हुरहुर
स्वप्नातली फुले ती, सत्यात कां न दिसली?
मज जाग जरा येता, ती रात कां हरवली?
रात्रीत प्यायले होते, मी अश्रु यक्षीणीचे
विरही व्यथेत ओले, मृदुगंध पापणीचे
येता रवी उदयास, ती आसवेही सुकली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक
कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख
ती उजळताच प्राची, सावली अंतरी धरली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
मज सूर गवसला जो, कोठे हवेत विरला?
ती साद ऐकू ये ना, स्वप्नील भाव सरला
जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो
मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो
अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
स्वप्नामधील सत्य, गवसेल कधी कोणां?
कधी बंद होई वेडा, जागेपणाचा बहाणा?
झोपेत जगूनी नंतर, ती धुंदी कां उडाली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
प्रतिक्रिया
सुंदर कविता.
वारंवार वाचून मजा आली.
धन्यवाद
तुमचा अभिप्राय वाचून लिहीण्याचा उत्साह वाढला.
सुंदर
अरुण मनोहरजी,
कविता सुंदर आहे. वाचायला खूप आवडली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
धन्यवाद
सामंतसाहेब, तुमचे मॅरेथॉन लिखाण वाचून थोडे थोडे लिहीण्याची स्फूर्ती येते.
सुंदर काव्य रचना
मज सूर गवसला जो, कोठे हवेत विरला?
ती साद ऐकू ये ना, स्वप्नील भाव सरला
जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
हे तर मस्तच
स्वप्नामध
स्वप्नामधील सत्य, गवसेल कधी कोणां?
कधी बंद होई वेडा, जागेपणाचा बहाणा?
झोपेत जगूनी नंतर, ती धुंदी कां उडाली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
हे विशेष आवडले !!!!
सुंदर कविता!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सुरेख..
सुंदर ओळी..
पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो
मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो
अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
सुंदर कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
अरुणजी
ह्या कवितेला चाल लावून जालकवी संमेलनात ही कविता मी अंतर्भूत करतो.
फक्त, तुम्ही ही कविता इमेल ने मला पाठवाल का ?
कारण प्रताधिकार उल्लंघन होऊ नये, म्हणून.
सुंदर कविता.
-- वैद्य
चित्रदर्शी
होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक
कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख
ती उजळताच प्राची, सावली अंतरी धरली
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
हे सुरेख! चित्रदर्शी!
(प्रेक्षक)बेसनलाडू
+१ हेच म्हणतो
चित्रदर्शी, आशयगर्भ काव्य!
चतुरंग
पाहीले रुप सुंदर
पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो
मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो
अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
व्वा..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
मदनबाण.....
Life is what happens while you are busy making other plans.
John Lennon
झकास!!
...जाणीव करूनी सुन्न, जाणीव कां परतली?
...अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
या ओळी खास आवडल्यात. मस्त आहे. बहोत बढीया!
राघव
सुन्दर
होता मनात माझ्या, कोपरा उजळला एक
कवडसे नृत्य करीत, लयबद्धसे सुरेख
खुप आवडल्या ओळी
सुरेख
पाहीले रुप सुंदर, तव नयनी मी बुडालो
मी गमविले स्वतःला, माझाच मी न उरलो
अस्तीत्व कां मिळाले? कां झोप ती उघडली?
मज जाग जरा येता, ती रात का हरवली?
छानच