सुंदरीचे ओझे

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
20 May 2015 - 5:28 pm

तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले.
तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.
‘चिंता करू नकोस मुली, ये!’ असे म्हणून त्याने तिला अलगद उचलले आणि ओढ्यापलीकडे नेऊन सोडले.
इकीदो हा सगळा प्रकार तोंड वासून पाहत होता. मुक्कामाचे ठिकाण येईपर्यंत तो काहीच बोलला नाही. रात्र झाली. पाउस पूर्ण थांबला . आकाशात पूर्ण चंद्र उगवला . दोघे उघड्यावर हवा खात बसले. तान्झेन शांतच होता पण इकीदोला काही रहावले नाही! जराशा उद्वेगाने तो म्हणाला, ‘आपणा भिक्खूना स्त्रियांच्या जवळही जाण्याची परवानगी नाही, त्यातल्या त्यात तरुण, सुंदर स्त्रीच्या जवळ तर नाहीच नाही. तसे करणे म्हणजे आपल्या यमनियमांचे उल्लंघन केल्यासारखे आहे! हे माहित असूनही, तू त्या सुंदर मुलीला का उचललेस?’
तान्झेन किंचित हसला आणि शांतपणे उत्तरला,
‘ मी त्या मुलीला तेव्हाच तिथे सोडले. तू मात्र अजूनही तिला आपल्या बाहूंत वागवत आहेस!’
[झेन परंपरेतील कथा. ]

धर्मवाङ्मयकथासमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चुकलामाकला's picture

20 May 2015 - 5:32 pm | चुकलामाकला

ही कथा भारतीय स्वरुपात अनेकदा ऐकली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2015 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कथा....!

-दिलीप बिरुटे

वाचत असल्याबद्दल धन्यवाद. रूप भारतीय असो,जपानी असो वा आणखी कोणतेही.... कथेने 'स्व-रूप' पहायची नजर दिली म्हणजे झाले!

गणेशा's picture

20 May 2015 - 6:04 pm | गणेशा

अर्थ आवडला

बॅटमॅन's picture

20 May 2015 - 6:33 pm | बॅटमॅन

उत्तम कथा आहे.

बाकी

कोमल तनुची

हे जपानी नावच वाटले एकदम. असो.

शिव कन्या's picture

20 May 2015 - 6:55 pm | शिव कन्या

बॕटमन.... आपल्या विचक्षण नजरेला सलाम!:-)

विवेकपटाईत's picture

20 May 2015 - 7:54 pm | विवेकपटाईत

एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. ......मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. असे वाटले संस्कृत काव्य वाचतो आहे. कथा आवडली

बाबा पाटील's picture

21 May 2015 - 7:29 pm | बाबा पाटील

एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. ......मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते मजबुत बांध्याची तरुणी सुंदर नसते का हो ?

NiluMP's picture

20 May 2015 - 11:20 pm | NiluMP

Short n Sweet Story. तुमच्या कथा थोडक्यात बरंच काही सांगून जातात.

पैसा's picture

20 May 2015 - 11:36 pm | पैसा

कथा आवडली. पूर्वी वाचलेली आहे.

राही's picture

20 May 2015 - 11:43 pm | राही

कथा आवडली. याच्या अनेक भारतीय आवृत्त्या वाचायला मिळतात. याचे मूळ झेन आहे हे आज कळले.
ता.क. मला कोमल तनुची हे जपानी पेक्षा इटालियन वाटले. निकोलाव मनुची सारखे. पण अर्थात Manucci चा नक्की उच्चार माहीत नाही.

रुपी's picture

20 May 2015 - 11:43 pm | रुपी

पूर्वी ऐकलेली आहे, तेव्हाही खूप आवडली होती. कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच काही ना काही वागवत असतो, सोडलं तर किती सुखी होऊ!

तुमची शब्दांवरची पकड मात्र कमालीची आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 May 2015 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

अगोदर थोड्या वेगळ्या रुपात माहीत असली तरी ही अर्थपूर्ण रुपककथा माझी आवडती आहे !

श्रीरंग_जोशी's picture

21 May 2015 - 12:10 am | श्रीरंग_जोशी

अगदी हेच म्हणायला आलो होतो.

शब्दांची निवड आकर्षक वाटत असली तरी तुम्ही आजवर लिहिलेल्या कथांच्या तुलनेत अपेक्षाभंग झाला.

हीच भारतीय स्वरूपातली बौद्ध भिक्षूंची रुपककथा माझी खूपच आवडती असल्याने असे झाले असावे.

सानिकास्वप्निल's picture

21 May 2015 - 12:08 am | सानिकास्वप्निल

कथा आवडली, तुम्ही छान लिहिता.

पुढची झ्येन कथा लाकुडतोड्याची का?

सस्नेह's picture

21 May 2015 - 8:23 am | सस्नेह

रूपककथा रुपांतरण यावर चांगले प्रभुत्व आहे तुमचे.

अमृत's picture

21 May 2015 - 8:48 am | अमृत

तुमच्या सगळ्याच कथा छान असतात!

या स्वरुपातली कथाही आवडली.

प्रसाद गोडबोले's picture

21 May 2015 - 7:47 pm | प्रसाद गोडबोले

हेच हेच

हेच हेच तत्वज्ञान आम्ही मांडतो तर केवढा मोठ्ठा गहजब माजतो ... सारे करा फक्त कशात गुंतुन पडु नका ...

तेन त्यक्तेन भुंजीथा: !!

कर्म बंधनकारक नाहीये , त्याच्या फलाची आसक्ती बंधन कारक आहे ! जर आसक्ती सुटली असेल तर कितीही मुलींना उचलुन पलीकडे पोहचवा , काही फरक पडत नाही पण हेच जर आसक्ती सुटली नसेल तर कितिही यम नियम पाळुन तुम्ही अडकलेलेच रहाणार !

रासक्रिडा करिता वनमाळी हो | सखे होतो आम्ही विषय विचारी |
टाकुनि गेला तो गिरीधारी | कोठे गुंतुन बाई हा राहिला || सांगा मुकंद कुणी हा पाहिला !!!

शिव कन्या's picture

21 May 2015 - 10:58 pm | शिव कन्या

प्रगो ....... वाचत असल्याबद्दल धन्यवाद.
उत्तम विवेचन.

शिव कन्या's picture

21 May 2015 - 10:59 pm | शिव कन्या

दामामि ......... आपल्यासारखे गुणी वाचक असतील तर 'झ्येन बत्तीशी' पण लिहू.

ओ तर्री ताई, बत्तिशी कुठून काढली तुम्ही?
दंत चिकित्सक आहात का?
चान चान!
रच्याकने झ्येन चिमण्या बाळाला आंदोळ घालतात का?
- एक निर्गुणी वाचक

शिव कन्या's picture

21 May 2015 - 11:03 pm | शिव कन्या

बाबा पाटील , अहो इतके जेरीस नका येऊ. असते कि! मजबूत बांध्याची मजबूत सुंदरी असणारच कि. नाय कोण म्हणतंय? पण या कथेसाठी तिचा काय उपेग नाय , म्हणून तिला 'नाजूक तनुची' केली.

कानडाऊ योगेशु's picture

22 May 2015 - 9:17 am | कानडाऊ योगेशु

मजबूत बांध्याची असली असती तर भिक्खुनींच तिला "आम्हाला नदी पार करुन दे"अशी विनंती केली असती व तिनेही त्या दोघांना बगलेत घेऊन नदी पार केली असती.... पण प्रश्न व कथेचा मतितार्थ मात्र तोच राहीला असता....!

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2015 - 9:25 am | श्रीरंग_जोशी

मजबूत बांधा.

प्रतिसाद मार्मिक हं.

शिव कन्या's picture

21 May 2015 - 11:09 pm | शिव कन्या

श्रीरंग जोशी..... वाचनातील आणि प्रतिक्रियेतील सातत्याबद्दल धन्यवाद.
होय, असे होते! तेच कथा बीज दुसऱ्या मातीत, दुसऱ्या वेशात वाचले कि जरासे खटकते.
पण, कथेचा अंतरात्मा तोच असतो.

शिव कन्या's picture

21 May 2015 - 11:11 pm | शिव कन्या

चुकलामाकला , स्नेहांकिता, सानिकास्वप्नील, पैसा, इस्पिकचा एक्का, रुपी इ इ इ ..... सर्वांचे वाचत असल्याबद्दल आभार.

ही कथा वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेली आहे...
और भी आने दो...

मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi