निखिल वागळे

काळा पहाड's picture
काळा पहाड in काथ्याकूट
27 Jun 2015 - 12:46 am
गाभा: 

निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html

मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो.

वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे:
http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/
या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्‍या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही?

हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

27 Jun 2015 - 1:07 am | स्रुजा

बाप रे ! काय माणुस आहे हा !! जातिवाचक शब्द वापरल्याबद्दल अ‍ॅट्रॉसिटी ची केस लावुन वागळेलाच जेल मध्ये टाकायला हवं. अर्थात ती क्लिप खरी असेल तर. कारण बाकी काही जबाबदारी क्लिप टाकणार्‍याने घेतली नाहीये.

पेशावर मॅसॅकर नंतर साहेबांनी उधळलेल्या मुक्ताफळाला एकाने फार चांगलं उत्तर दिलंय. इथे बघु शकता

पुण्याचे वटवाघूळ's picture

27 Jun 2015 - 10:18 am | पुण्याचे वटवाघूळ

एखादा माणूस दिसता क्षणी संतापाची तिडिक जावी अशा माणसांपैकी निखिल वागळे हा एक माणूस आहे.

ह्म्म.. तुम्ही वटवागूळ आणि ते वटवटवागळे, त्यामुळे तुम्हाला राग येणे साहजिकच आहे.

ह-घ्या.

पुण्याच्या वटवाघळाशी सहमत.

-गॉथमचे सेमीवटवाघूळ.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2015 - 11:10 am | अत्रुप्त आत्मा

पुरोगामी , सेक्युलर अशा चांगल्या संद्न्यांना शिविचं स्वरूप देण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे,त्यांच्यापैकी बगळे काका पहिल्या पाचात येतात.

उगा काहितरीच's picture

27 Jun 2015 - 11:25 am | उगा काहितरीच

निखील वागळे ...नो कॉमेंटस!

द-बाहुबली's picture

27 Jun 2015 - 11:29 am | द-बाहुबली

+100000000000000000000000000000000000000000000000

नाखु's picture

27 Jun 2015 - 11:36 am | नाखु

प्रती+प्रीती क्रिया

हा संघाचा डाव आहे...
-->ग्रेटथुंकर

"या निखिलने भल्या भल्यांना घाम फोडला होता महानगरातून असे आमचे हे म्हणत होते परवा पाय मुरगळला तेव्हा शेकताना श्री गुरुजी भावजींबरोबर आल्याचा चहा पिताना"..... सार्वकालीन माई.

मोदींंचे चांगले दिवस बघवत नाहीत म्हणून हा बनाव आहे.
---> श्री गुरुजी

हा केजरीवाल यांना प्रकाश झोतापासून आणि मत प्रदर्शनापासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा भाग आहे आणी कांग्रेस आणी भाजपा आतून मिळालेले आहेत.
---> पिंप-तळाचे उंदीर

ह्या प्रकरणाची साहीत्य संपादकांनी चवकशी केली पाहिजे.

पिचकारी वाचक "निसो-घुसो आणि धसो" कोपरा वाचाळ संघ

दमामि's picture

27 Jun 2015 - 11:38 am | दमामि

खिक्क!

तिमा's picture

27 Jun 2015 - 11:47 am | तिमा

ध्वनिफितीतला वागळेंचा आवाज सहज ओळखू येतोय. या माणसाच्या मनांत असलेला ब्राह्मणांविषयीचा द्वेष पूर्णपणे उघड झालाय. हा इतका उखडलाय, म्हणजे त्या जोशीनेही काहीतरी आक्षेपार्ह लिहिले असावे. पण तरीही, दाभोळकर आणि पानसरे यांच्या खुनाला हा वागळे, सरळसरळ ब्राह्मण समाजाला जबाबदार धरतोय. त्याचा पुरावा त्याने दिलाच पाहिजे नाहीतर कोणीतरी त्याच्यावर खटला भरायला हवा.

काळा पहाड's picture

27 Jun 2015 - 12:55 pm | काळा पहाड

जाला वर शोधल्यानंतर वागळे बद्दल पोलिसांच्या कडे तक्रार दाखल केली गेलीय असं कळलं: http://www.afternoonvoice.com/brahmins-demand-journalists-arrest.html
वागळेवर या पूर्वी सुद्धा तक्रारी दाखल झाल्यात. बीजेपीच्या पुणे कम्युनिकेशन सेल नं आणि अखिल भारतीय ब्राम्हण महासंघानं सुद्धा मोदींबद्दल लिहिलेल्या ट्वीट साठी तक्रारी दाखल केलेल्या आहेतः
http://www.newslaundry.com/2015/06/08/complaint-filed-against-journalist...

संदीप डांगे's picture

27 Jun 2015 - 12:16 pm | संदीप डांगे

मुंगी चावल्याने हत्तीला त्रास होतो का?

dadadarekar's picture

27 Jun 2015 - 11:51 pm | dadadarekar

मुंगी सोंडेत घुसली तर होउ शकतो.

महानगर सोडल्या पासून वागळेचा पट्टा कुणाच्या ना कुणाच्या हातात आहे.... आता कदाचित पट्टा पकडणारा कोणी नसल्याने वाटेल ते भुंकत/ बरळत असावा...

फुलथ्रॉटल जिनियस's picture

27 Jun 2015 - 12:24 pm | फुलथ्रॉटल जिनियस

वागळे एक चांगले पत्रकार आहेत, निरपेक्ष बुद्धीने काम करणार्या फार कमी पत्रकारांमध्ये वागळेंचे नाव घेतले जाते. वेळोवेळी त्यांना धमकवण्याचे प्रकार होत असतात, हे बरोबर नाही. पत्रकारीता जिवंत राहयची असेल तर वागळेंसारख्या निरक्षीर बुद्धीने काम करणार्या पत्रकारांशिवाय पर्याय नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2015 - 1:02 pm | अत्रुप्त आत्मा

@ फुलथ्रॉटल जिनियस>>> टॉपगियर्ड फिलोसोफर कोण हो तुमचे? ;-)

यसवायजी's picture

27 Jun 2015 - 2:54 pm | यसवायजी

ख्याक्क.

नाखु's picture

27 Jun 2015 - 3:01 pm | नाखु

नव्याने जन्मेन मी ही मालीका चालू आहे मिपावर.

प्रायोजक : सपट लोशण

पैसा's picture

27 Jun 2015 - 3:07 pm | पैसा

मी चुकून "निरक्षर" वाचलं!

विकास's picture

27 Jun 2015 - 3:37 pm | विकास

त्यांचे टंकताना चुकलेले असेल... ;)

विवेकपटाईत's picture

27 Jun 2015 - 3:16 pm | विवेकपटाईत

वागळे आणि निरपेक्ष???? हा हा हा

आनन्दा's picture

29 Jun 2015 - 5:00 pm | आनन्दा

निरक्षीर होय,
चुकून निरक्षर वाचले हो मी. शब्द खटकला तेव्हा परत वाचले, मग कळले तुम्हाला काय म्हणायचेय ते. बाकी उपरोध चान करता तुम्ही.

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2015 - 12:55 pm | श्रीगुरुजी

वागळे हा पराकोटीचा विकृत आणि अत्यंत माजलेला आहे हे या क्लिपवरून सहज दिसून येतंय. इतकी विकृती माणसात कशी काय येते याचे मला कायम आश्चर्य वाटत आलं आहे.

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2015 - 1:29 pm | कानडाऊ योगेशु

इतके सगळे असुन सुध्दा वागळेंचा शो चालु आहे म्हणजे त्याला तसा बर्यापैकी टी.आर.पी मिळत असणार.
झाले आहे काय कि जसे चितळ्यांनी स्वतःच्या पुणेरी विक्षिप्तपणाला आपला यु.एस.पी बनवला आहे,रजनीकांतने स्वतःच्या विचित्र अ‍ॅक्शनला स्वतःचा यु.एस.पी बनवला आहे तसाच वागळेंनी आपल्या आक्रस्ताळेपणाला स्वतःचा यु.एस.पी बनवला आहे आणि लोकांना त्याची सवयही लावली आहे.

बॅटमॅन's picture

29 Jun 2015 - 3:27 pm | बॅटमॅन

अस्सेच म्हणतो.

सांरा's picture

27 Jun 2015 - 1:30 pm | सांरा

व्यक्तीबद्दल बोलगे नलगे. प्रस्तुत व्यक्ती जर केजरीवाल सरकारचा पराभव झाला असता तर इसिस मध्ये भरती होण्याची तयारी ठेवली होती. अशांना धर्म सोडण्याची संधीच देऊ नये. (आधीच हाकलावे.)
Link: pic.twitter.com/hqEqxRFnb4

मनोज श्रीनिवास जोशी's picture

27 Jun 2015 - 2:41 pm | मनोज श्रीनिवास जोशी

ह्या क्लिप मध्ये वागळे जोशी ह्या आडनावाचा उच्चार ज्या तिरस्काराने करीत आहेत ते यांना तीव्र'मानसिक आजार' झाला आहे असे वाटते आहे.

त्याने माझ्या आडनावाचा कितीही 'उध्दार' केला तरी तो पत्रकार म्हणून मला अर्धा आवडतो. त्याचा अनाठायी हिंदुत्व द्वेष सोडला तर तसा बरा आहे. ( शुद्ध मराठी बोलतो हे काय कमी आहे ?)

नमो चे सरकार चांगले सुरु आहे त्यामुळे काँग्रेस ने पोसलेल्या अनेक पत्रकारांचा अंगाचा तिळपापड होतो आहे हे ही ह्या क्लिप मधून समजले. पत्रकारांचे परदेश दौरे नमोनी बंद केले त्यामुळे निखील चा मानसिक आजार बळावेल आणि बिघडेल ही ...

त्याच्या अस्थीत्वाने अती दुर्मिळ झालेला विक्षिप्त समाजवादी विचार अजूनही नामशेष झाला नाही एवढे समजते. पुढेमागे तो विचार नामशेष होईलच आणि तो करण्यात निखिलचाच महत्वाचा वाटा असेल.

विकास's picture

27 Jun 2015 - 3:36 pm | विकास

निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे.

मुळात ते कुठल्या धर्माचे आहेत?

मला वाटले ते निधर्मी आहेत त्यामुळे धर्म बदलणार म्हणण्यापेक्षा धर्मीय होणार म्हणावे लागेल. तरी देखील, मला वाटते ही अशीच अफवा असेल. नाहीतर इथे कुठला धर्म त्यांना घेण्यास उत्सुक असेल?

काळा पहाड's picture

29 Jun 2015 - 1:18 pm | काळा पहाड

हिंदू कायस्थ

dadadarekar's picture

27 Jun 2015 - 6:45 pm | dadadarekar

वाखाणण्यासारखे आहे.

खटपट्या's picture

27 Jun 2015 - 8:14 pm | खटपट्या

यांचे मालवणात एकदा थोबाड फोडले आहे. कोणी ते सर्वांना माहीत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jun 2015 - 9:31 pm | निनाद मुक्काम प...

चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये उत्कृष्ट दाल पकवान व स्टील च्या पेल्यातून लस्सी किंवा खरे ताक खास न्यःयारीसाठी खाण्यास जायचे आहे
कॉलेज च्य दिवसात झणझणीत व तेलकट न्याहारी उतारा म्हणून बेस्ट होती किंवा चेंबूर च्या सिग्नल वर भटाची तिखट जाळ मिसळ

काळा पहाड's picture

27 Jun 2015 - 9:53 pm | काळा पहाड

गल्ली चुकलं बघा तुमचं

आदूबाळ's picture

27 Jun 2015 - 11:00 pm | आदूबाळ

नाय नाय... गल्ली बरोबरे. वागळ्यांबद्दल आणखी काय लिहायचं? त्यापेक्षा लस्सी, ताक, दालपकवान वगैरेवर लिहिणे हां मिपाच्या ब्याण्डविड्थचा जास्त विधायक उपयोग आहे.

dadadarekar's picture

27 Jun 2015 - 11:11 pm | dadadarekar

या चेंबुरात .

dadadarekar's picture

28 Jun 2015 - 6:48 am | dadadarekar

दोन दिसापुर्वी चेंबरात मोनोरेलमध्ये ब्याटरीच्या विजेचा धक्का लागून एका माणसाचे दोन्ही हात व इतर शरीरही भाजले.

रात्री अडीच वाजता आमच्याकडे आणला होता. इतके मोठे बर्न केस असल्याने त्याला बर्नच्या ऐरोळीच्या स्पेशल दवाखान्यात पाठवला.

......

दुसर्‍या दिवशी पेप्रात नेटावर कुठेतरी बातमी असेल म्हणुन शोधलं. पण कुठे मिळाली नाही.

मनुष्य मोनोरेलचा एंप्लोयी आहे.

.........

आणीबाणीच्या काळात म्हणे पेपरांवर दडपण असायचे.

आणि आजच्या सरकारने सगळी पेपरं खिशात घातली आहेत , हे लोकांच्या लक्षात तरी येतय का ?

वागळे परवडला !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jun 2015 - 9:55 pm | निनाद मुक्काम प...

माझ्या मते वागळे ला मी मराठी वर अजून जम बसवता आला नाही आहे त्यांचे सोनेरी दिवस त्याच्यावर होणारी विडंबने
थोडक्यात सतत प्रकाश झोतात राहण्याची सवय असलेला वागळे आता त्या मानाने मागे पडला तेव्हा प्रकाश झोतात राहण्यासाठी त्याने ह्या अनिरुद्ध जोशी समवेत कुंभाड रचले
किंवा मुद्दामहून त्या जोशी च्या दूरध्वनी ला अशी विकृत उत्तरे दिली जेणेकरून विरोधी पक्षातून जातीचे राजकारण करणार्‍यांनी त्याची तळी उचलावी असा त्याचा कावा दिसतो
थोडक्यात विकृतपणा कमी व धंदेवाईक पणा जास्त दिसून येतो
तसे आमची शोभा ताई सुद्धा देवेंद्राला उद्देशून टीव टीव करते.

विचारजंत पत्रकार हे एखाद्या विचारसरणी च्या रंगात इतके रंगून जातात की त्या विचारसरणीच्या राजकीय नेत्यांच्या पेक्ष्या जास्त राडा हे प्रत्रकार मिळेल त्या माध्यामातून घालतांना दिसतात.
चाय पेक्ष्या किटली गरम असा सर प्रकार असतो

वागळे बरोबर केतकर सुद्धा.....दोघांनी उश्चाद् मांडलाय मि मराठी वर

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2015 - 11:17 pm | श्रीगुरुजी

आव्हाडला सुद्धा यांच्यात टाका.

समानशीलेषु व्यसनेषु सख्यम्|

समानशीले व्यसनेषु सख्यम्

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2015 - 11:16 pm | श्रीगुरुजी

वागळे पूर्वी आयबीएन लोकमत वर असताना रोज चर्चेच्या शेवटी चर्चेच्या विषयावर घेतलेल्या एसेमेस पोलचे निकाल दाखवायचा. बहुसंख्य पोलचे निकाल त्याच्या अपेक्षेविरूद्ध लागायचे. तो मी-मराठीवर गेल्यावर अचानक त्या वाहिनीवरील एसेमेस पोलचे निकाल त्याला हवे तसे लागू लागले.

जानेवारी २०१५ मध्ये मोदींच्या पहिल्या ७-८ महिन्यांच्या कारकीर्दीवर बर्‍याच वाहिन्यांनी देशभर जनमत चाचणी घेतली होती. आजतक, एसी नेल्सन्-एबीपी माझा, झी इ. अनेक चाचण्यात असे दिसून आले की मोदींच्या कारभारावर ६०-६५% हून अधिक जनता समाधानी किंवा खूप समाधानी होती व १५% पेक्षा कमी जनता नाखूष किंवा खूप नाखूष होती. मी-मराठीवर याच विषयावर चर्चा होऊन शेवटी एसेमेस पोल दाखविला तेव्हा हे आकडे बरोबर उलटे दाखविले होते. मी-मराठीवर जाऊन वागळे पोल मॅनेज करतो याची तेव्हाच खात्री झाली होती.

अविनाश धर्माधिकारी हे अत्यंत संयमित, अभ्यासू व प्रगल्भ आहेत. इतर वाहिन्यांवरील चर्चेत ते असतात. परंतु वागळे सूत्रधार असलेल्या चर्चेत ते कधीही नसतात. याचे कारण वागळेचा उन्मत्तपणा, जातीयवाद आणि विकृती.

आनंदी गोपाळ's picture

28 Jun 2015 - 12:12 am | आनंदी गोपाळ

वागळे तुझ्या आय मीन तुमच्या वर्गात होता असे नुकतेच समजले ;)
हबिणंडण.

श्रीगुरुजी's picture

28 Jun 2015 - 1:35 pm | श्रीगुरुजी

गोपू आय मीन गोपाळराव,

माझ्या एकट्यावरच का हो दात धरला? माझ्याप्रमाणे इतर अनेक जण वागळेच्याच वर्गात होते की. तू आय मीन तुम्ही इतरांचे प्रतिसाद वाचलेले दिसत नाही. मुद्दामच माझ्यावर दात धरला असं दिसतंय.

जरा याच धाग्यातील खालील प्रतिसाद वाचतोस का आय मीन वाचता का? या सर्वांचं पण 'हबिणंडण' कर की आय मीन करा की.

http://www.misalpav.com/comment/711622#comment-711622

http://www.misalpav.com/comment/712006#comment-712006

http://www.misalpav.com/comment/711717#comment-711717

http://www.misalpav.com/comment/711741#comment-711741

http://www.misalpav.com/comment/711770#comment-711770

http://www.misalpav.com/comment/711914#comment-711914

http://www.misalpav.com/comment/711957#comment-711957

http://www.misalpav.com/comment/712045#comment-712045

वागळे, दिग्विजय, लालू, मुलायम, सिब्बल, लादेन, कसाब, हफीज सईद इ. ना अहोजाही करण्याची मला कधी गरज वाटली नाही. त्यांची तेवढीसुद्धा पात्रता नाही. या व्यक्तींचा अहोजाहो, जी, श्री. इ. आदरपूर्वक उल्लेख करायला मी म्हणजे सुशीलकुमार शिंदे किंवा दिग्विजय नाही.

मितभाषी's picture

27 Jun 2015 - 11:25 pm | मितभाषी

वागळे १ न.पत्रकार आहे.

आनंदी गोपाळ's picture

28 Jun 2015 - 12:11 am | आनंदी गोपाळ

ओह अच्छा!

भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरून काहीतरी क्लिप अन त्यावरून वागळे यांना शिव्या देण्याचा धागा आहे तर!

धाग्याच्या नावावरून अर्थबोध होत नव्हता.

भाजपाच्या राज्यात वागळे अजूनही गजाआड नाहीत म्हणजे क्लिप किंवा एकंदर धाग्यात काही दम नसावा असे दिसते.

काळा पहाड's picture

28 Jun 2015 - 12:40 am | काळा पहाड

आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jun 2015 - 12:43 am | निनाद मुक्काम प...

त्याला अटकेत टाकून फुकटची प्रसिद्धी का बरे द्यायची
काही ब्राह्मण संघटना त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करणार होत्या मला विचारणा केली होती ,
मी म्हटले फुकटची प्रसिद्धी कशाला द्यायची त्याला
आणि ह्यांना सुद्धा मुद्दा मिळाला तर कशाला सोडतील
मात्र सध्या महाराष्ट्रात विरोधक थंडावले आहे व युती चा कारभार साधा सरळ चालला आहे , त्यामुळे ह्याचा टी र पी थंडावला असावा म्हणून हा बिथरला आहे एवढेच
एक होता वागळे अशी गात व्हायची ह्याची

मदनबाण's picture

28 Jun 2015 - 8:54 am | मदनबाण

ही तर विकॄती !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar

फुलथ्रॉटल जिनियस's picture

28 Jun 2015 - 11:54 am | फुलथ्रॉटल जिनियस

वागळेंचे त्या क्लीपमधले बोलणे सडेतोड आहे व ते अनेकांना झोंबलेले दिसतेय. याचा अर्थ वागळेंच्या बोलण्यात तथ्य असावे.

खटपट्या's picture

28 Jun 2015 - 12:17 pm | खटपट्या

बोलणे सडेतोड होते, पण त्यात ब्राह्मण जातीस भटजी म्हणून हीणवण्याचा टोन होता. एकदा नव्हे दोन/तीनदा त्यांनी जातीवाचक उच्चार केला. हेच जर एखाद्या खालच्या (तथाकथीत) जातीला उद्देशून बोलले असते तर तथाकथीत पुरोगामे गप्प बसले असते काय ?

मुळ मुद्दा निनावी मेसेज करण्याबद्द्ल होता. त्याबद्द्ल ते बोलले असते तर योग्य होते. विनाकारण ब्राह्मणी कावा आणि बरेच काही निरर्थक बोलण्याची गरज नव्हती.

त्यांच्या बोलण्यात काय तथ्य होते यावरही प्रकाश टाकावा..

नेत्रेश's picture

28 Jun 2015 - 12:39 pm | नेत्रेश

क्लिप मध्ये वागळे एकदम पिसाळल्या सारखे ओअरडत होते. समोरच्याला बोलायची, त्याची बाजु मांडण्याची बिलकुल संधी देत नव्हते. जोशींनी नक्की त्यांचे काय बिघडवले होते ते समजले नाही. पण जोशी हे अडनाव ऐकल्यावर तर त्याचा तोलच सुटला. त्यानंतर वागळे जे काही बोलले त्याला बरळले म्हणाबे लागेल. तरीही जोशी शांत राहुन डीसेंट कॉन्हर्सेशन करायचा प्रयत्न करत होते.

वागले शाहु, फुले, आंबेडकर यांचे उगाचच नाव जपत होते. या तीघांविषयी वागळेनां फारशी माहीती दीसत नाही. वागळेंच्या आचार विचार आणी बोलण्यावरुन तरी शाहु, फुले, आंबेडकर यांचे कोणतेही साहीत्य अथवा विचार वागळेनी अभ्यासलेला वाटत नाही.

नेत्रेश's picture

28 Jun 2015 - 12:49 pm | नेत्रेश

आंबेडकरांनी आपल्या हजारों, लाखों अनुनायांसह धर्म बदलला म्हणुन हींदु धर्माचे काय आणी कीती नुकसान झाले? (जाणकारांनी माहीती द्यावी)
तर वागळेनी घर्म बदलुन कुणाला काय फरक पडणार आहे? कदाचीत वागळेलाच थोडा अल्पकालीन फायदा होईल.

वागळेंनी धर्म बदलायचे ठरवले तर त्याच्या घरचे तरी त्याच्याबरोबर आपला धर्म बदलतील काय? त्याला सपोर्ट तरी करतील काय? बहुतेक तुझी नाटके TV वरच ठेव, घरी आणु नको असाच सल्ला (दम) मीळेल.

dadadarekar's picture

28 Jun 2015 - 1:40 pm | dadadarekar

इस्लाम १८ % , ख्रिस्चन २ % , जैन बौद्ध १ %

- २१ % आधीच झालेले आहे.

इस्लाम १८%, ख्रिस्चन २% यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे बदललेली नाही. आणी १% जैन्,बौद्ध आपल्याकडे आधीपासुनच होते.
तेव्हा बाबासाहेबांच्या धर्मांनरामुळे हींदु धर्माला फारसा फरक पडलेला नाही.

dadadarekar's picture

29 Jun 2015 - 1:04 pm | dadadarekar

तुम्ही तुमचा शर्ट बदलता तो तुम्हाला स्वतःला फरक पडण्यासाठी की कुठल्या तरी कंपनीला फरक पडण्यासाठी ?

धर्म बदलणारा माणुस त्याला काहीतरी फरक पडणे अपेक्षितसते म्हणुन धर्मांतर करतो. हिंदू धर्माला फरक पडावा म्हणून नव्हे.

नेत्रेश's picture

1 Jul 2015 - 11:07 am | नेत्रेश

पण स्वत: मध्ये फरक पडण्यासाठी शर्ट किंवा धर्म बदलणारा माणुस मी ते करुन दाखवीन अशा धमक्या दुसर्याना देताना पाहीला नाही. या क्लिप मध्ये तर वागळे स्वतःचा धर्म बदलण्याची धमकी देतो आहे. जसेकाही याच्या धर्म बदलण्यामुळे हींदु धर्माचे फार मोठे नुकसान किंवा बदनामी होणार आहे.

पण मी काय म्हणतो दादा आणि नेत्रेश भाऊ..वागळे साहेब या फुकाच्या वल्गना का करत आहेत? करून टाका ना म्हणा धर्मांतर. हिंदू धर्माला तर काहीच फरक पडणार नाही हे उघड सत्य आहे. आणि वागलेंना काय फरक पडेल ते त्यांना धर्मांतर केल्यावर कळेलच. स्वत: च्या धर्माचे वाभाडे काढण्याची हिम्मत दुसऱ्या एखाद्या धर्मात जाऊन करून बघा म्हणा (उदा. इस्लाम स्वीकारून इस्लाम वर टीका किंवा ख्रिश्चन स्वीकारून ख्रिश्चन वर टीका ..किंवा अजून काही)

त्यांनी क्लीप मध्ये वापरलेल्या भाषेप्रमाणे "त्यांच्या पार्श्वभागात दम असेल तर हे करून दाखवा!"

श्रीगुरुजी's picture

28 Jun 2015 - 1:37 pm | श्रीगुरुजी

एबीपी माझा वरील प्रसन्न जोशी हा वागळेचाच धाकटा भाऊ आहे.

मिपावर देखील वागळेचे भाऊबंद आहेत.

वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.

शब्दबम्बाळ's picture

28 Jun 2015 - 2:45 pm | शब्दबम्बाळ

दोन लोक फोनवरून एकमेकांशी भांडले जी त्यांची खाजगी बाब होती पण तिला मुद्दामहून इतकी प्रसिद्धी दिलेली दिसते.
मुळात संभाषण रेकॉर्ड कोणी केल हे हि महत्वाच आहे कारण रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला फोन सुरु होतानाच माहिती होत कि यातून काहीतरी "ज्वलंत" कंटेंट मिळणार आहे. यावरून उद्देश स्पष्ट होऊ शकतात.
वागळेंनी पुराव्याशिवाय आरोप केले असतील तर त्यांच्यावर कारवाही होणे शक्य आहे आणि योग्यही.

पण इथे कोणीही त्या जोशी नामक व्यक्तीविषयी अक्षरही काढले नाही याचे आश्चर्य वाटले.
एखाद्याला मुद्दामहून तोपर्यंत डिवचत राहायचे जोपर्यंत तो चिडत नाही आणि संयम सुटून बरळत नाही हि युक्ती बरेच लोक वापरतात. ते जुने आप वाले योगेंद्र यादव हि तसेच! इथे हि असेच काहीतरी केलेले दिसते. रात्री एखाद्याला निनावी संदेश पाठवणे अयोग्य नाही का?
वरती लेखामध्ये दिलेल्या लिंकवर "motivational SMS " पाठवला असे म्हटलंय! :D
हे म्हणजे सरळ सरळ "आपला तो बाब्या… " असे झाले.

बाकी कायद्यानुसार कारवाही व्हावीच पण कोणी स्वतःहून धर्म बदलणार असेल तर ती त्याची खाजगी बाब आहे त्याची इतकी प्रसिद्धी कशासाठी?

आणि एक प्रश्न, भटजी म्हणणे खरोखर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली येते का?(माहितीकरिता विचारला आहे, जाणकारांनी सांगावे)

dadadarekar's picture

28 Jun 2015 - 3:39 pm | dadadarekar

कुणी धर्म बदलला आणि नव्या धर्माबद्दल अभिमान बाळगला की जुन्या धर्माचे लोक का चवताळतात हे समजत नाही.. आपल्या कोरसमधून एकजण कमी होतोय , याची भीती वाटुन ते बेताल होतात का ?

होबासराव's picture

29 Jun 2015 - 1:43 pm | होबासराव

केम छो हितेसभाय....

फुलथ्रॉटल जिनियस's picture

28 Jun 2015 - 3:04 pm | फुलथ्रॉटल जिनियस

वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.>>>>>अनिरुद्ध जोशी ही सुद्धा व्यक्ति नसुन प्रव्रुत्ती आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2015 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

ज्जे ब्बात! :-D अता शंभर धावा नक्की! ;-)
पांडूsssss , ये रे!!! :-D

शून्य's picture

28 Jun 2015 - 4:23 pm | शून्य

Midlife crisis मध्ये आहे ओ तो. फार मनावर घेउ नका त्याचं

वॉल्टर व्हाईट's picture

28 Jun 2015 - 6:56 pm | वॉल्टर व्हाईट

पर्फेक्ट. एका शब्दात बोळवण !

ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे की वागळे हे हातात असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करायला फार वेळ घेणार नाही. जो माणूस बाहेर निर्भीड निरपेक्ष पत्रकार म्हणून ओळखला जातो तो प्रत्येक्षात अश्या कोत्या, हिणकस मनोवृत्त्तीचा आहे हे कळून येते. फुले, आंबेडकर ह्यांचे आदर्श समोर ठेवतात मग जातीवाचक संबोधने का वापरतात ? ह्यालाच " माज" ह्यापलीकडे काहीही म्हणू शकत नाही. जर अशा प्रकारचा आक्रस्ताळेपणा वागळे जर करत असतील म्हणूनच त्यांना एका मोठ्या वाहिनीने ह्यांना नारळ दिला आहे.

..

कोंकणी माणूस's picture

29 Jun 2015 - 3:21 pm | कोंकणी माणूस

शिव्या घाला, थोबाडीत मारा काही पण करा बस माझा TRP वाढला पाहिजे - इति .वागळे

अविनाश पांढरकर's picture

29 Jun 2015 - 4:06 pm | अविनाश पांढरकर

दोन हाणा पण सरपन्च म्हणा!!!!

बॅटमॅन's picture

29 Jun 2015 - 3:29 pm | बॅटमॅन

दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल जीनियस- नव्या अवतारासाठी शुभेच्छा.

लगेच ओळखायला येतात कि नाहि :)

बॅटमॅन's picture

29 Jun 2015 - 3:41 pm | बॅटमॅन

अगदी अगदी...

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 4:31 pm | संदीप डांगे

सदस्यांनी सुविधेसाठी रेकर आणि फुजी असे लघूरुप वापरावे.

(कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे)

कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे

हा पण चांगला आयडी आहे तसा..

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 4:50 pm | संदीप डांगे

हे हे, बुक करून ठीवतो आताच... :-)

नाखु's picture

29 Jun 2015 - 5:10 pm | नाखु

दुरुस्ती

कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे ऐवजी कुठे कुठे बोधु तुला, तुझे (आय डी) अनंत देव (सुद्धा) हारे !

संदीप डांगे's picture

29 Jun 2015 - 5:42 pm | संदीप डांगे

येक नंबर, आपल्याला हे जमलंच नसतं.

म्हणून इतं आणून चिकटवलं आणि बघा खास ना'खु टच मिळाला की नै..

dadadarekar's picture

29 Jun 2015 - 5:48 pm | dadadarekar

अहो रूपम् अहो ध्वनिम् !

पैसा's picture

29 Jun 2015 - 5:53 pm | पैसा

"अहो रूपम् अहो ध्वनि:" असं आहे ते.

dadadarekar's picture

29 Jun 2015 - 5:54 pm | dadadarekar

बरोबर

अर्धवटराव's picture

29 Jun 2015 - 9:03 pm | अर्धवटराव

वागळे किंवा तत्सम मंडळी असली नाटकं करतात त्याचं काहि वाटत नाहि.... ते खपतं याचं दु:ख वाटतं

dadadarekar's picture

29 Jun 2015 - 10:46 pm | dadadarekar

रेकॉर्डिंग कुणी केले ? वागळेनी की जोशीनी ?

अर्धवटराव's picture

29 Jun 2015 - 11:19 pm | अर्धवटराव

.

dadadarekar's picture

29 Jun 2015 - 11:23 pm | dadadarekar

बोलल्ले ते वागळे आणि अनिरुद्ध जोशी ना ?

हा निखिल जोशी कुठून मधे आला ?

अर्धवटराव's picture

29 Jun 2015 - 11:28 pm | अर्धवटराव

आपल्यासारख्यांना याची फोड करुन सांगावी लागु नये दादा.

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 5:36 am | dadadarekar

दोन माणसे फोनवर बोलत असताना तिसर्‍याने कसे काय रेकॉर्डिंग केले. ? तॉ जोशी या जोशीला सामील होता म्हणजे फोन रेकॉर्ड होतोय हे बोलणार्‍या जोशीला ठाउक होते. वागळेला फोन रेकॉर्ड होतोय हे ठाउक नव्हते.

अर्धवटराव's picture

30 Jun 2015 - 8:20 am | अर्धवटराव

वागळे साहेब जर घटीत-अघटीत गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे कधिही-कुठेही ऐकु शकतात तर निखील जोशीने रेकॉर्डींग केल्यास आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात??

पैसा's picture

30 Jun 2015 - 9:48 am | पैसा

स्वतःला शोध पत्रकार म्हणवणार्‍या माणसाला आपला कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो हे समजत नसेल का?

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 9:56 am | dadadarekar

जोशीने आधी निनावी मेसेज करुन वागळेला इरिटेट केला.

नंतर कॉल केला.

आता त्या संवादात वागळे जहाल शब्दात बोलणार हे नक्कीच होते.

चतुरपणे जोशीने त्यामुळे हा कॉल रेकॉर्ड केला.

वागळेने ' कावा ' असा उल्लेख केला आहे, तो असाच तर असतो ना ?

पैसा's picture

30 Jun 2015 - 9:58 am | पैसा

शोध पत्रकारिता म्हटल्यावर हे चालतच ना? परवा अर्णवकडे ललित मोदीच्या संबंधित ईमेल्स कशा पोचल्या हेच लोक विचारत होते ना!

dadadarekar's picture

30 Jun 2015 - 10:02 am | dadadarekar

मिपावरदेखील काही कावेबाज लोक जिनियस माणसाना डिवचत बसले आहेत.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 10:26 am | मुक्त विहारि

मिपावरदेखील काही कावेबाज लोक ====> कोण?

जिनियस माणसाना ====> कुठल्या?

डिवचत बसले आहेत =====> कशावरून?

पाटीलअमित's picture

14 Aug 2015 - 3:57 am | पाटीलअमित

मला हो
माझे सगळे धागे बघा

काळा पहाड's picture

30 Jun 2015 - 1:09 pm | काळा पहाड

जोशीने आधी निनावी मेसेज करुन वागळेला इरिटेट केला.

गेट वेल सून या एसएमएस मध्ये इरिटेट होण्यासारखं काय आहे?

आता त्या संवादात वागळे जहाल शब्दात बोलणार हे नक्कीच होते.
चतुरपणे जोशीने त्यामुळे हा कॉल रेकॉर्ड केला.
वागळेने ' कावा ' असा उल्लेख केला आहे, तो असाच तर असतो ना ?

तसं असेल तर वागळे ज्या जमातीला रिप्रेझेंट करतोय त्यांचा 'गुढघ्यात' असा उल्लेख केला तर चालेल ना? की हे वाक्य टाकून मी तुम्हाला 'इरिटेट' केलं? लै इरिटेट होणारे लोक ब्वा तुम्ही. गेट वेल सून, दादा.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 1:26 pm | मुक्त विहारि

नाही हो....

ते तसे नाहीत.

ते फार ज्ञानी आणि उदारमतवादी आहेत.

ते फक्त त्यांचे ज्ञान आपल्याजवळच ठेवतात, असे वाटते.

शंका विचारल्या तर त्यांच्याकडे उत्तरे असतात.पण ते देत नाहीत.दादा, असें ज्ञान झाकून कसे चालेल?

पुर्वी एक गहन-विचारी होते, ते पण असेच.

हो की नाही हो, दादा.

(दादांचा आणि फुलथ्रॉटल जिनियस, यांचा फॅन) मुवि

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2015 - 10:07 am | प्रकाश घाटपांडे

आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग होतय हे वागळेंना माहित नसावं. पण रेकॉर्डिंग करणार्‍या जोशींना ते पक्क माहित होत. त्यामुळे अगोदरच उचकलेल्या वागळेंना अजून शांतपणे उचकवणे सोप गेल असाव. निखिल वागळे आक्रमक व उचकणारा पत्रकार आहे हे सर्वज्ञात आहे. ते काही संयमी व विवेकी पत्रकार नाहीत. वागळे हे पत्रकारितेतील आदर्श नसले तरी पत्रकारितेला एक वेगळा पैलू देण्यात यशस्वी आहेत.माध्यमदांडग्यांची निर्मिती कशी व का झाली हा वेगळा विषय आहे. वागळे हे शेवटी एक गुणदोषांचे पॅकेज आहे. पुरोगाम्यांना शाहू फुले आंबेडकर घडोघडी लागतात हे तर सर्वश्रुत आहे. सामाजिक राजकारणसाठी शेवटी काहीतरी भांडवल करावे लागते.त्यांना काही शाहू वा फुले वा आंबेडकर काही शंभर टक्के मान्य नसतात. आपल्या सोयी साठी व सोयी पुरते मान्य असतात. पण तसे प्रत्येक संघटना वा पक्षाचे प्रेरणापुरुषां बद्दल असते.काँग्रेसला गांधी आपल्या सोयीपुरते मान्य असतात.

पैसा's picture

30 Jun 2015 - 10:10 am | पैसा

ज्जे बात!

कपिलमुनी's picture

30 Jun 2015 - 1:32 pm | कपिलमुनी

राजकारणी आपापल्या सोयीपुरते महापुरुषांना वापरतात . जसे की सध्या वल्लभभाई पटेल

सतीश कुडतरकर's picture

30 Jun 2015 - 4:38 pm | सतीश कुडतरकर

मुनी +१

हे असं जर शहाण्यासारखे सर्व लिहून मान्य करू लागले तर मराठी संकेतस्थळांचे काय होईल? ;)

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 10:14 am | टवाळ कार्टा

चायला कोणी ती ऑडीयो क्लिप नीट आणि पुर्णपणे ऐकली का?
मी ऐकल्यावर अगदी शेवटच्या २-३ सेकंदाच्या संभाषणावरुन मला ती क्लिप वागळेंच्या मोबाईलवर रेकॉर्ड केल्यासारखी वाटली कारण कॉल संपल्यावरसुध्धा वागळे कोणा तीसर्याशी बोलत होते बहुतेक
जर असे असेल तर ती क्लिप प्रसिध्धीसाठी कायप्पावर कोणी पसरवली ते जगजाहिर आहे

संदीप डांगे's picture

30 Jun 2015 - 10:32 am | संदीप डांगे

तसं वाटत नाही टका, जोशींनी स्वतः फोन कट केलाच नसेल तर रेकॉर्डींग सुरू राहू शकतं. वागळेंनी कानावरून फोन काढून कट करेपर्यंतचे ते २-३ सेकंद असावे. मी फक्त टेक्निकली बोलतोय. खरं खोटं ते दोघंच जाणे.

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 1:02 pm | श्रीगुरुजी

संभाषण कोणी ध्वनिमुद्रीत केले हा मुद्दाच नाहीय्ये. वागळे हा ब्राह्मणद्वेषाने किती पछाडलेला आहे आणि किती उन्मत्त आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय हाच खरा मुद्दा आहे.

चौकटराजा's picture

30 Jun 2015 - 1:03 pm | चौकटराजा

ते मुंबईत एकाच श्टींग झाल ना ते त्यानच केलं आहे असा मला संशय आहे. म्हणजे असं की मुळात व्हिडीओ करायचा. मग ऑडेओ ट्रॅक बदलायचा . दुसर्‍याच्या आवाजातला टाकायचा. श्रेष्टीना जायचा तो मेसेज जाणार . परत चौकशीत असे सिद्ध होणार की लिप मुव्हमेट जमत असले तरी आवाज वेगळा आहे सबब आमदार निर्दोष. प्रक्रण मिटणार.
( या काडीचा या धाग्याशी तसा ठेट सम्बंध काही नाही ..म्हणून क्षमस्व)

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 1:42 pm | मुक्त विहारि

१०० झाले..

पैसा's picture

30 Jun 2015 - 6:20 pm | पैसा

१०० निमित्त काळा पहाड़, दादा दरेकर आणि फुलथ्रोटल जीनियस यांचा सत्कार जेपी भौच्या गटारात जीव दिलेल्या मोबाइल चे भूत आणि १० रुपयाचे छोटा रिचार्ज व्हॉउचर देऊन करण्यात येत आहे.

तसेच श्रीगुरुजी, संदीप डांगे आणि मुवि याना २० रुपयाचे हेडफोन देऊन सत्कार करण्यात येत आहे.

अस्वस्थामा's picture

30 Jun 2015 - 6:58 pm | अस्वस्थामा

पैसा तै.. यु टू ?? :O

काळा पहाड's picture

30 Jun 2015 - 7:04 pm | काळा पहाड

पैसा तै जेपीच्या डूआयडी असाव्यात का?

खटपट्या's picture

30 Jun 2015 - 7:19 pm | खटपट्या

काहीही हां का(ळा) !!

अस्वस्थामा's picture

1 Jul 2015 - 2:42 pm | अस्वस्थामा

पैसा तै जेपीच्या डूआयडी असाव्यात का?

;)
बादवे, माई दिसल्या नैत बरेच दिवस. गेल्या काय त्या पण.. ;)

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 8:02 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

संदीप डांगे's picture

30 Jun 2015 - 8:04 pm | संदीप डांगे

ओ ताई, मी तर कय्च दंगा केला नायी,
फिर्भि मेरा नाम इदर कैसे क्या आयी?

-(कानफाट्या)

पैसा's picture

30 Jun 2015 - 8:17 pm | पैसा

तुम्ही तिकडे होतात काय, मग जेम्स लेन चे पुस्तक चांदोबा, बालभारती, सचित्र उजळणी काय हवे ते घ्या.

संदीप डांगे's picture

30 Jun 2015 - 9:18 pm | संदीप डांगे

आम्हाला इयत्ता चवथीचं पुस्तक पाहिजे. सगळा म्हाराष्ट त्या पुस्तकावरच थांबलाय अजून...

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2015 - 8:18 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद पैसाताई! कृपया रेकाँर्डिंगची सोय असलेला हेडफोन द्या.

कशाला?

आपण आपले रेकॉर्ड केलेलेच ऐकू.

रेकॉर्डिंग कुणी का करेनात?

अर्धवटराव's picture

30 Jun 2015 - 10:28 pm | अर्धवटराव

शेपुट नसणारी माणसं जर नको तसं पुच्छनृत्य करत असतील तर हेडलेस माणसाने हेडफोन का मागु नये?

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2015 - 2:46 pm | श्रीगुरुजी

आता यापुढे मी-मराठी या वाहिनीवरील कोणतेही कार्यक्रम बघायचे नाहीत असं निदान मी माझ्यापुरतं तरी ठरविलेलं आहे. मी न बघितल्यामुळे वाहिनीला कणभरही फरक पडणार नसला तरी हरकत नाही.

या वाहिनीशी संपर्क करून वागळेविरूद्ध तक्रार करण्यासाठी या वाहिनेच्या संकेतस्थळाचा किंवा ई-मेल पत्ता कोणाकडे आहे का?

तक्रार करण्यासाठी
http://www.ibfindia.com/complaint-form

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2015 - 2:55 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद!

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2015 - 12:57 pm | श्रीगुरुजी

एबीपी माझाच्या मराठी वाहिनीवरून प्रति-वागळे प्रसन्न जोशीची हकालपट्टी झाली की काय? बर्‍याच दिवसात चर्चासत्रात तो दिसला नाही म्हणून विचारतोय.

श्रीगुरुजी's picture

12 Aug 2015 - 10:53 pm | श्रीगुरुजी

प्रसन्न जोशी आता "जय महाराष्ट्र" या वाहिनीवर दिसतोय. ही वाहिनी एबीपी-माझाच्या तुलनेत कमी प्रेक्षकवर्ग असलेली असावी. तसे असेल तर प्रसन्नाची एबीपी-माझा वरून हकालपट्टी होऊन पदावनती झाली आहे असे म्हणता येईल.

वॉल्टर व्हाईट's picture

12 Aug 2015 - 11:29 pm | वॉल्टर व्हाईट

बेरक्याच्या मते प्रसन्न जोशी स्वता:हून सोडुन गेलेत. बाकी वागळे स्वता:चे नवे चेनेल सुरु करत आहेत, त्याचे नाव महाराष्ट्र १ असे ठेवणार आहेत. त्याही पुढे जाउन अंबांनिंचे आयबीन आता लोकमत बरोबरची पार्टनरशिप मोडीत काढणार असे दिसतेय.

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 12:07 am | संदीप डांगे

बेरक्याचं सोडा हो. खुद्द प्रसन्न जोशींनी सांगितलं की मी स्वतः सोडून गेलो तरी काही लोक आपल्या मतावर कायम असतील... ;-) (अगदी प्रसन्न जोशींनी रागारागाने आपला राजीनामा बॉसच्या टेबलावर आपटतांनाचे सीसीटीवी फुटेज मिळाले तरी असली लोकं म्हणतील की हे चित्रण त्यासंबंधीचे नसून 'प्रसन्न जोशीला मिळालेल्या मेमो बद्दल तो वैतागल्याचे' आहे.)

श्रीगुरुजी's picture

13 Aug 2015 - 10:56 pm | श्रीगुरुजी

वॉल्टर व्हाईट,

हा बेरक्या म्हणजे नक्की कोणती व्यक्ती आहे? त्याच्या फेबु प्रोफाईलवरून नाव समजले नाही

वागळे स्वतःचे चॅनेल सुरू करीत आहे हे वाचून मजा वाटली. त्याच्या चॅनेलवर आता दिवसरात्र चर्चा, आजचा प्रश्न आणि एसेमेस पोल असेल. चर्चेत दस्तुरखुद्द वागळे, केतकर, प्रसन्न जोशी आणि आव्हाड हे एकत्रित असायला हवेत.

कपिलमुनी's picture

13 Aug 2015 - 4:31 pm | कपिलमुनी

हकालपट्टी ,पदावनती
पुरेशी माहिती नसताना फेकुगिरी चालू आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Sep 2015 - 11:44 pm | श्रीगुरुजी

राजदीप सरदेसाई म्हणजे साधारणपणे निखिल वागळेचीच सौम्य आवृत्ती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना जाहीर पत्र लिहिले होते. त्याला फडणविसांनी खालील उत्तर दिले.

http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=7987140
__________________________________________________________

देवेन्द्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

प्रिय राजदीप (सरदेसाई),

सहसा मी ज्येष्ठ पत्रकारांनी लिहिलेल्या प्रत्येक खुल्या पत्राला उत्तर देत नाही. पण तुमचे पत्र वाचल्यावर विचार केला की उत्तर देणे जर टाळले तर गोबेल्सनीती प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. तुमचा पत्रप्रपंच म्हणजे माध्यम क्षेत्रातील एका कंपूने नीट माहिती न घेता स्वत: ठरविलेला अजेंडा राबविण्यासाठी सरकारला कसे ेझोडपून काढावे, याचा उत्तम नमुना वाटतो. स्पष्टच सांगायचं तर सध्या तरी राज्य सरकारच्या कामाकडे उपहासात्मक वृत्तीने किंवा गैरविश्वासाने पाहण्यासाठी काही वाव राहिलेला नाही. कारण आमचे सरकार सामान्य माणसाशी निगडीत अशाच विषयांवर लक्ष केंद्रीत करून आवश्यक त्या प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहे.

आपल्या तीन शेलक्या मुद्यातील पहिला मुद्दा मांसाहार बंदीचा. माझ्या सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही वा एकही नवीन आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेला नाही. सन २००४मध्ये तेव्हाच्या काँग्रेस सरकारने पर्युषण पर्व काळातील दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता व पुढे मीरा भाईंदरसह अन्य महापालिकांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याशिवाय मुंबई आणि मीराभार्इंदर महापालिकांनी त्यांच्या स्तरावर काही ठराव केले व बंदीचा कालावधी त्यांच्या अधिकारात वाढविला. मुंबईबाबत असा निर्णय १९९४पासून अंमलात आणला जात आहे. आश्चर्य म्हणजे आम्ही सत्तेवर येण्याआधी तुमच्यापैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नव्हता. म्हणजे यापूर्वीच्या सरकारची प्रतिमा कितीही ढोंगी-धर्मनिरपेक्ष, भ्रष्ट आणि अकार्यक्षम असली तरी तुम्ही त्याबाबत आश्वस्त होता.

श्री. राकेश मारिया यांच्या प्रकरणात तुम्हीच गोंधळून गेलेले दिसता. पत्राच्या शेवटी तुम्ही लिहिता की चटपटीत बातम्यांमागे असलेली माध्यमेदेखील तितकीच दोषी आहेत. त्यांना बरबटलेल्या खुनाच्या प्रकरणामध्ये अधिक स्वारस्य होते आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंदही घेतली जात नव्हती. मग मला सांगा, तुम्ही या खून प्रकरणाचा उल्लेख करून त्याचा संबंध मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीशी का लावता? एखादा पोलीस प्रमुख हा तपासी अधिकारी असत नाही, तर तो फक्त नियंत्रकाच्या भूमिकेत असतो. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बढतीच्या नियत दिनांकाच्या आधी उच्च पदावर नेमणे हेही काही नवे नाही.

सप्टेंबर आणि आॅक्टोबर हे महिने विविध सणांचे आहेत. या काळात मध्येच एखादी नियुक्ती करण्यापेक्षा सण सुरू होण्याआधीच नवीन अधिकारी आला तर त्याला नियोजनास पुरेसा अवधी मिळतो व काही योजना आखता येतात. त्यात काही चूक आहे का? आणि एवढा गहजब करण्याचे कारण काय? अधिकाऱ्यांना जात आणि धर्म नसतो असे मी मानतो. तरीही मारिया यांना पोलीस आयुक्त करताना जावेद अहमद या अल्पसंख्यांक समुदायातील आणि विजय कांबळे या मागास प्रवर्गातील अधिकाऱ्यांना का डावलले गेले, अशीही टीका केली जाऊ शकली असती. तरीही मी असे ेमानतो की त्यावेळी मारिया यांना नियुक्त करताना ते या पदाला अधिक योग्य असल्याचे तत्कालीन सरकारला वाटले असावे.

तुमचा राजद्रोह या विषयावरील लिहिण्याचा रोखसुद्धा योग्य अभ्यास आणि माहितीअभावी अत्यंत तर्कहीन वाटतो. शासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या इर्षेपोटी एखादी व्यक्ती किती टोकाची पक्षपाती मानसिकता बाळगू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मी याबाबत एकच प्रश्न विचारतो, मा. उच्च न्यायालयाने दिलेला एखादा आदेश पोलिसांना कळवावा की नाही? आमच्या सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. एका प्रकरणात याआधीच्या सरकारने मा.उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर मा.उच्च न्यायालयाने एका सविस्तर निकालपत्राद्वारे राजद्रोह या विषयावर आरोप कधी व केव्हा लावले जाऊ शकतात याबाबत सविस्तर विवेचन केले आणि ते सर्व पोलिसांना कळविण्याचे निदेशही दिले. सदर निकालपत्राचे संबंधित विभागाने केवळ मराठीत भाषांतर केले आणि सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना एका शासकीय परिपत्रकाद्वारे ते कळविले. तुम्ही जर ते काळजीपूर्वक नजरेखालून घातले तर त्यात हेही नमूद केल्याचे दिसून येईल की, ‘केवळ न्यायालयीन निकालपत्रावर अवलंबून राहू नये, कारण प्रत्येक प्रकरण वेगळे असते, त्यामुळे राजद्रोहाचे आरोप लावण्याआधी कायदेशीर सल्ला स्वतंत्रपणे घेण्यात यावा’. श्रीयुत सरदेसाई, आपण कार्यालयीन परिपत्रक आणि शासन निर्णय यातील फरक समजून घेण्यास इच्छुक दिसत नाही. कारण आपल्याला आपला डावा अजेंडा अत्यंत जोमाने व त्वेषाने पुढे न्यावयाचा आहे.

आता जलसंधारण विषयाबाबत. राज्याला दुष्काळमुक्त करू शकणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेबाबत आमच्या सरकारने घेतलेल्या पुढाकाराबाबत उल्लेख करताना आपल्याला किती दु:ख होते आहे, हे दिसूनच येते. हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला आहे. राज्यातील जनतेने अतिशय उदारपणे ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम यासाठी सढळ हस्ते दिली आहे. त्यामुळे सहा हजार गावांमध्ये जवळपास एक लाख कामे केवळ सहा महिन्यात पूर्ण करू शकलो. थोड्याशा पावसानेसुद्धा गावांना पाण्याचे विकेंद्रित साठे उपलब्ध झाले आहेत व पाण्याची पातळीसुद्धा वाढली आहे. हा एक कलाटणी देणारा प्रयोग असल्याची पावती दस्तुरखुद्द भारताचे जलपुरुष म्हणून गौरविले जाणारे राजेंद्रसिंहजी यांनी स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय जलपरिषदेत दिली आहे. या कार्यक्र मामुळे जमिनीतला ओलावा वाढणार असून बदलत्या वातावरणातही पिके जगण्याचे प्रमाण वाढणार आहे.

आपल्या ताटात दोन दिवस मांसाहारी पदार्थ असणार नाहीत, या कल्पनेनेच आपल्यासारखे लोक अस्वस्थ होतात तर दुसऱ्या बाजूला आपल्या अन्नदाता शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणामुळे जगण्याची भ्रांत आहे. वाईट खरे याचेच वाटते. पण मला आपल्या ताटापेक्षा त्या शेतकऱ्याच्या ताटात काय असेल याची अधिक चिंता आहे. म्हणूनच राज्य सरकारने ६०लाख शेतकऱ्यांसासाठी दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वितरीत करणारी अन्नसुरक्षा योजना आणली आहे. गेल्या १५वर्षांचा कुशासनाचा आणि शेतकरी आत्महत्त्यांचा वारसा हे आमच्यापुढचे खरे आव्हान आहे. पण आमच्या सरकारने हाती घेतलेले काही उपक्रम नक्कीच चांगले निकाल देतील याची मला खात्री आहे. जर तुम्हाला यात रस असेल तर जरूर या आणि पाहा. वातानुकुलीत दालनात बसणाऱ्यांचे अजेंडे शेतकऱ्यांची चिंता सोडून अन्य काही असू शकतात. श्रीमान सरदेसाई तुमच्या पत्रातील तपशील हा तुमच्या व्यावसायिक बांधिलकीचाही भाग असू शकतो पण माझे उत्तर हे मी हाती घेतलेल्या अभियानाचा भाग आहे आणि मी ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कार्य करा अथवा संपून जा, हा माझ्या जीवनाचा मंत्र आहे आणि येता काळच माझे नशीब ठरवेल.

कोणत्याही द्वेषभावनेशिवाय

आपला नम्र,

देवेंद्र फडणवीस

पर्युषण काळातील मांसविक्री बंदी आणि राजद्रोहविषयीचे परिपत्रक, ह्या दोन्ही मुद्द्यांना मुंबई उच्च न्यायालयाने परस्पर उत्तर दिले आहे.

ह्या दोन्ही बाबतीत सरकार सपशेल तोंडघशी पडले आहे.

दिवाकर कुलकर्णी's picture

24 Sep 2015 - 12:14 am | दिवाकर कुलकर्णी

भाषा सॉलिड,उत्तर मुद्देसूद,सरदेसाईना चांगली चपराक

जयन्त बा शिम्पि's picture

24 Sep 2015 - 6:46 am | जयन्त बा शिम्पि

दूध का दूध और पानी का पानी कर दिया , देसाई को उसकी जगह बता दी , मुख्यमंत्रीजी , ये आपने बहुत अच्छा कर दिया.
वाह , आपका जबाब नही. ऐसेही आगे बढते रहो, हम आपके साथ है !

मोदक's picture

21 Jul 2017 - 6:34 pm | मोदक
श्रीगुरुजी's picture

22 Jul 2017 - 2:52 pm | श्रीगुरुजी

आयबीएन लोकमत, मी मराठी, टीव्ही ९ असा वागळेंचा आजवरचा प्रवास झाला आही. आता त्यांची टीव्ही ९ वरील इनिंग सुद्धा संपली आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Jul 2017 - 6:58 pm | हतोळकरांचा प्रसाद

महाराष्ट्र १ राहिलं!

शब्दबम्बाळ's picture

22 Jul 2017 - 8:05 pm | शब्दबम्बाळ

या लिंक वर त्यांचे भाषण ऐकू शकता! चांगले आहे.
उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही!

एका वर्षाचा करार झाला झाला असताना अचानक एक दिवस कार्यक्रमाचे प्रसारण कसे थांबवले गेले? एक महिना आधी नोटीस देणे अपेक्षित होते असे म्हटले आहे. काही तरी गडबड आहेच!
Nikhil Wagle Quits TV9 After TV Show is Dropped Due to ‘Political Pressure’

उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही!

आजकाल..? नक्की का..?

शब्दबम्बाळ's picture

22 Jul 2017 - 8:15 pm | शब्दबम्बाळ

आलात? या!
तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो?
भाजप सोडून बाकी पक्ष सुद्धा आहेत हो नका इतकं लावून घेऊ मनाला...
पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...
असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा!
बाकी "जमल्यास" ती लिंक किंवा बातमी पहा..

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2017 - 8:35 pm | श्रीगुरुजी

पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...

(१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते.

(२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते.

अमितदादा's picture

22 Jul 2017 - 10:27 pm | अमितदादा

(१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते.

मनमोहन सिंग यांना फारसे भक्त नव्हते, समर्थक पूर्वी हि होते आणि आताही आहेत, दुर्दैवाने किंवा सुदैवाने त्यांचे समर्थक हि त्यांच्यासारखेच मितभाषी आहे. . UPA -१ चा चांगल्या कामगिरीनंतर त्यात वाढ झाली मात्र UPA -२ चा निराशाजनक कामगिरीनंतर त्यात घट झाली हे मान्य.

(२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते

मनमोहन सिंगांवर यांचावर गांधी घराण्यावरून आणि त्यांचा कार्यकीर्दीत झालेल्या भ्रष्टाचारावरून जी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते हे मान्य. बाकी त्यांची पूर्ण कार्यकिर्द कोणताही चष्मा न घालता पाहिल्यास अनेक उजळ बाजू दिसून येतील ज्याने ह्या देशास खूप काही दिले.

माझ्याकडे जतन असलेला एक लेख खाली देतो, फक्त माहिती म्हणून वाचा, एक समर्थक किंवा विरोधक म्हणून न्हवे.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/manmohan-singh-o...

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2017 - 10:54 pm | श्रीगुरुजी

मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून चांगले होते. परंतु पंतप्रधान या भूमिकेत त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. म्हणूनच 'पंतप्रधान' मनमोहन सिंग यांच्यावरील टीकेला त्यांचे समर्थक फारसे उत्तर देऊ शकत नव्हते.

मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून चांगले होते. परंतु पंतप्रधान या भूमिकेत त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. म्हणूनच 'पंतप्रधान' मनमोहन सिंग यांच्यावरील टीकेला त्यांचे समर्थक फारसे उत्तर देऊ शकत नव्हते.

याच्याशी अर्धीच सहमती कारण UPA-२ ची निराशाजनक कामगिरी. माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, यासमर्थनाथ माझे मुद्दे मी भविष्यात नक्कीच मांडेन कारण हा धागा त्यासाठी नाही त्यामुळे आत्ता इथेच थांबतो. तुमची मते वेगळी आहेत याची मला कल्पना आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2017 - 12:19 am | श्रीगुरुजी

माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, या

असहमत.

UPA-2 मध्ये उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे UPA-1 मध्येच सुरू झाली होती. मनमोहन सिंगांना ते माहीत होते. परंतु भ्रष्टाचार थांबविण्याऐवजी ते डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ बसले होते. "हिंदू दहशतवादी" या काल्पनिक संकल्पनेलाही याच काळात जन्म दिला गेला. अशी बरीच उदाहरणे आहेत.

अमितदादा's picture

23 Jul 2017 - 12:51 am | अमितदादा

देशातील सर्वात मोठ्या अश्या दूरसंचार घोटाळ्याची सुरुवात UPA -१ चा काळात झाली मान्य, परंतु याची बीजे NDA सरकार ने पेरून ठेवलेली होती. प्रमोद महाजन यांनी reliance ला स्पेक्ट्रम कशे दिले, त्यांना फायदा व्हावा म्हणून पॉलिसी बदल कसे केले हे वाचा जालावर. महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून. आता इथेच मी थोडक्यात मत मांडतो.
UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन.
तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका.

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2017 - 8:32 am | श्रीगुरुजी

महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून.

आरोप करण्यामागे बहुतांशी राजकारण असते. जर न्यायालयात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसतील तर ते आरोप खोटे होते हे मानायला हरकत नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी परदेशातून खूप जास्त किंमत देऊन शवपेट्या आयात करून मोठा भ्रष्टाचार केला होता असा आरोप सोनिया गांधींनी अनेकवेळा केला होता. कारगिल युद्धात शस्त्रसामग्री, सैनिकांसाठी पदवेश इ. च्या खरेदीतही मोठा घोटाळा झाला असे त्या वारंवार जाहिररित्या सांगत होत्या. प्रत्यक्षात २००४ मध्ये संपुआ सरकार सत्तेवर आल्यानंतर घोटाळ्याची चौकशी तर सोडाच, जॉर्ज फर्नांडिसांविरूद्ध साधी तक्रारही त्यांनी दाखल केली नाही. संसदेत कोणीतरी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी खरेदीत भ्रष्टाचार नव्हता असे सांगितले होते.

UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन.
तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका.

सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम . . . नक्की काय केलं तत्कालीन सरकारने यासाठी?

काश्मीर मधील निवडणूक . . . यात काय प्लस पॉईंट आहे?

नक्षलवाद . . . तेव्हाही होता आणि आताही आहे.

आंतराष्ट्रीय संबध आणि करार . . . अमेरिकेबरोबर केलेला अणुकरार याव्यतिरिक्त अजून नक्की काय केले?

पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती . . . यावर सविस्तर लिहा.

अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण . . . यात संपुआ सरकारचे योगदान काय?

शेतकरी आणि शेती विकास . . . याविषयी सविस्तर लिहा.

मृत्युन्जय's picture

26 Jul 2017 - 4:48 pm | मृत्युन्जय

२ वाक्यात बाजार उठवलात की गुर्जी. दंडवत स्वीकारा

वैयक्तीक प्रतिसाद दिल्यास वैयक्तीक उत्तर मिळेल.

तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो?

आणखीही बरीच कामे करतो. स्वत:चे मत मांडणे, पंतप्रधानांनी / मुख्यमंत्र्यांनी चुकीची पाऊले उचलली तर त्यावर प्रतिक्रिया नोंदवणे, वेळप्रसंगी निषेध नोंदवणे, भाजपाच्या चुकीच्या निर्णयांचे समर्थन करणार्‍या मिपासदस्यांना विरोध करणे वगैरे वगैरे.
तुमच्यासारख्या वैयक्तीक प्रतिसाद देणार्‍यांचे बुरखे टरकवायची पण कामे करतो.

पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...

म्हणजे एकतर त्यांचे फारसे समर्थक नव्हते किंवा काँग्रेस समर्थक मॅडम आणि पप्पूच्या हुकुमावरून शांत राहिले असावेत - असाच अर्थ होतो ना..?

असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा!

लॉजिकल बोललात तर उपयोग होईल. वैयक्तीक गरळ ओकायची असेल तर उपयोग होणार नाही.

मृत्युन्जय's picture

26 Jul 2017 - 4:50 pm | मृत्युन्जय

पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...

नुसते ममो म्हटले तरी सामुदायिक ओकार्‍या काढणारी पिल्लावळ देखील नाहि दिसायची की त्यावेळेस. आठवायचे तर सगळे आठवावे

मृत्युन्जय's picture

26 Jul 2017 - 4:47 pm | मृत्युन्जय

विनोद काप्री या माजी पत्रकाराने वागळ्यांची चांगली खोलली आहे. खाली उतारे देत आहे. ते वाचुन तुमच्या सगळ्या शंका मिटल्तील अशी आशा आहे:

मोदी के नाम पर शहीद बनने वालों .....

कुछ मित्रों को मेरी इस पोस्ट पर आपत्ति हो सकती है पर नरेंद्र मोदी के विरोध के नाम पर कैसे कैसे खेल हो रहे हैं और कैसे लोग खुद को ज़बरन शहीद बनाने की कोशिश कर रहे हैं - ये सामने लाने के लिए इस पोस्ट को लिखना बहुत ज़रूरी है।
ताज़ा मिसाल है निखिल वागले की TV 9 मराठी से विदाई की।वागले जी का मैं तब से प्रशंसक हूँ , जब मैं पत्रकारिता में आया भी नहीं था। 90 का दशक रहा होगा। मैं कॉलेज में था और इसी दौरान निखिल वागले और उनके अखबार पर शिवसेना के गुंडों ने हमला किया था।लेकिन वागले डरे नहीं। तब से मै वागले को एक निडर और निष्पक्ष पत्रकार समझता रहा। लेकिन मेरा ये भ्रम अब जाकर टूटा है तकरीबन 25-26 साल के बाद।
मैं सबकुछ बर्दाश्त कर सकता हूँ। पर कोरे झूठ के नाम पर सहानुभूति बटोरने को सहन नहीं किया जा सकता। आप सब जानते होंगे कि वागले की हाल ही में TV9 मराठी से विदाई हुई है और इस विदाई को उन्होने जिस तरह से बीजेपी और मोदी से जोड़कर प्रचारित किया , वो हैरान तो करता ही है , साथ ही अंदर तक दुख पहुँचाता है जब आप अपने ही एक हीरों और आदर्श को अपनी आँखों के सामने धराशायी होते देखते हैं।
सच ये है कि वागले की TV9 मराठी से विदाई और उसमें मोदी- बीजेपी की भूमिका की वागले जी की फैलाई कहानी ना सिर्फ पूरी तरह झूठी है बल्कि मनगढ़ंत भी है। ये सब मैं इतने दावे से इसलिए कर रहा हूँ कि मुझे ना केवल सबकुछ पता है , बल्कि इसमें मेरी पूरी भूमिका भी है। तो सच कुछ यों है।
मेरा एक 21 साल पुराना दोस्त है रविप्रकाश, जो कि TV9 group का CEO भी है और promoter भी। मई के महीने में रवि ने मुझसे कहा कि यार विनोद तुम मुंबई आते जाते रहते हो , ज़रा कुछ वक्त निकाल कर टीवी 9 मराठी की टीम से मिल लो और देख लो कि चैनल में क्या दिक़्क़त है। सात आठ साल हो गए - कुछ बात बन नहीं रही। रवि पुराना दोस्त है , मेहनती है , जुझारू है -तो मना नहीं कर पाया । सोचा कि फिल्म के काम के दौरान जब समय मिलेगा तो जाऊँगा। इसी दौरान जून में धाकड़ रिपोर्टर रहे उमेश कुमावत ने बतौर मैनेजिंग एडिटर join कर लिया। उमेश से मैने पूरे चैनल की FPC ( fixed Programing chart ) और पिछले तीन चार हफ़्तों की रेटिंग माँगी।
रेटिंग का अध्ययन करके पता चला कि चैनल लगातार चार नंबर पर है , तकरीबन हर शो की रेटिंग खराब है और सबसे बुरा हाल है निखिल वागले के शो Sade Tod का। मैंने टीम के साथ बैठकर नई FPC को तैयार किया और सुझाव दिया कि वागले के शो को रात नौ से दस बजे के बजाय आप शाम पाँच से छह बजे करो। और नई FPC 21 जून से लागू करो।
21 जून से नई FPC लागू हो गई और दो ही हफ़्ते में चैनल नंबर चार से नंबर तीन पर आ गया।FPC में सिर्फ एक ही बदलाव नहीं हो पाया और वो था निखिल वागले का शो। वागले जी ने 19 जून को उमेश से कहा कि उन्हें एक महीने का और वक्त दिया जाए , वो शो को और बेहतर और आक्रामक बना रहे है। वागले जी का सम्मान करते हुए उन्हें एक महीने का और समय दिया गया। पर सुधार के बजाय रेटिंग और गिरती रही। इतना बुरा हाल कि आखिरी के आठ हफ़्तों में पाँच हफ़्ते तो वागले जी का शो Top 100 में भी नहीं आ पाया ( pls check BARC ratings Marathi News Channels week 19- week 28) ।
इसके बावजूद उमेश ने ठीक एक महीने बाद 19 July को उनसे फिर प्यार से कहा कि अब आपके शो की टाइमिंग बदलनी ही होगी लेकिन वागले जी ने फ़रमान सुना दिया कि मैं शो करूँगा तो सिर्फ रात के नौ बजे, वर्ना नहीं करूँगा और अगले दिन हम क्या देखते हैं कि वागले जी Twitter में कूद पड़े कि : " देखिए मेरे साथ क्या नाइंसाफ़ी हो गई , TV 9 ने अचानक मेरा शो बंद कर दिया..मेरे शो को सेंसर कर दिया गया "
और फिर देखते ही देखते तमाम "liberal और Secular" पत्रकारों की पूरी बटालियन Twitter में मोर्चा लेकर खड़ी हो गई कि देखिए बीजेपी और मोदी ने एक और निष्पक्ष और निडर आवाज़ को चुप करा दिया। कुछ English websites में ख़बरें भी छपने लगीं और इन सबके बीच आदरणीय वागले जी सच जानते हुए भी बहुत भोले बनकर
"आपके सहयोग के लिए धन्यवाद "
और " ये जंग जारी रहेगी " "सेंसरशिप से लड़ेंगे " जैसे tweet करते रहे।
दूर से बैठा मैं ये सब देख रहा था और बेहद दुखी था कि कैसे मेरा एक हीरो मेरे ही सामने दम तोड़ रहा है। वागले के शो के बंद होने का दूर दूर तक ना मोदी से वास्ता था और ना बीजेपी से। पर दो दिन में Twitter पर ऐसा माहौल बना दिया गया कि : "मोदी ने एक बार फिर लोकतंत्र की हत्या कर दी। मोदी हर उस आवाज़ को दबा रहे हैं जो मोदी के विरोध में उठती है। "

देखिए बाकी आवाज़ों के बारे में कुछ नहीं कह सकता क्योंकि मैं जानता नहीं पर वागले जी के शो पर मैं पूरे विश्वास और दावे के साथ लिख रहा हूँ और डंके की चोट पर कह रहा हूँ कि शो बंद होने का एकमात्र कारण मैं था और मैं भी इसलिए क्योंकि मेरी जगह कोई भी व्यक्ति बदहाल चल रहे शो को या तो बंद करने का सुझाव देता या टाइमिंग बदलने की बात करता। जो मैंने किया। और मुझे खुलेआम ये मानने में कोई संकोच नहीं है। हो सकता है कि इस पोस्ट के बाद कुछ लोग मुझे कहें कि मैं भी मोदी की गोद में जाकर बैठ गया। कहने वाले कहते रहे , मुझे अपना सच पता है और वो मै लिखता रहूँगा।
अंत में ..
वागले जी , आपने झूठ फैलाकर और झूठ के नाम पर खुद को शहीद बनाकर अच्छा नहीं किया। आपने मेरा एक हीरो मुझ से छीन लिया। Twitter पर मैं आपको 5-6 साल से फ़ॉलो कर रहा हूँ। आपके tweets को आँख बंद करके RT करता रहा , यही सोचकर कि बाल ठाकरे से लड़ने वाला आदमी निडर और निष्पक्ष ही होगा लेकिन अब खुद को प्रासंगिक बनाने के लिए जिस तरह आप झूठ का सहारा ले रहे हैं , वो व्यक्ति मेरा हीरो नहीं हो सकता।
प्लीज़ मोदी के कंधे पर बंदूक़ रखकर खुद पर ही गोली चलाना बंद कीजिए । कुछ दिन के लिए आप शहीद ज़रूर बन जाओगे लेकिन मेरे जैसे आपको चाहने वालों का जब भ्रम टूटेगा तो आपकी बची खुची विश्वसनीयता भी ख़त्म हो जाएगी।
PS
Apologies for tagging.
Feel free to remove tag.
नोट :
इस पोस्ट के साथ कई tweets भी संलग्न हैं और TV 9 मराठी की वो मेल भी संलग्न है , जिसमें वागले जी को बताया गया था कि खराब रेटिंग की वजह से उनके शो की सिर्फ टाइमिंग बदली जा रही है , ना कि शो बंद किया जा रहा है।