सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग २

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
29 Jun 2015 - 1:35 pm
गाभा: 

आधीच्या धाग्यावर प्रतिक्रिया शंभरच्या आसपास पोहोचल्याने नवीन धागा तिथल्या नव्या बातमीच्या प्रतिसादापासून वेगळा काढून नव्याने सुरु करत आहोत.

- संपादक मंडळ

जेव्हा संवेदना मृत्यू पावतात…

बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या... मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना... तेच हात मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात गुंतलेले...
महाराष्ट्र टाईम्समधील ही बातमी

प्रतिक्रिया

अशा वेळी फोटो काढणं / व्हिडीओ काढणं याला नेमकं काय म्हणावं किंवा त्याविषयी कसा प्रतिसाद द्यावा ते कळेनासं झालंय. अगदी मृतदेहांचे नव्हे, पण अपघातस्थळाचे किंवा नेहमी जे दिसत नाही ते (उदा ट्रेन घसरणे, ट्रक उलटणे) याचे फोटो शक्य असतील तेव्हा काढणं हा ह्युमन नेचरचा एक भाग झाला असणार. पण ते सर्व अपघात होऊन गेल्यावर काही काळाने तिथे पोचणार्‍यांबाबत समजून घेता येईल. इथे या केसमधे निरुत्तर व्हायला होत आहे.

मोहनराव's picture

29 Jun 2015 - 1:51 pm | मोहनराव
संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 4:01 pm | संदीप डांगे

माझ्या मते चित्रपट-मालिकांमधून धक्कादायक चित्रणे वारंवार बघितल्याने मनुष्याची मानसिकता प्रभावित होऊन अशा प्रत्यक्ष घटनांवर खोट्या घटनांप्रमाणेच रीअ‍ॅक्ट होण्याचे अजाणतेपणी घडते. म्हणजे खून-बलात्कार-अपघात-रक्त इतकेवेळा बघून त्याबद्दलची फर्स्ट पॉसिबल रीअ‍ॅक्शन पार डीफयुज झाली असावी. त्यात आता वृत्तवाहिन्यांनी 'सबसे पेहले आणि सिर्फ इसी चॅनेलपर 'ची जोरदार प्रमोशन्स सुरू केल्यापासून प्रथम बघायला मिळणे आणि ते इतरांना आपण सांगणे हे काहीतरी ग्लॅमरस-एक्सायटींग आहे हे मानल्यामुळे तेच मानवी मनात प्राधान्यक्रम झाले असावेत. त्याचेच पुरावे देता यावे म्हणून विडीओ किंवा फोटो काढून शेअर करणे घडते.

अशा घटनांमधे पुष्कळदा समाज बघ्याची भुमिकाच घेतो याचे कारण आता तो कायम बघ्याच्याच भुमिकेत असतो. पुढे घडत असलेले खरे आहे हे त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचत नसावे त्या विवक्षित क्षणी. परत त्यावर कसे रीअ‍ॅक्ट व्हावे याचेही कुणी प्रशिक्षण देत नाही. अशा घटनांपासून शक्यतो दूरच राहावे -इजा टाळण्यासाठी व पोलिसांचा झमेला टाळण्यासाठी- अशी शिकवण घराघरांतून दिली जाते. अशा दोन प्रखर मानसिक प्रभावांमधे असलेल्या माणसांकडून योग्य प्रतिक्रीयेची अपेक्षा फोल आहे.

यावर उपाय म्हणजे शाळेपासूनच मुलांना आपात्कालिन परिस्थितीचे शिक्षण देणे. त्याचा नियमित सराव कंपल्सरी करणे. त्यातून खर्‍या घटनांमधे अंतर्मनाकडून फर्स्ट पॉसिबल रीअ‍ॅक्शन आपोआप अजाणता घडेल आणि मनुष्य पहिल्या प्रतिक्षिप्त क्रियेने मदतकार्यात ओढला जाऊन ते मदत कार्य पुर्ण करेल.

(निराशाजनक टीप्पणी: आपल्याकडे साधं 'स्वत:ला कसं वाचवावं' याचंही प्रशिक्षण कुणी मुलांना देत नाही. इतरांना मदत करण्याचं तर सोडाच)

(आशादायक चित्रः हे आपण आपल्या घरापासून सुरू करून परिस्थिती बदलण्यास मदत करू शकतो)

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 12:48 pm | टवाळ कार्टा

लाख मोलाची बात

स्वच्छंदी_मनोज's picture

29 Jun 2015 - 4:58 pm | स्वच्छंदी_मनोज

रेस अ‍क्रॉस अमेरीका (RAAM) ह्या प्रतीष्ठेच्या आणी अत्यंत खडतर अश्या सायकलींग रेस मध्ये नाशीकच्या महाजन बंधूंनी बाजी मारली आहे.

विशेष उल्लेखाची बाब म्हणजे रेसच्या ईतीहासात भारताचे पहील्यांदाच प्रतीनीधीत्व असण्यार्‍या ह्या रेस मधे ह्या डॉक्टर बंधूंनी पहील्यांदाच भाग घेऊन १८-५० वयोगटाती टिम कॅटेगरीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
त्यांनी एकूण ३००० माईल्स एवढे अंतर (वेस्ट कोस्ट ते ईस्ट कोस्ट) ८ दि. १४ ता. आणी ५५ मी. हा भीम पराक्रम केला आहे..

साष्टांग दंडवत _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2015 - 5:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

महाजन बंधूंचे हार्दीक अभिनंदन !

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 5:24 pm | संदीप डांगे

ग्रेटच, हे दोघेही बंधू ग्रेटच आहेत.

प्राची अश्विनी's picture

29 Jun 2015 - 6:23 pm | प्राची अश्विनी

अरे वा!अभिनन्दन!

मतदार याद्या अद्यतन करण्याचे काम १२ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.ठाणे/कल्याण परिसरांत तरी आहे.