अधिक महिना व जावया साठी वाण

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Jun 2015 - 11:39 am

अधिक महिना व जावया साठी वाण
..............................
अधिक महिना होता..
सावित्री बाईंची लगबग चालू होती..
जावई केशव व मुलगी सुनंदा प्रथमच परगावा हून धोंड्या च्या महिन्या निमित्त सासुरवाडीला येणार होते..
जावई केशव तसा साधा भोळा माणूस असतो..लग्ना नंतर प्रथमच तो सासुरवाडीला येणार असतो..
आपला मुलगा प्रथमच सासुरवाडीला जात असल्याने केशवच्या आई वडिलांनी सासुरवाडीला कसे वागावे याचे सल्ले दिलेले होते..
मोजकेच बोलावे.. मोजकेच खावे..एखादा पदार्थ आवडला तरी हावरटासारखा मागून नये इत्यादी टिपा केशवला दिल्या असतात..
सासरे मालदार असतात बागायती शेती असते..चौसोपी वाडा असतो..
.
सायंकाळच्या सुमारास केशव व कन्येचे आगमन होते ..
सा.बु. व सा.बा..जावयाचे आगतम स्वागतम करतात..
हात पाय धुतल्यावर केशव सास~या शी गप्पा मारत असतो व जेवण तयार असल्याची वर्दी येते..
सासू बाईनी भरली वांगी..घडीच्या पोळ्या चटणी कोशिंबीर असा बेत केलेला असतो..
जेवण सुरू होते अन सासरा पत्नीस म्हणतो अग काही गोड धोड नाही केले?
यावर सासू म्हणते उद्या पुरणावरणाचा बेत आहे..म्हणून आज साधेच केले..त्यावर सासरा म्हणतो..असो निदान काकवी तरी वाढा सा~याना...
हे ऐकताच सासूने रामू गड्यास हाक मारते व त्याला लाकडी घोडा घेऊन यायला सांगते
काकवी माठात शिंकाळ्या वर ठेवलेली असते .. रामू माठ खाली काढतो सासूबाई काकवी काढून घेतात व मडके तो परत आढ्याला टांगतो व रमू घोडा घेऊन जातो..
सासूबाई वाटीत काकवी काढतात त्यात ४ केशराच्या काड्या मिसळतात व वाटी जावई व पतीस देतात..
जेवणाचा बेत झकासच असतो... केशवाने प्रथमच काकवी खाल्लेली असते त्या ला ति खूपं आवडते..४ घासातच काकवी संपते..व त्याला ति परत मागावीशी वाटते पण आईचा सल्ला आठवतो अन आपण हावरटा सारखा वागतो असे सासुरवाडी च्या लोकांना वाटेल या भीतीने तो मनास आवर घालतो....
.
रात्री गप्पा झाल्यावर झोपायची वेळ होते..हवेत उष्मा असल्याने मुलगी आई व बाबा ओसरी वरच पथारी मांडतात मात्र जावया साठी माडीवरील खोलीत सोय केली असते..
.
केशव वर झोपायला जातो मात्र त्याच्या जिभेवर काकवीची चव रेंगाळत असते..व त्याला काकवी खाण्याची इच्छा होते..
रात्र झालेली असते सारे जण झोपी गेलेले पाहून केशव दबक्या पाउलाने माडी वरुन स्वयंपाक गृहात येतो..
.
आत आल्यावर त्याची नजर त्या उंच टांगलेलेल्या काकवीच्या माठावर जाते...
खाली कसा काढावा या विचारात असतानाच त्याची नजर कोप~यातल्या काठीवर जाते..
काय करावे न कळल्याने तो विचार करतो की काठी ने मडक्याला छिद्र पाडावे अन व काकवीचा आस्वाद घ्यावा व तो तसे करायला आतो पण मडके कच्चे असल्याने फुटते व सारी काकवी अंगावर सांडते...
करायला गेलो एक अशी अवस्था केशवाची होती काकवीने तो नखशिकांत भिजला असतो..
.
अंग साफ करावे म्हणून अंगणात बाजूला कोठीची खोली असते तिथे जातो..
सासरे बुवांनी कपाशीची वेचणी केलेली असते ते कापसाचे ढीग खोलीत असतात..
खोलीत अंधार असतो..केशव चा पाय कशाला तरी अडखळतो अन तो जाऊन कापसाच्या ढिगावर पडतो..उठताना अंधारामुळे परत पडतो..व खोलीतील काही सामान असते ते पण कोसळते व मोठा आवाज होतो..
आवाज झाल्यावर गडी जागे होतात व कोण आहे असे म्हणू लागतात..
हे ऐकताच केशव खोलीच्या बाहेर येतो..त्याच्या अंगावर काकवी असल्याने कापूस सर्वांगाला चिकटला असतो.
व त्याचे रूप खूप मजेदार दिसत असते..
.
तो तसाच खोलीकडे जायला निघतो..पण जाताजाता त्याचा पाय सासू बाईच्या पायावर पडतो..व सासूबाई जाग्या होतात..
समोर पाहतात तर एक सर्वांगाला कापूस चिकटलेली भयाण व्यक्ती पाहिल्यावर त्या घाबरतात..व जोरात भूत..भूत असे ओरडू लागतात...
सासूबाईच्या आरडाओरड्याने वाडाजागा होतो..
गडी धावत येतात व केशवला पकडतात..
..मालक हा तर चोर आहे चोरी करायला आला आहे असे म्हणत केशव ला बडवायला सुरवात करतात..
मार पडल्यावर मात्र केशव ओरडून सांगतो की "मी चोर नाही आपला जावई केशव आहे.."
अहो जावई बापू आपले असे कसे झाले? असे सासू बाई विचारताच केशव त्यांना सारी हकिगत सांगतो..हे ऐकून सारे जण हसू लागतात..
शेवटी सासू बाई पाणी तापवून देतात केशव स्वच्छं अंघोळ करतो व खोलीत झोपायला जातो...
.
सकाळी उठल्यावर हा एक चर्चेचा विषय बनतो..
मात्र सासूबाई मनातून खूश असतात...
आपली मुलगी साक्षात म्हाळसा आहे..तिला असा साधा भोळा नवरा मिळाल्या मुळे त्या मनातून खूश असतात..
त्यांना खात्री असते जावई मुलीच्या मुठीत राहणार..
जेवण झाल्या वर सासूबाई एक ऐवजी खूश होऊन एका ऐवजी २ चांदिच्या ताटात अनारशांचे वाण देतात..
व जावयाची सन्मानाने बोळवण करतात

संस्कृती

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

28 Jun 2015 - 12:05 pm | आदूबाळ

अरे काय!

कवितानागेश's picture

28 Jun 2015 - 1:09 pm | कवितानागेश

डबल वाण मिळवण्याची युक्ती आहे ही!

अजया's picture

28 Jun 2015 - 3:43 pm | अजया

=))=))

मुक्त विहारि's picture

28 Jun 2015 - 12:12 pm | मुक्त विहारि

परत एकदा लहानपण अनुभवायला मिळाले.

धन्यवाद.

(अद्याप परीकथेत रमणारा) मुवि.

बॅटमॅन's picture

29 Jun 2015 - 2:26 am | बॅटमॅन

अगदी असेच.

(चांदोबातील कथा व चित्रांचा अतीव जोराने फिरणारा पंखा) बॅटमॅन.

मुक्त विहारि's picture

29 Jun 2015 - 1:02 pm | मुक्त विहारि

फक्त काही जण, वयोमानानुसार, कथा-चित्रे बदलतात.

म्हणजे आवडतील ते सिनेमे बघतात.

म्हणजे एक्स-मॅन, स्पायडर मॅन, सुपर-मॅन, आर्यन-मॅन, हक वगैरे.

(साधा-सरळ) मुवि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2015 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या.
तुम्ही जाऊन आले की नै सासुरवाडीला ?

-दिलीप बिरुटे

वाचनखूण साठवली आहे.

योगी९००'s picture

28 Jun 2015 - 2:19 pm | योगी९००

छान गोष्ट ...आवडली..!!

दोन्-तीनदा फोन आले सासूरवाडीहुन, जायला जमत नाही ये.. काय करावे बरे...?? अनरसातर खुपच आवडतो मला..

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2015 - 3:40 pm | अत्रुप्त आत्मा

इडंबन व्हायलय मले! :-D

अकुंचित धागा , कुणासाठी लहान ? कुणासाठी महान! ;-)

उगा काहितरीच's picture

28 Jun 2015 - 3:48 pm | उगा काहितरीच

लोल. लहानपणी "ऐकली" होती.

रातराणी's picture

28 Jun 2015 - 6:43 pm | रातराणी

माहीत नव्हती गोष्ट. :) एवढ्यानी जावई मुठीत रहायला लागले तर मग काय!

पाषाणभेद's picture

28 Jun 2015 - 9:52 pm | पाषाणभेद

>>>> हवेत उष्मा असल्याने मुलगी आई व बाबा ओसरी वरच पथारी मांडतात मात्र जावया साठी माडीवरील खोलीत सोय केली असते..

ख्या... ख्या... ख्या...

dadadarekar's picture

28 Jun 2015 - 10:52 pm | dadadarekar

घरची माडी नाही दिली तर जावई बाहेरची माडी चढेल . हा सूज्ञ विचार त्यामागे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2015 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

@ घरची माडी नाही दिली तर जावई बाहेरची माडी चढेल . हा सूज्ञ विचार त्यामागे आहे.>> =)) ह्या ह्या ह्या ह्या ह्या! =))

द-बाहुबली's picture

28 Jun 2015 - 11:17 pm | द-बाहुबली

अलमोस्ट जिअन क्था.. मज्याअली. अजुन युद्या.

श्रीरंग_जोशी's picture

29 Jun 2015 - 5:58 am | श्रीरंग_जोशी

निखळ आनंद देणारी कथा.

धन्यवाद.

मोहनराव's picture

29 Jun 2015 - 2:11 pm | मोहनराव

सहमत

नाखु's picture

29 Jun 2015 - 8:58 am | नाखु

समोर पाहतात तर एक सर्वांगाला कापूस चिकटलेली भयाण व्यक्ती पाहिल्यावर त्या घाबरतात..व जोरात भूत..भूत असे ओरडू लागतात...

आम्ही बापडे वाचकही काही धागा प्रसवक पाहिले की हिच प्रीतीक्रिया देतो त्याची आटवण झाली !!

अभामिपाबालक्पालक्चालक्चावकवाचक संघाकडून पावसाळी(बदबदा) लेखसंसर्ग खबरदारी हितार्थ प्रसारीत.

शि बि आय's picture

29 Jun 2015 - 12:47 pm | शि बि आय

मस्तच ! हीच गोष्ट लहानपणी ऐकली आहे. पण परत ऐकून मज्जा वाटली. काकवी, जावईबापू आणि भूत sss … भूत sss

ही द. मा. मिरासदारांच्या 'जावईबापुंच्या गोष्टी' पुस्तकातली आहे.

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 10:04 am | dadadarekar

कुठेतरी वाचली होती ही कथा

हेमन्त वाघे's picture

30 Jun 2015 - 10:49 am | हेमन्त वाघे

चोर तो चोर आनि