दुचाकी घेतली पण... काही शंका

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in काथ्याकूट
23 May 2015 - 11:57 pm
गाभा: 

बरेच दिवस वेगवेगळे पर्याय शोधुन, माहिती काढुन, चार लोकांना विचारुन शेवटी एक दुचाकी घेतली.
ऐपत ६००००/-(कमि/जास्त), रोज चा वापर ६०-८०कि.मी(कधि कधि १०० देखिल), आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं)

गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता.
तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी."
मी-"किसीने खरिदी है पय्ले?"
तो-"अरे, बोहोत."
मी-"उन्कु, कितना दिया."
तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता."
मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?"
तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप."
(आणखी बरिच प्रश्नोत्तरे..)

त्याने त्याचं काम चोख केलं.
पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि. गाव जास्त लांब जरी नसलं तरी जाणं-येणं, थोडं फार फिरणं, असं करत करत गाडी पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली.
त्याने सांगितलेले सगळे नियम पाळुन काळजी घेउन सुद्धा हे म्हणजे खुपंच कमि झालं.
त्याला फोन केला, त्याने गाडी घेउन बोलवलं.
पहिल्या सर्विसींग साठी चे ५०० कि.मि. झाले होते म्हणुन सर्विसींगलाच घेउन गेलो.
यावेळेस मेकॅनिकला रडकहाणि सांगितली.

तो-"अवो सर, १००० कि.मी. ला कुठं एवरेज मिळ्तो का?"
मी-"मग?"
तो-"कमित कमि २०००-३००० तरी."
मी-"मग तो पर्यंत?"
तो-"गाडी ४० ने चालवायची, एक दोन सर्विसींग होऊ द्या, एवरेज काढुन देउ ना तुम्हाला."

संध्याकाळी गाडी घेतली. वापरली. पुन्हा तेच, जरा फरक नाही.
लावला टोल्-फ्री ला फोन.
टोल्-फ्री ला फोन लावल्यावर जो अनुभव येतो तोच.(हे दिल्लीत बसलेले होते. सगळं हिंदीत.)
भावनारहीत सांत्वन, फुकट्चे सल्ले आणि फिक्कट शब्दात तक्रार नोंदणी.
फायदा ईतकाच झाला की त्यांनी ती तक्रार विक्रेत्याला पोहोचवली व फोन वरुन वरचंच सगळं मराठीत झालं व विक्रेत्याने हि बोलवलं.
गाडी घेउन गेलो, तर यावेळेस मेकॅनिक लोकांचे मुकादम/पर्यवेक्षक/सुपरवाईजर किंवा आणखी काही, असे जे कोणी असतात ते मला भेटले.
रड्कहाणी पुन्हा.
पण या सरांनी कमित कमि २-३ सर्विसींग होउ द्या आपण एवरेजचं करुन देउ, असा भरवसा दिला, आणि एकदा गाडी आणा आपण एवरेज चेक करुन घेउ असंही सांगितलं.

ऑफिससमोरच्या गॅरेज वाल्याला एकदा विचारलं तर त्याने तर थेट ५००० कि.मी. नंतर एवरेज मिळेल असं सांगितलं.
दरम्यान हे एवरेज काढणं/ चेक करनं म्हणजे नेमकं काय याची चौकशि केली तर समजलं की गाडी ला एक बाटली लावुन, त्याची नळी पेट्रोल च्या ठिकाणी बसवतात व त्या बाटलीत १०० मि.लि. पेट्रोल टाकुन गाडी चालवायची, गाडी जे अंतर कापेन गुणिले १० कि भेटलाच गाडीचा एवरेज. हा.का.ना.का.

सांगितल्याप्रमाणे गाडी घेउन गेलो. ते नळी, बाटली जोडणे सोपस्कार पार पाडले, आणि विक्रेत्याचा तोच पहिला माणुस सोबत घेतला. गाडी ६.८ कि.मी. पळाली. त्याने हि एवरेज कमि देतेय असं कबुल केलं, व आता दुसर्‍या सर्विसींग ला आणा किंवा एकदिवस गाडी ठेउन जा असा सल्ला दिला.

आता शंका.
१) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी?
२) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो?
३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि?
४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे?
५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का?
६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी?

i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 May 2015 - 12:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दादानु इंजिनं नवीन असा. जरा जपुन चालवा. ४०-५० किमीप्रतितास ठेवाच शिवाय एका प्रवासामधे १०० किमी पेक्षा जास्तं अंतर चालवु नका किमान ३००० किमी होईपर्यंततरी. त्या गाडीनी किमान ७०-८० दिलं पाहिजे अ‍ॅव्हरेज.

उगा काहितरीच's picture

24 May 2015 - 1:44 am | उगा काहितरीच

कंपनी सांगते ते वजा २० धरून चालावे नॉर्मल बाईकसाठी.

श्रीरंग_जोशी's picture

24 May 2015 - 3:55 am | श्रीरंग_जोशी

एक रोचक शंका आहे. वाहन क्षेत्रातील तज्ञ मंडळी यावर योग्य माहिती देऊ शकतील.

माझी पहिली दुचाकी (कायनेटिक लुना सुपर) घेतल्यानंतर माझं निरिक्षण होतं की टाकी जवळपास फूल भरली की गाडी किंचित का होईना (अर्धवट भरण्याच्या तुलनेत) थोडे अधिक अ‍ॅव्हरेज देते. मग मला नेहमी टाकी फूल करण्याची सवय लागली ती कायमचीच.

२००५ साली युनिकॉर्न घेतल्यावर मी ₹ ५०० चे पेट्रोल भरत असे. बरेचदा पेट्रोल पंपावर काम करणारे आश्चर्याने बघायचे कारण बरेच चारचाकीचालकसुद्धा एवढे एकदम नाही भरायचे. देवाच्या कृपेने माझ्या गाडीतले पेट्रोल कधी चोरीला नाही गेले. पंपवाल्यांनी गंडवल्याचे काही वेळा घडले पण भरल्या टाकीतून पेट्रोल मात्र नाही गेले.

तसं पाहिलं तर टाकीत किती पेट्रोल आहे याने गाडीचे अ‍ॅव्हरेज बदलायला नको पण कदाचित थोडे थोडे पेट्रोल अनेकदा भरताना काही पेट्रोल वायूरुपात परिवर्तित होऊन उडून जाते. असे घडण्याचे प्रमाण एकदम टाकी फूल केल्याने कमी होत असेल. अन ते न उडालेले पेट्रोल आपल्याला अधिक अ‍ॅव्हरेज देत असेल. मान्य आहे हा खूप बाळबोध तर्क आहे पण विषय उपस्थित झालाच आहे तर मांडून घेतो.

बाकी गाडी कुठे कशी किती चालवली जाते. चालकाचे व चालकामागे बसणार्‍याचे वजन किती हे घटकही अ‍ॅव्हरेज ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. टायरमधील हवेचा दाब योग्य तेवढा ठेवणे हा सुद्धा महत्वाचा घटक असतो.

बाकी गेल्या काही वर्षांत चारचाकी चालवताना क्रूझ कंट्रोलवर चालवल्यानेही थोडे अधिक अ‍ॅव्हरेज मी मिळवत आहे. माझे हापिसातले सहकारी तर चेष्टा करतात की गाडी २५ मैल/तास पेक्षा कमी वेगात क्रूझवर चालवता आली असती तर पार्कींग लॉटमध्येही मी क्रूझवरच चालवली असती ;-) .

स्वच्छंद's picture

24 May 2015 - 1:20 pm | स्वच्छंद

बरोबर तर्क आहे तुमचा..रिजर्व्ह वर असेल तर थोड कमी होत average

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 11:05 am | टवाळ कार्टा

थोड्या वेळाने सविस्तर लिहितो...

म्हया बिलंदर's picture

24 May 2015 - 11:11 am | म्हया बिलंदर

खरंच वाट पाहतोय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 May 2015 - 11:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही पहा तो लावेल. :)

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 11:59 am | टवाळ कार्टा

वाट असे कोण लिहिणार =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 May 2015 - 12:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वाटेविषयीचं बोलतोय मी.

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 3:04 pm | टवाळ कार्टा

आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं)

अश्या रिक्स घेउ नये...मिपावरचे अनुभवी सांगतीलच असे केल्याने काय काय होउ शकते ;)

गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता.
तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी."
मी-"किसीने खरिदी है पय्ले?"
तो-"अरे, बोहोत."
मी-"उन्कु, कितना दिया."
तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता."
मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?"
तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप."
(आणखी बरिच प्रश्नोत्तरे..)

हे त्याने ब्रोब्र सांगितले

पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि.

हे चूक केले...नव्या गाडीला नव्या नवरीसारखे वागवायचे असते ;)
एका दिवसात ४०-५० किमीपेक्षा जास्त चालवू नये

पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली.

व्यवस्थित आहे

१) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी?

७०+ मिळायला काहिच हरकत नाही...७५+ सुध्धा मिळेल जर आरामात ४०-५५ मधल्या स्पीडला गियर्स सारखे न बदलता, क्लच न वापरता चालवली तर

२) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो?

पहिले २००० किमी जर ४५ स्पीड्च्या वर न नेता चालवलीत आणि पुस्तकात दिल्याप्रमाणॅ सर्विसिंग केली...ऑईल बदलले तर

३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि?

पहिले २००० किमी जर ४५ स्पीड्च्या वर न नेता चालवावी

४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे?

जास्त नाही...वेगवेगळ्या पध्धती आहेत

५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का?

शष्प फरक पडेल :)

६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी?

i-Smart साठी कमी अ‍ॅवरेज म्हणजे ६० च्या खाली :)

i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं

अजिबात नाही...मस्त बाईक आहे...ट्राफिक साठी उत्तम

सदस्यनाम's picture

24 May 2015 - 1:33 pm | सदस्यनाम

म्हया, मी हिरोच्या जवळपास सगळ्या गाड्या चालविलेल्या आहेत. अगदी जुन्या सीडी हन्ड्रेड किंवा स्लीक पासुन ते करिझ्मा पर्यन्त. १०० एवढे जास्त अ‍ॅव्हरेज देणार्‍या गाड्या अपवादात्मक असतात. तांत्रिक मला काही जास्त कळत नाही पण १०० सीसी च्या हिरो ५५ ते ६० देतातच. १२५ ते १५० सीसी च्या हिरो ४५ ते ५० देतात. करिझ्मा अजुन थोडे कमी. आयस्मार्ट ही तर जुनीच स्प्लेंडर एनेक्सजी आहे. ते क्लच दाबुन चालू करायची आयडीय फक्त नवीन आहे. त्यामुळे अ‍ॅव्व्हरेज ला काही जास्त फरक पडत नाही. आग्दी वेगळी टर्मिनॉलॉजी किंवा तंत्र वापरुन नवीन मॉडेल आणण्यापेक्षा कॉस्मेटीक फेस लिफ्ट चे प्रकार टू व्हीलर मध्ये जास्त आहेत. १०० सीसी हिरो मध्ये वेगळे ईंजिन म्हणले तर फक्त पॅशन एक्स्प्रो चे आहे. व्हर्टिकल सिलिंडर. ती प्रेफर केली असते तर ६५ ते ७० मायलेज आहे. माझ्या पॅशन प्रो चे ६५ ते ७० नियमित आहे (२ वर्शे झाली).
असाच ११० मायलेज चा दावा टीव्हीएस च्या सेंट्राने केला होता. कायनेटीक च्यालेंजरने(सध्या ही महिन्द्रा पंटेरो आहे, आणि जुनी व्हेलॉसिटी म्हणजेच महिन्द्रा सेण्ट्युरो) पण केला होता. अ‍ॅक्चुअली रोडवर त्या ६५ ते ७० देत होत्या.

म्हया बिलंदर's picture

24 May 2015 - 2:08 pm | म्हया बिलंदर

गाडी जुनी झाल्यावार कमि एवरेज देते(असं ऐकलंय).हि आत्ताच ६० देतेय पुढे आणखी कमि दिल्यावर झालोच कि i-Fool.
पॅशन ला हिचा विरोध होता ना.

पॉइंट ब्लँक's picture

24 May 2015 - 2:55 pm | पॉइंट ब्लँक

कॅप्टन जॅक स्पॅरोंशी सहमत. दोन हजार किमी चालवून झाली कि मायलेज स्टेबल होईल.
पण मायलेज बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते.
१. तुमची चालवण्याची पद्धत. एकदम अक्स्लरेट करणे. ब्रेकचा अति वापर, गियर शिफ्ट करण्याचा कंटाळा आणि गरज नसतान क्लच दाबणे ह्या मुळे मायलेज कमी मिळू शकते. हि तुमची पहली गाडी असेल तर तुमचा हात बसायला थोडा वेळ लागेल.
२. पेट्रोल कुठल्या पंपावर भरता. शेलवर पेट्रोल भरले की चांगले मायलेज मिळते हा वैयक्तिक अनुभव आहे.
३. गाडीचे आयडलिंग/ ट्युनिंग /टायरचे एअर प्रेशर बिघडले असेल तर मायलेज मध्ये फरक पडू शकतो.
४. गाडी कुठे आणि कशा परिस्थितीत चालवता. शहरात बंपर टु बंपर ट्राफिक किंवा गावाकडचा खराब कच्चा रस्ता, घाट, ह्या परिस्थितित मायलेज कमी मिळेल. त्यामुळे १०० मिमि त्याने बर्यापैकी सपाट आणि मोकळ्या रस्त्यावर चालवली असेल तर मिळालेले मायलेज कमी म्हणावे लागेल.

म्हया बिलंदर's picture

24 May 2015 - 4:59 pm | म्हया बिलंदर

हो तशी पय्लीच म्हणायची. पण गाडी चालवण्याचा अनुभव बर्‍यापैकी अस्ल्याने गाडी देखील बर्‍यापैकीच चालवतो.
पेट्रोल मिळेल तसं भरतो, पण तुम्ही म्हण्ताय तर शेल सुरु कर्तो.
गाडीचे आयडलिंग/ ट्युनिंग /टायरचे एअर प्रेशर नियमीत चेक्णार.
शहरात बंपर टु बंपर ट्राफिक मधेच गाडीचा वापर जास्त होणार आहे. कच्चा रस्ता, घाट सहसा नाही होणार.
१००मि.लि. त्याने शहरातच वळणावळणाच्या पण सपाट आणि कमि रहदारीच्या रस्त्यावर चालवलेली.
माय्लेज कमिचीच तर भिती आहेना सर.

म्हया बिलंदर's picture

24 May 2015 - 4:53 pm | म्हया बिलंदर

धन्यवाद.
अगदिच फूल(Fool)लो नाही असं वाटायला लागलंय.
सर्विसींग्,ऑईल बदलने, चाकातली हवा, ई. काळजी घेणं सुरुच ठेवतो(शेवटपर्यंत).
पुन:श्च सर्वांचे आभार.

सर्विसींग्,ऑईल बदलने, चाकातली हवा, ई. काळजी घेणं सुरुच ठेवतो(शेवटपर्यंत).

३५ ते ४५ चा एकॉनोमी झोन, गुळ्गुळीत रस्ते, सुरळीत ट्राफिक, रोबोटीक चालवणे (वेळच्या वेळी गिअर, क्लच, ब्रेक) हे पण केल्यावर का मायलेज पडणार नाही?
म्हणजे दगडाचे सूप झाले म्हणा की.
अशी कल्जि घेतली तर कुठलीही गाडी मायलेज देते.(अगदी कंपनी फॉल्ट नसेल तर)
मग आयस्मार्ट कशाला?

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 7:23 pm | टवाळ कार्टा

कारण त्यांनी विकत घेतली आहे :)

सदस्यनाम's picture

24 May 2015 - 7:28 pm | सदस्यनाम

कळले तुझ्या ऑटो कन्स्लटंट ज्ञानाचे रहस्य. ;)
असो. दोघांनाही शुभेच्छा. :)

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 7:45 pm | टवाळ कार्टा

छान...

लालगरूड's picture

24 May 2015 - 7:56 pm | लालगरूड

फक्त 100ml वर एवरेज चेक करने म्हणजे मुर्खापना आहे.
जर accleration मधे variation न करता चांगल्या रोड वर 40~45 च्या constant स्पीड ने गाड़ी चालवली तर चांगला एवरेज देते.गाडीची देखबाल सुध्धा गरजेची आहे. oil वेळीच बदलावे.

अलबेला सजन's picture

25 May 2015 - 9:34 am | अलबेला सजन

साधारण महिन्याच्या शेवटी गाडी रिझर्व्ह ला लागली की किलोमीटर रिडिंग लिहून ठेवा. त्यानंतरच्या पूर्ण महिनाभरात एकूण किती रुपयांचे पेट्रोल टाकले हे सुद्धा लिहून ठेवा. महिन्याच्या शेवटी गाडी महिन्याच्या पुन्हा गाडी रिझर्व्ह ला लागली की रिडिंग घ्या. ह्या दोन रिडिंग मधला फरक हे तुमचे पूर्ण महिन्याचे चालवलेले किमी. आता महिन्याभरातील पेट्रोलची सरासरी प्रति लिटर किमत भागिले पूर्ण महिन्यात टाकलेल्या एकूण पेट्रोलची किंमत गुणिले चालवलेले एकूण किमी हा येईल तुमच्या गाडीचा average.

आपण महिनाभर गाडी वेगवेगळ्या जागी चालवतो. कधी बाजारात कधी हायवेला तर कधी घाटातून. कधी खूप ट्राफिक असेल तर कधी पूर्ण रस्ता मोकळा असेल. त्यामुळे या पद्धतीने जर average काढलात तर तो एकदम व्यवस्थित येईल व तो नक्कीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. जर आपण गाडीची देखभाल वेळच्यावेळी व व्यवस्थित करत असू व आपला वेग हा ताशी ४०-५० च्या दरम्यान असेल तर १०० cc ची गाडी ही ६० – ७० या दरम्यान average देणारच. कंपनीने दिलेला average हा ६० किलोचा माणूस ताशी ४० किमी वेगाने गाडी चालवत अतिशय सरळ व खड्डेमुक्त रस्त्याने ट्राफिक नसताना जात असेल तेव्हा काढलेला average असतो. त्यामुळे ती नेहमी dramatic figure असते.

मी या पद्धतीने माझ्या होंडा शाइन चा रेकॉर्ड ठेवला आहे. मला १२५ cc असताना सुद्धा ६०-६५ च्या दरम्यान average गाडी घेतल्यापासून ते आत्तापर्यंत मिळत आहे.

सतीश कुडतरकर's picture

26 May 2015 - 11:04 am | सतीश कुडतरकर

७ वर्षे जुन्या होंडा शाईनचा माझाही अनुभव सारखाच. जवळपास ६० चा average देते.

गाडी रिझर्वला आली की मीटर रीडिंग नोंदवून ठेवावे (मोबाईलने फोटो मारून ठेवणे उत्तम) व पेट्रोल भरतेवेळी किती भरले आहे ते नीट समजावे म्हणून आपली सोयिस्कर सवय टाकून 'दोसौ का डालो, पाचशेचं टाका' असे न करता एक - दोन - तीन - पाच - दहा अशा पूर्णांक लीटरमधे पेट्रोल भरावे. क्रेडिटकार्डाने पैसे दिल्यास पूर्णांक लीटरचे अचूक पैसे अदा करण्यात पंपवाले कटकट करत नाहीत. पुढच्या वेळेस गाडी रिझर्वला आली की वजाबाकी, गुणाकार, भागाकार करून सहज एव्हरेज काढता येते.
माझी क्यालिबर १९९८ ते २००३ पर्यंत ७० ते ६० अशा उतरत्या क्रमाने एव्हरेज देत असे. पहिले काही दिवस एव्हरेज काढायची, त्यावरून आर्थिक गणिते मांडायची, आपण फसवले गेलो वा नाही ते ठरवण्याची, दुसर्‍यांच्या गाड्यांकडे भिरभिरत्या नजरेने बघायची बरीच हौस असते. पण एकदा का आपल्या हिच्याशी गट्टी जमली, एकमेकांच्या खाणाखुणा पटायला लागल्या की मग उरतं केवळ आनंदाचं सहचरण! :-)

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 8:07 pm | म्हया बिलंदर

पण एकदा का आपल्या हिच्याशी गट्टी जमली, एकमेकांच्या खाणाखुणा पटायला लागल्या की मग उरतं केवळ आनंदाचं सहचरण! :-)

मस्त

मार्मिक गोडसे's picture

25 May 2015 - 11:01 am | मार्मिक गोडसे

आता महिन्याभरातील पेट्रोलची सरासरी प्रति लिटर किमत भागिले पूर्ण महिन्यात टाकलेल्या एकूण पेट्रोलची किंमत गुणिले चालवलेले एकूण किमी हा येईल तुमच्या गाडीचा average.

गाडीच्या अ‍ॅव्हरेजचा आणी पेट्रोलच्या दराचा काहीही संबंध नाही. अ‍ॅव्हरेज प्रती लिटर काढायचे असते (रिक्षावाले पेट्रोलच्या किंमतीने काढतात त्याचे कारण वेगळे आहे). रिझर्व ते रिझर्व १ लिटर पेट्रोल टाकूनही गाडीचे अ‍ॅव्हरेज काढता येते.

कंपनीने दिलेला average हा ६० किलोचा माणूस ताशी ४० किमी वेगाने गाडी चालवत अतिशय सरळ व खड्डेमुक्त रस्त्याने ट्राफिक नसताना जात असेल तेव्हा काढलेला average असतो. त्यामुळे ती नेहमी dramatic figure असते.

ह्या पद्धतीने मी गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून बघीतले तरीही कंपनीने दावा केलेले अ‍ॅव्हरेज मिळत नाही.

संदीप डांगे's picture

25 May 2015 - 12:41 pm | संदीप डांगे

सहमत.

कंपनी जे अ‍ॅवरेज सांगते त्याला तारांकित केले असते. तारांकित म्हणजे 'आम्ही चक्क खोटे बोलत आहोत' असा अर्थ घ्यावा.
कंपनीने काढलेले अ‍ॅवरेज नियंत्रीत वातावरणात असते. तिथे वार्‍याचा अवरोध, खड्डे, चालणे-थांबणे-वळणे आणि इतर अनेक गोष्टी ज्या सामान्यपणे ग्राहकाच्या चालवण्याच्या वातावरणात असतात त्या लॅबटेस्ट मधे उपस्थित नसतात. त्यामुळे गाडीचे अ‍ॅवरेज ८५ वैगेरे देणारच. साधे १० किलो वजन वाढवले तर बाइकचा अ‍ॅवरेज अंदाजे ५-७ किमी ने कमी होतो.

एकदा या सगळ्याचा अनुभव, माहिती नसतांना मी आणि वडील असे दोघे (वजन: ९० किलो प्रत्येकी) बजाज प्लॅटीनावर एका दिवसात सुमारे ३०० किमीचा प्रवास ताशी ९० च्या वेगाने केला होता. तेव्हा ७०-७५ च्या अ‍ॅवरेजनुसार टाकलेले पेट्रोल परतीच्या वाटेवर अचानक संपले आणि आम्हाला फार भटकावे लागले. नंतर अंदाज काढला तेव्हा गाडीने ४० चा अ‍ॅवरेज दिला होता.

चारचाकीचा अनुभव आहे की अनावश्यक भार गाडीतून काढला तर अ‍ॅवरेजवर १०-१५% परिणाम होतो.

आदिजोशी's picture

25 May 2015 - 3:13 pm | आदिजोशी

तारा टाकून त्या तार्‍याच्या अर्थ सोबत दिलेला असतो. आयडीअल रायडींग कंडिशन्स मधे ते अ‍ॅव्हरेज काढलेले असते. त्यामुळे वास्तवाच्या जवळपास जाणारी फिगर हवी असेल तर ऑटोमोबाईल मॅगझीन्सचे रिपोर्ट वाचावे.
कंपनी आयडीअल कंडिशन्स मधले अ‍ॅव्हरेज का देते: दोन उत्तर आहेत.
१. ते अ‍ॅव्हरेज लोकांसाठी जास्त अपिलिंग असते.
२. प्रत्यक्ष वापरात दुचाकीचे अ‍ॅव्हरेज बदलणारे ४-५ डझन व्हेरिएबल्स असतात. ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन एक फिगर काढणे अशक्य आहे. एकच बाईक २ वेगळ्या जणांनी चालवली की अ‍ॅव्हरेज बदलते. त्यामुळे आयडीअल कंडिशन्स हा हाईयेस्ट नंबर धरावा. त्याहून जास्त मिळणारच नाही. नीट चालवली तर त्याच्या जवळपास मिळू शकते.

माझ्या मामाची केबी ४ एस नियमीतपणे ७०-७५ चा अ‍ॅव्हरेज द्यायची. जाहिरातीत ८० म्हटले होते.

संदीप डांगे's picture

25 May 2015 - 3:44 pm | संदीप डांगे

'तारांकित म्हणजे खोटे' हे उपरोधमिश्रित आहे. नमूद केलेला अ‍ॅवरेज मिळेलच याची कोणतीही खात्री कोणतीही कंपनी कधीच देत नाही. किंबहुना देऊच शकत नाही. त्यामुळे जाहिरातीतल्या आकड्यावर आंधळा विश्वास ठेऊ नये, सावध असावे असं म्हणायचं आहे.

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 3:54 pm | टवाळ कार्टा

त्यामुळे जाहिरातीतल्या आकड्यावर आंधळा विश्वास ठेऊ नये, सावध असावे असं म्हणायचं आहे.

जाहिरातीत दिलेल्या आकड्याच्या जवळपास जाणारे अ‍ॅवरेज मिळू शकते (तितकेच कधीही मिळणार नाही कारण ते कंपनीच्या कंट्रोल्ड टेस्ट कंडिशनमध्ये असते)
पण त्यासाठी बाईक थंड डोक्याने शांतपणे बाईकच्या मॅन्युअलमध्ये दिल्याप्रमाणे चालवावी लागते
क्लच व ब्रेकचा कमीत कमी वापर करावा...गीअर्स कमी वेळा बदलावे
उदा. नेहमीच्या रस्त्यावर स्पीडब्रेकर कुठे असतो हे माहित असते...स्पीडब्रेकर यायच्या आधी अ‍ॅक्सलरेट करणे बंद करावे...गाडी आपोआप स्लो होउन स्पीडब्रेकर पार करेल

मार्मिक गोडसे's picture

25 May 2015 - 4:10 pm | मार्मिक गोडसे

त्यामुळे आयडीअल कंडिशन्स हा हाईयेस्ट नंबर धरावा. त्याहून जास्त मिळणारच नाही.

जास्तची अपेक्षा कोण करतेय?

जर का कंपनी असा दावा करते तर ती कंपनी तिच्या अधिकृत सर्विस सेंटरला आयडीअल कंडिशन्समध्ये गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून का देत नाही? दूध का दूध पानी का पानी समोरच होईल.

बाईक कंपन्यांचे टेस्ट ट्रॅक्स असतात. त्यांना भेट देऊन तुम्ही खातरजमा करू शकता. तशी परवानगी मिळते की नाही हे माहिती नाही.

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 4:57 pm | टवाळ कार्टा

मिळेल की....कंपन्या ज्या टेस्ट कंडिशन वापरतात, जसे
चालवणार्याचे वजन
गुळगुळीत रस्ता
ठरवलेल्या वेळेत गीअर चेंज
ठरलेला स्पीड
अज्जिबात ब्रेक न वापरणे
अज्जिबात टर्न न मारणे
अज्जिबात क्लच न वापरणॅ
अतिरिक्त वजन नसणे

हे आणि आणखी काही फॅक्टरर्स असतील ते सांभाळा..मग मिळेल

माई मोड ऑन

रे गोडश्या, कंपनीने सांगितलेला अ‍ॅवरेज हा इंजिनसाठी सर्वात आदर्श परिस्थिती असतानाचा असतो...जर तुला तशी परिस्थिती निर्माण करता आली तर तुलाही मिळेल
अ‍ॅक्चुअल कंडिशन मध्ये आदर्श अ‍ॅवरेजचा हट्ट करणे हे मार्मिकपणाचे नाही तर #@$#@! पणाचे आहे असे ह्यांचे मत

माई मोड ऑफ

सुमारे ३०० किमीचा प्रवास ताशी ९० च्या वेगाने केला होता

माझा सल्ला आहे की हे असले उद्योग पुन्हा करू नयेत. कार असेल तर या स्पीडला अर्थ आहे तो सुद्धा पु.मुं. एक्स्प्रेस वे वर. बजाज प्लॅटिनाचे ब्रेक्स उपयोगी पडणार आहेत का या स्पीड ला?

संदीप डांगे's picture

25 May 2015 - 3:50 pm | संदीप डांगे

धन्यवाद, खरंच त्यानंतर तो मूर्खपणा केला नाही कधी.
विशेष म्हणजे ब्रेक्स कमकुवत होते त्यावेळेस हे अजून एक महान प्रकरण. रस्ता मोकळा आणि चांगला असल्याने वेगाचे काही वाटत नव्हते आणि नशिब बलवत्तर म्हणून काही दुर्घटना झाली नाही असे म्हणू शकतो. पण नंतर असे काही केले नाही आणि करणारही नाही. दुचाकीला तसाही रामराम ठोकला आहे.

नितीन पाठक's picture

25 May 2015 - 2:38 pm | नितीन पाठक

हिरो चि आय स्मार्ट घेतली आहे त्याबद्दल अभिनंदन.....
आता हिरो चि आय स्मार्ट घेतलीच आहे तर स्मार्ट पणे सौ. ना घेउन फिरावयास जा, आपली कामे करा. नवीन गाडी चालवयाचा "थ्रील" अनुभवा. मजा करा.
" अ‍ॅवरेज चा विचार कशाला करता ? १० कमी मिळेल किंवा १० जास्त मिळेल ..... सारखे सारखे अ‍ॅवरेज चा विचार करून नवीन गाडीच्या ड्रायव्हिंग चा मूड कमी करू नका.
२००० किमी झाल्यावर अ‍ॅवरेज चा विचार करा .....

सदस्यनाम's picture

25 May 2015 - 4:16 pm | सदस्यनाम

नितिन मालक तुम्हीच खरे स्मार्ट. तुम्हीच खरे हिरो.

म्हया बिलंदर's picture

26 May 2015 - 10:12 am | म्हया बिलंदर

विटामिन "एम" तुटपुंजा असल्याने एवरेज चा विचार करतोय. गाडी चा जो काही थ्रिल आहे तो अनुभवतोयंच पण पहिली गाडी अस्ल्याने काही शंका आल्या त्या विचारल्या हो.

मदनबाण's picture

25 May 2015 - 3:59 pm | मदनबाण

मला एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे... तो म्हंणजे कोणते इंजि.ऑइल सर्वात उत्तम आहे ? अनेक कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे फायदे सांगतात, प्रत्येक सर्व्हिस सेंटरवाले त्यांचे ठराविक ऑइलच टाकतात ! मग आपल्या बाईकच्या मॉडेलसाठीचे बेस्ट ऑइल कसे ठरवावे ?

{इंजि.ऑइल बरोबर ३एम टाकणारा}

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 4:02 pm | टवाळ कार्टा

बाईकच्या मॅन्युअल मध्ये ऑईल टाईप दिलेला असतो (जसे 20w40) त्याच specification चे टाकावे

मदनबाण's picture

25 May 2015 - 4:05 pm | मदनबाण

ओक्के. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 May 2015 - 11:00 pm | अनिरुद्ध.वैद्य

प्रत्येक सर्व्हिस सेंटरवाले त्यांचे ठराविक ऑइलच टाकतात???

चुकीचे आहे. म्यानुअलनुसारच ऑइल टाकले गेले पाहिजे. बाकी वेगळे ऑइल वापरून/ बदलून सुधारणा होते, But, Try at your own risk! बरेच लोक सांगतात की सिंथेटिकपेक्षा त्याच डेन्सिटीचे मिनरल ऑइल चांगला पर्फोर्मंस देते. पण मला स्वतःला अनुभव नाही. शक्यतो आपण विकत घेऊन सर्व्हिस सेंटर वाल्यांना द्यावे आणि आपल्या समोरच ऑइल बदलून घ्यावे.

चुकीचे आहे. म्यानुअलनुसारच ऑइल टाकले गेले पाहिजे.
मला असे म्हणायचे आहे, की बजाज सेंटरवाले त्यांचे ठरवुन दिलेले आणि होंडावाले त्यांचे ठरवुन दिलेले ऑइलच टाकतात, आपल्याला हव्या त्या ब्रॅडचे ऑइल निवडण्याचा पर्याय नसतो....

बरेच लोक सांगतात की सिंथेटिकपेक्षा त्याच डेन्सिटीचे मिनरल ऑइल चांगला पर्फोर्मंस देते.
याचा विचार करायला हवा...
बजाजवाले म्हणतात :- http://www.bajajauto.com/services_genuine_oils.asp
अजुन इकडेही गेलो :- https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20120102031506AAgwT2r
आता माझ्या १३५ एलएससाठी Bajaj DTS-i 10000 SAE 20W50 of API ‘SL’, JASO MA Grade असे मॅन्ञुअल मधे दिले आहे...मग 20W50 चे कोणते मिनरल ऑइल वापरता येउ शकते ? जाणकारांनी यांच्यावर "फोकस" टाकावा. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 11:21 am | टवाळ कार्टा

Castrol किंवा कोणत्याही दुसर्या मोठ्या कंपनीचे वापरा...पण ऑईल स्वतः विकत घेउन सर्विस सेंटरला स्वतःच्या समोर बदलायला सांगावे

तुषार काळभोर's picture

26 May 2015 - 1:45 pm | तुषार काळभोर

शेल ३: १००-१२५ सी सी गाड्यांसाठी (अंदाजे २५०-२७० रुपये प्रति लिटर)
शेल ५: १५०+ सी सी गाड्यांसाठी ( रुपये ४०० प्रति लिटर- मी माझ्या युनिकॉर्नमध्ये हे वापरतो)

नाही मिळाले तर बेस्ट ऑफ रेमेनिंग लॉटः कॅस्ट्रॉल ४टी: (अंदाजे २३०-२५० रुपये प्रति लिटर)

मदनबाण's picture

28 May 2015 - 9:57 am | मदनबाण

काल मी Motul 7100 20w50 इंजि. ऑइल टाकले. हे फुल सिंथेटिक आहे,आणि त्यामुळेच महाग देखील आहे. {८०० रु./प्र.लि }
P1
हे ऑइल टाकल्यावर परफॉर्मन्स मधे फरक जाणवला आहे. :)
सिंथेटिक ऑइल वापरण्याचे फायदे :-
Why Synthetics?
Synthetic oil vs. conventional oil

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

म्हया बिलंदर's picture

28 May 2015 - 10:09 am | म्हया बिलंदर

हे सी.सी. स्पेसिफीक असतं का? म्हणजे १०० सी.सी. साठी वेगळं, १२५ साठी वेगळं...??

मदनबाण's picture

28 May 2015 - 10:17 am | मदनबाण

बाईक मॅन्यूअल मधे जे स्पेसिफिकेशन आहे त्याच स्पेसिफिकेशनचेच ऑइल वापरावे...
काल जालावर वाचतान एक मत असेही वाचले :-
From layman speak, if recommended is 20W50, you can go for a grade lower than 20 and higher than 50, for ex. 10W60. But it is not preferred to go for a grade like 10W30.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

मार्मिक गोडसे's picture

25 May 2015 - 10:15 pm | मार्मिक गोडसे

अ‍ॅक्चुअल कंडिशन मध्ये आदर्श अ‍ॅवरेजचा हट्ट करणे हे

कोण करतेय असा हट्ट?

जर का कंपनी असा दावा करते तर ती कंपनी तिच्या अधिकृत सर्विस सेंटरला आयडीअल कंडिशन्समध्ये गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून का देत नाही? दूध का दूध पानी का पानी समोरच होईल.

हा माझा प्रतिसाद वाचला नाही वाटतं ?

आदिजोशी's picture

28 May 2015 - 11:56 am | आदिजोशी

टक्याने लिहिलेले हे वाचले नाही का?

मिळेल की....कंपन्या ज्या टेस्ट कंडिशन वापरतात, जसे
चालवणार्याचे वजन
गुळगुळीत रस्ता
ठरवलेल्या वेळेत गीअर चेंज
ठरलेला स्पीड
अज्जिबात ब्रेक न वापरणे
अज्जिबात टर्न न मारणे
अज्जिबात क्लच न वापरणॅ
अतिरिक्त वजन नसणे

हे सगळं सर्विस सेंटर मधे कसं बरं रिप्लिकेट करणार????? गाडी स्टँडवर लाऊन अ‍ॅव्हरेज काढता येत नाही, त्यासाठी ती चालवावी लागते. टक्याने लिहिलेल्या सगळ्या क्लुप्त्या वापरून काढा अ‍ॅव्हरेज.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 12:15 pm | टवाळ कार्टा

मला हेवनवासी झालेल्यांची आठवण येते आहे ;)

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 May 2015 - 10:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

थोडा क्लिष्ट उपाय आहे, पण इफेक्टिव: रेड लाईन कोणत्या आर पी एम ला सुरु होते ते बघा. साधारण ७ ८ हजार आरपीएमला रेड लाईन सुरु होते. त्याला ३ ने भागा, म्हणजे साधारण २ - २.५ हजार आरपीएम. ही तुमची कोणत्याही गीअरमध्ये इंजिन आरपीएमची लिमिट.

४५ ची लिमिट सगळे सांगतात, पण आरपीएमची लिमिट फॉलो नाही केली तर अर्थ नाही, कारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या गीअरमध्ये सुद्धा हा स्पीड गाठता येतो.

गाडी घेतल्यापासून साधारण ३ - ३.५ हजार किमी हे नियम वापरून गाडी चालवा. एकदा इंजिन ट्यून झालं, की मग मायलेज व्यवस्थित मिळेल.

बाकी म्हणजे, टायर प्रेशर व्यवस्थित ठेवा. लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर साधारण ४ ५ नी प्रेशर जास्त ठेवा. दर एक तासानी १० मिनिटे ब्रेक घ्या. पेट्रोल शेल किंवा व्यवस्थित माहितीतल्या पंपाहूनच भरा.

हे सगळे जेनेरिक उपाय पण स्प्लेंडरचे ड्रायविंग टेक्निक समजून घ्या. आणि व्यवस्थित वापरा. सुरुवातीस कमी मायलेज असतो, तो वाढतो २ ३ सर्व्हिसिंग नंतर.

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 10:12 am | टवाळ कार्टा

थोडा क्लिष्ट उपाय आहे, पण इफेक्टिव: रेड लाईन कोणत्या आर पी एम ला सुरु होते ते बघा. साधारण ७ ८ हजार आरपीएमला रेड लाईन सुरु होते. त्याला ३ ने भागा, म्हणजे साधारण २ - २.५ हजार आरपीएम. ही तुमची कोणत्याही गीअरमध्ये इंजिन आरपीएमची लिमिट.

हे माहित नव्हते...पण समजा १०० cc च्या बाईकची रेडलाईन समजा ७५०० आहे तर २५०० आर्पिएमला गीअर बदलले पाहिजे...बहुतेकदा १०० cc च्या बाईकला ४ गीअर असतात...अशाने ती बाईक कधीही अंदाजे ५०-५५ किमीप्रता पेक्षा जास्त स्पीडने जाणार नाही

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 May 2015 - 1:13 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे समीकरण फक्त पैल्या ३ हजारीसाठीच आहे. अर्थात नंतरही हे ठेवता येते. क्रुझ मोड गेअर मध्ये (चौथा (४ गिअर इंजिन) आणि पाचवा (५ गिअर इंजिन), गेअर टू ट्रान्समिशन १:१ रेशो) कितीही दामटा, कारण जेवढी पॉवर होतेय, ती १:१ नुसार सगळी ट्रान्समिशनला जाते, सो मायलेज जास्त.

म्हया बिलंदर's picture

26 May 2015 - 10:29 am | म्हया बिलंदर

i-smart
सर नाही समजलं ओ!!

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 10:39 am | टवाळ कार्टा

आरपीएम मीटर नै

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 May 2015 - 1:18 pm | अनिरुद्ध.वैद्य

आरपीएम मीटर नाहीये. मॅन्युअलमध्ये प्रती गिअर वेग किती असावा ह्याचा तक्ता असेल. तो पाठ करा आणि त्या मर्यादेच पालन करा.

बाबा पाटील's picture

26 May 2015 - 12:11 pm | बाबा पाटील

इ.स.वी.सन १९९९ ते २००३ या काळात स्प्लेंडर सरासरी ७० ते ७५ एव्हरेज द्यायची बुवा. दोनशे रुपयात महाबळेश्वरची ट्रीप व्हायची त्या काळात आताच काही माहित नाही राव.

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 May 2015 - 1:23 pm | अनिरुद्ध.वैद्य

माझी काही मित्रमंडळी अजूनही ९८-९९ च मॉडेल वापरतात. काहीही प्रॉब्लेम नाही.

संदीप डांगे's picture

26 May 2015 - 2:34 pm | संदीप डांगे

९८-९९ स्प्लेंडर जबरदस्तच होती.

तुषार काळभोर's picture

26 May 2015 - 2:44 pm | तुषार काळभोर

१. हिरोहोंडा सीडी१००: २००३ मॉडेल वापर २०१० पर्यंत
वापर बहुतेक पुणे शहरात, रोज ८०-१२० किमी, रोज एव्हढा प्रवास होत असताना पेट्रोल वाचवणे भाग होते. मग वेग ३५-४० किमी प्रति तास, ठराविक पंपावर पेट्रोल भरणे(मी भरायचो: रेसकोर्सच्या पुढे सेंट मेरी जवळच्या पंपावर) , दर ३००० किमी ला ऑईल बदलणे व दर ५०००-६००० किमीला सर्विसींग, हवा दर आठवड्याला तपासणे(मल्याळी दुकानदाराकडेच) इत्यादी.
अ‍ॅव्हरेज ७०+ किमी प्रति लिटर

२. हिरो होंडा प्लेजर: २०१२ मॉडेल आतापर्यंत
वापरः वडील्/बहीण्/बायको यांच्याकडून हडपसर-लोणीकाळभोर-मांजरी-फुरसुंगी परिसरात रोज २०-४० किमी
अ‍ॅव्हरेज= ४५-५० किमी

३. होंडा युनिकॉर्नः मॉडेल २००९ आतापर्यंत
वापरः लोणीकाळभोर-हडपसर-पुणे शहर-लोणीकंद रोज साधारण ३०-५० किमी
अ‍ॅव्हरेज=५०-५५ किमी (याच्यात शेलचं ऑईल, ७०% वेळा शेलचं साधं पेट्रोल, इतरवेळी भारत पेट्रो. च्या पंपावर, ६०००-७००० किमीला सर्विसींग, शहरी भागात ४० चा वेग, महामार्गावर ७०-९० किमी प्रति तास)

रोज १०० किमी फिरण व्हायच तेव्हा काही क्लॄप्त्या समजल्या होत्या/शोधल्या होत्या/माहिती झाल्या होत्या.
चालवण्याच्या बाबतीत मी हे करायचो (अजूनही करतो) :
१. अचानक वेग वाढवणे/ब्रेक लावणे शक्य तेव्हढे टाळणे. जर अनपेक्षित पणे समोर काही आले तरच ब्रेक दाबणे. नाहीतर पुढच्या रस्त्याचा अंदाज घेऊन ब्रेक लावावा लागू नये, अशी गाडी चालवणे.
२. ३५-४० किमीप्रतितास किंवा ३००० आरपीएम हे आकडे सब्जेक्टिव असतात. गाडी शक्य तितक्या वरच्या गियर मध्ये चालवणे, पण त्या गियरच्या कमीत कमी वेगात. म्हणजे मी युनिकॉर्न ५व्या गियरवर ४०-४५ च्या वेगात चालवतो. अशी चालवली की (३५-४० किमीप्रतितास किंवा ३००० आरपीएम) हे आपोआप होते.
३. सिग्नलला ३० सेकंदापेक्षा जास्त गाडी चालू स्थितीत उभी करायची नाही. (हे २ मिनिटे म्हटले जाते, पण मी ३० सेकंद पाळतो. मुळात नियम मोडणे मानवत नसल्याने २-३ सेकंद असताना गाडी सुरू करतो. प्लेजर व युनिकॉर्न बटनस्टार्ट आहेत, तर सीडी १०० अर्ध्या किकवर चालू व्हायची)
४. फुल्ल टाकी नसेल तर हिंदकाळून पेट्रोलचं बाष्पीभवन जास्त होतं. मी टाकी 'नेहमीच' फुल्ल ठेवतो. २-३ लिटर कमी झालं की टॉपअप करतो.)

अवांतरः सुरक्षेसाठी: मी हेल्मेट वापरतो, आणि मला त्याचा अभिमान आहे. हेल्मेट घातल्यावर मान दुखते, आजू बाजूच नीट दिसत नाही, नीट ऐकू येत नाही, केस गळतात, ही सर्व कारणं मला पटत नाहीत. जरी त्यातील एखादे वा सर्व खरी असली तरी जीवापेक्षा ते महत्वाचे नाही. लोक ४००० चा मोबाईल घेउन त्याला स्क्रीनगार्ड लावतात, पण डोक्याला स्क्रॅच येऊ नये म्हणून हेल्मेट वापरत नाहीत, हा फालतुपणा आहे.

म्हया बिलंदर's picture

26 May 2015 - 3:03 pm | म्हया बिलंदर

१. अचानक वेग वाढवणे/ब्रेक लावणे....

सहमत

२. ३५-४० किमीप्रतितास किंवा ३००० आरपीएम....

चालेल.

३. सिग्नलला ३० सेकंदापेक्षा....

सर ही गाडी आपोआप ५-१० सेकंदात बंद होते आणि क्लच दाबला कि सुरू. मि देखील सिग्नल पाळतो.

४. फुल्ल टाकी नसेल तर....

यापुढे काळजी घेत जाईन.

अवांतरः सुरक्षेसाठी: मी हेल्मेट....

१०० वेळा सहमत. मि हेल्मेट शिवाय गाडी चालवत नाही.

टवाळ कार्टा's picture

26 May 2015 - 4:54 pm | टवाळ कार्टा

कचकून हाबिणंदन....माझ्यासारखे बाईक चलवणारे कोणीतरी आहे मिपावर

उगा काहितरीच's picture

23 Jun 2015 - 1:59 pm | उगा काहितरीच

अजून १ (बोक्याने सीट फाडलेली गाडी सध्या पुण्यात चालतेय)

भुमन्यु's picture

26 May 2015 - 3:03 pm | भुमन्यु

अवांतरः सुरक्षेसाठी: मी हेल्मेट वापरतो, आणि मला त्याचा अभिमान आहे. हेल्मेट घातल्यावर मान दुखते, आजू बाजूच नीट दिसत नाही, नीट ऐकू येत नाही, केस गळतात, ही सर्व कारणं मला पटत नाहीत. जरी त्यातील एखादे वा सर्व खरी असली तरी जीवापेक्षा ते महत्वाचे नाही. लोक ४००० चा मोबाईल घेउन त्याला स्क्रीनगार्ड लावतात, पण डोक्याला स्क्रॅच येऊ नये म्हणून हेल्मेट वापरत नाहीत, हा फालतुपणा आहे.

यासाठी सहमत. लोकं हेलमेट हे पोलिसांसाठी वापरतात. ही शोकांतिका आहे की आपण हेलमेट घालावे यासाठी सरकारला दंड करावा लागतो. अशी पण वेळ आली आहे.

हेल्मेट म्हंटले की पुणे आठवते... पुणे म्हटले अर्थातच पुणेकर... आता हेल्मेट आणि पुणेकर म्हंटले की हॅ.हॅ.हॅ...
हेल्मेटसक्ती

जाता जाता :- नारायण ! नारायण ! चला माझी गंधर्व लोकात चक्कर टाकायची वेळ झाली ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 7:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आगलावबाण ;)

नितीन पाठक's picture

26 May 2015 - 4:07 pm | नितीन पाठक

जर आपणास शक्य असेल तर स्प्लेंडर च्या दोन्ही चाकांमध्ये साधी हवा न भरता नायट्रोजन भरा. लांबच्या प्रवासात टायर गरम होत नाही. धक्के बसत नाही. चालवतांना आरामदायक वाटते. सध्या जास्त पॉवरच्या मोटारसायकल्स मध्ये नायट्रोजन च भरतात. कदाचित अ‍ॅवरेज मध्ये सुध्दा फरक पडेल.

आय स्मार्टने डिक्लेअर केलेले (जाहिरातबाजी केलेले) मायलेज ह्यावरुन होन्डा आणि हिरो मध्ये शाब्दिक मारामारी झाली आहे. ओरिजिनल इन्जिन होन्डाने डेव्हलप केले आहे त्यामुळे ते त्याचा आधार घेउन १०२ वर आक्षेप घेत होते.
एकॉनोमिक टाइम्स मध्ये उत्तरं प्रत्युत्तर आहेत. हिरो कडुन टेक्निकली काहि फारसं उत्तर आलेल वाटल नाही.
पण बेसिक इन्जिन स्प्लेन्डर्चच असल्याने ६५-७० च्या रेन्ज मध्ये येइल अव्हरेज. त्यापेक्षा जास्त आलं तर बोनस म्हणुन खुश व्हा.
वर बरेच सल्ले दिलेत गाडी चालवण्याच्या पद्धतीसाठी ते योग्यच आहेत.
शिवाय पहिल्या सर्व्हिसिन्ग नंतरच एव्हरेज कॅलक्युलेट करायला सुरवात करा.
सुरवातीचे २००० किमी हे एन्जिनचे रनिन्ग इन असते त्यामुळे गाडी सोबत दिलेल्या पुस्तकात दिलेया कोष्टकप्रमाणेच त्या त्या गीअरला स्पीड ठेवा. त्यात पहिल्या २ हजार मध्ये किती स्पीड ओलान्डू नये ह्याची सुचना असेल ती देखील काटेकोरपणे अमंलात आणा.
हॅप्पी बायकीन्ग. :)

झकासराव's picture

28 May 2015 - 10:51 am | झकासराव

ते बायकीन्ग हे बाइकीन्ग असे वाचा. उगा अनर्थ नको. :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jun 2015 - 7:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दुवा द्याल काय ह्या होंडा वि. हीरो चा?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jun 2015 - 8:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

थेंकु सर.

झकासराव's picture

26 Jun 2015 - 10:46 am | झकासराव

धन्यवाद टकाजी :)

मदनबाण's picture

28 May 2015 - 12:39 pm | मदनबाण

कोणाला बाईक Chain Lube स्प्रे चा अनुभव हाय का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 12:41 pm | टवाळ कार्टा

सर्व्हिस सेंटरवाल्यालाच सांगायचे ते करायला....सेपरेट घ्यायची गरज नाही

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 May 2015 - 1:01 pm | अनिरुद्ध.वैद्य

आमाला फ्री भेटलत … ५०० किमी झाले की करा ल्युब! तशी शेपरेट घ्यायची गरज नाई. २ मिनटाच काम असते. सेंटरवाल्यालाच पकडा.

मदनबाण's picture

28 May 2015 - 1:06 pm | मदनबाण

ओक्के...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado

म्हया बिलंदर's picture

28 May 2015 - 4:59 pm | म्हया बिलंदर

परवाच सरांसोबत अ‍ॅक्टिवा वर प्रवास करत होतो. सुरु करतानाच पुढच्या चाकात कमी हवा असल्याचं सरांच्या निदर्शनास आणुन दिलं. पंपावर जाउन हवा भरली, तर त्याने हि, "कदाचीत पंक्चर असेल चेक करुन घ्या." असा सल्ला दिला. साधारण १०-१५ कि.मि. नंतर एका पंक्चर वाल्याकडून चेक केलं तर त्याने ते कसलंतरी पाणी चाकावर ओतुन जिथे बुडबुडे आले तिथे दाभणासारखी सुई भस्सकन घातली आणि दुसर्‍या तसल्याच सुईने एक चिक्कट दोरा त्यात ओवला. झालं. असं एकेक करुन त्याने ६ पंक्चर काढले.

  1. ट्युब्लेस टायर्सचे पंक्चर असेच काढतात का?
  2. एकाच वेळेस ६ पंक्चर होते की त्याने काहीतरी करुन ६ पंक्चर काढले?
  3. ट्युब्लेस टायर्स पंक्चर होउनही लौकर कळत नसेल तर कसे लक्ष ठेवावे?
  4. ट्युब्लेस टायर्सची ट्युबवाल्या टायर्स पेक्षा वेगळी काय आणी कशी काळजी घ्यावी?

पंक्चरवाल्याची चालुगिरी असा एक धागा शोधा.

ह्या हिशोहिने त्य हुशेन बोल्ट्ला पण हरविन कुणी

चिगो's picture

23 Jun 2015 - 12:42 pm | चिगो

ह्या हिशोहिने त्य हुशेन बोल्ट्ला पण हरविन कुणी

अगागागागा.. अरे भाई, कहना क्या चाहते हो? पारच वाट लागली डोस्क्याची..

म्हया बिलंदर's picture

25 Jun 2015 - 6:19 pm | म्हया बिलंदर

+१

दुचाकीस्वारांच्या जातीत महिला भरपूर संख्येने असूनही या चर्चेत कितीशा महिलांनी मत नोंदवलं आहे?

धर्मराजमुटके's picture

24 Jun 2015 - 1:36 pm | धर्मराजमुटके

दुचाकीस्वारांच्या जातीत महिला भरपूर संख्येने असूनही या चर्चेत कितीशा महिलांनी मत नोंदवलं आहे?

मुद्दा बरोबरय पण
१. इथे मोटरसायकलवर चर्चा चालली आहे. बहुतांश महिला स्कुटर प्रकारच्या दुचाकी चालवितात त्यामुळे त्यांना या धाग्यात इंटरेस्ट नसणे शक्य आहे.
२. महिलांना तांत्रिक बाबींपेक्षा सुरक्षा आणि / किंवा स्कुटरचे बाह्यरुप कसे आहे यात जास्त रस असावा असे वाटते. उदा. कोणता रंग जास्त चांगला दिसेल ? लुक्स कसे आहेत वगैरे वगैरे. जाणकार म्हैला जास्त प्रकाश टाकू शकतील.

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2015 - 2:15 pm | टवाळ कार्टा

म्याचींग म्हणतात त्येला =))

धर्मराजमुटके's picture

24 Jun 2015 - 2:25 pm | धर्मराजमुटके

व्हयं गां. इसारलूच व्हतू बगा म्यां. आत्ता आठिवलं. आमी लयचं जालं तर काळ्या / निळ्या इजारीवर कंच्याबी रंगाची बंडी घालतू.
देवा, एक डाव मापी द्या. :)

काळा पहाड's picture

24 Jun 2015 - 6:51 pm | काळा पहाड

नाहीतर रस्त्यावर गुलाबी, व्हायोलेट, क्रीम, पिस्ता अशा रंगाच्या मोटरसायकली दिसल्या असत्या

धर्मराजमुटके's picture

24 Jun 2015 - 7:14 pm | धर्मराजमुटके

बस ??? पुरुषांचे रंगांचे ज्ञान स्त्रियांपेक्षा फारच कमी असते.
तुम्ही वांगी कलर, मोरपंखी कलर, रानी कलर, आंबा कलर अशी रंगांची नावे ऐकली आहेत काय ?

बहुदा त्यांचे लग्न व्हायचे असावे.

म्हया बिलंदर's picture

25 Jun 2015 - 9:01 pm | म्हया बिलंदर

पिवळट हिरवा, हिरवट जांभळा, जांभळट निळा, नवरट डांबरी.....

वैभव जाधव's picture

26 Jun 2015 - 5:50 pm | वैभव जाधव

ह्ये सगळे कलर अपाचे नायतर यामाहा एफ्झी आणि वेस्पात मिळतात.
नशीब चटणी कलर मागत नाहीत.

तुषार काळभोर's picture

26 Jun 2015 - 6:17 pm | तुषार काळभोर

चिंतामणी कलर माहितेय का??

म्हया बिलंदर's picture

26 Jun 2015 - 8:55 pm | म्हया बिलंदर

नाही ओ...

हे सगळं सर्विस सेंटर मधे कसं बरं रिप्लिकेट करणार????? गाडी स्टँडवर लाऊन अ‍ॅव्हरेज काढता येत नाही, त्यासाठी ती चालवावी लागते.

परंतू तुम्ही म्हणता तसेही गाडीचे अ‍ॅव्हरेज काढले जात नाही. गाडी एका जागी उभी करुनच ही टेस्ट केली जाते. खाली दिलेल्या लिंकनी कदाचीत तुमचे समाधान होइल अशी आशा करतो.

http://www.bikesindia.org/reviews/how-realistic-the-certified-fuel-effic...

बाईकच्या कंपनीला अशी सुविधा अधिकृत सर्विस सेंटरला देणे अशक्य नाही. कदाचीत आपले पितळ उघडे पडेल अशी बाईक कंपनीला भीती वाटत असेल. म्हणून मी जर का कंपनी असा दावा करते तर ती कंपनी तिच्या अधिकृत सर्विस सेंटरला आयडीअल कंडिशन्समध्ये गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून का देत नाही? दूध का दूध पानी का पानी समोरच होईल. असे म्हटले होते.

टवाळ कार्टा's picture

15 Jun 2015 - 10:27 am | टवाळ कार्टा

खिक्क...कस्ले विनोदी लिहिता हो...सविस्तर प्रतिसाद नंतर देईन

खिक्क...कस्ले विनोदी लिहिता हो...सविस्तर प्रतिसाद नंतर देईन

मी बाइकचे अ‍ॅव्हरेज काढण्याच्या डायनो टेस्टबद्दल लिहिलेय. त्यात विनोदी असे काय आढळले? अजून कोणत्या वेगळ्यापद्धतीने बाइकचे आयडीअल कंडिशन्समध्ये अ‍ॅव्हरेज काढत असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल. सविस्तरच द्या. ज्ञानात भर पडणे महत्वाचे.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2015 - 12:19 pm | टवाळ कार्टा

अर्रे हा प्रतिसाद द्यायचा राहूनच गेलेला
विनोदी यासाठी लिहिले कारण
बाईकचा standard average हा ARAI या मान्यताप्राप्त संस्थेकडून आलेला असतो...उठसूठ कितीही वेळा टेस्टिंग केले तरी त्यात बदल होऊ शकत नै
तसेच जर बाईक कंपनीने असे उठसूट कोणाही सोम्या-गोम्यासाठी (तुम्ही त्यातले नै असेच आपण समजू) सर्व्हिस सेंटरमध्ये टेस्टिंगची सोय ठेवली तरी नेहमी तेच तेच रिझल्ट मिळणार पण त्यासाठी सर्व्हिस सेंटरला त्याचा मेंटेनंस किती? ते लोक सरळ फाट्यावर मारणार असा non-productive खर्च

मार्मिक गोडसे's picture

24 Jun 2015 - 6:12 pm | मार्मिक गोडसे

फुस्स !

उठसूठ कितीही वेळा टेस्टिंग केले तरी त्यात बदल होऊ शकत नै

असहमत.
असे ARAI छातीठोकपणे सांगू शकत नाही. कंपनी बनविलेली प्रत्येक गाडी ARAI कडून टेस्ट करून घेत नाही.
असे असते तर एकाच कंपनिच्या सारख्याच मॉडेलच्या दोन वेगवेगळ्या बॅचच्या बाइकच्या अ‍ॅव्हरेजमध्ये फरक पडला नसता. माझ्या चुलत भावाची नवी कोरी स्प्लेन्डर ४५ च्या पुढे अ‍ॅव्ह्रेरेज देत नव्हती. कंपनिच्या अधिकृत सर्विस सेंटरला नियमीत सगळ्या सर्विस करूनही गाडीच्या अ‍ॅव्ह्रेरेजमध्ये काहीही फरक पडला नाही. सर्विस सेंटरवाले गाडीत दोष आहे हे मानायला तयार नव्हते. मी स्वतः गाडीचे अ‍ॅव्हरेज काढून बघीतले पुन्हा रिझल्ट तोच. शेवटचा उपाय म्ह्णून गाडीचे ब्लॉक पिस्टन बाहेरच्या गॅरेजवाल्याकडून बदलले. महिन्याभरात गाडीने ६० च्या पुढे अ‍ॅव्हरेज दिले.
कंपनीने अ‍ॅव्हरेजच्या बाबतीत दावा जरूर करावा त्याचबरोबर जबाबदारीही घ्यावी. वाटल्यास टेस्टिंगचे पैसे घ्यावेत. जो ग्राहक अ‍ॅव्हरेजसाठी गाडी घेतो तो आयुष्यभर पेट्रोलवर ज्यादा पैसे खर्च करण्यापेक्षा टेस्टिंगला पैसे देण्यास नक्कीच नकार देनार नाही.
धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2015 - 6:17 pm | टवाळ कार्टा

व्यवस्थित स्लेंडर ४५ चा अ‍ॅव्हरेज देणे शक्यच नाही

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2015 - 6:17 pm | टवाळ कार्टा

व्यवस्थित चालवली तर स्लेंडर ४५ चा अ‍ॅव्हरेज देणे शक्यच नाही

म्हया बिलंदर's picture

25 Jun 2015 - 8:56 pm | म्हया बिलंदर

गेल्याच आठवडयात एका i-smart वाल्याला विचारलं तर त्याने, "सध्या तरी २७(नेमकं??) देतेय पण ते शोरुम वाले म्हणतात की पहिल्या सर्विसींग नंतर(म्हण्जे नुकतीच घेतलेली असेल) जास्त देईल." असं सांगीतलं.

मला २७ पेक्षा जास्त भेटतोय म्हणुन समाधानी व्हावं की अपेक्षेपेक्षा कमी म्हणुन कुजत बसावं?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jun 2015 - 9:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आय स्मार्ट ला २७ मायलेज? ह्म्म!! ४१ मायलेजवाली व्यागन आर का काय ती गाडी घेउन टाका मस्तं फिरा गारेगार एसीमधुन.

संदीप डांगे's picture

26 Jun 2015 - 12:52 am | संदीप डांगे

२७ ....? काही ही हां (....)

सुबोध खरे's picture

26 Jun 2015 - 10:18 am | सुबोध खरे

१०० झाले

म्हया बिलंदर's picture

26 Jun 2015 - 4:50 pm | म्हया बिलंदर

नाही ओ सर... अजुन १०० होतंच नाही ६० च्या आसरासंच पळतेय.

वैभव जाधव's picture

26 Jun 2015 - 5:53 pm | वैभव जाधव

तुमच्या चालविण्यातच कायतरी गडबड असेल. आता बायकोला सांगू नका. विचारले तर बिनधास्त ५० सांगायचे. त्यांना ते पण जास्त वाटेल.

म्हया बिलंदर's picture

26 Jun 2015 - 9:03 pm | म्हया बिलंदर

ऐसा नै बोल्नेका....अहो अनुभवि आहोत. फक्त स्वत:ची पहीली गाडी आहे म्हणुन इथे विचारलं.

सुबोध खरे's picture

26 Jun 2015 - 10:20 am | सुबोध खरे

२७ मायलेज कसे मिळेल पेट्रोल चोरी तरी होत असेल अथवा टाकी किंवा कार्ब्यूरेटर मधून गळती होत असेल. माझ्या हिरो होंडा मधील पिस्टन रिंग खराब झालेल्या असताना सुद्धा ४५ मिळत होते.

झकासराव's picture

26 Jun 2015 - 10:47 am | झकासराव

२७ फक्त???????
कुच तो गडबड है दया..