रेस (शतशब्दकथा)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
27 Jul 2015 - 3:19 am

लॅपटॉपची बॅग बराच वेळापासून खांद्यावर धरली की तिचे वजन वाढू लागते. मनोभौतिकीचा अप्रसिद्ध सिद्धांत! ठासलेली एमआरटी स्टेशनात प्रवेशली. शिरतानाच सिनियर किंवा गरजूंसाठी ठेवलेली राखीव सीट हेरली. रिकाम्या होणाऱ्या जागेकडे एक तरुणी लगबगीने येतांना दिसली. सिनियर वय पाउलांमधे अडकू नये अशा धडपडीने मी राखीव सीटकडे झेपावलो. माझ्याकडे बघत हरीणीच्या चपळाईने तरुणीने सीटचा कबजा केला. कडी पकडून खांद्यावर लॅपटॉप तोलीत उभा राहिलो.

एका मध्यवयीन स्त्रीने माझ्याकडे सहानुभूतीचे आणि तरुणीकडे तिरस्काराचे कटाक्ष टाकले. तरुणी स्थितप्रज्ञ! मीच न राहवून मोठ्याने म्हणालो, “Never mind, she was faster than me. She won!” लाज वाटल्याने तरुणीने उठून माझ्यासाठी जागा रिकामी केली.

न जिंकलेल्या जागेवर मी अवघडून बसलो.

राखीव सीट

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

27 Jul 2015 - 5:12 am | उगा काहितरीच

चांगला प्रयत्न !

श्रीरंग_जोशी's picture

27 Jul 2015 - 5:47 am | श्रीरंग_जोशी

कथानायकाचे गेमचेंजर वाक्य खूपच खास. शशकथा आवडली :-) .

नगरीनिरंजन's picture

27 Jul 2015 - 5:56 am | नगरीनिरंजन

:-)आवडली. शरातले जगणे म्हणजे पदोपदी रेस आणि जिंकण्यासाठीचे नवेनवे डावपेच.

योगी९००'s picture

27 Jul 2015 - 8:53 am | योगी९००

गोष्ट आवडली...!!

पगला गजोधर's picture

27 Jul 2015 - 9:24 am | पगला गजोधर

नॉर्थ इस्ट लाइन का ? सिंगापूरची …
जूरोंग ते चांगी

अरुण मनोहर's picture

27 Jul 2015 - 10:05 am | अरुण मनोहर

की इथलेच?

पगला गजोधर's picture

27 Jul 2015 - 10:27 am | पगला गजोधर

:)

खटपट्या's picture

27 Jul 2015 - 10:29 am | खटपट्या

आवडली कथा !!

विडंबन पाडायचा प्रचंड मोह होतोय. पण ट्काचा मान ठेउन हात आवरता घेतोय..

एक एकटा एकटाच's picture

27 Jul 2015 - 11:53 am | एक एकटा एकटाच

मस्त

आवडली

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 12:02 pm | टवाळ कार्टा

गुलाबाच्या पाकळ्या टोचणार्या रा.कु.ची आठवण झाली

रातराणी's picture

27 Jul 2015 - 12:07 pm | रातराणी

छान.

कथा नाही आवडली . आपल्या वृद्ध पणाची एवढी कीव असणारे ज्येष्ठांच्या राखीव जागेवर बसलेल्यांना उठवत नाहीत . येवून जावून स्त्रियांच्याच राखीव जागांवर डोळा असतो त्यांचा .

मनुराणी's picture

27 Jul 2015 - 1:57 pm | मनुराणी

तुडतुडी, सिंगापूरात स्त्रियांसाठी राखिव जागा नाहीत. राखिव जागा ज्येष्ठ व्यक्ती, लहान मूल कडेवर असलेल्यांसाठी, गर्भवतीसाठी अाणि अपंगांसाठी अाहेत. बाकी धडधाकट असलेल्या स्त्रीने अापली राखीव जागा ज्येष्ठ व्यक्तीला देण्यास काहीच हरकत नसावी.

अरुण मनोहर's picture

27 Jul 2015 - 3:00 pm | अरुण मनोहर

फ़ोटो एवढ्याचसाठी टाकला होता!

बाद्वे , मुळात राखीव जागा कोणासाठी आहेत हा मुद्दा गौण आहे.
राखीव जागा "पात्रता (इलीजीबीलिटी)" की "गरज" ह्यावर अवलंबून असाव्यात / घेतल्या जाव्यात हा मुद्दा प्राईम !

स्मिता.'s picture

27 Jul 2015 - 4:01 pm | स्मिता.

पात्रता की गरज हा मुद्दा अगदी मान्य! ज्या गरजूंकरता बस/ट्रेनमधे राखीव जागा असतात त्या त्यांना मिळायलाच हव्या. मी तर राखीव जागेवर बसले नसले तरी वृद्ध/अपंग व्यक्ती, सोबत लहान मूल असलेल्या व्यक्ती किंवा गरोदर स्त्रियांना स्वतःहून जागा देते.

(वरील लेखातल्या प्रसंगात नव्हे) मात्र एखादे वेळी तरूण आणि धडधाकट दिसणार्‍या व्यक्तिची तब्येत बरी नसते. अश्यावेळी तिला उभे राहून प्रवास करणे कष्टाचे होते. अश्यावेळची गरज कशी ग्राह्य धरावी हासुद्धा एक मुद्दा असावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवडली !

पद्मावति's picture

27 Jul 2015 - 4:04 pm | पद्मावति

थोडासा, अगदी बेसिक सिविक सेन्स लोकं का पाळत नाही. त्या ज्येष्ठ नागरीकाला त्यांच्या हक्काची सीट मिळविण्यासाठी रेस करावी लागली हे दुर्दैवी आहे.

पैसा's picture

27 Jul 2015 - 4:28 pm | पैसा

नेमके लिहिले आहे! ज्येष्ठ नागरिक ही रेस नेहमी हरणारच आहेत. आणि पुन्हा कधी रेस जिंकणे शक्य नाही याचे दु:ख कदाचित जास्त मोठे असावे.

शिंगापूरातली कथा आहे होय . मग बरोबर आहे . अहो पण ती मुलगी उठली ना . बस मध्ये चढल्यावर अर्थतच आपण एखादी रिकामी जागा दिसल्यावर तीरासारखे धावतो ती पकडायला . तसं त्या मुलीचं पण झालं असेल पण लक्षात आल्यावर ती स्वतःहून उठली . आपल्या इकडच्या सारखं नै कै ;-)

अंतु बर्वा's picture

27 Jul 2015 - 10:30 pm | अंतु बर्वा

छान कथा...

हा आमचा एक विडंबनात्मक प्रयत्न...

पोटाची आग बराच वेळ राहीली की तिचा त्रास वाढू लागतो. मनोभौतिकीचा अप्रसिद्ध सिद्धांत! उरल्या अन्नाने ठासलेल्या प्लेट कंपाउंड वॉलवरुन बाहेरच्या कोपर्यात झेपावल्या. दिसताच पुरी आणी श्रीखंड असलेली प्लेट हेरली. प्लेट पडणार्या जागेकडे एकदोन कुत्री लगबगीने येतांना दिसली. सिनियर वय पाउलांमधे अडकू नये अशा धडपडीने मी प्लेटकडे झेपावलो. माझ्याकडे बघत हरीणीच्या चपळाईने कुत्र्यांनी प्लेटचा कबजा केला. डोक्यावर हात ठेउन पोटातल्या आगीला सावरत उभा राहिलो.

प्लेट फेकणार्याने माझ्याकडे सहानुभूतीचे आणि कुत्र्यांकडे तिरस्काराचे कटाक्ष टाकले. कुत्री स्थितप्रज्ञ! मीच न राहवून मोठ्याने म्हणालो, “जाउ द्या, कुत्री माझ्यापेक्षा जास्त चपळ हायती!”. कुत्री बिनलाज्यासरखी प्लेटमधल्या खाण्यावर तुटुन पडली होती.

पुढिल प्लेटच्या आशेवर मी परत अवघडून बसलो.

अगदी गलिच्छ विडंबन. एका वृद्ध व्यक्तिच्या धाग्याला प्रतिसाद देतोय याचे भान पाहिजे होते.

अंतु बर्वा's picture

27 Jul 2015 - 11:30 pm | अंतु बर्वा

विडंबन हे कथेचे करण्यात आले आहे, त्यातील कंटेंटचे. त्यात लेखकाला कींवा व्रुद्ध व्यक्तींना कमी लेखण्याचा हेतु नव्हता/नाही. तुम्हाला त्यात गलिच्छपणा दिसला असेल तर तो तुमच्या perception चा दोष आहे.

आणी एक, विडंबन हे नेहमी विनोदी कींवा sarcastic असायलाच हवे असा काही नियम आहे का?

जुइ's picture

28 Jul 2015 - 12:45 am | जुइ

कथा आणि वाक्य दोन्ही आवडले!

तुडतुडी's picture

28 Jul 2015 - 3:19 pm | तुडतुडी

अंतु बर्वा ह्याला विडंबन म्हणता येईल का ? विडंबन विनोदी असतं . तुम्ही लिहिलंय ते दुखदायक आहे