श्रीमंत: शतशब्दकथा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
25 May 2015 - 7:40 pm

आज अक्षयतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे आज ते प्रसिद्ध दुकान लवकर उघडलेलं होतं. अगदी सकाळी सात वाजल्यापासुन लोकांनी दुकानामधे गर्दी करुन गोडा-धोडाचे पदार्थ खरेदी करायला सुरुवात केलेली होती. त्याची सरावलेली बोटं सराईतपणे नोटा आणि व्यवहार हाताळत होती. दुपारी दुकान बंद करायची वेळ झाली तसा त्याचा ५,१३,०००/- रुपयांचा हिशोब तयार होता. मालकाकडे पैसे आणि हिशोबाची यादी देउन तो दुकानातुन बाहेर पडला आणि घराकडे निघाला. वाटेत त्याला एका कुडमुड्या हलवायाचं दुकान लागलं आणि त्याला मुलांची आणि म्हातार्‍या आईची आठवण झाली. आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली.

(शतशब्दकथा लिहायचा पहिलाचं प्रयत्न त्या जिलबीएवढाचं गोड मानुन घ्यावा. शतशब्दकथा हा प्रकार भयानक अवघड आहे असं माझं मत बनलेलं आहे.)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

दमामि's picture

25 May 2015 - 7:46 pm | दमामि

वा! जम्या बरका!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 7:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद. पुढची शतशब्दकथा डु-आयडीवर लिहिन म्हणतो. आपलं मत जरुर सांगा.

दमामि's picture

25 May 2015 - 8:53 pm | दमामि

जरूर जरूर!
पण तोपर्यंत आम्ही जिवंत असलो तर:(

अजया's picture

26 May 2015 - 8:57 am | अजया

छान जमलिये कथा!

जेपी's picture

25 May 2015 - 7:51 pm | जेपी

101 शब्द आहेत.

बाकी कथेला 5 पैकी 3

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 7:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्द १०० आहेत उरलेला एक आकडा आहे ;) ;) ;)

(णया है मै जेपी)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2015 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी कथेला माझ्याकडून पाच पैकी दीड गुण.

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 1:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात नावडते प्रोफेसर असणार. :)

तसं पहायला गेलं तर दिड मार्काच्या लायकीची पण गोष्ट नाही. पण काय करणार लेखनकंडुशमनार्थ टंकावं लागतं काहीबाही. सगळ्यांना कुठे ५/५ च्या लायकीचं लिहायला जमणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2015 - 3:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> तुम्ही कॉलेजमधले सगळ्यात नावडते प्रोफेसर असणार. :)
मी सर्वांचा आवडताच आहे, असं माझं कौतुक माझ्या तोंडून कसं सांगू ?

>>> तसं पहायला गेलं तर दिड मार्काच्या लायकीची पण गोष्ट नाही.
अगदी खरं आहे. प्रश्न न समजता काही तरी उत्तराच्या जवळपास लिहिलंय
असं वाटलं की काही तरी पदरात टाकावं लागतं, तसंच हे काही गुणदान.

>>> पण काय करणार लेखनकंडुशमनार्थ टंकावं लागतं
हो ते स्पष्ट दिसतंय...!

>>> सगळ्यांना कुठे ५/५ च्या लायकीचं लिहायला जमणार.
अगदी खरं आहे. सर्वच सचिन तेंडुलकर नसतात पण
गल्लीच्या क्रिकेट खेळात फटकेबाजी करणारं पोरगंही सचिनपेक्षा काही कमी नसतं. :)
(ह.घ्याच)

-दिलीप बिरुटे
(मिपा गल्लीतला निवृत्त तुफानी फलंदाज) ;)

प्यारे१'s picture

12 Jul 2015 - 4:02 pm | प्यारे१

निवृत्त?
का? कधी? कुठे? कसे? मुळात झाले की केले गेले?
;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2015 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेळ नै सध्या. मिपावरुन मी कुठेच जाणार नाही.
व्यवस्थेत असो नसो, मान असो वा अपमान, काही असो.
मिपा माझं पहिलं प्रेम आहे.

अवांतर : आता उपप्रतिसाद लिहु नका. जरा शांतपणे मिपा वाचू द्या मला. :)

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

25 May 2015 - 7:58 pm | श्रीरंग_जोशी

रुपककथेचा प्रयत्न तो ही शतशब्दकथा या प्रकाराद्वारे करणे आवडले.

या प्रकारच्या पुलेशु.

सूड's picture

25 May 2015 - 8:10 pm | सूड

आवल्ड्या गेले आहे. ;)

जुइ's picture

25 May 2015 - 8:20 pm | जुइ

अशा प्रकारच्या लेखनासाठी शुभेच्छा!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 8:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

विनीत संखे's picture

25 May 2015 - 8:32 pm | विनीत संखे

गुड वन

प्रचेतस's picture

25 May 2015 - 8:59 pm | प्रचेतस

सरधोपट झालंय.
कलाटणी अधिक नाट्यमय हवी होती. शतशब्दकथेचे ते बलस्थान आहे असे मला वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 9:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. अजुन लेखनावर तेवढी पकड नसल्यानी तेवढा नाट्यमय शेवट नाही करता आला. हळुहळु जमेल अशी आशा आहे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 11:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रयत्न !

आपल्या कनवटीची शेवटची पन्नासची नोट त्यानी काढली आणि पावशेर जिलबी घेतली. मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली.

असा उघड शेवट करण्याऐवजी...

त्याचे पाय नकळत अडखळून तो थबकला. क्षणभर विचार करून त्याने आपल्या कनवटीची चुरगळलेली शेवटची पन्नासची नोट काढली आणि पावशेर जिलबी घेतली.

हे कसं वाटतेय ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 11:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं कल्पना. १०० मधे बसवायला पाहिजे काटछाट करुन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 11:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक शब्द कमी करायचा असेल तर "नकळत" काढून टाकता येईल.

एस's picture

25 May 2015 - 9:13 pm | एस

छान जमलीये.

मला आवडली - रादर शेवट टोचला.आता त्या प्रसिद्ध दुकानात जाताना ही कथा आठवेल नक्की.
कधी कधी तसे मनात येतच असते,आता अधिक प्रकर्षाने येईल.

मधुरा देशपांडे's picture

25 May 2015 - 9:21 pm | मधुरा देशपांडे

आवडली कथा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 9:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सर्वांचे आभार :)

सस्नेह's picture

25 May 2015 - 9:45 pm | सस्नेह

प्रयत्न आवडला !

पैसा's picture

25 May 2015 - 9:52 pm | पैसा

लिहीत रहा, म्हणजे लिखाणात अजून नाट्यमयता आणता येईल.

पैसा's picture

25 May 2015 - 9:53 pm | पैसा

मांडणीमधे. आशयात नाट्यमयता आहेच.

अन्या दातार's picture

25 May 2015 - 9:55 pm | अन्या दातार

छान रे.

एक एकटा एकटाच's picture

25 May 2015 - 10:08 pm | एक एकटा एकटाच

चांगला प्रयत्न आहे.
पुढिल लेखणास शुभेच्छा

प्यारे१'s picture

25 May 2015 - 11:06 pm | प्यारे१

आड़ौली रे!

बॅटमॅन's picture

26 May 2015 - 12:11 am | बॅटमॅन

छान!

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2015 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

जिल्बी... ;-) आपल ते हे... :-D
कथा आवडली!

असंका's picture

28 May 2015 - 10:17 pm | असंका

:-))

सौन्दर्य's picture

26 May 2015 - 1:47 am | सौन्दर्य

जर पहिलाच प्रयत्न असेल तर एकदम छान आहे. पुढील कथेसाठी शुभेच्छा.

किसन शिंदे's picture

26 May 2015 - 2:37 am | किसन शिंदे

कथा आवडली

खेडूत's picture

26 May 2015 - 8:54 am | खेडूत

पहिला प्रयत्न आवडला.

अजून लिहा, सफाईदार होईल. पुढील कथेसाठी शुभेच्छा..

सिरुसेरि's picture

26 May 2015 - 8:59 am | सिरुसेरि

छान कथा. मिठाई दुकानाच्या मालकांनीच खरे तर आपल्या सर्व स्टाफला सणासुदीचे म्हणुन मिठाईचे गिफ्टबॉक्स द्यायला हवे होते . बाकी , कनवट म्हणजे आतला खिसा का हो ?

छान !
लेखनासाठी शुभेच्छा!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 May 2015 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

पावशेर जिलेबीला पन्नास रुपये? साजुक तुपातली घेतली का?

पैजारबुवा,

तिमा's picture

28 May 2015 - 8:56 pm | तिमा

गुढी पाडव्याला पार्ल्याच्या साठे यांचे विजय स्टोर्स मधे जाऊन पहा. भाव असतो ४०० रु. किलो.

पाटील हो's picture

26 May 2015 - 9:21 am | पाटील हो

आवडली कथा.

नाखु's picture

26 May 2015 - 9:24 am | नाखु

जहाज छान आहे पण तू या पेक्षा चांगले लिहू शकतोस काठावर पास व्हायचे बंद कर आधी.

पॉइंट ब्लँक's picture

26 May 2015 - 9:36 am | पॉइंट ब्लँक

डोक्याला जास्त त्रास न करणारी साधी सुटसुटित कथा आवडली.

पगला गजोधर's picture

26 May 2015 - 11:40 am | पगला गजोधर

:)

खंडेराव's picture

26 May 2015 - 11:42 am | खंडेराव

छान जमलिये..

शि बि आय's picture

26 May 2015 - 12:17 pm | शि बि आय

आयडिया छान आहे. फार कठीण असतं हो हे मोजक्या शब्दात गोष्ट मांडणे.
लहान मुलांना रात्री गोष्ट सांगताना ट ला ट जोडत मुले झोपेपर्यंत गोष्ट खेचावी लागते आणि आता अगदी उलट करावे लागत आहे.
१०० शब्द बास…

चिगो's picture

26 May 2015 - 1:51 pm | चिगो

कल्पना मस्त.. प्रयत्नपण जमलाय. पुलेशु..

आशय छान आहे कवितेतला.आवडलि....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 8:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कविता आवडल्याबद्दल धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

26 May 2015 - 6:25 pm | सानिकास्वप्निल

कथा आवडली, छान लिहिली आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 8:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळ्यांचे आभार.

मोहनराव's picture

26 May 2015 - 8:33 pm | मोहनराव

आवडली कथा

लालगरूड's picture

26 May 2015 - 8:56 pm | लालगरूड

मिपा वर शतशब्दकथा स्पर्धा भरवायाला हवी.

खटपट्या's picture

26 May 2015 - 9:05 pm | खटपट्या

छान कथा. आवडली.

उगा काहितरीच's picture

26 May 2015 - 10:03 pm | उगा काहितरीच

छान ! (चान नाही)

संदीप डांगे's picture

26 May 2015 - 10:13 pm | संदीप डांगे

आटोपशीर आणि प्रवाही. दोन्ही गुण आहेत कथेत.

कथा संपल्यावरही चालू राहते मनात. सुरवातीच्या आधीची आणि शेवटाच्या नंतरचीही, दोन्ही कथा आकार घेऊ लागतात.

पहिलाच प्रयत्न असला तरी मस्त!

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.चिमणरावचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी 99 कार्यकर्ते

रुपी's picture

28 May 2015 - 2:08 am | रुपी

छान आशय..

प्रणित's picture

28 May 2015 - 2:57 pm | प्रणित

कथा आवडली

बॅटमॅन's picture

28 May 2015 - 3:00 pm | बॅटमॅन

आटोपशीर कथा. ब्लॅकपर्ल सांभाळून कदाचित जास्त लिहायला वेळ मिळत नसावा. ;)

आवडली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 10:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. ते आमचा एक मित्र हल्ली फक्त गॉथमामधेचं रात्री भटकत असतो. त्याला ट्रोजन घोड्याकडे बघायला अज्याबात वेळ नाही म्हणे.

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2015 - 12:14 pm | टवाळ कार्टा

आणि जर तो ट्रोजन घेउन घोड्याकडेच बघण्यात बीझी असेल तर??? ;)

मुक्त विहारि's picture

28 May 2015 - 6:44 pm | मुक्त विहारि

आवडली.

असंका's picture

28 May 2015 - 10:35 pm | असंका

आवडली गोष्ट...!

धन्यवाद..!

जडभरत's picture

12 Jul 2015 - 12:29 pm | जडभरत

आवडली कथा! थोडी फास्ट घेतल्यागत वाटते पण तुम्हाला जे सांगायचंय ते पोहोचतंय.
मी सुद्धा अशा प्रकारच्या अनुभवातून गेलोय भाऊ!
मुलांच्या आनंदी चेहेर्‍याची कल्पना मनाशी येउन त्याची जीभ गोड झाली.
:- माझे जुने दिवस आठवले. अगदी तुटपुंज्या उत्पन्नातून मुलीसाठी खेळणी आणि खाऊ शनीवारी गावी घेऊन जायचो. सर्व प्रवासभर ती किती खुश होइल हाच विचार असे. मस्तच!

पद्मावति's picture

12 Jul 2015 - 1:58 pm | पद्मावति

छान जमलीय कथा. आवडली. प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात ५,१३००० चा हिशोब करणार्‍याला स्वत:च्या कुटुंबासाठी मिठाई घेतांना मात्र त्या दुकनातले दर परवडू नये हा विरोधाभास अचूक दाखविल्या गेला आहे.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

13 Jul 2015 - 6:08 am | अरवीन्द नरहर जोशि.

फारच उत्तम आहे .