वॉट्सअप आणि वॉट्सऍप

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
29 Jun 2015 - 1:47 am

"वॉट्सअप म्हणजे रे काय भाऊ?"

"अरे,वॉट्सअप म्हणजे तो एक पश्चिमी देशात दोन व्यक्तीत संवाद साधण्य़ापूर्वी उच्चारलेला वाक-प्रचार आहे.हेलो आणि हाय ह्या ऐवजी हा वाक-प्रचारही वापरला जातो."

"म्हणजे भारतात,दोन मराठी माणसं भेटल्यावर,
"काय चालंय?" म्हणतात.
किंवा दोन गुजराथी माणसं भेटल्यावर,
सुं चाले छे?म्हणतात.
किंवा दोन हिंदी भाषिक भेटल्यावर,
"क्या चल रहा है?" म्हणतात
असं म्हटल्यासारखं का रे भाऊ?"

"अगदी बरोबर.वॉट्सअप हा वाक-प्रचार त्यांच्याकडे पूर्वापार आहे."

"अरे,मग, वॉट्सऍप म्हणजे रे काय भाऊ?"

"अरे,स्मार्ट फोनवर संवाद साधण्यासाठीची एक ऍप आहे ती."

"ऍप म्हणजे रे,काय भाऊ?"

"अरे,ऍप म्हणजे ऍप्लीकेशन."

"म्हणजे ज्याला सॉफ्टवेअर म्हणतात ते का रे?"

"बरोबर.त्याला प्रोग्राम असंही म्हणतात."

"मग,हे वॉट्सऍप अमेरिकेत जास्त लोकप्रिय का नाही रे,भाऊ?"

"अरे,तंत्रविज्ञान हेच दाखवतं की,त्याचा शिरकाव फक्त सामाजिक संबंध ठेवण्यासाठी,किंवा समुदायाच्या वर्तूळात अंतर्भूत होण्यासाठीच उपयोगी असतं.आणि जर का त्याला संस्कृतीचा पाया नसेल तर मग काय म्हणावं? तंत्रविज्ञान्याला संस्कृतीपेक्षा वरचढ राहून चालत नाही रे, बाबा!"

"भारत आणि ब्राझीलमधे हे वॉट्सऍप जास्त लोकप्रिय आहे.असं मला कुणी तरी सांगीतलं.खरं तर, ही ऍप अमेरिकेत स्थापित झाली.पण तिथे कुणीच कसं वापरीत नाहीत रे,भाऊ?"

"अरे,त्याचं कारण असं असावं की,आयमेसेजीस सर्वजणच वापरतात,अमेरिकेत आयफोन बराच लोकप्रिय आहे,त्यामुळे ह्या लोकांचं वॉट्सऍपशिवाय काम भागत असणार."

"अरे भाऊ, वॉट्सऍप अमेरिकेत लोकप्रिय नाही म्हणून मला काही फरक पडत नाही रे.पण हे अमेरिकन्स मोठे व्यापार धार्जीणे आहेत.ह्याचाच अर्थ असा की,अमेरिकेत वॉट्सऍपचे व्यापारी प्रतिमान,तिकडच्या किंमतीवर किंवा व्यापारी नम्यतेवर फारसा परिणाम करणारं नसावं,असंच ना रे भाऊ?"

"अगदी बरोबर.अमेरिकेत स्मार्टफोनचं वापरणं लोकसंखेच्या 64% आहे.आणि सर्व स्मार्टफोनवरून त्यांना मेसेजीसची देवाण-घेवाण करता येते.त्यासाठी त्यांना नवीन ऍप अपलोड करायला नको.भारतातल्या स्मार्ट्फोनवर वॉट्सऍपची ऍप मुळातच अपलोड केलेली असते.त्यामुळे त्यांना ती जवळ जवळ फुकट वापरता येते.पण संवाद साधण्यासाठी एकमेकाने त्या ऍपचा वापर करायला हवा.हे मला प्रो.देसाईनी सांगीतलं.
कुठचीही गोष्ट फुकट मिळाल्यावर त्याचा वापर करण्याचा माणसाचा कल असतो.ती कुणाही माणसाची वृत्ती असते.असंही प्रो.देसाई पुढे म्हणाले."

"आपल्या दोघांकडेही स्मार्टफोन नाही.त्यामुळे आपण ह्या विषयावर चर्चा उगाचच करतो नाही का रे भाऊ?"

"अरे,आपल्याकडे नसलेल्या गोष्टीकडे कुतूहल म्हणून बघण्याचीही माणसात मनोवृत्ती असतेच ना? मग कशाला रे,वाईट वाटून घेतोस.?"

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 2:07 am | संदीप डांगे

अमेरिकेत स्मार्टफोनचं वापरणं लोकसंखेच्या 64% आहे.आणि सर्व स्मार्टफोनवरून त्यांना मेसेजीसची देवाण-घेवाण करता येते.त्यासाठी त्यांना नवीन ऍप अपलोड करायला नको.भारतातल्या स्मार्ट्फोनवर वॉट्सऍपची ऍप मुळातच अपलोड केलेली असते.त्यामुळे त्यांना ती जवळ जवळ फुकट वापरता येते

हे जे काय लिहिलंय ते समजलं नाही. प्लीज एलाबोरेट इफ पासिबल.

श्रीरंग_जोशी's picture

29 Jun 2015 - 3:34 am | श्रीरंग_जोशी

कदाचित भारतात व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराची घनता इतकी अधिक कशी काय असा प्रश्न त्यांना पडला असावा.

मलाही हा प्रश्न पडतो. व्हॉट्सअ‍ॅपच नाही तर एकच माणून दोन किंवा तीन मोबाइल नंबर का वापरतो. कुणी ड्युएल सीम फोन वापरत आहे असं अमेरिकेत एकदाही दिसलं नाही.

व्हॉट्सअ‍ॅप जर विरंगुळ्याचे एक साधन आहे तर इतका अतिरेक का व्हावा. या बातम्या पाहा...

अमेरिकेत गाडी चालवताना चालकाने टेक्स्टिंग केल्याने अपघात होणे व त्यात प्राणहानी होणे हे बरेच घडायचे. गेली अनेक वर्षे यावर भरपूर जनजागॄती झाली आहे. बहुधा आता प्रमाण कमी झाले असावे. या कारणामुळे झालेल्या अपघातांच्या बातम्या गेल्या एकदोन वर्षांत कमी झाल्या असे निरीक्षण आहे.

सुनील's picture

29 Jun 2015 - 9:03 am | सुनील

मलाही हा प्रश्न पडतो. व्हॉट्सअ‍ॅपच नाही तर एकच माणून दोन किंवा तीन मोबाइल नंबर का वापरतो

खिक्.

मलाही हाच प्रश्न पडतोय, एकच माणूस दोन-दोन, तीन-तीन आयड्या का वापरतो???

बाकी भारतीय आणि ब्राझिलियनांमध्ये बरेच साम्य दिसतेय!

पूर्वी ऑर्कुट वापरातही हेच दोन देश आघाडीवर होते! बहुधा 'मिस्ड कॉल' ही संकल्पनादेखिल ह्याच दोन देशांत सर्वाधिक वापरली जात असावी!

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jun 2015 - 2:48 am | श्रीकृष्ण सामंत

संदीपजी,
स्पष्टीकरण उघड आहे असं मला वाटतं.आपल्याला बरोबर काय विचारायचं आहे ते कृपाकरून विचारा

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 6:41 am | संदीप डांगे

१. अमेरिकेत स्मार्टफोनचं वापरणं लोकसंखेच्या 64% आहे.आणि सर्व स्मार्टफोनवरून त्यांना मेसेजीसची देवाण-घेवाण करता येते.त्यासाठी त्यांना नवीन ऍप अपलोड करायला नको
>> अगदी हेच भारतातल्या स्मार्टफोनवरूनही करता येतं. मेसेजेसची देवाणघेवाण इथंही होतेच. त्यासाठी नविन अ‍ॅपची तशीच काही गरज नाही.

२. .भारतातल्या स्मार्ट्फोनवर वॉट्सऍपची ऍप मुळातच अपलोड केलेली असते.त्यामुळे त्यांना ती जवळ जवळ फुकट वापरता येते.
>> भारतात स्मार्टफोनवर वॉट्सॅप इन-बिल्ट इन्स्टाल आहे म्हणून युजर एसएमएस च्याऐवजी ते वापरतात असं नाहीये. वॉट्सॅपच्या सुविधा टेलीकॉम ऑपरेटरकडून पुरवल्या जाणार्‍या शॉर्ट मेसेज सर्विसमधे नाहीत. शिवाय एसएमएस चे दरही अव्वाच्या सव्वा आहेत. त्यापेक्षा वॉट्सॅप फुकट नाही पण फार फार स्वस्त पडतं. उद्या सर्व सर्विसप्रोवायडरनी एसएमएस फुकट केले आणि नेटपॅकच्या किंमती तीप्पट केल्या तर भारतातल्या वॉट्सअ‍ॅपच्या लोकप्रियतेवर बराच परिणाम होईल.

माझ्या मते तुम्हाला जो मुद्दा मांडायचा होता तो दरांमधल्या फरकांमुळे होत वापरांमधल्या फरकांबद्दल असावा. पण तुम्ही संबंध लेखात सेवादरांविषयी असा काही उल्लेख केला नाही त्यामुळे अर्थबोध होत नाहिये.

अमेरिकेत आयमेसेज - आयफोन वापरणारे जास्त संख्येने आहेत, तरी ज्यांच्याकडे आयफोनशीवाय इतर फोन आहेत त्यांच्याशी संपर्क करायला आयफोनवाले कसा संपर्क करतात?


मग,हे वॉट्सऍप अमेरिकेत जास्त लोकप्रिय का नाही रे,भाऊ?"

"अरे,तंत्रविज्ञान हेच दाखवतं की,त्याचा शिरकाव फक्त सामाजिक संबंध ठेवण्यासाठी,किंवा समुदायाच्या वर्तूळात अंतर्भूत होण्यासाठीच उपयोगी असतं.आणि जर का त्याला संस्कृतीचा पाया नसेल तर मग काय म्हणावं? तंत्रविज्ञान्याला संस्कृतीपेक्षा वरचढ राहून चालत नाही रे, बाबा!"

>> व्हॉट्सॅप अमेरिकेत जास्त लोकप्रिय न होण्याचा आणि संस्कृती-तंत्रविज्ञानाच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाचा काय नेमका संबंध आहे? जर व्हॉट्सॅपसारखंच तंत्रज्ञान त्यांच्याकडे आयफोन्समधे (जे ते अधिक संख्येने वापरतात) उपलब्ध असेल तर वॉट्सअ‍ॅप वेगळं डाउनलोड करून इन्स्टाल का करतील? त्याचा सामाजिक संबंध किंवा समुदायाच्या वर्तुळात अंतर्भूत होण्याशी नक्की काय संबंध आहे तेही कळलं नाही.

माफ करा पण संपूर्ण लेख काहीसा दुर्बोध वाटला. कदाचित तुम्हाला जे म्हणायचं आहे ते काही वेगळ असेल. जसं की या वाक्यात -
पण संवाद साधण्यासाठी एकमेकाने त्या ऍपचा वापर करायला हवा

इथे 'एकामेकाने' ऐवजी 'दोघांनी ते अ‍ॅप वापरणे आवश्यक आहे किंवा दोघांच्याही फोनमधे ते अ‍ॅप असलं पाहिजे तरच त्या अ‍ॅपद्वारे संपर्क शक्य आहे' असा अर्थ तुम्हाला अभिप्रेत असावा असे वाटते आहे. पण तुम्ही वापरलेल्या वाक्यरचनेत त्याचा वेगळाच अर्थ मलातरी ध्वनित होतोय.

असो.

तुम्हाला अभिप्रेत असलेली मध्यवर्ती कल्पना मला अजिबात न कळल्याने लेख चांगला का वाईट तो अभिप्राय देऊ शकत नाही. बाकी शैली छान!

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jun 2015 - 9:14 am | श्रीकृष्ण सामंत

संदीपजी,
वॉट्सऍप अमेरिकेत लोकप्रिय नसण्याची अनेक कारणं आहेत.सर्व तंत्रविज्ञानाची कारणं आणि व्यापारी विचारातून असलेली कारणं सवित्सरपणे देणं मला शक्य होणार नाही.

थोडक्यात मुळ मुद्दा असा आहे की,अमेरिकेत एसेमेसचे दर आपण म्हणता तसे, भारतातल्या लोकाना तिकडे वाटणार्‍या एसेमेसच्या दराएव्हडे अव्वाच्या सव्वा नाहीत.ते अमेरिकेत सर्वान सहजच परवडतात.त्यातुन मिळणार्‍या सुविधातून अमेरिकेतले लोक समाधान आहेत.

ज्यांच्याकडे आयफोन नाहीत त्यांच्याशी त्यांच्या स्मार्ट्फोनवर असलेल्या ऍपवरून एकमेकात संपर्क साधता येतो.ते साधलं जावं म्हणून होम मार्केट्मधे एकमेकाच्या फोनमधे सुविधा आहेत एकमेकात याचाच अर्थ कोणाही दोघांमधे ह्या अर्थाने मी म्हणत आहे.आपण त्याचा अर्थ कृपया दोघांमधे असा घ्यावा.दोघांमधे असाच अर्थ मला अभिप्रेत आहे.हे आपलं म्हणणं बरोबर आहे.

भारतात वॉट्सऍप एकदम फुकट आहे असं मी म्हणत नाही. जवळ जवळ फुकट आहे असं मी म्हटलं आहे.ह्याची कृपया नोंद घ्यावी.
अमेरिकन हे मोठे व्यापार धार्जिणे आहेत हे दराच्या द्द्ष्टीकोनातूनच मी म्हटलं आहे.आणि व्यापारी वृत्ती हिच त्यांची संस्कृती आहे.त्या वृत्तीत वॉट्सऍप बसत नाही म्हणूनच ती ऍप अमेरिकेत लोकप्रिय नाही असं माझे मित्र प्रो.देसाई ह्यांचं म्हणणं आहे.
मला वाटतं मी जमेल तेव्हडं तुमच्या शंकेंचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वीत स्वाति's picture

29 Jun 2015 - 9:15 am | स्वीत स्वाति

संदीप जी तुम्ही मांडलेला प्रत्येक मुद्दा अगदी बरोबर..
आणि सामंत यांना नक्की काय मांडायचे आहे लेखामधून ते मलाही कळले नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jun 2015 - 9:38 am | श्रीकृष्ण सामंत

मला काय म्हणायचं आहे ते वरती संदीप यांना देण्याचा प्रयत्न केला आहे तो कृपया वाचावा

राजाभाऊ's picture

2 Jul 2015 - 8:41 pm | राजाभाऊ

आय्फोन टु आय्फोन मेसेजींग (आय मेसेज) फुकट आहे. आय मेसेज द्वारे, तुम्ही जगाच्या पाठीवर अस्लेल्या कुठल्याही आय्फोन धारकाबरोबर संवाद (एस एम एस) साधु शकता. सामंत साहेबांना बहुदा हेच म्हणायचं आहे कि हे फिचर आय्फोन मध्ये नेटिव असताना वॉट्सॅप ची आवश्यकता नाहि; म्हणुन अमेरिकेत वॉट्सॅप पॉप्युलर नाहि...

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2015 - 7:07 am | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही!
What's Up ची मराठी नामे -
काय अप्पा?
कस्स क्काय?
वत्सला बाई

रॉजरमूर's picture

30 Jun 2015 - 10:24 pm | रॉजरमूर

भारतातल्या स्मार्ट्फोनवर वॉट्सऍपची ऍप मुळातच अपलोड केलेली असते

अत्यंत चुकीचे निरीक्षण .

भारतात स्मार्ट फोन घेतल्यावर whats app प्रीलोडेड येत नाही
ते गुगल Play store मधून इन्स्टाल करावे लागते .

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)blockquote>

हे वाचलंत नाय काय? कसं माहित असणार त्यांना भारतासारख्या देशात काय चालतं ते!!

श्रीकृष्ण सामंत's picture

1 Jul 2015 - 8:01 am | श्रीकृष्ण सामंत

नका हो,माझा असा सूड घेऊत.इतकी वर्षं इकडे राहून मी बराच भारतीय राहिलो आहे.आणि माझ्या ब्लॉगवर(जानेवारी 2007 पासूनचा) मी मराठीतच लिहित आहे.

"श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)blockquote>"

हे मी एव्हड्यासाठीच लिहितो कारण,अनेक श्रीकृष्ण सामंत आहेत.पूर्वी मी नुसतं "श्रीकृष्ण सामंत" असं लिहायचो.इकडे माझा ब्लॉग वाचणारे,माझी कुठेही भेट झाल्यावर पूर्वी नेहमीच विचारायचे तुम्हीच काय हो ते.? हो तोच मी हे समजण्यासाठी मी तसा blockquote करतो.असो.

"कसं माहित असणार त्यांना भारतासारख्या देशात काय चालतं ते!!"

हां,आता प्रत्यक्ष भारतात राहून जेव्हडी माहिती इतर भारतीयाना असेल तेव्हडी मला नक्कीच नाही.पण माझ्याकडे टीव्हीवर दोन मराठी चॅनेल्स आहेत,एक हिंदी चॅनल आहे.आणि झी२४तासवर बातम्या आणि रोख-ठोक सारखे कार्यक्रम मी पहायला चूकत नाही.माझी तीन नातवंड, एक नात डॉक्टर(फिजीशीयन),दुसरी नात युसी बर्कली मधून ग्रॅज्यूट होऊन ब्रेनवर संशोधन करते. युसी(एस.फ)मधे पीएचडी करतेय.आणि नातू इलेक्ट्रीकल इंनजीनीयर युसी(सांताक्रुझ)मधून होऊन दोन वर्षं झाली आणि आता तो नॅनोटेकनॉलाजीवर पीएचडी होईल.

सांगण्याचा मतीतार्थ एव्हडाच ही तिन्हीही नातवंड,आमच्याबरोबर आणि जरूर वाटल्यास आपआपसात अस्खलीत मराठीत बोलतात आणि वाचतात.आणि मराठी चॅनलही आवर्जून पहातात.आणि अमेरिकन ऍकसेंटमधे अस्खलीत इंग्रजीही बोलतात.

वॉट्सऍप भारतात स्मार्ट्फोनवर अपलोड करतात वगैरेबद्दलची माहिती मी आमचे मित्र प्रो.देसायांकडून घेतली.खात्रीलायक माहिती असं समजून मी तशी लिहिली.त्यात माझी चूक झाली.ते म्हणतात तसं होत नाही हे मी त्यांना भेटल्यावर नक्की सांगेन.

"ते गुगल Play store मधून इन्स्टाल करावे लागते ." हे मला श्री.रॉजरमूर यांच्याकडून प्रतिसादातून कळलं.बद्दल त्यांचे थॅन्क्स.

हे जवळ जवळ फुकट असतं का? हे मी आपल्याला, माझ्या अधिक माहितीसाठी सहजच विचारतो.तसं गुगलवर जाऊन कोणालाही माहिती काढता येईल म्हणा.असो.

एक वाक्यात गैरसमज (याने, टोमणा) आणि किती लिहिण्याचा मी प्रपंच केला बरं? पण असं लिहायलापण मला मजा येते हे नक्कीच.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 8:23 am | श्रीरंग_जोशी

तांत्रिक बाबी जाऊद्या हो. तुमच्या या लेखाच्या आशयात मला अजिबात अतिशयोक्ती वाटली नाही. गेली दीड दोन वर्षे भारतीय वृत्तपत्रांतल्या बातम्या, मिपावरचे उल्लेख, जवळच्या नातेवाईकांबरोबर होणारे संवाद तसेच स्वतः व्हॉट्सअ‍ॅपवर असल्याने नव्याने भारतातले कुणी अ‍ॅड झाले की त्यांच्याकडून होणारा फॉरवर्डसचा भडिमार यावरून माझे मत तुमच्यासारखेच झाले आहे.

अक्षरशः भारतातील सत्तरीतल्या व्यक्तीही त्यांच्या मित्रमंडळींच्या आग्रहाखातर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी चतुरभ्रमणध्वनीकडे वळत आहेत.

त्या तुलनेत अमेरिकेत व्हॉट्सअ‍ॅप किंवा तशा कुठल्याही माध्यमाचे वेड फारच कमी वाटते.

व्हॉट्सअ‍ॅपखेरीज भारतात अनेक लोकांकडे दोन, तीन किंवा त्यापेक्षाही अधिक क्रमांक असतात. ड्युएल सीम फोन खूप लोक वापरतात. अमेरिकेत अगदी गेल्या वर्षीपर्यंत इनकमिंग (दुसर्‍या कंपनीच्या फोन्सवरून) फ्री नसायचे. भारतात इनकमिंगचे पैसे पडत नसूनही सर्वसामान्य लोकांना दोन, तीन क्रमांक का सुरु ठेवावेसे वाटतात हे न उलगडणारे कोडे आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture

1 Jul 2015 - 8:41 am | श्रीकृष्ण सामंत

श्रीरंगजी,
"तसेच स्वतः व्हॉट्सअ‍ॅपवर असल्याने नव्याने भारतातले कुणी अ‍ॅड झाले की त्यांच्याकडून होणारा फॉरवर्डसचा भडिमार यावरून माझे मत तुमच्यासारखेच झाले आहे."

माझ्या मुलीने आणि मुलाने आपल्यासारखेच मत व्यक्त केले आहे.आणि माझ्या जावयांने वॅट्सऍप अपलोड करायला नकार दिला आहे.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 8:46 am | श्रीरंग_जोशी

या मुद्द्यांबाबत भारतातल्या मिपाकरांची मते जाणण्यास उत्सुक आहे.

बादवे व्हॉट्सअ‍ॅप अपलोड नाही इंन्स्टॉल करायला नकार दिला असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2015 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> भारतात स्मार्ट फोन घेतल्यावर whats app प्रीलोडेड येत नाही

अनेक फोनमधे इनबिल्ट वाट्सअ‍ॅप असतं. माझ्याकडे लावा कंपनीचे चार फोन आहेत
आणि त्या प्रत्येक फोनमधे इनबिल्ट वाट्सअ‍ॅप आहे. कसं करता आता ?

-दिलीप बिरुटे

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Jul 2015 - 7:39 am | श्रीकृष्ण सामंत

प्रो.बिरुटेजी,
"अनेक फोनमधे इनबिल्ट वाट्सअ‍ॅप असतं."
प्रो.देसाई यांनी मला असंच काहिसं सांगीतलं.म्हणजे ते अजिबात चुकले होते असं नाही हे आपल्या वरील स्पष्टीकरणावरून दिसतं.

रॉजरमूर's picture

4 Jul 2015 - 10:13 pm | रॉजरमूर

Take it as genral statement

अर्थात ,

सामंतजी …!

मी कुठे म्हटलंय आय फोन वर whats app प्ले स्टोर मधून इंस्टाल करता येते म्हणून .

ते एक जनरल स्टेटमेंट होते कारण भारतात आय फोन किंवा black berry पेक्षा अ‍ॅन्ड्रॉइड वापरणारे कित्येक पटीने अधिक आहेत .

whats app फक्त एक application आहे ते कुठल्याही फोन वर उतरवून घेता येते .

मुद्दा फक्त व्हॉट्सअॅप इनबिल्ट असण्याचा होता काही चायना मेड आणि इंडिअन ब्रांड व्हॉट्सअॅप आणि फेसबुक इनबिल्ट देतात पण बऱ्याच आघाडीच्या कंपन्या ते देत नाही हे मी स्पष्ट केलय .

धन्यवाद .

रॉजरमूर's picture

3 Jul 2015 - 9:40 pm | रॉजरमूर

किती "सर" सकटीकरण ?

लावा काय बहुतेक चायना मेड फोन मध्येही whats app इनबिल्ट असते प्रत्येक कंपनीची धोरणे वेगवेगळी असतात .
आता लावा ने दिले म्हणून प्रत्येक कंपनीने सरसकट whats app द्यावे की काय ?
आता मोटोरोला, साम्सुंग ,सोनी ,एच टी सी यापैकी कोणतीच कंपनी वाट्सअ‍ॅप इनबिल्ट देत नाही. हे मी स्वानुभवाने सांगू शकतो .
आता ?

अर्थात ते सोडा सर ,
आपल्या आवडत्या धाग्याकडेजरा लक्ष द्या की खरंच सांगतो परवा मी विचारलेल्या शंकेचं निरसन मला आपल्याकडून अपेक्षित आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jul 2015 - 12:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उदा.म्हणून लावा मोबाइल दिला. सर्व कंपन्यांनी वाटस्प इनबिल्ट दिलं तर यूजरचं काहीही नुकसान होणार नाही, सरसकट दिले तर चांगलीच गोष्ट.

-दिलीप बिरुटे

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Jul 2015 - 7:47 am | श्रीकृष्ण सामंत

रॉजरमूरजी,
आपण म्हणता ते वॉट्सऍप गुगल प्ले स्टोअरवरून ऍन्डरोईड स्मार्ट फोनवरच फक्त इंन्स्टॉल केलं जातं.आयफोनवर तेच आयफोनच्या सुविधामधून इंन्स्टॉल केलं जातं.हे मला इकडून खात्रीच्या माहितीवरून कळलं. कळावे.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2015 - 8:05 am | श्रीरंग_जोशी

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइडच काय आय ओस, ब्लॅकबेरी १०, विंडोज ओस या सर्व प्रणालींच्या फोन्सवर इन्स्टॉल करता येतं.
मी स्वतः ब्लॅकबेरी १० फोनवरून वापरतो.

कंजूस's picture

1 Jul 2015 - 9:00 am | कंजूस

))))कदाचित भारतात व्हॉट्सअॅपच्या वापराची घनता इतकी अधिक कशी काय असा प्रश्न त्यांना पडला असावा. मलाही हा प्रश्न पडतो. व्हॉट्सअॅपच नाही तर एकच माणून दोन किंवा तीन मोबाइल नंबर का वापरतो. कुणी ड्युएल सीम फोन वापरत आहे असं अमेरिकेत एकदाही दिसलं नाही. व्हॉट्सअॅप जर विरंगुळ्याचे एक साधन आहे तर इतका अतिरेक का व्हावा. )))))

--आपला वेळ आणि पैसे खर्च करून लोकांचे मनोरंजन करणे ,मी किती ज्ञानी आहे वगैरे " शाइनिंग मारणे " हे मला फार आवडते. कोणत्या समारंभात गेल्यास तिकडे पुर्ण दुर्लक्ष करून खाद्यपदार्थ खातांनादेखील मी शक्यतो योग्य गिह्राइक पकडून माझ्याकडे आलेले वाटस्अपचे मेसिजिज,फोटो,व्हिडिओ दाखवत असतो.त्याचा नंबर घेऊन ते लगेच फॅारवर्ड करतो. " ह्यांना क्कित्ती माहिती आहे "असे कोणीतरी म्हटते आणि माझी कॅालर टाइट होते.आता रिचार्ज करणार सोलर शर्ट घातला की माझ्या फोनची बॅटरी डाउन होणार नाही आणि वाटस्अप खेळताना फोन दमणार नाही.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 9:05 am | श्रीरंग_जोशी

या उत्तरासाठी धन्यवाद कंजुसराव.

एकच माणून दोन किंवा तीन मोबाइल नंबर का वापरतो ? याच कारण आहे भारतीय मानसिकता. तुम्हाला एकदा माझा नंबर दिला की तो तुम्ही कोणत्या कारणासाठी वापराल याची काही शाश्वती नाही. खासकरुन बँकवाले, फोनवरुन जाहिरात करणारे.
मी सुरुवातीस एकच फोन नंबर वापरत होतो मात्र कधी होम लोन, क्रेडीट कार्डचा हप्ता एखाद दुसरा दिवस लेट झालाच तर हे लोक अक्षरशः हैराण करुन सोडतात. बँकवाल्यांना तर तुमचा, तुमच्या बायकोचा आणि जमेल त्या नातेवाईकांचा, मित्रांचा नंबर हवाच असतो. तीच गोष्ट कधी कोणत्या प्रॉपर्टी एक्झीबिशनची. कुठे ना कुठे तुमचा नंबर द्यावाच लागतो. अगदी भंडावून सोडतात. व्हॉटसअ‍ॅप आल्यामुळे तर या त्रासात अजून भर पडली आहे. कोणीही कधीही वेळी अवेळी त्याला हवे असलेले व मला नको असलेले मेसेज फॉरवर्ड करत असतो.
या सर्व गोष्टींना वैतागून मी दोन सिम वापरायला सुरुवात केली. एक नंबर प्रोफेशनल वापरासाठी व जवळच्या लोकांसाठी तर दुसरा बँकवाले, मेरु टॅक्सीसेवा वा इतर तत्सम गोष्टींसाठी. पूर्ण नाही पण बराचसा त्रास कमी झाला आहे. शिवाय फालतू मेसेजसला उत्तर / उत्तेजन न देण्याची सवय जाणिवपूर्वक लाऊन घेतली आहे. कोणत्याही ग्रुपचा मेंबर होणे टाळले आहे. कोणी स्वतःहून त्यांच्या ग्रुपमधे अ‍ॅड केले तर दोन तीन दिवस त्यांच्या समाधानासाठी त्या ग्रुपवर राहतो व नंतर बाहेर पडतो. आता जवळच्या सर्वांना हे माहित झाल्यामुळे कोणीही विनाकारण त्रास देत नाही.
शिवाय कधी कधी एका सिमला नेटवर्क नसले तर दुसरे सिम अडीअडचणीच्या वेळी वापरता येते. पण माझ्यासाठी तरी हा अगदीच नगण्य फायदा आहे.

श्रीरंग_जोशी's picture

1 Jul 2015 - 10:22 pm | श्रीरंग_जोशी

या उत्तरासाठी धन्यवाद.

मी भारतात राहत असताना थोडाफार असा अनुभव घेतला आहे. नॅशनल डू नॉट कॉल रजिस्ट्रीमध्ये नंबर नोंदवूनही बरेच टेलिमार्केटिंगचे फोन यायचे.

त्या काळात कुठल्याही कारणासाठी दोन फोन्स ठेवणे मला परवडले नसते.

मार्मिक गोडसे's picture

1 Jul 2015 - 10:25 am | मार्मिक गोडसे

ज्यांना आपल्याला नंबर द्यायची गरज वाटत नाही तेथे खरा नंबर व नांव कधीच देउ नये. व आपल्या फोन नंबरचा डिएनडी (डू नॉट डिस्टर्ब) अ‍ॅक्टिवेट करावा.

लई भारी's picture

2 Jul 2015 - 10:14 am | लई भारी

२ सिमच्या बाबतीत वरील मत थोडे फार पटण्यासारखे आहे, अजून बरीच कारणे प्रत्येकाच्या व्यवसायानुसार इ.:
- बऱ्याचदा कंपनीने एखादा नंबर दिलेला असतो म्हणून मग कायमस्वरूपी नंबर म्हणून दुसरा वेगळा नंबर असतो.
- खूप लोक दुसरे सिम सारखे बदलत असतात - नवीन ऑफर आली कि घे दुसरा नंबर. शक्यतो दुसरा नंबर मग ते इंटरनेट, एस.एम.एस. च्या (मुक्त) वापरासाठी वापरतात. (ह्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे, ग्रामीण भागात पण खूप वेड बघितले आहे. )
- तुलनेने खूप कमी संख्या असलेले पण त्यांच्यासाठी उपयोगी असणारी गोष्ट म्हणजे - सीमाभागात(महाराष्ट्र-कर्नाटक) किंवा मुंबई-इतर-महाराष्ट्र मध्ये सारखा वावर असणारे लोक. माझे बरेच मित्र महाराष्ट्रातील रहिवासी आहेत पण काम-धंद्यासाठी कर्नाटकात जवळपास दररोज असतात. त्यावेळी महाराष्ट्रातील नंबर कर्नाटकात वापरणे(किंवा उलट) रोमिंग चार्जेस मुळे खर्चिक असते. अशावेळी हा पर्याय वापरतात.

व्हॉट्सअॅप बरेच दिवस वापरणे टाळले होते. पहिल्यांदा त्याची गरजच वाटत नव्हति. आणि बहुसंख्य लोक त्याचा कसा दुरुपयोग करतात(ग्रुप मध्ये) हे बघितल्यामुळे इच्छा नव्हती. शेवटी इतर लोकांशी (कामासंदर्भातील) फोटो शेअर करणे ह्या एकमेव कारणासाठी वापरावे लागले. बहुसंख्य वेळा त्याचा उपयोग घरच्यांचे मेडिकल रिपोर्टस डॉक्टर मित्राला पाठवण्यासाठी वगैरे होतो. माझी आई मुंबई ला गेल्या नंतर रक्त-शर्करा खूप कमी झाली होति. (प्रवासात असल्याने) सोबत नेहमीची फाईल, जुने रिपोर्टस नव्हते त्यावेळी पटकन उपचारासाठी व्हॉट्सअॅप ची मदत झाली. त्यावेळी मी डॉक्टर लोकांना अक्षरशः एक्स-रे सुद्धा व्हॉट्सअॅप वरून पाठवताना बघितले आहे.
मी आधी फोटो शेअर करण्यासाठी फक्त इमेल वापरायचो पण लक्षात आले कि ज्यांना मोबाईल, संगणकामधील विशेष ज्ञान किंवा वापरण्याची इच्छा, सुलभता नाही त्यांच्यासोबत शेअरिंग साठी व्हॉट्सअॅप चा उपयोग खूप होतो. (अर्थातच कामाच्या गोष्टींसाठी).

gogglya's picture

2 Jul 2015 - 8:29 pm | gogglya

व्हॉट्सअॅपच्या नाही राहीले आता...

gogglya's picture

2 Jul 2015 - 8:29 pm | gogglya

व्हॉट्सअॅप नाही राहीले आता...

गामा पैलवान's picture

2 Jul 2015 - 9:54 pm | गामा पैलवान

ऍ हा वर्ण मराठीत नाही ना? तो अॅ असा हवा ना?
-गा.पै.

गामाजी,
मला सुद्धा ऍ ऐवजी तुम्ही म्हणता ते अक्षर लिहायचे होते.पण देवनागरीमधे तसे लिहिता येत नाही म्हणून मी ऍ असे नाईलाजाने लिहिले.अजूनी ~ असे करून अ असेलिहिल्यास ऍच होतं.कळावे

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 8:41 am | श्रीरंग_जोशी

डॉ विकास आमटे यांनी पत्रकार उदय तानपाठक यांची फेसबुकवरील पोस्ट स्वतःच्या फेसबुक पानावर शेअर केली आहे. ती या चर्चेशी संबंधीत असल्याने इथे डकवावीशी वाटली. डॉ. विकास आमटेंच्या नावानी फ्रोझन लिंबाचा कीस कॅन्सरवर गुणकारी आहे या आशयाची पोस्ट सोशल नेटवर्कवर फिरून फार अवधी लोटलेला नाही ;-) .

--------- वॉटसपचा वापर ---------
वॅाट्सअप वर अनेक नवनवे समूह बनतात. अनेक समूहात तेच तेच लोक सगळीकडे सामाईक असतात. त्यामुळे मजकूरही तोच तोच वाचावा लागतो. वॅाट्सअपचा नेमका वापर कसा करावा, याबाबतीत मात्र बहुतांशी लोक गोंधळलेले दिसतात. सगळ्यांनी मोबाईलवर टाकलंय म्हणून आपणही वॅाट्सअप घेतलेलं असतं. एकदा नंबर लोकांकडे गेला की धडाधड संदेश यायला सुरुवात होऊन, आपण त्या चक्रव्युहात कधी गुरफटून जातो, आपलं आपल्यालाच कळत नाही. त्याचं कारण एकच. गंतव्य स्थान निश्चित असल्याशिवाय गाडीत बसायचं नसतं किंवा गाडी सुरु करायची नसते. जायचं कुठे, निश्चित नसेल तर गाडी गोल गोल फिरत राहते, पेट्रोल जाळत, कोणत्याही उद्दिष्टाशिवाय...
ज्यांना काहीच सुचत नाही, ते सगळ्यात जवळचा पर्याय म्हणजे, गुड मॉर्निंग, गुड नाईट चा स्वीकारतात. मधल्या काळात काय करायचं म्हणून इतरांचा आलेला मजकूर कॉपी-पेस्ट, शेअर, फॅारवर्ड करतात. गुड मॉर्निंग, गुड नाईट वैयक्तिकरित्या करा, पण समूहात अजिबात नको. यामुळे इतरांना काय मनस्ताप होतो, याची जाणीव कोणी ठेवत नाही. अनेक चांगले लोक या प्रकारांना कंटाळून समूह सोडणे पसंत करतात. शिवाय, असले फुटकळ संदेश पाठवणारे लोकच अफवा पसरवणाऱ्या प्रवृत्तीचा "गिऱ्हाईक" बनतात.
जगात विकृत माणसांची कमी नाही. आयुष्यात चांगलं काही करायचंच नाही, आणि वाईटाचा शक्यतोवर प्रचार प्रसार करत राहायचा, या एकाच ध्येयाने ही माणसं झपाटलेली असतात. बरे हल्ली सुसंस्कृत आणि विकृतांची अशी काय सरमिसळ झाली आहे की जे पसरत आहे किंवा पसरवलं जात आहे, त्याची शहानिशा करण्याची कोणाला आवश्यकता वाटत नाही. सध्याच्या पैसा कमावण्याच्या नादात कोणाला तितका वेळही नाही.
पैसा आहे म्हणून हातात स्मार्ट फोन आहे. पण म्हणून व्यक्ती स्मार्ट असेलच, याची शाश्वती नसते. बघा ना, वॅाट्सअप वर ज्या पद्धतीने बुद्धिवादी म्हणवणारे लोकही आंधळेपणाने खोट्याचा प्रचार करतात, तेंव्हा त्यांच्या स्मार्टपणाची खरोखर कीव करावीशी वाटते.
आयुष्य लहान आहे, ही सुरेश भटांची नसलेली कविता बिनधास्त त्यांच्या नावावर खपवली जाते.
खबरदारीचे इशारे बिनधास्त एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव टाकून पोस्ट केले जातात. आपल्याकडे जी कोणतीही पोस्ट येईल, त्यात असलेल्या नंबरवर कॉल करण्याची सवय लावा. पोस्ट खरी असेल, तरच पुढे पाठवा. पोस्ट खोटी असेल, तर तसे स्पष्ट करणारी नवी पोस्ट तयार करून टाका.
मंगळ हा ग्रह आहे, तो तारा नाही, तिथून किरणोत्सर्ग होऊ शकत नाही, हे माहित असतानाही त्यावरच्या कॉस्मिक किरणांनी पृथ्वीवर दुष्परिणाम होणार असल्याचं भय पसरवलं जातं. अशा प्रकारच्या ज्या कोणत्याही पोस्ट येतील, त्यातील शब्द वापरून इंटरनेटवर सर्च करा, तुम्हाला सत्य काय ते कळेल. www.hoax.com वर तुम्हाला जगभरात चाललेल्या खोट्या पोस्टची माहिती मिळते. त्यांचा खरा खुलासा कळतो. आपल्याला एक कळतं की, जे आज आपण मोठ्या कौतुकाने शेअर करतोय, ते जगात आठ दहा वर्षांपूर्वी खोटं ठरलंय.
भारताच्या राष्ट्रगीताला जगातलं सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून दर्जा मिळाल्याची आवई उठवली जाते. वास्तविक युनेस्कोच्या वेबसाईट वर लगेच जाऊन उलट तपासणी करणं शक्य असतं, पण आपण आपल्या नकली देशप्रेमापोटी नकळत आपल्याच राष्ट्रगीताचा अपमान करत असतो, हे आपण लक्षात घेत नाही. म्हणून नियमितपणे indian hoax जरूर तपासा.
जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फडकावण्यास मनाई असल्याचा कांगावा केला जातो. पण जर आपण जम्मू काश्मीर सरकारच्या वेबसाईटवर गेलो, तर चित्र वेगळं दिसतं. जाती धर्मात तेढ पसरवणाऱ्या अनेक पोस्ट वॅाट्सअपवर वेगाने फिरत असतात. अशा पोस्ट खऱ्या असो वा खोट्या, ताबडतोब डिलिट करा. मुलामुलींना किंवा कोणालाही मारहाण करतानाचे व्हिडियो, कोणाचीही वैयक्तिक विशेषतः स्त्रियांची बदनामी करणारे व्हिडियो असतील, पोलिसांना कळवा, अन्यथा डिलिट करा.
केंद्र सरकारने महिला अत्याचाराच्या कायद्यातील ज्या कलमात सुधारणा करून महिलांना हल्ल्यावेळी समोरच्याचा खून करण्याची परवानगी दिली म्हणून सांगितलं जातं, ते कलम नकली नाणे बनविण्याबाबत आहे. पण आपण आंधळेपणाने तो धादांत खोटा मजकूर आणखी शंभर लोकांना पाठवतो. ही सवय आजच सोडा.
कधी शीतपेयांमध्ये एड्सबाधित माणसाचं रक्त मिसळलं असल्याचा खोटा प्रचार केला जातो. इबोलावर मीठ पाण्याचा उपचार चालतो, म्हणून खोटं पसरवलं जातं. कडक लिंबांच्या किसाचा उपचार डॉ. आमटेंसारख्या समाजसुधारकांच्या नावावर खोटा खपवला जातो. देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत संशय निर्माण करून त्यांची अर्वाच्य भाषेत बदनामी केली जाते. देशाचे पंतप्रधान, अनेक राजकीय नेत्यांची खालच्या स्तराचे विनोद करून खिल्ली उडवली जाते. ही एक विकृती आहे. तिची सवय लावून घेऊ नका.
काय मिळत असेल, या लोकांना असं खोटंनाटं पसरवून असा भाबडा प्रश्न आपल्या मनात येत असेल. पण त्याचं उत्तर त्या भाबडेपणातच आहे. आपलं खोटं या देशातले लोक किती बेफिकीरीने पुढे पुढे ढकलताहेत, हे पाहून जगातली संबंधित विकृत माणसं पोट धरून हसत असतील, आपल्या मूर्खपणावर किंवा अति शहाणपणावर!!!
त्या विकृतांना असुरी आनंद सुद्धा होत असेल. कारण आपण दिवसेंदिवस बधीर होत चाललो आहोत, याची त्यांना जाणीव आहे. एक दिवस आपणच आपल्या बेजबाबदारपणामुळे आपलीच घरेदारे पेटवण्यास कारणीभूत ठरणार आहोत. आपली नजरचुकीने पुढे पाठवलेली पोस्ट एक दिवस दंगेधोपे घडविण्यास कारणीभूत ठरू शकते. ती आपणावर कायदेशीर कारवाई होण्याचे कारण तर ठरेलच पण आपल्याच प्रियजणांच्या विनाशाचेही कारण बनू शकते.
आपले डोळे उघडतील. पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. तेंव्हा, वेळीच जागे व्हा.
स्वतःची आणि स्वतःचीच, पुरेपूर खात्री असल्याशिवाय कोणतीही पोस्ट शेअर किंवा फाॅरवर्ड करू नका.
कोणतीही कविता, लेख, विचार ज्याचे असतील, त्याचे नाव टाकल्याशिवाय पोस्ट करू नका.
संवेदनशील विषय पोस्ट करण्याचे किंवा शेअर करण्याचे टाळा.
कोणाही व्यक्तीची, समाजाची, धर्माची तारतम्य सोडून बदनामी करेल असे किंवा फुकाचे उदोउदो करेल असे मजकूर, फोटो, चित्रे, कार्टून्स, विनोद पोस्ट करू नका.
महिलांना अवमानित करणारे विनोद, पोस्ट टाळा.
रक्तरंजित किंवा भावना भडकवणारे फोटो पोस्ट करू नका.
ग्रुपवर आपसात बोलतानाही आपलं लिखाण ग्रुपमधील सर्व सदस्य वाचत असतात, याचे भान राखा. ते समूहाचा विचार सोडून नसावं, याची काळजी घ्या.
देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अशी माहिती घाईघाईने उघड करू नका.
हे सोशल नेट्वर्किंग आहे, कचरा डेपो नाही, याची जाणीव असू द्या. सोशल नेट्वर्किंगचा वापर सकारात्मक करा.
हातात नुसता स्मार्टफोन असून उपयोग नाही. खऱ्या अर्थाने " स्मार्ट " व्हा..
बाकी आपण सुज्ञ आहात !

बाकी आपण सुज्ञ आहात !

सूज्ञ लोक हल्ली दुर्मिळतरी झालेत किंवा लोकांमधील सूज्ञपणाची जागा शुद्ध वेडेपणा फार वेगाने घेऊ लागला आहे.

मधुरा देशपांडे's picture

4 Jul 2015 - 7:36 pm | मधुरा देशपांडे

प्रचंड आवडली पोस्ट. पण सध्याचं जनतेचं व्हॉट्सअ‍ॅप प्रेम(?) आणि वापर बघता, अगदी हाच मेसेज जसाच्या तसा व्हॉट्सअ‍ॅप वर उद्या परवात येईल (किंवा आला असेल) आणि त्याच्या पाठोपाठ दुसर्‍याच क्षणी कुठलातरी फालतु जोक, एखादी अशीच खोटी वैद्यकीय माहितीची पोस्ट, चोरलेल्या कविता, देवांचे फोटो जे फॉरवर्ड करुन कल्याण होतं वगैरे, स्त्रियांवर केलेले पाचकळ विनोद हेही त्याच व्यक्तीकडुन येईल. त्यातल्या प्रत्येक पोस्ट प्रमाणे इतर जणांकडुन 'छान छान', 'बरं झालं सांगितलंस, हे माहितच नव्हतं', गुड मॉर्निंग/एव्हिनिंग, देवांचे फोटो फॉरवर्ड, थँक्यु फॉर शेअरिंग, आणि विनोदांवर स्मायल्या असे प्रतिसाद आले तरीही नवल वाटायला नको, एवढे आंधळेपणाने लोक व्हॉट्सअ‍ॅप आणि इतरही माध्यमं वापरतात. या सगळ्यात ही चांगली पोस्ट पण दुर्दैवाने फक्त ढकलली जाईल. हेच इतरही चांगल्या पोस्ट बाबत होत असावं.

पाटीलअमित's picture

4 Jul 2015 - 8:17 pm | पाटीलअमित

बर्याच वैताग लेल्या दिसताय

मधुरा देशपांडे's picture

4 Jul 2015 - 8:55 pm | मधुरा देशपांडे

हो अगदीच. बहुतेक असे ग्रुप्स जॉइन केलेले नाहीत, पण जे २-३ आहेत, त्यातच असे झालेय. ;)

जुइ's picture

4 Jul 2015 - 8:20 pm | जुइ

आजच एका शाळेतील मित्राला निक्षून सांगितले की त्यांचा कसं काय ग्रुपला जॉईन करणार नाही कारण ही वरील प्रमाणेच सांगितले.

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Jul 2015 - 7:21 am | श्रीकृष्ण सामंत

किती उद्बोधक लेखन आहे हे.!

कडक लिंबाचा किस पोस्ट अनेक चांगल्या चांगल्या लोकांनी फॉरवर्ड केलेली. शहानिशा न करता अस्ल्या पोस्ट पाठवताना नक्की काय विचार करत असतात लोक?