साजरं ( शतशब्दकथा )

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 3:41 pm

तो दिशाहीन चालत होता. बेवड्या बापाने आज परत त्याला चोपले होते आणि मायने मध्ये पडून त्याला सोडवले होते.
वाढते वय, वाढती भूक आणि ती भागवायला बापाचा मार आणि कधीतरी मिळणारे वडापावच्या गाडीवरचे काम.
पक्याची गाडी उचल्यापासून ते काम पण बंद होते.
शाळा बंद म्हणून खिचडी पण बंद... स्टेशनवर हमालीसाठी पण कोणी उभं करत नव्हतं.

मनात नसतानाही तो स्मशानाच्या रस्त्याला लागला...

आज गरजेच्यावेळी त्याला ते सापडत होते.... कधी नुसतेच कधी फुलांबरोबर कधी गुलालाबरोबर... तो दिसेले तिथून घेत होता मागचा पुढचा विचार न करता... मायला हे आवडणार नाही त्याला माहित होते पण..

जगण्यासाठी त्याला कुणाचं तरी मरण साजरं करावं लागणार होतं...

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Jul 2015 - 3:53 pm | यशोधरा

आई गं..

जडभरत's picture

28 Jul 2015 - 4:22 pm | जडभरत

वाईट खूप वाईट!!!
कधी नुसता वरण भात केला म्हणून कातावणारे आपण?
अशा तर्हेचं लेखनच आपल्याला अधूनमधून थप्पड देऊन जागं करतं.

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 5:20 pm | उगा काहितरीच

भीमा आठवला ! (कृष्णाकाठच्या कथा, अण्णा भाऊ साठे)

अस्वस्थामा's picture

28 Jul 2015 - 7:42 pm | अस्वस्थामा

स्मशानातलं सोनं , इयत्ता दहावी.. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Jul 2015 - 5:32 pm | माम्लेदारचा पन्खा

लिखते रहो !!

पैसा's picture

28 Jul 2015 - 6:17 pm | पैसा

काय काय सोसावं लागतं काही लेकरांना!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2015 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

कटु सत्य :(

स्रुजा's picture

28 Jul 2015 - 8:50 pm | स्रुजा

:(

पद्मावति's picture

29 Jul 2015 - 2:03 pm | पद्मावति

जगण्यासाठी त्याला कुणाचं तरी मरण साजरं करावं लागणार होतं...

....काय बोलणार....

खटपट्या's picture

29 Jul 2015 - 2:49 pm | खटपट्या

बाप्रे !!

तुडतुडी's picture

29 Jul 2015 - 3:16 pm | तुडतुडी

:-(

एक एकटा एकटाच's picture

30 Jul 2015 - 12:18 am | एक एकटा एकटाच

:-(