आपली लिपी टिकेल का ?

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in काथ्याकूट
22 May 2015 - 6:30 pm
गाभा: 

आपल्यापैकी कितीजण मराठीत अंक व्यवस्थीत लिहु शकतात ? असतील थोडेफार सन्माननिय अपवाद. पण बहुतेक जण तर नाही लिहु शकणार. आपली मराठीत अंक वगैरे लिहीण्याची सवयच मोडली असे नाही का वाटत ? मराठी ५ व्या इयत्तेत असल्या पासुनच आपण इंग्रजीतच अंक लिहीत आलोय. बहुतेक लोकांच्या ऑफिसमध्येही आकडेमोड इंग्रजीतच होते. त्यामुळे साहजीकच आपली मराठीतुन अंक लिहीन्याची सवय मोडली. द्या सोडुन !
whatsapp , facebook, किंवा इतर कुठल्याही messenger वर चॅटींग करताना किती जण मराठीत करतात ? उगा इंप्रेशन मारायला नाही , कामासाठी आवश्यक असनारी चॅटींग जसेकी कुठ आहेस, कधी येतोय वगैरे. असतील थोडेफार महाभाग पण बहुतेक जण तर kuthay ? kadhi yenar ? असंच करत असतात. आहे सोपं इंग्रजीत लिहीनं , बहुतेक सर्व अ‍ॅप करतात मस्त सपोर्ट इंग्रजीला. म्हणुन पडली सवय. द्याना सोडुन !
खरंच हे सोडुन देणं म्हणजे आपल्या लिपीला सोडुन देणं नाही का ? मी भाषा नाही म्हणत - बोलतो आपण पूष्कळ मराठी. पण लिपीच काय ? ती टिकेल का ? ती टिकन्यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते ? का कुठे लावुन ठेवावा एखादा रोझेटा स्टोन? :(

डिसक्लेमर...
माझा इंग्रजी ला विरोध नाही . इंग्रजीची अनिवार्यता मला माहीत आहे. इंग्रजी न शिकणे म्हणजे काळाच्या किमान १०० वर्षे मागे जाणे . इंग्रजी न वापरणे म्हणजे सहजासहजी उपलब्ध असणारे ज्ञानसाठे नाकारणे. ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट, संगीत, साहित्य व तंत्रज्ञान नाकारणे.

रोझेटा स्टोन

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

22 May 2015 - 6:39 pm | आजानुकर्ण

इंग्रजी आकडेमोड म्हणजे काय हे नक्की कळले नाही. इंग्रजी अंक म्हणजे रोमन अंक. (I II III IV V वगैरे) मी कधीही इंग्रजीतून आकडेमोड केली नाही. माझ्या माहितीतील कोणीही या अंकांचा वापर करुन आकडेमोड करत नाही.
तुम्ही ज्याला इंग्रजी अंक म्हणताय (1 2 3 4 5 वगैरे) ते हिंदू-अरेबिक अंक आहेत. हिंदुस्तानातून (मुस्लिम जगामार्गे) पाश्चात्य जगात पोचलेले अंक. आता तुम्हाला हिंदू अंक टिकावे वाटताहेत की मराठी अंक टिकावे वाटताहेत हे आधी ठरवावे लागेल असे वाटते. ;)

मराठीतून अंक लिहिल्याने नक्की काय साध्य होईल तेही सांगा.

उगा काहितरीच's picture

22 May 2015 - 6:54 pm | उगा काहितरीच

इंग्रजी अंक म्हणजे रोमन अंक. (I II III IV V वगैरे) मी कधीही इंग्रजीतून आकडेमोड केली नाही. माझ्या माहितीतील कोणीही या अंकांचा वापर करुन आकडेमोड करत नाही.
तुम्ही ज्याला इंग्रजी अंक म्हणताय (1 2 3 4 5 वगैरे) ते हिंदू-अरेबिक अंक आहेत. हिंदुस्तानातून (मुस्लिम जगामार्गे) पाश्चात्य जगात पोचलेले अंक.

हे माहित नव्हतं ! धन्यवाद नवीन माहितीबद्दल.

मराठीतून अंक लिहिल्याने नक्की काय साध्य होईल तेही सांगा.

मी आग्रह नाही करत आहे. केवळ उदाहरण दिले आहे.

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 9:05 pm | टवाळ कार्टा

रोमन आकडे माहित नाहित???

उगा काहितरीच's picture

22 May 2015 - 11:14 pm | उगा काहितरीच

ओ साहेब , ते अरेबिक वगैरे नव्हतं माहीत . आम्ही समजायचो १ २ ३ ४ म्हणजे मराठी आणि 1 2 3 4 म्हणजे इंग्रजी . रच्याकने तुम्ही रोमन अंकानी आकडेमोड करता का ?

स्वप्नांची राणी's picture

25 May 2015 - 12:20 am | स्वप्नांची राणी

ओ साहेब, तुम्ही उगा काहितरीच च्यालेंज देऊ नका हां टकाला...

संदीप डांगे's picture

22 May 2015 - 6:46 pm | संदीप डांगे

ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट, संगीत, साहित्य नाकारणे >>

हितेश मोड ऑनः
नाकारल्याने काही फरक पडत नाही.
हितेश मोड ऑफ.

बॅटमॅन's picture

22 May 2015 - 6:48 pm | बॅटमॅन

च्यायला, हा लेख देवनागरीत लिहून एकप्रकारे तुम्हीच लेखातल्या भावनेच्या विरुद्ध बोलताहात असं वाटत नाही का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 May 2015 - 8:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पुन्हा एकदा मोडीलिपीत लिहायची वेळ येणार रे बॅटमना.

आयला मज्जाच की हो मग माई. मग पुन्हा एकदा ध चा मा होणार. ध चा मा कशाला, लो चा के सुद्धा होईल. कारण मोडी लिपी ही लिहायला जितकी सोप्पी तितकीच वाचायला अवघड आहे. =))

बॅटमॅन's picture

22 May 2015 - 8:30 pm | बॅटमॅन

"ते समयी बाजीरावसाहेबांसमवेत २०० लोक होते" ऐवजी "ते समयी बाजीरावसाहेबांसमवेत २०० केक होते" असं वाचता येतं. त्यामुळे केकचा शोध गोर्‍यांच्या अगोदर खुद्द पेशवाईतच लागलेला आहे असे नवीन संशोधनही येऊ शकते. =))

पिंपातला उंदीर's picture

23 May 2015 - 9:16 pm | पिंपातला उंदीर

बेकार हसलो ; )

खटपट्या's picture

22 May 2015 - 9:24 pm | खटपट्या

मी व्हत्सप्प्स वर मराठीत लीहीतो. कोणाला अँड्रॉईड्वर मराठीत टंकायचे असेल तर मदत करायला तयार आहे. मराठीत लीहील्याने वाचायलाही सोपे जाते (हा माझा अनुभव आहे) मोठ्मोठे मराठी लेख जर रोमन लिपी वापरून लीहीले असतील तर वाचायला बराच वेळ लागतो.

जशी विन्डोज मधे 'बरह'आहे तसे काही अॅन्ड्राॅईड मधे आहे का?
भ्रमणध्वनीमधुन टंकन करतांना खुपच अडचणीचे होते.....

खालील साईटवर जाउन विडीओ पहा. मी विडीओ पाहुन गुगल हिंदी इनपुट कीबोर्ड डाउनलोड केला. कॉनफीगर केला. मराठी टाईप करायला मजा येते.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.in...

विलासराव's picture

23 May 2015 - 12:21 pm | विलासराव

अनेक आभार!
यानिमित्ताने आम्ही मराठी लिहायला सुरवात केली.

उगा काहितरीच's picture

22 May 2015 - 11:18 pm | उगा काहितरीच

स्पर्श मराठी किबोर्ड वापरून लिहीत असतो मी.

रामपुरी's picture

22 May 2015 - 9:46 pm | रामपुरी

हो टिकेल

लालगरूड's picture

22 May 2015 - 9:47 pm | लालगरूड

आम्ही मराठी जपणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2015 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

उगा काहितरीच काय ?! नक्की टिकेल मराठीची देवनागरी लिपी !

नितिन थत्ते's picture

23 May 2015 - 5:37 pm | नितिन थत्ते

मोडी लिपी टिकवायची आहे की देवनागरी हे एकदा ठरवूया बुवा.

मधूनच कोणीतरी उठतो आणि मोडीच्या र्‍हासाबद्दल अश्रू ढाळतो.

मोडीचा र्‍हास कै इतक्या लौकर होत नाही. अलीकडे जागोजागी मोडी वर्गांचे मोड उठलेत. जालावरून आणि ऑफजाल अशा दोन्ही सोर्सेसकडून हे समजलेलं आहे. सांगलीच्या मथुबाई गरवारे गर्ल्स कॉलेजात तर यूजीसी अप्रूव्ह्ड १ वर्षाचा मोडी सर्टिफिकेट कोर्सही सुरू झालाय आता. महाराष्ट्र शासनाचे वर्गही दरवर्षी सुरू असतातच, पण डिमांड वाढली आहे. कैक शहरांत मोडीचे प्रायव्हेट क्लासेस सुरू झालेले आहेत.

बरोबर आहे पण ते नवीन काही लिहिणे ह्या उद्देशासाठी नसून जुनी कागदपत्रे वाचण्यासाठी असावे.

(जे योग्यदेखिल आहे कारण हजारो मोडी लिपीतील कागदपत्रे अद्याप वाचली गेली नसल्याचे समजते. न जाणो इतिहासावर काही नवा प्रकाश पडू शकतो.)

खटपट्या's picture

24 May 2015 - 5:31 pm | खटपट्या

नाही हो, आत्ताच कोणीतरी सावरकरांवरचे एक पुस्तक मोडी लीपीत अनुवादीत केले आहे.
थांबा, लिंक मिळाली की डकवतो..

चिमिचांगा's picture

24 May 2015 - 8:28 pm | चिमिचांगा

(जे योग्यदेखिल आहे कारण हजारो मोडी लिपीतील कागदपत्रे अद्याप वाचली गेली नसल्याचे समजते. न जाणो इतिहासावर काही नवा प्रकाश पडू शकतो.)

खि खि खि! त्यासाठी मोडी लिपी यायची काय गरज आहे? ते ब्रिगेडी पहा, त्यांना मोडीच काय, काहीच वाचता यायची मारामार असताना केवढाली इतिहास'निर्मिती' करतायत.

हो अर्थात त्यासाठीच आहे. तरी त्यासोबत मोडीतील मासिके, मोडी लेखन, इ. देखील सुरू आहे, तस्मात मॉडेस्ट रिव्ह्यव्हल चालू आहे असे म्हणायला हरकत नसावीसे वाटते.

चित्रगुप्त's picture

24 May 2015 - 10:20 pm | चित्रगुप्त

जालावरून आणि ऑफजाल.....
ऑफजाल हे अफजल सारखे वाटते. 'जालातीत' कसे वाटते ?

बॅटमॅन's picture

25 May 2015 - 7:38 am | बॅटमॅन

हाहा, अगदी अगदी. बंगाली उच्चार वाटतो. बाकी जालातीत पेक्षा जालबाह्य असे म्हटलेले बरे, कारण जे सध्या जालावर नाहीत ते जालावर कधी येऊच शकत नाहीत असे नाही, म्हणजे त्या अर्थाने ते जालातीत नाहीत.

चित्रगुप्त's picture

23 May 2015 - 9:07 pm | चित्रगुप्त

आपल्या पिढीपर्यंत देवनागरी टिकून असली तरी पुढल्या-पुढल्या पिढ्यांमधे देवनागरीचा उपयोग कमी कमी होत जाण्याची शक्यता बरीच आहे. माझे वडील व त्यांचे भाऊ आपसात मोडीतच पत्रव्यवहार करायचे, परंतु आम्हा भावंडांना मोडी येतच नाही. माझी मुले देवनागरी वाचू शकतात, पण लिहीत नाहीत, नातवंडांना कदाचित अशी काही लिपी असते, हेही ठाऊक असणार नाही...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 May 2015 - 2:04 pm | निनाद मुक्काम प...

आपल्या भाषेच्या लिपीला देवनगरी लिपी म्हणतात. सुदैवाने
तीच लिपी आपल्या राष्ट्र भाषेची आहे जी विंग्रजी शाळेत अजूनपर्यंत शिकवली जाते.
पुढील काही पिढ्या ही लिपी अस्तित्वात राहीन मात्र ह्या लिपीच्या माध्यमातून मराठीतून अभिव्यक्त होणे कमी कमी होत जाईल.

सुनील's picture

24 May 2015 - 5:02 pm | सुनील

आणखी काही पिढ्यांनंतर मराठी ही रोमन लिपीतूनच लिहिली गेली तर आश्चर्य वाटणार नाही.

मुळात मोडीतून देवनागरीत येण्याचे मुख्य कारण छपाई हे नवे तंत्रज्ञान होते. आणि अगदी याच कारणामुळे आता देवनागरीतून रोमन असा प्रवास होण्याची शक्यता खूपच आहे.

उगा काहितरीच's picture

24 May 2015 - 8:07 pm | उगा काहितरीच

सुनीलराल एकदम बैलाच्या डोळ्यात मारला कि! पण असे होऊ नये यासाठी काय करता येईल ?

हुप्प्या's picture

25 May 2015 - 7:16 am | हुप्प्या

संगणक, त्यातील अक्षरे साठवायची युनिकोडसारखी सर्वमान्य (स्टँडर्ड) पद्धती यामुळे देवनागरीच काय, मोडीही संगणकावर लिहिणे शक्य आहे. आजचे आधुनिक तंत्रज्ञान तडजोडी करायला भाग पाडत नाही. वापरणार्‍याला जे हवे ते तसेच्या तसे देण्याकडे त्याचा कल असतो. कमी खर्चात, निर्दोष व चोख काम करणे हे ह्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे.
अरबी, उर्दू, पर्शियन अशा अनेक लिप्यांमधे किचकट नियम आहेत. अक्षरांच्या स्थानावर त्याचे वळण ठरते. आकडे एका दिशेने लिहिणार तर अक्षरे दुसर्‍या दिशेने वगैरे. चिनी लिपीतही हाच प्रकार.
ती लिपी वापरणारे पुरेशा संख्येने असतील तर आधुनिक काळात देवनागरी टिकायला काही अडचण नाही.
अर्थात हा संघर्ष असणार आहे. फक्त रोमन लिपीच बरी असे म्हणणारे आळशी, देवनागरी प्रतिगामी आहे, मोडी ब्राह्मणी आहे ती संपलेलीच बरी म्हणणारे तथाकथित पुरोगामी ह्यांना पुरून उरणारे देवनागरी प्रेमी असतील तर ह्या लिप्या अनेक शतके टिकून रहातील.
चांगले साहित्य, लेख, कविता पुस्तकी स्वरुपात वा ब्लॉगच्या रुपात देवनागरीत उपलब्ध होत असतील तर लोक ती लिपी वाचण्याचे कष्ट घेतीलच.
मराठी, हिंदी, नेपाळी, कोकणी अशा अनेक भाषा देवनागरी वापरतात. त्यामुळे ही लिपी जाणणारे, वापरणारे भरपूर आहेत. काही बाबतीत ह्या भाषेत लिहिणे हे इंग्रजीपेक्षा जास्त सोपे आहे.
मी तरी ह्या विषयात आशावादी आहे.

सांगलीचा भडंग's picture

25 May 2015 - 2:40 am | सांगलीचा भडंग

नाही टिकली तर दुसरी शिकू . लिपी चा जाज्वल्य अभिमान नसल्यामुळे फार विचार केला नाही

माझा उत्तरभारतीय रुम पार्ट्नर मराठी भाषेला हींदीची स्लँग म्हणतो. त्याचा युक्तीवाद असा की मराठी ही सुद्धा हींदी प्रमाणे देवनागरीत लीहीली जाते. जर दोन भाषा एकाच लीपीत लीहील्या जात असतील तर त्या एकमेकांच्या बोलीभाषा म्हणणे योग्य आहे का?
मला नक्की माहीत नाही पण कोकणी भाषा सुध्दा देवनागरीत लीहीली जाते बहुदा. तसेच नेपाळीसुध्दा. (चू.भू.दे.घे.) म्हणून त्यांना हींदीच्या बोलीभाषा बोलणे योग्य होणार नाही.
कोकणी तर माझ्या उत्तरभारतीय मित्राला सौद ईंडीयन भाषा वाटते. :)

राही's picture

25 May 2015 - 1:11 pm | राही

अशा वेळी आपण सांगू शकतो की जगातल्या कितीतरी भाषा रोमन लिपीत (थोडा-फार फरक करून) लिहिल्या जातात. पण म्हणून त्या एकमेकांच्या बोली-भाषा ठरत नाहीत.

खटपट्या's picture

26 May 2015 - 8:19 am | खटपट्या

बरोबर...

सौन्दर्य's picture

26 May 2015 - 3:30 am | सौन्दर्य

देवनागरी लिपीत लिहिलेली मराठी भाषा, लिपी स्वरूपात अजून तरी टिकून आहे. जिथे नवीन पिढी शिक्षणच इंग्लिश माध्यमातून घेते आहे तिथे देवनागरी लिपीत स्वताला व्यक्त करणे नक्कीच कठीण जाणार आहे. नवीन पिढी मराठी बोलेल, समजेल फार फार तर वाचूही शकेल परंतु लिहिणे थोडे अवघड होणार आहे. मी स्वता कॉम्प्युटरवर गुगल इनपुट टूल्स वापरून देवनागरीत लिहितो. इतकेच कशाला मायक्रोसोफ्ट ऑफिसच्या विविध सुटसमध्ये देखील देवनागरीत लिहितो. whatsappवर देखील देवनागरीत लिहितो जे मराठी आणि हिंदी भाषिक, इंग्रजी नीट न समजणाऱ्या व्यक्तींना फार सोयीचे पडते. माझ्या ७५ वर्षे वयाच्या सासूबाई देखील देवनागरी लिपी वापरून स्मार्टफोन वरून मेसेज पाठवतात.

लिहली गेली तर नक्कीच टिकेल ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;) Ellie Goulding