ती (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 10:47 am

"स्त्रीला कधीही नाही जमणार, भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला...... तुझं शरीराचं, तुला अडचणीच होईल त्यावेळी !" त्याचा मृतदेह पुरला, तरी डोक्यातले त्याचे शब्द तिला राहूनराहून छळत होते.

'त्याने शिकार करायची, अन तिने धारदार सुऱ्याने शिकारीची चामडी सोलून, छोटूकले तुकडे करून, शेकोटीवर भाजून, चिल्ल्यापिल्ल्यासकट सगळ्यांना खाऊ घालायचे', असा सरळसोट हिशोब राहिला नव्हता आता……त्याला गुहेजवळ पुराल्यानंतर.

जगण्यासाठी कोडगं व्हायचं ठरवून, इथूनपुढे रोजच, आपल्यासकट पिल्लांसाठीसुद्धा, शिकारीच्या शोधार्थ बाहेर पडावेच लागणार होते तिला तिच्या गुहेतून,
……
……
जाड चामड्याची पट्टी दाताखाली दाबून, दीर्घ श्वास रोखून, डाव्या हातातला सुरा खोलवर चालू लागल्यावर, उडणार्या रक्ताच्या कारंज्यात, असह्य वेदनेने कळवळली ती, उजवा स्तन कापून टाकताना……
स्वतःचाच …….

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

28 Jul 2015 - 11:34 am | खटपट्या

बाप्रे !! असंही असतं ?
मग एवढ्या महिला भालाफेकपटू असतात त्या कशा ?

खटपट्या's picture

28 Jul 2015 - 12:08 pm | खटपट्या

चित्र दीसत नाहीये. घरी जाउन बघतो

तुषार काळभोर's picture

28 Jul 2015 - 12:11 pm | तुषार काळभोर

ग्रीक युद्धदेवता आर्टेमिस हिच्या योद्ध्यांचं नाव अमेझॉन्स होतं.
(अमेझॉन या शब्दाची व्युत्पत्ती a- and mazos, "without breast" (ग्रीकमध्ये) अशी असल्याचं मानलं जातं)
तर या अमेझॉन स्त्रिया त्यांचे उजवे स्तन कापत असत.
याची कारणे वेगवेगळी दिली जातात. एक असं सांगितलं जातं की त्यामुळे उजव्या स्तनातील शक्ती उजवा खांदा व हात यात पुरवली जाते (जी कदाचित भालाफेक्/तीरंदाजी यात उपयोगी ठरत असेल.)
माहिती स्रोतः विकी

(ही ग्रीक पौराणिक थियरी आहे. खरं खोटं झ्युस जाणो.)

भीमराव's picture

28 Jul 2015 - 12:04 pm | भीमराव

कुठेतरी वाचल्याच आठवतय प्राचीन युरोपात अशी एक जमात होती जिच्यामधे स्त्री तिरंदाज त्यांचा एक स्तन कापुन घेत असत. अभ्यासक/जाणकार याबद्दल अधिकची माहीती देऊ शकतील.

मला सुमेरियन असं वाचल्याचं आठवतंय. आ.जा. वर सर्च मारायला हरकत नाही.

तुडतुडी's picture

28 Jul 2015 - 5:34 pm | तुडतुडी

???? नाही झेपलं

पगला गजोधर's picture

28 Jul 2015 - 5:46 pm | पगला गजोधर

आदिवासि स्त्री तिरंदाज त्यांचा एक स्तन कापुन घेत असत, तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला.
female archer

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 6:18 pm | उगा काहितरीच

आवडली !

मुक्ती's picture

28 Jul 2015 - 6:40 pm | मुक्ती

असे एकेक किश्शाची एकेक कथा कशाला करताय? आतिवास तैंच्या कथा वाचा जरा एकदा सगळ्या.

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. शशक ऐवजी थोडासा इतिहासातील कच्चा माल आणि कल्पनाशक्तीची फोडणी देऊन या विषयावर उत्तम कथा लिहिता येतील. कारण असं इतिहासात घडून गेलंय. तसेच शशकची शब्दमर्यादा लेखनावर बर्‍याच मर्यादा आणते! असो माझे वैयक्तिक मत!!!

तसेच शशकची शब्दमर्यादा लेखनावर बर्‍याच मर्यादा आणते! असो माझे वैयक्तिक मत!!!

माणसाच्या दिवसात २४च तास असतात नं, जसं तो त्याचा उपयोग कसा करतो हे महत्वाचे, तसेच आपण (लिहिणार्याने) स्वतःवर १०० शब्दांचे बंधन घालून, जास्तीत जास्त प्रभावी सादरीकरण करायचे ठरवले तर ??
अवांतर: शिवाय तुम्ही मुळचे "पिचर" चे भोक्ते असाल तर तुम्हाला "टक़ीला-शाँट" रुचणार नाही कदाचित.

द-बाहुबली's picture

29 Jul 2015 - 8:52 pm | द-बाहुबली

बहोत खुब. बहोत बहोत खुब. आप लिखते रहो लोग पढते रहेंगे.

अवांतर :- शटशब्दकथा लिहायचा विचार चालु आहे.

तुम बने रहो पगला....काम करेगा तुम्हारे अगला !!