अशी सुरुवात होऊ शकते का???

कोकण कन्या's picture
कोकण कन्या in काथ्याकूट
21 May 2015 - 5:53 pm
गाभा: 

जाता येता...सिग्नल ला थांबल...किवा तसेही..आपल्याला आजूबाजूला किती लोक दिसतात जे..संधी मिळताच रस्त्यावर पानांच्या आणि गुठ्क्याच्या पिचकार्या मारताना दिसतात..रस्त्यावरून जाताना गाडीवर फोन वर बोलणारे...रस्तावरून हिरोगिरी करत....इतर गाड्यांना कट मारणारे ....त्यांचाकडे बघून राग व्यक्त करण्या वतिरिक्त काहीही करत येत नाही ह्याचा राग येतो......जास्तीत जास्त रागाने बघ्ण्यावातिरिक्त काहीही करू शकत नाही......त्यातही जर समोर च्या व्यक्तीत जर लाज असेल तर ते दुर्लक्ष करतात किवा मग लाजेखातर सॉरी तरी म्हणतात.....पण काही निर्लज्ज माणस वर तोंड करून आपल्याकडेच असे बघतात कि आपणच काही चुकीच करतोय...किवा काहीतरी अपशब्द वापरतात........
मला एक कल्पना सुचली....तुम्हाला कशी वाटतेय सांगा...आणि ती खरोखर प्रत्यक्षात कितपत होऊ शकते हे देखील सांगा....
मला असे वाटते आज मोठ्या शहरांमध्ये किवा गावांमध्ये सुद्धा बेरोजगार तरुणाचे प्रमाण काही कमी नाही....साधारण १०/१२ किवा निदान एखाद्याला आहे त्या परीस्तीतून पुढे जायची इच्छा आहे अश्या तरुणांना ह्या मध्ये सहभागी होऊ द्यावे,शिक्षणाची तशी अट नाही...पण लिहिता वाचता येणारे आणि स्वतःच्या परीस्तीतीत सुधारणा करू इच्छा असलेल्यांना आणि ते स्वतः पूर्णपणे निर्व्यसनी असायला हवेत....ह्या लोकांना सरकार तर्फे एक अधिकृत ओळख पत्र द्यायचे...आणि अश्या लोकांना सिग्नल किवा रहदारी च्या रत्यावर उभे राहून जी जी लोक थुंकताना दिसतील..किवा कचरा टाकताना आणि...तेवढाच महत्वाच म्हणजे गाडी चालवताना फोन वर बोलताना दिसतील अश्या महाभागांना थांबून...त्यांना त्यांच्या गुन्ह्य प्रमाणे दंड आकारायचा.....हा दंड....सरकार तर्फे जाहीर करायचा..उदा :थुंकताना दिसला कि १००रु ,गाडी चालवताना फोन वर बोल्नार्यासाठी १००रु,कचरा करताना दिसला कि ५० रु अश्या किरकोळ पैसे...जे भरताना सामान्य किवा गरीब माणसाला जास्त...त्रास हि नाही झाला पाहिजे...पण त्याच्या मनात ह्या गोष्टी चा वचक बसला पाहिजे कि आपल्याला कोण बघत तर नसेल?
असे ४-५ वेळा दंड भरल्यानंतर तरी निदान हे पिचकारी मास्तर आणि फोन बोलणारे हिरो ....पुन्हा एकदा विचार करतील.....आणि ह्या सगळ्या तून दिवसभरात जी काही कमी होईल ती त्या पदावर नेमलेल्या व्यक्तीची मग दिवस भरात त्यांनी किती हि करावी...५००/१०००...जी काय असेल ती....त्यांच्या कष्टाचे फळ....त्यासाठी त्यांना वेगळा पगार द्यायची गरज नाही.....फक्त एका वरच्या अधिकार्य्कडे रोजच्या रोज कामावर जातोय कि नाही ह्याची नोंद झाली पाहिजे...आणि हि नेमलेली लोक...एखाद्या दुर्बलावर अन्याय तर करीत नाहीत न ह्या साठी cctv कॅमेर्याची मदत किवा वरिष्ठ अधिकार्याची मदत घ्यावी........ह्यातून ज्यांना खरच आर्थिक आणि कामधंद्याची गरज आहे त्यांना रोजगार मिळेल..आणि समाज कार्य होईल...आणि एकूणच...आपला परिसर आपला देश नवीन सुरुवात करेल...

मला असे वाटतेय ते तुमच्या समोर मांडतेय.....तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या....ह्या मध्ये सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून विचार मांडलेत..ह्या मध्ये कदाचित खूप चुका असू शकतील...पण तरीही मी माझे म्हणणे सांगतेय...

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 5:56 pm | टवाळ कार्टा

त्यांची गत सुध्धा आत्ता हिच कामे करण्यासाठी जे लोक आहेत त्यांच्यासारखी होईल

कोकण कन्या's picture

21 May 2015 - 6:00 pm | कोकण कन्या

ह्या कामांसाठी सध्या माणस नेमलीली आहेत?

कल्पना चांगलीय पण काय आहे...

.
.
.
WE THE PEOPLE

नीलमोहर's picture

21 May 2015 - 5:59 pm | नीलमोहर

छान कल्पना आहे, अंमलात आणायला काही हरकत दिसत नाही

उगा काहितरीच's picture

21 May 2015 - 6:52 pm | उगा काहितरीच

कल्पना छान आहे , थोडा बदल सुचवतो... कुणी थुकताना दिसला की एक कानाखाली तिथेच , कचरा टाकताना दिसलं कि पेकाटात लाथ . तिथल्या तिथंच . हं फक्त थोडे दणकट भरती करायचे.मज्जाच मज्जा .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 May 2015 - 9:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तुझे उगा काहितरीच रे उगा काहितरीच.

उगा काहितरीच's picture

21 May 2015 - 10:21 pm | उगा काहितरीच

माईसाहेब, जस्ट इम्याजीन ! लै मज्जा येईल .

कोकण कन्या's picture

22 May 2015 - 4:56 pm | कोकण कन्या

खरच कल्पना फार छान आहे....खर तर हीच काळाची गरज आहे:)

उगा काहितरीच's picture

22 May 2015 - 7:08 pm | उगा काहितरीच

ट्रायल व्हर्जन करायचा कुठं ? :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 May 2015 - 8:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान कल्पना ग कोकण कन्ये.मोठ्या शहरांत हे राबवता येईल.पण लहान गावांचे,जिल्ह्यांच्या ठिकाणांचे काय्?तेथे तर लोकच बुकलतील स्वच्छतेची,कायद्याची महती सांगणार्यांना.

कोकण कन्या's picture

22 May 2015 - 4:58 pm | कोकण कन्या

खर आहे...शहरात हि काही वेगळे नाही......आपापल्या परिसरात प्रत्येकजण दादागिरी करताना दिसतातच महाभाग....फक्त शहरांमध्ये..करमणूक झाली कि सोडून देतील...

सुबोध खरे's picture

21 May 2015 - 9:29 pm | सुबोध खरे

मुंबई महापालिकेने असा उपक्रम २०१२ मध्ये चालू केला होता.आणि काही तरुणांना असे मार्शल म्हणून नेमले होते आणि त्यांना दंड करण्याचा अधिकार दिला होता. परंतु अशा मार्शलच्या माजोरीपणा विरुद्ध बराच गदारोळ होऊन शेवटी तो उपक्रम बंद करावा लागला होता असे आठवते.

कोकण कन्या's picture

22 May 2015 - 4:59 pm | कोकण कन्या

दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद ....मला ह्याची माहिती नव्हती

मार्मिक गोडसे's picture

21 May 2015 - 10:02 pm | मार्मिक गोडसे

मुंबई क्लिनअप मार्शलांनी २००८-०९ ह्या एका वर्षात ६ कोटी रुपये दंड वसूल केल होता. २०१४ पासून ही योजना बंद करण्यात आली आहे. कारण नेहमीचेच..

काळा पहाड's picture

21 May 2015 - 10:27 pm | काळा पहाड

थोडासा बदल सुचवतो. एखाद्या गाडी कट मारणार्‍याला बाजूला घ्यायचं आणि गाडीवरून उतरवायचं. चारी बाजूचा ट्रॅफिक बंद करायचा. नंतर चौकाच्या बरोबर मध्ये तीन चार पोलिसांनी मिळून ओले केलेले बांबू घेवून विधात्याने शिक्षा करण्यासाठी दिलेल्या अवयवावर सलग दोन मिनिटे फटके द्यायचे. दोन मिनिटांनंतर पेकटात एक लाथ घालायची आणि ट्रॅफिक पुन्हा सुरू करायचा.

रवीराज's picture

21 May 2015 - 11:28 pm | रवीराज

ट्राफिक पोलिस दिवसभर नुसतच ओल्या बांबुने बडवायचे काम करताहेत, चौकात पोलिस बांबु फिरवताहेत आणि दुचाकीस्वार त्या बांबुला चुकवत गाड्या पळवत आहेत, जो तावडीत सापडतो त्याला पोलिस लोळवताहेत ह्या संधीचा फायदा उठवुन बाकीचे स्वार सैराभैरा गाड्या पळवताहेत,पोलिसपण मग आधीच्याला सोडुन त्यांच्या मागे पळताहेत, पुन्हा जो तावडीत सापडतो तो बांबुने फोडला जातोय

नंबर फिफ्टि फोर, दि रोड विथ दि बॅम्बू फोक !
..... बांबूने जमीन पिवळीशार !

नगरीनिरंजन's picture

22 May 2015 - 8:52 am | नगरीनिरंजन

हे असे लोक ठेवून काहीही उपयोग होत नाही लोकांच्या वागण्यावर. ज्यांना पळवाट काढायचीच आहे ते काढतातच.
स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे होऊन गेली तरी लोकांना मेंढरांसारखं वळावं लागत असेल तर अशा समाजाच्या भवितव्याबद्दल काहीही आशा नाही. आज सगळं आलबेल आहे म्हणून ठीक आहे पण येत्या काही वर्षात लोकसंख्येची वाढ, हवामान बदल वगैरे गोष्टींमुळे आपल्या सुसंस्कृत समाजाचे पितळ उघडे पडणार आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 May 2015 - 1:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

मागे पेपरात एक पत्र आले होते वाचकांचे पत्रव्यवहार मध्ये...की प्रत्येक चौकात चारही बाजुला काठ्या घेउन माणसे उभी करायची..आणि सिग्नल तोडणारा दिसला की काठी हाणायची पायावर...बस्स् दंड नाही की पावती नाही.

आयडीया मस्त आहे.

खंडेराव's picture

22 May 2015 - 1:09 pm | खंडेराव

सगळीकडेच होते असे लोक उभे केलेले आधी, सध्या काय परिस्थिती आहे माहीत नाही.

आपण उपरोध हे हत्यार पुरेसं वापरत नाही.

माझा एक मित्र (राहणार शनिवार पेठ) कुणी कटबिट मारला, आणि नंतर तोच मनुष्य सिग्नलला वगैरे भेटला, की त्याच्यापुढे जाऊन अत्यंत नम्र पण मोठ्ठ्या आवाजात

"वा: ... माऊली ... वा:. काय मजा आणलीत कट मारून! असा कट मारणं फार कमी वेळेला बघायला मिळतं..."

असं ओरडतो. आसपासचं पब्लिक हसायला लागतं. अगदी काळ्या-काचा-भाऊ-दादा-कॉर्पियोवालेही या अनपेक्षित हल्ल्याने एकदम शरमिंदा झालेले पाहिले आहेत!

मदनबाण's picture

22 May 2015 - 2:58 pm | मदनबाण

अरे आदू-दादू "उपरोध" समजण्यासाठी आवश्यक असणारा मेंदुच अश्या कट मारणार्‍या काही माजुरड्या धेंडांच्या कवटीतुन मिसिंग असतो त्यांचे काय करणार तू ?
बाकी सल्ला चांगला आहे... जमेल तसा या हत्याराचा प्रयोग करण्यास हरकत नाही ! :)

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi

तां खरां. पण स्वतःचा गजनी न होऊ देता सूड घ्यायची ही आयड्या बेस्ट वाटली मला.

कपिलमुनी's picture

22 May 2015 - 2:52 pm | कपिलमुनी

हिंजवडीमध्ये वाहतूक पोलिसाला बडवला . का ? नो एंत्रीमध्ये आलेल्या 'भाऊची' गाडी अडवली म्हणून !
तर बाकीच्यांचे काय हाल

काळा पहाड's picture

22 May 2015 - 4:19 pm | काळा पहाड

पोलीस कमिशनर ला काही तरी वाटायला पाहिजे त्याबद्दल. हे कमिशनर लोक लोकांनी नियम पाळावेत वगैरे उपदेश करत असतात. पण पोलिसांच्या वर हात उचलणं या साठी कमिशनर ने स्वतः पुढे होवून त्यात असणार्‍या भाऊचा अपघाती मृत्यू घडवून आणायला हवा होता.

कपिलमुनी's picture

22 May 2015 - 4:38 pm | कपिलमुनी
तिमा's picture

22 May 2015 - 4:13 pm | तिमा

तुम्ही ही कल्पना मोदींकडे पाठवा. व्यवहारी असेल तर करतील काहीत्तरी.

काळा पहाड's picture

22 May 2015 - 4:21 pm | काळा पहाड

मिलॉर्ड, लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर इज अ स्टेट सब्जेक्ट.

तिमा's picture

22 May 2015 - 4:44 pm | तिमा

बरं बरं, मग देवेंद्रकाकांकडे पाठवा.

सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...खर तर काही जणांनी सांगितल्या प्रमाणेच.सध्या वागणे हि काळाची च गरज आहे ....कि दिसल्यावर कानाखाली द्यायची....आणि सिग्नल ला चार चार मानस ठेऊन तिथल्या तिथे वसुली करायची...पावती वैगेरे ची भानगड च नको ...पण आपल्या कडे कायदेच खराब आहेत...एखादा अधिकारी प्रामाणिक पणे काही करत असेल तर त्याच्या वर त्याचे वरिष्ठ दबाव आणून स्वताच्या पंगतीत बसवतात ....आणि हि पायरी फार वर परेंत असते सामान्य माणूस कितपत दाद मागणार?आपण आपलीच समजूत घालायची आणि दुर्लक्ष करायला शिकायचं अस होत जात......कधी कधी डोंबिवली फास्ट मधील संदीप कुलकर्णी आठवतो ...अगदीच....तशी तर अवस्था होणार नाही न.....

तिमा's picture

23 May 2015 - 3:24 pm | तिमा

डोंबिवली फास्ट सारखं वागून खरं आयुष्य कशाला उध्वस्त करायचं ? त्यापेक्षा हा असा गेम खेळा.
http://www.misalpav.com/node/25707