पुण्यात येणार कुवेतचे शेख :)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in भटकंती
10 May 2015 - 7:02 pm

पुण्यात येणार कुवेतचे शेख :)

गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही.

त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे.

मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील)

कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल.
शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) )

मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :)

अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2015 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

राखिव आसण क्रमांक १
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
..
हो! इथेही! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 7:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सोनेरी पाणी आणि चैतन्यकांडीमधे मी नाही. मात्र कुक्कुटान्न आणि मत्स्यखाद्य चालेल. पण कट्ट्याला ९९% येईन एका लग्नाला जायला नाही लागलं तर. शेख साहेबांसाठी नारळ, शालजोडीमधले तयार आहेत. रेसिप्या टाकुन त्रास देण्याबद्दल सत्कार करण्यात येईल ;)

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 7:58 pm | टवाळ कार्टा

नारळ कुठे फोडणार ते आधीच सांग...तशी तयारी करता येईल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 May 2015 - 6:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दिपकशेख पनिरौदुल्लाखान कुवेती दांडपट्टेकर. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2015 - 7:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बादवे. आपले ** काका पण येणारेत ना ह्याचं सुमारास. त्यांचं नावं पण ठेव टाकुन. मुद्दाम ** नी लिहिलयं. त्यांची परवानगी घेतलेली नाही म्हणुन. ;)

टवाळ कार्टा's picture

10 May 2015 - 7:58 pm | टवाळ कार्टा

कोण रे कोण??? ;)

प्यारे१'s picture

11 May 2015 - 2:24 pm | प्यारे१

माझ्याबद्दल असेल तर स्वारी शक्तीमान.

शक्य होणार नाही. धन्यवाद्स. :)

प्यारे१'s picture

29 May 2015 - 11:00 am | प्यारे१

आता शक्य होइलसे दिसत आहे.
तरीही 70 हो-30 नाही शक्यता.

टवाळ कार्टा's picture

29 May 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा

पण ते ** काका तुम्हीच कश्यावरून =))

प्यारे१'s picture

29 May 2015 - 2:33 pm | प्यारे१

मीच तो मीच तो.
मना कलत नाय असा वाटला कं रं बाला?
- (दशावतारी) प्यारे ;)

मुक्त विहारि's picture

11 May 2015 - 10:18 am | मुक्त विहारि

पक्षी तीर्थाला नक्कीच येणार....

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:08 pm | टवाळ कार्टा

पक्षी तीर्थाला नक्कीच येणार....

सोबतच जाउया का?

पैसा's picture

11 May 2015 - 10:24 am | पैसा

दीपकला भेटायला नक्की आवडेल. पण ७ ला रत्नागिरीत एका लग्नाला जायचं आहे. त्यामुळे पुणे वारी अशक्य.

दिपक.कुवेत's picture

12 May 2015 - 11:05 am | दिपक.कुवेत

पुणेकरांनी जरी तुझी नुसती चहावर (तो सुद्धा १७ वेळा सांगून) बोळवण केली असली तरी मी तूला हवं ते खायला घालीन...पार्टी माझाकडून लागू.

पैसा's picture

12 May 2015 - 11:32 am | पैसा

धन्यवाद रे! पण मला त्यासाठी रजनीकांत नाहीतर गेलाबाजार माईसाहेब तरी व्हावं लागेल. ते कसं जमायचं! नक्की भेटू कधीतरी. याच जन्मात! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 10:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

या ओ. येताना काजुफळ घेउन या हवं तर. गप्पा मारता मारता फोडुन फळं परत देउ.

पैसा's picture

12 May 2015 - 10:55 pm | पैसा

तुला मुद्दा कळला नाय! =))

त्याच दिवशी माझ्या सख्ख्या मैत्रिणीच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न रत्नागिरीत आहे. तेव्हा एकाच वेळी एकाच दिवशी रत्नांग्री आणि पुण्यात हजर असायला मी एक तर रजनीकांत असले पाहिजे किंवा माई तरी. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्या सदिच्छा हिचं आपली उपस्थिती छाप लग्नं होतं नैत का रत्नांग्रीस?

बाकी नवर्‍या मुलाला लवकर मो़कळा कराव हो.

पैसा's picture

12 May 2015 - 10:57 pm | पैसा

त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण असतील त्याना फोन करीन आणि टवाळ कार्टा आला तर तू मला फोन कर. =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठल्या १०० नंबरवर का १०१ वर?

पैसा's picture

12 May 2015 - 11:00 pm | पैसा

१०८ ला कर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 11:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

णक्की. नारळाच्या शिमट्या आणाल का हो एक डझनभर. एक सहज आठवलं म्हणुन. टकाचा काही संबंध नाही.

पैसा's picture

12 May 2015 - 11:21 pm | पैसा

आणि काय पाहिजे?

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:22 pm | टवाळ कार्टा

१०८ ला कर.

खिक्क...मीच येताना ट्यांकर घेउन येऊ कै? ;)

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:21 pm | टवाळ कार्टा

त्यापेक्षा मी कट्ट्याला कोण असतील त्याना फोन करीन आणि टवाळ कार्टा आला तर तू मला फोन कर. =))

आणि पैसा टै ग्यांग घेउन आल्या तर मला सांग रे ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

डबल एजंट म्हणुन काम करणं बरचं अवघड दिसतयं. ;)

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:35 pm | टवाळ कार्टा

चैला पैसा टैंना नक्की कोणीतरी माझी सुपारी दिली आहे
धाग्यावर, खफवर मी आलो की मला फोन करायच्या धमक्या देत आहेत
मी फुक्कट के काजू फुक्कट के मानकुराद न माग्ता पण :(

पैसा's picture

13 May 2015 - 12:22 am | पैसा

लाडका म्हणून चौकशी करायला फोन करीन म्हटलं तर हे पळतंय!

टवाळ कार्टा's picture

13 May 2015 - 2:11 am | टवाळ कार्टा

पेहले खरड...फिर व्यनी और जरुरत पडे तो फोन
- बाजीराव सगळे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 May 2015 - 6:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

टका सद्ध्या मी "माझ्याशी मयतरी करणार का" टाईप मेसेज नी वैतागलोय.

टवाळ कार्टा's picture

13 May 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा

टका सद्ध्या मी "माझ्याशी मयतरी करणार का" टाईप मेसेज नी वैतागलोय.

खिक्क...तसे व्यनी कोणाकडून येतात बरे? =))

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 10:41 pm | टवाळ कार्टा

मी पुण्यात गेल्तो तेव्हा पुणेकरांनी मला उसाचा रस, वडापाव, कोकम सरबत पाजलेले...ते पण फुक्कट :)

पैसा's picture

12 May 2015 - 10:46 pm | पैसा

एक तर तू नदीच्या पलिकडे गेला असशील किंवा ते पुणेकर नसतील.

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:23 pm | टवाळ कार्टा

एक तर तू नदीच्या पलिकडे गेला असशील किंवा ते पुणेकर नसतील.

मी अलीकडून पलीकडे गेलो की पलीकडून अलीकडे गेलो ते म्हैत नै

धन्या असणार तो!! उसाचा रस, वडापाव, कोकम सरबत एका टवाळ माणसाला म्हणजे जरा अतिच झालं.

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:22 pm | टवाळ कार्टा

धन्या असणार तो!! उसाचा रस, वडापाव, कोकम सरबत एका टवाळ माणसाला म्हणजे जरा अतिच झालं.

ते मला न मागता मिळाले...तु मागतोस काय?

सूड's picture

12 May 2015 - 11:25 pm | सूड

तु मागतोस काय?

छे मागत वैगरे नाही, आमचं आम्ही पितो/खातो. सोबत मित्र वैगरे असेल तर टीटीएमेम या न्यायाने कारभार चालतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 11:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. गेल्या कट्ट्याला टका एकटा बिल भरायला निघालेला. एक धायरीकर, एक तळेगावकर आणि एक आकुर्डीकरांनी पुणेरी दिलदारपणा दाखवुन टी.टी.एम.एम. करुन टक्याला गरिबीपासुन वाचवलं. ;)

नशीब तूच बोल्लास, आम्ही बोललो की तोंड दिसतं!! =))))

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:32 pm | टवाळ कार्टा

हो नैतर लोन काढावे लागले असते

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2015 - 11:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही. भगवी कफनी वगैरे पर्यंत गेली असती वेळ. लोन खुप साधी गोष्ट आहे :P

अरे बापरे, कोकम सरबत, उसाचा रस आणि वडापाव इतकं महाग झालंय पुण्यात?

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 11:37 pm | टवाळ कार्टा

भगवी कफनी वगैरे मला झेपणारे नै...पो.प.चे प्रेषित उर्फ "गिर जा" काका आहेत त्यांच्या कडे द्या पाठवून भगवी कफनी

चिमी's picture

11 May 2015 - 10:46 am | चिमी

कट्टा स्थान सांगा की..

मुक्त विहारि's picture

11 May 2015 - 11:05 am | मुक्त विहारि

हे नक्की...

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:08 pm | टवाळ कार्टा

कट्टा स्थान सांगा की..

पुण्यवंतांनाच सुचवू दे

मृत्युन्जय's picture

11 May 2015 - 12:04 pm | मृत्युन्जय

६ जुन शनिवार आहे. त्यामुळे जगभरच्या हॉटेलात तौबा गर्दी असेल. त्यामुळे बाणेर रोडवरचे "ग्रीनपार्क" हे ठिकाण योग्य राहिल असे सुचवु इच्छितो. (इथे निवांत बसताही येइल आणि मोठ्या ग्रुपची सोयदेखील होउ शकते).

दुसरे बरे ठिकाण म्हणजे पुणे विद्यापीठापासुन पाषाणकडे जायचा जो रस्ता आहे तिथे डेक्कन हिल्स का कायसे हॉटेल आहे. ते देखील बरे पडेल. अन्यथा बंजारा हिल्स किंवा गार्डन कॉर्ट बघा. तीर्थप्राशन, खाटखुट या सग्ळ्याची व्यवस्था होइल असे बघत पर्याय सुचवले आहेत.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:11 pm | टवाळ कार्टा

६ जुन शनिवार आहे. त्यामुळे जगभरच्या हॉटेलात तौबा गर्दी असेल. त्यामुळे बाणेर रोडवरचे "ग्रीनपार्क" हे ठिकाण योग्य राहिल असे सुचवु इच्छितो. (इथे निवांत बसताही येइल आणि मोठ्या ग्रुपची सोयदेखील होउ शकते).

दुसरे बरे ठिकाण म्हणजे पुणे विद्यापीठापासुन पाषाणकडे जायचा जो रस्ता आहे तिथे डेक्कन हिल्स का कायसे हॉटेल आहे. ते देखील बरे पडेल. अन्यथा बंजारा हिल्स किंवा गार्डन कॉर्ट बघा. तीर्थप्राशन, खाटखुट या सग्ळ्याची व्यवस्था होइल असे बघत पर्याय सुचवले आहेत.

कुठेही बघा पण शेखांना मस्य व मला तंदूर मधला पक्षी असेल असे बघा :)

बॅटमॅन's picture

12 May 2015 - 12:13 pm | बॅटमॅन

मस्य नाही मत्स्य.

-आपला, व्याकरणब्रिगेडी.

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 10:01 pm | टवाळ कार्टा

मस्य नाही मत्स्य.

-आपला, व्याकरणब्रिगेडी.

ब्रोब्र

चलत मुसाफिर's picture

11 May 2015 - 12:25 pm | चलत मुसाफिर

कुठल्याही कंपूचा (अद्याप) हिस्सा नसलेल्या नवमिपाकरांना मिपाकट्ट्यात प्रवेश असतो काय?

कुठल्याही कंपूचा (अद्याप) हिस्सा नसलेल्या नवमिपाकरांना मिपाकट्ट्यात प्रवेश असतो काय?
कट्ट्याला कंपु नसतो..

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:11 pm | टवाळ कार्टा

कट्ट्याला कंपु नसतो..

सोवळ्यातला कंपू सोडून का पकडून?

llपुण्याचे पेशवेll's picture

11 May 2015 - 1:50 pm | llपुण्याचे पेशवेll

हे शेख साहेब कोण आहे हे कळाले तर फार आनंद होईल. :) आम्ही पण कट्ट्याला यायचा विचार करू.

अरे पुपे, शेखसाहेब म्ह्ण्जे दिपक कुवेतकर! गणपा रिटायर झाल्यानंतर शेफची शेगडी त्यांनी सांभाळलीये. पण ते सारखे पनीरचे पदार्थ करत असतात.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 11:08 pm | टवाळ कार्टा

दिपक कुवेतकर नै...दिपक कुवेत पनीरकर :)

रेवती's picture

11 May 2015 - 11:10 pm | रेवती

हा हा. भारी!

llपुण्याचे पेशवेll's picture

15 May 2015 - 5:54 pm | llपुण्याचे पेशवेll

वाटलंच रेवतीकाकूच मदतीला धावून येणार. नक्की नक्की येऊ मग कट्टयाला.

गणपा रिटायर झाल्यानंतर शेफची शेगडी त्यांनी सांभाळलीये.
गादी सांभाळ्ल्या बद्धल शेख साहेबांना तहे दिल से शुक्रिया... ;)
बाकी, आज्जे गणपा सेठ रिटायर झाले ? बापरे... कधी ? कसे ? का ?

जाता जाता :- आध्य बल्लावाचार्य श्री.श्री.श्री गणपा शेठ तुम्ही जिथे कुठे गेला असाल तिथुन इथे परत या ! आम्ही तुमची वाट पाहत आहोत !
इति :- मदनराव प्रेमनगरकर आणि समग्र अघळ पघळ मित्रमंडळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

पैसा's picture

12 May 2015 - 9:51 am | पैसा

आलेत! जरा इकडे तिकडे बघ. घराच्या जवळ दिसेल कुठेतरी! सध्या आंतरजालीय नेटवर्कच्या एकूणच बाहेर आहे तो.

मदनबाण's picture

12 May 2015 - 9:59 am | मदनबाण

आलेत! जरा इकडे तिकडे बघ. घराच्या जवळ दिसेल कुठेतरी!
अच्छा अच्छा ! असं व्हयं... बरं वाटलं बघा आम्हासनी. :)

जाता जाता :- युएस टाईम मधे आज्जे आणि इंडिया टाईम मधे पै तै गादी चालवतात तर ! ;)
नमस्कार त्या "हुच्च" गादीला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

पैसा's picture

12 May 2015 - 11:00 am | पैसा

मी अन रेवती आम्ही कुठच्याच प्रकाराने हुच्च लोकांत मोडत नै!

दिपक.कुवेत's picture

12 May 2015 - 10:54 am | दिपक.कुवेत

सांभाळणारा? गणपा एकमाद्वीतीय आहे आणि माझ्याहुन सरस असे एक सो एक बल्लवाचार्य आहेत की ईथे!!

कपिलमुनी's picture

11 May 2015 - 1:55 pm | कपिलमुनी

हा देखील उत्तम पर्याय आहे. अगोदर टेबल राखून ठेवता येइल.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:13 pm | टवाळ कार्टा

हा देखील उत्तम पर्याय आहे. अगोदर टेबल राखून ठेवता येइल.

बाबू गणेशन असेल तर २ दिवस उपवास करून येउ ;)

बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी ठेवणार असाल तर अंमळ अशक्य दिसतंय!!

कपिलमुनी's picture

11 May 2015 - 3:00 pm | कपिलमुनी

मध्यवर्ती ठिकाण कोणते ?

बॅटमॅन's picture

11 May 2015 - 5:57 pm | बॅटमॅन

अक्षरधारा, नैतर साधना.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:13 pm | टवाळ कार्टा

अक्षरधारा, नैतर साधना.

आणि तिथली चहा ;)

ह्याचा उकल अद्याप व्हायचा आहे....

तुर्तास, आमच्या द्रुष्टीने "आकुर्डी" हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण.

तुर्तास, आमच्या द्रुष्टीने "आकुर्डी" हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण.

असं करुया, पुण्यात आल्यावर ज्या ठिकाणी उभे राहाल ते ते ठिकाण मध्यवर्ती म्हणून घोषित करुन टाकू आपण!! ;)

मुक्त विहारि's picture

11 May 2015 - 6:34 pm | मुक्त विहारि

आकुर्डीच उत्तम आहे....

असं नका करु, मी आता मध्यवर्ती ठिकाण, मध्यवर्ती ठिकाण अशा पाट्या रंगवायला घेतल्यात त्यांचं काय करायचं आता? किमान अर्धा डझन मध्यवर्ती ठिकाणं होऊन जाऊदेत. पाह्यजे तर आकुर्डीला आपण 'मानाचं पहिलं मध्यवर्ती ठिकाण' असा किताब देऊ. ;)

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:16 pm | टवाळ कार्टा

असं नका करु, मी आता मध्यवर्ती ठिकाण, मध्यवर्ती ठिकाण अशा पाट्या रंगवायला घेतल्यात त्यांचं काय करायचं आता? किमान अर्धा डझन मध्यवर्ती ठिकाणं होऊन जाऊदेत. पाह्यजे तर आकुर्डीला आपण 'मानाचं पहिलं मध्यवर्ती ठिकाण' असा किताब देऊ. ;)

बनव की...फक्त ठिकाणाचे नाव नको लिहू....ज्या ठिकाणाला मध्यवर्ती घोषीत करायचे असेल तिथे जाऊन खोचायची
हा.का.ना.का.

यशोधरा's picture

15 May 2015 - 12:23 pm | यशोधरा

आँ? आँ? डोंबोलीचं काय झालं म्हणे?

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:14 pm | टवाळ कार्टा

बाणेर वैगरे लांबच्या ठिकाणी ठेवणार असाल तर अंमळ अशक्य दिसतंय!!

तुझ्या अथवा सगाच्या घरी एक्स्टेंडेड कट्टा करायचा का? ;)

माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण पक्षी-तीर्थ वाल्यांचा लोच्या होईल.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:24 pm | टवाळ कार्टा

म्हणूनच सगाचे घर हा ब्याकप आहे (अर्थात त्याला जमले तर)

सूड's picture

11 May 2015 - 9:40 pm | सूड

तू ये आधी मग बघू!! =))))

बोलाची कढी नि बोलाचा भात!!

अत्रन्गि पाउस's picture

11 May 2015 - 2:48 pm | अत्रन्गि पाउस

हा कट्टा मुंबईमध्ये का होऊ नये ??
काही जण मुंबईतूनच पुण्यात जाताहेत नं ?
सजेशन ...'बाबू गणेशन' (बार्बेक्यू नेशन) ठाण्यात सुद्धा आहेच ...

त्यांचा एक सत्कार जगातल्या मध्यवर्ती ठिकाणी पण होणार आहेच,

तेंव्हा परीघातल्या म्हणजे, मुंबई-पुणे इत्यादी, ठिकाणी जायला जमत नसेल तर,

मध्यवर्ती ठिकाणी होणार्‍या शेख साहेबांच्या सत्काराला नक्की या.

खर्च आपापला...

जगातील मध्यवर्ती ठिकाण कोणते? हा प्रश्र्न इथे गैरलागू आहे.

सुबोध खरे's picture

11 May 2015 - 8:18 pm | सुबोध खरे

मु वि शेठ
मला हेच कळेना हे शेख बृहन मुंबईचे असून पुण्याच्या नादाला का लागत आहेत. आता तुम्ही मध्यवरती ठिकाणी कट्टा होईल म्हटल्यावर जरा बरे वाटले.

जगातल्या मध्यवर्ती ठिकाणी पक्षी-तीर्थाला आल्या शिवाय त्यांची भ्रमणगाथा पुर्ण होत नाही, असा पुरावा आहे.

पण जगाचे मध्यवर्ती तर यांबू आहे ना ?

मुक्त विहारि's picture

12 May 2015 - 11:49 am | मुक्त विहारि

यांबू हे तात्पुरते होते.

आता परत मुळ स्थानी.

दिपक.कुवेत's picture

12 May 2015 - 10:59 am | दिपक.कुवेत

अगदि खरं. १५ जून ९९% मी मध्यवर्ती डोंबोलीत असेन....जागा तीच आपली...फेमस नंदी पॅलेस...मील बैठेंगे सब यार. तस्मात १५ जून संध्याकाळ मोकळी ठेवा आणि हो ह्या वेळेस गाडगील साहेबांना पण आवर्जून आमंत्रण द्या.

डॉकः अहो लग्न/मुंजी निमित्त पुण्यास जाणं होणार आहे सो सोचा गले हात एक कट्टा भी हो जाय. पण आपण १५ ला भेटूच.

मुक्त विहारि's picture

12 May 2015 - 11:47 am | मुक्त विहारि

फिक्स.

गाडगीळांना घेवून यायची जबाबदारी आमची.

टवाळ कार्टा's picture

11 May 2015 - 9:16 pm | टवाळ कार्टा

हा कट्टा मुंबईमध्ये का होऊ नये ??
काही जण मुंबईतूनच पुण्यात जाताहेत नं ?
सजेशन ...'बाबू गणेशन' (बार्बेक्यू नेशन) ठाण्यात सुद्धा आहेच ...

ठाण्यात बाबू गणेशनच्या पेक्षा चांग्ल्या जागा आहेत :)

खटासि खट's picture

11 May 2015 - 6:11 pm | खटासि खट

कुवेतचे शेख म्हण डोक्याला पुण्याच्या दुचाकीस्वार तरुणींप्रमाणे फडके गुंडाळून आणि लोडाला टेकून बिलोरी काचेच्या पात्रातून रंगीत द्रव्य प्राशन करीत अल्पवस्त्रांकित बिंदूचाचीचे नृत्यकौशल्य पाहत माशाअल्ला अशी दाद देणारा.. असंच चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं,

मुक्त विहारि's picture

11 May 2015 - 6:16 pm | मुक्त विहारि

अद्याप आपण, कुवैतच्या शेख साहेबांना भेटला नाहीत, हे नक्की.