कधीतरी काहीतरी

prasadoak7's picture
prasadoak7 in जनातलं, मनातलं
26 Jun 2015 - 9:59 pm

भाग-3

अंधाराच्या आत जेवण बनवायला हव होत. राकेल मिळवायला किती हेलपाटे मारायला लागत होते. मोठ्या कष्टाने एक कॅन मिळत होता. झोपड्यात येणार्‍या स्त्यावरच्या दिव्याचा प्रकाशत ती रोजच सगळ आवरायची. लेकर आल्यातील म्हणून आज घासलेटचा दिवा पेटवला होता. दिव्याचा प्रकाशात आज बरेच दिवसांनी झोपडीत दिवाळी नाचत होती. हातपाय धुवून त्यान कांबळी अंथरली. पोर धावत बापाला बिलगली. हळूच धाकट्या लेकरान बा ची मांडी पटकावली. बापाची हनुवटी इवल्या हातान हलवीत त्यान विचारल बा त्या रेल्वेचा ड्रायव्हर यवढी मोठी लांब गाडी वळवतो कशी ? थोरली लेक जोरात हसायला लागली . बा न डोळ मोठ करीत तीला गप केल. उद्याच्याला शहरात फिरायला जायच त्यान नक्की केल. बागेत जाऊन प्राणी बघायला मिळणार शिवाय भेळ पण मिळणार हे ऐकून लेकरू खुष झाल. शहरातले रस्ते, गाड्या ,गर्दी, पिक्चर मधे दिसतात तसे कपडे घातलेली माणस मोठ्या कौतुकाने ते सगळ पहात होत पोरग.
एवढ्यात तीन आवाज दिला. मटन रस्सा तयार झाला होता. दोन्ही लेकराची ताट आधी भरली. मटन रस्सा वाढून ती गरम भाकरी करून लेकरांना वाढीत होती. त्याना खाताना बघून तीचा ऊर भरून आला होता. मटनाच्या फोडी शोधून शोधून ती त्यांच्या पानात वाढीत होती. पोरांची जेवणं आवरली. दोघही खुशीत रस्त्यावरून जाणाऱ्या गाडय़ा बघण्यासाठी बाहेर गेली. तीन पोरांची ताट उचलून ठेवली. आता एकच थाळी घरात होती. त्यात भाकरी रस्सा व मटनाच्या टोपात शिल्लक असलेल्या दोनच फोडी वाढून नवर्‍यासमोर ठेवल. लेकरांचा बा जेवला की परत थाळी घासून नंतर आपण जेवायच तीनं ठरवल. त्यान आसपास बघीतल. पोर रस्त्यावरची गंमत पहाण्यात दंग होती. हलकेच त्यान तीचा हात धरून आपल्या जवळ बसवल. भाकरीचा तुकडा मोडून तीच्यासमोर केला. आज दहा वर्षे झाली त्यांच्या लग्नाला पण दहा वर्षानी परत आज ती पुन्हा एकदा लाजली नव्या नवरी सारखी. मटनाच्या दोनच फोडी आणी रस्सा दोघांच पोट भरूनही उरलाच होता. १० × १० च्या झोपडीत जणू स्वर्ग अवतरला होता

क्रमशः

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

26 Jun 2015 - 10:50 pm | उगा काहितरीच

खरं तर इथेच संपूर्ण वाटतेय कथा, पण क्रमशः वाचून आनंदच झाला.
कथा आवडली हेवेसांनलगे .

भाग 1 मधील 4 व्यक्ती व आणखीन एक सुत्रधार अशी साधारण मांडणी व कथा विस्तार आहे

सुंदर! डोळ्यांसमोर उभ करताय त्यांच जग!