स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 7:41 am

मी जिथे काम करतो तेथील प्रसंग. इतके दिवस जुनाट कपाटं, कागद, वाळलेल्या पापडासारखी पोस्टर्स, निवांत सरकारी कामं, एका बाईचा तार सप्तकातला इरिटेटिंग स्वर अस एकंदर स्वरूप.
परवा अचानक गडबड झाली, खडबडून जाग आली म्हणा ना...सगळी पोस्टर्स पुसून घ्यायला लावली...कुणाला?? संशोधकांना...आम्हाला देण्यात येणाऱ्या पगारात हे ही समाविष्ट असत वाटत. नवीनच कळलं. १ महिना रखडलेल्या पोस्टरच काम १ तासात उरकलं गेलं अन ते प्रिंट करायला धाडण्यात आलं. जुनी कपाटं नवीन दिसण्याचे दुबळे प्रयत्न करून झाले. कार्पेट नवीन, पायपुसणी नवीन एवढच काय तर चहाचे कपदेखील नवीन. अन तार सप्तकातला स्वर आणखीनच फाटक्या स्पीकर सारखा झाला.

म्हटलं च्यायला झालं काय???

एक बाई येतीय, परदेशातून. फॉरीन बर का. कुलगुरुंपेक्षा महत्वाची लोकं. मग हे खराब आहे, इथे तिला आणायलाच नको, तिथे नको वगैरे planning झालं. मग water cooler आतून साफ केला गेला, please check it does not have mosquito larvae या शब्दात बोलून झालं. (इतके दिवस त्यातलंच पाणी पितोय आम्ही. पण आम्ही फॉरीनचे नाही ना. असली त्या संचालक बाईची अक्कल). सगळं कसं टापटीप. सुंदर. च्यायला ती काय अडाणी आहे का काय?? बांग्लादेशात काम केलय तीने. LMIC (low middle income countries) मध्ये काय अन कस चालत माहित नाही की काय तीला? हे असले आव कशाला आणायचे.? बर ती बाई काय funding वगैरे देणारे का? नाही..ते पण नाही.
एकच कारण. बाई, अन त्यातून गोरी. कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत. आपल्याकडील गोर्या कातडीचं आकर्षण संपत नाहीच. त्यांचे गुलाम म्हणून जगायचीच लायकी आहे वाटत तुमची. या सगळयाच मूळ कुठे आहे? आम्हाला संशोधन पद्धती शिकवतात न तिथेच. संशोधन म्हणजे फार नवीन अन फार मस्त असा प्रकार. नवीन शोध. अनेक पॉलीसी, आरोग्य सेवा यांच्या दर्जात भर टाकणारे शोध. लोकहिताचे. पण सुरुवात कुठून करायची??

पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास?? नाही?? मग गोरे काय वेडे आहेत का? त्यांच्या डोक्यात नक्कीच आलं असेल. असा रिसर्च नाही ना झाला पूर्वी? मग होतंच नसेल...methodology मध्ये काहीतरी प्रोब्लेम असणार. तू असं कर, ४-५ सिमिलर रिसर्च शोध. आणि carry out is as it is.
या सगळ्याला नवीन मी प्रश्न विचारतो, पण मग वेगळं काय करतोय आपण?? मग मला वेड्यात काढत उत्तर मिळत, "अरे स्टडी स्ट्रेन्थ मध्ये लिहायचं, हा भारतीय context मध्ये पहिला आहे"...

म्हणजे काय झालं पुन्हा? जा...पाय चाटा गोऱ्यांचे!!

स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!

मांडणीविचार

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

28 Jul 2015 - 8:52 am | आनंदी गोपाळ

अहो, निदान त्यानिमित्ताने स्वच्छता तर झाली! हेही नसे थोडके.

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jul 2015 - 9:27 am | कैलासवासी सोन्याबापु

थोड़ी स्वच्छता तुम्हाला करायला लागलेल्याचे तुम्ही ज़रा जास्त मनाला लावुन घेतलेत काय संशोधक सर??

आगाऊ म्हादया......'s picture

28 Jul 2015 - 7:39 pm | आगाऊ म्हादया......

मुद्दा वेगळाच आहे. स्वच्छता अभियान म्हणून बाकी काम फसक्लास झालं.

तुषार काळभोर's picture

28 Jul 2015 - 9:36 am | तुषार काळभोर

फ्रेंच येमेन्शीत असल्याने रोज दहा वेळा अशा गोष्टी बघतो.

नाखु's picture

28 Jul 2015 - 9:39 am | नाखु

थोडा "आगाऊ पणा " करून सांगतो रागावू नका बरे !!!!

तुम्ही या सगळ्याकडे "मोदी स्वच्छता अभियान" म्हणून बघा आणि टाका दोनचार सेल्फी आणि बसा लाईक मोजत !!! हा का नाका .

न केलेल्या स्वच्चतेचे कवतीक होतयं तुम्ही तर खरेच केलीय.

प्वांईटाचा मुद्दा फक्त शेवटची ओळ : गोर्यांची गुलामी/धार्जीणगिरी याबद्दल काही ठोस आणि टिकाऊ लिहा.

तळटीप अवांतर : मोदींचे नाव आल्याने धागा पन्नाशीकडे वेगाने धावेल.

आनंदी गोपाळ's picture

28 Jul 2015 - 9:58 am | आनंदी गोपाळ

पूर्वी शंभरी गाठायचा म्हणे? आजकाल पन्नाशीकडे ओहोटी लागल्येय की काय?

कंजूस's picture

28 Jul 2015 - 10:48 am | कंजूस

आमच्याकडे हेच. ओफिस( लॅब )मध्ये खिडकीतून कावळे यायचे केमिकलच्या बॅाटल्सवर बसून पाडायचे. वरती गच्चीवर जाऊन मी वरून दोय्रा सोडून काठ्या बांधल्या आडव्या (रेल्वे वाले बांधतात तसे ). त्याला काव ळे घाबरायचे.परंतू इकडे ओरड झाली mad bugger,mad chap .काही दिवसांनी एक जर्मन साहेबाने केवळ तिकडून ओझरते जातांना काठ्या पाहून रिमार्क मारला "crows ? goot! . मग काय उदो उदो .he appreciated it very much वगैरे.

काळा पहाड's picture

28 Jul 2015 - 12:46 pm | काळा पहाड

पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास?? नाही?? मग गोरे काय वेडे आहेत का? त्यांच्या डोक्यात नक्कीच आलं असेल. असा रिसर्च नाही ना झाला पूर्वी? मग होतंच नसेल...methodology मध्ये काहीतरी प्रोब्लेम असणार. तू असं कर, ४-५ सिमिलर रिसर्च शोध. आणि carry out is as it is.

म्हाद्या साहेब, आम्हाला या गोष्टीचा विषाद वाटतंच नाही. विषाद या गोष्टीचा वाटतो की या हरामखोर सरकारी नोकर, युनिव्हर्सिटी प्राध्यापक वगैरे वाल्यांना (मिपावरच्यांनी स्वतःला वगळावे) सिक्स्थ आणि सेवंथ पे कमिशन हवं असतं. लायकी नसताना जास्त पगार हवा असतो. आणि वर वार्षिक सुट्ट्या पण हव्या असतात. या साठी सगळ्याच गोष्टींचं खाजगीकरण करणं गरजेचं आहे. मग तुमच्या त्या संचालकाला बॉस अशा लाथा घालेल की बस्स. म्हणजे अशा निरुत्साही खोंडांना नोकरीवर ठेवलं तरचं सांगतोय.

आगाऊ म्हादया......'s picture

28 Jul 2015 - 8:12 pm | आगाऊ म्हादया......

खरय..खाजगीकरण कदाचित उपाय चांगला असेल.

वेल्लाभट's picture

28 Jul 2015 - 1:54 pm | वेल्लाभट

चाटूगिरी ! युगानुयुगे चालत आलेली प्रंप्रा.

आपल्याकडे गोरेपणा आणि सौंदर्य हे दोन समानार्थी शब्द असल्यासारखे बरेच वेळी वापरल्या जातात. मग तो गोरा रंग परदेशी असेल तर त्याची इंटेन्सीटी जरा जास्तं वाढते इतकंच.

इरसाल's picture

28 Jul 2015 - 4:56 pm | इरसाल

यमीपेक्षा दहापट गोरी र्‍हायलयं, अ‍ॅडवा ना प्लीज !

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 5:22 pm | उगा काहितरीच

कोण यमी ? असा प्रतिसाद नाही दिला कुणी म्हणजे झालं !

पद्मावति's picture

28 Jul 2015 - 3:25 pm | पद्मावति

या लेखातील घटनेच्या संदर्भात मधे गोरेपणा आणि सौंदर्य यापेक्षा गोरेपणा आणि superiority हे अधीक योग्य वाटतय.

वेल्लाभट's picture

28 Jul 2015 - 4:02 pm | वेल्लाभट

खरं आहे

आगाऊ म्हादया......'s picture

28 Jul 2015 - 8:13 pm | आगाऊ म्हादया......

होय

विवेकपटाईत's picture

28 Jul 2015 - 8:19 pm | विवेकपटाईत

परदेसी आणि गोर्या बाईंचे गुलाम होण्यात हि धन्यता असते.

हे असच आणखी बर्‍याच प्रसंगात म्हणता येईल ...
पण मग आपल्या संस्कृतीच काय ? असा विचार करून गप्पं बसावे लागते.

आगाऊ म्हादया......'s picture

31 Jul 2015 - 8:49 pm | आगाऊ म्हादया......

एकुणात मिपावर माझ्या भावना अगदी तंतोतंत पोहोचल्या. थोबाडपुस्तकावर मात्र एक धडा शिकायला मिळाला.
शब्दातून भावना पोहोचतीलही, भूमिका नाही पोहोचू शकत.

कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत. आपल्याकडील गोर्या कातडीचं आकर्षण संपत नाहीच.

=)) =)) =)) कडक. :)

आगाऊ म्हादया......'s picture

4 Aug 2015 - 11:59 am | आगाऊ म्हादया......

धन्यवाद!