सफर माद्रिदची........भाग १.

पद्मावति's picture
पद्मावति in भटकंती
24 Jun 2015 - 3:41 am

काहीतरी कारणाने वीकेंड ला जोडुन एका दिवसाची सुट्टी मिळाली होती. तसा थोडाफार ऑफ सीज़न असल्यामुळे विमानांची तिकिटे अगदी डर्ट चीप म्हणतात तशा दरात उपलब्ध होती. मग मॅड्रिडला जायचं का बार्सेलोनाला अशी तूफानी चर्चा घरात सुरू झाली. खरंतर आम्हाला काय दोन्ही बघितले नसल्यामुळे तसा काहीच फरक पडत नव्हता. शेवटी आम्ही हेड्स का टेल्स असा अत्यंत डोकेबाज उपाय वापरून निर्णय घेऊन टाकला. तिकिटे, होटेल बुकिंग वग़ैरे करुन शुक्रवारी रात्री उशिरा मॅड्रिड मधे येउन पोहचलो सुद्धा.

मॅड्रिड चा खरं म्हणजे स्थानिक लोकं माद्रिद असा उच्चार करतात. या शहरात हिंडतांना सर्वात प्रथम आपल्या डोळ्यात भरते ती येथील भव्यता. इथले रस्ते अतिशय प्रशस्त आहेत. रस्त्याच्या कडेला फूटपाथ पण अगदी ऐसपैस. सायकलिंगसाठी वेगळा मार्ग. लोकांना बसायला बेंचेस. त्यामुळे एखाद्या रस्त्याच्या कडेला तिथे बाकावर बसून कॉफी पीत त्या गर्दी, ट्रॅफिक चा जराही त्रास न होता आजूबाजूच्या ऊत्साही, आनंदी वातावरणाची मजा घेता येते.

भलेमोठे चौक....त्या चौकात भव्य देखणे पुतळे, कारंजे. आजूबाजूला इमारती तर नजर हटुच नये अशा. एखाद्या इमारती-कडे नजर जावी आणि तिचं रूप, तोरा बघून वाटावं की आत एखादं म्यूज़ीयम तरी असावं नाहीतरी एखादं महत्वाचं ठिकाण असावं. तर ही इमारत निघावी एखादे अपार्टमेंट. म्हणजे साध्या, टूरिस्ट मॅप वर नसलेल्या इमारती पण अतिदेखण्या.

.

.

या शहरात आणि पॅरिस मधे मला विलक्षण साम्य जाणवलं. तशीच थक्क करून सोडणारी सुंदरता. दोन्ही ठिकाणी उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमूना असलेल्या इमारती. तसेच अतिभव्य राजवाडे. उत्तमोत्तम संग्रहालये, एकापेक्षा एक सुरेख उद्याने, कारंजी, कमानी, विस्तीर्ण प्लाझा, जागोजागी असलेले कॅफेस, बार्स, शॉपिंग.....आणि वेड लागेल असे रंगीबेरंगी सळसळतं वातवरण.

एक मात्र आहे ते म्हणजे पॅरिस ला मिळालेली प्रसिध्हि, ग्लॅमर, नाव, प्रतिष्ठा हे सर्व माद्रिद च्या नशिबी नाही. एकाच घरातले दोन भाऊ असावेत नं. दोघेही हुशार, कर्तबगार आणि देखणे. पण एकाला अपार यश-किर्ती मिळावी आणि एकाला जरा उपेक्षा असा हा प्रकार. थोडक्यात जगाच्या लाडक्या पॅरिस चा हा किंचितसा दोडका भाऊ. युरोपमधील एक अत्यंत सौंदर्यवान आणि राजबिंडं पण अतिशय अंडर-रेटेड शहर.

.
जालावरून साभार

.
जालावरून साभार

.
सुप्रसिद्ध Plaza Mayor
जालावरून साभार

या शहरात फिरण्यासाठी हॉप ऑन हॉप ऑफ बसेस खूप सोयीच्या पडतात. बसच्या वरच्या खुल्या जागेत बसायला जागा मिळाली की आरामात माद्रिद दर्शन करता येते. कुठे उतरायचे असेल तर उतरा. आजूबाजूला जरा चक्कर मारा, फोटो काढा. कुठल्यातरी छानशा जागी बसून टॅॅपा खा, सन्ग्रिया प्या. टापा आणि सॅंग्रिया हे क्लॅसिक कॉंबिनेशन. थंडगार सॅंग्रिया चा तो चटकदार रंगाचा भलमोठा जार नुसता बघुनच जिवाला गारेगार वाटेल. चुर्रोस हा सुद्धा खास स्पॅनिश पदार्थ. थोडाफार आपल्या चीरोट्या सारखा. आपल्यासमोर हे खुसखुशीत गोडसर चुर्रोस गरम गरम येतात. त्यांना चॉकलेट सॉस मधे बुडवून गपागप खा.

..
जालावरून साभार

माद्रिदमधे फिरण्यांच्या महत्वाच्या जागांपैकी एक आहे Temple Of Debod. एकोणिसशे साठ मधे Egypt मधे आस्वान धरण बांधले जात होते. हजारो मंदिरे- देशाचा संस्कृतिक ठेवा पाण्याखाली जाण्याचा धोका होता. अशावेळी युनेसको ने जगाला मदतीची हाक दिली. जगातील स्पेन सकट अनेक देश पुढे सरसावले. या पाण्याखाली जाणार्‍या असंख्य प्राचीन वस्तूंना, मुर्तींना, देवलयांना तेथून हलवून सुरक्षित ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या मदतीसाठी आभाराचे प्रतीक म्हणून इजीप्त सरकारने हे टेंपल ऑफ डेबोद स्पेनला भेट दिले. आज हे देऊळ माद्रिदच्या parque del oeste या सुंदर उद्यानात उभे आहे.

.
जालावरून साभार

इसिस नावाच्या देवतेचे हे मंदिर साधारणपणे दोन अडीच हजार वर्षे जुने आहे. एका लहानशा जलाशयाला लागून याची उभारणी झाली आहे. मुख्य मंदिराच्या समोर दोन कमानी आहेत. आत छोट्या छोट्या खोल्या, दालने आहेत. काही ध्यानधारणे साठी, काही पूजार्यांसाठी. सगळे बांधकाम दगडाचे, एकावर एक शिळा ठेवल्यासारखे.

तेथील भितींवर वेगवेगळे देखावे कोरले आहेत त्यावरून त्यांच्या चालीरितींची, पूजा-अर्चेच्या विधींची थोडीफार कल्पना येते. काही चित्रांमधे तर मला आपल्या आणि प्राचीन इजिप्तीयन संस्कृती मधे थक्क होईल इतके साम्य जाणवले. त्यातील मुख्य भाग म्हणजे मूर्तिपूजा. देवळाच्या आत कोरीव खांब. देवाचे दर्शन घेण्यासाठी सभामंडप आणि मुर्तीचा मुख्य गाभारा. येथे फक्त प्रमुख पूजार्यालाच प्रवेश असे. देवाला वेगवेगळी फळे, अन्नपदार्थाचा नैवेद्य दाखविणे. इतकेच नाही तर आपल्यासारखेच देवाला फुले वाहणे, उद्बत्ति, धूपाने ओवळणे इत्यादी प्रकार सुद्धा.

दिवसभर फिरून पार दमायला झालं होतं. पण डोळ्यात झोप काही येत नव्हती कारण रात्री हॉटेलच्या खिडकीतून बाहेर मंद प्रकाशात उजळून निघालेला रॉयल पॅलेस आम्हाला खुणावत होता. उद्या तिथेच जायचे होते......

क्रमश:

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

24 Jun 2015 - 5:51 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या नजरेतून माद्रिदची सफर घडणार याचा आनंद वाटत आहे. पहिला भाग उत्तम झालाय. तुम्ही काढलेले अन जालावरून घेतलेले दोन्ही फोटोज आवडले.

पुभाप्र.

अगम्य's picture

24 Jun 2015 - 8:07 am | अगम्य

माद्रिद शहर सुंदर आहेच आणि तुमची वर्णन करण्याची शैली सुद्धा छान आहे. माद्रिद की बार्सेलोना असा toss करावा लागला तर मी मात्र शोलेतल्या अमिताभ सारखं दोन्ही बाजूंना बार्सेलोना लिहिलेलं नाणं वापरेन. तुम्हाला जर माद्रिद पारीसशी तुलना करण्यासारखं वाटलं तर तुम्ही बार्सेलोनाच्या तर प्रेमातच पडाल. पुढच्या वेळी toss करत बसू नका आणि आम्हाला बार्सेलोनाच्या वर्णनाची मेजवानी द्या.

पाटील हो's picture

24 Jun 2015 - 8:25 am | पाटील हो

अफाट वर्नन & फोटो

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2015 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

टाळ्याहि !

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2015 - 10:11 am | टवाळ कार्टा

आनी ताल्यासुद्द =))

खेडूत's picture

24 Jun 2015 - 8:31 am | खेडूत

सुंदर!

स्पेनबद्दल खूप ऐकलंय, तिथल्या लोकांबरोबर काम केलंय, पण आता पहायची उत्सुकता लावलीत!

दोन्ही ठिकाणी जाण्यात येईल.

पद्मावति's picture

24 Jun 2015 - 1:19 pm | पद्मावति

श्रीरंग-- धन्यवाद. खरेतर मी या ट्रिप ला खूप फोटो काढले होते. अजूनही टाकले असते. पण या वेळी फोटोस somehow फारच खराब आले. म्हणून या लेखाच्या दोन्ही भागात जास्ती करून जालावरचेच फोटो टाकावे लागत आहेत.

अगम्य-- सहमत....पुढच्या वेळेस टॉस नाहीच बार्सिलोना नक्की करून टाकिन.

पाटील, खेडुत- खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रतिसादांचे.

मोहनराव's picture

24 Jun 2015 - 1:27 pm | मोहनराव

वा चला आता माद्रिद फिरूया.. मी बार्सिलोनाला गेलोय. पण माद्रिद राहिलंय. छान माहिती.

खटपट्या's picture

24 Jun 2015 - 1:48 pm | खटपट्या

खूप छान फोटो आणि माहीती !!

स्वाती दिनेश's picture

24 Jun 2015 - 2:02 pm | स्वाती दिनेश

तुमच्या लेखाने माद्रिदच्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Jun 2015 - 2:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अर्रर... मी बार्सिलोना मधे ९ महिने होतो, पण माद्रिदला जाव का नाही यातच वेळ गेला. तसही आमच्या कंपनीने अत्यंत कद्रूपणा करुन फारच कमी पैसे दिले होते.. असो. राहिले ते राहिले, पण तुमच्या लेखामुळे दुधाची तहान ताकावर... :)

केदार-मिसळपाव's picture

24 Jun 2015 - 2:16 pm | केदार-मिसळपाव

छान लिहिलेय.

सूड's picture

24 Jun 2015 - 2:36 pm | सूड

सुंदर!!

इशा१२३'s picture

24 Jun 2015 - 3:00 pm | इशा१२३

छान माहिति व फोटो .आवडला हा भाग.पुभा प्र.

वर्णन खूप छान आहे रॉयल पॅलेस दर्शनाची प्रतीक्षा करतोय

द-बाहुबली's picture

24 Jun 2015 - 6:38 pm | द-बाहुबली

छान माहीती. देखण्या इमारती आहेत.

केतकी_२०१५'s picture

24 Jun 2015 - 10:45 pm | केतकी_२०१५

खूप सुन्देर लेख. पद्मवति, तुमची लेखन शैली खूप आवडली.
पुभाप्र!

जुइ's picture

25 Jun 2015 - 1:33 am | जुइ

माद्रिदचे प्रवास वर्णन प्रथमच वाचत आहे त्यामुळे कुतूहल वाढले आहे. अतिशय उत्तम माहिती आणि फोटो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

रेवती's picture

25 Jun 2015 - 4:03 am | रेवती

वाचतिये. फोटू आवडले. या बिल्डिंगांच्या आतले वातावरण जरा उदास असेल असे मला का कोणास ठाऊक पण वाटते.

मधुरा देशपांडे's picture

25 Jun 2015 - 4:43 am | मधुरा देशपांडे

वर्णन आवडले.

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 9:28 am | विशाल कुलकर्णी

मस्तच..

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 10:27 am | डॉ सुहास म्हात्रे

वा ! अजून एका सुंदर शहराची सफर !

पुभाप्र.

सानिकास्वप्निल's picture

27 Jun 2015 - 11:59 pm | सानिकास्वप्निल

सफरीची सुर्वात छान झालिये.
वाचतेय