बाहुबलीच्या निमित्ताने …

अभिदेश's picture
अभिदेश in काथ्याकूट
21 Jul 2015 - 6:12 am
गाभा: 

कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?

प्रतिक्रिया

तळ्यात मळ्यात's picture

21 Jul 2015 - 7:23 am | तळ्यात मळ्यात

मराठी चित्रपटांबद्दल आपल्याला सहानुभूती असते, पण बरेचसे चित्रपट त्याच त्याच चावून चोथा झालेल्या विषयांवर असतात. वैचारिक झेप घ्यायचं सुचतच नाही कोणाला! गरीब चित्रपट आणि प्रेक्षकांची वानवा हे दुष्टचक्र चित्रपट तयार करणारेच मोडू शकतील. कारण नुसतंच प्रमोशन करुन चार टकली जास्त येतीलही पण डोंगर पोखरून उंदीर निघतो ना! टीपी२ चं काय वेगळं झालं?! आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणारे विषय घेऊन ते डोकेबाजपणे हाताळणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं

बाहुबलीबद्दल नुसतेच ऐकलेय, चांगले आणि वाईट दोन्ही. म्हणून बघण्याआधी बोलता येणार नाही.
टीपी २ भंगार होता. पहिल्या भागाच्या यशामुळे दुसर्‍यांदा लोक्स पहायला गेले असतील तर प्रेक्षकांची फसवणूक केली गेलीये. काहीही म्हणजे काहीही दाखवलय. आमच्या घरातील सगळी मेंब्रं शिनेमा बघताना धाव्व्या मिंटाला झोपली. मीच जरा भक्तीभावाने ७५ टक्के बघितला. मोठ्या प्रमाणावर खर्च करून कायतरी केले म्हणजे ग्रेटच असते असे नाही. त्याला काही ष्टोरी नसली तर असले शिनेमे तयार करून पैसे व वेळ वाया गेले असेच वाटेल. आता तो अगंबाई अरेच्च्या २ आलाय. हिंमतच होत नाही वेळ खर्च करण्याची!

प्रीत-मोहर's picture

21 Jul 2015 - 8:04 am | प्रीत-मोहर

नको बघुस अग बाई अरेच्च्या. सगळी ओवर अ‍ॅक्टींग आहे सोनालीची.

बाहुबली छान आहे, पण मगधीराच बेस्ट होता. हे मा वै म

बरं झालं सांगितलस, आता नाहीच बघणार.

सानिकास्वप्निल's picture

21 Jul 2015 - 3:56 pm | सानिकास्वप्निल

बाहूबली अजिबात आवडला नाही कदाचित हिंदी डब्ड असेल म्हणून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2015 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाहुबली अजिबात आवडला नाही. कथानकाचा नीट पत्ता नाही. दोन तीन तुकडे एकत्र चिटकवले आहेत. युद्धाची भव्य दिव्यता आवडली. बाकी, आता २०१६ मधे रिटर्न बाहुबली पाहणं आलं. सालं पब्लिक इतकी चित्रपटावर तुटून कशी पडली ते मला काही कळेना. :(

-दिलीप बिरुटे

हेच मी माझ्या परीक्षणात लिहिले तर काय गहजब झाला होता मिपावर. काही सदस्यांनी तर रवि जाधवचे स्वीय सहायक असल्यासारखे वैयक्तिक टीकेचे वार केले होते. तसं मिपा अशा प्रकारच्या निरर्थक हुज्जतीला नवं नाही.

या लेखावरील प्रतिक्रिया बघून डोळे पाणावले. 'टीपी 2' हा अत्यंत भिकार आणि टुकार चित्रपट होता हे त्रिवार सत्य आहे. प्रियदर्शन जाधवने नायक म्हणून कधीच काम करू नये. त्याचा अभिनय भयंकर होता. रवि जाधवसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकाने इतका सुमार दर्जाचा आणि भिक्कार चित्रपट काढावा हे खरेच आश्चर्य आहे.

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 12:00 am | पाटीलअमित

प्रियदर्शन जाधवचा अभिनय भिकार होता म्हणून छोट्या दगडू ला परत आणावे लागले

काही प्रश्नांची उत्तरं मिळालीत तर सोप्पं जाईल
१. तेलूगू व मराठी चित्रपटस्रूष्टीची वार्षिक उलाढाल किती
२. आंध्रा/तेलंगाना व महाराष्ट्रात चित्रपट बघण्याचा क्रेझ कसा आहे?
३. तेलुगू व हिंदी आणि मराठी व हिंदी भाषेतील साम्य?
४. किती तेलुगू लोकं हिंदी चित्रपट बघतात व तसेच किती मराठी मंडळी हिंदी चित्रपट बाघतात?
५. मराठी माणूस मराठी चित्रपटाचं तिकीट ब्लॅक मधे खरेदी करेल काय? ( बाहूबलीचं तिकीट १०००० रूपयाला गेल्याचं वाचण्यात आलय)

प्रश्न अजुन आहेत पण असो.

मराठीचं दुर्दैव एकच -हिंदी भाषेसोबतचं साम्यं ज्याचा थेट परीणाम मराठी माणसाच्या चित्रपट आवडीवर होतो. एका मराठी माणसानेच सिनेमा भारतात आणला पण तरी इतर पुढे निघुन गेलेत हा आपलाच करंटेपणा म्हणावा लागेल.

विशाल कुलकर्णी's picture

21 Jul 2015 - 9:55 am | विशाल कुलकर्णी

तसेच किती मराठी मंडळी हिंदी चित्रपट बाघतात?

हा प्रश्न खरेतर किती मराठी मंडळी मराठी चित्रपट बघतात? असा हवा आहे ;)

स्वप्नांची राणी's picture

23 Jul 2015 - 3:45 pm | स्वप्नांची राणी

मराठी चित्रपट आधी पण कमीच बघीतलेत. पण किल्ला (वट्ट पैसे घालून थेट्रात) आणि वास्तूपुरूष (घरात , आंतरजालावर, पायरेटेड) पाहील्यावर हाय खाल्लीय!! चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खरं म्हणजे काहितरी वेगळाच अर्थ सांगतेय, जो मला अजिबात कळत नाही आणि समिक्षकांच वाचूनच जर मला चित्रपट कळणार असेल तर असा भिषण , गहन अर्थपुर्ण पिक्चर मी विशिष्ट प्राण्याच्या विशिष्ट ठिकाणी घालीन. (हे दोन्ही अत्युच्च चित्रपट पाहुन मला मिस्टर बीन्स हॉलीडे मधला कार्सन क्ले चा अत्युच्च मुल्यं वगैरे असलेला चित्रपट आठवला...)

त्यापेक्षा बजरंगी भाईजान आवडला कारण तो माझ्या अल्पमतीला व्यवस्थित कळला....

वास्तूपुरुष म्हणजे सुमित्रा भावेबाईंचा सिनेमा आहे ना? मी एका बैठकीत बघितला होता. खूप चांगला वाटला.
बजरंगी भाईजान लोकांनी बराच जयजयकार करून पाहिलाय पण सलमान खान मला आवडत नाही म्हणून थेट्रात जाऊन पाहणार नाही. जालावर आल्यानंतर व मला लक्षात राहिल्यास पाहीन बहुतेक!

स्वप्नांची राणी's picture

23 Jul 2015 - 6:54 pm | स्वप्नांची राणी

हो तोच, पण मला त्यात काहि घडलय असं वाटलच नाही ग.. निरर्थक गुढरम्यपणा वाटला, ओढून-ताणून आणलेला!!

अगम्य's picture

28 Jul 2015 - 2:38 am | अगम्य

वास्तुपुरुष DVD विकत घेऊन अनेकदा पहिला आणि दर वेळी प्रचंड आवडला. अत्यंत सशक्त व्यक्तिचित्रणे, उच्च दर्जाचा अभिनय आणि एका संक्रमणशील कालखंडाचा पट मांडणारे प्रभावी दिग्दर्शन.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 2:57 am | श्रीरंग_जोशी

वास्तुपुरुष हा बहुधा २००३ सालचा चित्रपट आहे नं?

मी पाहिला आहे. मुख्य भूमिका कोणी केली ते आठवत नाही. पण. स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी नायकाच्या वडिलांची भूमिका केली होती व अतुल कुलकर्णी यांनी मोठ्या भावाची. बहुधा रविंद्र मंकणी यांनी नायकाच्या काकाची भूमिका केली होती.

आमच्या कॉलेजमध्ये नवे सभागृह बनले होते. तेथील प्रोजेक्टरवर हा चित्रपट दाखवला होता. ₹१० तिकिट होते. मला चित्रपट आवडला होता.

अगम्य's picture

28 Jul 2015 - 8:18 am | अगम्य

टीनेजर नायकाचे काम सिध्दार्थ दफ्तरदार ह्याने केले होते. आणि उत्तरा बावकर ह्यांनी नायकाच्या आईची भूमिका केली होती. इतर काही नाही तरी प्रत्येक व्यक्तिरेखेचे जे कंगोरे, मर्यादा, आणि काळे पांढरे रंग त्या त्या अभिनेत्यांनी जिवंत करून दाखवले आहेत त्यासाठी बघावा असा चित्रपट.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 8:25 am | श्रीरंग_जोशी

मी अकरा वर्षांपूर्वी एकदाच पाहिला आहे तरीही संपूर्ण चित्रपट व्यवस्थित लक्षात आहे इतका तो मला भावला.

प्यारे१'s picture

24 Jul 2015 - 3:08 am | प्यारे१

प्रतिसाद लैच आवडला!

खटपट्या's picture

21 Jul 2015 - 9:37 am | खटपट्या

तुम्ही आंतरजालावर बाहुबली बघीतला म्हणताय, म्हणजे फुकट.
अप्रत्यक्ष रीत्या पायरसीला प्रोत्साहन देताय.

सतिश गावडे's picture

21 Jul 2015 - 9:46 am | सतिश गावडे

सहमत आहे.
काही अपरिहार्य परिस्थितीत चित्रपट आंजावर पाहिला असल्यास समजण्यासारखे आहे अन्यथा या विषयावर गळा काढण्यात काय अर्थ आहे.

हा आंजावर पाहण्याचा चित्रपट नाही. भव्य कलाकृती काय असते हे अनुभवायचे असेल तर चित्रपटगृहातच जाऊन पाहायला हवा हा चित्रपट.

अक्षरश: चांदोबातील गोष्ट जिवंत केलीय त्यांनी पडद्यावर.

क्रेझी's picture

21 Jul 2015 - 9:51 am | क्रेझी

+१

काही अपरिहार्य परिस्थितीत चित्रपट आंजावर पाहिला असल्यास

यात कसली आलीय अपरिहार्य परिस्थिती? ज्याला पटत नाही त्याने पाहू नये - पहायचा आणि नंतर आपद्धर्म म्हणून बोंबलायचं याला काय अर्थ?

मला बाहुबली बघण्याआधीच एका गोष्टीमुळे प्रचंड आवडला कारण तो 3D मधे आणला नाही!! हल्ली हॉलिवूड वाले आणि त्यामुळे इतरही चित्रपटकर्ते 3Dच्या नादाने काहीच्या काही बघायला लावतात!

तर, बाहुबली बोरिंग आहे, स्टोरी काहीच नाही अशा ब-याच नकारात्मक प्रतिक्रिया ऐकल्यावर मी तो चित्रपट बघितला आणि मला तो प्रचंड आवडला. स्क्रीनवर दिसणारी ती भव्य-दिव्यता खरंच भारावून टाकणारी आहे. खरं तर कथा पहिल्या भागाच्या शेवटी चालू झाली आहे आणि पुढच्या वर्षी येणा-या चित्रपटामधे कळणार आहे.तोवर जे समोर आहे ते पण बघण्यात मजा येईल ह्याची काळजी नक्कीच चित्रपटकर्त्याने घेतली आहे.

भाते's picture

21 Jul 2015 - 9:55 am | भाते

आयपीएल संपल्यावर दर आठवडयाला २-३ या हिशोबाने महिन्याला किमान १२-१५ चित्रपट प्रदर्शित झाले. हिंदी चित्रपट निर्माते आपसात तारखा ठरवुन दोन चित्रपटांमध्ये योग्य अंतर ठेवतात. इथे मराठी निर्माते मात्र एकमेकांचे चित्रपट पाडायला पुढे सरसावतात. हल्ली एक चित्रपट जास्तीत जास्त दोन आठवडे टिकतो. महिन्याला १२-१५ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वेळ आणि पैसा खर्च करून कोण इतके चित्रपट पहाणार आहे? त्यातले एक दोन चित्रपट चालतात आणि बाकीचे डब्यात जातात. मग हेच लोक मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पहात नाहित म्हणुन बोंबा मारतात.

टीपी२ पध्दल

शनिवारी सुट्टी असल्याने घरीच तुनळी वर टीपी२ बघितला. बकवास. पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाची मारे जोरात घोषणा केली. चित्रपट बघताना जाणवत होते कि दिग्दर्शकासहित सगळ्या कलाकारांना चित्रपटाविषयी शंका होती. कथानक, संवाद, कलाकार आणि अभिनय (?) या सर्वच बाबतीत मार खाल्ला. पण आधी गाजावाजा करून घोषणा केलेला चित्रपट अर्धवट गुंडाळुन डब्यात जाऊ नये म्हणुन तो तसाच पुढे रेटला गेला. पहिल्या भागात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांच्या अभिनयात ताजेपणा होता. दुसऱ्या भागात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट अक्षरश: पाट्ट्या टाकत आहेत असे वाटले.

मृत्युन्जय's picture

21 Jul 2015 - 10:52 am | मृत्युन्जय

Containt = Content
Promot = Promote

बाहुबली बघायचाच आहे. मराठी चित्रपट इतक्या मोठ्या बजेटवर जायला वेळ आहे अजुन. हाच बाहुबली जरी तमिळ तेलुगु मध्ये आला असता तर त्याने इतका पैसा कमावला असता का? नाही ना? त्यांनादेखील हिंदीच्या कुबड्या लागल्या म्हणजे हा चित्रपट एवढा धो धो चालतो आहे तो हिंदी असल्यानेच. प्रादेशिक चित्रपट कधीच २५० कोटींचा टप्पा गाठणार नाही.

मुख्य म्हणजे चित्रपटावर किती पैसे ओतले यापेक्षा चित्रपटातुन किती समाधान मिळाले हे महत्वाचे. जर ते छोट्याश्या श्वास, शाळा किंवा किल्ला मध्ये मिळत असेल तर उगाच बिग बजेटचा सोस कशाला? त्यातुन आनंद फक्त निर्मात्यांना आणि कलाकारांना मिळतो (कारण त्यांना पैसा जास्त मिळतो). सामान्य माणसाला नाही. त्यामुळे माझ्यासाठी तरी बजेट पेक्षा कंटेट जास्त महत्वाचे.

कपिलमुनी's picture

21 Jul 2015 - 1:32 pm | कपिलमुनी

प्रादेशिक चित्रपट कधीच २५० कोटींचा टप्पा गाठणार नाही.

#Baahubali [dubbed Hindi version; Week 2] crosses ₹ 60 cr mark: Fri 3.25 cr, Sat 4.70 cr, Sun 5.40 cr. Total: ₹ 60.12 cr

Bahubali's multiple versions made Rs 100 crore in 2 days, and its total earnings stood at Rs. 300 crore after eight days, reports Forbes magazine.

it looks like baahubali cross 250 crore figure in telugu + tamil version.

बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनचा वाटा अल्प आहे मृत्युंजयसाहेब. जरा विदा बघा की.

मृत्युन्जय's picture

21 Jul 2015 - 10:45 pm | मृत्युन्जय

वोक्के. पहिला प्यारा खोडुन टाकावा. हाकानाका :) ;)

सत्याचे प्रयोग's picture

21 Jul 2015 - 11:10 am | सत्याचे प्रयोग

अरेरे

यमगर्निकर's picture

21 Jul 2015 - 12:43 pm | यमगर्निकर

हाच फरक आहे मरठि प्रेक्षक आणी साउथ चे प्रेक्षकां मध्ये, तिथे लोक स्वतःहुन पायरसि ला थारा देत नाहित, पायरसि सीडि कुठे विकत असतिल तर तेथिल लोकच त्याला मज्जाव करतात. त्यामुळे तेथिल निर्माते सिनेमावर मोठ्याप्रमानावर पैसा लावण्यास तयार होतात म्हणुनच बाहुबलि सारख्या कलाकृति आपनास बघायला मिळतात, कृपया कुठलाहि सिनेमा हा बनवट सीडि किंवा आंतरजालावर पाहु नये. सिनेमा हा थियेटर मध्येच किंवा ओरिजनल सीडि वर पहावा. अधिच २जी आणि ३जी इंटर्नेट मुळे संगीत क्षेत्राचि काय अवस्था झालि आहे ति पहा.

हे तुम्ही कुठे बघितले हे सांगु शकाल काय? मी बेंगलोर मध्ये रहिलो आहे आणि पायरसि होत असलेली सर्रास बघितली आहे (अगदि कन्नड चित्रपटांची सुद्धा ).

अर्थात फक्त बेंगलोर म्हणजे साउथ नव्हे पण बेंगलोर साउथमध्येच धरले जाते

देश

नाखु's picture

21 Jul 2015 - 3:12 pm | नाखु

हा खरा आंतर"देशी"य प्रतीसाद !!!!

देश's picture

21 Jul 2015 - 9:41 pm | देश

आभारी आहे :-)

देश

द-बाहुबली's picture

21 Jul 2015 - 3:07 pm | द-बाहुबली

आर्र.. छोट्या पडद्यावर पाहिला ? ... तुने तो पिइच... नै.. फिर काय को बाता करेला हय बाहुबली ह्यांव अन त्यांव... पयले बडॅ पर्दे पेदेखो फिर बांता करो... अहो छोट्या पदद्यावर मराठी चित्रपट खपुन जातात... बहुबली काय बघितला तिथे, वरुन धांगे काढता त्याचे ? कहर हय.

बॅटमॅन's picture

21 Jul 2015 - 3:12 pm | बॅटमॅन

शमत!

पद्मावति's picture

21 Jul 2015 - 3:15 pm | पद्मावति

मी बघितलेली एक गोष्ट तेलगु, तमिळ लोकं आपल्या भाषेतला चित्रपट म्हणजे घरचं कार्य असल्याप्रमाणे वागतात. भक्तिभावाने स्वत: मूवी बघणे , नंतर तो मूवी त्यांच्या इतर भाषीय मित्रमंडळींनी सुद्धा बघावा म्हणून जोरदार लॉबिंग. त्यांच्या पार्टी, समारंभात सुद्धा त्यांच्याच भाषेतली गाणी वाजत असतात. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी इतकी मोठी असल्याचे मूळ कारण त्या लोकांचा हा भाषीक अभिमान असावा.

अजुन एक म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणे हा वाक्प्रचार त्या भागात नसल्यामुळे तेथील निर्माते पण दिलखुलास पणे चित्रपटावर खर्च करतात. बरं प्रेक्षक आपल्याला फार नुकसान होऊ देणार नाही ही खात्री असतेच कारण हिंदी चित्रपटांची स्पर्धा तिथे नसतेच. प्रेक्षक जाणार कुठे? मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग हिंदी मराठी मधे जरा वाटल्या गेला जातो.

दाक्षिणात्य लोकं हे मुळातच चित्रपट-वेडे असतात, ते त्यांच्या genes मधेच आहे. या लोकांच्या तुलनेत मराठी लोकांना चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही. म्हणजे मोजके छान चित्रपट बघतातच आणि एन्जॉयही करतात. पण क्रेझ अशी कमीच. त्यातही मराठी चित्रपट म्हटले की अजुनच उत्साह मावळतो. म्हणून निर्माते सुद्धा खूप बिग बजेट चित्रपट निर्माण करतच नाहीत. रिस्क कोण घेणार?

द-बाहुबली's picture

21 Jul 2015 - 3:22 pm | द-बाहुबली

या लोकांच्या तुलनेत मराठी लोकांना चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही. म्हणजे मोजके छान चित्रपट बघतातच आणि एन्जॉयही करतात.

हे वाक्य मराठी लोकांना मराठी चित्रपट बघायला खूप मनापासून आवडत नाही असे हवें. कारण हीच मराठी लोके हिंदी, इंग्रजी व दाक्षीणात्य तसेच इतर चित्रपट फार हौसेने बघतात पण मराठी नाही कारण मराठी चित्रपट सालं चौकटीबाहेर मनोरंजक असे काही देतच नाही.

मुळा मराठी लोकांना चौकटीत चौकटी करत बसायची फार हाउसच आहे तर त्यांचे कडून काय अपेक्षा ठेवणार ? मराठीचा नुसताच अभिमान उरलाय आता, प्रेंम केंव्हाचं आटाया लागलयं...

संदीप डांगे's picture

21 Jul 2015 - 3:24 pm | संदीप डांगे

जय माहिष्मती...
आताच बाहुबली बघून आलोय.... मोठ्या पडद्यावर.
डोळ्याचे पारणे फिटले. अडीच तास वेगळ्याच जगात घेऊन गेला...
पुढच्या भागाची प्रतिक्षा आहेच.
एकच शंका होती ती म्हणजे कुठल्याही कलाकाराला तो किरी भव्य दिव्य चित्रपटात काम करतोय याची जणू माहितीच नव्हती. म्हणजे सर्वांची अ‍ॅक्टींग ए-वन पण कुठेतरी ५ टक्के राहून गेलंय.
पण एकूण पैसे वसूल ...
जमलं तर परिक्षण लिहणार..

अशा कलाकृतीचा छोट्या पडद्यावर तेही चोरून डाउनलोड करून बघून अपमान करू नये अशा मताचा मी आहे. (वैयक्तिक अपरिहार्यता समजू शकतो. पण ज्यासाठी इतर लोक बघा म्हणतात तो फील छोट्या पडद्यात येत नाही. वेळ वाया जाईल. मन खट्टू होईल.)

मराठीला इतका खर्च करायला अजून वेळ आहे. असू दे. इतर लोक बनवतायत आपण बघूया. परत काही तरी ब्रेक-थ्रू मराठीलोक करतीलच.

द-बाहुबली's picture

21 Jul 2015 - 3:35 pm | द-बाहुबली

तर.. काय सात्वीक संताप येतो राव... अहो चोरुन बघीतली तरी कुठे बघायची याचे तारतम्य नको काय ? छोट्या स्क्रीन ऐवजी थेटरात घुसुन फुकटात बाहुबली बघितला अन त्या निमीत्ताने काही प्रश्न निर्माण झाले असे जरी धागाकर्त्याकडून घडले असते ना तरी मन भरभरुन आलं असतं...

चित्रपटाला स्टोरी नाही, म्हणजे स्टोरी आहे अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर दुसृया भागाची गरजच नसती असे मुळ पुस्तक वाचलेल्यांचे मत आहे तरीहे दुसर्‍या भागाची प्रतिक्षा आहे. चक्क वाहत्या पाण्यात रंग न फिस्कटता हिरो अचुक टॅटु काढतो अशी बिंडोक द्रुष्ये आहेत, काढु तितक्या चुकाच आहेत पण हा चित्रपट ज्या स्केलवर आहे तिथुन हे सगळे दोहेन दिसण्या इतपत खुजे आहेत.... आणी हा चित्रपट एखादा महात्मा छोट्या स्क्रिनवर काढुन त्यावर धागा टाकतो हा चित्रपटाच्या प्रेक्षकांचा अक्षम्य अपमान आहे... :(

अजुन ३० मिनिटे वाढवला असता तर दुसृया भागाची गरजच नसती असे मुळ पुस्तक वाचलेल्यांचे मत आहे

कुठले मूळ पुस्तक?

द-बाहुबली's picture

22 Jul 2015 - 12:59 pm | द-बाहुबली

@बॅटमॅन बाहुबलीच्या पुस्तकाबाबत कॉमेंट एका कानडी मित्रासोबत सोबत ऑनलाइन चॅट करताना आलि आहे. अजुन माहिती त्याच्याशी संपर्क झाल्यावर डाकवतो. बाकी गुगलुनही फार काही हाती आले नाही, त्यामुळे त्याच्याशी बोलुनच अपडेट करेन.

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 1:08 pm | बॅटमॅन

ओक्के सार, सांगा नक्की. जमल्यास विकतही घेईन.

महिष्मती संराज्याचा उल्लेख महाभारतात आहे. हि कथा अमर चित्रकथा (बहुतेक चांदोबा )ह्या मासिकातून घेतली असल्याचे "Quora.com" वर वाचले.

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 8:36 pm | बॅटमॅन

हे पाहिले पाहिजे. तदुपरि शंकराचार्यांनी वादविवादात पराभव केलेले द्वैतमतानुयायी मंडनमिश्र हे माहिष्मती नगरीचे निवासी असे म्हणतात. ती माहिष्मती कुठे मध्यप्रदेश साईडला नर्मदेकाठी आहे असे सांगितल्या जाते.

नर्मदाकिनारचे महेश्वर म्हणजेच माहिष्मती.

अच्चा महेश्वर तर....धन्यवाद.

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 2:07 pm | अस्वस्थामा

अच्चा महेश्वर तर.

आसं "अच्चा" बोलतुय की जणु मिरजेच्या पल्याडच हय महिष्मती.. ;)

बॅटमॅन's picture

23 Jul 2015 - 2:52 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

अहो जे जे भारतात आहे ते ते सगळे जवळच आहे...अहद लाहोर तहद चंदावर, अहद गुजरात तहद बंगाल...

संदीप डांगे's picture

21 Jul 2015 - 10:20 pm | संदीप डांगे

चित्रपटाला स्टोरी नाही? आहो आहेकी, द लायनकिंग नाही बघितला का? तीच कथा वेगवेगळ्या चित्तरपटांतून येत राहिली आहे.. अजून काय..? द लायनकिंगसुद्धा कुठूनतरी उचलला होता म्हणतात.

द-बाहुबली's picture

22 Jul 2015 - 1:01 pm | द-बाहुबली

मुळात जगात प्रमुख कथाबीज फक्त सात आहेत त्यामुळे कुठे ना कुठे साम्य असणारच ना :)

अवांतरः- आणी साधारण साहस्/अ‍ॅक्शन चित्रपटाच्या घटनांचा फॉर्म्युला साधारण हा असतो

१) हिरो एक सामान्य जिवन जगत आहे/ लागत आहे
२) काही तरी घडते आणी साहसाला सामोरे जायची वेळ येते
3) हिरो ला साहसापासुन पराव्रूत्त व्हावेसे वाटणे अथवा अजुनच जोम येणे
४) कोणी तरी मेंटर भेटतो
५) हिरोचे साहसी मिशन कंटीन्यु
६) यात हिरोला नवीन मित्र /शत्रु वगैरे मिळतात
७) काही कारणाने सेटबॅक होतो व हिरो ला त्याची चाल(स्ट्रेटजी) बदलने भाग पडते
८) परिस्थीती अजुन बिकट बनते
९) हिरो त्यातुन हिरोपंती करुन यशस्वीपणे बाहेर येतो/झुंज जिंकतो
११) सर्व सुरळीत झाले वाटत असतानाच एक अल्टीमेट चॅलंज निर्माण होते जे जिंकयला हिरोला आतापर्यंतचा सर्व अनुभव पणाला लावावा लागतो
१२) द एंड. हिरोच्या हिरोपंतीने जग सगळ्यांसाठीच एक अतिसुरक्षीत व अतिशय चांगली गोष्ट बनली आहे (विलन मेला) सर्व काही मस्त मस्त मस्त... आणी मस्त.

आता वरील मुद्दे (सगळेच घेतले पाहिजेत असे नाही) गुंफुन हवे तसे यशस्वी कथाबीज अ‍ॅक्शन चित्रपटासाठी गुंफता येते. मग तो फँटसी असो साय फाय असो अथवा दाक्षीणात्य मसाला असो :)

टीप_- वरील मुद्दे हे द मॅट्रीक्स पार्ट पहिला याचे विवेचन आहे ज्याच्या कथा घटनाक्रमावर ओव्हर फॉर्म्युलॅटीक (तेच वर दिलेले मुद्दे व तसाच घटना क्रम रचणे) म्हणूण मान्यवरानी टिका केली होती... अर्थात तरीही चित्रपट यशस्वी ठरलाच. थोडक्यात एकदा चित्रपटाची थिम ठरली की साधारण त्यात काय घडणे अपेक्षीत आहे हे स्पष्ट होते :)

संदीप डांगे's picture

22 Jul 2015 - 3:03 pm | संदीप डांगे

तुमचं म्हणणं बरोबरच आहे.

लायनकिंग मधे सिम्बाच्या काकाच्या (जो व्हिलन असतो) डाव्या डोळ्यावर जखमेचा व्रण आहे. अगदी तस्साच इथे शिवाच्या काकाच्या (भल्लाल् देव) उजव्या डोळ्यावर आहे.

सिम्बाचा बाप प्राण्यांच्या गोंधळात फसवणुकिने मारला जातो, इथेही तसंच दिसतंय.

तिकडे सगळे प्राणी (कसंकाय बुवा) सिम्बाच्या बापाचे फॅन असतात, इथेही प्रजा बाहुबलीची फॅन आहे.

अजून पुढचा भाग आल्यावर साम्य शोधता येतीलच किंवा जबरी धक्का बसेल.

अस्वस्थामा's picture

21 Jul 2015 - 4:20 pm | अस्वस्थामा

बाजीरावावर असा एक दोन-तीन भागातला पिच्चर काढायचा राव.. फक्त वीस वर्षांतली युद्धं आणि दौरे कवर करायचे. सोबतीला शिंदे होळकर आणि मराठा सैन्य. असं चांदण्या रात्रीत उत्तरेच्या मैदानावर घोडदैड करणार्‍या घोडदळाचं एरिअल डोळ्यासमोर येतंय.
(ती मस्तानी/पुणे राजकारण वगैरे तूर्तास बाजूला ठेवायचे किंवा चवीपुरतेच अ‍ॅडवायचे. बाकी सिकंदरासारखी ऑन-फिल्ड गाथा असेल मग..!)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2015 - 12:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कल्पना आवडली. भव्य दिव्य चित्रपट नक्कीच आला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

महाराजांवर असा चित्रपट का येत नाही, आला नाही याचं नवल वाटतं.
इतकी साहसी दिव्ये आणि कूटनीति दुसर्‍या कुठल्या ही राजाने वापरली नाही. इतकी भव्य दृष्टी दुसर्‍या कुठल्याही राजाची नव्हती.
जर इतकी भव्य युद्धं दाखवण्याची कपॅसिटी एखाद्या दिग्दर्शकाची असेल तर इथे स्टोरी तर तयार आहे. आणि सगळं काही खरं खरं आहे.
विचार करा. राजांनी अफजलखानाच्या सैन्याची जी कत्तल केली तो सीन वरून पाचशे फुटावरून चित्रीत केला तर, किंवा कोकणात उतरणार्‍या कारतलबखानाची ससेहोलपट घोड्यावर विराजमान झालेले, निळं मुकूट घातलेले महाराज जवळच्या पहाडावरून पहाताना सूर्य त्यांच्या पाठीमागे लपला आहे आणि सूर्याची किरणं त्यांच्या मुकूटावरून परावर्तित होवून एक तेजस्वी प्रभामंडल फाकलं आहे, किंवा बाजीप्रभू ची ३०० स्टाईल लढाई किंवा सात मरगट्टे प्रचंड त्वेशाने व संतापाने शत्रूसैन्याचा पाठलाग करून त्याच्यावर तुटून पडतायत किंवा महाराजांचा राज्याभिषेक (देसाईंनी टेलीव्हीजन सिरियल मध्ये हा अप्रतीम दाखवला होता) किंवा केवळ ३०० मावळे वापरून शाईस्तेखानावर छापा..
नाट्याची अजिबात कमतरता नाही.
हां फक्त एखाद्याला लाथ मारून ३० फूट फेकणे, दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून जमीनीत भेग तयार करणे किंवा १५ जणांना एकच माणूस वेगवेगळ्या दिशेने उडवून लावतो वगैरे अचाट गोष्टी नकोत.

कपिलमुनी's picture

22 Jul 2015 - 2:44 pm | कपिलमुनी

किती ब्रिगेडच्या परवानग्या लागतील ?
भानगडी निस्तरता निर्माता खच्ची होईल

संदीप डांगे's picture

22 Jul 2015 - 2:51 pm | संदीप डांगे

मक्कायतर. इथं जयंती ठरवण्यापासून ते मृत्यू कसा झाला याबद्दल प्रत्येक घटनेबद्दल दहा हजार मतं आहेत.

निर्माता वेडा होईल...

अस्वस्थामा's picture

22 Jul 2015 - 2:54 pm | अस्वस्थामा

का.प. या बाबतीत अगदी मान्य.. :)
पण महाराजांच्यासंदर्भात आधीच (काही चांगले/ काही यथातथा ) चित्रपट/ मालिका या मधून आले आहे. त्यांची शौर्यगाथा थोडी फार का होईना लोकांन माहितीय. (अर्थात पोटेंशियल जबरदस्त आहे यात वादच नाही)
तसंच पोटेन्शियल २७ वर्षांच्या युद्धाचं आहे, (संभाजी ते ताराबाई) तिथे तर जबरी मालिका बनेल इतके पोटेन्शियल आहे.

पण बाजीराव हा या बाबतीत उपेक्षित वाटतो. म्हणजे त्याच्या लढाया आणि मोहिमा इतक्या मोठ्या मोहिमा आधी मराठ्यांपैकी कोणी काढल्या नसाव्यात (अर्थात ते शक्य पण नव्हतं तरीही). त्याचा कॅनव्हास खूपच मोठा आहे. शिवरायांच्या बाबतीत आपण मैदानी युद्धं दाखवू शकत नाही पण तशी बाजीरावाची युद्धं पण अचाट अशी आहेत आणि तरीही त्याच्या मस्तानीबद्दल जितकं आलंय तेवढं त्याच्या कर्तृत्वाबद्दल आलेलं नाही असं वाटतं ..
असो.

संदीप डांगे's picture

22 Jul 2015 - 3:09 pm | संदीप डांगे

सहमत. मागे यावर खफ वर बरीच गहन चर्चा झाली होती.

बाजीराव हा मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल पाहिजे तर. मराठी साम्राज्य दाखवायचे तर बाजीरावावर योग्य तसा चित्रपट निघायला हवा.

पगला गजोधर's picture

28 Jul 2015 - 2:20 pm | पगला गजोधर

बाजीराव हा मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हणता येईल पाहिजे तर

शिवप्रभूंनी रचिला पाया, बाजीराव (थोरला) झाला कळस.

पूर्ण सहमत. त्यातून ब्रिगेडचे लोक विषारी प्रचार करकरकरून अज्ञान फैलावतात त्यामुळे तर कैच झेपत नै.

काळा पहाड's picture

22 Jul 2015 - 3:05 pm | काळा पहाड

बाकी माझ्यातल्या दिग्दर्शकाकडे ही एका चित्रपटातलं शेवटचं दृश्य तयार आहे.
क्षितीजावर एक अणुस्फोटामुळे निर्माण झालेला काळा ढग वरच्या दिशेनं सरकतोय. कॅमेरा खाली येतो. एका समांतर रेषेत उडणारी सुखोई त्या दिशेने वेगाने निघून जातात. त्यापाठोपाठ सैनिकी हेलिकॉप्टर्स चा एक जत्था पण निघालाय. कॅमेरा खाली येतो. रस्त्यावरून तिकडे कडे जाणारी सैनिकी गाड्यांची शिस्तबद्ध नि:शब्द रांग आणि त्यात बसलेले 'अणु जैविक रासायनिक' प्रतिबंधक सूट घातलेले सैनिक. कॅमेरा आणखी थोडा खाली जातो. कॅमेरा एका मैलाच्या दगडावर स्थिर होतो. अर्ध्या फ्रेमभर तो दगड आणि राहिलेल्या अर्ध्या फ्रेममध्ये सैनिकी गाड्यांची पुढे जाणारी चाकं. त्या दोन्हींमधून मावळत्या सूर्याचे किरण. दगडावर लिहीलंय: 'اسلام آباد میں 20 کلو میٹر'.
आणि इथे श्रेयनामावली सुरू होते.

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 4:11 pm | बॅटमॅन

इस्लाम आबाद मैं २० कलो मिटर!

असं वाचलं अन मग प्रकाश पडला, इस्लामाबाद २० किलोमीटर.

अस्वस्थामा's picture

22 Jul 2015 - 4:28 pm | अस्वस्थामा

तुमाला हे पण वाचता येतं व्हय ? आमी सरळ गूगल ट्रान्स्लेटर वापरला.. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2015 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाजीराव-मस्तानी डिसेंबरात प्रदर्शित होत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2015 - 2:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

ट्रेलर...

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 2:41 pm | अस्वस्थामा

हे पाहिलंय एक्का काका.. पण एक तर ट्रेलर मध्येच इतक्या कमतरता/चुका दिसून आल्यात की चित्रपटाकडून काहीच अपेक्षा नै. (त्यांनी अपेक्षाभंग करावा अशी अपेक्षा. :) )
त्याचबरोबर,

त्याच्या मस्तानीबद्दल जितकं आलंय तेवढं त्याच्या कर्तृत्वाबद्दल आलेलं नाही असं वाटतं ..

हेच या मुव्हीवरून सिद्ध होतंय ना.

पिशी अबोली's picture

21 Jul 2015 - 4:36 pm | पिशी अबोली

बाहुबली अतिशय आवडला. पहिल्या हाफ मधे वैतागले होते, पण दुसर्‍या हाफ मधे डोळ्यांचं पारणं फिटलं. पुन्हा तेलुगु मधे बघायची इच्छा आहे. चित्रपटाबद्दल ऐकून ज्या अपेक्षेने गेले होते, ती पूर्ण झाली. ज्या आतुरतेने एखाद्या हॉलीवूडपटाची वाट बघेन तेवढ्याच आतुरतेने 'द कन्क्लुजन' ची वाट बघतेय.

बाहुबलीची गोष्ट एक तर अस्सल भारतीय मनावर लहानपणापासून झालेल्या तमाम कथांच्या संस्कारांची आठवण करून देणारी, त्यात बॉलीवूडी गाणी आणि प्रेमदृश्ये, त्यात दाक्षिणात्य भव्यदिव्यता, आणि या सगळ्यासाठी तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकाने केलेली मेहनत त्यात दिसत राहते. त्याची ओढून ताणून मराठी सिनेमाशी तुलना करायचा अट्टाहास कशाला?

मराठी चित्रपट चांगले असतील तर बघायला आवडतात, पण मराठी चित्रपट एक तर एका टोकाचे गल्लाभरू नाहीतर दुसर्‍या टोकाचे गंभीर गहन असतात. एकात फालतू करमणुकीचा अजीर्ण होईपर्यंत मारा तर दुसर्‍यात करमणुकीला फाट्यावर मारून नुसते मेंदूला छळणारे प्रसंग(काही अपवाद वगळून). त्यामुळे हल्ली आपोआप मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते. हिंदीचं तर बोलायलाच नको. एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे बाहेरून येणारे चित्रपट. पण ते कितीही आवडले तरी काळजाला भिडत नाहीत. त्यामुळे महाभारतीय संस्कारातला आणि भारतीय मातीतला चित्रपट म्हणून बाहुबलीला एवढा रिस्पॉन्स मिळाला त्यात नवल काय? तो मराठीला मिळत नाही म्हणून कुढतच बसायचं का?

संदीप डांगे's picture

21 Jul 2015 - 10:37 pm | संदीप डांगे

प्रतिसाद अतिशय आवडला... :-)

आताच एका वर्तमानपत्रात वाचले:
अवतार ने २ हजार कोटी प्रॉडक्शन वर खर्च केले आणि बारा हजार कोटी कमावले.. मराठी चित्रपट कधी इतक्या उंचीवर पोचेल.

अरे काय मूर्खपणा आहे. कशाची कशाची तुलना करावी याला थोडंतरी डोकं वापरावं की नाही? इथं मराठी चित्रपट २ हजार कोटी तर सोडाच, त्याच्या ०.०००५ टक्क्यासही निर्मात्याचे प्राण कंठाशी येतात. आणि एवढं करून इन-मीन ४०-५० स्क्रीन्स आणि ४०-५० लाख प्रेक्षक. तिथे ४०-५० हजार स्क्रीन्स आणि ४०-५० कोटी प्रेक्षक. काय तुलना आहे का?

उगाच आपलं "मराठी लोक कसे मागे बघा" चं टूमणं वाजवायचं. जौदे ना भाव! इतर खर्च करतायत, आपण बघायचं काम करावं.

झालस्तर आपल्या कथा ग्रेट पद्धतीने इंग्रजीतून लिहाव्या, गाजवाव्या म्हणजे ते ग्रेट दिग्दर्शक, निर्माते कथेतलं ग्रेट मूल्य बघून चित्रपट काढतीलच शिवाजींवर, संभाजींवर, बाजीरावांवर. गेम ऑफ थ्रोन्ससारखी टीवी सीरीजही बनू शकेल. त्या आधी ते ते नाट्य, इतिहास जगाला समजेल अशा भाषेतून फार उत्तुंग पद्धतीने मांडला गेला पाहिजे. जगभर ओळखला गेला पाहिजे. किंवा निदान त्या निर्मात्यांच्या हातात तरी पडला पाहिजे.

धंद्यात कधीही दुसरर्‍याच्या पैशाने खेळायचं असतं. कथा आपल्या मातीतली पण निर्माते दिग्दर्शक आणि भाषा जागतिक... हा मार्ग कसा आहे? माझ्या मते शक्यही आहे.

कपिलमुनी's picture

22 Jul 2015 - 2:30 pm | कपिलमुनी

धंद्यात कधीही दुसरर्‍याच्या पैशाने खेळायचं असतं.


मारवाडी संगत आहे वाटत

संदीप डांगे's picture

22 Jul 2015 - 2:53 pm | संदीप डांगे

हालात के थपेडोने मारवाडी बना दिया मुनिवर...

कपिलमुनी's picture

22 Jul 2015 - 3:25 pm | कपिलमुनी

मते अतिशय योग्य आहेत .
माझा मारवाडी मित्र हेच सांगतो .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jul 2015 - 2:39 pm | निनाद मुक्काम प...

बाहुबली सोडा राव
मी बाजी पाहिला आहे
मराठी मधील पहिला सुपर हिरो
तो पाहिल्यावर मला सुद्धा वाटले
मी बाजी आहे

मराठीत 'भुजबळ द आर्मस्ट्राँग" या नावाने येतोय एक सिनेमा. त्यातल्या प्रॉपर्टीची भव्यता डोळ्यात भरणार नाही या साऊथवाल्यांच्या..

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Jul 2015 - 1:15 pm | लॉरी टांगटूंगकर

==))==))==))==))

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:36 pm | टवाळ कार्टा

ट्याच्या आड्डी..."म्राठा ड पॉवर" अस्सा येईल येक ;)

मित्रहो's picture

21 Jul 2015 - 10:52 pm | मित्रहो

बाकी बाहुबलीमुळे तेलगु चित्रपट फार महान वगेरे असतात असा गैरसमज होउ नये.
- दर वीस मिनिटाला जर रक्त सांडले नाही तर फाउल समजतात. (पुलंचे वाक्य बदलून वापरतोय)
- अर्ध्या चित्रपटातला अर्धा भाग ब्रह्मानंदम् आपल्या खांद्यावर उचलतो. बऱ्याचदा चित्रपट टुकार असला तरी त्यामुळे सुसह्य होतो. पुढचा चित्रपट पण बघितला जातो.
- काही कुटुंबाची मक्तेदारी आहे.
- मराठी प्रेक्षकाला तरी तेलगु चित्रपट काही अपवाद सोडले तर फार आवडनार नाही.
ह्या गोष्टी इतरत्र नाही असे नाही.

बाहुबली ही एक मोजून मापून घेतलेली जोखीम होती. परत ती काही जणांनी मिळून शेअर केली. काही बाबी जमेच्या होत्या.
- राजमौलीचा हा काही पहीला ऐतिहासिक चित्रपट नव्हता या आधी मगधीरा येउन गेला होता. तसेच मख्खीला हिंदीत सुद्धा बरेच यश मिळाले होते. मुळात या माणसावर जोखीम घ्यावी अशी त्याची पत होती.
- अनुष्काच्या नावाने चित्रपट चालतात. इथे तर प्रभास, राणा, सत्यराज, रम्या क्रिष्णन सारे होते.
- धर्मावाल्यांनाही साथ दिली. सुरवातीपासूनच काहीतरी भव्य करायचे आहे या हेतूनेच ते केले गेले. कुणीतरी अशी जोखीम घ्यायला हवी होती आणि ती घेतली गेली. एक जबरदस्त चित्रपट तयार झाला.

मराठी तर जाउ द्या आजवर बॉलीवुडमधेही असा चित्रपट बनला नाही. तेंव्हा तेलगु आणि मराठी चित्रपटांची तुलना करीत इथे खल करीत बसण्यापेक्षा परत एकदा थेटरात जाउन चित्रपट बघावा.

सिद्धार्थ ४'s picture

21 Jul 2015 - 11:21 pm | सिद्धार्थ ४

लक्ष्या, मकरंद अनारसपुरे, भारत जाधव, इत्यादी इत्यादी कोमेडीअन आपण हिरो म्हणून आवडीनी बघू तो पर्यंत तरी साउथ सारखे ग्ल्यामर मराठी सिनिमा ना कसे मिळणार?

इरसाल's picture

22 Jul 2015 - 2:41 pm | इरसाल

नाव लिह्याचं रायलं का ?

सिद्धार्थ ४'s picture

23 Jul 2015 - 6:35 am | सिद्धार्थ ४

दादा, लिव्हा ना तुम्हि. मला लै भारि वतेल भघा.

सुहास झेले's picture

22 Jul 2015 - 8:33 pm | सुहास झेले

काल बाहुबली बघण्याचा योग आला...दोन तीन दिवस कुठेच तिकिट्स मिळत नव्हते. रात्री ११ चा शो असून हाउसफुल्ल होता. सिनेमाबद्दल बोलायचे तर अतिशय भव्य आणि रम्य चित्रकथा आहे. टेक्निकल आस्पेक्ट्स निव्वळ उच्च दर्जाचे आहे. ज्युरासिक वर्ल्डच्या व्हिज्युअल इफेक्ट्स टीमने यासाठी काम केले आहे असे ऐकून आहे. मराठी चित्रपट सोडाच, बॉलीवूडला ही अजून काही वर्ष जातील त्यांच्यासारखे टेक्निकली परफेक्ट काम करायला.. :) :)

संदीप डांगे's picture

22 Jul 2015 - 9:28 pm | संदीप डांगे

विज्युअल इफेक्ट्स टेक्निकली परफेक्ट नाहीत:
बर्‍याच दृश्यांमधे ज्याप्रकारे कॅमेरा फिरणे अपेक्षीत होते तसा तो फिरला नाहीये. धबधब्याचं चित्रिकरण त्यामुळे परफेक्ट लेवलला पोचलं नाही. धबधब्याचं भव्यता दाखवणारं मनोहारी चित्रीकरण मी जुरासिक पार्क पहिल्या भागात बघितलंय. विशिष्ट अँगलने कॅमेरा टॉप-टू-बॉटम सगळा धबधबा एकदा तरी फ्रेम मधे घेऊन वरून खाली आला पाहिजे होता. इथे कॅमेरा दर्शकाच्या आयलेवलवर वरून खाली पॅन केला आहे. त्यामुळे इतका सुंदर धबधबा करून तो वाया गेला असं वाटलं. फ्लॅट वाटतं.

कलर टिन्ट नॉट परफेक्ट. बरेच सीन्स असे आहेत जिथे टिन्ट अपेक्षित होते. ग्लॅडियेटर आणि ट्रॉय बघतांना फिल्म-टिन्ट मुळे वातावरण तयार होतं. युद्धाच्या सीन्समधे टिन्टचा वापर अपेक्षित होता. या चित्रपटात बराच दिवाळी-इफेक्ट आहे. (दिवाळी-इफेक्ट ही आमच्या काही कलाकार वीएफएक्स मित्रांची संज्ञा, दिवाळीच्या काळात जशा जाहिराती येतात, फ्रेश, कलरफूल, वैगेरे. इतर संज्ञा आहेत त्या नंतर कधीतरी.)

आयुधे, शस्त्रे, वाहन, अ‍ॅक्सेसरीज यांच्यातलं डीटेलींग पर्फेक्ट लेवलला नाहीये. भल्लालदेवाचं मुकूट याचं उत्तम उदाहरण आहे. जर हा चित्रपट काल्पनिक आहे तर तेवढं स्वातंत्र्य घेता आलं असतं. इतिहासकाळाप्रमाणे वस्तूंमधलं डीटेलींग ऐतिहासिक चित्रपटात लागतं. इथे तो प्रश्न नव्हता.

इतरः कुठेतरी संकलनात गडबड झालीये. पार्श्वसंगीत अप-टू-द-मार्क नाहीये.

ओवरऑल टेक्निकली मी या चित्रपटाला १० पैकी ८.५ गुण देइन.

भारतीय चित्रपटांनी बाहुबलीच्या निमित्त फार मोठी झेप घेतली आहे. पण परफेक्शनसाठी नेमकं जिथे अजून थोडा जोर लावायचा पॉइंट येतो तिथूनच ही टीम परतली आहे असं वाटत होतं. भारतीय तंत्रज्ञ आणि कलाकार त्याबाबतीत थोडे कमी पडतात. यातले जे तंत्रज्ञ अभारतीय आहेत, त्यांच्या कामातलं परफेक्शन आणि भारतीयंच्या कामातलं परफेक्शन कळून येतं. (इथे कोणालाही कमी-जास्त लेखायचा उद्देश नाही याची नोंद घ्यावी.)

खटासि खट's picture

22 Jul 2015 - 11:23 pm | खटासि खट

जुरासिक वर्ल्ड या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स ज्या कंपनीने बनवले त्यांच्याचकडे यातल्याही काही भागाचं काम झालेलं आहे अस त्या कंपनीतल्या अनधिकृत सूत्रांकडून कळते.

धबधबा केरळमधला असून (एबीपी माझा) त्याचं चित्रीकरण महत्वाचं नाही. कारण पुढचे सर्व सीन्स हे व्हीएफएक्स वापरून दाखवलेले आहेत ( रविवार सकाळ, पुरवणी) - . धबधब्याचे काहीच सीन्स खरे आहेत.

उत्तम प्रतिसाद, बह्वंशी सहमत. पिसं काढायची तर अजून नक्कीच काढता यावीत, पण ये तो शुरुआत है, आता लक्षात येईल अशी अपेक्षा करावयास हरकत नसावीसे वाटते.

चिगो's picture

23 Jul 2015 - 5:17 pm | चिगो

मी 'बाहुबली' दोनदा बघितला थेटरात. (माझ्याकडून हा बहुमान मिळालेला हा एकमेव हिंदी चित्रपट आहे.. ;-) ) स्पेशल इफेक्ट्सच्या बाबतीत ही लक्षवेधी झेप असली तरी काही तॄटी आणि कमतरता जाणवल्या..

१. हीरोला तमन्ना पहील्यांदा जेव्हा प्रत्यक्षात दिसते, त्या तिच्या जंगलात पाठलाग होण्याच्या सीनमध्ये दाखवलेले जंगल बर्फाच्छादीत उंचीवर नसते.. चक्क 'मॅनग्रोव्ह्स' ते ' रेनफॉरेस्ट' टाइपातले जंगल दाखवले आहे.. ही चुक नंतरच्या दृष्यांत (avlanche) मध्ये सुधारलीय..

२. दिवाळी इफेक्टशी सहमत..

३. अ‍ॅनीमेशन काही दृष्यांमध्ये अभिनयाशी जुळत नाही.. तो हीरो जंगलात पळतांनाच्या अ‍ॅक्शन्स जरी 'अवतार' सारख्या असल्या तरी तृटी जाणवतात.

४. माहीष्मती महालात बाहुबलीचा पाठलाग करतांना त्याच्या ज्या उड्या दाखवल्यात, तेव्हा 'मारीयो' काळातले ग्राफीक्स आठवले.. ;-)

मात्र एकंदरीत हा चित्रपट भव्यदिव्य आहे, आणि नक्कीच बघण्यासारखा आहे.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. ;-)

माझा मूळ मुद्दा जो होता कि मराठी चित्रपट एवढ्या मोठ्या scale वर का बनत नाहीत , तो वरच्या चर्चेत मागे पडला असे वाटले . खूप लोकांनी मी हा चित्रपट आंतर्जालावर पहिला हा मुद्दा उपस्थित केला . पहिल्या प्रथम म्हणजे हा चित्रपट मी पाहणारच नव्हतो पण माझ्या office मधल्या तेलेगु , तमिळ जनतेने त्याची बरीच माहिती गायली आणि पाहण्याचा आग्रह केला , इथे परदेशात जवळच्या चित्रपटगृहात हिंदी version लागला नसल्यामुळे मी तो आंतरजालावर पहिला . असो …. काही मिपा सदस्यांनी असा अनाहूत सल्ला दिला आहे कि चित्रपट हा चित्रपटगृहा मधेच पाहावा किंवा original CD वर पाहावा . एकदम मान्य …. पण त्यासाठी मराठी चित्रपट परदेशात release तर व्हायला हव ना … परदेशाचे सोडा , मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तरी प्रदर्शित होतात का ? काही अपवाद वगळता … फारच थोडे महाराष्ट्रा बाहेर प्रदर्शित होतात . अरे का नाही आपण मोठी स्वप्न बघत ? का नाही एखादी Fantasy निवडून त्याचा चित्रपट बनवत ? अशी कथा जिला universal appeal असेल . हिंदी मधली यशस्वी मराठी तगडी starcast घ्या , रजनी तर आपला मराठीच माणूस आहे. त्याला घ्या , चित्रपट dub करा हिंदी , दक्षिणात्य भाषेत . करा release जगभरात नाही निदान भारतभरात तरी . मुळात चित्रपट मोठा असेल तर, चालणारा असेल तर तुम्हाला रडावं लागणार नाही आम्हाला multiplex वाले prime time देत नाहीत म्हणून .

खटासि खट's picture

23 Jul 2015 - 1:13 pm | खटासि खट

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले स्टार्स तीन राज्यात ब-यापैकी स्विकारले जातात. बाहुबली तीनही राज्यात डब झालेला आहे. (एरव्ही तीन स्वतंत्र सिनेमे बनले असते, पण खर्चाचे आकडे पाहून एकच सिनेमा रिलीज झाला. यापूर्वी रोबोटला हा मान मिळाला होता. आणखीही असू शकतील.
मनोरंजन उद्योगात त्या त्या राज्यातले भाषिक सिनेमे ही पहिली पसंती आहे. हिंदी सिनेमाचं अस्तित्त्व नगण्य आहे.
पहिल्या आठवड्यात हजार दीड हजार रुपये तिकीटाला घालवण्याची तयारी आहे. जितके पैसे लावले जातील त्याचे रिटर्न्स मिळू शकतात.
आपल्याकडे बाहुबली सारखा खर्चिक सिनेमा चितळे किंवा अविनाश भोसलेंनी बनवलाच तर प्रभासच्या जागी तरणाबांड नायक म्हणून सचिन खेडेकर असेल. तमन्नाच्या जागी सई ताम्हणकर (आठवा तमन्नाचं कुपोषित पोट वि. सईचं बाळसेदार पोट ), राणाच्या जागी अशोक सराफ किंवा दया आलीच तर सिद्धार्थ जाधव वगैरे आणि कटप्पाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे/ अरूण नलावडे अशी स्टारकास्ट असू शकेल. जर टाटाने पायनान्स केलाच तर सिनेमाचं शूटींग होण्याआधीच तिकीटाचं बुकींग घेतलं जाईल. त्यासाठी बॅंकांकडून कर्जही उपलब्ध केलं जाईल. जर रीलीज झाल्यानंतर एका आठवड्यात तिकीटाचा नंबर आला नाही तर व्याज अशी योजनाही जाहीर होईल. सिनेमाचं शूटींग कोकणात होईल हे सांगायला नकोच. सचिन खेडेकर (चष्म्यासहीत) बोरघाट चढून येतो तेव्हां लोणावळ्याचे नयनरम्य धबधबे दिसतील. शूटींग साठी ५० एमपीचा ओप्पो मोबाईल वापरण्यात येऊ शकतो. युद्धाचे प्रसंग शूट करताना पन्नास - पन्नास कलाकार वापरले जातील. मोदींच्या गर्दीचे फोटो रिलीज करणा-या संस्थेकडून त्याचं रुपांतर पाच पाच लाखात केलं जाईल. सेट्सवर पैसे वाया घालवण्यापेक्षा भोरच्या राजवाड्यात शूटींग केलं जाईल. अशा अनेक वैशिष्ट्यांसह पहिला मराठी महामूव्ही तयार होईल आणि झी टॉकीजच्या साथीने त्याचं प्रमोशन देखील होईल. चला हवा येऊं द्या मधे विशेष एपिसोड होईल. आणि ज्या दर्शकांच्या तिकीटाचे नंबर पहिल्या शो साठी लागलेत त्यांची नावे जाहीर केली जातील. त्यांना स्टेजवर बोलावून त्यांना सिनेमा हॉलचे पासेस चितळे किंवा अभोंच्या हस्ते सुपूर्द करण्यात येतील.

आमच्या राज्यात अ पेईंग घोस्ट शिनेमागृहात येईल अशी आशा होती, निदान एक अठवड्यासाठी! पण आला नाही. आता जालावर बघण्याशिवाय इलाज नाही. बाहुबली हा तेलुगु भाषेत थेट्रात चालू आहे व आताचे माहित नाही पण पहिला अठवडा तरी हाऊसफुल चालू होता असे समजले.
रजनीकांतला घेऊन मराठी चित्रपट काढणे सर्व निर्मात्यांना मिळून तरी परवडेल का हा हिशोब मनात चालू आहे. ;)

संदीप डांगे's picture

23 Jul 2015 - 7:31 pm | संदीप डांगे

रेवती ताई,

एक अनाहूत सल्ला की ज्या भाषेत असेल त्या भाषेत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघून याच. भाषेची फारशी अडचण नाही कारण फार महान कथा नाहीये आणि डायलॉग्स पण यथातथाच आहेत. अ‍ॅक्शनवरून सगळं समजतं काय चाललंय ते. मुख्यतः बघण्याचाच चित्रपट असल्याने तेवढं महत्त्वाचं. पण मोठा पडदा मिसू नका... :-)

रेवती's picture

23 Jul 2015 - 9:12 pm | रेवती

ओक्के. मला तेलुगु समजतं म्हणून तसा प्रश्न नाही पण त्या पब्लिकची भक्ती बघून आश्चर्य वाटले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jul 2015 - 3:18 pm | निनाद मुक्काम प...

आमच्याकडे मामाच्या गावाला जाऊ या व पीजी येउन गेला
आता स्पृहा व कामत तुमच्याकडे येणार आहेत
त्यातील अनिमेशन हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे
अवांतर दिवाळी इफेक्ट्स चे लोण म्हटले तर प्रस्थ आता वाढत चालले आहे
त्यामुळे यात करियर करण्यासाठी काही माहिती मिळू शकेल का
भारतात आलो की अनेक पालक आमच्या मुलांना सल्ले द्या किंवा काय करावे असा प्रश्न विचारतात , मग नेहमी नेहमी तेचतेच सांगून कंटाळा येतो

कपिलमुनी's picture

23 Jul 2015 - 9:26 am | कपिलमुनी

मराठी चित्रपट एवढ्या मोठ्या scale वर का बनत नाहीत ?

१. कमी प्रेक्षकवर्ग
२. चित्रपटगृहांची अनुपलब्धता
३. मराठी प्रेक्षकांची हिंदी चित्रपटाला असणारी पसंती आणि स्पर्धा ( हिंदीचा कलेक्शन फक्त ६० कोटी आहे आणि बजरंगी आल्यावर ९०% चित्रपटगृहामधून बाहुबली काढला )
४. मराठी निर्मात्यांचे बजेट
५. तिथे बाहुबली पहिलाच बिग बजेट चित्रपट नाही , पूर्वी तिथे असे चित्रपट आले आहेत आणि चालले आहेत . त्यामुळे बाहुबली ही केलक्युलेटेड रिस्क होती.

कन्यारत्न's picture

23 Jul 2015 - 2:24 pm | कन्यारत्न

निशित्तच कौतुकास्पद आहे

dadadarekar's picture

24 Jul 2015 - 12:26 am | dadadarekar

मराठीत नाथमाधवांची वीरधवल कादंबरी बाहुबलीला तोडीस तोड आहे.

सिरुसेरि's picture

24 Jul 2015 - 11:53 am | सिरुसेरि

मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे . त्यामुळे जे मराठी चित्रपट त्याला काळजाला भिडले नाहीत व क्रुत्रिम वाटले ते मराठी प्रेक्षकांनी नाकारले आहेत . म्हणुन त्याला ग्रुहित धरुन कसे पण मराठी चित्रपट बनवू नयेत . उदाहरणादाखल - सतिश राजवाडे यांचा 'मुम्बई पुणे मुम्बई' जेवढा चालला , तेवढे त्यांचे नंतरचे चित्रपट चालले नाहीत . स्वप्निल जोशीचे 'मुम्बई पुणे मुम्बई' , दुनियादारी जेवढे स्विकारले गेले , तेवढे इतर चित्रपट स्विकारले गेले नाहीत . सचिन खेडेकर यांचे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ', काकस्पर्श हे जेवढे गाजले तेवढे इतर चित्रपट गाजले नाहीत.

बाहुबली, एस.एस.राजमौळी, प्रभास, राणा, तमन्ना यातलं एकही नाव मला माहीत नव्हतं. मुळात मला चित्रपट सृष्टीचा गंधच नाही तेवढा. “बावर्ची सिनेमात हिरोचा डबल रोल आहे का??” असले प्रश्न विचारणारा मी. पण आज खास लिहायला बसलोय म्हणजे तसं काहीसं मी पाहिलेलं असणार, असा तर्क लढवायला आजिबात हरकत नाही. परवा सहज मनात आलं, पाहूया हा सिनेमा. पण इतर अनेकांच्या मनात आलं न ते. शो झालेला हाउसफुल. मग पुन्हा प्रयत्न केला दुसर्या दिवशी. तुटकी सीट मिळाली. कारण तिचं तिकीट विकलंच जात नाही ऑनलाईन. त्यामुळे तिकीट खिडकीवर मिळालं तरी. असो खूप झालं. मुद्दा हा आहे की, वरील सर्व नावं मला काल परिचीत झालेली आहेत.

खूप कौतुक कराव्या अशा खूप गोष्टी आहेत या सिनेमात. आता सिनेमासाठी बॉडी वगैरे करणं जुनं झालं, सगळेच करतात. पण त्याचंही कौतुक आहेच. राणा आणि प्रभास. दोघेही वीर असे काही दिसलेत सिनेमात, की चुकून नायिकेला दिग्दर्शकाच्या मताच्या/अन कथेच्या विरोधात नायकाशिवाय दुसरा कुणी आवडला तरी आश्चर्य वाटायला नको. अर्थात मी इथे स्टोरी बिरी सांगायला बसलोच नाहीये, आपल्या लोकांच फक्त कौतुक (जे मी फार कमी वेळा करतो ते) करायला बसलोय.

ह्या चित्रपटात एक 'कालकेय ' नावाची जमात आहे. त्यांची वेगळी भाषा ठसवण्यासाठी मदन कार्की ह्याने एवढ्या एकाच आवश्यकतेसाठी चक्क एक नवीन भाषा निर्माण केल्याचं मला विक्रम एडके यांच्या परीक्षणातून कळालं. अरे काय माणसं आहेत की काय. एवढे कष्ट फक्त हॉलीवूड मध्ये केल्याच्या बातम्या येतात कानावर. आपण म्हणजे “वाहवा, याला, याला म्हणतात डेडिकेशन वगैरे उद्गार काढतो. पण आपली माणसं काय करतात हे पाहूया ना एकदा डोळे उघडून. एक नवी भाषा. ७५० शब्द आणि ४० व्याकरणाच्या नियमांसह. अर्थात हिंदी मध्ये नाही जाणवायचं ते. कारण भाषांतरीत सिनेमे कसे अन कुणाकरवी भाषांतरीत होतात हे मी चांगलंच अनुभवलंय.
आता जरा जिव्हाळ्याचा विषय, सेट्स. साबू सिरील या माणसाने ज्या काही detailing सकट सेट केलाय, त्यासाठी विशेष टाळ्या आहेत. भव्यता...मनभर व्यापून राहिलेली भव्यता. झोपल्यावरही डोळ्यात राहणारी. पहावीच एकदा. त्याला visual effects ची जोड पण आहेच; मान्य. पण मुळात असं काही करावं हे सुचणाऱ्या कलादिग्दर्शकाला सलाम.
या सगळ्यात मला महत्व वाटलं ते स्टोरी टेलिंगचं. इतकी अप्रतिम कथा सांगण्याची पद्धत. त्याला तोड नाही. अर्थात मुळात त्या कथेतच तेवढा दम आहे. पण मांडणी ...प्रेक्षकांना कथेचा एकेक पदर उलगडून दाखवण्याची हातोटी सुन्दर आहे. दोन अभिनेत्यांना हेतुपुरस्सर उच्च/नीच दाखवून हा घ्या तुमचा हिरो वगैरे प्रकार नाहीत. कथेला गरज वाटेल एवढीच प्रेमाची फोडणी, भावनांच्या कल्लोळांचा अभाव, भक्ती, स्वाभिमान अशा संकल्पनांचा भडीमार नसल्यामुळे कथा track सोडत नाही. (नाहीतर कृष्णचा क्रिश होईपर्यंत ६०% सिनेमा संपलेला असतो एरवी)
२५० कोटी मिळाल्यावर तुम्ही काय करू शकता?? उच्च तंत्रज्ञान वापरून उच्च सिनेमा बनेलच असं नाही. इथे सेट्स पाहताना विशेष आभास पाहताना जाणवतं...की किती उत्तम पद्धतीने पैसा खर्च केलाय. महिष्मती नगरीतील व्यवस्था, ८-८ माजली वाडे, इमारतीचं बांधकाम निव्वळ अप्रतिम. मोठ्ठ्ठठ्ठा धबधबा पाहून तर पैसे पाण्यात घालवलेत वगैरे म्हणावसं वाटतं.
छायाचित्रकारांनी पण कमाल केलीय. ही भव्यता, सौंदर्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ते आजिबात कमी पडलेले नाहीत. रात्रीचे प्रसंग चितारण्यासाठी निळा फिल्टर न लावून त्यांनी जे काही मन जिंकलय. वा वा!!
वैदिक काळातील व्यूह रचना, त्यांचा अभ्यास वगैरे पण कथेला हातभार लावायला आहेच. मुद्दा काय, तर चला सिनेमा बनवूया म्हणून कुणीही ह्याला हात घातलेला नाही. त्यामागे खूप अभ्यास अन कष्ट आहेत.

थोड्या अतार्किक गोष्टी पण आहेत. सावळी नायिका एका गाण्यात गोरी, अन गाणं संपल्यावर पुन्हा सावळी वगैरे. पण स्वप्नात असं होऊ शकत म्हणून सोडून दिलय मी ते. ईतर आहे अजून...पण माफ!!!

नार्निया पाहतो आपण, सुपरम्यान, kripton ग्रह वगैरे. पण अरे बॉलीवूडच्या सर्व व्यावसायिक गणितांना छेद देत एक टॉलीवूड सिनेमा आलाय जो सलग २ दिवस हाउसफुल आहे. प्रेम कथा, थिल्लरपणा नसलेला हा सिनेमा प्रचंड यशस्वी होणारे आणि त्याला यशस्वी करण्यात आपला हात असावा असा मला वाटतं. त्याशिवाय असे धाडसी प्रयोग करायला कुणी तयार होणार नाही. आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं सारं गणित पैशापाशी अडत. प्रेक्षकांना काय आवडतं ते दाखवा. अरे पण आम्हाला हे देखील आवडत हे कळू द्या न त्यांना. २५० कोटीला २५० कोटीचा परतावा आहे म्हणावं. धार्मिक सणांना सिनेमा रिलीज न करताही यश पदरात पडत हे कळेल म्हणजे त्यांना.

आता गम्मत म्हणजे हा सिनेमा एका उच्च बिंदुला येऊन क्रमश: राहतो आणि २०१६ मध्ये पुढील भाग येणार असल्याची घोषणा करतो. जे काही असेल ते. मी ज्या आतुरतेने MI सिरीजची वाट पाहतो, तेवढीच याचीही पाहतोय हे नक्की.
वेळ काढून पहा. (सिनेमा विशेष आवडला असल्यामुळे माझं कौतुकाचं लिखाण क्रमश:च राहील, पुन्हा काही लिहावसं वाटेल असं दिसतंय.)

भाषा समजत नसली तरी सिनेमा समजला आणि बेहद्द आवडला. एवढी तांत्रिक करमत करून सुद्धा चान्दोबातल्या गोष्टींमध्ये जी निरागसता असायची ती जपण्यात यश मिळाले आहे. ही अतिशय कठिण आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.

सिरुसेरि's picture

28 Jul 2015 - 1:41 pm | सिरुसेरि

१०० , २०० कोटी खर्च करुन बनवलेले हे तेलुगु , तामिळ सिनेमे बघताना भव्य दिव्य वाटत असेलही , पण त्याच बरोबर वाईटही वाटते . यातील काही कोटी हे जर तेथिल रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा यांवर खर्च करता आले ते जास्त महत्वाचे आहे . त्यामुळे या बाबतीत मराठी सिनेमांचे विशेष कौतुक वाटते . कारण कोणत्याही गाजलेल्या मराठी सिनेमाने मराठी प्रेक्षकांना खोटी स्वप्ने दाखविली नाहीत .

खटपट्या's picture

28 Jul 2015 - 2:30 pm | खटपट्या

मराठी चित्रपट विषय आणि सामाजिक जाणिवेच्या बाबतीत पुढे आहेतच. आगामी देउळबंद चित्रपटातून येणारे सारे उत्पन्न विधायक कामासाठी वापरले जाणार आहे.

अस्वस्थामा's picture

28 Jul 2015 - 3:14 pm | अस्वस्थामा

१०० , २०० कोटी खर्च करुन बनवलेले हे तेलुगु , तामिळ सिनेमे बघताना भव्य दिव्य वाटत असेलही , पण त्याच बरोबर वाईटही वाटते . यातील काही कोटी हे जर तेथिल रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा यांवर खर्च करता आले ते जास्त महत्वाचे आहे . त्यामुळे या बाबतीत मराठी सिनेमांचे विशेष कौतुक वाटते . कारण कोणत्याही गाजलेल्या मराठी सिनेमाने मराठी प्रेक्षकांना खोटी स्वप्ने दाखविली नाहीत .

तरी वाटलंच होतं हे कोणी कसं म्हटलं नाही !!

अहो, आपल्या पुणे अथवा मुंबई नगरपालिकांमध्ये अथवा इतर पुरेसे उत्पन्न असलेल्या शहरामध्ये "रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा" यातल्या किमान महत्वाच्या गोष्टींवर किती बजेट असते पाहिलेत का हो ? मुंबई मनपाच्या या वर्षीच्या बजेटमध्ये ३००० कोटी आहेत फक्त road repair and development या कामासाठी (संदर्भ). तरी काय अवस्था आहे हो ??

मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता.
isro ने ४०० कोटीचे यान पाठवले तेव्हाही हाच सूर ऐकला होता. त्यांनी त्यांना दिलेले काम यशस्वी केले हे महत्वाचे.

ज्याला जे पैसे अ‍ॅलोकेट झालेत त्याने ते नीट वापरावे (यात प्रशासन मुख्यत्वे आले) तरी खूप काम होईल.
हे असले साम्यवादी विचार आता या काळात सध्यातरी तितकेसे लागू होत नाहीत हे ध्यानात घावे.

संदीप डांगे's picture

28 Jul 2015 - 3:49 pm | संदीप डांगे

असा प्रतिसाद अजून कसा आला नाही याचेच आश्चर्य वाटत होते.

असो. शेवटी आलाच.

१००-२०० कोटी खर्च म्हणजे लेडीजबार मधे जाउन धनदांडगे जसे पैसे उडवतात तसे हे २५० करोड उडवले असे वाटणे असेल तर त्या वाटण्याला काय करू शकत नाही. ज्यांना हे उधळणे वाटते त्यांनी एकदा चित्रपट सुरू व्हायच्या आधी आणि नंतर येणारी नामावली व त्यात येणारी नावे मोजली तरी थोडा प्रकाश पडेल की हे पैसे कुठे जातात. त्या नावांशिवाय अप्रत्यक्ष हजारो लोकांना ह्या तथाकथित उधळण्याचा फायदा झालेला असतो. एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था उभी आहे, लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार, क्षमतेनुसार, कलेनुसार कमवायची संधी मिळत आहे. सिनेमा इंडस्ट्री नसती तर ह्या हजारो लोकांना कुठे व काय काम मिळाले असते? जसे दुसर्‍या एका धाग्यावर आयटी क्षेत्राने नोकर्‍या देऊन अभियंत्यांचे भलेच केले असे म्हटले जात आहे. तसेच इथेही म्हटले जाऊ शकते.

जर कोणाला उपदेश द्यायची गरज असेल तर ती दर्शकांना आहे. कारण खिशातले ८० ते २००० हजार रुपये हा दर्शकच उधळत असतो. निर्माता तर आपले काम करत असतो. तो त्याचा व्यवसाय आहे. त्यात त्याने किती पैसे लावावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. व्यवसायात लावल्या जाणार्‍या पैशाला उधळणे म्हणणे हा एक फारच मध्यमवर्गीय, मनोरंजक पण अनुत्पादक, क्षुद्र विचार झाला.

चित्रपट बनवणे हे म्हणजे पुस्तक वाचण्याएवढे सोपे काम नाही हे एकदाचे समजून घेतले पाहिजे. एक दहा सेकंदाचा शॉट बघायला आपल्याला दहाच सेकंद जरी लागत असले तरी तो शॉट आपल्यापर्यंत पोचवायला हजारो तंत्रज्ञ, कलाकार आणि व्यावसायिक झटलेले असतात. तो शॉट पर्फेक्ट येण्यासाठी कदाचित त्यांनी शेकडो तास घालवले असतात. एक उडी नीट मारली गेलेली अचूक पद्धतीने येण्यासाठी कदाचित नायकाला अक्षरशः दिवसभर तेच करत राहायला लागलेले असते. पडद्यावर दिसते तेवढे सोपे ते खचितच नसते. तेच काम न थकता, न चिडता, अचूक येण्यासाठी कमालीची सहनशिलता आणि कामामधे अढळ श्रद्धा लागते. तुम्ही आम्ही ज्या सहज भावनेने आणि क्षुल्लक महत्त्व देऊन एखादा चित्रपट बघत असतो त्याच सहजतेने तो तयार झालेला आहे असे आपल्याला वाटत असते. पण तसे नसते.

एखादी कथावस्तू पडद्यावर चितारण्यासाठी त्याप्रकारचे वातावरण उभे करावे लागते. तेवढा प्रचंड अनुभव येण्यासाठी प्रचंड खर्च करावाच लागतो. हा अनुभव घेण्यासाठी दर्शक पैसे मोजतात. जिथे दोन पार्टींमधला हा सरळ सरळ व्यावसायिक व्यवहार आहे तिथे सामाजिक जाणीवेचे, गरज नसलेले कढ काढण्यात कोणती महान मानसिकता आहे हे खरंच कळत नाही.

असा विचार येत असेल तर आपले सगळे जीवनच आपण तपासून पाह्यला पाहिजे. आपण एक व्यक्ती म्हणून जो काही खर्च करतो तो नक्की आवश्यकता आहे की उधळपट्टी हेही तपासून घ्यायला पाहिजे. त्यादृष्टीने पाहिले तर माणसाचे ९५ टक्के खर्च हे उधळपट्टी म्हणून मोजता येतील. झोपायला जमीनीवर चटई टाकली तरी झोप येतेच, तिथे कशाला डबलबेड, किंगसाईझची गरज? तेवढे पैसे किमान शंभर लोकांना चटई विकत घ्यायला उपयोगी पडतील की. तेच लाखो रुपयांची घरे कशाला? झोपायला जागा मिळाली तरी पुरे. कित्येक हजार लोक रस्त्यांवर झोपतात. त्यांतल्या किमान दहा लोकांना चाळवजा घर बांधता येईलकी. टूथपेस्ट तरी का वापरावी. तीही उधळपट्टीच आहे.

अव्यावसायिक उधळपट्टी आणि व्यावसायिक गुंतवणूक यातला फरक समजेल तेव्हाच याबाबतीत चित्रपटांवर केली जाणारी अस्थानी टिका कदाचित थांबेल.

लोक निर्मितीला लागलेला पैसाच बघतात. जमवलेला गल्ला बघत नाहीत. खरी टिका त्यावर झाली पाहिजे. पण तिथे अशी सोयिस्कर भूमिका घेता येत नाही.

पैसा's picture

28 Jul 2015 - 2:33 pm | पैसा

लोकांना स्वप्नं विकायचं आपलं काम तो सिनेमा चोख करतो आहे. अजून एक गोष्ट कोणाच्या लक्षात आलेली दिसली नाही, दिग्दर्शकाचे काम. अगदी एक्स्ट्रा नटांकडून त्यांनी उत्तम मुद्राभिनय करून घेतला आहे. कोणत्याही फ्रेममधे एक्स्ट्राज चे वागणे विसंगत वाटत नाही.

मारियोच्या उड्यांबाबत चिगोशी सहमत! पण बाकी उत्तम दृश्य अनुभवासाठी ते माफ करून टाकले आहे!

समीरसूर's picture

28 Jul 2015 - 2:52 pm | समीरसूर

आगाऊ म्हाद्या यांचा प्रतिसाद सुंदर आहे.

'बाहुबली' मला खूप आवडला. काय सुंदर आणि प्रभावी चित्रपट बनवला आहे!! वाह! सोपी कथा, जबरदस्त कलादिग्दर्शन, डोळ्यांचे पारणे फिटावे अशी अफलातून आणि भव्य दृश्ये, सगळ्यांचा खणखणीत अभिनय आणि उत्सुकता ताणून धरायला लावणारे दिग्दर्शन! प्रभास आणि राणा तर उत्तम आहेतच पण कटाप्पाच्या भूमिकेत सत्यराजने जान ओतली आहे. नासीरचा कुटील बाप जबरदस्त. अनुष्का, रम्या, आणि नाजूक तमन्ना यांनीदेखील जीव तोडून अभिनय केला आहे. स्पेशल इफ़ेक्ट्स जाणवतात पण एकंदरीत चित्रपटाचा आवाका प्रचंड मोठा आहे; त्यामुळे उणीवांकडे फारसे लक्ष जात नाही. चित्रपट बघतांना आपण काहीतरी भव्य-दिव्य, श्वास रोखून धरायला लावणारे बघतोय असे वाटत राहते.

डिटेलिंग इतके मस्त की मोठ्या मोठ्या महालांच्या ग्राफिक्समध्ये दुरून छोटी छोटी हालचाल करणारी माणसे, उडणारे पक्षी, फडकणारे झेंडे, बुरुजांच्या सावल्या, इत्यादी सगळे कुशलतेने टिपले आहे. धबधबा आणि पर्वतराजी तर निव्वळ अप्रतिम!

एकदा मोठ्या पडद्यावर पहायलाच हवा असा चित्रपट.

सत्याचे प्रयोग's picture

28 Jul 2015 - 4:41 pm | सत्याचे प्रयोग

मराठीत मला वाटतंय पानिपत वरच असा होवू शकतो .

सिरुसेरि's picture

29 Jul 2015 - 10:49 am | सिरुसेरि

"मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता."
-- बाहुबली बाबत आतापर्यंत प्रतिक्रिया या संमिश्र , परस्पर विरोधी अशा वाचायल्या मिळाल्या आहेत . काही जण त्यांतील तांत्रिक करामतींनी भारावून गेले आहेत , तर काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते .
"जर कोणाला उपदेश द्यायची गरज असेल तर ती दर्शकांना आहे. कारण खिशातले ८० ते २००० हजार रुपये हा दर्शकच उधळत असतो"
-- सर्वात वाईट तर तेथिल दर्शकांबद्दलच वाटते . कारण रणरणते उन , वादळ , पाउस , पाणी / वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हा सर्व त्रास सहन करीत लोक येतात व २ , ३ तास स्वताला गंडवून घेतात . यातूनच वास्तवापासून पलायनवादाची भावना वाढीस लागते .

संदीप डांगे's picture

29 Jul 2015 - 11:45 am | संदीप डांगे

मनोरंजनाला 'पलायनवाद' म्हणणे म्हणजे...

बॅटमॅन's picture

29 Jul 2015 - 12:43 pm | बॅटमॅन

अगदी असेच.

कपिलमुनी's picture

29 Jul 2015 - 3:04 pm | कपिलमुनी

सर्वात वाईट तर तेथिल दर्शकांबद्दलच वाटते

येथील दर्शकांबद्दल काय वाटते ?

dadadarekar's picture

29 Jul 2015 - 3:16 pm | dadadarekar

दर्शक शब्द योग्य आहे की प्रेक्षक ?

अस्वस्थामा's picture

29 Jul 2015 - 5:05 pm | अस्वस्थामा

"मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता."
-- बाहुबली बाबत आतापर्यंत प्रतिक्रिया या संमिश्र , परस्पर विरोधी अशा वाचायल्या मिळाल्या आहेत . काही जण त्यांतील तांत्रिक करामतींनी भारावून गेले आहेत , तर काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते .

अहो.. बाकीच्या मुद्द्यांबद्दल काहीच बोलत नाही आहात तुम्ही. असो.
इथे "काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते" बर मग ? निर्मात्याने जमेल तितका पैसा घातला तसा त्याला परतावा मिळाला असे समजा हवे तर. अगदी विहिर/बंधारा गायब होते तसे झालेय का हो ?
मुद्दा समजून घ्या आणि बोला की.

कारण रणरणते उन , वादळ , पाउस , पाणी / वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हा सर्व त्रास सहन करीत लोक येतात व २ , ३ तास स्वताला गंडवून घेतात . यातूनच वास्तवापासून पलायनवादाची भावना वाढीस लागते .

परत तेच. त्यास २५० कोटी घालणारा निर्माता कसा जबाबदार ? हे म्हणजे इतके लोक उपाशी असताना मिठाई बनवायला चितळे इ. हलवायांना लाज नाही का वाटत ? असे म्हटल्यासारखे वाटतेय. तुम्ही भलतीच निराशावादी मांडणी करत आहात आणि तिही सदोष.

अर्धवटराव's picture

29 Jul 2015 - 10:23 pm | अर्धवटराव

भारी आए... पन लय भारी नाय. ट्रॉय बीय च्या तर आसपास बी येत नाय.
दुसरा पारट पन फानार... अन असाच काइसा परतिसाद देनार :)

सिरुसेरि's picture

30 Jul 2015 - 10:52 am | सिरुसेरि

"येथील दर्शकांबद्दल काय वाटते ? "
--- मराठी दर्शक / प्रेक्षक हा केवळ १०० , २०० कोटींना व तांत्रिक करामतींना भुलून जाणारयांमधला नाही .तसेच तो चित्रपट / चित्रपट कलाकार / निर्माते / दिग्दर्शक यांना डोक्यावरही चढवणारयां मधला नाही . मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे . त्यामुळे जे मराठी चित्रपट त्याला काळजाला भिडले नाहीत व क्रुत्रिम वाटले ते मराठी प्रेक्षकांनी नाकारले आहेत . म्हणुन त्याला ग्रुहित धरुन कसे पण मराठी चित्रपट बनवू नयेत . उदाहरणादाखल - सतिश राजवाडे यांचा 'मुम्बई पुणे मुम्बई' जेवढा चालला , तेवढे त्यांचे नंतरचे चित्रपट चालले नाहीत . स्वप्निल जोशीचे 'मुम्बई पुणे मुम्बई' , दुनियादारी जेवढे स्विकारले गेले , तेवढे इतर चित्रपट स्विकारले गेले नाहीत . सचिन खेडेकर यांचे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ', काकस्पर्श हे जेवढे गाजले तेवढे इतर चित्रपट गाजले नाहीत.
-- येथील -->(महाराष्ट्रातील ). तेथिल --> (तामिळनाडू , आंध्रा / दक्षिण भारतीय प्रदेश)---
"त्यास २५० कोटी घालणारा निर्माता कसा जबाबदार ? हे म्हणजे इतके लोक उपाशी असताना मिठाई बनवायला चितळे इ. हलवायांना लाज नाही का वाटत "
--- २५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो . त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात .यांतील थोडे फार कोटी त्याने हवेत ऊडविले काय किंवा सामाजिक विकासासाठी खर्च केले काय , त्याचे फारसे काहीच बिघडणार नसते .

अस्वस्थामा's picture

30 Jul 2015 - 3:13 pm | अस्वस्थामा

२५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो . त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात .यांतील थोडे फार कोटी त्याने हवेत ऊडविले काय किंवा सामाजिक विकासासाठी खर्च केले काय , त्याचे फारसे काहीच बिघडणार नसते .

असले बालिश प्रश्न/विचार पाहून आमचा __/\__ .

बॅटमॅन's picture

31 Jul 2015 - 12:32 pm | बॅटमॅन

अगदी अगदी, आमचेही एक लोटाङ्गण. _/\_

कपिलमुनी's picture

30 Jul 2015 - 3:24 pm | कपिलमुनी

मराठी दर्शक / प्रेक्षक हा केवळ १०० , २०० कोटींना व तांत्रिक करामतींना भुलून जाणारयांमधला नाही .तसेच तो चित्रपट / चित्रपट कलाकार / निर्माते / दिग्दर्शक यांना डोक्यावरही चढवणारयां मधला नाही . मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे .

हाच मराठी प्रेक्षक सगळ्या खानावळीच्या बिनडोक चित्रपटांना कसा काय हजार असतो बॉ ?

संदीप डांगे's picture

30 Jul 2015 - 4:02 pm | संदीप डांगे

चित्रपट ह्या विषयासंबंधी तुमचे आकलन बघुन धन्य जाहलो या जन्मी.

मराठी प्रेक्षकांच्या वतीने त्यांना गृहीत धरून तुम्ही जी विधानं केली आहेत ती वादग्रस्त आहेत हे सांगू इच्छितो. कारण 'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' हे तद्दन बाजारू चित्रपट होते. सुरवातीच्या दिवसांत दादा कोंडके व सचिन प्रभृतींचे चित्रपटांनी सिल्वर जुबिल्या दाखवल्यात महाराजा. 'नॉट ओन्ली मिसेस राउत', 'विहिर', 'किल्ला', 'हजाराची नोट' ने नाही. त्यामुळे तुमचे ते चोखंदळ, चुजी मराठी प्रेक्षक कुठे आहेत त्यांचा जरा शोध घेऊन पहा आधी. आणि कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे हेच चुजी, चोखंदळ मराठी प्रेक्षक ज्यांना भुलवल्या जाऊ शकत नाही ते खाणावळींच्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहेत त्याचं काय?

तुम्ही म्हणताय अमूक गाजले, तमूक नाही गाजले, गृहीत धरून कसेही चित्रपट बनवू नये वैगेरे. जर यशाचा अचूक फॉर्मुला तुम्हाला कळला आहे तर जे इंडस्ट्रीत आहेत त्यांनाही तो तुमच्या आधीच कळला असेल. पण असे काही होतांना दिसत तर नाही. मुळात चित्रपट बनवणेच जर तुमच्या दॄष्टीने उधळपट्टी आहे तर तुम्ही चित्रपट बनवा असे तरी का सांगताय? की कायम झोपड्यांमधे चित्रीकरण करत गरीबांचे गचाळ आयुष्य दाखवणारेच चित्रपट बनवावे असे तुमचे मत आहे? तिथेही भरपूर लाईट्स लागतात. त्यापेक्षा उघड्या माळरानावर दुपारी बनवावे, महागडे कॅमेरे नको मोबाईल कॅमेरा चालेल. साउंड इंजिनीअरची गरज नाही. मूक चित्रपट बनवू. चांगले कलाकारही नकोत. खूप पैसे घेतात. गाणीपण नकोत, कथा चांगली असली म्हणजे झाले. पण चांगल्या कथेला चांगले पैसे मिळत नाहीत म्हणून कथाकार देणार नाही. प्रसिद्धीला खूप पैसे जातात. कशाला करायची प्रसिद्धी? एवढे कॉस्ट कटींग पुरे की अजून काही करायचे? नाही चित्रपट कसे बनवायचे सांगताय म्हणून विचारले. मग मराठी चित्रपट चालले नाही की बोंब मारायलाही आपण मोकळेच आहोत. हा कसा चांगला, तो कसा जमला नाही अशी चर्चा चघळायला तयार. नाही का?

तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठल्याच मराठी चित्रपटाचा बजेट २ कोटीपेक्षा जास्त जात नाही. (अपवादः लय भारी- ८ कोटी, प्रकाश आमटे- २.५, हरिश्चंद्राची फॅक्टरी- ६ कोटी, इत्यादी. बोटांवर मोजण्याइतके). हे ही टॉपलाईन निर्माते/दिग्दर्शकांबद्दल आहे. ९० टक्के तर २५ लाखाचाही टप्पा पार करत नाहीत. उद्या शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा झालाच तर त्याचे बजेट २०० कोटीच्या आसपासच असेल कारण कथेची गरज आहे म्हणून. निर्मात्याला उधळायचे आहेत म्हणून नाही. तुम्ही म्हणाल एवढा भव्य कशाला बनवायचा? ठिक आहे, शिवाजींची भूमिका करणार्‍याला घरच्या कपड्यात शूट करू. महाल, राजवाडे नकोत. जे भग्न किल्ले आहेत तिथेच मोबाइलने शूट करू. तिथे जायचा खर्च तरी कशाला. एखादं खेळाचं मैदान (असेल तर) घेऊ. ओके? त्या काळाची, पेहरावाची, हत्यारांची, वास्तुंची कल्पना ज्याने त्याने मनातल्या मनात करून घ्या म्हणा कारण आम्हाला पैसे 'उधळायचे' नाहीत.

२५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो. त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात

एक कलाकार व व्यावसायिक म्हणून माझा वरिल विधानांवर जोरदार आक्षेप आहे. चित्रपट व्यवसायाविषयीचे पुर्वदूषित आकस असल्यामुळे कदाचित असे अज्ञानमूलक विचार प्रसवत असावेत.

कुठल्याही निर्मात्याकडे स्वतःचे पैसे शिल्लक झालेत म्हणून किंवा चैन करावी म्हणून चित्रपट काढत नसतो. कारण कुणीही पैसे जास्त झाले म्हणून करूया धंदा असे म्हणून व्यवसायात उतरत नसतो. कुणाकडे १००० कोटी आहेत म्हणून बाहुबलीपेक्षा चांगला सिनेमा निघणार नसतो. परताव्यावर डोळा ठेवून केलेली ही एक व्यावसायिक गुंतवणूक आहे. शिल्लक पडलेली रक्कम नाही. मध्यमवर्गीय विचारसरणीच्या लोकांना इथे फक्त खर्च होणारा पैसा दिसतोय. त्याच्यापेक्षा लाखपटीने मौल्यवान अशी हजारो लोकांची मेहनत दिसत नाही. निर्मात्यांनी पैशातून पैसा निर्माण करायचा, रोजगार निर्माण करायचा धवल राजमार्ग (खरे देशकार्य/समाजकार्य) सोडून ज्या लोकांना आपल्या भविष्याची चिंता नाही, नागरी कर्तव्याची फिकर नाही, त्यांच्या परिस्थितीस सर्वस्वी तेच जबाबदार असलेल्या त्यांना हे पैसे पुरवून काय फरक पडणार आहे? मुळात ह्या दोन वेगळ्या क्षेत्रांचा तसा काय संबंध?

वरीलप्रमाणे विचार असणार्‍यांना कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या कामाची कदर नाही, किंमत नाही. कलाकार्/तंत्रज्ञांनी फुकट राबावे, चांगली गाणी, चित्रपट बनवावे, ते फुकट इंटरनेटवरून डाउनलोड करून ऐकावे, पाहावे अशी काही फुकट्या लोकांची इच्छा असते. स्वतः ज्या व्यवसायात/नोकरीत आहोत ते क्षेत्र सोडून इतर सर्व क्षेत्रातले लोक बसून खातात अशी भावना असते बर्‍याच जणांची. असे बरेच लोक मलाही माझ्या व्यवसायत भेटत असतात. ज्यांना फुकट काम करून हवे असते किंवा लाख रुपये किमतीचे काम दोन-पाच हजारात हवे असते. तेही ते उपकार करून देतोय अशी भावना असते. ही भावना इथूनच येते. उत्तम कलाकारांच्या मौल्यवान कलाकृती ह्या फुकटात, सहज मिळाल्या की असे विचार उपजायला सुरुवात होते. ह्या विचारांना वेळीच विरोध करणे माझ्यादॄष्टीने आवश्यक आहे.

मागे डॉक्टरांना मिळणार्‍या फीबद्दल आक्षेप घेणार्‍यांना मी हेच म्हणत होतो की कुणी कमावतंय त्याच्या कमाईवर डोळा ठेवू नये.

सिनेमा निर्मिती ही गुंतवणूक नसून उधळपट्टी आहे हे सिद्ध करा. जर जमत नसेल तर इतकंच म्हणतो- गल्ली चुकलं की तुमचं वो.

कुठल्याच मराठी चित्रपटाचा बजेट २ कोटीपेक्षा जास्त जात नाही.
असे असेल तर त्या हिरो हिरविनीच्या हातात काय पडत असेल? बिचार्‍यांचा खर्च तरी निघत असेल का? २ कोटी म्हणजे काहीच नाहीत.
नाही, मी कोणाच्या कमाईवर डोळा ठेवून नाहीये पण त्या मराठी पोरापोरींचा मेंटेन्सचा खर्च तरी निघायला हवा ना! जिम, सत्राशेसाठ कपडे, केस, चेहर्‍याची निगा, चपला, ब्यागा, पर्सा यांचे खर्च, शिवाय हे काही पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत नसणार. मान्य आहे की शिनेमाचे शूटींग, प्रमोशन्सवेळी खर्च निर्माता करत असेल पण इतरवेळी काय?
तळटिप- माझे प्रश्न हे उत्सुकतेपोटी विचारलेत. त्यांचा आणि सिरुसेरी यांच्या प्रतिसादाचा संबंध नाही.

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:43 pm | पाटीलअमित

म्हणच तर ह्या सई आणि राधिका हिंदी मध्ये hunter सारखे चित्रपट करतात

================================================

आजची स्वाक्षरी

बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

संदीप डांगे's picture

31 Jul 2015 - 7:14 pm | संदीप डांगे

कमाईच्या मानाने जो खर्च ज्या प्रमाणात करणे शक्य आहे तेवढाच केला जाणार. कत्रिना कैफ/प्रियंका येता जाता सहज मर्सिडीज ऑडी घेणार तर सोनाली/सई होंडा सिटी वैगेरे घेणार. त्या गुची/वित्तों वापरणार ह्या आपल्या काहीतरी सॅम्सोनाईट वापरणार. त्यांच्या घरीच दोन-तीन करोडची जीम असणार वर ट्रेनर असणार. ह्या कॉलनीतल्या जीममधे जाणार. त्यांची ब्युटीशियन लाखात फिया घेणार यांची हजारात.

शेवटी ज्या प्रमाणात पैसा कमवायचा तसं स्टेटस मेंटन करावं लागतं. जसं स्टेटस मेंटेन केलं तसा पैसा मिळतो. म्हणून कलाकाराला आधीच कुठल्या वर्तुळात काम करायचंय हे नक्की करायला लागतं नाही तर एकदा शिक्का बसला की सुटका होत नाही सहज. म्हणून माधुरी/उर्मिला मराठी चित्रपट करत नाही. राधिका आपटे आता कुठल्या भंगार मराठी सिरियल मधे दिसणार नाही. सई ताम्हणकर तर नाहीच नाही.

नवाजुद्दीन सिद्दिकी/इरफान खान आता आता खालच्या वर्तुळात येणारच नाहीत.

रेवती's picture

31 Jul 2015 - 7:34 pm | रेवती

हम्म.............पटतय.
प्रतिसादाबद्दल आभार.

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 7:37 pm | पाटीलअमित

नाना पाटेकर दिलीप प्रभावळकर ह्यांना ढिगाने हिंदी च्या ऑफर्स आहेत
म्हणून मराठीची कास नाहे सोडली

होय की! पण हिरो आणि हिरविनीचा प्रश्न वेगळा असतो असे वाटते. मी काही या क्षेत्रातील माहितगार नव्हे. भारतातही आजकाल सामान्य मनुष्यासाठी सगळे खर्च भरपूर वाढलेत असे लक्षात आल्याने शेलिब्रिटींबद्दल विचारले होते इतकेच! जास्त माहिती घेऊन काय करणार? जाऊ द्या!

संदीप डांगे's picture

31 Jul 2015 - 9:20 pm | संदीप डांगे

+१ :-)

यमगर्निकर's picture

30 Jul 2015 - 2:33 pm | यमगर्निकर

वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हे सर्व त्रास जर लोकांना होत असतील तर त्यांनि सरकार ला जाब विचारावा, सिनेमाच्या दिग्दरशकाला कस काय जबाबदार धरु शकता?

सिरुसेरि's picture

31 Jul 2015 - 10:35 am | सिरुसेरि

"आणि कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे हेच चुजी, चोखंदळ मराठी प्रेक्षक ज्यांना भुलवल्या जाऊ शकत नाही ते खाणावळींच्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहेत त्याचं काय"
-- खान मंडळींचे चित्रपट डोक्यावर घेण्यात तर इतर राज्यांतील प्रेक्षकांचाही मोठा वाटा आहे , मग तो गुन्हा केवळ मराठी प्रेक्षकांवर लादता येणार नाही .

"सुरवातीच्या दिवसांत दादा कोंडके व सचिन प्रभृतींचे चित्रपटांनी सिल्वर जुबिल्या दाखवल्यात महाराजा.""
-- निखळ विनोदाला मराठी प्रेक्षक नेहमीच दाद देतो .

--'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' या चित्रपटांना कथा , संगीत , चित्रीकरण ,अभिनय अशा घटकांचा योग्य समन्वय साधता आला . तसेच हे चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . बाहूबलीच्या बाबतीतही नेमके हेच झालेले आहे . हा चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . आवडण्याची आणी न आवडण्याची प्रत्येकाची मते , कारणे वेगवेगळी आहेत . आणी प्रत्येक जण हा त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे . "आम्हाला डिडिएलजे , हम आपके है कौन , कुछ कुछ होता है हे असले हाय फाय चित्रपट आवडले नाहीत . त्यापेक्षा थोडा हळूवार थोडा रफ टफ असा अजय देवगण - काजोल यांचा 'प्यार तो होनाही था' हाच आवडला " असे सांगणारे बरेच जण आहेत . ते त्यांच्या जागी बरोबरही आहेत .
-- तर 'नॉट ओन्ली मिसेस राउत', 'विहिर', 'किल्ला', 'हजाराची नोट' हे चित्रपट यामधील काही घटकांमध्ये कुठेतरी कमी पडले .
हिंदीमध्ये सूद्धा असे प्रकार झाले आहेत ( गाईड , कागज के फूल ) . जसे की गाईड हा चित्रपट सुरुवातीला लोकांना उमगलाच नाही . २ ,३ वेळा पाहिल्यावर मग प्रेक्षकांना त्यातील अर्थ / आशय समजू लागला . अजुनही समजुन घेत आहेत .

संदीप डांगे's picture

31 Jul 2015 - 1:05 pm | संदीप डांगे

मुद्द्यापासून कोलांट्याउड्या? भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे हा तुमचा मुद्दा होता. सोयिस्कर स्मृतिभ्रंश?

कोणते चित्रपट चाललेत आणि त्यामागची कारणे , ते आवडणे, न आवडणे हा सर्वस्वी वेगळा विषय आता घुसडता आहात.

सिरुसेरि's picture

31 Jul 2015 - 1:38 pm | सिरुसेरि

चित्रपट हा भव्य आहे म्हणुन तो सर्वांना आवडलाच पाहिजे हा हट्ट धरण्यात काहीही अर्थ नाही .
तसेच एकाला एखादा चित्रपट आवडला म्हणुन तो दुसरयालाही आवडलाच पाहिजे हा अट्टाहास धरून उपयोग नाही .
हा चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . आवडण्याची आणी न आवडण्याची प्रत्येकाची मते , कारणे वेगवेगळी आहेत . आणी प्रत्येक जण हा त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे .
भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो .

१."चित्रपट बनवणे हे म्हणजे पुस्तक वाचण्याएवढे सोपे काम नाही हे एकदाचे समजून घेतले पाहिजे. एक दहा सेकंदाचा शॉट बघायला आपल्याला दहाच सेकंद जरी लागत असले तरी तो शॉट आपल्यापर्यंत पोचवायला हजारो तंत्रज्ञ, कलाकार आणि व्यावसायिक झटलेले असतात. तो शॉट पर्फेक्ट येण्यासाठी कदाचित त्यांनी शेकडो तास घालवले असतात. एक उडी नीट मारली गेलेली अचूक पद्धतीने येण्यासाठी कदाचित नायकाला अक्षरशः दिवसभर तेच करत राहायला लागलेले असते. पडद्यावर दिसते तेवढे सोपे ते खचितच नसते. तेच काम न थकता, न चिडता, अचूक येण्यासाठी कमालीची सहनशिलता आणि कामामधे अढळ श्रद्धा लागते. तुम्ही आम्ही ज्या सहज भावनेने आणि क्षुल्लक महत्त्व देऊन एखादा चित्रपट बघत असतो त्याच सहजतेने तो तयार झालेला आहे असे आपल्याला वाटत असते. पण तसे नसते.""
२."कारण 'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' हे तद्दन बाजारू चित्रपट होते."
--- जेव्हा तुम्ही वरिल चित्रपटांवर बाजारूपणाचा आरोप करता , तेव्हा या चित्रपटांतील कलाकार , तंत्रज्ञ , सर्व टीम या सर्वांचाच , व त्यांच्या कष्टांचा अपमान करता . मग तेव्हा स्वताच्या सोयीने मारलेल्या दुतोंडीपणाच्या कोलांट्याउड्या चालतात का ?

संदीप डांगे's picture

31 Jul 2015 - 2:23 pm | संदीप डांगे

१. तुम्ही परत तेच ते गोंधळ घालताय. चित्रपटाच्या भव्यतेचा आणि व्यक्तिगत आवडीचा काय संबंध? तुमचा पहिला मुद्दा होता की असे भव्य चित्रपट ही पैशाची उधळपट्टी आहे. ते पैसे समाजकार्यावर खर्च करावे. आता तुम्ही व्यक्तिगत आवडीचा, जो कायमच वादातीत आहे असा, अगदी गैरलागू मुद्दा घेताय जो या चर्चेत मांडलाच नव्हता. दोन वेगवेगळ्या मुद्द्यांची केविलवाणी घुसळण करून तुमच्या प्रतिसादांची अवस्था अधिकाधिक वाईट होत जात आहे. तुम्ही आधी म्हणता की मराठी प्रेक्षक असे भव्य चित्रपट स्विकारणार नाहीत. तुम्हाला उदाहरण दिले तर म्हणता की काही लोकांना आवडतं, काहिंना नाही आवडत. अरे काय चाल्लंय तरी काय?

चित्रपटाच्या भव्यतेचा, गरिबीचा, हिट/फ्लॉप जाण्याचा, आवडीचा, नावडीचा, अभिरुचीचा, त्या पैशातून समाजकार्य करण्याचा एकमेकांशी मस्त बादरायण संबंध लावून ह्या सगळे मुद्द्यांची खिचडी करून तुम्ही नक्की काय सुचित करू इच्छित आहात?

२. बाजारू म्हणजे कमर्शियल/व्यावसायिक ही व्याख्या आहे. तुमची काही वेगळी आहे का? जे बाजारात खपू शकतं असं प्रॉडक्ट बाजारूच असणार. त्यात लागणार्‍या मेहनतीचा अपमान कुठे होतोय? तीन प्रकारचे चित्रपट असतात. एक कलात्मक - आर्ट फिल्म आणि दुसरे बाजारू - कमर्शियल - व्यावसायिक. तीसरे समांतर. आर्ट्फिल्म मधे सर्व निर्णय दिग्दर्शकाच्या हाती असतात. त्याला काय आवडेल तेच तो बनवतो, पब्लिकला काय आवडेल त्याचा विचार होत नसतो. बाजारू-व्यावसायिक चित्रपटात दिग्दर्शकासह इतर टीम आपले उच्च कौशल्य/ज्ञान वापरून पब्लिकला काय पाहायला आवडेल याचा अंदाज घेऊन अभ्यास करून चित्रपट बनवत असतो. चित्रपट उद्योग हा व्यवसाय आहे. तो बाजारू असणारच. बाजारू म्हटला म्हणजे त्यात मेहनत लागत नाही असं काही आहे का? उलट त्यातच जास्त मेहनत लागते. मी तो शब्द त्या मराठी प्रेक्षकांना उद्देशून वापरला आहे ज्या (तुमच्या मते) चुजी, चोखंदळ, अभिरूची संपन्न वैगेरे प्रेक्षकांनी हे चित्रपट डोक्यावर घेतले. कोर्ट सारखा चित्रपट डोक्यावरून जाणारे टाइमपास ला भरभरून प्रतिसाद देतात. म्हणजे बाजारात टाइमपास सारख्या चित्रपटांची मागणी आहे. जो चित्रपट 'मास'ला आवडतो त्याला बाजारू म्हटले तर कुणाचा अपमान झाला?

असो. शब्दांचे खेळ करून तुमचा मूळ मुद्दा तुम्ही विसरून जाऊ नका. लक्षात आहे ना "भव्य चित्रपट नको, समाजकार्य हवे"? आधी आपले प्रतिसाद नीट करा मग दुसर्‍यांची पिसं काढा.

कपिलमुनी's picture

31 Jul 2015 - 3:11 pm | कपिलमुनी

भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे

हे तुमचे वैयक्तीक मत आहे . गुड ! पण हे तुम्ही सार्वजनिक पटलावर मांडला आणि त्याचा समर्थन केलात की की प्रतिवाद होणार

पाटीलअमित's picture

31 Jul 2015 - 6:18 pm | पाटीलअमित

बाहुबली मधून व्यवस्थापन विद्या पण चांगली शिकवली आहे

========================

आजची स्वाक्षरी
बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

सिरुसेरि's picture

31 Jul 2015 - 11:11 pm | सिरुसेरि

"हे तुमचे वैयक्तीक मत आहे . गुड ! पण हे तुम्ही सार्वजनिक पटलावर मांडला आणि त्याचा समर्थन केलात की की प्रतिवाद होणार"

"आता तुम्ही व्यक्तिगत आवडीचा, जो कायमच वादातीत आहे असा, अगदी गैरलागू मुद्दा घेताय जो या चर्चेत मांडलाच नव्हता. "

--- सार्वजनिक पटलावर बहुतेकजण आपापले व्यक्तिगत / वैयक्तीक मत / द्रुष्टीकोणच मांडत असतो. त्या प्रमाणे मी आपले वैयक्तीक मत मांडले . व पुढील प्रतिसादांतून त्याबद्दल उपस्थित झालेल्या शंकांना उत्तरे देताना या मताबद्दलचे विचार मांडले .

"असो. शब्दांचे खेळ करून तुमचा मूळ मुद्दा तुम्ही विसरून जाऊ नका. लक्षात आहे ना "भव्य चित्रपट नको, समाजकार्य हवे"
-- या बद्दल मी लिहिलेच आहे . भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो .

"बाजारू म्हणजे कमर्शियल/व्यावसायिक ही व्याख्या आहे. तुमची काही वेगळी आहे का "

--इथे शब्दांचे खेळ कोण खेळत आहे ? आधी नको ते शब्द वापरायचे आणि नंतर सारवासारव करून त्याचे केविलवाणे समर्थन करायचे हा प्रकार जूना झाला . स्वताच्या आवडत्या चित्रपटांच्या तंत्रज्ञांची भलावण करायची आणी नावडत्या चित्रपटांना बाजारू संबोधून त्यातील तंत्रज्ञांची , त्यांच्या कष्टांची हेटाळणी करायची . आणी हा
दुटप्पीपणा ढोंगीपणा उघडकीस आला की शब्दांची फिरवाफिरव करून पळवाट काढायची आणी वारा येईल तशी पाठ फिरवायची . अशा दुतोंडीपणाला काय बोलणार

संदीप डांगे's picture

1 Aug 2015 - 12:48 pm | संदीप डांगे

सार्वजनिक पटलावर बहुतेकजण आपापले व्यक्तिगत / वैयक्तीक मत / द्रुष्टीकोणच मांडत असतो. त्या प्रमाणे मी आपले वैयक्तीक मत मांडले . व पुढील प्रतिसादांतून त्याबद्दल उपस्थित झालेल्या शंकांना उत्तरे देताना या मताबद्दलचे विचार मांडले .

>> वैयक्तिक मताचे स्वागतच आहे. फक्त ते मराठी प्रेक्षकांचे सार्वजनिक मत आहे असे म्हणून खपवणे योग्य नाही. व्यक्तिगत दृष्टीकोण सार्वजनिक पटलावर मांडल्यावर त्याबद्दल अधिक विचारणा होणारच. त्यातून एखाद्याचा दॄष्टीकोण कितपत अभ्यासावर, निरिक्षणावर आधारित आहे की बस दिले ठोकून टाईप आहे हे उघडकीस येते. आपल्या दृष्टीकोणास साजेसे स्पष्टीकरण विचार मांडणार्‍याकडून अपेक्षित असते. टाळाटाळ नाही.


भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो
.

>> हे तुमचे वैयक्तिक मत आहे. ओके. मग त्याचे बील तमाम मराठी प्रेक्षकांवर का फाडले? आपले वैयक्तिक मत सार्वजनिक मत आहे असे कुठल्या निकषांवर आपणास वाटले?

स्वताच्या आवडत्या चित्रपटांच्या तंत्रज्ञांची भलावण करायची आणी नावडत्या चित्रपटांना बाजारू संबोधून त्यातील तंत्रज्ञांची , त्यांच्या कष्टांची हेटाळणी करायची . आणी हा दुटप्पीपणा ढोंगीपणा उघडकीस आला की शब्दांची फिरवाफिरव करून पळवाट काढायची आणी वारा येईल तशी पाठ फिरवायची. अशा दुतोंडीपणाला काय बोलणार
>> मला कुठले चित्रपट आवडतात आणि कुठले आवडत नाहीत हे तर मी बोललोच नाही. ज्यांची उदाहरणे दिली त्यातले कित्येक तर मी पाहिले सुद्धा नाही. माझी विधाने त्या चित्रपटांना मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादांवर आधारित आहेत. व्यक्तिगत मत नव्हे. उलट तुमची व्यक्तिगत मते समाजावर लादून आपण फार समाजाभिमुख व थोर विचारवंत आहोत हा जो आव आणता आहात तो हास्यास्पद आहे. 'भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत' हे विधान अतिशय बालिश आणि अभ्यासहिन तर आहेच त्यातून गरिबांचा खोटा कळवळा दाखवण्याचा प्रयत्नही केविलवाणा आहे. शिवाय ते बुद्धीभ्रम निर्माण करून सकारात्मक घटनांना नकारात्मक लेपन करणारे आहे. २५० कोटींतून ज्यांना रोजगार मिळाला त्यांना तुमची ही मते कशी वाटतील याबद्दल थोडा विचार करून बघा.

तुमच्या कुठल्याच मुद्द्याबद्दल तुमच्याकडे कसलेही समर्थन नाही. कोण ढोंगी, कोण दुटप्पी हे ठरवण्याचा तुमचा वैयक्तिक अधिकार मान्य आहे. पण त्याने सिद्ध काहीच होत नाही हे सत्य आहे.

चर्चेबद्दल धन्यवाद!

सिरुसेरि's picture

3 Aug 2015 - 9:30 pm | सिरुसेरि

माझे वैयक्तीक मत हे माझ्या वैयक्तीक विचार / अनुभव / निरिक्षण यांवर आधारीत आहे .
कुणा दूतोंडी इसमाने टुकार दमबाजी , भंपक दमदाटी व पुचाट अरेरावी केली म्हणून मी ते बदलणार नाही.
माझ्या प्रतिसादातून मी मराठी प्रेक्षकांचे , मराठी सिनेमांचे , मराठी तंत्रज्ञांचे कौतूक केले आहे . तुमचा मात्र मराठी सिनेमांवर , मराठी तंत्रज्ञांवर त्यांच्या यशाबद्दल असणारा राग , जळफळाट , दूटप्पीपणा बाहेर पडला आहे . एकिकडे सिनेमा बनविण्यामागील तंत्रज्ञांचे कष्ट यांवर गळा काढायचा व दुसरीकडे वरील सिनेमांना हिणवून त्यातील तंत्रज्ञांच्या कष्टांचा अपमान करायचा , व परत त्याचेच रेटून समर्थन करायचे यांतून तुमच्या दूतोंडीपणाबरोबरच तुमचा निर्ढावलेपणा ही उघडकीस आला आहे .
दूसरयाला दांभिकपणे अक्कल शिकवण्यापेक्षा स्वताचा फालतू दूटप्पीपणा कमी करा . कुणा दूतोंडी इसमाकडून बिनकामाची अक्कल शिकण्याइतके बूरे दिन सुदैवाने आलेले नाहीत .