मिसळ पाव - श्री गणेशा!

हर्षल पतिंगे's picture
हर्षल पतिंगे in जनातलं, मनातलं
21 May 2015 - 3:13 pm

नमस्कार मित्रमंडळी,
बरेच वर्षापासून विचार करत होतो की 'मिसळ पाव' खायला सुरुवात करुयात ; पण काही करून योग येईना.
बरेच जण म्हणतात की योग हा येत नसतो, तो आणायचा असतो. येत नसेल तर त्याचा येण्या-जाण्याचा खर्च उचलायची तयारी दाखवावी लागते असं म्हणतात.
तर मी ही तयारी दखवल्यावर योग तर एका पायावर तयार झाला येण्यासाठी. नशीब! (जाऊ दे सध्याच नशीबा बद्दल नको बोलायला. लवकर रुसायची सवय आहे म्हणतात त्याला)

तस तर वेबसाईटच्या वरच्या कोपर्यातलं नुसतं चित्र बघायलाही भेटं देणं मला वावगं वाटणार नाही; पण त्याचा आस्वाद घेण्यातली मजा काही औरच.

असो. मी इथे माझी मिसळ वाढत जाईन; तुमची रसिकता 'पाव'ली कि मेजवानी झालीच म्हणून समजावी.

(ह्या वेबसाईट वर मस्तपैकी मिसळ कोण बनवतं ते पण सांगा. मी पण तिथे हजेरी लावतो मग.)

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

स्पा's picture

21 May 2015 - 3:15 pm | स्पा

ऑ, अच्च जाल्ल

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2015 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा

@ऑ, अच्च जाल्ल>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif हे बगा आलं..मिपा चं पाव वालं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

जेपी's picture

21 May 2015 - 3:20 pm | जेपी

व्वा ...तोंपासु..

उगा काहितरीच's picture

21 May 2015 - 3:28 pm | उगा काहितरीच

ब्रेकिंग न्यूज : मिपावर नवीन आयडींचा सुळसुळाट.

उगा काहितरीच's picture

21 May 2015 - 3:32 pm | उगा काहितरीच

लेख अतिशय आवडला . पुभाप्र हेवेसांनलगे . ( स्वसंपादन सुरू करा परत प्लीज !)

अजया's picture

21 May 2015 - 3:38 pm | अजया

मिपावर नक्की नविन का?
पुढील शब्दांचे अर्थ सांगा,अनर्थ करायला मिपाकर समर्थ अाहेतच!!!
पुलेशु
रच्याकने
पुभालटा
टेम्पोत बसवणे
सध्या हा बालवर्गाचा अभ्यास करुन ठेवा!

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 3:46 pm | सानिकास्वप्निल

खि खि खि

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 4:01 pm | टवाळ कार्टा

मिपावर नक्की नविन का?

असे विचारल्यावर नाही उत्तर मिळणार आहे का कधी? :)

हर्षल पतिंगे's picture

21 May 2015 - 4:22 pm | हर्षल पतिंगे

खरच नवीन आहे मिपा वर.
वर लिहिलेल्यापैकी एकाचाही अर्थ मला माहीत नाही.

ह्याची शिकवणी कुठुन मिळेल? :)

इथे तर प्रतिक्रियांचिच मिसळ झलेली दिसतेय.

अजया's picture

21 May 2015 - 5:09 pm | अजया

अभ्यास वाढवा.

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 5:19 pm | टवाळ कार्टा

असे सांगायच्या आधी त्याचा अर्थपण सांगा त्यांना =))

बचेंगे मिपापर तो अर्थभी कळेंगे आपोआप=))

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 5:47 pm | टवाळ कार्टा

इरसाल मिपाकर नवख्या मिपाकरांना आधी ४-५ वेळा बुचकळून काढून मग मिपासागरात पोहायला शिकवतात

आज टक्याच्या जीभेवर सरस्वतीने मराठीचा क्लास उघडलेला दिसतोय.

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 6:20 pm | टवाळ कार्टा

मी या वाक्यातसुध्धा चावट अर्थ शोधू शकतो ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 May 2015 - 7:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ट्रॉलाहिता =))

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2015 - 3:49 pm | प्रसाद गोडबोले

काही जुन्या आयडीं कडुन मिपामृत घ्या ... फार उपयोगी पडेल !

नाखु's picture

21 May 2015 - 4:02 pm | नाखु

आय्डी ओळखायचे एखादे २१ उपेकक्षीत "नव्"नीत संच दे की !!!

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2015 - 4:06 pm | प्रसाद गोडबोले

काही सान्गता येणार नाही अश कारणांमुळे तुर्तास (आणि त्यानंतरही ) आम्ही मिपावर थंड घेत आहोत .... नाहीतर लेखच पाडला असता आयडींच्या गुणविशेषम्ना सकट ;) =)) !!

आता आम्ही आमचा सारा टवाळपणा , मजेशीरपणा , स्पष्टवक्तेपणा बाजुला ठेवुन फक्त भावना बंबाळ लेखन करायचे ठरवले आहे :-|

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 4:08 pm | टवाळ कार्टा

म्हणजे दवणीय स्टैल का?

नाखु's picture

21 May 2015 - 4:13 pm | नाखु

मी पाहिलेला "गिरिजाकाका" हा नाहीच, कधीपण प्रतीसाद्-फुलांची अपेक्षा न ठेवणारा होता तो.
तुझ्याकडून भावनाप्रधान पेक्षा भावना प्रधान (दोन्ही वेगळे शब्दच अर्थासहीत) लेखाची अपेक्षा असलेला

जुन्या सुकांता-व्रुत्तांताचा वाचक.
नाखु

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2015 - 4:13 pm | प्रसाद गोडबोले

दवणे + अलका कुबल + बाबुजी उर्फ आलोकनाथ + ब्रह्मे काका + प्रवचनकार

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2015 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले

आणि हो श्रीगुरु बालाजी तांबे राहिलेच !!

( कृपया स्वसंपादन परत सुरु करता येईल काय ? )

मंगला गोडबोलेकाकूंना पण अ‍ॅड करा. भरीताची रेसिपी सांगताना त्या एकदा "अशी बरं का, अगदी 'स्नेहाळ' वांगी घ्यायची" म्हणाल्या होत्या. =))

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2015 - 11:41 am | प्रसाद गोडबोले

'स्नेहाळ' वांगी

>>>>

=))

मदनबाण's picture

22 May 2015 - 11:44 am | मदनबाण

इथे तुमचे आणि इतर नवमिपाकरांचे स्वागत... :)
तुमचे अनुभव विश्व आम्हा सर्वांसाठी खुले करा आणि बिनधास्त लिहा... :)

@ प्रगोशी सहमत...
अरे स्वसंपादनाची सोय काय को काढली रे बाबा ! संपादकांना अजुन किती छळणार आम्ही ? ही सोय परत देण्यात यावी यासाठी आता काय वेगळे करायचे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake It Off... ;) :- Taylor Swift

(ह्या वेबसाईट वर मस्तपैकी मिसळ कोण बनवतं ते पण सांगा. मी पण तिथे हजेरी लावतो मग.)

ईथे न्,ना, नि, नी, ने सिरीज्वाले मिसळ बनवत्तात अशी माहिती आहे. विचारुन बघा.

हाडक्या's picture

21 May 2015 - 4:17 pm | हाडक्या

ईथे न्,ना, नि, नी, ने सिरीज्वाले मिसळ बनवत्तात

हा मिसळपावचा गाडाच मुळी "नि"लकांताचा आहे राव.. ;)

इरसाल's picture

21 May 2015 - 4:45 pm | इरसाल

त्याचा गैरफायदा घेणारे आहेत ना ;)

मोहनराव's picture

21 May 2015 - 4:38 pm | मोहनराव

मिसळपाववर स्वागत!

बाबा पाटील's picture

21 May 2015 - 8:25 pm | बाबा पाटील

मिसळीची माहिती हवीय,इथले नमुने बघायचे मग या मिसळपावचा पुराणपुरुष विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर सध्या थोबाडपुस्तकावर्/फेसबुकवर शिळोप्याची ओसरीत बसलेला असतो तिथे भेट त्याला,तुला बरच काही कळेल.

आदूबाळ's picture

22 May 2015 - 11:52 am | आदूबाळ

काका, लेखाचा पतंग सोडायला हरकत नाही. पण थोडा आशयाचा मांजादेखील लावा.