मलाही कविता सुचली

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
21 May 2015 - 12:57 pm

मलाही कविता सुचली
मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।।
सक्काळी सक्काळी उठून
ब्रशला पेस्ट मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। १ ।।
आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। २ ।।
हाफिसात निघताना
बुटाची लेस मी बांधली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ३ ।।
बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ४ ।।

कवी - अथक घासकडवी
(माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती .
तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )

अभय-काव्यअभय-लेखनधोरणमांडणीधर्मपाकक्रिया

प्रतिक्रिया

इकडे कविता सुचत नाहीत..होतात..

(नकवी) जेपी

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 1:10 pm | टवाळ कार्टा

कच्चा मसाला कस्ला ठासून भरलेला आहे ;)
परंतू आम्ही व्हीआरेस घेत्ली :)

टक्या होऊन जाऊदे...वाटलस याच धाग्यावर टाक

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 1:19 pm | टवाळ कार्टा

ऐसा नक्को बोलू रे...मेरे हात मे खुज्ली होना :)

खुज्ली होता तो खुजानेका ,काय की शरम. =))

दमामि's picture

21 May 2015 - 1:51 pm | दमामि

अरे होउन जाउंद्या!

नाखु's picture

21 May 2015 - 2:03 pm | नाखु

गुरू आज्ञेने बांधलेला आहे.
तेव्हा त्याला भरीस घालू नका.

साक्षात्कारी वाचक
नाखु

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 2:13 pm | टवाळ कार्टा

खबर पोचली वाट्टे =))

खेडूत's picture

21 May 2015 - 1:11 pm | खेडूत

अतिसुंदर!

अथकपणे अश्याच कविता करा!

मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.

तुम्हाला कधी सुचते हो कविता ?

स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात …

(आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )

दमामि's picture

21 May 2015 - 1:50 pm | दमामि

धन्यवाद!
गुर्जी कोण यावर प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 2:13 pm | टवाळ कार्टा

मिपापे येकीच गुर्जी हय :)

दमामि's picture

21 May 2015 - 2:32 pm | दमामि

कोण हो?कोण हो?कोण हो?

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 2:56 pm | टवाळ कार्टा

पहिल्याच दिवशी खफ-खफ आणि प्रतिसाद-प्रतिसाद खेळताय आणि म्हणता गुर्जी नै माहित =))

वेल्लाभट's picture

21 May 2015 - 1:59 pm | वेल्लाभट

सुचली ना ! गुड.

चित्रगुप्त's picture

21 May 2015 - 2:00 pm | चित्रगुप्त

ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 2:14 pm | टवाळ कार्टा

वर्तमानपत्र वाचण्यासाठीच नेले असावे अशी आशा करतो =))

पैसा's picture

21 May 2015 - 2:04 pm | पैसा

बरं बरं. इथे काहीजणांना कविता होतात.

हे घासकडवी त्या घासकडवींचे कोण?

आधी गुर्जी कोण ते कळू दे , मग याचे ही उत्तर देतो.

राजेश घासकडवी नामक आयडीला जुने लोक गुर्जी म्हणत असत. आता सांगा आपण कोण ते/त्या!!

दमामि's picture

21 May 2015 - 3:09 pm | दमामि

मी त्यांचा कुणीच नाही!
महितीबद्दल धन्यवाद!

चुकलामाकला's picture

21 May 2015 - 5:24 pm | चुकलामाकला

बढीया!

विवेकपटाईत's picture

21 May 2015 - 8:23 pm | विवेकपटाईत

बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली

या ओळी मात्र सत्य कथन आहे.

दमामि's picture

22 May 2015 - 7:10 am | दमामि

माझी खरकटी वेदना जाणून घेतल्याबद्दल आभार हो, पटाईत भाऊ!

तिमा's picture

24 May 2015 - 5:06 pm | तिमा

आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।।

कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 5:13 pm | टवाळ कार्टा

खिक्क

टक्या, नको तिथं खिक्क करयची भारी वैट सवय तुझी!

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 12:11 pm | टवाळ कार्टा

समजला अरसिकपणा lllluuuullllluuuuuuu

अहो, मग कविता नाही कादंबरी सुचली असती.