डोक्क्यात जाणारी सेल्समनशिप

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
14 May 2015 - 2:40 pm

सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन.

ग्राहक म्हणून तुमचा अधिक संबंध येतो तो या 'सेल्समन' नावाच्या प्रजातीतील व्यक्तींशी. कुणाचीही हेटाळणी करायचा उद्देश नाही, त्यामुळे हलकेच घ्या (take it easy). तर या सेल्समन व्यक्ती बहुतेकदा डोक्क्यात जातात. कशा, ते काही प्रकारांतून, सवयींतून सांगतो.

मागे लागणं - मॉल मधे जाऊन खरेदी सुरु झाल्यावर मुख्य फायदा झाला तो म्हणजे तुम्हाला 'विचार' करून चार गोष्टी बघून तुमच्या स्वतंत्र निर्णयातून खरेदी करता येऊ लागली. नाहीतर दुकानात गेलं की तो दाखवेल तेच दिसतं आणि नाही आवडून आपण चालायला लागावं तर और देखो ये देखो वो देखो करत आग्रह सुरू होतो. बरं मोठं दुकान असेल तर आपण निघाल्यावर तुच्छ नजरेने आपल्याकडे बघितलं जातं ते वेगळंच. हे दुकानातल्या सेल्समन चं मागे लागणं डोक्क्यात जातं. आता मॉलमधेही फिरते सेल्समन असतात म्हणा.

त्यांच्याकडे आहे तेच बेस्ट - मला विंडोज फोन हवा होता. एका दुकानात शिरलो. त्याने 'रेंज' विचारली 'रेंज'. म्हटलं लुमिया दाखव. "ये देखो सेमसंग गेलेक्सी अमूक" "हा नको लुमिया दाखव" "उससे बेस्ट ये है. १३ मेगापिक्सेल...." .... "अरे ते मेगापिक्सेल गेलं ......त. मी काय मागतोय?"... मग म्हणाला शेवटी की नही है वो. म्हणजे, आलेल्या पाहुण्याला रिकाम्या हाताने पाठवू नये ची पद्धत फार मनावर घेतल्यासारखं आलेल्या ग्राहकाच्या गळ्यात काहीतरी मारूनच त्याला पाठवायचं असा प्रकार झाला. डोक्क्यात !

आजकाल हेच चालतं - 'ट्रॅडिशनल वेअर' चं दुकान. मी कॉटन चा झब्बा मागितला. त्याने झगरमगर एम्ब्रॉयडरी वाला स्टारप्लस छाप झब्बा दाखवला. "हे नाही. सोबर दाखवा", मी. "हे बघा तर, नवीन कलेक्शन आहे" "अरे नको बाबा साधे दाखव ना जरा डिसेंट प्रिंट वाले" त्यापुढच्या उत्तरानंतर मी बाहेर पडलो. "आजकाल ते नाही चालत. आजकाल हाच ट्रेंड आहे" "हो का? ठेव मग तो तुझ्याकडे", मी. मला आजवर असंख्य वेळा हा डैलॉग सहन करावा लागलाय. सगळ्यांनाच असेल. पण माझ्या तो डोक्क्यात जातो. 'तू कोण ठरवणार कसला ट्रेंड आहे आणि मी तो फॉलो करावा का नाही?'

दाखले देणे - मोबाईलचंच उदाहरण. बिलबुक काढून दाखवलं होतं एकदा बघा... गेले चार मोबाईल अमके अमके विकले. म्हणून सांगतो हा बेस्ट आहे. किंवा मग 'आज के दिन मे चार प्रॉडक्ट्स गये साब इसके!' (म्हणजे, तू मूर्ख आहेस जे दुसर काहीतरी मागतोयस) असे डैलॉग.

तुम्हाला झाडावर चढवणं - या ट्रिकला बायका हमखास भुलतात. (ओह... जेंडर स्पेसिफिक स्टेटमेंट) कधी कधी मुलं/पुरुषही भुलतातच. म्हणजे उदहारणार्थ बघा; साडीचं दुकान. "ये आपको बहुत अच्छा दिखेगा" (सेल्समनचे उद्गार नाईलाजाने हिंदीत लिहावे लागत आहेत कारण बहुतांश ते हिंदीतच असतात) असं म्हटलं की म्याडमचा फोकस त्या साडीवर येण्याची पुरेपूर शक्यता. मग नवरा असेल सोबत तर तो म्हणतो की "ही नाहीये इतकी चांगली". त्या औषधाचा परिणाम झाला तर ठीक, नाहीतर त्यालाही "तुम्हाला त्यातलं कळंत नाही" वगैरे म्हटलं जाऊ शकतं. असो. कपड्यांच्या दुकानात हे समजू शकतो पण एकदा एका रंगा-याला जेंव्हा मी म्हटलं की ही शेड जी तू केली आहेस ती परफेक्ट नाही झाली आहे, तेंव्हा तो मला म्हणाला "अरे उससे ज्यादा ये अच्छा दिखेगा!" सटकलीच माझी तेंव्हा म्हणजे. घर कोणाचं? रंग कोण ठरवणार? असो. पण एकंदरित सेल्समनची ही पकपक सुद्धा डोक्यात जाते.

अवांतर प्रश्न - यात आता हेतू वेगवेगळे असू शकतात. काही वेळा खरंच तुमचा विचार समजून घ्यायला प्रश्न विचारले जात असतील. पण काहीवेळा हे इंट्रूडिंग होतं फार. शर्ट घेताना, 'पार्टीत घालणार आहात?' 'शादी घरका है के बाहरका?' असे प्रश्न ऐकून प्रतिप्रश्न येतोच मनात. "तुला का.....य फरक पडतोय?'

फास्ट आणि खूप जास्त बोलणे - हे कॉमन आहे खूप. भरभर तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलायचं आणि असं सगळंच म्हणजे खूप जोराची लागली आहे आणि ग्राहक गेला की धावलोच अशा घाईत उत्पादनं दाखवायची. डोक्क्यात.

मागे मागे फिरणं - मॉल मधे होतं हे आजकाल. तुम्ही एका रॅक जवळ ३० सेकंदापेक्षा जास्त थांबलात, की एक मुलगा/मुलगी मागे येऊन उभी राहते तुमच्या. आणि मग 'सांग ना, काय झालं?' च्या सुरात 'क्या लेना है?', 'ट्राउजर लेना है?', 'ऑफिस के लिये?' असे हळूच हळूच प्रश्न पुटपुटत राहते. दुस-या रॅकशी जा, तिथेही तुम्हाला फॉलो करते. एकदम चोर बिर असल्याची भावना येते मनात. समबडी इज फालोविंग मी.... डोक्क्यात.

एकूण काय; नो ऑफेन्स बट हे अ‍ॅग्रेसिव मार्केटिंग किंवा कंपेलिंग सेल्समनशिप या फार वैताग देणा-या गोष्टी आहेत. त्यामुळे मी मॉल मधे गेलो तर सरळ 'मी बघतो आणि गरज लागली तर तुम्हाला सांगतो' असं नम्रपणे सांगून दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. दुकानात गेलो तर थंड रहायचा प्रयत्न करतो. :)

हे सगळं असूनही जेंव्हा मी मला त्यांच्या जागी ठेवतो, एका मोबाईल शॉपी मधल्या सेल्समनने मला सांगितलेलं त्यांच्या कामाचं स्वरूप व मालकाचा जाच आठवतो, जेंव्हा त्यांना मिळणा-या कमी पैशांची आणि असणा-या अवास्तव टार्गेट्सची कल्पना करतो, तेंव्हा त्यांच्याबद्दल कणव वाटल्यावाचून रहात नाही. त्यांच्या कामाबद्दल त्यांचं कौतुकच वाटतं. पण तरीही जेंव्हा मी ग्राहकाच्या जागी असतो तेंव्हा....

समाजजीवनमानतंत्रविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

14 May 2015 - 2:52 pm | पगला गजोधर

एय लेव ना … लेव ना साब …. अईसा कायकू करता.… :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 May 2015 - 3:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी आत्ताच सहन करुन आलोय..सहकूटुंब सुट्टिसाठी काश्मीरला गेलो होतो. दर ठीकाणी नवीन वस्तूसाठी, घोड्यासाठी,शिकारा राईड, स्लेज, बूट कोट भाड्याने घेणे, फोटोवाले अमके नी ढमके.......
साब येही एक दो महीने का सीझन होता है हमारा, आप आते हो तो हमारा पेट भरता है, अच्छा फ्री मे लेलो आप मेरे भाई हो, हमारा नंबर दो दिन के बाद आता है थोडक्यात काय तुमचा खिसा खाली केल्या शिवाय आम्ही तुम्हाला येथुन जाउ देणार नाही असा अ‍ॅप्रोच...एक दोन दिवस सहन केलं आणि मग डोकच सटकलं..सरळ हाकलुन लावायला लागलो..अरे मला आणि बायकोला जरा बोलु तरी द्याल की नाही?आजु बाजुचे निसर्गसौंदर्य पाहु तरी द्याल की नाही? की तुमच्याच पोटाची चिंता करत बसु?

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 3:22 pm | वेल्लाभट

सिरियसली!

रेवती's picture

14 May 2015 - 10:22 pm | रेवती

काय त्रास आहे!

गणेशा's picture

14 May 2015 - 3:16 pm | गणेशा

चांगले लिहिले आहे....

बिचार्‍यांची पण दया येते. संमजा त्यांच्या मर्जी विरुद्ध ते मार्केटींग करत असतील तर.. आपण जेव्हडा डोक्याला शॉट म्हणत असु त्या पेक्षा ते कस्टमर ला वैतागत असतील.. काही ही दाखवा ह्यांचे नखरे अनेक अश्या भावाने( फक्त मनात शिव्या घालत असेल तो )

साडी.. निळी दाखवली.. हिरवी पाहिजे. हिरवी दाखवली...काठ असला पाहिजे.. काठ दाखवला... बॉर्डर अशी नको होती... बॉर्डर दाखवली... साडीच्या कलर मध्ये व्यव्स्थीत नाही वाटत..
असे असंख्य नखरे नवरा नसताना सहन करनारा तो साडीच्या दुकानातील सेल्समन डोक्याला कीती शॉट लावुन घेत असेल काय माहीत.

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 3:20 pm | वेल्लाभट

हो ते झालंच... !

रुपी's picture

14 May 2015 - 11:22 pm | रुपी

शिवाय मॉलमध्ये तासन तास उभे राहून, फिरून हवे असलेल्या मापाचे, रंगाचे कपडे शोधताना कधी कधी वैताग येतो. अशा वेळी वाटतं कुणी दाखवायला/ शोधून द्यायला असतं तर बरं झालं असतं.

अनुप७१८१'s picture

14 May 2015 - 3:28 pm | अनुप७१८१

टार्गेट टार्गेट टार्गेट .... दुकान गेले तेल लावत, इन्सेन्टिव कसा मिळेल ह्य कडे लक्श !

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 3:37 pm | वेल्लाभट

अब सवाल सिर्फ पेट का नही रहा. टार्गेट का भी हो गया है.

माझा मॉल मधील सेल्समन्सचा अनुभव आत्ता पर्यंत तरी चांगला आहे... जास्त गळ्यात पडण्याचा प्रयत्न केल्यास "नको" म्हणण्या पलिकडे अजुन काही बोलण्याची वेळ आलेली नाही, झालाच तर त्यांच्या "प्रॉडॉक्ट" सुचवण्याचा उपयोग झाला आहे.

साडीचं दुकान. "ये आपको बहुत अच्छा दिखेगा" (सेल्समनचे उद्गार नाईलाजाने हिंदीत लिहावे लागत आहेत कारण बहुतांश ते हिंदीतच असतात) असं म्हटलं की म्याडमचा फोकस त्या साडीवर येण्याची पुरेपूर शक्यता. मग नवरा असेल सोबत तर तो म्हणतो की "ही नाहीये इतकी चांगली". त्या औषधाचा परिणाम झाला तर ठीक, नाहीतर त्यालाही "तुम्हाला त्यातलं कळंत नाही" वगैरे म्हटलं जाऊ शकतं.
या बाबतीय माझी बायडी माझ्यावर पूर्णपणे अवलंबुन आहे, प्रत्येक साडी हातात घेतल्यावर त्यावर माझे मत घेतल्या शिवाय तिचे समाधान काही होत नाही...आत्ता पर्यंत तिच्या माहेरकडच्या समस्त स्त्री वर्गाने तिच्या साड्यांचे प्रचंड कौतुक केल्याने आणि कुठुन घेतली ? हा प्रश्न विचारला गेल्याने साडी खरेदीत माझी हजेरी आणि निवड "मस्ट" आहे.
मोबल्यासाठी बरेच आरएनडी केल्या शिवाय दुकानात पाउल ठेवत नसल्याने मला विक्रेता उगाच हा घ्या,तो घ्या असा सल्ला देण्याचा भानगडीत बसत नाही.केशरी लुमिया घेतल्या नंतर दुसर्‍या वेळी एका दुसर्‍या दुकानात मोबल्यासाठी कव्हर पाहत होतो तेव्हा, तुम्हाला या रंगाचा मोबाइल कुठुन मिळाला ? कारण या लाईन मधे आणि इथल्या मार्केट मधे हा अजुन तरी अव्हलेबल झाला नाही असे त्याने सांगितले... नंतर इतर खरेदी बरोबर मोबाइल कव्हर चक्क चकटफु दिले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व
Why on earth is Narendra Modi going to Mongolia?
Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China
Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li
India’s foreign policy must continue to move past the parochial
Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 3:41 pm | वेल्लाभट

भलतेच लक्की ब्वा तुम्ही !

कपिलमुनी's picture

14 May 2015 - 3:51 pm | कपिलमुनी

मिपावर सेल्स मध्ये काम करणारे कोणी आहे का ;)

(माजी )-सेल्समुनी

सतीश कुडतरकर's picture

15 May 2015 - 3:49 pm | सतीश कुडतरकर

मी उमेदवारी केली होती, Logistics मध्ये.

Accounts वाल्यांचा जाम राग यायचा. च्यायला customer च्या मागे मागे लागून धंदा आम्ही आणायचा, तेंव्हा कुठे यांचा पण पगार सुटायचा.
पण अकड अशी कि हेच कंपनी चालवतायत. प्रत्येक गोष्टीत अडवणूक.

अत्रन्गि पाउस's picture

14 May 2015 - 4:04 pm | अत्रन्गि पाउस

खरे आहे .... असे काही सावली सारखे वावरतात कि काय सांगावे ...
ह्या साठी मला उपयोगी पडलेला उपाय ...

१. चेहेरा अतिशय गंभीर ..खालचा ओठ किंचित बाहेर ठेवणे
२. डोळ्यात एक तुसडा / शिष्ट /घमेंडी भाव वागवणे ... सेल्समनच्या डोळ्यात एक आरपार कटाक्ष फेकणे ...त्याने नजर चुकवली /फिरवली पाहिजे
३. मंद्र सप्तकात इंग्लिशमध्ये बोलणे ..शक्यतो त्याला नीट ऐकूच जाणार नाहीसे ...

२/३ हे रियाजाने शक्य आहे ...
पहा प्रयत्न करून

पगला गजोधर's picture

14 May 2015 - 4:13 pm | पगला गजोधर

अश्या सेल्समनगिरीसमोर, आपण अस्सल मध्यवर्ती पुणेकराप्रमाणे बेअरिंग घेणे …

पगला (एक्स मध्यवर्ती-पुणेकर )

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 4:27 pm | वेल्लाभट

हाहाहाहाहाहा !

मास्टरमाईन्ड's picture

15 May 2015 - 12:21 pm | मास्टरमाईन्ड

मी बर्याच वेळेस समोरच्या सेल्समनच्या भाषाज्ञानाचा अंदाज करुन (सोप्पंय) मराठी, हिन्दी, इंग्लीश आलटून पालटून वापरतो. तो लैच डोक्यात जात असेल तर सदाशिव स्टाईलने उत्तरं देतो / प्रश्न करतो.
पण कधीतरी आपल्यालापण गुरु भेटू शकतो.

माझ्या वडिलांनी बावीस वर्षं सेल्समध्ये काम केलं, आणि पुढे येम्बीयेला सेल्स/मार्केटिंग शिकवताहेत. त्यांच्याबरोबर कोणत्याही दुकानात जायला लय मजा येते. उत्तम सेल्सपर्सन कसा ओळखावा हे त्यांच्याकडून शिकलो (शिकतो). उत्तम सेल्सपर्सन होण्यासाठी बोलबच्चन असणं गरजेचं नसतं, हा त्यांच्याकडून शिकलेला एक धडा.

त्यांचा एक किस्सा: बिग बझार मधल्या अंगावर येणार्‍या एका सेल्समनला त्यांनी उलटेसुलटे प्रश्न विचारून भांबावून सोडलं. बिचारा एकदम सळो-की-पळो झाला. मग विचारलं, "एमबीए किया है? किया होता तो ये नौबत न आती..." सेल्समनलाच एमबीए विकून आले!

राजाभाउ's picture

14 May 2015 - 4:39 pm | राजाभाउ

हे भारीच !!

मास्टरमाईन्ड's picture

15 May 2015 - 12:22 pm | मास्टरमाईन्ड

लै भारी

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2015 - 5:14 pm | कानडाऊ योगेशु

मुरलेला सेल्समन आणि ट्राफिक पोलिस ह्यात एक साम्य आहे. दोघांनाही बकरा लगेच ओळखु येतो.

स्वतःकडचा माल खपवणे ही त्यांच्या दृष्टीने एक स्क्लि आहे त्याप्रमाणे नको असलेला माल गळ्यात पाडुन न घेणे हे स्किल आपण स्वतःच विकसित करायला हवे.
ह्याबाबतीत माझेच एक उदाहरण सांगतो.
प्रवास च्या इच्छित स्थळी उतरलो व स्टेशन बाहेर गेलो तर एकामागोमाग एक रिक्षावाले/टॅक्सीवाले कहा जाना है? वगैरे विचारत पिच्छा पुरवतात. आधी आधी भांबावुन जायला व्हायचे व एक दोघांना नाही म्हटल्यावर तिसर्या/चौथ्याला अमुक अमुक ठिकाणी जायचे हे तोंडातुन बाहेर पडायचे. बस्स.. मग काय... माझ्या रुपाने चांगला बकरा मिळायचा त्याला. ह्यावर मग एक युक्ती काढली. गाडीतुन बाहेर उतरल्या उतरल्याच चावी बाहेर काढतो. कशाची का असेना. (घराची बॅगेची वा कार बाईकची..इट डझन्ट मॅटर !) व प्रत्येक विचारणार्या रिक्षा/टॅक्सीवाल्याला स्वतःची गाडी आहे हे चावी ओझरती दाखवत (कारची असेल तर व्यवस्थित दिसेल अशी दाखवतो) पुढे पुढे जातो. चावी दाखवल्यामुळे कुणी पुन्हा विचारायच्या फंदात पडत नाही व मलाही मग स्टेशन्बाहेर येऊन एकुण अंदाज घ्यायचा वेळ मिळतो.

खेडूत's picture

14 May 2015 - 5:28 pm | खेडूत

नुकताच घडलेला किस्सा:

स्थळ: के के मार्केट पुणे .

वेळ: दुपारची कंटाळवाणी

सेल्समन ला म्हटलं अकरा वर्षाच्या मुलासाठी साधे शर्टस दाखव .

त्यानं ढीगभर शर्टस काढले. सगळे भडक आणि प्रत्येकाला भरपूर साखळ्या / बटणे आणि रिंगा वगैरे. असले चमकते शर्टस घालणारी मुलेही डोक्यात जातात - त्यांची चूक नसेल तरीही !

त्याला म्हटलं साधे पाहिजेत - आधीच सांगितलंय. उगीच फालतू सजावट करून दोनशे रुपये वाढवलेले नको दाखवू .

त्यावर तो म्हणाला, '' हे तर कंपनी फ्री मध्ये देते - त्यामुळे किंमत नै कै वाढत …. ''

त्याला म्हटलं बाबा रे - सोळा वर्ष टेक्स्टाईल इंडस्ट्रीत काम करतोय. कंपनी काय करते मला विचार - तुझी खरेदीची किंमत सांगू का? - खरं तर मी चारेक वर्षं टेक्स्टाइल क्षेत्रात काम केलंय पूर्वी - पण आत्मविश्वास पाहून तो वरमला. बाकीची गिर्हाइक्स तोपर्यंत चर्चेत रस घ्यायला लागली.

पुढे म्हटलं - फुकट काही मिळत नाही या जगात - तुला चांगलं माहिताय ! का नाही माहित ? मग गडबडला. वेगळे दाखवले - पण सगळे फुलशर्टस - मला हाफ हवे होते.

त्यावरून त्याची मापं काढून तिथे काही न घेता निघालो.

थोडं जनरल नॉलेज कामाला येतं - कधी फसगत होते- कधी आपली चूक होते पण शिकायला मिळतंच. एकूण शॉपिंग म्हणजे यंजॉय माडी करायची गोष्ट असते !

मला थोडी दया येते या लोकांची. उन्हातान्हात उभे राहुन क्रेडिट्कार्ड विक, पॉलिसी विक.
लोकांना पॅप्लेट दे. अवघड जॉब आहे. मी दारवर सुद्धा कोणी आलंतरी हसुन नको म्ह्णतो आणि तोंडावर दार लावत नाही. जिनेउतरुन जाइपर्यंत वाट बघतो आणि मग दार लावतो. सगळेच पोट भरण्यासाठी काही ना काही करत असतात.

असंका's picture

14 May 2015 - 5:40 pm | असंका

+१

धन्यवाद!!

अनुप ढेरे's picture

14 May 2015 - 6:31 pm | अनुप ढेरे

हेच बोल्तो.

सामान्यनागरिक's picture

14 May 2015 - 11:41 pm | सामान्यनागरिक

क्रेडीट कार्ड आणि ईतर गोष्टी विकणार्यांबद्दल अजिबात सहानूभूती नको.
अत्यंत कोडगी जमात आहे ती.
त्यांना वाळीतच टाकले पाहिजे.

चांगलं लिहिलंयत हो दादा.
एकदम आवडलं...!!

खंडेराव's picture

14 May 2015 - 5:56 pm | खंडेराव

बाबतीत काश्मिरचा खरच नाद करायचा नाही.
दल सरोवरात फिरतांना अगदी जिव खाल्ला. मी आणि बायको होतो. दर २ मिनिटाला एक जण येउन विचारायचा, साब, शिलाजित चाहिये :-)

रात्री हाउसबोट मधे थांबलेलो. सकाळी उठलो तर बाहेर रांग लागलेली विकणार्यांची, आणि हाउसबोट्चा मालकही आर्जवे करणार, त्याचे कमिशन ठरलेले.

( चुकीच्या जागेवर पडली प्रतिक्रिया, मेहेंदळेंच्या पोस्ट खाली टाकायची होती. )

खंडेराव's picture

14 May 2015 - 6:00 pm | खंडेराव

दोन असतात, एक ते की ज्यांची ती नौकरी असते, दुसरे ते, ज्यांचे काम काही वेगळेच असते पण ते सेलसमनगिरीने कमीशन खायच्या प्रयत्नात असतात. ( उदा - प्रसिद्ध ठिकाणचे रिक्षावाले, ते अगदी रेस्तरावाल्यांकडुन ही कमिशन काढतात. )
पहिल्यांविषयी राग नाही,ते बिचारेच, दुसरे दिसले की डोके सटकते.

चुकलामाकला's picture

14 May 2015 - 6:02 pm | चुकलामाकला

पण याहून डोक्यात जाते अॅमवे ची सेल्समनशिप.
"अॅमवे वापरायला / विकायला लागल्यापासून आम्ही कित्ती कित्ती सुखी आहोत, ब्ला ब्ला ब्ला"
जाम सटकते माझी.

मास्टरमाईन्ड's picture

15 May 2015 - 12:26 pm | मास्टरमाईन्ड

बरोब्बर

चिनार's picture

15 May 2015 - 4:23 pm | चिनार

अॅमवे वाल्यांना तर फटके द्यावे वाटतात.
माझ्या सख्ख्या भावाच्या डोक्यात हे खूळ शिरलं होतं. मी त्याला स्पष्ट सांगितलं," मी तुझ्याकडून एकही रुपयाचं सामान विकत घेणार नाही. अन्य कोठल्याही विषयावर बोल..वाट्टेल ती मदत करेल पण अॅमवे करणार नाही"
उतरलं खूळ काही दिवसात !

सौन्दर्य's picture

15 May 2015 - 11:52 pm | सौन्दर्य

माझे दोन मित्र अॅम वे एजंट झाले होते, सारखे "मिटिंगला ये, मिटिंगला ये" म्हणून मागे लागायचे. शेवटी "ना ही" म्हणून ठणकावून सांगितल्यावर आमची मैत्री संपली.

आम्हाला तर एकाने घरी येण्याचे आमंत्रण दिलं, म्हणाला माझा आणखी एक मित्र येणार आहे, तुम्ही त्यालाही भेटाल. त्याच्या त्या मित्राने दोन तासाचं प्रेझेंटेशन दिलं. :(

नंतर अमेरिकेत राहायला आल्यावर तर आणखीच अनुभव आले. वॉलमार्ट, टार्गेट अशा दुकांनात घरासाठी लागणारे सामान घेताना हे लोक बरोबर नवीन माणसाला हेरून, गप्पा मारुन फोन नंबर घेतात. आणि फोन करुन करुन वैताग आणतात. माझे एक नातेवाईक तर वैतागून त्यांना 'स्कॅमवे'च म्हणायचे!

हां, आत्ता आठवलं की हामेरिकेत नवीन असताना टार्गेटात एक बुवा सारखा माझ्या मागे फिरत होता व तुम्हाला दोन मिनिटे वेळ आहे का विचारत होता. मी आधी घाबरले मग वैतागले, नंतर त्याची बायडी येऊन मिटींगला घरी येण्याबद्दल विचारत होती. हे अ‍ॅमवेवाले असतील असे माहित नव्हते. आता असा मनुष्य समोर आल्यावर अंदाज येईल.

सौन्दर्य's picture

15 May 2015 - 11:52 pm | सौन्दर्य

माझे दोन मित्र अॅम वे एजंट झाले होते, सारखे "मिटिंगला ये, मिटिंगला ये" म्हणून मागे लागायचे. शेवटी "ना ही" म्हणून ठणकावून सांगितल्यावर आमची मैत्री संपली.

विषेश त्रास असा होत नाही.

बाबा पाटील's picture

14 May 2015 - 8:10 pm | बाबा पाटील

एक ओळखीचाच नमुना,मी एम एल एम वाल्या आईमाई वरुन शिव्या घालतो हे माहित असुनही डॉक्टर तु हे आमच आठशे का नउशे रुपयाच गार्लिक तुझ्या पेशंटला वापर म्हणुन माग लागला होता.एक दिवस बाबा ओपिडीतच येवुन बसला, सोडायलाच तयार नाही.शेवटी स्टाफला त्याच्यासाठी चहा बनवायला सांगितला त्यात लसुन आणी सुंठ टाकायला लावली.बिचार्‍याने तोंड वेड वाकड करत तो चहा पिला.म्हटल दे आता हजार रुपये तुला लसानाबरोबर सुंठ पण चारलीय. तेंव्हाच बाबान पिच्छा सोडला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 May 2015 - 6:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यापे़क्षा दंबुक दाखावायची ना गेला असता पळुन.

बाकी एम.एल.एम. वाल्यांबद्दल सहमत. डोक्याचं भरीत करतात.

कपिलमुनी's picture

15 May 2015 - 12:05 pm | कपिलमुनी

याला डॉक् च्या दंबूकीचे भारी कौतुक ;)

रुस्तम's picture

15 May 2015 - 11:10 am | रुस्तम

मस्तच...

सतीश कुडतरकर's picture

15 May 2015 - 3:53 pm | सतीश कुडतरकर

लय भारि

रातराणी's picture

15 May 2015 - 1:18 am | रातराणी

हाहा! छान आहे! चष्मे बद्दूर मधली चमको आठवली.

उगा काहितरीच's picture

15 May 2015 - 9:39 am | उगा काहितरीच

एम एल एम वाल्यांची दोन तास बडबड ऐकायची, थर्ड क्लास पिपिटी पहायची आणि शांत आवाजात नॉट इंटरेस्टेड सांगायचं , लै भारी मज्जा येते :-D :-D

रायनची आई's picture

15 May 2015 - 12:22 pm | रायनची आई

खर आहे..ड्रेसेसच्या दुकानात गेल्यावर बोलतात कि आप गोरी हो इसलिए ये कलर आप पे ज्यादा सूट होगा..काहीही ;-)

सर्वसाक्षी's picture

15 May 2015 - 12:30 pm | सर्वसाक्षी

माणूस हा जन्मजात सेल्समन असतो. फक्त जो पोटापाण्यासाठी 'विक्री' या क्षेत्रात कार्यरत असतो त्याला 'सेल्समन' म्हटलं जातं.

जन्मल्यापासून माणूस स्वतःला विकत असतो

लहान मूल आई वडीलांपुढे
थोडं मोठ झाल्यवर शिक्षक / मित्र-मैत्रिणींपुढे
आणखी मोठं झाल्यावर प्रेयसी/प्रियकर/ पती/ पत्नी/ बॉस पुढे

कुणी व्यक्तिमत्व विकत असतो, कुणी रुप, कुणी गुण, कुणी मत, कुणी महत्व सगळेच काही ना काही विकत असतात. तात्पर्य प्रत्येक जण स्वतःला सर्वोच्च किमतीत विकु पाहतो.

असो.

मोहनराव's picture

15 May 2015 - 4:04 pm | मोहनराव

काही काही ठिकाणी माल पाहुन काही घेतला नाही तर हे सेल्समन अंगावर आल्यासारखे 'कुछ लेना नही तो आते क्युं' असा अविर्भाव करतात.अरे तुला ठेवलय कशासाठी?
माल दाखवायचा कंटाळा असणारे वेगळेच..
एकदा असेच मुंबईत एका चांगल्या साडी दुकानात गेलो होतो बायकोबरोबर.. हिला बहिणीच्या लग्नात घालायला साडी खरेदी करायची होती. थोड्या साड्या दाखवल्यानंतर अजुन दाखवा म्हणाल्यावर तो स्वतःच जरा बघुन काढुन घ्या म्हणाला. माझी बायको चिडली. एकतर ती गरोदर होती त्यावेळी. आम्ही दोघांनी मिळुन त्याचा चांगलाच पाणउतारा केला. सगळेच गिर्‍हाईक बघु लागले. शरमला तो. मालकाला बोलावले. मालकांनी माफी मागितली. दुसरया सेल्यसमनने मग गुपचाप हव्या तश्या साड्या दाखवल्या.

रुस्तम's picture

15 May 2015 - 4:40 pm | रुस्तम

पाण उतारा कसा केलात जरा इस्कटून सांगा की. कधी असा प्रसंग आला तर बाकी मिपाकरांना बी फायदा होइल.

मित्रहो's picture

16 May 2015 - 10:34 pm | मित्रहो

समोरच्याला असे 'Morally Challenge' करणे हा निगोशियेशनचा प्रकार आहे. 'तुम्हाला घ्यायचेच नाही' किंवा 'तुम्ही टाइमपास करताय' असे वाक्य म्हटल्याने बऱ्याचदा समोरचा चिडून ती वस्तू घ्यायला तयार होतो. आनंद मेळा किंवा फॅशन स्ट्रीट असल्या ठिकाणची माणसे हि पद्धत बऱ्याचदा वापरतात कारण त्यांच्याकडे एकदा आलेले गिऱ्हाइक परत दहा महीणे येत नाही.
बाकी साडीचा सेल्समन सेल्सच्या लायकीचा वाटत नाही.

मोहनराव's picture

15 May 2015 - 5:45 pm | मोहनराव

हेच की सेल्समन इथे असताना आम्ही का स्वत:हुन साड्याच्या शेल्फमधुन साड्या काढुन का पाहायच्या? मग बाबा तुला ठेवलय तर कशाला? गरोदर बाईला असं सांगताना लाज कशी नाही वाटत वगैरे वगैरे..

सौन्दर्य's picture

15 May 2015 - 11:59 pm | सौन्दर्य

मुंबईतल्या कित्येक दुकानात पूर्वी कपडे खरेदी करायला गेलं की "बजेट कितना है ?" हा पहिला प्रश्न विचारायचे. त्यांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा प्रश्न असला तरी आपला अपमान होतोय असं (उगीच ?) वाटायचं आणि दुकानातून काढता पाय घ्यायचो.

कपिलमुनी's picture

19 May 2015 - 3:23 pm | कपिलमुनी

पुण्यात सुद्धा विचारतात , मी आणि सौ साडी खरेदीसाठी गेल्यावर हस्तकलामधे पहिल्या पावलाला हाच प्रश्न विचारला होता. " २ लाखाची" साधी दाखवा असे नम्र उत्तर दिले :)

एक असाच सोसायटीतला भेटला होता. अम्वेसाठी मागे लागला. तुम्हाला फावल्या वेळात आधिक पैसा कमावता येइल वगैरे सान्गू लागला. त्याला एकदम सिरियस चेहरा करून म्हणालो "अहो घरी खूप पैसे पडले आहेत. सोन वगैरे तर बेडमधे कपाटात ठेवयलाहि जागा नाही. पैश्याच काय कराव ते कळत नाही. कालच दोन मर्क्स बुक केल्या."
हा सटक आहे समजून हे हे करत निघुन गेला. परत समोरून आला तरी तोन्ड चुकवतो.

नूतन सावंत's picture

16 May 2015 - 8:55 pm | नूतन सावंत

मस्त धागा आणि मस्त प्रतिक्रिया.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2015 - 10:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मागे एकदा माझ्या एका मामेभावानी अ‍ॅमवेच्या अश्या डोकेदुखीला आर.एम.पी. नावाच्या दुसर्‍या चेन मार्केटिंग वाल्याकडे पाठवलेलं. दोघांनी एकमेकांची यथेच्च डोकी खाल्ली आणि माझा मामेभाउ अलगद बाजुला झाला ;)

मित्रहो's picture

16 May 2015 - 10:24 pm | मित्रहो

माझ्या मते सेल्समन हे खरेच कठीण काम आहे किंबहुना सर्वात कठीण काम आहे. कुठलीही वस्तू विकणे एवढे सोपे नाही. प्रत्येकाने तरुण वयात काही वर्षे सेल्समधे घालवावी त्याचा कदाचित पुढे जाउन बराच फायदा होत असेल.
कुठली वस्तू कशी विकायची हा स्वतंत्र विषय आहे. मी घर घ्यायच्या वेळेला त्या सेल्समनने तीन तास देउन शांतपणे प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. जो प्रॉब्लेम आहे तो आहे, उगाच त्याचा बचाव केला नाही. कमी नाही पण नेमके बोलनारा सेल्समन होता. बऱ्याचदा योग्य ट्रेेंनीगच्या अभावामुळे काही सेल्समन अंगावर धावून आल्यासारखे वाटतात. सेल्स हा कठीण प्रकार आहे आणि माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा आहे. पुलंनी म्हटलेले आहे की डोके शांत कसे ठेवावे यासाठी साडीच्या सेल्समनची नोकरी करावी.

विजुभाऊ's picture

19 May 2015 - 1:34 pm | विजुभाऊ

तरी बरं हल्ली अ‍ॅम वे , जपान लाईफ वगैरे यमयलयम वाल्यांचा ससेमिरा कमी झालाय

>>> तुम्हाला झाडावर चढवणं - या ट्रिकला बायका हमखास भुलतात. (ओह... जेंडर स्पेसिफिक स्टेटमेंट) कधी कधी मुलं/पुरुषही भुलतातच. म्हणजे उदहारणार्थ बघा; साडीचं दुकान. "ये आपको बहुत अच्छा दिखेगा" (सेल्समनचे उद्गार नाईलाजाने हिंदीत लिहावे लागत आहेत कारण बहुतांश ते हिंदीतच असतात) असं म्हटलं की म्याडमचा फोकस त्या साडीवर येण्याची पुरेपूर शक्यता. <<<
हा मुद्दा सोडून पटला लेख. असो.

मॉलमधे वस्तू निवडता येते हे ठिके पण हल्ली तिथेही हे सेल्समन प्रकरण त्रासदायक होऊ लागलेय. एखाद्या सेक्शनमधे गेल्यावर 'तुम्हाला काही मदत हवीये का?' इथपर्यंत विचारणं ठिके पण एखाद्या वस्तूला आपण हात लावला किंवा २ सेकंदापेक्षा जास्त बघितलं त्या वस्तूकडे की लगेच इसमे ये कलर्स भी है, और आयटेम्सभी वहापे मिलेंगे करून सांगायला लागले की डोक्यात जातात. किंवा मग आपण वस्तू बघत फिरत असलो की आपल्या मागे मागे करत रहातात ते ही डोक्यात जातात.
एकदा मी शॉपर्स स्टॉपमधे एका सेल्समनला सुनावलं होतं. आम्ही पर्सेसच्या सेक्शनमधे फिरत होतो. सेल्समन आमच्या मागेमागे फिरत होता. एक पर्स दिसली. मी उलटे वळून ती परत बघितली. आणि मग बरोबरच्या मैत्रिणीला त्या ठराविक प्रकारच्या पर्सेसच्या स्टाइलबद्दल काही सांगायचं होतं म्हणून मैत्रिणीला बोलावून त्या रॅकपुढे उभं राहून, त्या पर्सकडे बोट दाखवत मी तिला काही सांगायला जाणार इतक्यात सेल्समन मधे येऊन ये अमुक ब्रॅण्डका है. ऐसेही स्टाइलमे वो बाजूमे औरभी है पर्सेस. वगैरे सांगू लागला. मग असला झाडला त्याला. म्हणलं मला गरज वाटली तर मी तुला प्रश्न विचारेन. उगाच मधे मधे येऊन बोलू नकोस. गेले १० मिनिटे तू आमच्या मागे मागे फिरतोयस. कशासाठी? काय प्रॉब्लेम आहे तुझा? तर म्हणे मै सेल्समन हूं यहा का. शेवटी मॅनेजरकडे तक्रार केली.

सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन.

या विषयाची एक बाजू आपण "सगळेच सेल्समन" या सर्वसाक्षींच्या प्रतिसादात वर आली आहे. सेलिंग आणि मार्केटिंगचा रोल फॅसिलीटेशनचा आहे तो तिथेच मर्यादीत न राहता ओसंडतो, मालक आणि ग्राहक या दोहोंची सेल्समनने उतूनये मातू नये ही अपेक्षा रास्तच असते. आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) याचा पडद्या मागचा एक कर्ता करवीता फायनान्स हा घटकही असतो, जो काहीही झालेतरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मागत असतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा दबाब मालकां/व्यवस्थापनावर येतो. सेल्समन स्वतःसाठी स्वतःच्या कुटूंबासाठीच्या स्पर्धेत झटतो हे समोरून दिसणारे सत्य आहे, व्यवस्थापन त्याच्या गरजेला मोहरा बनवते ते प्रत्येक स्टेकहोल्डरचे किंवा त्यांच्या कुटूंबाचे पोट भरण्यासाठी.

सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे हे बरोबर आहे इतर कलांप्रमाणे काही गुण जन्मजात असतात, काही कौशल्ये आत्मसात कारवी लागतात, कौशल्ये आत्मसात करताना प्रशिक्षणाचे महत्व असू शकते, कोणत्याही क्षेत्रात सर्वांना चांगले प्रशिक्षण आणि प्रशिक्षक लाभतातच असे नाही ते याही क्षेत्रात होते, गुण नाही पण वाण लागला असेही बर्‍याचदा होऊन व्यावसायीकतेस मारक असलेल्या अत्यंत चुकीच्या प्रॅक्टीसेस मालक व्यवस्थापन ते सेल्स मार्केटींग अमलात आणताना दिसते.

स्पर्धेचा अभाव अथवा अती स्पर्धा हे दोन्हीही ग्राहक अनुभवाच्यादृष्टीने अहीतकारक असतात. जेव्हा एखादा सेल्समन ग्राहकाला बुद्धू बनवून काम करतो त्यात सेल्समन आणि आस्थापनेच्या नैतीकतेचा प्रश्न असतोच पण या नाण्याची दुसरी बाजू ग्राहकाची सतर्कतेपेक्षा स्वभावनेला अधिक मह्त्व देणे हे सुद्धा तेवढेच कारणीभूत असू शकेल का असा प्रश्न पडत राहतो.

पैसा's picture

19 May 2015 - 8:12 pm | पैसा

माझी रोजच्या सामानाची खरेदी को ऑपरेटिव्ह स्टोअरमधे. पुस्तके, भाजी, दूध इ. मधे हा प्रश्नच येत नाही. आणि इतर बहुतेक सगळे (हो, कपडे सुद्धा) ऑनलाईन. कसलाच ताप नाय. एखादेवेळी पुण्याला हस्तकला मधे किंवा अशाच स्थानिक काहीतरी घ्यायच्यासाठी एखाद्या दुकानात गेले, तर तोंड उघडत नाही. सगळ्याला लेबलं लावलेली असतात. आवडलं ते उचललं. पैसे देऊन १० मिनिटांत बाहेर. कुठेही गेलं तर इतर कोणाच्यातरी मागून मख्खपणे जावे. म्हणजे आपण स्वतंत्रपणे आलोय अशी शंकासुद्धा दुकानातल्या सेल्समनना येऊ द्यायची नाही.