याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in काथ्याकूट
25 Jul 2015 - 8:19 pm
गाभा: 

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.

फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही.

समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात.

फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का?

भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा.

गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

25 Jul 2015 - 8:30 pm | श्रीरंग_जोशी

लेखाच्या आशयाशी सहमत.

तुम्ही दिलेल्या यादीत आंतरजालावरून कॉन्स्पिरसी थेअर्‍या* पसरवणारे व दहशतवादाशी संबंधीत खटले विक्रमी* वेळात संपूनही उशिर झाला असे रडगाणे~ गाणारे यांनाही जोडायला हवे.

* कसाबला फाशी झाल्यावर अतिउत्साही लोक १० प्रश्न फॉरवर्ड करत होते ज्यापैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे कॉमन सेन्सनेही मिळवता येत होती.

~ २६/११ अतिरेकी हल्ल्यांचा आव्हानात्मक व आकारमानाने खूप मोठा असणारा खटला कुठल्याही तडजोडीशिवाय विक्रमी वेळात पूर्ण झाला होता. या गोष्टीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक झाले होते. तरी देखील 'किती तो उशिर' असे रडगाणे गाणारे मिपावरही पाहिले आहेत.

dadadarekar's picture

25 Jul 2015 - 9:03 pm | dadadarekar

याच गुन्ह्यात एक षिनिमावाला होता ना ? तो किरकोळ सजा भोगतोय. का ? शेंदरी षेनेच्या आश्रयात गेला म्हणून ?

माहितगार's picture

25 Jul 2015 - 11:01 pm | माहितगार

कायदेशीर दृष्ट्या आपले विधान अपूर्ण माहितीवर तर नाही ना ? न्यायालयांचा निर्णय कोणत्याही रंगाने बाधीत होणारा नसतो तर स्वतंत्र असतो आणि स्वतंत्र राहीला आहे. निष्पक्ष न्याययंत्रणेची कदाचित नकळत नाहक बदनामी होत नाही आहे याची खात्री करून घेतलेली बरे असेल असे वाटते.

...... डोक्यावरुन गेला असेल, जरा त्याची फोड करून लिहा म्हणजे कदाचित समजेल त्याला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jul 2015 - 1:23 am | निनाद मुक्काम प...

साहेबांनी वृत्त पत्रात मुलाखत देऊन स्पष्ट सांगितले होते.
कसा सोडवला ते
नाहीतर टाडा च्या अन्वये जामीन नाही
जन्मभर तुरुंगवास हेच वास्तव असते

पण त्या शिनेमावाल्याचे वडील हाताचा पंजा दाखवायचे बा सतत..त्याविषयी काही माहिती असेल तर सांगा दादा तुम्ही..
माहिती नसेल तर आज राहुलच्या आईच्या साड्या इस्त्री करायला जाल तेंव्हा विचारून घ्या हो ..

तो निर्दोष आहे , त्याला मुक्त करा असा आदेश वाघोबाने दिला होता ना ? तेंव्हा कोर्टाची चौकशीही झाली नव्हती !

आणि आता याकूबची बाजु कुणीतरी घेतली तर ते तेवढे देशद्रोही झाले काय ?

खटपट्या's picture

27 Jul 2015 - 2:13 pm | खटपट्या

शिनेमावाला म्हंजे कोन ?
तो म्हंजे कोन?
वाघोबा म्हंजे कोन?

सगळे इस्कटून सांगा..

dadadarekar's picture

28 Jul 2015 - 4:32 pm | dadadarekar

स्पष्टपणे बोलून मला पुलं देशपांडे व्हायचा नाही.

..

काश्मीर मधील श्रीनगर महाविद्यलयात, युरोपिअन फोरमच्या मदतीने ,नासिमबागच्या बाजूस एक सुंदर लायब्ररी बांधण्यात आली होती .त्या वेळी मी इंजीनिरीगच्या पहिल्या वर्षात शिकत होतो. मी व माझा पुण्यातील एक मित्र ( महमद ) त्या लायब्ररीला वारंवार भेट देत होतो .त्याचेही वडील उधमपूर मिलिटरी सेक्टर मध्ये कर्नल होते .ती लायब्ररी इतकी अप्रतिम पाच मजली बांधली होती कि त्याचे द्रुष्य आजूनही डोळ्या समोरून जात नाही .बाहेरुन सुंदर सुंदर परदेशी काचा लावण्यात आल्या होत्या. अद्यावत कपाटे, भरपूर पुस्तके ,थंडी वाजू नये म्हणून ,मध्यवर्ती हिटीग सिस्टीम .थोडक्यात अप्रतिम अशी ती लायब्ररी होती .त्याच वेळी नेमकी पाकिस्तानचे माजी प्रतंप्रधान झेड . भुत्तो यांना फाशी देण्यात आली. वास्तविक या घटनेची भारताचा कांही एक संबध नव्हता. अफवा व व्देषा पोटी निव्वळ भारताच्या पंत प्रधानांनी कांहीच प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून स्थानिक विध्यार्थ्यांनी ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली व त्या लायब्ररी वर झुल्फ्कार भूत्तो असा फलक लावण्यात आला .ह्या घटनेने माझे मन मात्र खूपच हेलावून गेले होते. शेवटी फाशीची शिक्षा हि पूर्णपणे न्यायालयीन कामकाजाचा भाग असल्याने त्या मध्ये जात पात धर्म ह्या गोष्टी आणणे चुकीचे ठरेल . हि शिक्षा न्याय घटनेला अनुसरून असलेने प्रत्येंक नागरिकाने त्याचा आदर हा केला पाहिजे.

ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली >> अरेरे! :(

जुइ's picture

26 Jul 2015 - 9:07 pm | जुइ

संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली>>> खूपच वाईट झाले.

अत्रन्गि पाउस's picture

25 Jul 2015 - 11:37 pm | अत्रन्गि पाउस

ह्यांनी फाशीच्या शिक्षेवर शिक्का मोर्तब केले कि फाशी देण्यासाठी अजून काय कायदेशीर प्रक्रिया असतात ??
त्यात पुन्हा पुन्हा याचिका कसल्या दाखल करताहेत ?
शेवटचे ऐकले त्यात मामला राज्यपालांकडे आहे असे कळले ...हा सगळा नक्की काय प्रकार आहे ??

ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची या विषयावरची ताजी ब्लॉगपोस्ट वाचनीय आहे.

बेजबाबदार-आणि-बेताल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

26 Jul 2015 - 11:04 am | पुण्याचे वटवाघूळ

श्रीरंगराव लिंक शेअर करत आहेत म्हणजे त्यात विनाकारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याविषयी गरळ ओकलेली असणार हे गृहित धरलेच होते. तरीही प्रवीण बर्दापूरकर यांची ही पोस्ट अपुर्‍या माहितीवर आधारित आहे.

मे २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्ह्टले होते की फाशीची शिक्षा सिक्रेटली आणि घाईघाईने (कसाब आणि अफजल गुरू केसप्रमाणे) करू नये. संबंधित गुन्हेगाराला सर्व लीगल रिकोर्स मिळाले पाहिजेत आणि नातेवाईकांना भेटता आले पाहिजे वगरे. http://timesofindia.indiatimes.com/india/Convicts-cant-be-hanged-secretl...

त्यामुळे फाशीची तारिख आधी जाह्रिर करणे क्रमप्राप्त होते. अशा प्रसंगी सरकारने गुपचूप सगळे उरकायला पाहिजे होते हे म्हणणे ठिक आहे पण त्यातून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असते त्याचे काय? देवेन्द्र फडणवीसांनीही हेच म्हटले की या संदर्भात कोर्टाच्या सगळ्या गाईडलाईनचे पालन केले जाईल. बाकी फाशी कधी देणार, कशी देणार या गोष्टी पूर्वी धनंजय चॅटर्जीच्या फाशीच्या वेळीही (२००४) चघळल्या जातच होत्या. आता दिले जात आहेत तेच सगळे डिटेल त्यावेळीही दिले होते. विश्वास बसत नसेल तर http://www.rediff.com/news/2004/aug/12spec.htm हे वाचा.

विशेष म्हणजे सरकारने आता फाशीची डेट आधी का जाहिर केली हे म्हणणार्‍यांपैकीच बरेच अफजल गुरूच्या केसमध्ये गुपचूप फाशी का दिले असा उलटा सवालही विचारत होतेच. त्यावेळी आणि आता यात नक्की काय फरक झाला आहे? एक फरक म्हणजे कोर्टाच्या गाईडलाईन आल्या आहेत. आणि दुसरा महत्वाचा फरक म्हणजे केंद्रातील आणि राज्यातील सरकारही बदलले आहे. आणि सध्याच्या केंद्र सरकारला काहीही बादरायण संबंध नसताना शिव्या घातल्या की श्रीरंगरावांसारख्यांना अगदी धन्य वाटते आणि इतर कुठलेही प्रश्न न विचारता त्यांच्यासारखे अशा लिंका 'वाचनीय' म्हणून पोस्ट करतात. एक तर बॉम्बस्फोट झाले १९९३ मध्ये.खटला सुरू झाला त्याच वर्षी. खटला पूर्ण झाला २००७ मध्ये. पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपील वगरे झाले २०१३-१४ पर्यंत. प्रणव मुखर्जींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला मे २०१४ मध्ये. आता सरकार (आणि ते ही राज्य सरकार-- केंद्राचा संबंध गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपतींना अर्ज फेटाळा हे रिकमेन्ड करण्यापुरता. आणि ते ही युपीए-२ सरकारने केले असायचीच शकयता सगळ्यात जास्त) त्या शिक्षेची पूर्णपणे कायद्याच्या कक्षेतून अंमलबजावणी करत असेल तरी शिव्या घालायच्या केंद्र सरकारला. अर्थातच काहीही झाले तरी केंद्र सरकारला आणि नरेंद्र मोदींना शिव्या घालणार्‍यांकडून वेगळी अपेक्षाही नाही म्हणा.

आणि ओवेसी आणि अबू आझमी च्या 'जहरी' टिकेस सरकारला सामोरे जावे लागले असे म्हणायचा शहाजोगपणा बर्दापूरकर बाळगतात.म्हणजे एक तर ओवेसी आणि अबू आझमी हे दोन महात्मे अन्य वेळी एकदम रॅशनल बोलत असतात!! वा वा.

या असल्या रद्दड ब्लॉगपोस्टना फाट्यावर मारावे.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2015 - 12:44 pm | श्रीगुरुजी

पूर्ण सहमत! बर्दापूरकरांचा लेख अत्यंत पूर्वग्रहदूषित व अज्ञानावर आधारीत आहे.

सदस्यनाम's picture

26 Jul 2015 - 1:43 pm | सदस्यनाम

अगदी अगदी.
आणि लिहायची स्टैल तर अगदी फिक्स झालीय. सुरुवातीला आम आदमीचा कळवळा आणून थोडे प्रवचन द्यायचे. आपल्या बाब्याला तोंडदेखल्या चार शिव्या देऊन घ्यायच्या अन नंतर मूळ मुद्दा ऊगाळायचा. केंद्र सरकार कसे वाईट, अनुभव कसा नाही, राज्य सरकार कसे अनुनभवी, भगवा अजेंडा कसा राबवलाय, एकूणच काँग्रेस सोडून इतर सर्वजण प्रशासनाला कसे नालायक हे लिहून जाता जाता मिडीयाला दोन शिव्या दिल्या की लेख कसा फुलप्रुफ झाल्यासारखा वाटतो. ह्यांचे टेम्प्लेटस पाठ झालेत आता.

प्रदीप's picture

26 Jul 2015 - 5:18 pm | प्रदीप

आता तुम्ही ट्रोलींग करता आहात, असा आरोप केला जाईल, त्यासाठी तयार रहावे.

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2015 - 1:27 pm | श्रीगुरुजी

>>> ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची या विषयावरची ताजी ब्लॉगपोस्ट वाचनीय आहे.

प्रवीण बर्दापूरकरांच्या त्या लेखावर मी कॉमेंट पाठविली होती. लेखात उपस्थित केलेले मुद्दे (याकूबला गुपचुप फाशी देणे, भगवेकरण, काँग्रेसचे कौतुक इ. मुद्दे) चुकीचे आहेत हे आहेत हे मी सोदाहरण लिहिले होते. सदर लेख पूर्वग्रह व कायदेशीर तरतुदींच्या अज्ञानातून जन्माला आला आहे हे मी लिहिले होते.

प्रवीण बर्दापूरकरांनी माझी प्रतिक्रिया प्रकाशित केलेली नाही!

एकंदरीत त्यांच्यावर लेखाच्या शेवटी उधळलेली स्तुतीपुष्पे - "परखड, चतुरस्त्र, स्वच्छ पत्रकारिता, सेक्युलर, पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा इ. इ." - ही खोटी असून निधर्मांध विचारसरणी, काँग्रेसभक्त, भाजपविरोधक, पूर्वग्रहदूषित आणि कायद्याविषयी अज्ञान असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे असे दिसत आहे.

सुप्रीम कोर्टाने याकुब मेमनची फाशीची सजा कायम केल्यानंतर,राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर याकुबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयायाचिका दाखल करण्याने त्याचे मरण दोनपाच दिवस पुढे ढकलले जाईल इतकेच. मात्र प्रश्न असा आहे की सर्वोच्च यंत्रणेने एकदा शिक्षा कायम केल्यानंतर त्यासंदर्भात तुलनेने कनिष्टह यंत्रणेकडे दाद मागता येते का?याचे उत्तर आजच्या घडीला कदाचित कोणाकडेही नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल ही याचिका फेटाळतीलच याबद्दल दुमत असू नये. कारण तसे न घडल्यास संपूर्ण यंत्रणेचीच अब्रू वेशीला टांगली जाण्याची शक्यता आहे.

एक मात्र निश्चीत की आपल्या व्यवस्थेतील ढिसाळपणा,अनियमितता आणि त्रूटी याकुबच्या याचिकेने अधोरेखीत झाल्या आहेत!

तिमा's picture

26 Jul 2015 - 10:46 am | तिमा

आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय. २९ जुलैला अबू आ़झमी एक मोर्चा काढणार आहे. तरीही ह्या घटनांकडे धर्मनिरपेक्ष दृष्टीने पहावे काय ?

संजय पाटिल's picture

26 Jul 2015 - 10:59 am | संजय पाटिल

या सर्वांवर न्यायालयाचा अवमान या कलमाखाली गुन्हे दाखल करता येतात. पण राजकीय ईच्छाशक्ति हवी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय.

जो स्वतः मनुष्यवधाचा गुन्हा करून, कारागृहात जाण्याची शिक्षा होऊ नये यासाठी खोटे बोलून, अनेक गैर/कायदेशीर उचापती करत आहे; अश्या माणसाच्या भुक्कड वकिली मताला किती महत्व द्यावे याची जाण नसलेले बरेच जण आहेत, हीच जास्त शरमेची गोष्ट आहे !

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 5:31 pm | टवाळ कार्टा

बज्रंगी भैजान्न हिट्ट झालाय ओ काका...आहात कुठे

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते पण लोकांच्या मनात कायद्याबद्दल किती आस्था आहे याचे लक्षण आहेच ! :(

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 9:51 pm | टवाळ कार्टा

कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक्,,,,मिपावरचे वकिल टाकतीलच प्रकाश...पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तात

हं बरोबरंय टका. आणि आपलंच मूर्ख पब्लिक असल्या भाईंना डोक्यावर चढवतं. साला एक हिंदी चित्रपट बघत नै मी या फाल्तू हीरोंमुळे. अगदी "खाणा"वळच चालू है यांची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 10:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक्

ही जबाबदारी कायद्याची नसते... फक्त त्याचे पालन केले नाही तर निरपेक्षपणे योग्य ती शिक्षा द्यावी इतकाच कायद्याचा हेतू असतो.

कायद्याबद्दल आस्था ठेवून त्याचे पालन करणे ही नागरिकांची जबाबदारी असते... आणि सुजाण नागरिक ती समजून आचरण करतात.

पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तात

हे वाचून, एखाद्या महत्वाच्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करू नये ही सुद्धा सुजाण नागरिकांची जबाबदारी असते, हे आठवले.

बाकी चालू द्या.

जडभरत's picture

26 Jul 2015 - 10:16 pm | जडभरत

थिल्लर मुद्दा? डाॅक्टर आपल्याला लव्ह जिहाद माहिती असेलच?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी उद्धृत केलेली वाक्ये परत वाचली तर मी काय आणि का म्हणालो ते कळेल असे वाटते.

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2015 - 10:39 pm | टवाळ कार्टा

+११११
पटेश

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे त्या प्रकारची भाषा कोणत्याही मुद्द्याला मारकच ठरेल. तीच त्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करत आहे, हे ध्यानात आले नाही का ???!!!

अवांतर : मुद्दा मांडताना वापरलेली भाषा मुद्दा मांडणार्‍याची त्या मुद्द्याबद्दलची आस्था दर्शविते.

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2015 - 2:17 pm | टवाळ कार्टा

ते समजले म्हणून तर पटेश असे लिहिले :)

उगा काहितरीच's picture

26 Jul 2015 - 10:54 am | उगा काहितरीच

रच्याकने लेखकाच्या मिपीय वयाच्या मानाने खुपच चांगले लेखन ! कुणाचा असावा बरं डुआयडी ?

नगरीनिरंजन's picture

26 Jul 2015 - 11:30 am | नगरीनिरंजन

गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे.
गुन्हेगार,अतिरेकी व नक्षलवादी यांना एकाच रांगेत बसवणार्‍यांचं काय करावं ते मात्र कळत नाही.

चलत मुसाफिर's picture

26 Jul 2015 - 5:27 pm | चलत मुसाफिर

कुणाला देहदंडाची शिक्षा होणे यात जल्लोष करण्यासारखे काहीही नाही. कायदेशीर प्राणहरण ही केवळ एक दुर्दैवी अपरिहार्यता असून त्यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

न्यायमूर्ती प्रमोद कोडे यांनी वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीही अनुचित आहेत. न्यायाधीश निकालपत्राच्या बाहेर कोणत्याही खटल्यावर भाष्य करत नसतो.

त्याचबरोबर हेही म्हणावेसे वाटते, की डाव्या/ मुस्लिमधार्जिण्या विचारवंत टोळीने यावर केलेला हलकल्लोळ हा सामान्य नागरिकाला संताप आणणारा आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे जर समाज, सरकार, न्यायपालिका, पोलीस, प्रसारमाध्यमे या सर्वांत जर मुस्लिमद्वेष भरलेला असता, तर याकूबची फाशी नक्की व्हायला इतकी वर्षे लागली नसती. प्रत्यक्ष बॉंम्ब बनवण्याचा वा ठेवण्याचा गुन्हा सिद्ध होऊनही काही आरोपींना केवळ कारावासाची शिक्षा झाली नसती.

अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.

वरील वाक्यातच महाराष्ट्र सरकारने असे का केले ह्याचे उत्तर आहे. आधीच्या फाशीच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्याचे महाराष्ट्र शासन पालन करीत आहे. उलट आपण केलेल्या बेजाबदार विधानामुळे गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. कृपया ते काढून टाकावे हि विनंती.

सुबोध खरे's picture

26 Jul 2015 - 8:39 pm | सुबोध खरे

अबू आझमी किंवा अक्बारुद्दिन ओवैसी सारखी माणसे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात. सलमान ची लायकी काय आहे हे सर्वाना माहित आहेच. स्वतः सदोष मनुष्यवधाच्या आरोपात दोषी म्हणून जाहीर झालेला असताना त्याने एखाद्या दहशतवाद्याची पाठराखण करावी हे नैसर्गिकच आहे. पण त्याच्या या बेताल वक्तव्याला अफाट प्रसिद्धी देणारे वार्ताहर आणि वृत्तपत्रे यांची लाज वाटते.
एकीकडे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होत असताना सुजाण मुसलमान लोक मुग गिळून गप्प बसतात याबद्दल वाईट वाटते. अबू आझमी सर्केह चार उंदीर कुचकुचले तर फरक पडणार नाही पण जर बहुसंख्य निधर्मी लोक गप्प बसले तर अशा लोकांचा आवाज कारण नसताना मोठा आहे असे वाटु लागते. अशा दुर्दैवी परिस्थितिचा "श्रीराम सेने" सारखे लोक हि फायदा उठवू शकतात.
नेपोलियनचे वचन आठवते. "दुर्जन लोकांच्या कोलाहाला पेक्षा सज्जन लोकांचे मौन जास्त घातक असते"

सुबोध खरे's picture

26 Jul 2015 - 8:40 pm | सुबोध खरे

जाता जाता -- अबू आझमी किंवा सलमान खान वर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरता येऊ शकतो असे वाटते.

खटपट्या's picture

26 Jul 2015 - 9:54 pm | खटपट्या

असा खटला ओवेसीवरदेखील भरता येइल. सरकार किंवा पोलीस सुओमोटो पद्धतीने कारवाई करु शकते का?
जाणकार प्रकाश टाकतील अशी आशा

यांच्यावरही गुन्हा दाखल करणार काय ?

मृत्युन्जय's picture

27 Jul 2015 - 12:45 pm | मृत्युन्जय

त्यांनी तसे काही विधान अथवा उपद्य्वाप केले असतील तर होय त्यांच्यावरही कारवाई करावी.

चिनार's picture

27 Jul 2015 - 12:48 pm | चिनार

सह्मत !

dadadarekar's picture

27 Jul 2015 - 12:51 pm | dadadarekar

सलमान .... याकूबला फाशी नको.

शत्रुघ्न , झेटमलानी ... याकुबला फाशी नको.

एकच वाक्य सर्वानी उच्चारले आहे , शत्रुघ्न सिन्हा व झेटमलानीवर हिंदुत्ववादी का तुटुन पडले नाहीत ?

मृत्युन्जय's picture

27 Jul 2015 - 1:04 pm | मृत्युन्जय

याकूबला फाशी द्यावी की नाही याबद्दल तुमचे मत काय? ते आधी सांगा मग पुढचे बोलु. माझे मत फाशी झालीच पाहिजे. विनाविलंब.


एकच वाक्य सर्वानी उच्चारले आहे , शत्रुघ्न सिन्हा व झेटमलानीवर हिंदुत्ववादी का तुटुन पडले नाहीत ?


सलमानने टीवटीवाट केला आहे. आणि कुठल्याश्या पत्रावर शत्रुघ्न सिन्हा आणि जेठमलानी यांनी सह्या केल्या आहेत अशी बातमी आहे. ते पत्र बघायला आवडेल. शत्रुघ्न सिन्हा म्हणतात त्यांनी सही केली नाही.
अर्थात अश्या आशयाचे कोणतेही पत्र पाठवले असेल तर ते निषेधार्ह आहे. कारवाई व्हायलाच हवी.
हिंदुत्ववादी जर त्यांच्यावर तुटुन पडत नसतील तर तुमच्या राहुल बाबांना सांगा की संसद बंद पाडायला. तेव्हढाच कारण मिळेल त्यांना ..हो पण त्याआधी जरा विषय समजावून सांगाल त्यांना ..म्हणजे मुंबई कुठे आहे ? १९९३ ची घटना...याकुब,टायगर ,दाउद..वगैरे वगैरे

सुबोध खरे's picture

27 Jul 2015 - 8:12 pm | सुबोध खरे

हितेस्भाऊ
चष्मा काढा कि.
जेठमलानी किंवा शत्रुघ्न सिंह यांनी फाशी देऊ नये असे म्हटले आहे. फाशीची शिक्षा मुळात असावी कि नसावी हा विषय वेगळा आहे. त्यांनी याकुब निर्दोष आहे असे म्हटले नाही.
सलमानने याकुब निर्दोष आहे असे म्हटले होते. हे ठरवणारा हा बोकड कोण?त्याल कायद्याचे काय ज्ञान आहे? स्वतः गाडी घालून लोकांना मारल्याबद्दल दोषी ठरलेला आहे.
किंवा ओवैसी म्हणतात कि तो मुसलमान आहे म्हणून त्याला फाशी दिले जात आहे. याला कोणता आधार आहे? उगाच निष्पक्ष असणार्या न्यायसंस्थेला आपल्या घाणेरड्या राजकारणात ओढणारा हरामखोर माणूस आहे. जातीय दंगे भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला टाडा लावायला पाहिजे. उगाच हिंदू आणी मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

26 Jul 2015 - 9:07 pm | वॉल्टर व्हाईट

गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

तथाकथित उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ येउन गेलीये आणि काळ सोकावलाय असे मत आहे. पण प्रश्नकर्ता अंतर्मुख होण्यास भाग पाडायचे म्हण्जे काय करायचे याबद्दल काहीच बोलत नाहीये, त्यामुळे हे मत इथे अयोग्य ठरू शकते.

विद्यार्थी's picture

26 Jul 2015 - 9:55 pm | विद्यार्थी

राजकारणी लोक आणि तथाकथिक उदारमतवादी हीसुद्धा माणसेच आहेत. समाजातून मिळणाऱ्या पाठीम्ब्यापेक्षा चुकीच्या गोष्टींना न होणारा विरोध हा मुद्दा आहे. समाजात, राजकारणात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून नफा किंवा फायदा कमावण्याची वृत्ती बळावली आहे. एक तर हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करतात किंवा इतर कोणाच्या सांगण्यावरून फुटकळ आर्थिक मोबदल्यासाठी करतात.

हा इंटरनेटचा जमाना आहे. न्यायालयेसुद्धा सक्रिय आहेत. या सगळ्याचा उपयोग करून या लोकांना जे ते करत आहेत ते करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो.

आपण सगळे मिपाच्या माध्यमातून याविषयी चर्चा करतोय हीसुद्धा चांगली सुरुवातच नव्हे का?

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2015 - 10:52 pm | श्रीगुरुजी

भारतातील ४० निधर्मांधांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून याकूब मेमनची फाशी रद्द करावी अशी विनंती केली आहे. या पत्रावर खालील मंडळींच्या सह्या आहेत.

- शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, सीताराम येचुरी, कराट दांपत्य, जॉन दयाल, तुषार गांधी, मणी शंकर अय्यर, राम जेठमलानी, डी. राजा, अनेक निवृत्त न्यायाधीश, इरफान हबीब, अरूणा रॉय, . . . इ.

शत्रुघ्न सिन्हाने या पत्रावर आपली स्वाक्षरी नसल्याचे सांगितले आहे.

या यादीत महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, कम्युनिस्ट नेते, मण्या अय्यर इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. यांना पाकिस्तानविषयी वाटणारा कळवळा आणि अतिरेक्यांविषयी वाटणारे प्रेम जगजाहीर आहे. या यादीत अरूंधती रॉय व डॉगविजयचे नाव कसे नाही याविषयी आश्चर्य वाटत आहे.

तर दुसरीकडे "सर्वोच्च न्यायालयाने बनावट पुरावे आणि पोलिसांनी छळ करून मिळविलेला कबुलीजबाब यावर विसंबून याकूबला शिक्षा दिली" असे तारे आचरट शिरोमणी काटजू यांनी उधळले आहेत.

एकंदरीत याकूबच्या फाशीमुळे निधर्मांधांना सुगीचे दिवस आले आहेत.

हं नाहीतर या फ्लाॅप लोकांना कोण विचारतो?

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2015 - 10:59 pm | श्रीगुरुजी

>>> भारतातील ४० निधर्मांधांनी

हा आकडा चुकला आहे. प्रत्यक्षात २००+ निधर्मांधांनी सह्या केल्या आहेत.

शब्द मस्त वापरलात गुरुजी!!! निधर्मी अंध!!!

प्यारे१'s picture

26 Jul 2015 - 11:18 pm | प्यारे१

कोण सलमान खान आणि कोण हे तथाकथित निर्धर्मांध?
A wednesday चित्रपट बघून नासिर आवडला होता. फाशी देऊ नये म्हणून सह्या काय करतात हे येड*वे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jul 2015 - 1:51 am | निनाद मुक्काम प...

कोंग्रेज ने दहशतवादाची समझोता नाही अशी आता भूमिका घेतली आहे चेपू वर त्यांच्या पोस्ट ला मी चक्क लाईकले .
राजीव च्या मारेकऱ्यांना माफी देण्याचा अर्ज देतांना कुठे गेली होती अक्कल असे प्रश्न नाही विचारायचे
मात्र रॉ च्या माजी प्रमुख कै रमण ह्यांनी याकुब ला भारतात आणले होते त्याच्या फाशीच्या निर्णयाच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती ह्या बदल्यात याकुब ने बरीच माहिती दिली होती, असे कळते
याकुब चे चुकले कुठे की भारतात येण्याआधी त्याने भारतीय सरकार कडून लिखित स्वरुपात आपल्याला फाशी देणार नाही असे लिहून घ्यायचे होते किंवा तसा गोपनीय करार करायचा होता.
अबू सालेम ला युरोपियन देशातून हस्तांतर केले तेव्हा त्यांच्या कायद्यानुसार भारताला सालेम ला फाशी देणार नाही असे लिखित स्वरुपात द्यावे लागले.
दाउद ने जेठमलानी तर्फे अटी घातल्या होत्या
माझ्या मते अजित दोवेल ह्यांनी आधी छोटा राजन च्या मदतीने दाउद चा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता आता तर त्यांच्या हातात ताकद आहे तेव्हा दाउद ला संपवणे हा मोदी सरकार चा अजेंडा होताच तेव्हा छोटा राजन अधिक प्रमाणात सक्रिय करण्यात आला असावा
माझ्या वाचण्यात छोटा राजन व्हिएतनाम मध्ये चीन च्या विरोधात स्थानिक माफियांच्या सोबत कारवाया करत आहे तेव्हा त्याला संपविण्यासाठी कांगारूच्या देशात डी कंपनीने नुकताच प्रयत्न केला.
त्याला उत्तर म्हणून याकुब ला फासावर चढवण्याचा निर्णय घेतला गेला ,
फाशीची शिक्षा मिळालेले अनेक जण प्रतिक्षायादीत आहेत .
आहेत ,कोणाला कधी फाशी द्यायची ह्यांचे सरकारचे स्वतःचे निकष असतात. अफजल ते कसाब ह्यांना फासावर देतांना
सुद्धा मतांचे राजकारण होते
ह्या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे आपल्या घटनेत बदल
दहशतवादी कार्याबाबत फाशी झालेल्या व्यक्तीस सर्वोच्च न्यायालयाने फाशी वर शिक्कामोर्तब केले की महिन्याचा आता फाशी द्यावे त्यांना दयेचा अर्ज वगैरे सुविधा असू नये

चिरोटा's picture

27 Jul 2015 - 12:09 pm | चिरोटा

मात्र रॉ च्या माजी प्रमुख कै रमण ह्यांनी याकुब ला भारतात आणले होते त्याच्या फाशीच्या निर्णयाच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती ह्या बदल्यात याकुब ने बरीच माहिती दिली होती, असे कळते

खरे आहे.

Mr Raman's argument was that while for Indians the country is bigger than anything else, a country can command respect only by honouring its commitments.

रॉ व आय.बी.ने(आय.एस.आय व ईतर पाकिस्तानी यंत्रणांशी) वाटाघाटी करूनच याकुबला भारतात आणले असावे.अन्यथा टायगर मेमेन व ईतर दुबई/पाकमध्ये राहिले तसाच तो ही राहिला असता. काठमांडूला याकुब कोणत्यातरी समारंभासाठी आला होता व नंतर दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसला...व नंतर त्याला अटक झाली.. अशी बातमी होती तेव्हा.
http://www.rediff.com/news/column/exclusive-b-ramans-unpublished-2007-ar...

तुडतुडी's picture

27 Jul 2015 - 12:46 pm | तुडतुडी

तरी म्हनल ह्या विषयावर अजून कसा धागा आला नाही

म्हणून स्थानिक विध्यार्थ्यांनी ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली>>>
ह्यात नवीन काय आहे ? त्या लोकांची वृत्तीच आहे ती स्वतःला काही उदात्त निर्माण करता येत नाही म्हणून दुसर्यांविषयी इर्षा वाटून त्यांच्या अश्या उदात्त वास्तू , पुस्तके , उपकरणं नष्ट करायची . नालंदा, तक्षशीला विद्यापीठ , सुंदर सुंदर मंदिरं , अश्याच अनेक वास्तू त्यात समाविष्ट आहेत .
फाशी गुपचूप द्यावी ह्यावर आक्षेप घेण्याचं कारण काय ?

संबंधित गुन्हेगाराला सर्व लीगल रिकोर्स मिळाले पाहिजेत आणि नातेवाईकांना भेटता आले पाहिजे वगरे.>> हे गुन्हेगार बॉम्ब स्फोट करतात तेव्हा तेव्हा हीच प्रोसिजर follow करतात का ?मग त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी पाळायची काही गरज नाही . आणि त्या कागदावर सह्या करणार्यांना म्हणावं ठीक आहे याकुब ची फाशी रद्द केली जाईल. जे लोक मेलेत त्यांना जिवंत करून द्या. ह्याच्या घरातलं कोणी मेलं नसेल म्हणून हि थेरं सुच्तायेत

या यादीत महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, कम्युनिस्ट नेते, मण्या अय्यर इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. >> आयुष्यभर चंदेरी आभासी दुनियेत राहायचं . ह्यांची कला म्हणजे काय तर खोटी खोटी डायलॉगबाजी कारण , ढुंगण हलवत नाचणं , खोटं खोटं हसणं आणि खोटं खोटं रडणं . त्यांची अक्कल ती काय ? कलाकार आहेत म्हणजे सगळ्या क्षेत्रातले तज्ञ झाले का हे ?

अप्पा जोगळेकर's picture

27 Jul 2015 - 1:28 pm | अप्पा जोगळेकर

त्या यादीत दादा दरेकर हे नावदेखील आहे का ?

म्हणुन सही नाय केली.

सही करुनही शत्रुघ्न नाही म्हणतोय की खरोखरच त्याने सही केलेली नाही ?

नसेल... तिथे ह्या लखोबा ने वेगळ्या नावाने सहि केलि असेल.

मृत्युन्जय's picture

27 Jul 2015 - 1:51 pm | मृत्युन्जय

माझे तर मत आहे मोदी आनंदाने करमणूक बघत असतील आता. या फालतु लोकांचे देशद्रोही चेहरे समोर यायला लागलेत. मोदींना कधी बोलावे आणि कधी शांत बसावे बरोबर कळते. ते बोलतात तेव्हा सुद्धा असल्या लोकांची ठासली जाते (आणि मग प्रेस्टिट्युट्स मोदींनी कसा संयम बाळगला पाहिजे वगैरे केकाटतात) आणि ते शांत बसतात तेव्हा ही थर्डक्लास लोकच स्वतः किती रद्दी आहेत हे लोकांना दाखवुन देतात. अजुन घोष बाई नाही रेकल्या?

व्यापमं च्या निमित्ताने जे चालले आहे, हे देखिल त्यांच्या करमणूकीचे साधन आहे काय ?
(अवांतर होत आहे, पण राहवल नाही हा भाबडा प्रतिसाद बघुन.)

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 10:57 pm | मृत्युन्जय

खरे सांगायचे तर हो. उगाच का हे प्रकरण एवढ्या चव्हाट्यावर आलय? शिवराज चौहान एकेकाळी मोदींचे प्रतिस्पर्धी होते हे विसरलात?

प्यारे१'s picture

29 Jul 2015 - 11:05 pm | प्यारे१

एवढ्या खालच्या पातळीवर 'पक्षान्तर्गत' राजकारण गेलं नसावं. मध्यप्रदेशात भाजपाचं नुकसान म्हणजे मोक्याच्या 30 जागा तरी नुकसान. मोदी नाहीत करायचे असं असा अंदाज. बाकी विरोधी नेत्यांना धोबीपछाड़ देण्यात मोदींचा हातखंडा आहे. मुलासकट उखडून टाकतात (ळ नव्हे ल च)

ट्रेड मार्क's picture

30 Jul 2015 - 1:50 am | ट्रेड मार्क

व्यापमं विषयी जर अजून माहिती गोळा करा….बादरायण संबंध यालाच म्हणतात.

विकास's picture

29 Jul 2015 - 10:58 pm | विकास

हे घ्या!

पुण्याचे वटवाघूळ's picture

27 Jul 2015 - 2:13 pm | पुण्याचे वटवाघूळ

आजच पंजाबात दहशतवादी हल्ला झाला आहे आणि इथे आपण एका दहशतवाद्याला दया दाखवावी का म्हणून चर्चा करत आहोत. डिजगस्टींग. सोडा अजून दहशतवाद्यांना. बोलवा दहशतवाद्यांना हल्ले करायला. आजच्या हल्ल्यातील एक दहशतवादी स्त्री आहे म्हणे. समजा ती मेली नाही आणि पकडली तर परत आपले मानवाधिकार वाले स्त्री ला फाशी कशी देणार म्हणून आकांडतांडव करणार. कसाबही अंडरएज आहे म्हणून त्याला सोडा असे त्याला दिलेला महामूर्ख वकिल बरळला होता.म्हणजे काय-- तर त्यांनी अंडरएज मुले पाठवावीत, स्त्रिया पाठवाव्यात, इथल्या लोकांना मारावे आणि तरीही आपला कायदा काहीही करणार नाही. या असल्या मानवाधिकार वाल्यांना आपणच पोसतो. जिथे दिसतील तिथे आपण त्यांना थोबडावत नाही, त्यांच्या अंगावर थुंकत नाही. मग काय होत राहणार दहशतवादी हल्ले. त्याविषयीही तक्रार का करा? साला आपली लायकीच ती.

जडभरत's picture

27 Jul 2015 - 3:04 pm | जडभरत

ते सर्व लाईव्ह बघणे खूप क्लेशकारक आहे. खरे तर आपणातच आस्तिन के साप दडलेत. जितका म्हणून राक्षसी आरोपी दहशतवादी असेल त्याचा यांना जास्त पुळका.

अस्वस्थामा's picture

27 Jul 2015 - 7:44 pm | अस्वस्थामा

याकुब मेमनला त्याच्या सर्व समर्थकांसोबत या पंजाबातल्या दिनानगर गावात नेऊन घटनास्थळाची "सफर" घडवावी आणि मग त्या समर्थकांना विचारावे, आता काय ? :|

वेन्सडेचा नासिरुद्दीन शहा सही करताना "२६/११ फक्र है" हे किमान आठवत असेल का असा प्रश्न पडला..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jul 2015 - 1:37 am | निनाद मुक्काम प...

याकुब च्या निमित्ताने काही गोष्टी मला अजून
उमजल्या नाहीत
तो भारतात काय म्हणून परत आला
किंवा त्याला आय एस आय शी बार्गेनिंग करून रमण ह्यांनी आणले असे म्हणणे योग्य ठरणार नाही
कारण रमण ह्यांना बार्गेन करायचे तर टायगर साठी करतील
किंवा दाउद साठी गेला बाजारभाव दौउद चा भाऊ व छोटा शकील ह्यांच्यात विस्तव जात नाही तेव्हा त्यांच्या पैकी एकाला आणतील
माझ्यामते याकुब ला पाकिस्तानात राहणे पसंद नव्हते
भारतात येण्यासाठी दाउद ने जसा जेठमलानी ह्यांना संपर्क साधला तसा याकुब सुद्धा प्रयत्नात असावा
तेव्हा रमण ह्यांनी धूर्तपणे त्यास भारतात बोलवून त्यांचा कडून माहिती काढण त्या बदल्यात तुरुंगवास व पुढे कदाचित जामिनावर सुटका असे वचन दिले असावे म्हणून त्यांनी न्यायालयात याचिका सादर केली असेल ह्यात त्यांच्या देश प्रेमावर मला अजिबात शंका येत नाही
पण त्यांचे निधन झाले व आजच्या राजकारणात याकुब ची फाशी ह्या घटनेला अनेक अर्थानी महत्व प्राप्त झाले
मुंबई हल्ल्यातील कसाब फासावर लटकला पण त्याहून आधी १९९२ च्य हल्यातील कोणालाही फासावर लटकता आले नाही
नाही म्हणा त्यातील काही आरोपी जामिनावर सुटले तेव्हा देशभक्ती सिद्ध करण्यासाठी असे वृत्त पत्र म्हणतात छोटा राजन ने त्यांचा गेम केला , का आय बी ने करवला
जे झाले उत्तम झाले ,
तात्पर्य असे की मुळात रमण ह्यांनी जर खरच याकुब ला असे काही वचन दिले असेल तर सर्वोच्च न्यायालयात त्याला शिक्षा
होण्याच्या आधी काहीतरी जुगाड आपल्या सरकार तर्फे करायचा होता त्याला मासा करायचा होता म्हणजे फाशी जन्म ठेपेवर आली असती कदाचित पण एकदा न्यायालयाने शिक्षा दिल्यावर ती बदलावी असा दुराग्रह करणे हा न्यायालयाचा अवमान करणे आहे
त्यामुळे फाशी ही अटल आहे उद्या पर्यत ती नक्की करावी असे मला वाटते
अवांतर
दाउद ने आपल्या मुंबई मधील कारभारावर लक्ष राहावे म्हणून आपल्या छोट्या भावाला भारतात पाठवला
त्याला काहीकाळ तुरुंगवास होऊन आज तो जामिनावर मुंबईत
मुक्तपणे फिरत आहे नाही म्हणायला त्याने नानाचा सिनेमातील नव्हे नव्हे गेम करायचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर खुनी हल्ला सुद्धा झाला
पण असाच काहीच बेत टायगर ने याकुब विषयी योजला असेल
अवांतर
टायगर मेनन ची भूमिका पवन मल्होत्राने झोकात केली होती

चिरोटा's picture

28 Jul 2015 - 1:39 pm | चिरोटा

माझ्यामते याकुब ला पाकिस्तानात राहणे पसंद नव्हते

त्याने दिलेल्या मुलाखतीनुसार ही सर्व गुन्हेगार मेमन मंडळी कराचीत डिफेन्स कॉलनीत एका मोठ्या बंगल्यात राहत होती.जेव्हा त्याला नेपाळमध्ये पकडला तेव्हा त्याच्याकडे काही पासपोर्ट्स्,काही व्हिडियोज सापडले.कोणताही गुन्हेगार असला माल घेऊन दुसर्या देशात,तेही भारताच्या मित्र देशात असा जाणार नाही.आय.एस.आय. किंवा दाउदच्या परवानगीशिवाय तो असा बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे.कारण येथे पोचल्यावर तो सर्व माहिती सी.बी.आय.ला देणार हे उघड होते.अपेक्षेप्रमाणे त्याने बरीच माहिती दिली,ज्यावरून पोलिसांना अनेकांना पकडणे शक्य झाले.भारता पोचल्यावर त्याने पत्नीला व काही भावांनाही येथे बोलवून घेतले.

श्रीगुरुजी's picture

28 Jul 2015 - 12:59 pm | श्रीगुरुजी

काय विरोधाभास आहे!

भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिले तेव्हा काही तत्कालीन विचारवंतांनी व प्रभावी नेत्यांनी त्यांच्या फाशीला विरोध केला नाही व त्यांना फाशी देऊ नये अशी ब्रिटिशांना विनंती केली नाही.

पण आता याकूब मेमनला फाशी देण्याच जाहीर झाल्यावर त्याला फाशी देऊ नये अशी विनंती करणार्‍यांची मोठी फौज उभी आहे.

कालाय तस्मै नमः!

आजच्या टाईम्स ओफ इंडीया मधे आलेला याकुबच्या वकीलांचा युक्तीवाद असा की, याकूब १९९६ पासून स्किझोफ्रेनिया चा रूग्ण आहे. त्यात तो गेली २० वर्षे तुरुंगात आहे जी जन्मठेपेपेक्षा जास्त शिक्षा होते. आणि एका गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि फाशी देउ नये..

(स्किझोफ्रेनिया झाल्यावर याकूबला कन्या रत्नाचा लाभदेखील झाला)

तो भारतात काय म्हणून परत आला>>
तो भारतात परत आला नाही . नेपाळ मध्ये असताना त्याला काठमांडू पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती . तिथून त्याला दिल्लीला आणण्यात आलं आणि नेपाळ आपला दोस्त असल्यामुळे त्यांनी त्याला आपल्या हवाली केलं.
याकुब आधी दुबईला , मग पाकिस्तान , मग bankok आणि तिथून नेपाळ ला गेला .

तेव्हा रमण ह्यांनी धूर्तपणे त्यास भारतात बोलवून त्यांचा कडून माहिती काढण त्या बदल्यात तुरुंगवास व पुढे कदाचित जामिनावर सुटका असे वचन दिले असावे >>> याकुब काय कुक्कुलं बाळ आहे का हो ? शेंबड्या पोराला सुधा हा धूर्तपणा लक्षात येवू शकेल

याकुब च्या फाशीला मिडिया ने नको तेवढं महत्व दिलंय . आणि हा असा गोंधळ होणार असेल तर ह्यापुढे फाशी गुपचूप दिली जावी . त्या मानवाधिकारवाल्यांकडे एवढं लक्ष द्यायची गरज नाही

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jul 2015 - 3:45 pm | निनाद मुक्काम प...

सगळे मेनन पाकिस्तानात लपले होते तेव्हा हा नेपाळ मध्ये पर्यटनाला गेला होता का . आय एस आय ने त्याला असे मुक्त बागडायला परवानगी दिली
आणि रॉ च्या प्रमुख रामान हे देशद्रोही मानायचे का त्यांनी त्याच्या फाशिविरोधात याचिका केली
लक्षात घ्या महेश भट्ट व रमण ह्यांनी फाशी न होण्या मागे घेतलेल्या घेतल्याला भूमिकेत जमीन अस्मानाचा फरक आहे.

कुक्कल बाळ...
दाउद चा भाऊ भारतात परत आला त्याला अटक केली , खटला भरला व मग रीतसर जमीन मिळवून सध्या मस्त जीवन जगत आहे , दाउद चा कारभार सांभाळत आहे ,
भारतात शिक्षा झालेले जयललिता लालू सलमान असा लांबलचक इतिहास पहिला तर याकुब चा त्यावेळचा निर्णय अगदीच बाळबोध नव्हता.

चिरोटा's picture

28 Jul 2015 - 4:12 pm | चिरोटा

२५७ माणसे ठार झाली आहेत अशा केसमध्ये 'आपण कधीतरी सुटू शकतो' अशी कल्पना कोणी करीत असेल तर तो मूर्ख म्हंटला पाहिजे.कदाचित फाशी नाही पण आपण आयुष्याच्या अखेरपर्यंत तुरुंगातच असणार आहोत ह्याची कल्पना याकुबला भारतात परतताना नसेल ?

तुडतुडी's picture

28 Jul 2015 - 5:12 pm | तुडतुडी

सगळे मेनन पाकिस्तानात लपले होते तेव्हा हा नेपाळ मध्ये पर्यटनाला गेला होता का>>
त्याचं त्यालाच माहित .
याकुब भारतात परतला नवता हो . त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली म्हणलं ना .

तुडतुडी's picture

28 Jul 2015 - 5:18 pm | तुडतुडी

दाउद चा भाऊ भारतात परत आला त्याला अटक केली , खटला भरला व मग रीतसर जमीन मिळवून सध्या मस्त जीवन जगत आहे , दाउद चा कारभार सांभाळत आहे>>>
कोणता भाऊ ? आणि असं असेल तर त्याचा त्या गुन्ह्यात तेवढा हात नसेल . न्यायालयाने काय त्याला असाच सोडून दिला असं म्हणायचय का तुम्हाला ?
मेनन चा मात्र ह्या गुन्ह्यात सिंहाचा (असा शब्दप्रचार आहे ) वाटा होता.
न्यायालयाचा अवमान करता ऑ …

हे लोक जिहाद (धर्मयुद्ध ?) लढत असतात तर असे लपून छापून का हल्ले करतात ? हे आमचं धर्मयुद्ध आहे असं म्हणून शूरासारखं समोर येवून का लढत नाहीत ? आणि धर्मकार्य म्हणून फासावर का जात नाहीत ? आता का जीवाची भिक मागत दयेची याचना करतात ?

dadadarekar's picture

29 Jul 2015 - 1:19 am | dadadarekar

धर्माच्या नावानं मरणं ही पुरातन धर्माची ओळख आहे.

धर्माच्या नावानं मारून मरणं ही नूतन धर्माची ओळख आहे.

....

नूतन आयडीवाला दादूमियाँ

विद्यार्थी's picture

29 Jul 2015 - 1:32 am | विद्यार्थी

एकदम बरोबर दादा!!!

अर्धवटराव's picture

29 Jul 2015 - 3:14 am | अर्धवटराव

कित्ती छान सगळं मरण, मरण, मरण. बरोबर आहे. जीवनावर प्रेम, मुल्य वगैरे फालतु भानगडीत पडायचच कशाला.

dadadarekar's picture

29 Jul 2015 - 6:18 am | dadadarekar

जे निमूटपणे मरतात ते इहलोकापेक्षा परलोकातील सुखावर प्रेम करतात .

जर प्रेम , सुख वगैरे गोष्टींचं नव्या धर्माला वावडं आहे तर बिर्यानी , शेरोशायरी , ताजमहाल, अनारकली , तानसेन ...... हे सगळे काय ?

....
मनसोक्त शहेनशाह दादूखान

अर्धवटराव's picture

29 Jul 2015 - 6:02 pm | अर्धवटराव

आधि आपण सर्व उपभोग घ्यायचे. आणि इतरांना 'वरची' वाट दाखवुन आपली परलोकीच्या उपभोगांची बेगमी करायची. कित्ती उदात्त.

dadadarekar's picture

29 Jul 2015 - 6:24 pm | dadadarekar

हे जग म्हणजे मोहमाया आहे... ते उरपाटे असे झाडाचे प्रतिबिंब आहे... खरे झाड ' वर ' आहे म्हणे ! असले तत्वद्नान असणार्‍यानी कशाला ' खाली ' रहायचे ?

संदीप डांगे's picture

29 Jul 2015 - 6:47 pm | संदीप डांगे

तरीच जन्नतची वाट बघत जमिनीत दडून राहता व्हय... ?

जडभरत's picture

29 Jul 2015 - 7:27 pm | जडभरत

आणि तिथे म्हणे बारबालक मदिरेचे चषक हातात घिऊन वाटतात म्हणे सगळ्या पुण्यवंतांना!!!
आणि पृथ्वीवर कुठ्ठेच नसतील अशा सुंदरी म्हणे सेवेचे ठाई तत्पर असतात!!!
कसली श्येवा तेवडं इचरू नका.

तिथे म्हणजे जन्नत मध्ये. पाकसाफ लोकांच्या...

dadadarekar's picture

29 Jul 2015 - 8:15 pm | dadadarekar

त्या आता शेपाचशे वर्शात आल्या हो.

पण सोमरस पाजणार्‍या अप्सरा त्याच्याही आधीपासुन आहेत ना ?

प्यारे१'s picture

29 Jul 2015 - 9:21 pm | प्यारे१

शी बाबा!

मग काय '...' फायदा बदलून ?????
शेवटी (अ‍ॅट द एन्ड ऑफ द डे) सगळंच पॅकेज शेम टु शेम आहे काय?

बाकी या वयात 'कापाकापी' केलेली झेपणारे का दादा तुम्हाला? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jul 2015 - 10:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यारे ह्या एका प्रतिसादासाठी _/\_. ठ्ठो!!! बरचं ठणकणारे हे =))

बॅटमॅन's picture

30 Jul 2015 - 1:44 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

अग्गा बाब्बौ =))

संदीप डांगे's picture

30 Jul 2015 - 3:57 pm | संदीप डांगे

अहो इकडल्या पॅकेजमधे इंस्टंट फायदा आहे. तिकडे जमीनीत किती युगं पुरून राहायला लागेल ते त्या 'खोदा'ला माहित. त्यानंतर कधीतरी निवाडा होऊन 'ह्यांना' बहात्तर सुंदर्‍या मिळतात की बहात्तर शौकिन नवाबांना 'हे' मिळतील हे कळेल.

अप्सरा वाटताहेत ते एक ठीक हो. या पाकसाफ लोकांना जन्नत मध्ये मदिरा वाटायला पोरगे का पाहिजेत???

अर्धवटराव's picture

29 Jul 2015 - 7:23 pm | अर्धवटराव

आणि कोणि खाली राहातो म्हटलं तरी आपण त्यांना बरं खाली राहु देऊ. पवित्र कार्य हाती घेतलय ना.

ट्रेड मार्क's picture

29 Jul 2015 - 6:31 pm | ट्रेड मार्क

पण निरपराधांना मारून मारणाऱ्यांना परलोकात ७२ सुंदर्यांचा लाभ होतो म्हणतात ना? मग ते परलोकातल सुख नाही का?

मला तर वाटत होतं कि याकूब पण ७२ सुंदर्यांसाठी आतुर असेल. कशाला उगाच माफीनामा वगैरे देत बसलाय? त्या सुंदर्या म्हाताऱ्या होत चालल्यात.

जडभरत's picture

29 Jul 2015 - 6:39 pm | जडभरत

हाण तेजामारी!!! सुंदर प्रतिवाद!!! शाब्बास!!!

मला तर वाटत होतं कि याकूब पण ७२ सुंदर्यांसाठी आतुर असेल

ता काय मेल्यावर लगेच मिलात नाय.. आधी आंगठे धरून बाकीचे मरेपर्यंत वाट बघावी लागते म्हणतात. तो म्हणला असेल त्या हजारो वर्षांपैकी १५-२० इथेच काढू. बचेंगे तो और भी लढेंगे.

ट्रेड मार्क's picture

3 Aug 2015 - 6:17 pm | ट्रेड मार्क

चांदणी काढून खाली बारीक अक्षरात लिहिलेले असते कि काय? या अटी व शर्ती या लोकांना सांगत नाहीत बहुतेक. उगाच आशेला लावून ठेवतात.

तसं पण यांना प्रार्थनेच्या वेळेला बसून पायाचे अंगठे धरायची सवय असते की…पुढ्च्याचे ;)

विकास's picture

29 Jul 2015 - 2:11 am | विकास

आज व्टिटरवर पाहीलेले एक चित्र...

...

याकुबसाठी ज्या लोकांना मानवता आठवते त्या लोकांना बॉब्मस्फोटात ठार झालेल्यां बद्धल काहीच वाटत नाही हे विशेष !
सर्वोच्च न्यायलयाने जो निर्यण दिला तो विचार करुनच दिला ना ? मग ह्या मंडळींना याकुबच्या बाबतीत इतके प्रेमाचे उमाळे का ?
याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम लोकप्रतिनिधी एकवटले, राष्ट्रपतींना पत्र
LIVE: याकूब मेमनच्या याचिकेवर सुनावणी सुरु

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

सुबोध खरे's picture

29 Jul 2015 - 12:38 pm | सुबोध खरे

सत्य काय आहे? एक पैलू
http://www.dailyo.in/politics/yakub-memon-1993-mumbai-blasts-tiger-memon...

याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम लोकप्रतिनिधी एकवटले, राष्ट्रपतींना पत्र>>
तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो . म्हणून तर ते मुसलमान कुठल्याकुठून येवून भरत खंडावर ६०० वर्षे राज्य करू शकले .देशाचे तुकडे पाडू शकले . संपत्ती, अब्रू लुटून नेवून हिंदूंना भिकारी बनवू शकले . हिंदूंना मात्र कधीच अक्कल आली नाही .

फाळणीच्या वेळी मुस्लिम लोकांची इथे घरं होती , बिसनेस होता , नोकर्या होत्या . पाकिस्तानमध्ये गेल्यावर ह्या सगळ्याला मुकावं लागेल . म्हणून काही मुस्लिम भारतातच राहिले . त्यांना ह्या देशाबद्दल प्रेम बीम आहे म्हणून नाही राहिले कै

dadadarekar's picture

29 Jul 2015 - 2:13 pm | dadadarekar

:)

जडभरत's picture

29 Jul 2015 - 4:09 pm | जडभरत

आपण नक्की कोण आहात, दादा दरेकर?
हर हर न हिंदुर्नयवनः!!! :) :) :)
गंमतीत घ्या!!!

ट्रेड मार्क's picture

29 Jul 2015 - 6:45 pm | ट्रेड मार्क

स्वतःला सच्चे आणि चांगले म्हणवणारे मुसलमान पण आतंकवादी मुसलमानांचा विरोध करताना दिसत नाहीत. वरवर दाखवण्यापुरत म्हणायच आम्ही आतंकवादाचा निषेध करतो पण असं सगळे चांगले मुसलमान एकत्र येवून आतंकवाद्यांना सांगत नाहीत कि जे निरपराधांना मारतात ते धर्मभ्रष्ट आहेत आणि मुस्लिम धर्मात त्यांच्यासाठी जागा नाही.

सुबोध खरे's picture

29 Jul 2015 - 8:04 pm | सुबोध खरे

तुडतुडी ताई
भांडणे आणि मारामारी करणे हा मुसलमानांचा स्वभाव आहे. जेंव्हा बाहेरचा कोणी मिळत नाही तेंव्हा ते आपापसातच भांडतात आणि एकमेकांचा जीव घेतात. इराण आणि इराक देश यांचे ८ वर्षे युद्ध चालले आणि त्यात १० लाख लोक मेले हे सर्व मुसलमानच होते ना?https://en.wikipedia.org/wiki/Iran%E2%80%93Iraq_War
पाकिस्तानात दहशतवादाने दहा वर्षात ३५, ००० बळी घेतले( हा अधिकृत आकडा आहे, आणि बेपत्ता झालेले ( मारले गेले आणि सापडले नाहीत असे कितीतरी असतील. आणि हा आकडा वाढतच चालला आहे.
जो धर्म हिंसाचारला प्रोत्साहन देतो त्याचे पहिले बळी स्वतःचेच अनुयायी असतात.
https://en.wikipedia.org/wiki/Terrorism_in_Pakistan
https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents_in_Pakistan_si...

ट्रेड मार्क's picture

29 Jul 2015 - 8:30 pm | ट्रेड मार्क

ते युद्ध होते आणि आता चालू आहे तो दशहतवाद. भ्याड हल्ले आणि निरपराधांना मारणे हेच सर्व मुसलमान पूर्वापार करत आलेले आहेत.

धर्माच्या खोट्या कल्पना, कट्टरवाद आणि मनुष्य धर्माला काळिमा फासणारी कृत्ये करणे या पलीकडे या लोकांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे महाभारताची तुलना इथे अस्थायी आहे.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2015 - 8:35 pm | मृत्युन्जय

१२० कोटी लोक मेले होते

सुबोध खरे's picture

29 Jul 2015 - 8:43 pm | सुबोध खरे

काय पुरावा आहे? मी म्हणतो महाभारत झालेच नाही.

अर्धवटराव's picture

29 Jul 2015 - 8:48 pm | अर्धवटराव

राज्य/राजकारणासाठी होणारी साठमारी आणि आपली ( अत्यंत उदात्त, शुद्ध तार्कीक ) मतं न मानणार्‍याला जीवनातुन उठवायची धर्माज्ञा यात काहिच फरक नाहि.

रॉजरमूर's picture

29 Jul 2015 - 11:16 pm | रॉजरमूर

तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो .

यातलेच काही महाभाग मिपावर पण आहेत .

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2015 - 12:26 pm | श्रीगुरुजी

>>> तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो .

वरील वाक्यांवरून खालील आठवले.

गांधीजींना एक नामवंत मुस्लिम (त्याचे नाव लक्षात नाही) असे म्हणाला होता की, "चांगल्यातला चांगला हिंदू सुद्धा वाईटातल्या वाईट मुस्लिमापेक्षा वाईट असतो.".

दुसर्‍या शब्दात ... "वाईटातला वाईट मुस्लिम सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या हिंदूपेक्षा चांगला असतो."

संदीप डांगे's picture

30 Jul 2015 - 1:12 pm | संदीप डांगे

गांधीजींना एक नामवंत मुस्लिम (त्याचे नाव लक्षात नाही) असे म्हणाला होता की, "चांगल्यातला चांगला हिंदू सुद्धा वाईटातल्या वाईट मुस्लिमापेक्षा वाईट असतो.".

>>> संदर्भ???

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2015 - 10:20 pm | श्रीगुरुजी

असे विधान करणार्‍याचे नाव मौलाना मोहम्मद अलि जौहर असे आहे.

https://books.google.co.in/books?id=Dz-5B8_jMpEC&pg=PA116&lpg=PA116&dq=w...

During the freedom struggle our leaders tried to win over Muslims even when Maulana Mohammed Ali said that the worst Muslim was better than the best Hindu, including Mahatma Gandhi.

http://rethinkingislam-withnewageislam.blogspot.com/2014/09/faith-heredi...

Even a scholar of Maulana Mohammad Ali Jauhar's standing is credited with the celebrated remark that even the worst Muslim is better than a Mahatma Gandhi, for the former would eventually go to Heaven and the latter won't.

http://www.faithfreedom.org/oped/HinduWoman40718.htm

In 1924, Mohammed Ali to whom Gandhi showed such affection said, : "However pure Mr. Gandhi's character may be, he must appear to me, from the point of religion, inferior to any Mussalman even though he be without character." In 1925 he emphasized: "Yes, according to my religion and creed, I do hold an adulterous and a fallen Mussalman to be better than Mr. Gandhi".

वेल्लाभट's picture

29 Jul 2015 - 4:46 pm | वेल्लाभट

रच्याकने, फाशी अटळ आहे. ताज्या वृत्तानुसार दया याचिका फेटाळलेली आहे.

संदीप डांगे's picture

29 Jul 2015 - 6:54 pm | संदीप डांगे

सब सियापा है...

बाकी सगळं ठिक आहे. पण याकूबला तो मुस्लिम आहे म्हणून फाशी नको म्हणणारे आणि फाशी द्याच म्हणणारे दिसत आहेत. मस्त आहे हे सगळं.

प्यारे१'s picture

29 Jul 2015 - 6:58 pm | प्यारे१

सियापा म्हणजे काय रे भौ?

हैदर मधला कुठला तो शब्द?

संदीप डांगे's picture

29 Jul 2015 - 7:06 pm | संदीप डांगे

सियापा म्हणजे रुदन, शोक... मृत्यूगान...

बॅटमॅन's picture

30 Jul 2015 - 1:44 pm | बॅटमॅन

सियापा = *तियापा.

संदीप डांगे's picture

30 Jul 2015 - 7:37 pm | संदीप डांगे

हो हाही अर्थ आहेच.

पांथस्थ's picture

30 Jul 2015 - 6:25 pm | पांथस्थ

हैदर मधला कुठला तो शब्द?

Chutzpah: (Yiddish) unbelievable gall; insolence; audacity

राघवेंद्र's picture

29 Jul 2015 - 8:12 pm | राघवेंद्र

झाले १००

घडा भरला.

असुद्दिनी ओविसी यांचे विधान :- राजकिय पाठिंबा नसल्याने याकुबला फाशी !
हा न्यायालयाचा निकालाचा अपमान आहे ! तसेच हिंदूस्थानी न्याय व्यवस्थेवर एक प्रकारे अविश्वास आणि प्रश्न चिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ! आसुद्दिन विरुद्ध आता खटला दाखल होण्यास हरकत नसावी !
याकुबच्या निमित्त्याने इतके किळसवाणे राजकारण केले जाइल यावर विश्वास बसत नाही ! अबु आझमी काय, सलमान खान काय, कॉग्रेसचे आमदार काय आणि ओवेसी काय सगळेच एका देशद्रोही व्यक्तीच्या बाजुने उभे राहिलेले दिसले ! हे सर्व एका बॉम्बस्फोटातील अपराध्याच्या बाजुने उभे ठाकले हे या देशाचे मोठे दुर्दैवच ! २२ वर्ष लागली या खटल्याच्या एका आरोपीस फाशी देण्यास ! बॉम्बस्फोटात ठार झालेल्या लोकांबद्धल आणि त्याचे दुखः सहन करणार्‍या नातेवाईकांबाबत कोणतीही सहानभुती व्यक्त न-करता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याच हा घॄणास्पद प्रकार झाला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

नाव आडनाव's picture

29 Jul 2015 - 9:42 pm | नाव आडनाव

असुद्दिनी ओविसी यांचे विधान

मी चुकून

असुद्दिनी ओविसी यांचे निधन

असं वाचलं.

स्पार्टाकस's picture

29 Jul 2015 - 9:59 pm | स्पार्टाकस

असं खरंच झालं असतं तर तो सुदीनच....

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 12:16 am | वॉल्टर व्हाईट

तेंडुलक्रांच्या 'हे सारे कुठुन येते' या पुस्तकातला 'मरेपर्यंत फाशी' हा लेख एबीपी माझाने आज प्रकाशित केला आहे. याकुबला फाशी देऊ नये असे मत अजिबात नाही, किंबहुना त्यावर मतप्रदर्शन करावयाची आवश्यकताही नाही, परंतु मृत्युदंडकी शिक्षा लवकरात लवकर जगातून हद्दपार होवो अशी प्रार्थना करतो.

अर्धवटराव's picture

30 Jul 2015 - 12:46 am | अर्धवटराव

परंतु मृत्युदंडकी शिक्षा लवकरात लवकर जगातून हद्दपार होवो अशी प्रार्थना करतो.

आमेन

विकास's picture

30 Jul 2015 - 1:29 am | विकास

तेंडुलकरांच्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. लेख पूर्णपणे वाचला. मला वाटते ते स्वतः फाशीच्या शिक्षेच्या विरोधात होते. पण लेख हा केवळ निरीक्षक म्हणून लिहीलेला वाटला आणि वाचकाला विचार करायला लावणारा वाटला. लेख तेंडुलकरी अर्थात चांगलाचा आहे. पण विषय भिषण असल्याने "आवडला" असे म्हणवत नाही.

फाशीची शिक्षा ही भारतीय घटनेप्रमाणे "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" अशीच आहे. आणि एकंदरीत ती तशीच दिली जात असल्याने न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द केल्यास स्वतःच्या मराणाची भिती खुन्यास आणि दहशतवाद्यास वाटणार नाही. त्यामुळे ती रद्द न करता दुर्मिळच ठेवावी असे वाटते.

मुंबई स्फोटासंदर्भात देखील ती एकालाच झाली. इतरांची फाशी (जन्मठेप कायम करत) सुप्रिम कोर्टाने वेगवेगळ्या कारणाने रद्द केली. या संदर्भात याकूबला देखील भरपूर वेळ देण्यात आलेला आहे आणि त्याच्या साठी विचार केला गेला आहे. हे लिहीत असाताना देखील वाचले त्याप्रमाणे सुप्रिम कोर्ट न्यायाधिश शेवटचे निवेदन हे परत एकदा पहाटे २ वाजता ऐकणार आहेत. कदाचीत त्यात त्याला सात दिवस अधिक मिळतील. पण त्याहून वेगळा निर्णय मिळण्याची शक्यता नाही.

जो न्याय दिला गेला आहे, अथवा दिला जातो, तो ज्यांच्यावर अन्याय केला आहे अशांना दिला जातो. या संदर्भात २५७ लोकं ज्यांचा हकनाक बळी गेला आणि ज्यांचे कुटूंबिय कायमचे त्यांच्या जवळच्यांना मुकले त्यांना हा न्याय आहे. तसेच कोणीही यावं आणि दहशत पसरवावी या दहशतवादी वॄत्तीस दिली गेलेली एक शिक्षा आहे. त्यामुळे दहशतवाद थांबेल का नाही हा मुद्दा नाही, पण या भुमीमधे न्याय दिला जातो हे दिसणे महत्वाचे आहे असे वाटते. असो.

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 3:11 am | वॉल्टर व्हाईट

शिक्षेबद्दलचे तुमचे विचार वाचले. मी अजून शिक्षा आणि न्याय याविषयांवर स्वता:ची ठाम अशी मते बनवू शकलेलो नाही. त्यामुळे या प्रतिसादाला विचारमंथन म्हणुन विचारात घ्यावे.

शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने.

न्याय- २५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार. याही पुढे जाउन असेही म्हणता येईल की २५७ लोकांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला, पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का?

विकास's picture

30 Jul 2015 - 6:01 am | विकास

चांगले मुद्दे...

शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने.

म्हणूनच तर ती अपवादात्मक परीस्थितीत आणि सर्व पुरावे/शक्यता पडताळून झाल्यावर द्यावी आणि त्यानंतर देखील कायद्याने सर्व मार्ग गुन्हेगारास वापरायची मुभा देऊन झाल्यावर आमलात आणावी अशी व्यवस्था घटनेने केली आहे.
आणि हे सर्व अपवादात्मक परीस्थिती, "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" मधे जर फाशीची शिक्षा दिल्यास... जेंव्हा अशी शिक्षा दिली जाते अथवा दिली जाऊ शकते तेंव्हा इतर होऊ पाहणार्‍या गुन्हेगारांना संदेश मिळतो.

याकूबच्या संदर्भात देखील हे लक्षात घेयला हवे, की सुप्रिम कोर्टापर्यंत आजच्या पहाटे पाच पर्यंत वेळ दिला गेला. एरवी उठसूठ सुप्रिम कोर्टाने सरकारला चपराक मारली म्हणत कोर्टाची विधाने (निर्णय नाही) ओरडून सांगणारे या वेळेस मात्र सुप्रिम कोर्टाला चुकीचे समजताना पाहून आश्चर्ययुक्त खेद वाटतो.

या शिक्षेच्या अंमलबजावणीमुळे किमान काही सामान्य माणसे जी अतिरेक्यांना मदत करू शकतात ते तसे करण्या आधी दहा वेळेस विचार करतील. हे ही नसे थोडके. हे त्याचे महत्व. बाकी याकूबला फाशी दिली म्हणून पेढे वाटणे अथवा फटाके उडवणे अथवा आनंद व्यक्त करणे हे "मरणांतानी वैराणी" म्हणणार्‍या संस्कृतीच्या विरोधात असल्याने, अर्थातच चुकीचे आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 9:02 am | वॉल्टर व्हाईट

रेअरेस्ट ऑफ दी रेअर"

या बद्दल तक्रार नाहीच उलटे आपल्या कायद्याबद्दल ती अत्यंअत कौतुकास्पद गोष्ट आहे.
उर्वरीत प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2015 - 8:31 am | पिलीयन रायडर

२५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार.

???
म्हणजे? एखादा मनुष्य मेला की त्याला न्याय मिळण्याची आवश्यकता नसते की काय? न्याय मिळतो तेव्हा व्यक्ति जिवंत असते तेव्हाच काहीतरी साध्य होत असतं का? त्या न्यायाचे काही सामाजिक परिणाम असतात की नाही?

पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का?

न्याय ह्या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. आपल्याला हवा तो न्याय मिळण्याची सिस्टीम नाहीये भारतात. सुप्रीम कोर्ट देईल तो न्याय. त्यासाठी कायदे आहेत. तशीच शिक्षा का दिली गेली ह्याचे विवेचनही न्यायालय देते. आता त्या २५७ दुर्दैवी लोकांच्या नातेवाईकांचेच काय तर १२० करोड लोकांचे काहीही मत असो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. असा प्रत्येकाला काय वाटतं ह्याचा विचार कसा करता येईल? शिवाय ह्या घटनेत न्याय हा individual व्यक्तिला दिलेला नाहीये.

बाकी याकुब मेमनला फाशी झाली ह्याचा अपार आनंद झाला.

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 9:08 am | वॉल्टर व्हाईट

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

एखादा मनुष्य मेला की त्याला न्याय मिळण्याची आवश्यकता नसते की काय?

नसते.

न्याय मिळतो तेव्हा व्यक्ति जिवंत असते तेव्हाच काहीतरी साध्य होत असतं का?

होय जिवंत असतांना न्याय मिळाल तर ते न्यायव्यवस्थेचे यश म्हणुन गणले जाईल.

त्या न्यायाचे काही सामाजिक परिणाम असतात की नाही?

असतात, आणि त्यासाठीच न्यायव्यवस्था 'शिक्षा' ही संकल्पना वापरते. पण त्यासाठी मृत्युदंड देणे हाच फक्त ऑप्शन नाही, असा मुद्दा आहे.

सुबोध खरे's picture

30 Jul 2015 - 10:04 am | सुबोध खरे

काय भंपक प्रतिसाद आहे.
आपल्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्याचा खून झाला तर त्याच्या मारेकर्याला सोडूनच द्यायला पहिजे. कारण मेलेल्याला न्याय द्यायची गरजच उरलेली नाही. ती व्यक्ती मेली तरच तो गुन्हा ठरतो मग तिला जिवंतपणी कसा न्याय देणार ?
न्यायचे सामाजिक परिणाम नसते तर लोकांनी दाबून खाल्ला असता भ्रष्टाचार केला असता आत्ता निदान न्यायाची तरी भीती आहे. जनाची आणि मनाची लाज त्यांनी कधीच सोडलेली आहे.

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 8:14 pm | वॉल्टर व्हाईट

आपल्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्याचा खून झाला तर त्याच्या मारेकर्याला सोडूनच द्यायला पहिजे.

अर्थात तुम्ही माझे प्रतिसाद नीट वाचलेले नाहीत आणि तुम्हाला सोयीस्कर असा अर्थ तुम्ही अझ्युम करून तुम्ही तुमचा प्रतिसाद टंकलेला आहे, त्यामुळे प्रतिवाद करत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2015 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

न्यायव्यवस्था शिक्षा हा प्रकार कशासाठी वापरतात ते तरी सांगा ?

गुन्हेगारांवर वचक बसला पाहिजे यासाठी तडफडून प्राण जातील अशीच शिक्षा दिली पाहिजे असे वाटते, भले ते क्रूर वाटत असेल, मानवतेला धरुन नसेल, पण गुन्हा करणा-यांना मनात शिक्षेची भीती निर्माण झालीच पाहिजे.

फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्चीत हाय होल्टेज विद्युत पुरवठा करून झटके देणे, हाता पायांवर गोळीबार करणे, विषारी वायूत जीव गुदमरावा यासाठी जीव जाईपर्यन्त अनेकदा तसा प्रयोग करणे, अशा मृत्युदंडाचे विविध प्रकार कायद्यात अंतर्भुत करावे लागतील त्या शिवाय गुन्हेगारांवर वचक बसणार नाही.

सिग्नल तोड़ल्यामुळे अपघात होतो पेक्षा पाचशे रूपयाच दंड भरावा लागतो ही लोकांना भीती वाटते, म्हणून शिक्षेची कायद्यात तरतूद आहे नाही का ?

-दिलीप बिरुटे

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 8:20 pm | वॉल्टर व्हाईट

फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्चीत हाय होल्टेज विद्युत पुरवठा करून झटके देणे, हाता पायांवर गोळीबार करणे, विषारी वायूत जीव गुदमरावा यासाठी जीव जाईपर्यन्त अनेकदा तसा प्रयोग करणे, अशा मृत्युदंडाचे विविध प्रकार कायद्यात अंतर्भुत करावे लागतील त्या शिवाय गुन्हेगारांवर वचक बसणार नाही.

अजून कल्पना हव्या असतील तर अफगाणिस्तानात लावलेला इस्लामिक लों वाचा.

पिलीयन रायडर's picture

30 Jul 2015 - 7:52 pm | पिलीयन रायडर

मेलेल्या माणसाला न्यायाची गरज नसते???

हे बघा.. तुमचे विचार साफ गंडलेले आहेत हे खेदपुर्वक नमुद करते. वर खरे आणि बिरुटे काकांनी लिहीलं आहेच. मुद्दा अजुन समजावुन सांगण्याची गरज नसावी.

तुम्हाला सहन होत नाही किंवा तुम्ही खुप सेन्सिटीव्ह आहात म्हणुन नको बाबा कुणाला फाशी.. असं नसतं.

आज एकानी भारतात घुसुन असे स्फोट घडवुन आणले, तुम्ही त्याला जन्मठेप देवुन आयुष्यभर पोसणार. कशासाठी? शिवाय हे बरंय ना, की या भारतात, करा स्फोट, मरु देत च्यामायला लोक किड्या मुंग्या सारखे, होऊ देत जन्मासाठी अपंग.. एकदा का तुरुंगात जाऊन बसलो की उरलेलं आयुष्य मस्तपैकी आयतं खाऊन पिऊन काढायचं, फाशी म्हणलं की इथलेच लोक येड्यासारखे आपल्याच बाजुने पत्र लिहुन भांडत बसतील.. आपण तंगडे हलवत जन्नत मधल्या पर्‍यांची स्वप्नं बघत बसायचं!

वा काय शिक्षा आहे!!

आणि हो तशा अर्थानी फाशीला माझाही विरोध आहे.. फार सोप्पी शिक्षा आहे. बिरुटे काका म्हणतात तसल्या शिक्षा हव्यात.

वॉल्टर व्हाईट's picture

30 Jul 2015 - 8:24 pm | वॉल्टर व्हाईट

आज एकानी भारतात घुसुन असे स्फोट घडवुन आणले, तुम्ही त्याला जन्मठेप देवुन आयुष्यभर पोसणार. कशासाठी?

हे पहा माझे मत नीट समजाउन न घेता तुम्हाला bashing करायला सोयीस्कर असा अर्थ तुम्ही काढताय. मी प्रथमत:च स्पष्ट केले आहे की याकुबला फाशी देऊ नये असे माझे मत अजिबात नाही.

मुळात न्याय आणि शिक्षा हे शब्द व्यक्तीसापेक्ष का वापरावेत?
शिक्षा या शब्दाचा अर्थ शिक्षण, किंवा वळण असा होतो. कायदे करताना ते केवळ "एक व्यक्ती" अशी एंटिटी समोर ठेवून केलेले नसतात, न्याय आणि शिक्षा हे समाजाला मिळतात.
एखाद्याला जेव्हा फाशी होते, तेव्हा न्यायालये अश्या निष्कर्षापर्यंत आलेली असतात की ही व्यक्ती कोणत्याही प्रकारे जिवंत राहिली तरी सुधारण्याची शक्यता शून्य. किंबहुना अशी व्यक्ती नुसती जिवंत ठेवली तरीदेखील समाजाला अधिक उपद्रव व्हायचीच शक्यता. अन्यथा ती शिक्षा जन्मठेपेत परावर्तित होते. जशी याकूबबरोबरच्या इतर लोकांची झाली.

आता राहिला प्रश्न शिक्षा आणि न्यायाचा - शिक्षेचे म्हणाल तर समाजाला अशी शिक्षा मिळते की अश्या प्रकारचे राष्ट्रविघातक कृत्य केल्यास मृत्यू येऊ शकतो. (आत्मघाती अतिरेकयांचे सोडा, तो विषय वेगळा आहे) आणि न्याय म्हणाल तर केवळ मेलेल्या व्यक्तीवरच अन्याय झालेला असतो हे म्हणणेच चुकीचे आहे. उद्या जर देशाच्या पंप्रचा खून झाला, तर तो काय पंप्रवर केलेला अन्याय आहे का? पंप्र हे केवळ उदाहरण आहे. देशाच्या कोणत्याही आजी/ माजी/ भावी नागरिकाचा मृत्यू देशाला, समाजाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानी पोचवतच असतो. त्यामुळे मिळालेला न्याय हा देशाने केलेला देशासाठीचा न्याय असतो. आणि म्हणूनच त्या न्यायासाठी संविधान लिहावे लागले आहे. नाहीतर न्याय काय कुठेही चावडीवर पण होतो.

न्याय आणि शिक्षेची तत्वे "व्यक्ती"शी निगडीत असू शकतात. पण न्याय आणि शिक्षा या संज्ञा मात्र देश किंवा समाजाशीच निगडीत आहेत.

समजले असेल अशी अपेक्षा करतो.

श्रीगुरुजी's picture

30 Jul 2015 - 10:38 pm | श्रीगुरुजी

>>> शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने.

मृत्युदंड दिल्याने शिक्षेचा उद्देश सफल होतोच. मृत्युदंड नाही दिला तर नक्कीच शिक्षेचा उद्देश सफल होत नाही, कारण आपण अनेकांचा प्राण घेऊन सुद्धा गुन्हेगार जिवंत असतो. जगात इतर कोणत्याही भीतिपेक्षा मृत्युची भीति सर्वात जास्त असते. अनपेक्षित मरण आलेल्यांपेक्षा ज्यांना दिवस, वेळ ठरवून मृत्युदंड दिलेला आहे त्यांची मृत्युची वेळ जशी नक्की होते त्या क्षणापासून ते अक्षरशः मरण जगत राहतात.

>>> न्याय- २५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार.

हाच नियम ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे, ज्यांच्यावर बलात्कार झालेला आहे, ज्यांची फसवणूक झालेली आहे ... अशा इतरांना सुद्धा लावला तर योग्य होईल का? ज्याप्रमाणे खुन्याला फाशी देऊन गेलेली व्यक्ती परत जिवंत होणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या बलात्कार्‍याला शिक्षा देऊन पिडीतेची अब्रू परत येणार नाही. मग कशाला बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची?

>>> याही पुढे जाउन असेही म्हणता येईल की २५७ लोकांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला, पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का?

भारतात किंवा जगात कोठेही (काही अपवादात्मक देश वगळता) न्याय व शिक्षा हा कायद्यांवर विसंबून दिला जातो. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या मागणीनुसार न्याय व शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे २५७ पैकी २०० जणांना ही शिक्षा हवी किंवा नको यावर न्याय व शिक्षा दिली जाऊ शकत नाही.

आणि समजा उर्वरीत ५७ जणांच्या नातेवाईकांना फाशी हीच शिक्षा द्यावी असे वाटत असेल तर ती द्यायला नको का? किंवा एखाद्या मृताच्या नातेवाईकाला असी वाटत असेल की खुन्याचा रोज एक अवयव तोडावा व त्याला सावकाश ७-८ दिवसात मारावा, तर अशी शिक्षा देता येईल का?

dadadarekar's picture

30 Jul 2015 - 11:37 pm | dadadarekar

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2015 - 1:00 am | डॉ सुहास म्हात्रे

दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर इतर एकही शब्द न लिहिता सहमत !!!

मी जागा आहे की स्वप्नात हे पाहण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला ;) मी तर जागा आहे.

दादासाहेब तुम्ही हे जागेपणी लिहिले आहे की स्वप्नात हे पाहण्यासाठी स्वतःला ताबडतोप चिमटा काढून पहा बरे =))

एकदा सहमत झालेत ते झालेत.डोन्ट मेक इट अ हॅबिट हं!!आम्ही कोणाकडे बघायचं मग =))

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 11:16 am | टवाळ कार्टा

खिक्क

दादासाहेब श्रीगुरुजींबरोबर इतर एकही शब्द न लिहिता सहमत !!!
अजि म्या ब्रह्म पाहिले!!!