्याय झाला असं वाटलं नाहि तर तो प्रतिशोध भावनेने स्वतः गुन्हेगार बनु शकतो, किंवा वैफल्यग्रस्त होऊ शकतो हे देखील शिक्षेचं कारण असावं. पण अल्टीमेटली हा समतोल साधण्याचा मार्ग नाहि. जे नुकसान झालय, ते पूर्णपणे किंवा शक्य तेव्हढं भरुन निघणं आणि परत तसं व्हायची शक्यता समाप्त करणं हे राहुनच जातं. गुन्हेगाराला जोपर्यंत आपल्या कृत्याकरता खरा पश्चात्ताप होत नाहि तोपर्यंत न्यायप्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाहि... व त्या बाबतीत शिक्षा काहि कामाची नाहि.

न्यायदान प्रक्रिया मानवी सभ्यतेच्या अगदी सुरुवातीपासुन अस्तीत्वात आहे. राजसंस्था, धर्मसंस्था, समाजव्यवस्था, इ. व इतर अनेक मार्गांने न्यायदान होत आलय. पण थोडाफार प्रायश्चित्त प्रकार आणि काहि मनुष्यविवेक या पलिकडे गुन्हेगाराच्या मानसीक परिवर्तनाकडे सर्वत्र दुर्लक्ष्य झालं. साहित्य, कला क्षेत्रात हा विषय तसा बर्‍यापैकी चर्चेला आला. किंबहुना चर्चेच्या पातळीवर सर्वच क्षेत्रांनी "गुन्हेगाराची मानसीकता बदललायला हवी" असा रम्य घोषा लावला. पण मेनस्ट्रीम न्यायव्यवस्थेत पॉलीसी लेव्हलला याला म्हणावं तितकं महत्व आलेलं दिसत नाहि. संतचरित्रात वाल्या डाकु, अंगुलीमाल वगैरे उदाहरणं शेकडो असतील पण ति आध्यात्माची किंवा महानुभावांची महती झाली. न्यायव्यवस्थेला तिथुन काहिच रेफ्रन्स मिळत नाहि. सलमान खान व तत्सम केसमधे गुन्हेगाराकडुन समाजसेवा करुन घेणे वगैरे गोष्टी ठळक बातम्या म्हणुन प्रसिद्ध झाल्या. तशी काहि उदाहरणं पण वाचायला मिळाली. पण ते तेव्हढच.

गुन्हेगाराचं मानसशास्त्र फार मोठा विषय आहे. त्याचा अगदी सखोल अभ्यास होतो. गुन्हा तपासणी आणि प्रतिबंध म्हणुन तर त्याचा फार उपयोग होतो. पण एकदा गुन्हा घडला, गुन्हेगार सापडला, गुन्हा सिद्ध झाला... आता क्लायमेक्स...इथे विवेकी डेव्हीड, अशोककुमार, उत्पल दत्त ऐवजी धरमपाजी, शोटगन सिन्हा आणि अँग्रीमॅन बच्चन साहेब अवतरात. प्रश्न असा, कि न्यायदानासारख्या अत्यंत धरमकाटेवाल्या व्यवस्थेत हि एंट्री मानवी तर्कशास्त्र, तटस्थता, मुल्यविवेक इ. मुळे होते कि अश्रुंचा हिशोब चुकवावा इतक्या स्वच्छ भावनेतुन होते? अश्रुंचा हिशोब चुकवतो म्हटलं तर गुन्हेगाराने आपल्या कृत्याच्या पश्चात्तापातुन ढाळलेले अश्रु सर्वात मौल्यवान म्हणावे लागतील. व्हिक्टीम कदाचीत त्याने समाधानी होणार देखील नाहि. शक्य तेव्हढं मटेरीअल नुकसान भरुन निघणं, गुन्हेगाराला इक्वल शारीरीक पीडा भोगताना बघण्याची इच्छा होणं वगैरे देखील स्वाभावीक आहे. पण हे सगळं गुन्हेगाराने स्वतःहुन केलं तर व्हिक्टीमला जास्त बरं वाटेल. आणि भविष्यात गुन्हा घडण्याची शक्यता थोडीतरी कमी होईल.

इतकं दळण कांडण करण्या मागचा प्रश्न इतकाच, कि गुन्हेगाराची मानसीकता बदलणं प्रॅक्टीकली अशक्य वाटत असल्यामुळे तशी तजवीज न्यायव्यवस्थेत नाहि, कि न्यायव्यवस्थेच्या मूळ सिद्धांतातच ते बसत नाहि ?? प्रॅक्टीकली अशक्य वाटत असल्यास त्या बाबतीत काहि ठोस प्रयत्नच झाले नाहि म्हणावं लागेल. आणि सिद्धांतातच बसत नसेल तर न्यायव्यवस्था मुळातच अधु म्हणावी लागेल.

झाला टैमपास आता थोडं काम करतो :) माझ्याकडुन मायबाप कंपनीलासुद्धा काहि न्याय द्यावाच लागेल ना.

प्रतिक्रिया

विद्यार्थी's picture

30 Jul 2015 - 2:44 am | विद्यार्थी

कायद्याचे काम फक्त गुन्हेगारांना शिक्षा करणे यापुरतेच मर्यादित नाही. नियमबद्ध समाजव्यवस्था निर्माण करून लोकांनी त्या समाजव्यवस्थेच्या नियमांचे पालन करून जगावे हा अजून एक उद्देशही आहे.

प्रत्येक जण गुन्हेगार नसतो आणि एखाद्या भागामध्ये गुन्हे कमी असण्याचे कारण उत्तम न्यायव्यवस्थेचे अस्तित्वही असू शकते. त्यामुळे केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा गुन्हेगाराला देण्याबरोबरच लोकांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्याचे कामही न्यायव्यवस्था करते असे मला वाटते.

अर्धवटराव's picture

30 Jul 2015 - 2:48 am | अर्धवटराव

मूळ उद्देश नियमबद्ध समाजरचनाच असावा. शिक्षा वगैरे गोष्टी काठाला लागलेलं भांडं पुन्हा प्रवाहात आणण्याचा प्रकार झाला. शुण्य गुन्हेगारी असणारा समाज देखील शंभर टक्के कायदेबद्ध असणार.

न्यायव्यवस्था कायद्याचा संदर्भ घेईल, पण कयदा म्हणजे न्याय नाहि.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jul 2015 - 2:57 am | श्रीरंग_जोशी

या विषयावर आतापर्यंतचे माझे मत असे आहे की भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये हत्येच्या अतिअपवादात्मक गुन्ह्यासाठी मृत्यूदंड दिला जातो ते योग्य आहे.

मात्र आपल्याकडची गंभीर समस्या अशी आहे की वर्षानुवर्षे मृत्यूदंड मिळालेले दोषी गुन्हेगार वाट पाहत राहतात. मृत्यूदंड ठोठावला जाऊन त्याची तारीख निश्चित नसणे हाही एक प्रकारचा मानसिक अत्याचारच आहे. केवळ दोषी व्यक्तीच नाही तर तिचे कुटुंबीयही ही अवस्था भोगत राहतात.

मृत्यूदंड देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होऊन ती वेगवान व निश्चित कालमर्यादेत पार पाडणे आवश्यक आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jul 2015 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मात्र आपल्याकडची गंभीर समस्या अशी आहे की वर्षानुवर्षे मृत्यूदंड मिळालेले दोषी गुन्हेगार वाट पाहत राहतात. मृत्यूदंड ठोठावला जाऊन त्याची तारीख निश्चित नसणे हाही एक प्रकारचा मानसिक अत्याचारच आहे. केवळ दोषी व्यक्तीच नाही तर तिचे कुटुंबीयही ही अवस्था भोगत राहतात.

हे जरी कितीही खरं असलं तरी फाशीची शिक्षा दुर्मिळात दुर्मिळ अश्या गुन्ह्यांसाठी दिली जाते. थंड डोक्याने गुन्हे करायच्या आधी त्याने हा विचार करायला हवा की नको? त्याच्या गुन्ह्यामधले बळी जाणार्‍यांचं अस्तित्व जगामधुन मिटतं. त्याच्या मागे उरलेले आयुष्यभर हकनाक शिक्षा भोगतात त्यांचं काय? ९३ च्या बाँबस्फोटामधे मरण पावलेल्या किंवा अपंगत्व येउन परावलंबी झालेल्यांना न्याय मिळायलाचं हवा होता. कारण त्यांच्यामधली कित्येक कुटुंब घरामधली कर्ती व्यक्ती गेल्यानी देशोधडीला लागलेली होती. त्यांचे हाल कुत्रा खाणार नाही अशी परिस्थिती काही कुटुंबांनी पाहिलेली आहे. त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल? काय दोष होता त्यांचा? फक्त ते चुकीच्या वेळी घातपाताच्या ठिकाणी होते हा?

मी तर म्हणतो अश्या पातळीवरच्या गुन्हेगारांना शेवटचं पाणीसुद्धा पाजायला नाही पाहिजे. शेवटची इच्छा विचारुन पुर्ण करायचं काय कारण? जे बळी गेले त्यांच्या इच्छा झाल्या का पुर्ण, निम्म्यापेक्षा जास्तं लोकांच्या पिंडाला दर्भाचा कावळा शिवायला भाग पडला असेल? अश्या मोठ्या कटकारस्थानाच्या सुत्रधारांना पकडुन भर चौकामधे हालहाल करुन मारलं पाहिजे. तरचं अशी घातपाती कृत्य करणार्‍या लोकांपर्यंत योग्य संदेश जाईल. जनतेची सहनशक्ती जेव्हा संपेल तेव्हा गंगाजल चित्रपटामधल्या रानवट गोष्टी प्रत्यक्षात आणल्या जातील. तेव्हा परित्स्थिती आटोक्यात आणायची ताकद कोणामधे असेल?

मास्टरमाईन्ड's picture

30 Jul 2015 - 12:45 pm | मास्टरमाईन्ड

गुन्हेगाराची मानसीकता बदलणं

ही प्रक्रिया बलात्कार (लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार पण यातच आले ) आणी फालतू कारणासाठी केलेला निरपराध व्यक्तीचा खून यातील गुन्हेगारांसाठी अशक्य आहे. कारण बलात्कारामुळे / बसलेला मानसिक धक्का त्यातल्या बळीला आयुष्यातून उठवतो. यातील चिमुरड्यांची अवस्था तर काय विचार करण्यापलिकडे असते.
आणी खून झालेल्या व्यक्तीचं आयुष्य अकाली संपतंच पण त्या व्यक्तीच्या जवळच्यांच्या आयुष्यावर पण वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा गुन्ह्यातल्या आरोपीला मरण हाच उपाय आहे.

फालतू कारणासाठी केलेला खून = स्वतःची शक्ती / पॉवर / भाईगिरी वगैरे दाखवण्यासाठी, वर्गणी/ खंडणी दिली नाही म्हणून, मुलीच्या / पत्नीच्या / बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारल्याबद्दल, केवळ मत्सरापोटी इ. कारणांसाठी केलेला खून.
निरपराध व्यक्तीचा - ज्या सामन्य आयुष्य जगणार्या व्यक्तीवर आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही (public personality, राजकारणी, सिनेनट वा इतर कुठल्याही प्रसिद्ध व्यक्ती सोडून.)

वरची विधानं एकदम ढोबळ आहेत. पण भावना पोचल्या असतील अशी आशा आहे.

याव्यतिरिक्त, मध्यंतरी पुण्यात एका XXXX ने ७०-८० दुचाकी जाळल्या. त्याला दोन्ही हात तोडून टाकणे हीच एक शिक्षा आहे. हात तोडल्यावरसुद्धा त्यापुढील आयुष्यात त्याला अपंगांसाठी मिळणारी कोणतीहि सवलत मिळू न देता रोज मरत जगण्यासाठी सोडणे हेच उत्तम.

वरील मते ही वैयक्तिक आहेत पण काही घटनांमधल्या पीडीत व्यक्तीची दु:खं पाहून तयार झालेली आहेत.

तुडतुडी's picture

30 Jul 2015 - 3:20 pm | तुडतुडी

हो ना . दुचाकी जाळल्या . हात तोडून टाकले पाहिजेत त्या दुचाकी जाल्नार्याचे

आनन्दा's picture

30 Jul 2015 - 6:16 pm | आनन्दा

भावना पोचल्या.. एकच गोष्ट सांगतो..
तश्या सार्‍याच न्यायव्यवस्था गुन्हेगारात सुधारणा व्हावी म्हणून केलेल्या असतात. उदा.. सक्तमजुरीची शिक्षा म्हणजे गुन्हेगाराकडून शारिरिक श्रम करून त्याच्याकडून हानीभरपाई मिळवणे, आणि त्याचवेळेस त्याला पश्चात्तापाची संधी देणे असे होते.
जेव्हा माणूस सुधारण्याची आशा कमी असते तेव्हा जन्मठेप दिली जाते.

फाशीची शिक्षा ही दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठी दिली जाते, उदा. एखादा निर्ढावलेला गुन्हेगार, जो व्यावसायिकपणे गंभीर गुन्हे करतो, अश्याच माणसासाठी ही शिक्षा आहे. त्याचा वापर कसा होतो, होत नाही हा भाग वेगळा.

जाता जाता, दया याचिका ताटकळत ठेवण्याचा हा पण एक हेतू असू शकेल, की पुढच्या १० वर्षात, समजा त्या गुन्हेगाराबद्दलचे समाजाचे मत बदलले, किंवा किमान तीव्रता कमी झाली, तर कदाचित दया दाखवून त्याला अजून एक संधी देता येईल.
अगदी जवळचे उदाहरण म्हणजे, राजीव गांधींचे मारेकरी आणि याकूब मेनन.. या दोघांचे दया अर्ज जर मंजूर केले असते तर काय प्रतिक्रिया आली असती याची तुलना करा म्हणजे समजेल.

अर्धवटराव's picture

30 Jul 2015 - 7:14 pm | अर्धवटराव

पण लेखात दिलेला मुद्दा असा कि जेव्हढा खर्च आणि यंत्रणा गुन्ह्याची शिक्षा अमलात आणायला राबवली जाते त्यामानाने गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची बोच अगदी मनाच्या तळापर्यंत पोचवायला विशेष असे काय प्रयत्न केले जातात ? लहान मुलांच्या लैंगीक शोषणाचं उदाहरण घेऊया. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक माय/बाप दडलेली असते. जर पिडीत बालकाची वेदना त्या बापापर्यंत पोचली तर तो गुन्हेगार स्वतः आपलं लिंग कापुन आत्महत्या करेल ( हि जरा अतिशयोक्ती झाली. पण कायदा जी शिक्षा देईल त्यापेक्षा भयंकर शिक्षा तो स्वतःला देईल, कायद्याने दिलेली शिक्षा मनपासुन भोगेल व त्याची लिंगपिसाटता कायमची मिटेल). न्यायव्यवस्थेत शारीरीक शिक्षा द्यायला सर्व प्रोव्हीजन आहे... पण असली गुन्हा ज्या मनाने केलाय त्याला हात लावलाच जात नाहि.

मध्यंतरी किरण बेदींनी गुन्हेगारांवर विपष्यनेचे प्रयोग केले होते त्याबद्द्ल थोडंफार वाचन झालं. त्या प्रयोगात अनेक हार्डकोर गुन्हेगार अगदी ढसाढसा रडले म्हणतात. मुख्य म्हणजे अशी विपष्यना पुर्वीच केली असती तर गुन्हा घडलाच नसता असं त्यांचं मत होतं. न्यायव्यवस्थेत मनाचं असं स्थित्यंतर करायला ऑफीशिअली काहि पॉलीसी आहे काय? शिक्षा फर्मावताना मानसोपचार तज्ञांचं पॅनल वेगळी थेरपी रेकमेण्ड करतं काय ? दोन वर्ष सक्तमजुरी आणि एक वर्ष मानसोपचार असा काहि निवाडा होतो काय ? बलात्कारी, अन्न्/औषधी भेसळ करणारे, हुंडाबळीचे गुन्हेगार... उदाहरण कुठलही घ्या. प्रत्येक गुन्ह्याची बोच मनाच्या विशिष्ट अवस्थेत जर पोचली तर कुठल्याही शिक्षेपेक्षा ति जास्त परिणामकारक असणार. न्यायव्यवस्थेत त्याचं प्रोव्हीजन आहे काय हाच मुद्दा.

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 8:37 pm | वॉल्टर व्हाईट

माहितीपूर्ण प्रतिसाद. असे प्रयत्न आणि प्रयोग होत आहेत हे कौतुकास्पद आहे.

प्यारे१'s picture

30 Jul 2015 - 10:26 pm | प्यारे१

मुद्दा तुमचा रास्त आहे पण मानसशास्त्रावर आधारुन न्यायनिवाडा करण्याचा प्रयत्न होतो असं मानायला जागा आहे
एखादा गुन्हा घडताना तो भावनेच्या भरात केला गेला आहे की व्यवस्थित विचार करुन आणि आखून केला गेला आहे यावर शिक्षेची तीव्रता अवलंबून असते असं कायदा सांगतो. अर्थात कायद्याला वाकवणारे दलाल त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा वापर करुन गुन्हेगाराची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करतात.
दो आँखे बारह हाथ चित्रपटासारखे प्रयोग होतात पण ते वैयक्तिक गुह्यांबाबतच व्हावेत असं वाटतं. त्यातही लहान मुलांना त्रास देणारे, बलात्कारी अथवा जाणीवपूर्वक गुन्हा करणारे यांच्याबाबत कुठलीही क्षमाबुद्धी नकोच. सामाजिक परिणाम होणारे गुन्हे तर वेगळे निकष लावूनच अभ्यासले जावेत आणि अनुषंगानं शिक्षा योजल्या जाव्यात.

बाकी वैचारिक पातळीवर सगळे जण गुन्हेगार असतातच. एखाद्या व्यक्तीनं गुन्हा करण्या आधी तो गुन्हा मानसिक पातळीवर अनेकदा केलेला असतो. एखाद्या व्यक्तीचें नाव घेतल्या बरोबर डोक्यात उठणारी तिड़ीक गुन्हेगार म्हणून माझा तेवढाच र्हास करत असते. शारीरिक पातळीवर त्याची अभिव्यक्ती हा नंतरचा भाग झाला.

पण शिक्षा ठरवताना मानसशास्त्र अगदीच प्राथमीक अवस्थेततलं वापरतात... तिथेच मला लोचा वाटतो.

शिक्षा देताना कोर्ट वकीलांनी पाडलेल्या कीसाचा वापर करतं ना त्यामुळे हाती काही येत नसावं. तमाम सबूत आणि बयानात को मद्दे नजर ठेवण्याची हतबलता कोर्टासमोर असते. गुन्हा करणारा मुळात काही एक बेफिकिरी असल्यानं गुन्हा करतो. ही बेफिकिरी प्रामुख्यानं हरामाच्या किंवा सहज आर्थिक किंवा सत्ता हातात आल्यानं आलेली असते. साहजिकच त्याच्याकडे कायद्याचं इंटरप्रिटेशन स्वत:ला हवं तसं करणारा वकील हव्या तितक्या पैशानं खरेदी करता येतो. कोर्टाला मानसशास्त्र समजत नाही असं नाही पण समोर दिसून देखील काही करता न येणयाइतपत तटस्थता त्यांना स्वीकारावी लागते. हे मी लिनेअरली लिहीतोय. एका पाठोपाठ एक मुद्दे अशा रुपात. यात वेगवेगळे आयाम वेगवेगळ्या पातळीवर आले तर घोळ नक्की आहे.

बाकी आदर्श स्थिती मध्ये मेंदूत लोचा हा सगळ्याच गोष्टीमागचा कार्यकारणभाव किंवा अभाव असणार. त्या वेळी कुणालाच शिक्षा देता यायची नाही. रस्त्यातून जाताना 120 ची लेन पाळावी लागणार च . तिथे 120 लिहिलेलं नसलें तर 180 काय किंवा 60 काय अपघात होणार च. तो तसा होऊ नये म्हणून आधी पाटी नंतर रडार नंतर पावती हा क्रम. एकाचं पावती फ़ाडणं पाहिल्यावर मुख्यत्वे 'भयापोटी' इतरांनी तसं न करणं हे जास्त सयुक्तिक. तिथं समुपदेशन करायला जास्त वेळ न द्यावा लागावा हे देखील ओघानं आलं.

संदीप डांगे's picture

31 Jul 2015 - 5:14 pm | संदीप डांगे

तुमचा हा प्रतिसाद गुन्हेगार हे विशिष्ट वर्गातलेच असतात असा पूर्वग्रह मांडणारा वाटत आहे.

एकूणच "गुन्हा" या शब्दाला जो तो आपआपले पूर्वग्रह लावून इथे प्रतिसाद देत आहे. त्यामुळेच याकुब/कसाब च्या फाशीच्या प्रकरणात न्यायालयावर विश्वास आहे असं हिरिरीने सांगणारे एखादा अट्टल गुन्हेगार/राजकारणी पुराव्यांअभावी सूटून जातो त्यावेळेस बरोबर उलट भूमिका घेतांना त्याच न्यायालयाला शिव्या घालतांना दिसतात. कायदेशीर पद्धतीत असे पूर्वग्रह ग्राह्य धरत नाहीत.

कोर्टाला तटस्थता बाळगावी लागते कारण तेच त्याचे मूळ अधिष्ठान आहे. पूर्वग्रहदुषित वातावरणात होणारे न्यायदान हे न्यायदान नसून दंडेलशाही/हुकुमशाही आहे.

आपण स्वतःला न्यायाधिशाच्या जागी कल्पून बघा. तुम्हाला पूर्णपणे अपरिचित अशा जोडप्याची घटस्फोटाची केस समोर आली तर नक्की कोणाची बाजू योग्य आहे याचा निर्णय उपलब्ध पुराव्यांवर/कायद्यांवर विसंबून घेणार की स्वतःच्या तत्कालिन वैयक्तिक भावनेवर विसंबून घेणार? एखाद्या पादचार्‍याला कारने उडवले तर नक्की कसा निर्णय घेणार की नेहमी मोठ्या वाहनाचीच चूक असते असे म्हणत निर्णय देणार? साक्षीपुराव्यांवरच आधारून निष्पक्षपणे निर्णय द्यायचा असतो. त्यासाठी तटस्थताच योग्य आहे. साक्षी पुरावे योग्य पद्धतीने शोध घेऊन कोर्टात सादर करणे हे पोलिसयंत्रणेचे काम आहे. त्या पुराव्यांचा सोयिस्कर अर्थ लावून आपली बाजू कोर्टात मांडणे हे वकिलांचे काम. त्यावर आधारित निर्णय देणे हेच न्यायालयाचे काम. त्यापेक्षा जास्त नाही की कमीही नाही. कोर्टाचे उपलब्ध साक्षी पुराव्यांवर समाधान नाही झाले तर फारतर अधिक तपास करण्याचे आदेश पोलिसांना देऊ शकतात.

चर्चा कुठल्या केसेस ची होते ?
तशा लाखो केसेस भारतात सुरु आहेतच की.
हेमामालिनीच्या गाडीचा अपघात आणि गाडीचा अपघात. सलमान हिट एंड रन केस आणि नुसती हिट एंड रन केस यात नेमका काय फरक आहे सांगाल?

संदीप डांगे's picture

1 Aug 2015 - 1:28 pm | संदीप डांगे

मला वाटतं धागा आणि चर्चा सेलेब्रिटी क्रिमिनल केसेस बद्दल सुरू नसून साधारण गुन्हा आणि न्यायालयीन न्यायप्रक्रिया (criminal offense and justice) यावर आहे. त्यानुषंगाने मी तुमच्या प्रतिसादावर मत व्यक्त केले.

चर्चा कुठल्या केसेसची होते हे म्हटल्यापेक्षा या विशिष्ट केसेस माध्यमात/चर्चेत कोण व का आणतं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हेमामालिनी केस मधे ज्या मुलीचा जीव गेला तीच्या बापाच्या रहदारीचे नियम न पाळण्यामुळे अपघात झाला हे समोर आले, किती माध्यमांनी यावर चर्चा केली? ते सोडून हेमामालिनीने त्या मुलीला सोबत इस्पितळात का नेले नाही यावरच सगळे काथ्याकूट करत होते. सलमान खान केस एक साधारण नेहमीचा अपघात आहे, तिथे सलमान असल्याने व त्याने अपघात केल्याने त्याला जास्त फुटेज मिळतं. मागे वेगवेगळ्या घटनांमधे सेलेब्रिटींच्या गाडींचे अपघात झाले ज्यात त्यांची काहीच चूक नसून उलट त्यांनी अपघातग्रस्तांना मदतच केली. त्या घटनांना माध्यमांनी सोयिस्करपणे दुर्लक्षीत केले. या केसेसची चर्चा का होत नसावी?

माध्यमांचा कल लोकप्रिय विषयवस्तू चघळण्याकडे असतो. 'गरिबांचे/सामान्यांचे नेहमीच शोषण होते, श्रीमंत/सत्ताधारी नेहमीच माज/गुन्हे करतात' ह्या लोकप्रिय गृहितकावर माध्यमांचा बाजार चालत असतो. त्यांच्या वागणूकीवरून न्यायालयीन कामकाजाचा अंदाज लावणे योग्य नाही. न्यायालयाने लोकभावनेवर न विसंबता तटस्थपणे न्यायदान करणेच समाजहिताचे आहे. तो सेलेब्रिटी आहे म्हणजे त्याने गुन्हा केलेलाच आहे अशी ठाम भूमिका घेणे जनतेला गोड वाटत असेल पण न्यायालयाला तसे करून चालणार नाही. कारण कधी कधी सेलेब्रिटी असला तरी कोणी त्याला अडकवण्यासाठीही सापळा रचलेला असू शकतो. अशा असंख्य शक्यतांचे निराकरण करणे हेच न्यायालयाचे काम आहे. ज्यात निर्दोषास शिक्षा होऊ नये हा उदात्त हेतू असतो. (न्यायदानाचे तत्त्वः शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोषास शि़क्षा होऊ नये. हे तत्त्व वादग्रस्त आहे.)

प्यारे१'s picture

1 Aug 2015 - 2:50 pm | प्यारे१

>>>> कोर्टाला मानसशास्त्र समजत नाही असं नाही पण समोर दिसून देखील काही करता न येणयाइतपत तटस्थता त्यांना स्वीकारावी लागते. हे मी लिनेअरली लिहीतोय. एका पाठोपाठ एक मुद्दे अशा रुपात. यात वेगवेगळे आयाम वेगवेगळ्या पातळीवर आले तर घोळ नक्की आहे.

हा माझा मुळ प्रतिसादातला काही भाग आहे.

बाकी मुद्द्यांशी सहमत आहेच.

संदीप डांगे's picture

1 Aug 2015 - 4:01 pm | संदीप डांगे

ते वाक्य वाचले होते. :-)

विकास's picture

31 Jul 2015 - 2:40 am | विकास

मानसीक स्थिती वाईट असणे - अर्थात इन्सॅनिटी चे कारण ठरून कोर्ट शिक्षा कमी करू शकते. याचे एक उदाहरण म्हणजे ६०च्या दशकातला रामन राघव. त्याने रस्त्यावरील जवळपास ३५ लोकांना मारले. शेवटी तो जेंव्हा मिळाला तेंव्हा बोलायला तयार नव्हता. मग त्याच्या हट्टाप्रमाणे त्याला चिकन खायला घातली आणि तो घडाघडा बोलला... नंतर कोर्टात केस चालू असताना लक्षात आले की तो मनोरुग्ण असून त्याला काही कळत नव्हते. अर्थात तो येरवड्याला खितपत पडला आणि शेवटी ससून रुग्णालयात ९०च्या दशकात मरण पावला. पण येथे त्याला जन्मठेपच दिली गेली - कृत्य कितिही हिन असले तरी.

पण पुण्यातल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील चार आरोपी मात्र विकृत होते पण मनोरुग्ण नव्हते. तसेच जे कृत्य केले ते अत्यंत घृणास्पद होते. परीणामी त्यांना फासावर चढवले गेले. तेच बिल्ला रंगा या दिल्लीच्या विकृत गुंडांचे...

अशा लोकांना फाशी देण्याशिवाय पर्याय नसतो कारण आपल्याकडची जन्मठेप ही कायम स्वरूपी नसते. काही काळानंतर ते बाहेर येऊ शकतात आणि अशा गुन्हेगारांना परत समाजात येऊन देणे धोकादायक असू शकते.

या संदर्भात बॉस्टन/मॅसॅच्युसेट्स मधला कायदा सांगतो (इतर अमेरीकन राज्यात पण असेल, पण मला माहीत नाही): येथे सेक्स ऑफेंडर म्हणून शिक्षा झालेली व्यक्ती एकदा सुटली आणि एखाद्या भागात घर घेऊन राहू लागली की ती माहिती पोलिस जाहीर करतात. ती सरकारी संस्थळावर देखील असते आणि हल्ली काही फोन अ‍ॅपवर पण दिसते. अर्थात त्यांना कोणी इजा करू नये हा देखील दंडक असतोच...

अजून परत एकदा फाशीच्या संदर्भातः

बॉस्टन मॅरॅथॉन बाँबर ला जेंव्हा इथल्या ज्युरींच्या पद्धतीने सामान्यांकडून शिक्षा ठरवली गेली, तेंव्हा बचावपक्षाचे म्हणणे होते की त्याने ते कृत्य केले ते केवळ (आता मेलेल्या) भावाच्या प्रभावाखाली येऊन केले. पण व्हिडीओ वरून समजत होते की लहान मुल तेथे हजर आहे हे दिसत असून सुद्धा तो त्या ठिकाणी बाँब ठेवून निर्विकार पणे (कोल्ड ब्लडेड) निघून गेला. तो लहान मुलगा त्यात गेला. आणि विशेष करून त्या निर्विकार पणामुळे त्याला मरणाची शिक्षा झाली. मॅसॅच्युसेट्स राज्यात कॅपिटल पनिशमेंट नाही. पण हा खटला दहशतवादी कृत्यामुळे फेडरल गव्हर्नमेंटच्या अख्त्यारीत असल्याने कॅपिटल पनिशमेंट होऊ शकणार होती आणि झाली. तरी देखील त्यात ज्यांचे पाय गेले आहेत अशा व्यक्ती पण या शिक्षेच्या विरुद्ध होत्या (त्याला सोडण्याच्या विरुद्ध नाही). बॉस्टन सिटीचा पोलीस प्रमुख जो त्याला पकडण्यासाठी झालेल्या दिड दिवसाच्या ऑलमोस्ट युद्धाचा प्रमुख होता, तो देखील (त्याच्या स्वतःच्या शब्दात) कॅथलीक असल्याने मरण देण्याच्या शिक्षेच्या विरुद्ध होता. पण त्याच वेळेस तो हे देखील म्हणाला, की जेंव्हा गणवेषात असतो तेंव्हा धर्म फक्त अमेरीकन कायदा असतो त्यामुळे त्याच्या नुसार न्यायव्यवस्था जो निर्णय घेईल तो मला शिरसावंद्य आहे.

असो.

द-बाहुबली's picture

1 Aug 2015 - 2:02 pm | द-बाहुबली
द-बाहुबली's picture

1 Aug 2015 - 2:52 pm | द-बाहुबली

वरिल प्रतिसाद संपादित झाला आहे का ?

१) हो ? मग सगळाच अद्रुष्य करावा हि विनंती.
२) नाही ? मग काहि तांत्रीक कारणाने हा प्रतिसाद व्यवस्थीत नक्किच छापला गेला नाहीये. तेंव्हा अद्रुश्य केला तर बरे होइल.

अभिजित - १'s picture

3 Aug 2015 - 8:59 pm | अभिजित - १

दुबई / गल्फ मध्ये रस्त्यावर पाकीट जरी पडले असेल तरी त्याला कोणी हात लावत नाही. १ तासाने जरी परत आलात तरी ते मिळते. कमाल आहे. तिकडच्या बहुतेक ( ९० % ) गुन्हेगारांचे कोणी तरी आधीच मन परिवर्तन केले असले पाहिजे. हो कि नाही ?

इनफॅक्ट, जपानमधे आपल्याला वस्तु हरवल्या ठिकाणी सुद्धा जायची गरज पडत नाहि. बहुतेक वेळा लॉस्ट अ‍ॅण्ड फौण्ड कौण्टरवर आपली वस्तु परत मिळायचे चान्सेस खुप जास्त असतात.
शिक्षेची भिती वा परक्याची वस्तु इमानदारीने परत करायची सभ्य मानसीकता हा वेगळा विषय आहे. न्यायव्यवथेत शास्त्रोक्त पद्धतीने गुन्हेगाराची मानसीकता सुधरवण्यात किती भर दिला जातो हा धाग्याचा विषय आहे.