हैद्राबाद फिरायचा जरा विचार आहे …

अनामिक२४१०'s picture
अनामिक२४१० in काथ्याकूट
15 Jun 2015 - 7:14 pm
गाभा: 

हैद्राबाद फिरायचा जरा विचार आहे …
२० ते २३ जून च्या दरम्यान तिथे असेल.

काय काय पाहण्याजोगे आहे ? एखादी टुरिस्ट बस वगैरे … अर्थातच जी सामान्य लोकांना परवडेल अशी सुचवा .
त्याचे भाडे पण आणि वेब साईट चा पत्ता असेल तो पण

कुटुंबसोबत असल्याने मुक्काम 'नामपल्ली'या भागात असेल .

कृपया माहिती पुरवणे

- आपलाच अनामिक

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

15 Jun 2015 - 7:59 pm | प्रीत-मोहर

Tithlya local cha yarhechcha vapar kara. Max thikane local stations varun javalpas ahet. Golkonda an ranojisathi nampally station javal anek tour chi dukane ahet tithe sampark kara.
Baki thodi thikane auto ne firu shakal

मित्रहो's picture

15 Jun 2015 - 8:07 pm | मित्रहो

तसे फिरण्यपेक्षा हैद्राबाद खाण्याचे शहर आहे. पाउस पडल्याने सध्या प्रसन्न वातावरण आहे. नेहमीची स्थाने
- चारमिनार
- सालारजंग संग्रहालय
- गोवलकोंडा किल्ला
- हुसेन सागर, एनटीआर गार्डन, लुम्बीनी पार्क, स्तूप
- बिर्ला मंदीर
- रामोजी पण एक संपूर्ण दिवस जाइल
- स्नो वर्ल्ड
- शिल्परामन

हे बघितले असेल तर
- ओस्मान सागर, हिमायत सागर
- चिलकूर बालाजी
- थोडे लांब जायचे असेल तर मेडक चर्च, बासर सरस्वती मंदीर (१५० किमी)

सरकारी बसेस आहे तसेच प्रायव्हेट सुद्धा आहेत. नामपल्ली स्टेशनच्या बाहेर त्याची माहीती मिळते.

खाण्याचे प्रयोग करायचे असेल तर
- पॅराडाइस बिर्याणीसाठी प्रसिद्ध. चौकाचे नांव पॅराडाइस आहे (अर्थात मांसाहारी उत्तम शाकाहारी तशी चांगलीच )
- चटणी (महाग पण इथल्या इडली दोसासारखी मजा नाही. बाबाइ हॉटेल इडली, स्टीम दोसा अप्रतिम)
- नामपल्ली स्टेशनच्या बाहेर कामत तसे किफायतशीर आणि चांगले हॉटेल आहे.
- गोकुल चॅट कोटी

खास हैद्राबादी पदार्थ
- हैद्राबादी बिर्याणी
- डबल का मीठा
- खुबानी का मीठा

गोळकोंडा, सालारजंग व रामोजी चांगली पण खूप वेळखाऊ प्रकरणे आहेत. बघितली त्याला खूप वर्षे झालीत पण अजूनही तशीच असतील असे वाटते.
३ दिवसातील बहुतेक सगळा वेळ ही ठिकाणे बघण्यात जाईल मात्र!

अनामिक२४१०'s picture

15 Jun 2015 - 8:29 pm | अनामिक२४१०

पहिल्यांदाच येतोय नवाबांच्या शहरात …
त्यामुळे काहीही माहिती नाही आणि पाहिलेलं नाही
जितकी मायाजालवर तितकीच फक्त …

गोवळकोंड्याला एक दिवस लागेल.सालारजंगला अर्धा.रामोजी पूर्ण दिवस.लुंबिनी संध्याकाळी फिरणे बोटिंग करता येईल.चारमिनारला खरेदी.तिथुनच पुढे पाच किमी वर फलकनुमा पॅलेस आहे.तिथे तेलंगणा टुरिझमच्या पॅलेस टुरनेच जाता येत होते.तो महाल बघणे चुकवू नका.पॅलेस ताज हाॅटेलने घेतल्याने डायरेक्ट एन्ट्री नसते.बहुधा शनीवार रविवार या पॅलेस टुर्स असतात.

रामोजी मस्ट वॉच - १ संपुर्ण दिवस
चारमिनार + सालारजंग संग्रहालय + गोवलकोंडा किल्ला + बिर्ला मंदीर - १ दिवस
सालारजंगचे हातोडीवाल्या माणसाचे प्रसिद्ध घड्याळ सुरु असेल तर १२ चे टोले चुकवु नका.
स्नो वर्ल्ड - हे तुम्ही स्कीप करु शकता - १७६० लोकांनी घातलेले गरम कपडे देतात घालायला - टोट्ली अनहायजिनिक :(

कंजूस's picture

16 Jun 2015 - 7:18 am | कंजूस

चिमी +1.लहान मुल बरोबर असल्यास सालारजंग ,गोवळकोंडा उरकून तो वेळ झू आणि हुसेनसागर परिसर बाग. पाहाणे सालारजंगमध्ये घड्याळ आणि रत्न दालन(२३ नं बहुतेक),चाइनिज रेशीमचित्रे (१६ नं?),खालचा बुरख्यातला पुतळा पाहिल्यावर इतर दालने पाहा.काउंटरवर महत्त्वाचे दालन विचारा.

सिरुसेरि's picture

16 Jun 2015 - 12:16 pm | सिरुसेरि

पेसरट्टु / एम एल ए पेसरट्टु खाउन पाहा .

रमेश आठवले's picture

16 Jun 2015 - 6:27 pm | रमेश आठवले

पेसरट्टु म्हणजे मुगाच्या डाळीचा डोसा आणि एम एल ए पेसरट्टु म्हणजे ज्या पेसरट्टु च्या गुंडाळीत भाजी ऐवजी उपमा ठेवतात तो .

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 12:22 pm | टवाळ कार्टा

आब्बा ...तूम हैद्राबादाकूं जातां...उस्मानीआ बिस्कूटां खानेकू नै भूल्ना

बॅटमॅन's picture

17 Jun 2015 - 2:34 pm | बॅटमॅन

बिस्किटां, बिरियानी, बज्जी, डब्बल का मीठा, सब खा के आओ रे...बांडी पे जो है सब खा के आओ, फिर नक्को बोलो के हैदराबादमें कुच मिलताइच नै खानेकू...हाउर चारमिनार गये तो वो सलीम फेकू आउर इस्माईलभाईको मिलना भी नक्को भूलो..वो इस्माईलभाई तो पच्चीस सालसे चारमिनारपे बैठा कते, तो व्हां तो वो मिलनाइच होना...रुक्साना भी दिखेंगी शायद..जम्या तो फेकू हाउर मामा को भी मिल लेव रे भाय...

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 2:48 pm | टवाळ कार्टा

मशहूर आईस्क्रीम को भी नक्को भूलों यारों (वोईच्च जिदर इत्ते इत्ते कपां मल्लिकाने खाये थे)
;)

पांच पांच कपां खाये थे, फिर मेरेकु बोली, बॅटू अब तुम किदर जाना वाना मत... ;)

टवाळ कार्टा's picture

17 Jun 2015 - 3:02 pm | टवाळ कार्टा

फिर रातभर क्या क्या हुआ वो नक्को लिहू
=))

अत्मरंजन कित्ताभी बोले लोगां लेकिन मैं नै लिख्खूंगा =))

रमेश आठवले's picture

16 Jun 2015 - 6:54 pm | रमेश आठवले

रामोजीराव फिल्म सिटी ला गेलात तर तिथून साधारण वीस कि. मी. वर पोचमपल्ली गाव आहे. येथील विणीच्या साड्या स्त्रीयांना खूप आवडतात. विनोबा भावे यांनी भूदान योजनेची सुरुवात येथे केली. त्यामुळे नकाशावर या गावाचे नाव भूदान पोचमपल्ली असे आता लिहिले जाते.
जवळपासच्या ठिकाणी भेटी द्यायच्या असतील, तर आधी राज्य टुरिझम च्या एका दिवसाच्या टूर मध्ये मुख्य शहरातील प्रेक्षणीय स्थळे बघून घेणे चांगले.
चार मिनार जवळच्या गल्लीत स्त्रिया बांगड्या व काकणे आवर्जून खरेदी करतात.तसेच या शहरात मोत्याच्यी सरांची खरेदी मस्ट आहे.लेपाक्षी या सरकारी दुकानात निर्मल व बिदर येथील कलात्मक वस्तू भेट देण्या साठी घेणे योग्य आहे .

चौकटराजा's picture

16 Jun 2015 - 7:05 pm | चौकटराजा

पैशा चा व् वेळेचा अपव्यय

चिमी's picture

17 Jun 2015 - 2:02 pm | चिमी

रामोजी फिल्म सिटीच्या पायथ्याशी अप्रतिम सांघी टेंपल आहे - ते अवश्य पहा.
फिल्म सिटी बघुन झाल्यावर रामोजीच्या मेन रोडवर आणून सोडणार्या बस ड्रायव्हरला सांगितले तर तो मंदिराजवळ बस थांबवतो. फिल्म सिटीहुन शेवटची बस ६-६.३० ला असते. त्याऐवजी ५ वाजताच निघालात तर मंदिर बघुन होइल.

विशाखा पाटील's picture

17 Jun 2015 - 2:38 pm | विशाखा पाटील

हैद्राबादच्या एका मैत्रिणीकडून कार म्युझिअमबद्दल ऐकलं आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वस्तूंसारख्या गाड्या बनवलेल्या आहेत, असं काहीतरी वैशिष्ट्य आहे.

सिरुसेरि's picture

22 Jun 2015 - 10:42 am | सिरुसेरि

हैदराबाद्कडुन सोलापुरकडे जाताना नळदुर्ग किल्ला लागतो . तो ही पाहण्या सारखा आहे . हैदराबाद्कडुन सोलापुरकडे जाताना जहीराबाद नावाचे ठिकाण लागते . तेथील ढाब्यांवर चांगले जेवण मिळते .

अनामिक२४१०'s picture

1 Aug 2015 - 8:54 am | अनामिक२४१०

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद ...!!!

हर्मायनी's picture

9 Feb 2018 - 9:59 am | हर्मायनी

Birla Mandir, Chowmahalla Palace, Charminar, Mecca Masjid & Shopping at Laad Bazaar(By walk), Salarjung Museum(Lunch Break), Nizam Jubilee Pavilion(purani haveli), Golconda Fort, Qutub Shahi Tombs(Drive through), Lumbini Park -(Terminating point) हे एका दिवसात फिरून होऊ शकते का? साधारण किती वेळ लागू शकेल? हि इटिनेररी त्यांच्या ऑफिशिअल टुरिझम साईट वर दिली आहे. तसेच, २ व्हीलर रेंट करून फिरणे कितपत योग्य? आम्ही दोघेच आहोत. आणि कुठून रेंट करता येईल? या वीकेंडला जात आहोत..

दुसय्रा एका अशाच धाग्यावर प्रतिसाद दिला -

लुंबिनि पार्क, हुसेन सागर तलावाच्या उत्तरेस सिकंद्राबादकडे आहे. दक्षि्ण भागात अंज्जेया पार्क, आणखी एक पार्क आहे. सेक्रेटरिएटही जवळच आहे. आणि बुद्धाचा पुतळा तलावाच्या मध्यभागी आहे. संध्याकाळी एक क्रूज बोट फिरवतात, सर्वत्र लाइटिंग असते. फोटोमध्ये हे खुप छानछान वाटेल पण तलावात अतिशय दुर्गंधि आहे. आता डिसेंबरात गेलेलो. पाच वाजता पाहिला हा भाग. गटाराचे पाणी सोडून तलावाची वाट लावली आहे. बिरला मंदिर दक्षिण टोकालाच आहे. पण ही मंदिरे बय्ाच शहरांत आहेत.
२) चार मिनार, चुडि बाजार, सालारजंग हे हुसेनसागरच्या दक्षिणेस आहेत.
सालारजंग - दहाला उघडते, शुक्रवार बंद. २६ नंबर दालनात रत्नजडित वस्तू आहेत. खाली एक पुतळा आणि टोले देणारे घड्याळ बाराचे टोले पाहा. नंतर चार मिनारवरून चुडि बजारात खरेदी.

३) शहराच्या पश्चिमेस अकरा किमिवर गोलकोंडा फोर्ट आणि कुतुब टुम आहे. इकडे उन फार लागते. सकाळी लवकर जा. कमानीकमानी आणि भिंती. गेटपाशी टाळी वाजवून वर ऐकू येते म्हणतात ते आता गोंगाटात शक्य वाटत नाही. वरून हैदराबाद शहर दिसणार नाही खूप अंतर आहे