रघु देसाई

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
8 Jul 2015 - 11:56 am

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष होता. रघु देसाई काही महिन्यापूर्वीच जुनी कंपनी सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला होता. त्याने त्या कंपनीमध्ये खूप मजा केली होती. तिथलं वातावरण त्याला आवडत होतं, त्या कंपनीकडून तो ऑनसाईटपण जाऊन आलेला होता. त्याला आमच्या कंपनीमधलं वातावरण फारसं पसंत पडलं नव्हतं. त्याच्या मते आधीचीच कंपनी छान होती.

"वहापे बहोत ऐश करते थे रे... अपने बाप कि जान्गीर थी जैसे, यहापे साला दिन रात मराओ, फिर भी काम खतमहि नही होता. सबको गधेजैसे काम करनेकि आदत है यहा, टाईमपे घर निकलो, तो ऐसे देखते है कि सामनेसे आठवा अजूबा जा रहा है." अशी त्याची कुरकुर चालायची.

एकदम गप्पिष्ट माणूस होता तो. त्याच्या बे-मध्ये बऱ्याचदा गप्पांचे अड्डे जमलेले असायचे. आजूबाजूच्या दिल्लीकडच्या, पंजाबी वगैरे पोरांसोबत गप्पा मारताना तो तिकडे असतानाच्या आठवणी काढायचा. तिकडचे किस्से सांगायचा. तिकडे वातावरण किती मस्त असतं, तिकडचे लोक किती बिनधास्त असतात. तिथे त्याच्या ऑफिसजवळच तो राहायचा, आणि तिथे आजूबाजूला खाण्यापिण्याच्या गोष्टींची कशी रेलचेल असायची वगैरे गोष्टी सांगत रमायचा. मुंबईला शिव्या द्यायचा. जाण्यायेण्यात इतका वेळ जातो म्हणून वैतागायचा. त्याच्या आधीचंच शहर जास्त चांगलं होतं.

त्याने तिकडे बॅंचलर लाइफ़ एन्जॉय केली होती. आता लग्न झाल्यावर कशी वाट लागते हे सांगायचा, अजून अविवाहित असलेल्या मुलांना "ऐश करा लेको, हेच दिवस आहेत" अशा आशयाचे डोस पाजत राहायचा. त्याचे तसले दिवस सरल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर उघड दिसत असे. आणि ती त्याच्या बोलण्यामधूनही लपत नसे. त्याच्या मते आधीचंच आयुष्य छान होतं.

त्याचं एकदा कुठल्यातरी मित्राशी फोनवर बोलणं चालू होतं. लवकरच कुठला तरी लाँग विकेंड येणार होता. तो मित्र सुटीवर मूळ गावी चालला होता. तो यालापण चलायला सांगत असावा. हा त्याला हताश सुरात म्हणत होता "तुमचं काय साहेब.. असेल तर ट्रेनमध्ये बुकिंगच्या बर्थवर नाहीतर बिनधास्त खाली पेपर टाकून जाताल गावाला. आम्ही आता फॅमिलीवाले. बुकिंग मस्ट झालंय. असं जाऊ शकत नाही. आणि एकट्याने जायचा विषय जरी काढला तरी बायको जीव घेईल."

तो एकटा असताना सुटीच्या दिवशी दुसरं काही नसेल तर ऑफिसला येऊन नेटवर टाईमपास करत असे, पण आता कामासाठी विकेंडला ऑफिसला यावं लागलं तरी त्याची बायको कुरकुर करायची, आणि मग तो चिडून यायचा. कधी उशिरा थांबावं लागलं आणि बायकोचा फोन आला कि वेडावाकडा चेहरा करून फोन वर बोलायचा, आणि आम्हाला हसवायचा. त्याची आधीची एकट्याची लाइफ सही होती, असं त्याला मनापसून वाटतं.

Raghu Desai

एव्हाना आमच्या प्रोजेक्टची डेवलपमेंट संपून टेस्टिंग सुरु झालं होतं. टेस्टर लोक सगळे एपीआय (सॉफ्टवेअरचा एक भाग) टेस्ट करून त्यातले बग्स, इश्युज रेज करायचे. ते आम्हा डेवलपर लोकांना सोडवण्यासाठी असाईन व्हायचे. रघुने बरेच मोठे एपीआय डेवलप केले असल्यामुळे त्याला बरेच इश्युज यायचे, आणि तो वैतागायचा. दिवसभर टेस्टर लोकांना लाखोली वाहत इश्यू सोडवत बसायचा.

त्या एपीआयमध्ये मला कळायला लागल्यावर मलाही इश्यू मिळायला लागले. मग तो गमतीने म्हणायचा "यार तूहि लेले न सारे इश्युज, इतना अच्छा जावाका (जावा : प्रोग्राम लिहिण्याची भाषा) चँप है.. मै टेस्ट लीड को बोल देता हु, अभी इसके आगे मेरे एपीआयमे कुछ इश्यू आता है, तो सिधा तेरेकोही देनेको.. मेरेको झंझटहि नही चाहिये" हे याला त्याला चँप म्हणून काम करून घेण्याची त्याची खास स्टाइल होती.

कोणालाही काम सांगताना त्या व्यक्तीला कितपत ज्ञान आणि अनुभव आहे याचा विचार न करता अगदी बारीकसारीक सूचना द्यायचा. "काम सुरु करताना कोड लेटेस्ट घे" "किवर्डस कैपिटलमध्ये टाक" इ. समोरच्याच्या अकलेचा असं सन्मान करण्याचं त्याचं कारण "बाद मे लफडा नही चाहिये" असं असायचं.

रघुला शिकवण्याची आवड उपजतच. त्यामुळे संधी मिळेल तिथे प्रत्येकाला निःशुल्क शिकवण्याचं अखंड व्रत त्याने घेतले आहे. टीममधले सहकारी, टेस्टर लोक, बॉस कोणालाही त्यांचे काम आणखी चांगले कसे करता येईल, त्यांना प्रगतीस कुठे वाव आहे, हे तो अगदी उत्साहाने शिकवत असतो. यामुळे तो कंपनीसाठी एक अमूल्य असेट आहे. :D

त्याचं स्वतःचं काम किती व्यवस्थित आहे हे दाखवण्याचा त्याला छंदच आहे. कुठल्याही चर्चेत, "मेरे सिस्टमपे तो मैने ऐसा सब कर के रखा है.." "मै ना इसको ऐसे ऐसे करता हु, तो क्या है ना टाईम बच जाता है" अशी वाक्य तो येता जाता कोणावरही फेकतो.

ब्लेम गेम मध्ये तर तो एक कसलेला पटू आहे. सरकारी खात्यात, जिथे फक्त इकडून तिकडे काम टोलवणे हे मुख्य कौशल्य लागतं, तिथे त्याने टोलवाटोलवीची महान कामगिरी करून दाखवली असती. आयटी कंपनीमधेही काही कमी होत नाही हे सर्व. पण टोलवण्याआधी थोडे तरी काम करावं लागतंच.

रघुकडे काही असं काम आलं कि रघु ताबडतोब त्याचा फडशा पाडून, चेंडू दुसरीकडे टोलवून देई. आणि दुसरीकडून काही विलंब झाला कि याचा ठणाणा सुरु. बॉसशी काही बोलायला जावं आणि तो जागेवर नसेल, किंवा त्याने मेलला लवकर उत्तर दिले नाही तर त्यालाही सुनवायला मागे पुढे पाहत नाही. मग बाकीच्या पामरांची काय कथा.

रघूच्या लेखी काम देणारा म्हणजे शत्रू.. त्यामुळे त्याला काम देणाऱ्याला रिकामं न राहू देणं हे त्याचं कर्तव्य असल्यागत तो वागे. प्रत्येक छोट्या बाबतीत वरून मंजुरी आल्याशिवाय स्वतः पुढे जात नसे. म्हणजे कामाला उशीर झाला तर तो बॉसने शंकेचं लवकर समाधान केलं नाही म्हणून, आणि कामात चूक झाली तर विचारूनच केलं होतं अशी बोंब ठोकायला तो मोकळा.

काही दिवसांनी काही एफएस, डीएस ( थोडक्यात क्लायेंटच्या गरजा, अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी डेवलपरला सूचना असलेले कागदपत्र ) मध्ये चुका ध्यानात आल्या, त्या बदलण्याचं काम होतंच, त्यात परत क्लायेंटने बऱ्याच गरजा बदलून आमचं आणखी काम वाढवलं.

तेव्हा रघु आयुष्यालाच वैतागला होता. "क्या कामा करते रे ये लोग, दस बार डीएस चेंज करेंगे, और दस बार हमे उसकेलीये बैठना होगा दस घंटे, साला एक बार बैठो ना जी भरके क्लायेंटके साथ, ठीक से एकही ढंग का डीएस बनाओ, हम भी एकही बार कुछ घंटे मे बना देंगे उसको.. ये क्या रोज कि मगजमारी, रोज कुछ चेंज करो, रोज उसको टेस्ट करो, इश्युज निकालो तबतक नया चेंज आ जाता है..."

असाच रडतपडत तो प्रोजेक्ट संपला. नंतरच्या प्रोजेक्टमध्ये रघु दुसऱ्या टीममध्ये गेला होता. त्याच्या अनुभवामुळे त्याला आता काही डीएस बनवायचं काम दिलं होतं. मी सहज त्याला भेटायला गेलो तेव्हासुद्धा तो वैतागलेलाच होता.

" साला क्या टीम है यार, पकाते है बहोत. डीएस बनानेको दिया है मुझे.. हर रिव्यू मे कुछ न कुछ मिल जाता है इनको.. पक गया मै. कोई और बनाये तो अच्छा है यार. बस पढनेका और प्रोग्राम बनानेका. ये फालतू काम है एकदम. अपना पेहलेका काम अच्छा था यार, मजा आता था करनेमे, टीम भी अच्छा था.. ये क्या......"

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष आहे.

रेखाटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

हाहाहा! बर्‍याचजणांचं असंच असतं. लेख मस्त.

मृत्युन्जय's picture

8 Jul 2015 - 12:53 pm | मृत्युन्जय

हाहाहा. जमलंय.

मधुरा देशपांडे's picture

8 Jul 2015 - 12:59 pm | मधुरा देशपांडे

मस्त लिहिलंय. आवडलं.

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 1:08 pm | कपिलमुनी

आजूबाजूचे रघू आठवले

जबरी! माझ्यातला रघू दिसला ;)

रातराणी's picture

8 Jul 2015 - 1:54 pm | रातराणी

सही! आवडलं!

मित्रहो's picture

8 Jul 2015 - 5:47 pm | मित्रहो

असे रघू आसपासतर असतातच पण स्वतःत सुद्धा असा रघू दडलेला असतो.
आापला रघू होउ द्यायचा नाही, असा प्रयत्न करावा लागेल.

बरोबर आहे. आपण दुसऱ्यांबद्दल बोलतो ऐकतो तेव्हा त्यात स्वतः सारखं काहीतरी सापडतच.

नाव आडनाव's picture

9 Jul 2015 - 10:02 am | नाव आडनाव

मस्तं लिहिता राव तुम्ही.
वाचतांना (खासकरून शेवटी) मी माझ्यातला रघू शेधत होतो. एकदम तसा नाही जसा तुम्ही सांगितला, पण आहेच थोडा मी पण रघू सारखा :)

चिनार's picture

9 Jul 2015 - 12:35 pm | चिनार

वा रघुभाय !!

विशाल कुलकर्णी's picture

9 Jul 2015 - 12:37 pm | विशाल कुलकर्णी

झकास्स...

पिलीयन रायडर's picture

9 Jul 2015 - 3:33 pm | पिलीयन रायडर

आपण सगळेच रघु आहोत की थोडे थोडे!!!

फार मस्त लिहीलय!

पाटील हो's picture

9 Jul 2015 - 3:45 pm | पाटील हो

मस्त लिहिलंय. आवडलं.

बॅटमॅन's picture

9 Jul 2015 - 3:47 pm | बॅटमॅन

रघुपति राघव राजाराम =))

मस्तच!

अभिजीत अवलिया's picture

9 Jul 2015 - 5:08 pm | अभिजीत अवलिया

आवडेश !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2015 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

हर हर रघु !!

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2015 - 5:30 pm | स्वाती दिनेश

छान लिहिलय,आवडलं.
स्वाती

आकाश खोत's picture

10 Jul 2015 - 10:40 am | आकाश खोत

धन्यवाद :)

जयनीत's picture

25 Jul 2015 - 2:28 am | जयनीत

आय.टी  तल्या कामा बद्दल काहीही माहिती नाही.
पण तरीही कथा समजण्यात काहीच अडचण आली नाही.
मस्तच लिहीलीत.
खुपच आवडली.
लिहीत रहा.

अभिदेश's picture

25 Jul 2015 - 4:45 am | अभिदेश

अगदि बरोबर वर्णन केले आहे... आपल्या आजुबजूला असे बरेच रघु असतात आणि त्यातले बरेच आप्ल्याच वाट्याला येतात.

उगा काहितरीच's picture

25 Jul 2015 - 5:56 am | उगा काहितरीच

मस्त...

आय टी ची माहिती नसतानाही कथा आवडलीच.मस्त रंगवलाय रघू.

अनुप ढेरे's picture

25 Jul 2015 - 9:44 am | अनुप ढेरे

छान लिहिलय. आवडलं!

आय टी मध्ये नसणाऱ्या लोकांना सुद्धा हे समजावे अशी इच्छा होतीच. म्हणूनच थोडे कामाचे वर्णन सुद्धा टाकले. ते समजतेय हे पाहून आनंद वाटला. धन्यवाद. :)

मी-सौरभ's picture

29 Jul 2015 - 2:34 pm | मी-सौरभ

असे बरेच रघु नेहमीच आजूबाजूला असतात आनी ते आय टी वालेच पाहिजेत असंहि नाही...

सस्नेह's picture

29 Jul 2015 - 3:58 pm | सस्नेह

आपणही थोडे रघु आहोत, नाही का ?

तुडतुडी's picture

29 Jul 2015 - 4:49 pm | तुडतुडी

लिखाण छान आहे पण
मै टेस्ट लीड को बोल देता हु, अभी इसके आगे मेरे एपीआयमे कुछ इश्यू आता है, तो सिधा तेरेकोही देनेको..>>
रघुकडे काही असं काम आलं कि रघु ताबडतोब त्याचा फडशा पाडून, चेंडू दुसरीकडे टोलवून देई>>
बॉसशी काही बोलायला जावं आणि तो जागेवर नसेल, किंवा त्याने मेलला लवकर उत्तर दिले नाही तर त्यालाही सुनवायला मागे पुढे पाहत नाही>>
कामाला उशीर झाला तर तो बॉसने शंकेचं लवकर समाधान केलं नाही म्हणून, आणि कामात चूक झाली तर विचारूनच केलं होतं अशी बोंब ठोकायला तो मोकळा.>>
अजिबात पटत नहि. असं होतं आय टी मध्ये ?
कारण कुणीही कुणालाही टीम लीड च्या संमती शिवाय काम देवू शकत नाही . software चा एखादा भाग आपण डेवलप केला असेल आणि त्यात इश्यू आला तर तो आपल्यालाच solve करावा लागतो . कुणी कशाला स्वतःच काम सोडून तुमचा इश्यू सोडवत बसेल हो . आणि बॉस ला सुनवायचं ? तोबा तोबा . ऐसे होणे नाही . प्रत्येक इमेल मध्ये बॉस ला सी सी मध्ये ठेवावं लागतं त्यामुळे 'शंकेचं लवकर समाधान केलं नाही' अशी बोंब नाही मारता येत .
इन जनरल असं होत नाही . आता तुमच्या कंपनीत होत असेल तर भारीच आहे

आणि हो हा देसाई न. मग प्रत्येक वाक्य हिंदीत का बोलतोय ?

आकाश खोत's picture

29 Jul 2015 - 5:35 pm | आकाश खोत

तुडतुडी...
बऱ्याच शंका काढल्यास कि.
मग तो गमतीने म्हणायचा... हे वाक्य वाचायचं राहिलं वाटतं :P

आणि टीम लीड मुख्यत्वे काम देत असला, तरी एक टीम मधला सिनियर माणूस जुनियरला काम देऊ शकतो. प्रत्येक कंपनीत वातावरण वेगळं असतं. काही कंपनीमध्ये मेट्रीक्स असतं म्हणजे एका माणसाचे २-३ बॉस असू शकतात.

ज्याने डेवलप केला त्याने इश्यू सोडवणे हि साधारण बाब झाली. खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये एका टास्क मध्ये २-३ किंवा जास्त लोकसुद्धा असतात. आणि इश्यू हे त्या ग्रुपकडे येतात. आणि त्यातला जो मोकळा असेल किंवा ज्याच्याकडे कमी लोड असेल तो तो इश्यू सोडवतो. एकट्यावर सगळा भार दिला जात नाही. हि परिस्थिती प्रत्येक कंपनी आणि प्रोजेक्टमध्ये वेगळी असते. तिथल्या पॉलिसीवर अवलंबून आहे.

आणि बॉसला बोलणे. तोच तर मुद्दा आहे. बाकी लोक सहसा आपल्या लीडला फार काही बोलत नाहीत. पण काही मोजके लोक त्यांनापण टोमणे मारतात.

आता प्रश्न हिंदीचा. आयटी कंपनीत सगळीकडून आलेले लोक असतात. त्यामुळे हिंदी आणि इंग्लिशवर भर असतो. मुंबईसारख्या ठिकाणी मराठी लोकसुद्धा जास्त हिंदीच बोलताना दिसतात. इथे दिलेले सर्व संवाद फक्त दोघातच नाहीत तर काही समूहात बोललेलेसुद्धा आहेत. काही संवाद मराठीतसुद्धा आहेत. आणि वर लिहिल्याप्रमाणे रघु बाहेरसुद्धा राहून आलेला आहे. त्यामुळे त्याला सहज हिंदी बोलायची सवय आहे.

झालं का शंका निरसन? :P
अजून राहिल्या असतील तर विचाराव्यात. :D

स्रुजा's picture

31 Jul 2015 - 7:50 am | स्रुजा

हाहाहा, सही जवाब. ट्रायेजिंग नावाचा प्रकार असतो हो बग्ज मध्ये, तुडतुडी. त्या मध्ये अनेक गोष्टींचा विचार करुन बग्ज असाईन केले जातात. पण ते असो. तुम्ही आयटी मध्ये आहात का नाही आहात?

मयुरा गुप्ते's picture

30 Jul 2015 - 9:13 pm | मयुरा गुप्ते

आपणही थोडेसे रघु असतोच कि, आणि आपल्या आजुबाजुला वावरणारे वेगवेगळ्या स्वरुपातले अनेक रघु दिसतच असतात.
आय्.टी. कंपनीत ह्या सगळ्या प्रकारांची झलक कधी ना कधी मिळतच असते. प्रत्येक कंपनीचा वरचा चेहरा मोहरा वेगळा असला तरी मनुष्य स्वभावाच्ं मुळ गाठोडं सगळीकडे घेउनच वावरत असतात लोकं. ह्यामध्ये देश, भाषा, प्रांत ह्या सर्वांच्या पलिकडचं 'सर्व्हावल ऑफ दी फिटेस्ट' ही व्याख्या मला वाटतं सर्वच क्षेत्रात लागु होत असावी.
'ब्लो युअर ओन ट्रंपेट' हे ही वैश्विक आहे.

-मयुरा.

स्रुजा's picture

31 Jul 2015 - 7:51 am | स्रुजा

लेख झकास. अनेक रघु आठवले. ज्याला तुम्ही ब्लेम गेम म्हणता त्याला मी चेन ऑफ रेकॉर्ड्स म्हणते ;) मला कोण रघु म्हणत असेल याचा आता विचार पडलाय ;)

कौशिकी०२५'s picture

31 Jul 2015 - 5:07 pm | कौशिकी०२५

मस्त लेख....

इशा१२३'s picture

31 Jul 2015 - 6:40 pm | इशा१२३

मस्त लिहिलय!

मन१'s picture

17 Feb 2016 - 4:45 pm | मन१

:)