प्रिय समुद्रा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 May 2015 - 12:10 pm

प्रिय समुद्रा,
कश्या रे तुझ्या लाटा आंधळ्या
पुढची कातळावर फुटलेली
दिसतच नाही..
मागून येऊन पुन्हा त्याच
कातळावर आदळतात
कां? कशासाठी??
फुटण्यासाठी ?!
------
प्रिय समुद्रा,
तुला चंद्राची खुपच ओढ म्हणे
का त्याला तुझी?
किती वर्षांची साथ रे तुमची?
कधी एकत्र बसून
गप्पा मारतांना पाहीले नाही तुम्हाला!
अशी कशी रे हि दोस्ती?
स्पर्शातित!
-----
प्रिय समुद्रा,
तुझ्या पोटात अनेक वादळे
असतात म्हणे..
पण मला कळत नाही
त्यात नवल ते काय?
इथे सगळेच आपापली
वादळे घेऊन वावरतात..
त्या वादळांच करायच काय?
हाच काय तो प्रश्न बाकी आहे..
------
प्रिय समुद्रा,
कसं वाटत रे?
जेव्हा तुझ्याच किनार्‍याशी बसून
तुला न विचारता, तुला साक्षीला ठेवून
आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाका
घेणार्‍या जोडप्यांकडे बघून?
कसा पाहतोस तू त्यांच्याकडे?
रागाने? करुणेने? कि वात्सल्याने?
------
प्रिय समुद्रा,
एकदा माझ्या घरी येशील?
खुप गप्पा मारु
वादळाच्या, घनगंभीरतेच्या, बुडणार्‍या जहाजांच्या,
रंगीबेरंगी जलचरांच्या, मोत्यांच्या, रत्नांच्या
आणि
तुझ्या उदरात गडप होऊन
आयुष्य संपवणार्‍या जिवांच्या
करुण कहाण्यांच्या?
तू कसं सामावतोस त्यांना
याबद्दल एक विचित्र कुतुहल
आहे मला...
येशील?
-----
प्रिय समुद्रा,
तू एकदा खुप रागावला होता म्हणे
एक मोठ्ठी लाट जन्माला घातलीस
आणि दिली धाडून
गरीब भाबड्या जिवांवर
कां रे?
ना ती लाट जिवंत राहीली
ना ते जिव...
फक्त एक प्रश्न राहीला
कां?
-----
प्रिय समुद्रा,
तुला माहितीये?
तुझ्या माझ्यात एक साम्य आहे
तू ही वेडा आणि मी ही
एकही लाट जिवंत राहणार नाही
हे माहीत असूनही तु
एकामागे एक लाटा जन्माला
घालत राहतोस
आणि मी
एकदाही 'ती' किनार्‍यावर येणार नाही
हे माहित असूनही
रोज एक आशा
जन्माला घालत राहतो..
असं कां रे?
----
प्रिय समुद्रा,
आज आलो खरा मी
तुझ्याकडे...
शांततेसाठी आलो होतो
जिव निववायला आलो होतो
पण जाऊ दे..
चलतो मी..

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०५/२०१५)

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 12:15 pm | वेल्लाभट

छान !!! समुद्र हा त्याच्या भौतिकतेसारखाच एक गहन विषय आहे.

वाचताना खुप सोप्प्या पद्धतीने वाटतात ही मुक्तके.. पण कितीतरी खुप गहन प्रश्न दडलेले आहेत यात.
मस्त वाटले वाचताना .. समुद्राला घरी येशिल म्हणणारे मुक्तक जास्त आवडले..
----

शेवटच्या मुक्तकात गेलाच होता समुद्राकडे तर बोलायचे की जरा..

स्पा's picture

14 May 2015 - 12:51 pm | स्पा

जबराटच, हाय क्लास

जियो

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 May 2015 - 12:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रिय समुद्रा,
तुझ्या पोटात अनेक वादळे
असतात म्हणे..
पण मला कळत नाही
त्यात नवल ते काय?
इथे सगळेच आपापली
वादळे घेऊन वावरतात..
त्या वादळांच करायच काय?
हाच काय तो प्रश्न बाकी आहे..

हे विषेश आवडले

पैजारबुवा,

खेडूत's picture

14 May 2015 - 2:14 pm | खेडूत

आवडली !

तिमा's picture

14 May 2015 - 7:09 pm | तिमा

मिका
ही कविता लिहून माझ्या मनांत अनेक वादळे जन्माला घातलीस रे पोरा !
खूप छान !

सूड's picture

14 May 2015 - 3:14 pm | सूड

प्रिय समुद्रा,
तुझ्या पोटात अनेक वादळे
असतात म्हणे..
पण मला कळत नाही
त्यात नवल ते काय?
इथे सगळेच आपापली
वादळे घेऊन वावरतात..
त्या वादळांच करायच काय?
हाच काय तो प्रश्न बाकी आहे..

प्यारे१'s picture

14 May 2015 - 3:16 pm | प्यारे१

'मिका'क्लास कविता!
भारीच्च!
कसं सुचतं ओ ? ;)

बहुगुणी's picture

14 May 2015 - 3:59 pm | बहुगुणी

'मिका'क्लास कविता!

धागा उघडल्याचं चीज झालं!

नाखु's picture

14 May 2015 - 5:05 pm | नाखु

जोखडातून मुक्त आणि अर्थ्-भोवरे देणारी कवीता.

जियो एक "मिका टच" म्हणतात तो हाच !!!

प्रसाद गोडबोले's picture

14 May 2015 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले

छान निबध्ध !

चुकलामाकला's picture

14 May 2015 - 6:05 pm | चुकलामाकला

क्या बात है!

विवेकपटाईत's picture

14 May 2015 - 9:34 pm | विवेकपटाईत

आवडली कविता. माझ्या पोटात ही वादळे गड गड करत राहतात.

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2015 - 11:26 pm | अत्रुप्त आत्मा

मि.का. ,बस्स! नाम ही काफी है|

प्रचेतस's picture

14 May 2015 - 11:35 pm | प्रचेतस

मिकाटच...अप्रतिम.

शलभ's picture

15 May 2015 - 8:47 pm | शलभ

अप्रतिम. आवडली.

किसन शिंदे's picture

16 May 2015 - 10:20 am | किसन शिंदे

अप्रतिम!

नाखु's picture

16 May 2015 - 1:40 pm | नाखु

"हाडाचा" कवी आहे ही नम्र नोंद
कवीशी समक्ष भेट झालेला
वाचक नाखु.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 May 2015 - 1:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हा हा हा

अतिशय उत्कृष्ट.मिका सिग्नेचर स्पष्ट उमटलेली सुंदर रचना..

यशोधरा's picture

16 May 2015 - 6:33 pm | यशोधरा

प्रिय समुद्रा,
तुझ्या पोटात अनेक वादळे
असतात म्हणे..
पण मला कळत नाही
त्यात नवल ते काय?
इथे सगळेच आपापली
वादळे घेऊन वावरतात..
त्या वादळांच करायच काय?
हाच काय तो प्रश्न बाकी आहे..

चाणक्य's picture

18 May 2015 - 7:05 pm | चाणक्य
चाणक्य's picture

18 May 2015 - 7:05 pm | चाणक्य
चाणक्य's picture

18 May 2015 - 7:06 pm | चाणक्य
चाणक्य's picture

18 May 2015 - 7:07 pm | चाणक्य

मस्त रे... तुझ्या लेखणीत तरल आणि आशयघन असं जबराट काॅम्बिनेशन आहे. खास मिका स्टाईल

पैसा's picture

18 May 2015 - 10:02 pm | पैसा

समुद्राला विचारलेले प्रश्न त्याच्या लाटांसारखेच विरून जाणार आहेत अनुत्तरित!

अर्व's picture

20 May 2015 - 3:15 pm | अर्व

प्रिय समुद्रा,
एकदा माझ्या घरी येशील?
खुप गप्पा मारु
वादळाच्या, घनगंभीरतेच्या, बुडणार्‍या जहाजांच्या,
रंगीबेरंगी जलचरांच्या, मोत्यांच्या, रत्नांच्या
आणि
तुझ्या उदरात गडप होऊन
आयुष्य संपवणार्‍या जिवांच्या
करुण कहाण्यांच्या?
तू कसं सामावतोस त्यांना
याबद्दल एक विचित्र कुतुहल
आहे मला...
येशील?

काहीतरी खास आहे या ओळीत..
समद्रासारखच घनगंभीर आणि पोटात खोल खोल अर्थ दडवलेलं

प्रीत-मोहर's picture

25 May 2015 - 5:11 pm | प्रीत-मोहर

सही. एक्दम मिका स्टाईल.

फिझा's picture

19 Apr 2016 - 12:27 pm | फिझा

खूप मस्त !! आवडली कविता !!

जव्हेरगंज's picture

19 Apr 2016 - 9:08 pm | जव्हेरगंज

आवडली!

जव्हेरगंज's picture

19 Apr 2016 - 9:09 pm | जव्हेरगंज

आवडली!

जव्हेरगंज's picture

19 Apr 2016 - 9:09 pm | जव्हेरगंज

आवडली!

विजय पुरोहित's picture

19 Apr 2016 - 9:34 pm | विजय पुरोहित

सुंदर काव्य आहे...
अप्रतिम...

उल्का's picture

19 Apr 2016 - 9:38 pm | उल्का

अप्रतिम!
समुद्राकडे बघितल्यावर हे असेच काहिसे प्रत्येकाच्या मनी उमटत असावे जे तुम्ही खूप सुन्दरपणे शब्द्बद्ध केलय.