सलमानचा जामिन !

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
8 May 2015 - 11:16 am

उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी
१. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो.
२. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे.
३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे.
कारण -- इतर वेळी त्यांचे समाजातील वर्तन चांगले असते.
४. फूटपाथवर झोपणाऱ्या सगळ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा सरंक्षण देण्यात यावे. आणि विम्याचा हप्ता सबसिडीमार्फत देण्यात यावा.
कारण -- कुत्रे असलेत तरी ते माणसचं आहेत.
५. एखाद्याचा प्रेमभंग झाला असल्यास त्याचे भविष्यातले सगळेच गुन्हे माफ करावे. प्रेमभंग किती वेळा व्हावा याबद्दल बंधन असू नये. आणि अश्या प्रेमवीरांची मद्य पिण्याची व्यवस्था सरकारने त्यांच्या घरीच करावी (अर्थात सबसीडीमार्फतच!)
कारण -- प्रेमभंग ही एक नियतीने दिलेली एक शिक्षाच असते.
६. सेलेब्रिटीला जेल मध्ये पाठवयाचे असल्यास त्यांच्या ऐवजी त्यांच्या घरगड्यांना पाठवण्याची मुभा असावी.
कारण -- बाहेर राहून २०० कोटींचा व्यवसाय करणारे सेलेब्रिटी अर्थव्यवस्थेला हातभारच लावत असतात.
७. अपघात, शिकार, बलात्कार, देशद्रोह असल्या फालतू कारणांसाठी सेलेब्रिटीवर खटला भरून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये. न्यायालयाबाहेरच असे खटले मार्गी लावावे.
कारण-- बडे बडे देशो मी ऐसी छोटी छोटी बाते होती ही रेहती है !

मुक्तकप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

8 May 2015 - 12:53 pm | काळा पहाड

एक गोष्ट कळत नाही. जज नं विचारलं की प्रॉसिक्युशन नं कमाल खान आणि ड्रायव्हर ला का बोलावलं नाही? प्रॉसिक्युशन कसं बोलावणार? जर त्यांना माहिती आहे की हे दोघे सलमानच्या बाजूने साक्ष देणार आहेत तर ते त्यांना गाळणारच ना! यात प्रॉसिक्युशन नं चुकीचं काय केलं? कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हे प्रॉसिक्युशन ठरवणार ना. डिफेन्स नं त्यांना त्यावेळी त्यांचे साक्षीदार म्हणून का बोलावलं नाही? आणि आत्ता ते हा इश्श्यू का उचलतायत? आणि यड्या हायकोर्टाच्या जज ला हे का कळत नाही?

लालगरूड's picture

8 May 2015 - 12:54 pm | लालगरूड

< marque> आवडले

तिमा's picture

8 May 2015 - 1:02 pm | तिमा

या महान देशांत, न्याय मिळणे, हे तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे.
निदान, ज्या कोणाला त्याला शिक्षा व्हावी असे वाटत असेल त्यांनी स्वयंस्फूर्तीने त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा. अशा तर्‍हेने केवळ जनताच त्याला शिक्षा देऊ शकते.

सामान्यनागरिक's picture

9 May 2015 - 4:28 pm | सामान्यनागरिक

सलमानच्या सिनेमांवर मी तरी बहिष्कार टाकलाय. तो दिसला की च्यानेल बदलतो. कमीतकमी यवढे तरी आपण करू शकतो. सगळ्यांनी हेच केले तर त्याला खरी शिक्षा होईल.

रवीराज's picture

8 May 2015 - 2:16 pm | रवीराज

यांना कधी वाटले कि, विरंगळा म्हणुन एखादे काळविट किंवा तत्सम प्राण्याची शिकार करावी तर ती त्यांना करु द्यावी.

रघुनाथ.केरकर's picture

8 May 2015 - 4:11 pm | रघुनाथ.केरकर

तारे जामीन पर

रेवती's picture

8 May 2015 - 6:18 pm | रेवती

कोण सलमान?

तुम्हाला कोण अ म्हाहितीये ?? रश्दी ? खान ? शहा ? मलिक ?
सगळेच उद्योगी आहेत.. :)

हा त्या नावाचाच प्रॉब्लेम दिसतोय. ;)

विकास's picture

8 May 2015 - 7:10 pm | विकास

काल सलमानला सेशन कोर्टात शिक्षा होई पर्यंत विनापरवाना गाडी चालवणे, दारू पिऊन चालवणे, त्यात अपघात घडल्यावर पळून जाणे वगैरे सर्वच घडलेले होते. तेंव्हा आपल्याला (म्हणजे त्यात मी देखील आलो) कुणालाच काही पोटतिडीकेने वाटत नव्हते. रविंद्र पाटील हे नाव पण त्या व्यक्तीसारखेच दुर्दैवाने इतिहासजमा झाले होते. पण न्यायव्यवस्थेने एक दणका दिला आणि अगदी मस्त दिला. "देर से आये लेकिन दुरुस्त आये" असे म्हणता येईल कदाचीत... पण त्यानंतर सगळी न्यायव्यवस्था गाशाला गुंडाळून कधी हा सल्लू (खरेच) दगड फोडायला लागतोय (एमपीके मधल्यासारखे शूटींगसाठी नाही!) याची घाई झाली आहे.

मधल्या काळात आपल्या पैकी नक्की कोणी कोणी त्याचा एकही सिनेमा तत्व म्हणून पाहीला नाही?

मग आज एकदम अन्याय झाला म्हणून चिडचिड करायचे काही कारण आहे का? सलमानची शिक्षा लवकरात लवकर आमलात यावी असे मला देखील वाटते. त्याला आणि संजय दत्त ला कुठलीही विशेष सवलत मिळू नये आणि तुरूंगातून सुट्टी मिळू नये असेच वाटते. पण म्हणून कोर्टाने नियम न पाळता करावे असे वाटत नाही...

या सर्व चर्चांमधला आणि त्राग्यामधे माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असलाच - तर सलमानची शिक्षा असणे/नसणे हा नसून, कोर्टात जी दिरंगाई चालते तो आहे. Justice delayed is justice denied हा मुद्दा आहे. त्याला अनुषंगून गरीबांना असे जामीन न मिळणे हा देखील मुद्दा आहेच. असो.

आधी त्याचे एक दोन सिनेमेच पाहिले असतील या काळात. मला आठवतोय तो बॉडीगार्ड पाहिलेला, बाकी नाही. पण ते तत्व म्हणून कमी पाहिले किंवा पाहिले नाहीत यापेक्षा सलमान, शाहरुख यांचे सिनेमे बघावेत असे त्यात काही नसते म्हणून. पण रविंद्र पाटील प्रकरण फारसे ऐकिवात नव्हते हे खरे. यापुढे सलमानला बाद करावे की न करावे याचा निर्णय होत नाही कारण आजकाल मिडिया जिथेतिथे आहेच असल्या लोकांना निदान आपल्या करमणुकीसाठी तरी वापरून घ्यावे का असा दुष्ट विचार मनात येतोय.

रविंद्र पाटील बद्धल फारच कमी माहिती उपलब्ध आहे का ?
बाकी ओ ओ जाने जाना वाल्या कमाल खानची एन्ट्री झाली म्हणजे अजुन शाब्दिक स्वरुपात तरी म्हणे... इतक्या वर्षांनी ड्रायव्हर नंतर याचाच "अवातार" न्यायालयात प्रकट व्हायचा बाकी आहे का अजुन ?

जाता जाता :- जामिन { आजचा नव्हे } कोणत्याही "कॉमन मॅन" ला इतक्या लवकर मिळवता येउ शकतो का ? याचा विचार करतोय !
संदर्भ :-Miracles happen with celebrities: How Salman Khan managed to get bail in 3 hours
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Damon Paul - Knight Rider Theme (Official Video HD)

मदनबाण's picture

11 May 2015 - 11:57 am | मदनबाण

जामिन { आजचा नव्हे } कोणत्याही "कॉमन मॅन" ला इतक्या लवकर मिळवता येउ शकतो का ? याचा विचार करतोय !
Unlike Salman Khan, 60% of undertrials spend 3 months in jail before bail

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar

विवेकपटाईत's picture

8 May 2015 - 7:59 pm | विवेकपटाईत

'सत्यमेव जयते' सीरिअल बनविणारा आमीर खान सलमानला भेटला. आता त्याने सीरिअलचे नाव 'लक्ष्मीमेव जयते' ठेवायला पाहिजे.

अभिजित - १'s picture

8 May 2015 - 8:05 pm | अभिजित - १

http://www.narendramodi.in/we-are-living-in-a-democracy-and-there-is-imm...

We are living in a democracy and there is immense trust in our judicial system..whole world admires our judicial system: Narendra Modi

विकास's picture

8 May 2015 - 8:22 pm | विकास

आत्ताच वाचनात आलेले...

The law is a system that protects everybody who can afford to hire a good lawyer. – Mark Twain.

सौंदाळा's picture

8 May 2015 - 8:16 pm | सौंदाळा

एक प्रामाणिक प्रश्न,
असे बरेच अपघात रोज होतात. कित्येक ट्रकचालक, बस ड्रायव्हर, ईतर वाहनचालक दारु पिऊन गाड्या भरधाव वेगाने चालवुन माणसांना मारतात. अशा बर्‍याच केसेस मधे वाहनचालक जामिनावर सुटतात असे पेपरला वाचायला मिळते.
आजच असे ऐकले की सलमान खानच्या केसमधे २ एन्.जी.ओ प्रचंड पैसे लाटण्यासाठी १३ वर्षांपासुन ही केस लावुन धरतायत. साक्षीदारांचे घुमजाव ऐकुन हे खरेच वाटते. कोणाला याबाबत काही अधिक माहिती आहे का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 May 2015 - 1:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे रे सौंदाळ्या. पोलिसही अनेकदा अशा केसचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी करतात.केसचा निकाला लागायला १३ वर्षे लागावीत ह्यावरून पोलिसांच्या कामाची पातळी लक्षात येते.

नूतन सावंत's picture

8 May 2015 - 8:20 pm | नूतन सावंत

सलमान किती चांगला आहे याचा उदो उदो त्याचे वकील करत होते. मुळात तो चांगला असता तर तो दारू प्याला नसता?प्याला असता तर विनापरवाना गाडी चालवली नसती.गाडी चालवून अपघात केला असता तर पोलीकॅंकडे जाऊन कबुली दिली असती.कसला डोम्बलाचा चांगला?ज्याचा बाप निरपराध ड्रायव्हरला बळीचा बकरा करू पाहतो,जामीन मिळाल्यावर सेलिब्रेशनच्या गोष्टी करतो त्याचा मुलगा चांगला असणे शक्य तरी आहे काय?काळापहाड आणि तिमा यांच्याशी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2015 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं हे मिपावरील हे लेखन मला वाट्स्प ग्रुपवर फिरत फिरत आलं आहे. अभिनंदन ! :)

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

9 May 2015 - 10:53 pm | पाषाणभेद

माझे तर मत असे आहे की त्याने असले अनेक पालथे धंदे केलेत अन ते झाकण्यासाठी दानशूरपणाचा आव आणतो आहे.
शिक्षा झालीच पाहीजे.

रवीराज's picture

11 May 2015 - 7:53 pm | रवीराज

रामलिंगमच्या - जामिन मिळाला

लॉर्ड फॉकलन्ड's picture

11 May 2015 - 8:04 pm | लॉर्ड फॉकलन्ड

जयललिता निर्दोष सुट्ली.राजूला जामिन मिळाला.आता लालू आणि अशोक चव्हाण सुटण्याची आतुरतेने वाट बघतोय.

विकास's picture

11 May 2015 - 8:13 pm | विकास

सहमत!

सत्यम् जय झाले!

अम्मा आणि रामलिंगम हे सुद्धा चॅरिटी-वॅरिटी करतात काय ? असा निरागस प्रश्न मनात डोकावुन गेला ! ;)
संदर्भ :- Bhai so nice! Behold the charitable genius of Salman Khan

जाता जाता :-
"It was great fun. Not once did Salman Khan allow anyone feel he was stressed about the impending court verdict. He is a completely chilled guy. I hope I get many more opportunities to work with him."

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

विकास's picture

12 May 2015 - 6:55 pm | विकास

आजच व्हॉट्सअ‍ॅप सारख्या "अधिकृत" माध्यमात वाचल्याप्रमाणे, ; )

दाऊद इब्राहीम भारतात परत येयचा विचार करत आहे. कारण सलमान, जयललीता यांच्या संदर्भातील निर्णय वाचल्यावर त्याचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे.