शतशब्दकथा

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
26 Jul 2015 - 2:36 pm

डोकं ज्याम भणाणून गेलंय . काहीच सुचत नाहीय . पेट्रोलपण संपत आलंय . येताना भरु . सिग्नलपाशी ८० ccवर लोवेस्ट पुढे जायचं ट्राय करतेय . इतर वेळी ऐश वाटली असती पण आज राग येतोय ,च्यायला बुलेटशी स्पर्धा करते? जी झुम्मकन काढली . तिने घाबरून ब्रेकच मारला . आज ऑफिसात पण काय खरं नाय . पीएल उलटसुलट बोलला तर आपलं नक्की वाजणार . दुसरा सिग्नल . पण काहीतरी सुचायलाच हवं . १०० च टार्गेट आहे . १०, ९, यावेळी ५० तरी रिप्लाय हवेत . ६, ५, चला. सुटुया …. झू …… क्रीश्श आई ………………………
..
..
..
..
..
जाग आली ती हॉस्पिटलात . सर्व अंगच प्लास्टरमध्ये गुंडाळलेलं . एकदम ट्यूब पेटली . कसाबसा एका हाताने बाजूचा मोबाइल घेतला नि टंकू लागलो , "डोकं ज्याम भणाणून गेलंय …"

कथा

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

26 Jul 2015 - 3:25 pm | एक एकटा एकटाच

मस्त

आवडली.

ही सत्यकथा नसल्यास ......"उत्तम"

जडभरत's picture

26 Jul 2015 - 4:31 pm | जडभरत

मजेशीर कथा आहे!!!

खटपट्या's picture

26 Jul 2015 - 7:31 pm | खटपट्या

या शतशब्दकथेची प्रेरणा तो "सीग्नल तोडणारा धागा" तर नाय ना
कथा आवडली,,,

संदीप डांगे's picture

26 Jul 2015 - 7:39 pm | संदीप डांगे

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

कथा छान आहे !

कुणी त्यापासून बोध घेतला तर बरे... अन्यथा बोधपर कथा, विनोद, हसण्यावर नेण्याची प्रथा पडली आहे :(

स्वतःचा हात-पाय हॉस्पीटलमध्ये टांगला गेल्याशिवाय सुबुद्धी सुचू शकत नाही इतक्या स्तरावर बुद्धी का पोचली हा प्रश्न पडावा असेच वाहतूकीकडे पाहून वाटत राहते.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jul 2015 - 9:39 pm | श्रीरंग_जोशी

बोधकथा म्हणून आवडली.

डॉ सुहास यांच्या मताशी सहमत.

जडभरत's picture

26 Jul 2015 - 9:53 pm | जडभरत

हं हे मात्र खरे डाॅक!!!

नाखु's picture

27 Jul 2015 - 10:28 am | नाखु

फास्ट "फॉरवर्डच्या" जमान्यात कसल्या अपेक्षा करता डॉक तुम्ही सुद्धा !!!!!

टिंबक टू नाखु

अजया's picture

26 Jul 2015 - 9:42 pm | अजया

आवडली कथा.

उगा काहितरीच's picture

27 Jul 2015 - 5:19 am | उगा काहितरीच

छान आहे की !

अरुण मनोहर's picture

27 Jul 2015 - 10:14 am | अरुण मनोहर

हा हा: मोबाईल प्लास्टर मध्ये गेला नाहीना? मग ठीकाय!

चुकलामाकला's picture

27 Jul 2015 - 11:25 am | चुकलामाकला

धन्यवाद!

रातराणी's picture

27 Jul 2015 - 12:19 pm | रातराणी

हा हा! सुपारी द्यायची ना 50ची! हा का ना का.पाक प्लास्तर मधे जायचं होय? आवडली. : )

झकास . च्या मारी . हास्पिटलात पडलंय तरी ………