मन करा रे प्रसन्न

जागु's picture
जागु in मिपा कलादालन
14 May 2015 - 2:30 pm

कुठेही फुल दिसले त्या ऐवजी मी असे म्हणेन की कुठेही गेले की मी फुले शोधत असते. असेच शोध घेता घेता तर काही सहज दिसलेली कॅमेर्‍यात टिपलेली ही फुले. ही फुले पाहून तुम्हीही फुलांसारखे प्रसन्न व्हावे ही सदिच्छा.

१) पिवळ्या हळदीत रंगलेली नवरीच जणू अशी ही पिवळी अबोली.

२) अडेनियम

३)

४) राणीच्या बागेतील गायत्रीची फुले

५) हळद-कुंकूची फुले (राणीचा बाग)

६) स्प्रिंग सारखी दिसणारी फुले

७) तामण

८) पिवळा एक्झोरा

९) पांढरा गुलाब

१०) शिवण

११) कृष्ण्कमळ

१२) चाफा

१३) सीता अशोक

१४) हि आमची पेरूची फुले

१५) कांचन

१६) कुडा

१७) पीतमोहोर

१८)

१९) बिट्टी

२०) पांढरा बहावा

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 2:57 pm | मृत्युन्जय

खतरनाक फोटो लैच आवडले.

वाह, एकदम प्रसन्न झाले मन! तुमच्या धाग्यात फुलांची नावे समजतात ते फार आवडतं. अडेनियम तर चाफ्याचा एक प्रकार वाटतेय. गायत्री, शिवण ही नावे माहिती नव्हती. किती सुंदर फुले आहेत सगळी! विशेषतः ते बिट्टीचे फूल पाहून मन एकदम बालपणात गेले. याच्या बिट्ट्या गोळा करून खूप खेळत असू. जास्त बिट्ट्या कोण गोळा करतो यावर अहमहमिका चालायची!

भिंगरी's picture

14 May 2015 - 4:09 pm | भिंगरी

अगदी अगदी

श्रीरंग_जोशी's picture

15 May 2015 - 8:03 am | श्रीरंग_जोशी

स्वॅप्स यांनी मांडलेल्या भावनेशी सहमत.

मी लहान असताना घरमालकांच्या बंगल्याच्या एका कोपर्‍यात बिट्ट्यांचे मोठे झाड होते. आज अनेक वर्षांनी ती आठवण वर आली.

मनःपूर्वक धन्यवाद, जागुतै.

मस्त फोटो. ती स्प्रिंग सारखी दिसणारी कळलावी का?

मदनबाण,मृत्युंजय धन्यवाद.
स्वॅप्स अडेनियमला वाळवंटातील गुलाबही म्हणतात.

सूड नाही कळलावी वेगळी. कळलावीचा वेल असतो व त्याचे फुल अर्धे पिवळे व अर्धे लाल असते.

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा

ही खरी पुष्प पूजा!

भिंगरी's picture

14 May 2015 - 3:59 pm | भिंगरी

हे जे 'कुडा'चे फुल आहे त्याच्या फळावर फुटबॉलवर असणार्‍या षटकोणासारखी डिझाईन असते का?

भिंगरी तुम्ही म्हणताय ते नोनी उर्फ बारतोंडी. त्याचे फुलही साधारण असेच पण थोडे लहान असते. हा कुडा आहे. ह्या फुलांची भाजी करतात.

अत्रुप्त धन्यवाद.

भिंगरी's picture

14 May 2015 - 4:08 pm | भिंगरी

धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.

कपिलमुनी's picture

14 May 2015 - 4:09 pm | कपिलमुनी

जागु तै प्रकट झाल्या हैत :)
सुंदर फोटो !

स्पा's picture

14 May 2015 - 4:36 pm | स्पा

वा वा
मन अगदी "प्रसन्न"झाले :)

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा

प्र सन्न यांचेशि सहमत!

पांडुच्या आत्मकोटिक प्रतिसादांचा फ़्याण- आत्म्हा!

नूतन सावंत's picture

14 May 2015 - 9:59 pm | नूतन सावंत

जागुताई,मस्त फोटो ग.तुझे मागच्या धाग्यांवरचेही फुलांचे फोटो सुरेख आहेत.

रेवती's picture

14 May 2015 - 10:02 pm | रेवती

फोटू आवडले.
हळदी कुंकवाची फुले एकाच झाडाला येतात की दोन झाडे वेगळी असतात?

जागु's picture

14 May 2015 - 10:32 pm | जागु

एकाच झाडाला येतात

आश्चर्य आहे. एका झाडाला दोन प्रकारची फुले हे पहिल्यांदाच ऐकतिये.

काय अप्रतिम फोटो आहेत. पिवळी अबोली पण असते हे तर पहिल्यादाच पाहिलं. तुम्हाला एवढी नावं कशी माहिती आहेत? यातली बरीच फुलं मी पाहिली आहेत पण आज तुमच्यामुळे पहिल्यांदा नावं कळली. सुंदर आले आहेत एकुण एक फोटोज.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2015 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त.....!

-दिलीप बिरुटे

रुपी's picture

14 May 2015 - 10:52 pm | रुपी

खरंच मन प्रसन्न झाले. तुम्हाला एतक्या फुलांची नावे माहित आहेत हे विशेष!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2015 - 8:27 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

नंदन's picture

15 May 2015 - 10:24 am | नंदन

फोटो आवडले, खरोखरच मन प्रसन्न करणारे आहेत!

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 May 2015 - 2:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही बॉटनी वाल्या आहात का हो? नै म्हंजे येवढी नावे माहीत आहेत म्हणुन विचारले...

उमा @ मिपा's picture

17 May 2015 - 10:55 pm | उमा @ मिपा

खूप सुंदर! नावं समजली हे विशेष.

मन झालं गं प्रसन्न फुलं पाहुन!

पर्नल नेने मराठे's picture

18 May 2015 - 9:11 am | पर्नल नेने मराठे

म स्त

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 11:00 am | कविता१९७८

वाह जागु, सुगरण तर तु आहेच पण बागकामाचीही तुला विशेष आवड आहे, सर्व प्रकारच्या झाडांची , फुलांची माहीती तुला असते आणि तुझ्या निमित्ताने ती आम्हालाही मिळते.