चित्रपट गप्पा .. ( सर्व भाषातील सिनेमे)

dadadarekar's picture
dadadarekar in काथ्याकूट
11 Jul 2015 - 3:55 pm
गाभा: 

चित्रपट या विषयावरील गप्पांसाठी हा धागा. चालू व आगामी आकर्षण असलेल्या हिंदी / मराठी / इंग्रजी व अन्य भाषेतील चित्रपटाबाबत हा धागा.

काल बाहुबली पाहिला. चांगला वाटला. थ्री डी असता तर अजुन छान वाटला असता.

लहान मुलांसाठी मिनिऑन्स कसा आहे?

थ्री डी , फोर डी , आयम्याक्स थ्री डी यात काय फरक असतो?

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

11 Jul 2015 - 3:58 pm | उगा काहितरीच

बाहुबली पाहिला , 3D पाहिजे होता, अशा वळणावर सोडला कि नंतरचा भाग पहिल्या दिवशी पहावा !

त्वरअगदी असेच म्हणतो. रामायण - महाभारतावर असे पिच्चर आले तर सर्व सुपरहीरोंचं मार्केट क्षणार्धात होत्याचं नव्हतं होईल.
(हो हो, त्यात आम्हीही आलोच. :( ;) )

स्वप्नांची राणी's picture

11 Jul 2015 - 4:42 pm | स्वप्नांची राणी

काहिही हां ....

अहो काय करता मग. वैसेभी आमचा रोल पर्मनंट नसतो असे नोलानसाहेबांनी सांगितलेच आहे. बॅटमॅन एक सोच है-मोर दॅन अ सिंगल पर्सन. त्या अर्थे आम्ही अमरच आहोत.

उगा काहितरीच's picture

11 Jul 2015 - 9:17 pm | उगा काहितरीच

पानिपत या विषयावर बिगबजेट पिक्चरच्या प्रतिक्षेत...

सव्यसाची's picture

12 Jul 2015 - 8:42 pm | सव्यसाची

चित्रपट आवडला. एकदा तरी नक्कीच पाहावा असा आहे. (चांगला होउ शकतो वगैरे नेहमीची टीका होउ शकते.)
पण एवढा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करणारा हा पहिलाच चित्रपट पाहण्यात आला. युद्धासाठी जोधा अकबर मध्ये खुपच कमी लोक दाखवले होते. इथे बरेच लोक दाखवले तरी आहेत. काही ठिकाणी अ‍ॅनिमेशन वाटले पण अ‍ॅनिमेशन आणि खरे लोक यामधली सीमारेषा जेवढी छोटी करण्याचा प्रयत्न करता येइल तेवढा केला आहे. तरिही बर्याच ठिकाणी जाणवत राहते. माहिष्मती नगरीच्या अ‍ॅनिमेशन चे सर्व अ‍ॅंगलने शूटिंग आहे. त्यामुळे त्याची भव्यता ठसण्यास फायदा झाला आहे.
बाकी रथाच्या समोर तलवारी फिरत राहताहेत, कपड्याचा शत्रुवर केलेला वापर या गोष्टी इतर कुठल्या इंग्रजी चित्रपटात पाहिल्या नाही. असे करणारा हा पहिलाच चित्रपट समजावा काय?
गाणी आणि नाच या गोष्टी स्टोरी ला खुप पुढे नेतात असे वाटत नाही.
अवांतरः ह्या डायरेक्टरने मगधीरा पण दिग्दर्शित केला आहे का?

dadadarekar's picture

12 Jul 2015 - 10:45 pm | dadadarekar

भव्यदिव्य लोकेशन्स आणि युद्धाच्या करामती यात थोडेफार साम्य जाणवते

उपयोजक's picture

18 Jul 2015 - 11:12 pm | उपयोजक

सुब्रमण्यमपुरम - तमिळ
कुंजिकुलेन - मल्याळम
हे चित्रपट पाहिलेत का?

चित्रगुप्त's picture

11 Jul 2015 - 5:32 pm | चित्रगुप्त

काहीसा जुना, 'आँखों देखी' चित्रपट अवश्य बघावा.
आँखों देखी : सत्याचं थेट प्रक्षेपण
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-utpal-v-4798933-NOR.html

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2015 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा

@ 'आँखों देखी' >> पाहिला. आवडलाच आवडला. साधं शांत आणि तरीही कसल्याही तत्वज्ञानाची बळजोरि न करणारं कथानक आहे. कदाचित म्हणुनच चालला नसावा. गाणीही वेगळ्या पठडितलि आणि पटकथेला साजेशी आहेत. मस्स्स्स्स्त वाटत होतं ऐकायला.

मी-सौरभ's picture

11 Jul 2015 - 6:33 pm | मी-सौरभ

पिक्चर छान आहे

आदूबाळ's picture

11 Jul 2015 - 10:56 pm | आदूबाळ

"...क्षमा कीजए सर, मुझे ये पता नहीं था मोती काला भी होता है..."

गोलमाल पुनरेकवार पाहतो आहे.

पैसा's picture

16 Jul 2015 - 11:31 am | पैसा

एकच नंबर!

'मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटातील 'कधी तू' या गाण्यात स्वप्नील जोशीसोबत असणारी ती मुलगी कोण आहे, जिचा चेहरा कधीही दाखवत नाहीत? मुक्ता बर्वेपेक्षा जास्त चांगल्या बांध्याची आणि छान आहे दिसायला असे वाटते.

चिनार's picture

13 Jul 2015 - 3:22 pm | चिनार

सुंग ची !

ते पात्राचं नाव झालं. त्या अभिनेत्री/नर्तिकेचे नाव काय आहे?

छत्रपतींवर असे चित्रपट का बनवता येऊ शकणार नाहीत. दक्षिणेकडचे दिग्दर्शक जर बाहुबली सारख्या काल्पनिक पात्रावर इतका भव्य दिव्य सिनेमा बनवू शकतात तर छत्रपतींवर किती भव्य चित्रपट बनवता येतील.

अफझल खान वधाचे पोस्टर लावण्यावरून दंगे भडकत असतील तर सिनेमात काय होईल तुम्हीच कल्पना करा…
आणि अफझल खान वध गाळून छत्रपतींवर सिनेमा म्हणजे रावणाविना रामायण …

जडभरत's picture

13 Jul 2015 - 5:09 pm | जडभरत

दुर्दैव आपले!

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 6:11 pm | टवाळ कार्टा

आणि असे करणारे ब्राम्हण नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरवले जाते

होबासराव's picture

13 Jul 2015 - 4:07 pm | होबासराव

अगदि मनातल बोललात.. पण परंतु किंतु त्या स्क्रिप्ट ला अप्रुव्हल किति ठिकाणावरुन आणावे लागेल कळतय का.. त्यातहि काहि नावे आणि चरित्र सिनेमातुन / स्क्रिप्ट मधुन गाळावे लागतिल्..आणि हे केल्यानंतर सुद्धा एखादि चींधि-चोर संघटना काहि तरि खुस्पट काढेलच.. मग इतकि रिस्क कुठलाहि निर्माता का घेईल?
भालजि नि सुद्धा कर्ज काढुनच आणि केवळ आपल्या निस्सिम शिव-भक्ति पायिच सुंदर चित्रपट काढले होते.

dadadarekar's picture

15 Jul 2015 - 5:13 pm | dadadarekar

बाहुबली दुसर्‍या भागात जॉन अब्राहम आहे म्हणे

का? दुसर्या भागात बाहुबली संन्यास घेऊन वस्त्रत्याग करतो का?

चलत मुसाफिर's picture

16 Jul 2015 - 9:23 am | चलत मुसाफिर

'समर'
दिग्द. शाम बेनेगल.
जातिसंस्था व तदनुषंगिक दांभिकपणा यावर प्रखर प्रकाशझोत टाकणारा

सत्यजित रेंचा 'समाधी' पाहिलात का? ओम पुरी, मोहन आगाशे, स्मिता पाटील... स्टारकास्टच पुरेशी आहे या सिनेमाबद्दल सांगायला.

dadadarekar's picture

16 Jul 2015 - 9:43 am | dadadarekar

आता नवीन आकर्षण ... बजरंगी भाइइजान आणि दृश्यम

मी-सौरभ's picture

16 Jul 2015 - 10:20 am | मी-सौरभ

कुणाला इंटरेस्ट नाही का या सिनेमात?

नया है वह's picture

16 Jul 2015 - 11:24 am | नया है वह

थोडासा रुमानी हो जाये! पहिला आतिशय सहज, सुन्दर सिनेमा,नाना पाटेकर अप्रतीम!

पैसा's picture

16 Jul 2015 - 11:39 am | पैसा

फेसबुकवर आत्ताच बाजीराव मस्तानीचे काही फोटो बघितले. तो कोणसा सिंग बरा दिसतो आहे बाजीराव म्हणून. पण प्रियंका चोप्रा काशीबाई असेल तर तिच्या कपड्यांची चांगलीच काशी केली आहे. दीपिका पदुकोण मस्तानी म्हणून धनुष्यबाण घेऊन काय विचित्रच वाटली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Jul 2015 - 11:47 am | कैलासवासी सोन्याबापु

हिंदी चित्रपटांत खुप ऐतिहासिक चुका असतात ज्या इतिहासाचा विद्यार्थी म्हणुन कितीही छोट्या असल्या तरी खटकतात
१ उदा जोधा अकबर मधे जोधाने तिच्या भावाला (सोनु सूद) लिहिलेल्या पत्रात प्लेन देवनागरी लिपी दाखवली आहे ते किंवा
२ लेटेस्ट बाजीराव मस्तानी मधे रणवीर सिंह हा बाजीराव च्या वेशात असताना कानात भिकबाळी च्या जागी मोत्याचे डुल दाखवले आहेत इत्यादी

जोधा राजपूत असल्याने तिच्या वैयक्तिक पत्रव्यवहारात देवनागरी लिपी येणे चूक नाही. मत्र मुघलांनी दुसर्‍या राजाला पाठवलेले फर्मान देवनागरीतले दाखवलेय, ते कैच्याकै आहे. सर्व फर्माने शुद्ध सदाशिवपेठी फारसी भाषेत असायची त्यांची.

बाकी भिकबाळी अन डूल-डीटेल्सची अपेक्षा कुणाकडून करताय सोन्याबापूसाहेब? रिकामडोक्या बॉलीवुडकडून? हाच जर सौथवाल्यांनी बनवला असता तर खचितच अ‍ॅक्युरसीकरिता जास्त कष्ट घेतले असते.

पैसा's picture

16 Jul 2015 - 12:12 pm | पैसा

या पिक्चराबद्दल वाचतेय की काशीबाई आणि मस्तानी बाजीरावासमोर एकत्र डॅन्स करणार आहेत. एक रागावलेली आणि वैताग आलेली स्मायली द्या रे कोणीतरी! यक्क्क्क्क!

बाजीरावाचा देवदास होणार तर!

बॅटमॅन's picture

16 Jul 2015 - 12:26 pm | बॅटमॅन

काय बोलू कळत नाही.

बाकी करण जोहर त्या इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नामक तद्दन भिकार सेरीजवर पिच्चर काढणारे माहितेय का?

पैसा's picture

16 Jul 2015 - 12:33 pm | पैसा

सारुखभाय शिवा का? आणि किरण खेर शिवाची आई असेल. भरजरी कपडे, लग्न, समूहनृत्ये वगैरे असेलच! करू देत काय काय ते! म्याड आहेत लोक असले पिक्चर पैशे घालवून बघायला जातात ते!

ओ तै, विचार करकरूनच काटा आला ना....."प प प पार्वती" म्हणेल मग तो शंकर. आय होप दॅट मूव्ही बिकम्स अ फ्लॉप. सीरियसलि. इतके वाईट शक्यतो कुणाबद्दल चिंतीत नाही, पण आय कांट हेल्प मायसेल्फ इन धिस केस.

द-बाहुबली's picture

16 Jul 2015 - 12:43 pm | द-बाहुबली

शिवाचा रोल वरुण धवन करणार आहे असेच कळते. एबीसीडी मधे त्याची नृत्याची सिन्सीअ‍ॅरीटी व प्रचंड कुवत बघता शिवाचा रोल तो १००% व्यवस्थीत करु शकतो.(शिव हा उत्तम नर्तक दाखवला आहे).

द-बाहुबली's picture

16 Jul 2015 - 12:38 pm | द-बाहुबली

इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नामक तद्दन भिकार सेरीजवर पिच्चर काढणारे माहितेय का?

त्याची रंगीत तालीम म्हणूनच त्याने बाहुबली प्रोड्युस केला...

प्रोड्यूसर करण जोहर नाहीये. शोबू यर्लागड्डा, राघवेंद्र राव आणि प्रसाद देविनेनी हे प्रोड्यूसर आहेत.

द-बाहुबली's picture

16 Jul 2015 - 12:46 pm | द-बाहुबली

सॉरी करन जोहरने फक्त हिंदी रिलीज केलयं. तो प्रोड्युसर नाही.

कथा म्हणून चांगली आहे कि 'इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा'. त्याकडे ऐतिहासिक किंवा धार्मिकतेच्या दृष्टीने बघितल्यास खटकू शकते. मध्यंतरी hollywood च्या निर्मात्यानेहि पुस्तकाचे अधिकार घेतल्याचे वाचले होते. करण जोहर फार तर फार निर्माण करेल , दिग्दर्शनाची हिम्मत तो करेल असे वाटत नाही.

बोका-ए-आझम's picture

18 Jul 2015 - 8:10 pm | बोका-ए-आझम

जोधा ही आख्यायिका आहे ना? मी तर असं ऐकलेलं की तो इतिहासकारांचा कल्पविलास आहे.

पद्मावति's picture

19 Jul 2015 - 7:39 pm | पद्मावति

संजय लीला भंसाली बाजीराव पेशव्यांवर सिनेमा काढणार ऐकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती ...बापरे...!! पण काल प्रोमो बघितल्यावर जरा हायसं वाटतय. तरीही पूर्ण सिनेमा बघेपर्यंत खात्री नाहीये की भंसाली साहेब काशीबाई आणि मस्तानीवर डोला रे डोला टाइप काही गाणं करणार नाही...keeping fingers crossed...

नाव आडनाव's picture

16 Jul 2015 - 11:47 am | नाव आडनाव

"ऊनपाऊस" नावाचा मराठी चित्रपट आहे. कृष्ण - धवल आहे. नक्की महित नाही पण ~१९५० च्या दशकातला असेल. काही वर्षां आधी आलेला बागबान (अमिताभ बच्चन - हेमा मालिनी) ऊनपाऊस वरूनंच बनवला आहे असं वाटतं. बरीच दृश्यं तर जशीच्या तशी घेतलेली आहेत. ऊनपाऊस चॅनेल वर लागत नाही कधी आणी लई शोधून त्याची सीडी पण मिळाली नाही पुण्यात. मी दूरदर्श्न वर बघितला होता. एकदा यूट्यूब वर होता पण उडवला नंतर.

dadadarekar's picture

16 Jul 2015 - 12:12 pm | dadadarekar

तु तिथे मीवरुन घेतला हो५आ ना ?

नाव आडनाव's picture

16 Jul 2015 - 1:49 pm | नाव आडनाव

बरोबर, मी पण तसंच एकलं होतं. पण बागबान मधली काही दृश्यं ऊनपाऊस सारखी वाटली म्हणून मला बागबान बघतांना ऊनपाऊस आठवला. उदा. चिठ्ठी वाचायच्या आधी अमिताभ बच्चनच्या चष्म्याची काच पडल्यामुळे फुटते ते आणी पुढचं सगळं एकदम तसंच आहे ऊनपाऊस मधे. अजून बरंच सारखं आहे बागबान आणी ऊनपाऊस मधे.

इनिगोय's picture

16 Jul 2015 - 11:54 am | इनिगोय

इनसाईड आउट हा अॅनिमेशनपट मोठ्यांनापण खूप आवडेल असा आहे. आपल्या भावना आपल्याला कशा सांभाळतात, चिडवतात, बिथरवतात, तर कधी सावरतात, याची मस्त गोंडस गोष्ट आहे. थ्रीडीमध्ये बघितल्यास आणखी छान.

पैसा's picture

16 Jul 2015 - 12:20 pm | पैसा

माझ्या मैत्रिणीने पाहिला, ती म्हणाली की अ‍ॅनिमेशन असला तरी लहान मुलांपेक्षा मोठ्यांसाठी जास्त आहे.

रायनची आई's picture

16 Jul 2015 - 12:33 pm | रायनची आई

मला आठवत असलेले काही सिनेमे.. A Separation, Baran, Tokyo Story, Last Vegas, Mr. Bean's Holiday आणि आपले Mr. & Mrs. Iyer , Queen, Piku, Hera Pheri ..

माझ्या मते -
मराठीत - जगाच्या पाठीवर, पाठलाग, सामना, उंबरठा, सरकारनामा, पक् पक् पकाक ,पोष्टर बाॅइज.
हिंदीत - मुघल-ए-आझम, गंगा जमना, शोले, अनुपमा, गाईड, जिस देश मे गंगा बहती है,
अर्थ, कभी हां कभी ना, जाने भी दो यारों, चक दे इंडिया, स्वदेस, लगान, दिल तो पागल है.
विंग्रजी - Schindler's List, Psycho, Silence of the Lambs, All the President's Men, Chinatown, The Pianist, Rain Man, Million Dollar Baby, Vertigo, Shutter Island.

यातले सगळे मी किमान १० वेळा पाहिले असतील. पण अजूनही ते पाहून संपलेत असं वाटत नाही. चांगलं पुस्तक जसं एकदा वाचून समाधान होत नाही, तसंच.

(Proud to be filmy)
बोका-ए-आझम

पद्मावति's picture

16 Jul 2015 - 3:00 pm | पद्मावति

हलक्या फुलक्या हिंदी सिनेमांमधे सई परांजपे यांचा कथा मस्तं आहे. गंभीर चित्रपटांमधे कलयुग- शशी कपूर.
इंग्रजी पीरियड फिल्म्स मधे- द अदर बोलीन गर्ल, द बटलर उत्तम.

सई परांजपे यांचा 'पपीहा' हाही चित्रपट छान आहे. तसेच मूळ 'चष्मेबद्दूर' ही.

dadadarekar's picture

16 Jul 2015 - 3:56 pm | dadadarekar

थ्री डी आयम्याक्स काय असते ?

सिरुसेरि's picture

16 Jul 2015 - 4:48 pm | सिरुसेरि

मराठी 'रमा माधव' मध्ये सुध्दा फालतु आयटम साँग घुसडले आहे.

उगा काहितरीच's picture

16 Jul 2015 - 6:40 pm | उगा काहितरीच

कुणी वास्तुपुरूष पाहीलेला आहे काय ?

धनावडे's picture

16 Jul 2015 - 9:36 pm | धनावडे

पाहिलाय छान आहे

मी पंचवीस हून जास्त वेळा बघितलेला एकमेव चित्रपट (आठ ऑस्कर लाभलेला):
...
...

याबद्दल विक्किती: (विक्कीतील माहिती)
https://en.wikipedia.org/wiki/Amadeus_(film)

माझाही परम आवडता पिच्चर. अफाट, अप्रतीम, बेफाट सुंदर, अचाट वगैरे.

बोका-ए-आझम's picture

17 Jul 2015 - 1:27 pm | बोका-ए-आझम

काय चित्रपट आहे हा! लियाम नीसनचा शिंडलर अफाट, राल्फ फाईन्सचा अमाॅन गाॅथ म्हणजे नखशिखांत नाझी (विशेषतः तो I pardon you सीन), बेन किंग्जलेचा इत्झॅक स्टर्न अप्रतिम. ज्यू घेट्टो नष्ट करुन नाझी सगळ्यांना श्रमछावणीत नेतात - तो सीन तर अंगावर येतो. ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रण चित्रपटातलं क्रौर्य आणि कारूण्य अजून अधोरेखित करतात. स्टीव्हन स्पीलबर्गने अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेले असतील पण अविस्मरणीय असा शिंडलर्स लिस्टच.

'शिंडलर्स लिस्ट' ह्या चित्रपटात स्पीलबर्गने त्याचा प्राण ओतला असावा!

असाच रोमान पोलान्स्कीचा 'द पियानिस्ट'.

एक एकटा एकटाच's picture

19 Jul 2015 - 11:43 am | एक एकटा एकटाच

शिंडलर्स लिस्ट जबरादस्तच.
जेव्हा जेव्हा पाहिलाय तेव्हा तेव्हा अंगावर काटा उभा राहिलाय.

बोका-ए-आझम's picture

19 Jul 2015 - 8:03 am | बोका-ए-आझम

स्पीलबर्ग आणि पोलान्स्की हे दोघेही ज्यू. पोलान्स्की तर खुद्द आॅशविट्झमध्ये राहिलेला. त्याची आई तिथल्या मृत्युछावणीतल्या गॅसचेंबरमध्येच मारली गेली. स्पीलबर्गही जर्मनीतून जीव वाचवून पळून आलेल्या नातेवाईकांच्या गोष्टी ऐकत मोठा झाला. त्यामुळे दोघांनीही आपल्या चित्रपटात जीव ओतला यात काही आश्चर्य नाही.

बोका-ए-आझम's picture

19 Jul 2015 - 12:17 pm | बोका-ए-आझम

तसाच पोलान्स्कीचा चायनाटाऊन. जॅक निकलसन आणि फे डनवे यांचा. त्याचं रुपांतर करायचा एक चांगला प्रयत्न नवदीप सिंगने (ज्याने अनुष्का शर्माचा NH10 दिग्दर्शित केलाय) केला होता - मनोरमा ६ फूट अंडर मध्ये.

NiluMP's picture

31 Jul 2015 - 10:52 pm | NiluMP

Apocalypto, Now You See Me and Olympus Has Fallen ---- Must watch

and Upcoming MI-5

सुंड्या's picture

1 Aug 2015 - 1:08 am | सुंड्या

English-The Shawshank Redemption, 300, The Godfather-I, Forest Gump, It's a Wonderful Life (1946), American History X (1998),The Departed (2006), Django Unchained (2012), Lawrence of Arabia (1962),Full Metal Jacket (1987),Scarface (1983), The Bridge on the River Kwai (1957),A Beautiful Mind (2001),Fargo (1996),12 Years a Slave (2013, Groundhog Day (1993), Dead Poets Society (1989),Broken Arrow (1996),Dangerous Minds 1995 , For a Few Dollars More (1965), The Good, the Bad and the Ugly (1966), Ip Man (2008),Kid Cannabis [2014],No Mans Land, The MotorCycle Diaries,The Secret in Their Eyes (2009), City of God (2002),Foolproof (2003), God Bless America (2011),Grease (1978),Love Story (1970), Pathology[2008], A Perfect Getaway (2009), The Devil's Double (2011), The Dictator[2012], The Game (1997), The Odessa File (1974), Under the Tuscan Sun (2003) ...

हिंदीत-सलिम लन्ग्डे पे मत रो, सलाम बोम्बे,कथा(1983),इजाज़त(1987),सूरज का सातवाँ घोड़ा (1993), छोटी सी बात(1975), खट्टा मीठा (1978),बाझार (1982), अरन्यक (1994)...

.(योग्यायोग्य ठरवण्याचा अधिकार दर्श्कावर).

राघवेंद्र's picture

1 Aug 2015 - 1:18 am | राघवेंद्र

Django Unchained (2012)हा कालच बघितला. खुप आवडला.

तसेच The Blues Brothers (1980)हा पण मस्त चित्रपट आहे.

अनामिक२४१०'s picture

1 Aug 2015 - 8:37 am | अनामिक२४१०

मला 'एक हजाराची नोट' पाहायचाय …
ऑनलाईन डाऊनलोड करायला लिंक मिळेल का मला …. ?

dadadarekar's picture

28 Aug 2015 - 12:02 pm | dadadarekar

कट्यार काळजात घुसली.

सिनेमा येत आहे.

खान्साहेब ... सचिन.

पंडितजी .... शंकर महादेवन

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2015 - 9:23 am | बोका-ए-आझम

जर 'कट्यार काळजात घुसली' वर चित्रपट येणार असेल तर. पण नाटकांवरुन आलेले चित्रपट अयशस्वी ठरतात असा इतिहास आहे - सुंदर मी होणार वरुन आज और कल, अश्रूंची झाली फुले वरुन आंसू बन गये फूल आणि तो मी नव्हेच वरुन वो मै नही - हे सगळे प्रयत्न सपशेल फसले. मराठीत जयवंत दळवींच्या पर्याय वरुन काढलेला पुढचं पाऊल चालला होता. कट्यार पण असंच अपवादात्मक ठरलं तर छान होईल.